मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
8 Jul 2015 - 8:28 pm
गाभा: 

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे.

दुवा १ दुवा २ दुवा ३

वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.

धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण...

एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अ‍ॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा.

त्याच अ‍ॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्‍या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली.

नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय.

कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का?

(ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्‍हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

8 Jul 2015 - 8:33 pm | प्रसाद गोडबोले

मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे १००% सत्य आहे .

मी बोटीवर होतो तेव्हा मी माझा मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्ह केला होता आणि मी मिपा चे सदस्यत्व घेतले =))

सूड's picture

8 Jul 2015 - 9:08 pm | सूड

३ (+३) ;)

बॅटमॅन's picture

9 Jul 2015 - 2:22 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

विवेकपटाईत's picture

17 Jul 2015 - 7:29 pm | विवेकपटाईत

आमची सौ. म्हणते तुमचे डोके कामातून गेले म्हणून संध्याकाळी आल्यापासून कामधाम सोडून मिपावर ....

मला तरी हे थोडं संशयास्पद वाटतंय. २ दिवसात हा वर्क्शॉप संपतो म्हणुन जास्त च वाटतंय. बरं डोळे बंद करुन वॉलेट चा रंग का ओळखायचा? ५ वर्षां पुढची मुलं तसं ही कलर्स ओळखतात च की. एकाग्रता वाढवण्यासाठी वगैरे एक्सरसाईझेस असतात पण सातत्य लागतंच त्यात. हळु हळु सवयी लावणं, अस्थिर स्वभाव असेल तर त्याला थोडं स्थैर्य देणं वगैरे त्यात अभिप्रेत असतं. आणि आता लहान मुलं जात्याच हुशार अस्तात. कुणाचं ग्रास्पिंग चांगलं असतं, कुणाला खेळात रस असतो , कुणाला अजुन कशात आणि पालक सुद्धा इतके जागरुक पणे लक्ष देतात की साधारण २ र्‍या , ३र्‍या वर्षापर्यंत मुलांचे हे कल लगेच कळतात. आणि त्यांचं कौतुक पण सगळीकडुन होत असत, त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. एकद रॅट रेस मध्ये उतरले की मग या दुव्यांमध्ये लिह्लंय तसं परिक्षेतले मार्क्स आणि मेडिकल मधलं यश वगैरे मधुन हे असले प्रकार जनमाला येत असावेत आणि त्यांना लोकप्रियता पण म्हणुन च मिळत असणार.

अंतु बर्वा's picture

8 Jul 2015 - 8:54 pm | अंतु बर्वा

प्रत्यक्ष अनुभव आहे. माझ्या मामाचा दहा वर्षाचा मुलाने डोळे बंद करुन (मी स्वतः verify केलं डोळे नक्की बंद आहेत ना?) माझ्याकडच्या नोटेवरचा नंबर अचुक सांगितला. मी मोबाईल वरुन डायल केलेला नंबर (कीटोन अक्टिवेटेड असताना) फक्त आवाजावरुन अचुक ओळखला. फळे आणी ईतर पदार्थांचे रंग स्पर्श न करता ओळखले.

मामांना याबद्दल विचारले असता कुठल्यातरी शिबीरात शिकल्याचे सांगितले. तसेच आपण मुलाला प्रात्यक्षिक करुन दाखवण्यास आग्रह करीत नाही असेही म्हणाले, कारण त्याची इच्छा/मुड नसताना तसे करावयास लावले तर त्याला ते जमत नाही.

कंजूस's picture

8 Jul 2015 - 9:09 pm | कंजूस

असं धरून चला कमालीचं अॅक्टिवेशन येतय पंचवीस हजारात.----

---लगेच एक नवीन ओएस लिहून घ्या मुलांच्याकडून.

द-बाहुबली's picture

8 Jul 2015 - 9:13 pm | द-बाहुबली

ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते

हे ध्वनी व ब्रेन जिम व्यायाम टाँरंटवरही उपलब्ध्द आहे का ?

भौ ही खरी शंका! चेक करायला हवं.

फरंट आणि ब्याकचं अलाइनमेंट करायचे किती घेत्यात ?प्वारीला डाकतर कह्रायचं हाइ.

**च्या गावात! एव्हढेच म्हणू शकतो.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

8 Jul 2015 - 10:18 pm | फुलथ्रॉटल जिनियस

थो तां ड

चित्रगुप्त's picture

8 Jul 2015 - 10:30 pm | चित्रगुप्त

डोळ्यांवर पट्टी बांधून अनेक जादूगार मंडळी भर रस्त्यातून बाईक चालवणे व अनेक प्रकार करतात, त्यापैकी काही प्रकार वाटतो. इथे जो व्हिडियो दिला आहे, त्यातील मुलीला कागद, नोट वगैरे समोर धरावे लागत असताना दिसते, त्याअर्थी तिला पट्टीतून दिसत असणार असे वाटते.
मी स्वतः लहानपणी जादूचे खेळ करायचो, त्यात अगदी अशक्य वाटणार्‍या करामतींच्या मागे अगदी सोपी युक्ती असायची, पण जोवर ती ठाउक नाही, तोवर चमत्कार वाटायचा.
अश्या एकाद्या युक्तीचा पैका कमावण्यासाठी रचलेला हा बनाव वाटतो.
कुणाच्या परिचयात कोणी जादूचे खेळ करणारा असेल, तर तो बरोबर सांगू शकतो.
एक शक्यता संमोहनाची पण वाटते.

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2015 - 10:39 pm | टवाळ कार्टा

मला थोतांड वाटते कारण असे काही असते तर पप्पू विपश्यनेसाठी थायलंड ऐवजी इथेच नस्ता का थांबला

चित्रगुप्त's picture

8 Jul 2015 - 10:40 pm | चित्रगुप्त

मुलीच्या डोळ्यांवर विशिष्ट प्रकारची जी पट्टी बांधलेली आहे, त्यात लहानसा स्पीकर/हेडफोन/ असून त्याद्वारे कोणीतरी तिला माहिती पुरवत असेल. लास वेगासच्या मोठमोठ्या जुगारी अड्ड्यातून अश्या प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात, याबद्दल मोठा कार्यक्रम मागे कोणत्यातरी च्यानेलावर बघितला होता. कोण केंव्हा किती पैसे जिंकतो/हरतो, यावर कसिनोवाल्यांचा पूर्ण ताबा असतो, आणि हे काम अत्याधुनिक तंत्राद्वारे वरील मजल्यावर बसलेले अनेक तंत्रज्ञ करत असतात, असे दाखवले होते.
समोरील विमान वा बस, हत्ती इ. वस्तू क्षणार्धात दिसेनाश्या करणे वगैरे करामती या तंत्राने करता येतात.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2015 - 11:34 pm | श्रीगुरुजी

कोठे गेले श्याम मानव आणि अंनिसवाले?

आनंदी गोपाळ's picture

9 Jul 2015 - 11:25 pm | आनंदी गोपाळ

त्या गोळ्या घालून मारलेल्या दाभोलकरांबद्दल विचारताय का तुम्ही?

श्रीरंग_जोशी's picture

8 Jul 2015 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

दोन अडीच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी वॄत्तपत्रांत एक बातमी वाचली होती.

छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात इस्राइलहून आलेल्या काही तांत्रिकांनी एकाग्रतेच्या जोरावर काही करामती करून दाखवल्या. जसे धातूचा चमचा हात न लावता केवळ बघत राहून वाकवणे. भुजबळांनी (कशाचा तरी आडोसा करून) कागदावर काय लिहिले असेल ते वाचून दाखवणे.

ती बातमी आता शोधताना मिळत नाहीये कारण भुजबळांचा उल्लेख हजारो बातम्यांमध्ये असतो.

दीड वर्षांपूर्वी जादूगार जितेंद्र रघूवीर यांचा कार्यक्रम आमच्या मंडळाने ठेवला होता. अगोदरच्या दिवशी त्यांनी काही साधे प्रयोग आम्हाला दाखवले होते व काहींमध्ये कशी हातचलाखी केली जाते तेही दाखवले होते.

धाग्यात उल्लेखलेल्या प्रयोगांच्या मागेही काही हातचलाखीच असणार हे नक्कीच.

हम्म..इंटरेस्टिंग. मिड राहू द्या आमचा कुठलातरी मेंदू चालू करून दाखवा हे चॅलेंज घेतील का? : )

सामान्यनागरिक's picture

9 Jul 2015 - 1:45 am | सामान्यनागरिक

मी सुधा हा प्रकार पाह्यला आहें . पण वर वर्णिलेले प्रकार सोडले तर या मुलांची बाकी विषयात काही नेत्रदीपक प्रगति दिसलेली नाही कदाचित अजुन काही काळ जावा लागेल
नेटवर शोधले असता दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या
।या विषयातील जाणकाराणी मार्गदर्शन करावे

कंजूस's picture

9 Jul 2015 - 4:47 am | कंजूस

तो dynamo नावाचा जादुगार कमालीच्या जादु ( पाण्यावर चालणे,हवेत उडणे ,कारंज्यातील पाण्याचा बर्फ करणे ,कागदाची फुलपाखरे जिवंत करणे इत्यादी ) करतो रस्त्यातच तरी यास मनोरंजन म्हणतो.हिच माणूस भारतात असता तर ?
काशीला येऊन गंगेत असंख्य दिवे लावले पण तिकडच्या राख फासून बसलेल्या साधुंनी ढिम्म आश्चर्य दाखवले नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jul 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

Dynamo चा शो जर टीव्ही वर असेल आणि मी तिथे असेन तर तो शो फाट्यावर मारतो.

जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. एक प्रेक्षक म्हणुन मला जादुच्या रेसिपीपेक्षा तिची मजा चाखण्यामधे जास्त रस आहे.

जडभरत's picture

11 Jul 2015 - 10:23 pm | जडभरत

भौ बरोबर हाय!!!

यसवायजी's picture

12 Jul 2015 - 11:57 am | यसवायजी

का नाही?
जादूचे प्रकार फारसे बदलत नाहीत. तेच कुठूनतरी काहीतरी बाहेर काढणे, पत्त्याचे खेळ वगैरे. किती वर्षं तेच तेच बघायचं? डोकं चालवून बघितलं, नाहीच जमत. मग आता ट्रिक बघतो.
-
शाळेत असताना एकदा अं.नि.चा एक शो पाहिला होता. तेंव्हापासून "मॅजिक रिव्हील्ड" पहायला आवडते.

"जादु/ हातचलाखी बघण्यात जी मजा आहे ती त्यामागच्या ट्रिक्स समजुन घेण्यामधे नाही. ""-ट्रिक्स नाही समजावत तो.

सिरुसेरि's picture

9 Jul 2015 - 11:42 am | सिरुसेरि

हा प्रकार कर्णपिशाच्च किंवा टेलीपथीचाही असू शकतो .
जादु/ हातचलाखी यांवर आधारीत ख्रिस्तोफर नोलनचा 'द प्रेस्टीज ' हा चित्रपट मस्त आहे .

याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे.

वॉव.. कशी मिळते याची फ्रँचाईजी?

बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता. तिथे मिसळ उत्तम मिळत असल्याने जात असे. तिथेही मिसळ खाण्यात काहीतरी सायंटिफिक आहे असं म्हणत "मिसळ खाण्याच्या अनुभवा"विषयी काही शास्त्रीय किचकट प्रश्न असलेला फॉर्म भरुन घेत होते.

आत मेंदूच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि वेगवेगळ्या सीझन्समधे त्याचे वेगवेगळे भाग कसे अ‍ॅक्टिव्हेट होतात यासम काहीतरी होतं. आहे आहे.. हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!

सतिश गावडे's picture

9 Jul 2015 - 2:30 pm | सतिश गावडे

बाकी अशाच पद्धतीचा पण अगदी हातचलाखी लेव्हलचा न वाटेल असा पंथ लोणावळ्याजवळ केंद्र असणारा बघितला होता.

तो पंथ होता का? शाळेत असताना त्यांचे लोक अधून मधून यायचे आणि कसल्या कसल्या मेंदुच्या आकृत्या असलेली पुस्तके विकायचे. तेव्हा ते सारे खरेही वाटायचे.

मनशक्ती असं काहीतरी नाव होते का?

अस्वस्थामा's picture

9 Jul 2015 - 2:52 pm | अस्वस्थामा

हे सर्व मोठठं सायन्स आहे..!!

हे सगळं मोठ्ठं सायन्स का असतं आणि विज्ञान का नसतं असा प्रश्न मला नेहमीच सतावतो.. ;)

तुडतुडी's picture

9 Jul 2015 - 12:33 pm | तुडतुडी

हे फक्त लहान मुलांच्याच बाबतीत का ? मोठ्या माणसांच्या बाबतीत का नाही ? आणि ह्याची जाहिरात करण्यासाठी वापरलेली मुले त्यांचीच अस्तिल. त्यांना शिकवल्याप्रमाणे ते करून दाखवत अस्तिल. किवा डोळ्यावर बांधलेली ती पट्टी पारदर्शक असेल . आत मध्ये छोटा कॅमेरा , हेड फोन लपवलेला असू शकतो

हं तै!!!! तुमची शंका बराबर है!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jul 2015 - 3:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नुकतीच ही बातमी वाचली होती.
http://www.thehindu.com/news/national/kerala/debunking-midbrain-activati...
भोंदूगिरी आहे असे हे म्हणतात.

संदीप डांगे's picture

9 Jul 2015 - 4:09 pm | संदीप डांगे

मी आत्ताच त्या मालकाला भेटून आलोय. गेल्या नऊ महिन्यातली प्रगती अविश्वसनीय आहे.

मी त्याला म्हटले मला यावर रीसर्च करायचा आहे. तो म्हणाला कधीही या. त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो, जर त्यातल्या एकाही पालकाने म्हटलं की ह्यांनी फसवलंय, हे थोतांड आहे तर मी ही संस्था बंद करून घरी बसेन.

तर मंडळी, तिथे येणार्‍या मुलांवर मी माझ्या पद्धतीने रीसर्च करणार आहे. तुमचे काही प्रश्न, कुतूहल, शंका असेल तर कळवा. अभ्यासात अंतर्भूत करेन.

'जे विश्वास ठेवतात त्यांना कुठल्याही कारणाची गरज नाही. जे ठेवत नाहीत त्यांना कुठलेही कारण पुरेसं नसतं'. या वाक्यात नमूद केलेल्या दोन अवस्थांपलिकडे जाऊन काहीतरी करता येण्यासारखं आहे का? या प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे.

फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?

सतिश गावडे's picture

9 Jul 2015 - 11:35 pm | सतिश गावडे

तुम्ही खरंच या प्रकाराबद्दल स्केप्टीक आहात की एका वेगळ्या पद्धतीने त्यांची जाहिरात करत आहात? :)

संदीप डांगे's picture

10 Jul 2015 - 9:42 pm | संदीप डांगे

गावडेसाहेब, असा प्रश्न येईल हे अपेक्षितच होते.

मी स्वतःला स्केप्टीक म्हणत नाही. कारण जे कोणी स्केप्टीक/रॅशलिस्ट बघितलेत ते फार अहंकारी आणि 'माझं तेच खरं' असं म्हणणारे असतात. त्यांना कितीही समजावून सांगा ते आपला हेका सोडायला तयारच नसतात, काहीतरी बेसलेस एक्स्प्लेनेशन देत असतात आपल्या "वाटण्याचं". मी तरी असंच बघितलंय, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.

मी स्वत:ला अभ्यासक म्हणेल. एखाद्या दाव्यात काय खरं, काय खोटं असं आधीच ठरवून न बघता, सगळ्या बाजूने प्रॉपर विचार करून निष्कर्ष काढणे याला मी महत्त्व देतो.

मला या मिड-ब्रेनच्या वर्किंग लॉजिक मधे अजिबात इंटरेस्ट नाही. ते कसं काम करतं, खरं आहे की फसवतात वैगेरेच्या भानगडीत पडून उपयोग नाही. फक्त रीझल्ट आहेत का? आधी आणि नंतर च्या अवस्थांमधे जाणवण्याइतपत फरक आहे का? आणि तो या कोर्समुळेच झालाय का? या तीन प्रश्नांची उत्तरे शोधायचीत.

रच्याकने: कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय? मी शोधतोय. तुम्ही पण सांगा. खोटा दावा करून तोंडघशी पडणारे हजारो आहेत. पण उलटं उदाहरण अपवादालातरी असायला पाहिजे की नाही?

आनंदी गोपाळ's picture

10 Jul 2015 - 11:23 am | आनंदी गोपाळ

फक्त प्रश्न एवढाच की उद्या (शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करून) मी या प्रकाराला सत्य आहे असं म्हटलं तर विरोधी मत (याचा काहीच अभ्यास नसणारे) असणारे त्यांचा तर्क किती ताणू शकतात?

१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा?
२. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात?
३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार?
४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?

संदीप डांगे's picture

10 Jul 2015 - 9:32 pm | संदीप डांगे

१. "शास्त्रीय पद्धतीने" म्हणजे नक्की कसा?
>> https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method#Process. जी काय माहिती उपलब्ध होईल त्याचे तटस्थपणे संकलन, निरिक्षण व त्यावर प्रयोग करून येणारे परिणाम तटस्थपणे तपासणे. यापेक्षा अजून काय वेगळी पद्धत असेल तर जरूर सांगा मी अंतर्भूत करेन.

२. "अभ्यास" करणार म्हणजे नक्की काय करणार आहात?
>> जी मुले कोर्स करून गेलेली आहेत व इथून पुढे हा कोर्स करणार आहेत त्यांचा विदा गोळा करणार, कौटुंबिक माहिती, शालेय प्रगती, इतर सवयी. कोर्स नंतर त्यांच्यात काय फरक पडला, पालकांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्रमैत्रिणींचं मत, शालेय प्रगतीत पडलेला फरक, इत्यादी विषयांचे माहिती संकलन. शिवाय माझ्या स्वतःच्या मुलाला ह्या कोर्सला घालणार आहेच.(तेही फुकटात होईल याची तजवीज करून आलोय) मी फक्त बाहेरून, वरवर अंदाजपंचे दाहोदसे करणारा बुद्धीवादी नाही. गटारात उतरूनच घाण आहे का हे बघायला लागत असते या विचाराचा आहे. माझी कामे सांभाळून जेवढा जमेल तेवढा वेळ यासाठी देणारच आहे.

३. याचा पियर रिव्ह्यू कोण करणार?
>> तुम्ही करा. जो काय रीपोर्ट तयार होईल तो सगळ्यांसाठी खुला असेल अभ्यासायला. फक्त कुणी नुसतं तार्किक तारे तोडायला नको. कारण त्याचा काय उपयोग नसतो.

४. स म जा, हे प्रकरण भंकस आहे, हे तुमच्या शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झाले, तर त्या लहान मुलांना पुढे करून लाखो पालकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याच्या या गोरखधंद्याबद्दल काय करण्याचा आपला विचार आहे?
>> आम्ही अशा फसवणार्‍यांची बीन-पाण्याने करायला सर्वात पुढे असू. कारण मुले आणि त्यांचे आयुष्य-मन-स्वभाव-इच्छा ह्यांच्या बद्दल आम्ही कमालीचे हळवे आहोत. त्यात कुणीही (अगदी कुणीही बरंका) भंकस करत असेल तर आम्ही त्येनला काय सोडत नाय.

ऋतुराज चित्रे's picture

9 Jul 2015 - 4:16 pm | ऋतुराज चित्रे

हे पहा आणि ठरवा
https://www.youtube.com/watch?v=BoR8uDMCbm0

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jul 2015 - 10:18 am | प्रकाश घाटपांडे

धन्यवाद ऋतुराज चित्रे.
माहितीपुर्ण दुवा आहे.नाशिक अंनिस ने चांगले काम केले आहे.

यासंबंधी अगदी अशीच आठवण माझ्याकडे आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी मी एका कंपनीत अ‍ॅप्रेंटीस असतानाची ही आठवण आहे. आम्हाला शिकवायला जे सर होते, ते एकदा म्हणाले की तुम्ही फळ्यावर जे लिहाल ते मी डोळे झाकून पुन्हा लिहू शकतो. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे रुमालाने डोळे बांधले आणि आम्ही फळ्यावर खडूने काहीतरी लिहीले. नंतर सरांच्या हातात खडू दिला.डोळे बांधलेले असताना सरांनी फळ्यावर आम्ही जे लिहीले होते ते तेच लिहीले.आम्ही अत्यंत आश्चर्यचकीत झालो. मग सरांनी खुलासा केला की तुम्ही ज्यावेळी डोळ्यावर रुमाल बांधला, त्यावेळी खरे म्हणजे मी माझ्या पद्ध्तीने तुमच्याकडुन रुमाल बांधून घेतला. मी खाली थोडी गॅप ठेवली होती.आणि तुम्ही जेव्हा लिहीत होतात तेंव्हा मी त्या गॅपमधून बघत होतो. थोडक्यात मला सगळे दिसत होते.
वरील व्हीडीओत अनिस ने तेच दाखवले आहे.

द-बाहुबली's picture

9 Jul 2015 - 6:06 pm | द-बाहुबली

आस्सयं काय... मग मी सुधा ब्रेन अ‍ॅक्टीवेशनची एक ट्रीक दाखवु शकतो. शेजारच्या खोलीतला मुलगा तुमच्या मनातला पत्ता आपोआप ओळखतो असा तो प्रयोग आहे. बाकी हे अ‍ॅक्टीवेशन खरेच झाले तर मज्जाच मज्जा आहे. अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.

चेष्टा करत नाही. सिरीयस आहे. असे उपद्व्याप शिकलेली लेकरं आजूबाजूला असतील तर नवीन नवरा बायकोचं काय होईल?

त्यासाठी नवीन नवराबायकोच पाहिजेत असं नाही.

आय मीन नवीन आणि नवराबायको या दोन्हीही नेसेसरी किंवा सफिशियंट कण्डिषन्स नाहीत.

नवीन अशासाठी म्हटलं की ते जास्तच अॅक्टीव्ह असतात!!!
हीः हीः हीः!!!!

बॅटमॅन's picture

13 Jul 2015 - 2:19 pm | बॅटमॅन

खी खी खी ;)

द-बाहुबली's picture

13 Jul 2015 - 9:26 pm | द-बाहुबली

यावरुन रिलायन्सने प्रोड्युस केलेला जज ड्रेड नामक तद्दन मारधाडपट आठवला... त्यात बायडीचं नक्कि काय अ‍ॅक्टीवेट केलं गेलं यावर भाष्य नाही पण ती... मिडब्रेन एक्टीवेट केल्याप्रमाणे पावर्स राखते.

अंतु बर्वा's picture

13 Jul 2015 - 11:10 pm | अंतु बर्वा

आमच्या स्कार्लेट जॉन्सनचा लुसी सुद्धा असाच. फरक एवेढाच की यातलं स्त्री पात्र १००% ब्रेन वापरु लागते (साधारण माणसं फक्त १०% ब्रेनचा वापर करु शकतात या गृहितकावरुन).

अवांतरः https://en.wikipedia.org/wiki/Ten_percent_of_the_brain_myth

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2015 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

मी मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशन करून घेतलं तर मला मोठ्मोठ्या लॉटर्‍यांचे नंबर (६+१, ७+१, इ इ) ओळखता येतील काय ? कोणीतरी लवकर सांगा. म्हणजे मला युरोमिलिओनेन आणि युएस मधल्या क्रिसमसच्या जंबो लॉटरी एडिशन्सच्या अगोदर अ‍ॅक्टिवेशन करून घेता येईल !

चित्रगुप्त's picture

10 Jul 2015 - 12:09 am | चित्रगुप्त

अभ्यासाची गरजच नाही, बस मिड ब्रेन अ‍ॅक्टीवेट करुन कॉपी करत करत पेपर लिहुन मोकळे व्हायचे.

असेच होण्याची पूर्ण शक्यता आहे.
इथे दिलेले व्हिडिओ बघून ते मनगटावर चोळणे, वास घेणे वगैरे निव्वळ नाटक असून पट्टीतुन दिसते, हेच खरे असे वाटले.

त्याने म्हटलंय मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलांची लिस्ट देतो,

ताबडतोब ती लिस्ट घ्या आणि त्या सर्वांना भेटा. अर्थात त्यातही काही मखलाशी असेलच, तरी त्यातून काहीतरी कळेलच.
लहान मुलांना, विशेषतः शाळकरी मुला -मुलींना या कामी वापरणे हे अश्लाघ्य आहे, (पण ते फार परिणामकारक आहे).
"शाळकरी मुली" असल्याचा आभास निर्माण करून कशी फसवणूक केली जाते, याबद्दलचे दुसरे उदाहरण अनेकांना ठाऊक असेल.

भीडस्त's picture

10 Jul 2015 - 12:02 pm | भीडस्त

खरंच माहीत नाही असंही फसवतात ते
ओ सांगा ना प्लीज
प्लीज सांगा ना ओ

कुठं फसवतात असं????
;-) ;-)

चित्रगुप्त's picture

14 Jul 2015 - 7:05 am | चित्रगुप्त

दिल्लीजवळील 'तुगलकाबाद' या स्टेशनावरून सकाळी पुष्कळ 'बन्जारन' तरुणींचे जथे लोकल ट्रेनीत चढतात आणि कॅनॉट प्लेस जवळील स्टेशनावर उतरतात. तिथे वेणीफणी करून पिशव्यांमधून आणलेले शाळेचे युनिफॉर्म चढवून, एकादी वही, पुस्तक हातात घेऊन मोठमोठ्या तारांकित हॉटेलात रवाना होतात.

भीडस्त's picture

16 Jul 2015 - 4:28 pm | भीडस्त

धन्यवाद

ऋतुराज चित्रे's picture

10 Jul 2015 - 12:50 am | ऋतुराज चित्रे

५ ते १५ वयाचीच मुले का निवडतात. ह्या वयापेक्षा मोठी का नाही?
हि मुले चष्मेवाली असतील तर उत्तमच. कारण ह्या वयात शक्यतो र्‍हस्वदृष्टिचा नंबर असतो. त्यामुळे एकतर मुलाच्या डोळ्यावर चष्मा नाही व डोळ्यावर काळी पट्टी म्हणजे समोरचाही विचार करतो पट्टितून दिसले तरी चष्म्याशिवाय तो वाचू शकणार नाही. र्‍हस्वदृष्टीवाला लांबचे वाचू शकत नसला तरी जवळचे चष्म्याशिवाय वाचू शकतो.
जे पालक १५००० - २५००० रु. घालवून फसले ते फसलो असे दाखवत नाही स्वतः खोटं बोलतात व आपल्या मुलांनाही खोटं बोलायला भाग पाडतात. त्यामुळे अशा लोकांची दुकाने जोरदार चालू रहातात.
मेंदू जर डोळ्यांशिवाय बघू शकत असेल तर निसर्गाने आपल्याला डोळे कशाला दिले असते. डोळ्यांकडून व कानाकडून आलेले संदेश पुढच्या व मागच्या मेदूकडे वाहून न्यायचे काम मधला मेंदू करतो. डोळे झाकून ठेवल्यावर कोणते संदेश हा मिड ब्रेन वाहून नेणार आहे.

कुठे चालू आहे हो धुमाकुळ ?

मी मागच्या महिन्यात भारतात (पुण्यात) होते. नुक्तीच परत आलेय. मला तर सारं काही शांत शांत दिसलं ?
ते असो ...
सध्या तुमच्या व्यावसायीक चिंता संपलेल्या अथवा कमी झालेल्या दिसतात . ( संदर्भः आत्महत्या करण्याचा विचार --- वगैरे लिहिलेला तुमचा लेख )
अभिनंदन! आणि अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा !

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 2:17 pm | संदीप डांगे

क्षमा असावी. पुण्यात नाही तर जगात नाही असा नियम आहे हे मला माहिती नव्हतं. काय की आमच्या नाशिकमधे गल्लीबोळात हे इंस्टीट्यूटचे बोर्ड्स दिसतायत. चौकशी करून पाहिले तर भारतात बर्‍याच ठिकाणी ही भुछत्रं उगवलेली दिसली. ह्या संस्था आणि यांचे पितळ उघडे पाडणारे यांचे चाललेले जबरदस्त स्टेजशोजपण बरीच पब्लिसीटी खेचतायत असं आढळलं. याबद्दल वर्तमानपत्रांमधेही बरंच लिहून आलंय. पण तुम्हाला पुण्यात दिसलं नाही म्हणजे तो सगळा माझा भ्रम आहे असं मला आता जाणवलंय... धन्यवाद!

असो.

वैयक्तिक चौकशी आणि ख्यालीखुशाली विचारण्यासाठी मिसळपाव.कॉमने आपल्या सर्वांना व्य.नि व खरडवहीची सोय दिली आहे हे आपल्यासारख्या जुन्याजाणत्या सदस्यास माहिती नाही हे बघून फारच आश्चर्य वाटले. तसेच नको ते संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही.

संदर्भ नको त्या ठिकाणी उद्धृत करण्यामागचा उद्देशही कळला नाही.
+१
मलापण तो संदर्भ चुकिचा वाटला.

पुण्यात दिसलं नाही
मी पुण्यातंच राहतो आणी मागच्या आठवड्यातच पेपरबरोबर एक जाहिरात होती - बहुतेक पिंपळे सौदागर मधे आहे अशी एक संस्था. मी ती जाहिरात फेकून दिली नाहितर इथं दिली असती. आधी पण अश्या जाहिराती पुण्यात बघितलेल्या / वाचलेल्या आहेत.

दिलेला संदर्भ इतका टोचला का ? सॉरी बरं का?
कुणाच्या वैयक्तीक आयुष्यातील अर्धेमुर्धे संदर्भ घेऊन नस्त्या कॉमेंटस करणं चूकच आहे म्हणा.
पण तुम्ही तो लेख इथे बोर्डवरच दिला होता , त्यामुळे वाटलं त्यात लपविण्यासारखं काहीच नसावं ... कारण सगळ्यांनीच त्यावर भरपूर चर्चा केली होती. म्हणून म्हणलं इथेच विचारायला काही हरकत नसावी.
पण तुम्ही दुखावलेले दिसता .. म्हणून परत एकदा सॉरी!

असो ...

पुण्यात नाही तर जगात नाही असं नाही .. ठीक आहे . मग नाशीक मधे आहे म्हणजे देशभर धुमाकुळ?
असेलही ...

आणि तेही असोच ...

dadadarekar's picture

11 Jul 2015 - 3:44 pm | dadadarekar

आत्महत्येबद्दल लिहिलेले वेगळे होते व हे वेगळे आहेत

मनिषातै! लिखाण संदर्भ सोडून होतंय असं तुम्हाला वाटत नाही का?

ओहो असा सगळा प्रकार झाला तर. पुण्यात नै म्हंजे भारतात नै हे विसरून गेलो ना आम्ही.

नगरीनिरंजन's picture

11 Jul 2015 - 2:15 pm | नगरीनिरंजन

खरं की खोटं असा प्रश्न पडलेला पाहूनच फेसपाम करुन झाला आहे. चालू द्या.

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 2:48 pm | संदीप डांगे

धन्यवाद!

खरं की खोटं हा प्रश्नच विचारायचा नाही असं काही सांप्रत स्वयंघोषीत बुद्धीवाद्यांनी ठरवून दिलंय. त्याबाहेर सामान्य माणसांना काही प्रश्नच पडू नये व त्यांनी त्यांची उत्तरे स्वतः शोधूच नये असा काहीसा ट्रेंड आहे. मेडीकल सायंस असो वा पॅरानॉर्मल सायन्स असो, अशा कुठल्याही ठिकाणी कुणालाही शंका आली तर त्यांनी प्रश्न न विचारता स्वयंघोषित बुद्धीवादी जे सांगतात ते निमूटपने शिरोधार्य मानायचं असा नियम झालाय जणू. ह्याबाहेर जाऊन कोणी प्रश्न विचारतंय तर आश्चर्य वाटणारच.

काही गोष्टी घडणे कसे अजिबात शक्य नाही असा दावा बर्‍याच संशोधनांपूर्वी केल्या गेला होता. ज्यांनी काहीही अभ्यास न करता नुसत्या पुर्वग्रहांवर अवलंबून हे घडणे शक्यच नाही असा शिक्का दिला ते मागेच राहिले. ज्यांना प्रश्न पडले व त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनाच यश मिळाले. यश म्हणजे असे घडणे शक्य आहे की नाही याचे ठाम उत्तर.

माझ्या मते प्रश्न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण नसून प्रश्नच न पडणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. आंधळेपणाने कुठलाही दावा मान्य/अमान्य करणे हा मूर्खपणा आहे.

तुम्हाला काय वाटतं?

नगरीनिरंजन's picture

11 Jul 2015 - 7:04 pm | नगरीनिरंजन

प्रश्न पडूच नये असे मला म्हणायचे नाही; पण अतिशय ऑबव्हियस बाबतीत प्रश्न पडणे फारच भोळसटपणाचे असून प्रश्न विचारणार्‍याच्या हेतूवरच शंका निर्माण करणारे असू शकते हे तुम्ही पाहिलेच.
खाली अनेकांनी नेटवर्क मार्केटिंग वगैरे उदाहरणे दिली आहेत म्हणजे अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडून गेलेल्या असताना 'सामान्य' माणसाला प्रत्येकवेळी तोच प्रश्न पडत असेल तर फेसपाम होणे भाग आहे.
असा मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते?

डांगेसाहेब मला तर हे बोगस वाटतंय! अशा गूढ शक्ती एक दोन तासाच्या सेमिनार मधून प्राप्त होतील? पूर्वी साधू लोक वर्षानुवर्षे तपस्या करायचे अशा शक्ती मिळवायला.

टवाळ कार्टा's picture

11 Jul 2015 - 3:32 pm | टवाळ कार्टा

मुद्दलात अशी शक्ती अस्तित्वात असायला हवी ना

टकाराजे अशा शक्ति अस्तित्वात असातात!!!

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 12:09 am | टवाळ कार्टा

कशावरुन

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Jul 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जगामधे गुढ शक्ती अस्तित्वात असतात मित्रा. एक छोटसं उदाहरण देतो, पुनर्जन्माचं. तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? नसेल असं गृहित धरु. इथे आपल्या मिपावरचं बघ. आयडी मेला रे मेला की दोन दिवसात पुनर्जन्म घेतो. आता बसला विश्वास?

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 12:03 pm | टवाळ कार्टा

खिक्क...पंण मिपाच्या ब्रम्हदेवाला भेटलोय मी...त्यामुळे मिपावर पुन्र्जन्म होतात हे सत्य आहे

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 3:54 pm | संदीप डांगे

टकासाहेब म्हणतायत तशा ह्या गूढ शक्ती अस्तित्वात असायला हव्या ना? नाही का? त्यामुळे जे दावा करतायत त्यांचा तपासून पाहायला काय हरकत आहे?

गूढ शक्ती वैगेरे काही नसते हो. जे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या आवाक्यात नसते पण घडतांना दिसते ते गूढ. जे आवाक्यात आहे आणि समजू शकते ते का गूढ म्हणायचं?

ऋतुराज चित्रे's picture

11 Jul 2015 - 4:20 pm | ऋतुराज चित्रे

काही शंका.
हे कोर्स चालवणार्‍या व्यक्तिंचे वय किती असते? ते वयाच्या कितव्या वर्षी ही विद्या शिकले?
हा कोर्स केल्यावर एखाद्या मुलाची अभ्यासातील प्रगती प्लॅसिबो नसेल कशावरुन ?

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 4:53 pm | संदीप डांगे

अगदी रास्त शंका चित्रेसाहेब,

मलाही हेच प्रश्न पडलेत. हे शिकवणारे कुठून येतात, ते कोण आहेत, त्यांना हे कोणी शिकवले आणि एवढे पैसे घेण्यासारखे त्यात काय मोठे आहे इत्यादी.

ही सकारात्मक शिकवण देणारी विद्या आहे त्यामुळे प्लॅसिबो म्हणणं जरा गुंतागुंतीचं आहे. मनाला उभारी यावी, एकाग्रता वाढावी, कसलेही भय राहू नये म्हणुन काही क्रिया (जसे स्वसंमोहन वैगेरे) हे लोक करत असतील तर ते नेमकं प्लॅसिबो आहे हे कसं समजायचं? कारण प्लॅसिबो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे खोट्या साधनांद्वारे मिळणारे मानसिक समाधान. इथे थेट मानसिक समाधानच उत्पादन आहे या कोर्सचं.

तुमचे प्रश्न मी अंतर्भूत केलेत. धन्यवाद!

सदस्यनाम's picture

11 Jul 2015 - 6:10 pm | सदस्यनाम

डांगे साहेब जमल्यास अजून एक करा. साधारण पणे २००५ ला अ‍ॅबॅकसचे असेच फॅड आलेले. सध्या काय चालूय त्यांचे माहीत नाही पण जवळपास अशाच अशक्य गणिती क्रिया क्षणार्धात करणे. तोंडी मोठ्या आकडेमोडी करणे वगैरे. त्या कोर्सेस चा किती फायदा दहावी बारावी च्या परिक्षेला झाला. अथवा त्या अ‍ॅबॅकस ट्रेनिंग मुळे एखादे करीअर अचिव्ह केले (नवीन अ‍ॅबॅकस ट्रेनिंग सेंटर ऊघड्ण्याखेरीज) याचा शोध घेतला तर बरीच उत्तरे मिळतील.

संदीप डांगे's picture

11 Jul 2015 - 6:41 pm | संदीप डांगे

Ha ha ha. Yes sure will do it. These type of things never help people to achieve any success in real career. Even if they are valid and true.

चित्रगुप्त's picture

11 Jul 2015 - 5:20 pm | चित्रगुप्त

काही हजार रुपये देऊन करण्याचे जे कोर्सेस असतात, त्यात एक सोय(?) दिलेली असते, ती म्हणजे तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ओळखीच्या लोकांनी केलेली घरगुती शिफारस विश्वसनीय वाटते, आणि जास्त जास्त गिर्‍हाईक मिळत जातात.
या प्रकारे केले जाणारे अनेक धंदे असतात, त्यात तथाकथित अद्भुत शक्ती वगैरेंपासून लाख रुपयात गादी विकणे (तिला गादी न म्हणता 'कंप्लीट स्लीपिंग सिस्टम' म्हणायचे), अमूक एक मंत्र म्हणून जागृत होणार्‍या अध्यात्मिक शक्ती, असे कित्येक प्रकार असतात. दिल्ली भागात एक प्रकार खूप बोकाळलेला आहे, तो म्हणजे अपेक्षित फायदा झाला की त्यातले अमूक टक्के द्यायचे (किंवा उदाहरणार्थ मुलीचे लग्न ठरणे, नोकरी लागणे, कोर्ट केस जिंकणे वगैरे एका महिन्यात झाले, तर अमूक रक्कम देऊ) ठरावीक मुदतीत फायदा झाला नाही, तर टक्केवारी/रक्कम वाढवत जायची, वगैरे. पैसे शेवटी कुणाला पोहोचतात, हे कडेकोट रहस्य असते.
धागाकर्त्याने त्या मुलांच्या पालकांना भेटताना हा मुद्दाही ध्यानात ठेवावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2015 - 5:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले.

ही पद्धत गटविलेल्या गिर्‍हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अ‍ॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jul 2015 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असा प्रकार वाटतोय.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 12:08 am | टवाळ कार्टा

कहर आहे हे

dadadarekar's picture

12 Jul 2015 - 9:25 am | dadadarekar

किडन्या बर्‍या झाल्या की चालायला येते. छान... ड्न्यानात भर प्डलि

प्रकाश घाटपांडे's picture

12 Jul 2015 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे

समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणसाला अमर थोडेच व्हायचे आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!

पुणेकर भामटा's picture

12 Jul 2015 - 10:30 am | पुणेकर भामटा

डांगे साहेब,

हा विषय या ठिकाणी चर्चे साठी निवडल्या बद्दल धन्यवाद. मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे आणि मला असे आढळून आले आहे कि मिसळपाव वर शक्यतो आपले विचार सडेतोड आणि आपल्या प्रतिक्रिया सारासार विचार करून दिलेल्या असतात. असो...,

मध्य मेंदू सक्रियिकरन या प्रकाराबद्दल या लेख पूर्वी मला अजिबात काही माहिती नव्हते, या लेखाच्या निमित्ताने या गोष्टी मला समजल्या आणि अंतर्जालावर या बद्दल माहिती चाळली आणि या प्रकाराबद्दल बरेच कुतूहल जागृत झाले. माज्या आसपास शोध घेतला असता अश्या कुठल्याच सौस्थेची इथे शाखा नाही असे समजले. आपल्याला जर खरोखर अश्या विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळाले तर कृपया खालील मुद्दे जरूर विचारात घ्यावेत …

१. चौकशी निपक्षपाती पद्धतीने करावी, म्हणजे चौकशी साठी जाताना पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बाजूला ठेवावा.

२. या गोष्टीमध्ये नक्की कुठले विज्ञान आहे हे समजावून घ्यायला हवे. (या सौन्स्था विद्यार्थ्यांच्या पाच ज्ञानेंद्रियांना जागृत करण्याचा दावा करतात (दृष्टी, गंध, स्पर्श, चव, ध्वनी) गंधाने विद्यार्थी रंग ओळखतात तर स्पर्शाने त्या वस्तूचा आकार वगरे वगरे.)

३. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडील एखाद्या वस्तूचा (एखादी वस्तू जी फक्त तुम्हालाच माहिती असेल प्रेक्षकांना नाही आणि आयोजकांना तर आजीबात नाही) फक्त रंग ओळखण्यास सांगावे (उदाहरणार्थ खेळाच्या ५२ पत्त्यांमधील एखादा पत्ता), आणि दुसर्यास त्याच वस्तूच्या केवळ स्पर्शाने त्या वरील मजकूर ओळखण्यास सांगावे (या वेळी त्या विद्यार्थ्याने आपल्याकडील वस्तू नाकाजवळ नेता कामा नये)

४. केवळ विशिष्ट वयोगटातील विद्यार्थीच या प्रशिक्षणासाठी पात्र का आहेत यामागचे विज्ञान काय आहे?

५. खरोखर अश्या प्रशिक्षनांमध्ये तथ्य असेल तर जी मुले बौद्धिक दृष्ट्या दुर्बल आहेत (गतिमंद किवा मतीमंद) अश्या मुलांना हे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल का?

६. अश्या पद्धतीने कार्यक्षम केलेला मध्य मेंदू भविष्यात किती वर्षे कार्यक्षम राहील.

आपण नक्कीच यातील तथ्य लवकरात लवकर आमच्या समोर मांडाल अशी अपेक्षा करतो, आपल्याला शुभेच्छा

धन्यवाद,

पुणेकर

संदीप डांगे's picture

12 Jul 2015 - 11:04 am | संदीप डांगे

Thank you.
Intention of this thread is awareness only. If we are aware and discussed these kind of things before accidental encounter of such demos - practices, we can be well prepared to counter attack such frauds. And help weak mentality people to stay away from this Who have habit of falling for crooks

प्रकाश घाटपांडे's picture

12 Jul 2015 - 10:48 am | प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेब्रुवारी २०१५ च्या अंकात फसवे मिडब्रेन अशी डॉ प्रदीप पाटील सांगली यांची एक कव्हर स्टोरी आहे.सांगलीत ही असे एक सेंटर चालू झाले होते. त्यात नाशिक येथेही या एम्बीए वाल्यांना आव्हान देण्यात आले होते असे म्हटल आहे. अंनिस कशा पद्धतीने चाचणी घेउ इच्छिते हे लेखात नमूद आहे. तसेच या एमबीए वाल्याना आव्हान पण आहे.
संदीपजी हा लेख तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.

संदीप डांगे's picture

12 Jul 2015 - 10:57 am | संदीप डांगे

Thank you sir.

Online milel ka he article??

प्रकाश घाटपांडे's picture

12 Jul 2015 - 11:17 am | प्रकाश घाटपांडे

बहुतेक नाही. व्यनि पहा.

संजय पाटिल's picture

12 Jul 2015 - 5:23 pm | संजय पाटिल

हा निव्वळ हात्चलाखि आणी भामटेगीरीचा प्रकर आहे.

एक छोटीशी चाचणी करता येईल. जर हि मुले डोळ्यावर पट्टी बांधून नोटेवरचा क्रमांक ओळखतात तर त्यांना मिट्ट काळोखात सुद्धा हे करता यायला हवे. जर पाहायचेच नाही तर प्रकाशाची काय गरज? आणि या नियमामुळे चोरून पाहणे, रुमालाखालून पाहणे, इतर कोणीतरी संकेताने सांगणे या बाबी वजा करता येतील.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2015 - 9:00 pm | टवाळ कार्टा

+१११

..याच अनुषंगाने अजून प्रश्न.. ..मुळातच अंध असलेले कोणी याचे लाभार्थी आहेत का?..
.अंधत्वावर हे वरदान ठरेल.

भिंगरी's picture

12 Jul 2015 - 10:46 pm | भिंगरी

+++111

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2015 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे

+१०००

प्रयोग करून पहाण्यासारखा आहे !

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 2:10 pm | तुडतुडी

संदीप डांगे साहेब .माझ्या ३ शंका आहेत
१. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ?
२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?
३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ?

ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते>>>
मग हा ध्वनी आपण रेकॉर्ड करून आणि ब्रेन-जिम चा व्यायाम शिकून घेवून आपल्या मुलांचा ब्रेन activate केला तर ? त्यासाठी २०-२५ हजार कशाला घालवायचे ?

कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय?>>>
नक्की कुठला काळ अपेक्षित आहे ? कारण अगदी प्राचीन काळापासून ची अनेक उदाहरण आहेत .सध्याचं अनिस चंच उदाहरण घ्या कि . त्यांना अध्यात्मिक दृष्ट्या develop असणार्या २ जणांनी आव्हान दिले होते . परंतु अनिस ने ते स्वीकारले नाही. त्यातले १ बहुदा नरेंद्राचार्य महाराज होते . दुसर्याचं नाव आठवत नाही . मी पा वरच कुणीतरी ते सांगितलं होतं

मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते>>>
खरं आहे. कारण ह्या सिद्धींच्या जोरावर तो काहीही करू शकतो . तसेच ह्या सिद्धी दुसर्यांना दिल्या तर त्याला प्रतिस्पर्धी नाही का निर्माण होणार ?

संदीप डांगे's picture

13 Jul 2015 - 2:29 pm | संदीप डांगे

१. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ?
>> याबद्दल अधिक माहिती इथे मिळेलः http://www.shichidamethod.com/faq.html

२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?
>> थर्ड आय, इएसपी, सिक्स्थ सेन्स, ब्लाईंडफोल्ड विजन हे सगळे शब्द त्यांच्या शास्त्रिय संज्ञेच्या योग्य अर्थाशिवाय सर्रास वापरले जातात. त्यात शब्दांच्या भुलभुलैय्यात फसण्यापेक्षा माझा भर रिझल्ट्स वर आहे.

३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ?
>>आत्ता तरी माहिती उपलब्ध नाही. चौकशी करून कळवतो.

आव्हानः
'मंत्रांद्वारे जीव घेतल्या जाऊ शकत नाही' हा दाव्याला आव्हान देणारा एक कथित तांत्रीक टीवीवर लाइव शोमधे 'मृत्यूंजय मंत्र' वापरून जीव घ्यायचा प्रयत्न करत होता. ह्या पेक्षा हास्यास्पद प्रकार मी अजून तरी पाहीला नाही. आणि जो कोणी रॅशनलिस्ट हा स्टंट करत होता त्याला कोणी खरा तांत्रीक मिळाला नसेल. किंवा खरा तांत्रीक आणण्याची हिंमत झाली नसेल. खरेखोटे देव जाणे!

जडभरत's picture

13 Jul 2015 - 3:36 pm | जडभरत

२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?

तुम्ही खरंच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मध्यंतरी मी नेटवर काही व्हीडीओ पाहिले होते तूनळीवर. त्यांचा दावा कुंडलिनी शक्ती जाग्रित करण्याचा होता. मी सदर व्हीडीओ उत्सुकता म्हणून पाहिले व ऐकले थोडाच वेळ. काहीतरी विचित्र प्रकाश व ध्वनींचा खेळ होता. नंतर कंटाळा येऊन बंद केले. दोन दिवस माझं डोकं दुखत होतं. रक्तदाब पण वाढल्यागत झाला. लहान मुलांच्या बाबतीत जर काही वाईट घडले तर कोण जबाबदार?

तुडतुडी's picture

13 Jul 2015 - 2:16 pm | तुडतुडी

मेंदूचे डावा आणि उजवा असे २ भाग असतात ना . मधला ब्रेन कुठून आला मग ?

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2015 - 7:25 pm | प्रसाद गोडबोले

मजा आला ।

धाग्यावारील प्रतिसाद पाहून खुप मजा आला :))))

बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।

सतिश गावडे's picture

13 Jul 2015 - 7:34 pm | सतिश गावडे

बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।

म्हणजे असं वाटणारा मी एकटा नाही तर.

शलभ's picture

13 Jul 2015 - 7:39 pm | शलभ

मी पण..;)

संदीप डांगे's picture

14 Jul 2015 - 12:15 am | संदीप डांगे

मी हा धागा काढून मार्केटिंग करतो आहे हे कुणीही सिद्ध करुन दाखवा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2015 - 6:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ते डोळे बांधुन करायचं का डोळे उघडे ठेउन??? =))

(हघ्या. गंमतीमधे लिहिलय)-कॅजॅस्पॅ-

संदीप डांगे's picture

14 Jul 2015 - 11:40 am | संदीप डांगे

आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार... :-)

आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...

असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल.

बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे.

सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल.

या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल.

ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.

सतिश गावडे's picture

14 Jul 2015 - 2:19 pm | सतिश गावडे

अगदी नेमक्या शब्दांत लिहिलंय गविंनी.

आनंदी गोपाळ's picture

16 Jul 2015 - 9:45 pm | आनंदी गोपाळ

असले प्रतिसाद टंकायला काय लागते? तुम्ही फारच स्केप्टिक आहात बुवा.

धागाकर्ते करणार आहेत ते "शास्त्रीय" विश्लेषण येऊ द्या जरा या एम्बीए चे. मग गवि अन त्यांचे तत्वनिष्ठ तर्क कसे तोंडावर आपटतात ते पहाच तुम्ही.

बाकी सर्वात टॉपच्या व्हीडीयोत तो चष्मेवाला तरुण मुलगा आणि मुलगी चांगले सुशिक्षीत दिसताहेत.एम. बी.ए. आहेत का काय माहीत नाही.पण आजकाल काही टुकार एम.बी.ए. कॉलेजांमधे लोकांना **त्या बनवायचेच शिक्षण देतात की काय? मागे मला एका चांगली नोकरी असलेल्या आणि इंजिनीअर असलेल्या मित्राने आग्रह करून करून एका पॉश ठिकाणी प्रेजेंटेशनला नेले. एक तरुण एम.बी.ए. एक्झीक्युटीव्ह आकडेवाडी मोडून बिझिनेस मॉडेल समजावत होता. तासभर त्याची बडबड चालू होती.
दुसरे काही नाही, ते मल्टी चैन मार्केटींग स्कीम होती. पण ज्यांचे त्यात पैसे अडकले होते, ते उगाचाच त्याच्या हो ला हो आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते (माझ्यासारख्या ब-याच नवीन बक-यांना इम्प्रेस करण्यासाठी).
मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे सरळ सरळ थोतांड दिसते आहे. लोकांना मामा बनवून पैसे कमवायचे धंदे. यात वाईट एव्ह्ढेच वाटते की लहान मुलांना यात सामील करून घेऊन त्यांना खोटे बोलायला, दाखवायला भाग पाडले जाते. वरील व्हीडिओत ती लहान मुलगी कार्ड ओळखण्यासाठी हाताला, डोक्याला कार्ड चोळतेय हे चक्क नाटक करतेय हे स्पष्ट दिसतेय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jul 2015 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक चांदणी जास्त पडलीये का हा कुठला नवा शब्द आहे?

जडभरत's picture

14 Jul 2015 - 6:53 am | जडभरत

खीः खीः खीः

शैलेन्द्र's picture

13 Jul 2015 - 8:09 pm | शैलेन्द्र

च्यामारी, धागा भारी न प्रतिसाद लै भारी

प्यारे१'s picture

14 Jul 2015 - 1:38 am | प्यारे१

आमाला 98 नंतर 99 येतं एवढं माहिती आहे.
पुढं काय कल्पना नाय!

अस्वस्थामा's picture

14 Jul 2015 - 3:32 am | अस्वस्थामा

पुढं १००..!!
;)

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे

१०० पार!
या धाग्याचा मात्र मिपावर धुमाकूळ चालू आहे.

'पिंक' पॅंथर्न's picture

14 Jul 2015 - 1:39 pm | 'पिंक' पॅंथर्न

पुणे तिथे काय उणे....

या धाग्याच्या निमित्ताने अजुन एक माहिती शेअर करु इच्छितो. परवा माझी पत्नी मुलीच्या शाळेत गेली होती. तिथे एक पालक म्हणाली की त्यांनी त्यांच्या मुलीला सुंदर हस्ताक्षराचा क्लास लावला आहे. तीन महिन्याचा कोर्स आणि फी ₹ १५ हजार फक्त !!
३ च महिन्यात ते वळणदार अक्षर आणि तेही वेगाने काढायला शिकवतात अशी माहिती त्यांनी दिली.

खरतर एखाद्याचं अक्षर सुंदर आणि वळणदार असणे ही त्या व्यक्तीला मिळालेली नैसर्गिक देणगी असते असे मी मानतो. थोड्याफार सरवाने खराब अक्षर असणारे त्यात थोडी वरची पातळी गाठु शकतात. पण कोर्स वगैरे हे अती झालं. बर त्या बाईसुद्धा कोर्स सुरु केल्यापासुन आमच्या मुलीचं अक्षर सुधारायला लागलयं असा दावा करत होत्या.

मला तर यामधे वरील काही सदस्यांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्केटींगच वाटतय.

मुळात डिजिटल जमान्यात सुंदर हस्ताक्षराची गरजच काय?

अगदी बराब्बर बोलतात. बाकी आजकाल कोण कशाचं दुकान उघडून बसेल सांगता येत नाही.

खटपट्या's picture

16 Jul 2015 - 3:49 pm | खटपट्या

मला बरेचजण हस्ताक्षर सुधारण्याचे क्लास घे म्हणून गळ घालतायत पण निव्व्ळ याच कारणाने मी ते टाळतोय. वर सांगीतल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारणे खूप कठीण वाटतंय. सुलेखन वेगळे आणि हस्ताक्षर वेगळे. चांगल्या सुलेखनकाराचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही.
ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते. कोणत्याही क्लास कींवा कोर्स केल्यामुळे ते सुधारलेले नसते.
नववी दहावीतल्या मुलांना तर हस्ताक्षर सुधारणेच्या क्लासमधे अजीबात पाठवू नये. कारण हस्ताक्षर सुधारायच्या नादात ते सद्या असलेला वेग हरवून बसतील आणि दहावीच्या परीक्षेत भरपूर लीहावे लागते.

चित्रगुप्त's picture

17 Jul 2015 - 12:35 am | चित्रगुप्त

ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते

माझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.

आनंदी गोपाळ's picture

16 Jul 2015 - 9:47 pm | आनंदी गोपाळ

मी चांगलं अक्षर काढलं, तर हा बोगस डाक्टर हाये अशी शंका येती राव लोकास्नी :(

नाव आडनाव's picture

17 Jul 2015 - 9:48 am | नाव आडनाव

:)

बॅटमॅन's picture

17 Jul 2015 - 9:37 pm | बॅटमॅन

डॉक्टरांच्या संपाचे व्यंगचित्र आठवले. त्यांच्या हातांतील फलकांवर काय लिहिलेय हे वाचता न आल्याने कुणी लक्षच दिले नाही वगैरे वगैरे.

त्याने ब-याच शाळांमधे बरेच सेमिनार घेऊन सांगीतले की अक्षर खराब असल्यामुळे ब-याच मुलांना दहावी बारावीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्याने इव्हन हेही पटवले की आधी पालकांचे अक्षर चांगले हवे. तरच मुलांचे अक्षर सुधरेल. आहे कि नाही एका दगडात दोन पक्षी :-)
त्यांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे फेबु. वर जोरदार मार्केटींग चालू आहे.

तुडतुडी's picture

15 Jul 2015 - 5:35 pm | तुडतुडी

मला mid brain activation चा मेसेज आलाय मोबाईल वर. पुण्यात तीळक रोड ला परवा फ्री सेमिनार आहे . बघूया तरी जावून काय आहे हे . आता पुण्यात सुधा धुमाकूळ सुरु होणार कि काय

द-बाहुबली's picture

15 Jul 2015 - 5:47 pm | द-बाहुबली

जरा मेसेज इथेच फारवड करता काय ? जाउन बघतोच काय प्रकरण आहे ते.

संदीप डांगे's picture

15 Jul 2015 - 5:58 pm | संदीप डांगे

+१००००
जेवढ्या मिपाकरांना जमेल तेवढ्यांनी जावा.
पाहीजे तर मिपासाठी खास सेमिनार घ्यायला सांगा त्यांना.
दूध का दूध पानी का पानी....

द-बाहुबली's picture

15 Jul 2015 - 8:31 pm | द-बाहुबली

मालक, मी मनोरंजन म्हणून जाणार आहे. दुध-पानी साठी नाही :)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

15 Jul 2015 - 8:34 pm | ईश्वरसर्वसाक्षी

पुण्यात तीलक रोड ला कुठेशिक आहे ?

अस्वस्थामा's picture

15 Jul 2015 - 9:51 pm | अस्वस्थामा

तीलक रोड

टिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)

तुडतुडी's picture

16 Jul 2015 - 12:42 pm | तुडतुडी

तीलक रोड>>>
खरच चुकलं . माफ करा . टिळक मार्ग बरोबर आहे . मेसेज असा आहे :

What is MIDBRAIN ACTIVATION & how it is going to benefit ur
child for a lifetime. Attend a free seminar on 17th July 7 pm
@MCCIA HALL Tilak Rd, Miscall 9764069900

संदीप डांगे's picture

17 Jul 2015 - 5:09 pm | संदीप डांगे

प्रत्यक्ष सेमिनारला जायची चांगली संधी आहे आज. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जावं आणि या धाग्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर तिथे उत्तर मिळतायत का बघावी. सेमिनारला जाणार्‍यांनी आल्यावर नविन धागा काढून मत मांडलं तरी चालेल.

संदीप डांगे's picture

19 Jul 2015 - 1:36 pm | संदीप डांगे

काय...?

कुनी गेलेवते की नै?

असं कसं चाललं? एवडी मार-के-टींग केली या धाग्यावर... सगळी फेल झाली का बावा?

द-बाहुबली's picture

19 Jul 2015 - 5:26 pm | द-बाहुबली

मी तरी गेलो नाही कारण बाहुबलीच जास्त मनोरंजन करेल असा निर्णय झाला.

या असल्या सगळ्या गोष्टी मी वयाचे १५ पार केल्यावरच का सापडायला लागल्या बरं :(
ते अ‍ॅबॅकस पण तसंच. मोठ्या माणसाना नाही शिकवणार म्हणे.
हे काही खरे असेल असं अज्जिबात वाटत नाहिये. पण असेलच तर काही वर्षांत मोठ्यांना पण कसं हुशार करायचं याचा शोध ही मुलेच लावतील.
मला जर असं काय काय अंतर-ज्ञान मिळालं तर काय बहार येईल या स्वप्नात हरवून गेलेय. :)

बाकी संदीप भाऊ, तुमच्या अभ्यासाचं फलित नक्की सांगा हो.

काळा पहाड's picture

16 Jul 2015 - 4:10 pm | काळा पहाड

पण बौद्धिक वय कमी असलं तरी चालतं म्हणतात. पहा बरं घेतात का ते. :-)

संदीप डांगे's picture

16 Jul 2015 - 4:14 pm | संदीप डांगे

तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. मोठ्यांचेही अ‍ॅक्टीवेशन सुरू केलंय बरंका...?

गिरकी's picture

16 Jul 2015 - 4:21 pm | गिरकी

हो का? दोन्ही बातम्या चांगल्याच आहेत माझ्यासाठी :)

चित्रेचा तारा's picture

16 Jul 2015 - 9:14 pm | चित्रेचा तारा

http://www.mirror.co.uk/news/uk-news/mind-boggling-magician-shows-how-6039713

या चित्र फितीमध्ये सुद्धा मुलगा असाच काहीतरी करत आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा काही दिवस थांबून निर्णय घेणे चांगले.

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? त्यासाठी एवढे पैसे कशाला घालवायचे ?

ऋतुराज चित्रे's picture

17 Jul 2015 - 2:54 pm | ऋतुराज चित्रे

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ?
हि मुले अंधारात अभ्यास करू शकतील त्यामुळे उर्जेची बचत होइल, मुलांच्या वस्तू गहाळ होणार नाही. मुलांना चष्मे लागणार नाही. पोलिसांना श्वानपथक बाळगावे लागनार नाही. ...... असे बरेच फायदे आहेत, पैशाकडे बघु नका.

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा

पण मुले आणि पालक एकाच खोलीत झोपत असतील तर पालकांची गोची नै का होणार?

काळा पहाड's picture

17 Jul 2015 - 4:15 pm | काळा पहाड

तुला रे काय माहीत? तुझं लगीन तर झालेलंच नै अजून.

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2015 - 4:35 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मग कै झाले

आनंदी गोपाळ's picture

17 Jul 2015 - 7:35 pm | आनंदी गोपाळ

मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनच्या पुढच्या स्टेपला शेजारच्या खोलीतलंही दिसतं म्हणे?

सुबोध खरे's picture

17 Jul 2015 - 7:58 pm | सुबोध खरे

गोपाळ राव
मला एक कळत नाही कि हे मिड ब्रेन कशाला अ‍ॅक्टिव्हेट करायला जात आहेत?फोर ब्रेन( मोठा मेंदू) का अ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत? ती अ‍ॅक्टिव्हेट करता आला तर मी सुद्धा आईन्स्टाइन सारखा बुद्धिमान होईन कि. नुसती दृष्टी किंवा कर्ण शक्ती सुधारून माणूस कसा हुशार होणार? वेडा किंवा मतीमंद माणूस सुद्धा व्यवस्थित पाहत असतो किंवा ऐकत असतो.
म्हणतात ना डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी फक्त काही लोकांनाच असते. किंवा गाणी आम्ही पण ऐकतो पण गाण्यात कुठला सूर चुकला हि श्रवणशक्ती आम्हाला नाही. हे सर्व कार्य मध्य मेंदूचे नाही तर आद्य मेंदू( मोठा मेंदू)चे आहे. तो अ‍ॅक्टिव्हेट करायचा सोडून हे काय चालले आहे?
पाईनीयल ग्रंथीला अ‍ॅक्टिव्हेट करतात असे त्यांचे म्हणणे आहे. पण पाईनीयल ग्रंथी शल्यक्रिया करून काढून टाकली तर माणूस ना बहिरा होतो ना आंधळा होतो. मग हे काय?
हे शोधताना मला उत्तर सापडले. ते असे आहे
http://www.midbrain-activation.com/IncomeOpportunity.html
मोठी ईण्ष्टीट्य़ूट काढू. खाऊ पिऊ मजा करू. १२५ कोटी लोकांच्या देशात आपल्या सात पिढ्या चालवू शकतील असा धंदा आहे. येता का?
मला सफाईदार मराठी हिंदी आणी इंग्रजी येते. चार असे विविध भाषा बोलणारे घेऊ.
हा का ना का

काळा पहाड's picture

17 Jul 2015 - 10:00 pm | काळा पहाड

मी पण मी पण

टवाळ कार्टा's picture

17 Jul 2015 - 11:14 pm | टवाळ कार्टा

मी पण येउ का या प्लान मध्ये ;)

सदस्यनाम's picture

19 Jul 2015 - 6:01 pm | सदस्यनाम

ह्या टवाळ नगाला घ्या डॉ. डोळे मिटून गाड्या आणि डुआयडी ओलखतेय.
व्हिडिओ मधे घ्यायला पण बेस्ट स्याम्पल है.

प्यारे१'s picture

18 Jul 2015 - 5:05 pm | प्यारे१

initial investment तुम्ही करा डॉक्टरसाहेब. पुढचं आम्ही बघून घेतो. नफ़ा आम्हाला तोटा तुम्हाला वगैरे... कधी सुरु करताय बोला!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

17 Jul 2015 - 3:35 pm | ईश्वरसर्वसाक्षी

ट.का. पेशल पंच