शेजारच्या इमारतीच्या त्रासा बद्दल काय करायचे?

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in काथ्याकूट
9 Jun 2015 - 11:13 am
गाभा: 

आमची इमारत मुख्य रस्याच्या १५ फूट आत आहे. रस्याला लागुन असलेल्या दोन इमारतींमधुन आमचा यायचा/ जायचा रस्ता आहे. त्यापैकी एका इमारतीचे रिप्लास्टरींगचे काम १० दिवसांपुर्वी चालु झाले. आणि आमची परवानगी न घेता त्यांच्या परांतीचे बांबु बांधताना त्यांनी आमच्या इमारतीच्या आवाराचा वापर केला. तेव्हा खाली पडणारे सगळ्या सिमेंट , विटा यांचे तुकडे (रॅबीट) आमच्या इमारतीच्या आवारत पडत होते. ज्याने आमचा पार्कींगमधल्या सर्व बाईक इतरत्र हलवाव्या लागल्या. आणि त्यातच काम चालु झाल्या पासुन ३ र्‍या दिवशी आम्हाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन रॅबीट पडल्यामुळे फुटली व त्या लाईनला असलेला एक नळही तुटला. तेव्हा त्या बिगारी कामगारांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधुन नळाचे पाणी वहाण्याचे बंद केले. आणि खुप वेळा आम्ही सांगितल्यावर २ दिवसानंतर त्या काँन्ट्रॅक्टरने नविन ऩळ बसुवन दिला. पण पाईपलाईनला जी चिर गेली आहे त्यामधुन अजुन थोडे पाणी झिरपतेच आहे. पाणी वाहुन जातेच आहे.

हे काय कमी म्हणुन आता यायच्या जायाच्या वाटेवरच त्या इमारतीच्या एका बाजुचे सांडपाणी आणि संडासचे पाईप आहेत. त्यातील ३ र्‍या मजल्यावर एका सांडपाण्याचा पाईपची कॅप निघाली आणि अजुनच बिकट परिस्थीती झाली.
त्या पाईपमधुन (जो ४ इंचाचा आहे) आता येणार्‍या जाणार्‍या सगळ्यांवर सतत लोटा भरुन जसे आपण आंघोळ करतो तसे पाणी पडते आहे व तेच पाणी मुख्य रस्त्यावर साचुन राहिले आहे. सगळीकडे घाण आहे नुसती.
शिवाय डासांना अंडी घालायला चांगलीच सोय झालेली आहे.
आमच्या इमारतीतले लोक कोणीच लक्ष देत नाहीये. कारण सोसायटी नाही झाली आहे. मी धरुन ( मी २ वर्षे सेक्रेटरी होतो) मोजके २/४ लोकं आमच्या बिल्डींगच्या कामात लक्ष घालतात. आणि ज्या बिल्डींगचे काम चालु आहे त्यांचीही सोसायटी झालेली नाही. बिल्डींगच्या लोकांना काही सांगायला जावे तर सगळे एकमेकांवर ढकलतात. आम्ही त्यांच्या कॉंन्ट्रॅक्टरला फोन करावा म्हणुन आम्हालाच सांगतात. सरळ म्हणतात बिल्डींग धोकादायक आहे अशी तक्रार केलीत तरी चालेल. आता यातुन मार्ग कसा काढावा?
जो मनस्ताप आम्हाला होतो आहे त्यात ठाणे पालिका काही हस्तक्षेप करु शकते काय? कुठे तक्रार करावी. आता सर्व बाजुने इमारत तोडल्यानंतर तो कॉंन्ट्रॅक्टर प्लॅस्टरसाठी रेती मिळत नाही म्हणुन गायब झालाय.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 11:16 am | टवाळ कार्टा

पालिकेत काही सांगायला गेले तर आणखी मनस्ताप होऊ शकतो अशी शक्यता धरूनच कै करायचे ते करा

स्रुजा's picture

10 Jun 2015 - 1:16 am | स्रुजा

मला नाही वाटत. अशीच एक तक्रार या आधी मनपा मध्ये केली होती आणि ती लगेच रेझॉल्व पण झाली.

द-बाहुबली's picture

9 Jun 2015 - 12:14 pm | द-बाहुबली

लोकांची एकी नसेल तर एकुणच कठीण प्रकरण आहे. विशेषतः जेंव्हा सिमेंट , विटा यांचे तुकडे आपल्या इमारतीच्या आवारात पडत होते त्यावेळीच जरा एकी दाखवुन बिंल्डींगमधील कामगारांना दमदाटी करुन काम थांबवले असते तर प्रश्न वेळीच सुटला असता. कारण त्यांना तुमची परवानगी व काम करताना जाळीचा वापर करणे बंधनकारक होते. (आपण अधिकृत सोसायटी धारक नसल्याने परवानगी तुमची हवी की बिल्डरची यावर वकीलाचे मत आवश्यक.)

सध्य स्थितीत जिवीताला व मालमत्तेला धोकादायक बांधकाम करत आहेत म्हणून पोलीसात तक्रार करता येउ शकते असे सकृत दर्शनी मला वाटते. प्रयत्न अवश्य करावा जर किमान ५०% लोक सोबत यायला तयार असतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 12:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलडोझर आणुन शेजारच्या बिल्डिंगवर घाला.

-निळा महाड-

आता सिर्यस सल्ला

त्या काँट्रॅक्टरची गचांडी धरा आणि सगळी रिपेरी करुन घ्या. नाही ऐकलं तर श्रीकृष्णजन्मस्थानाची सफर घडवुन आणा.

कपिलमुनी's picture

9 Jun 2015 - 12:59 pm | कपिलमुनी

कप्तान आजकाल भोसरी, चाकणच्या सफरी करत आहे असे एकंदरीत दिसते :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jun 2015 - 6:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही रे. भलत्याच्या एवढा त्रास आपण का सहन करावा? बरं समजा शेजारधर्म म्हणुन दोन-चार दिवस सहन केलं तर किमान झालेलं नुकसान तरी त्या काँट्रॅक्टर नामक बैलानी द्यायला पाहिजे का नको?

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 10:01 am | काळा पहाड

बैलांचा अपमान केल्याबद्दल निषेध

प्रमोद देर्देकर's picture

9 Jun 2015 - 1:09 pm | प्रमोद देर्देकर

काँट्रॅक्टरची गचांडी धरा >>> ह्या साठी तर आमचेही हाताला खाज येते होती. पण
आणि आत्ताच एका शेजार्‍याचा फोन आला होता. त्या काँट्रॅक्टरने म्हणे मघाशी येवुन कॅप बसवली आहे आणि येत्या दोन दिवसात काय तो सगळे प्रश्न निकालात काढणार आहे.
सगळ्यांना धन्यवाद.

काळा पहाड's picture

9 Jun 2015 - 2:32 pm | काळा पहाड

रोग भी खलास, रोगी भी खलास
Ilaj

धर्मराजमुटके's picture

9 Jun 2015 - 2:33 pm | धर्मराजमुटके

शी बाई ! अस्सा कस्सा मेला तो काँट्रॅक्टर. इथं चांगली शतकी चर्चा व्हायच्या आतच काम पुर्ण करणार ? काय बी मज्जा आली नाय.
प्रमोदराव : तुम्ही पण ना अगदी सत्यवादी हरिश्चंद्र आहात बुवा. अहो अगोदर सल्ले नीट ऐकायचे, शतकी - व्दिशतकी चर्चा होऊ दिल्यावर मग तुमचा वरचा प्रतिसाद द्यायचा ना ! आता आमचे मनोरंजन कसे होणार ? :)

आणि असा कसा रिपेरिंगला तयार झाला तो ?? अचानक ?? ते पण धागा टाकल्या टाकल्या???? मला तर ह्यातून वेगळाच संशय येतो आहे !!!

तुम्हाला माहित आहे न …. धाग्याचे प्रतिसाद "चरमोत्कर्ष " गाठत असताना त्यांना असे मधेच थांबवले कि ते थांबत नाहीत !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हाय हे मिपाप्रभावाबद्दलचे घोर अज्ञान ! :) ;)

नाखु's picture

10 Jun 2015 - 10:06 am | नाखु

बर्याच मिपाकरांना
साक्षात बराक ओबामा पासून ते दांगट पाटील धायरी बु|| पर्यंत शिवाय महाम्हीम दाऊद पासून चिमण हटेला पर्यंतचे लोक मिपा काथ्याकूट वाचलेशिवाय आपले निर्णय घेत नाहीत हेच माहीत नाही.

देव त्यांना सतबुद्धी देवो.

याचकांची पत्रे
नाखु

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा

चिमण हटेला =))

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 7:13 pm | खटपट्या

काही प्रश्न:
१. ठेकेदार गाववाला आहे का ? असल्यास दमाने घ्या. उगाच तुमची मरम्मत करावी लागेल.
२. तुमची सोसायटी नाही म्हणताय. मग तुम्ही दोन वर्षे सेक्रेटरी कसे?

बाकी सर्वांनी दीलेले सल्ले योग्यच आहेत. एकंदर वर्णनावरुन तीनही ईमारती अनाधीक्रुत आहेत असे दीसतेय. तुमच्या नगरसेवकाला मध्यस्ती करायला सांगा. असेही ते लोक काही करत नाहीत. एवढे तरी कर म्हणावं.

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2015 - 1:16 am | श्रीरंग_जोशी

तुमची सोसायटी नाही म्हणताय. मग तुम्ही दोन वर्षे सेक्रेटरी कसे?

सोसायटी अजून नोंदणीकृत झालेली नसेल. एवढे लोक एकत्र राहतात म्हंटल्यावर कार्यकारी समिती असायलाच हवी नाहीतर कारभार कसा चालेल. शुल्क गोळा करणे, बिले भरणे, दुरुस्त्या करवून घेणे अन खूप सारी कामे थांबू शकत नसतात सोसायटीची नोंदणी होईपर्यंत.

बाकी समस्या सुटत आहे याचा आनंद आहे.

खटपट्या's picture

10 Jun 2015 - 7:06 am | खटपट्या

ओके

प्रमोद देर्देकर's picture

10 Jun 2015 - 12:54 pm | प्रमोद देर्देकर

+१११११११११११ रंगाशेठ..

आणि हो ही सग़ळी कामे जो कोणी करतो त्याला बाकीचे साथच / लक्षच देत नाहीत. त्यांना काहीही पडलेली नसते. अमुक एक जण पहातोय ना बिल्डींगची व्यवस्था मग जावु दे त्यालाच बघु दे. अशी भुमिका असते सगळ्यांची.

पहिली सभा झाली त्यात ठराव झाला की प्रत्येकाने (म्हणजे प्रत्येक मजल्यावरील एकाने) किमान १ वर्ष तरी सेक्रेटरीपद सांभाळायचे. पण साले २ वर्षे आणि ३ महिने झाले तरी कोणी जबाबदारी घ्यायला पुढे येईना.
मागिल सभेमध्ये तर सगळे माझ्याच गळ्यात पडत होते अजुन १/ २ वर्षे सांभाळा मग पुढे पाहु काय होते ते.

मग मी ही माझ्याकडे कोणीही एप्रिल -२०१५ पासुन पुढे वर्गणी देवु नये असा पावित्रा घेतला. तेव्हा कुठे ते काम दुसर्‍या शेजार्‍याकडे सोपावले गेले.

( हुsssश सेक्रटरीपदापासुन विश्रांती मिळलेला पम्या)

श्रीरंग_जोशी's picture

11 Jun 2015 - 7:13 am | श्रीरंग_जोशी

मी लहान असताना आई वडिलांनी सोसायटीच्या कामांना वाहून घेतले होते. प्रत्यक्ष पदाधिकारी नसतानाही बहुतांश कामे पदाधिकार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे अन बहुतांश सदस्यांच्या वेळेवर शुल्क न भरण्यामुळे अंगावर पडत असत. मी देखील सोसायटीची बरीच कामे करायचो.

आमच्या सोसायटीचे पाण्याचे, वीजेचे कनेक्शन कापले गेले होते. वेळेत न भरल्यामुळे थकीत बिले प्रचंड वाढली होती. प्रामाणिकपणे वेळेत शुल्क देणार्‍या सदस्यांनाही इतरांच्या कर्माची फळे भोगावी लागली असत.

आतासुद्धा मी विकत घेतलेल्या फ्लॅटच्या सोसायटीतली बरीच कामे माझे वडिल अन त्यांचे समवयस्क शेजारी करतात. सोसायटीच्या तरुण पदाधिकार्‍यांना नोकरीच्या व्यापातून सवड मिळत नाही.

थोडक्यात सांगायचे तर बहुतांश लोक वाटच पाहत असतात की कोण ही कामे आपल्या अंगावर घेतो.

बादवे - मी शेठ नाही, फक्त रंगा :-) .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jun 2015 - 7:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रंगाशेठशी सहमत. :)

नाखु's picture

11 Jun 2015 - 1:00 pm | नाखु

कप्तानशी तसेच रंगाशेठ यांचेशी सहमत.

एके काळी सहकारी गृहरचना संस्थेचा शेकरे@री पदाचा दाहक अनुभव घेतलेला.
नाखु

जाता जाता अश्या संस्थांचे पदाधिकारी हे घरचे नोकर असल्यासारखे उल्लेख इतर सभासदांकडून ऐकले आहेत. "आपला अध्यक्ष काय झोपा काढतो काय? वगैरे.

कळव्यात कोणाचे राज्य आहे माहिती आहे नं ?
( कळवा हा शब्द काढून मिारा भाइंदर,विरार,अंबरनाथ,पिंचिं ही नावे टाकली तरी चालेल)
जाऊ द्या धागा पुढे सुपरफास्ट.

खटपट्या's picture

10 Jun 2015 - 7:26 pm | खटपट्या

थोडे इस्कटून सांगा..

आणखी काय इस्कटायचं बाकी आहे अण्णा?चेन्नई इक्सप्रेस पाहिला नाही का-पर्याय १)गाडी सोडा , २)करा मारामारी.

येवडापण कळवा मागासलेला राहीला नाही आता. याकी कट्ट्याला दाखवतो.

कधी आहे कट्टा इक्सप्रेस?
खारीगाव,शिवाजी पुतळा ते स्टे?
आता इकडे खरडफळा केला तर सेक्रिटरी येऊन हाकलतील.

माझीही शॅम्पेन's picture

11 Jun 2015 - 1:41 pm | माझीही शॅम्पेन

अजुन एक काडी :)
कळवा आणि खारेगाव शेजारी असली तर शेप्रेट आहेत तरी खारेगाववाले स्वत:ला कळव्यात समजतात

खटपट्या's picture

11 Jun 2015 - 8:11 pm | खटपट्या

बरोबर, पण आम्ही खारीगाव आणि कळवा दोन्हीमधे नाही. पारसीक नगर हे स्वतंत्र आहे.

सभ्य माणुस's picture

10 Jun 2015 - 7:30 pm | सभ्य माणुस

थोडेफार पैसे सरकवा , फायदा होइल.

विजुभाऊ's picture

11 Jun 2015 - 2:22 pm | विजुभाऊ

शरद पवाराना सांगा.काम होइल.
कदाचित ते स्वतःच तुमच्या आणि शेजारच्या सोसायटीच्या निवडणुकीत उभे रहातील