सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
प्रतिक्रिया
27 Aug 2015 - 10:23 pm | असंका
स्पेस सिटी सिग्मा आणि जंतर मंतर या डी डी वरच्या सिरीयल कुठे मिळू शकतील?
27 Aug 2015 - 10:51 pm | किणकिनाट
ईतकी वर्ष आपल्या पहिल्यावहिल्या केबलला चिकटून राहिल्यावर आता डिश टि.वी. घ्यायचे म्हणतो. आम्हाला दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) लागणार आहेत. टाटा स्काय का ईतर कुठला सेवा पुरवठेदार चांगला? दोन जोडण्या (कनेक्क्षन्स) साठी मासिक शुल्क दुपटिऐवजी एक आणि अर्ध्यापेक्क्षा थोडे कमी द्यायचे पॅकेज कोणि देत का? सेवा , दर्जा कोणाचा चांगला आहे. माहितगार मि.पा. कर मदत करा. महिती आणि सल्ला द्या ही विनंती.
28 Aug 2015 - 2:49 pm | गवि
या धाग्यात प्रतिक्रिया शंभरहून बर्याच जास्त झाल्याने नवा भाग (२) काढला गेला आहे.
http://www.misalpav.com/node/32572