दुराभिमान की आत्मसन्मान?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
13 May 2015 - 8:15 pm
गाभा: 

हा विषय बऱ्याच दिवसांपासून मनात घोळतोय याचे कारण म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींचा संदर्भ गेले बरेच दिवस कोणा ना कोणाबरोबर तरी बोलण्यात येतोच आहे आणि योग्य अशी कारणमीमांसा सापडत नाहीये. याच विषयाला अनुसरून मी एका व्याख्यानाला देखील हजेरी लावली होती परंतु त्या वक्त्यालाही या दोघातला फरक तितकासा उलगडून सांगता नाही आला.कदाचित ह्या एका नाण्याच्या दोन बाजू देखील असतील.

आपल्याला आपल्या स्वतःविषयी वाटतो तो अभिमान, दुराभिमान की आत्मसन्मान हे नक्की कसे ठरवावे? याला काही निकष आहेत का? या सगळ्यांची सीमारेषा खूप धुसर आहे आणि ती काही केल्या शब्दात पकडता येत नाहीये. आपल्याला वाटणारा अभिमान दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला आपला दुराभिमान वाटू शकणार नाही कशावरून ? तो तसा नाही हे आपण कसे पटवून देऊ शकतो ?

एखादा वाद विकोपाला जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला हवे तसे न वागता तिला जे पटेल तेच वागते त्यामुळे मग स्वाभाविकच ती आततायी, आढ्यतेखोर किंवा मनमानी आहे असा शिक्का मारला जातो. परंतु त्या समोरच्या व्यक्तीला मात्र तसे वाटत नसते कारण तिच्या जागी तीच बरोबर असते. ह्यातून मग मूळ मुद्दा बाजूला पडून दोघांचेही एकमेकांशी भावनिक पातळीवर युद्ध सुरु होते आणि ह्यात होणाऱ्या आघातांनी होणाऱ्या जखमा कायमस्वरूपी राहतात.

उदाहरणस्वरूपी एक नमुना पाहूया: अ ह्या व्यक्तीचे ब ह्या व्यक्तीशी लग्न झाले आहे. अ ला वाटतंय की ब ने त्याच्या मनासारखं वागावं पण अ हे मान्यच करायला तयार नाही की आपल्यातही काही गुण दोष असू शकतात ज्याचा त्रास ब ला होतोय.त्याच्या मते तो कायमच बरोबर आहे आणि तो स्वताचा आत्मसन्मान जपतोय. जो काही कमीपणा आहे तो ब मधेच आहे किवा ब ने तो मान्य करावा असा अ चा आग्रह आहे. ह्या ठिकाणी अ चा दुराभिमान आहे ही गोष्ट स्पष्ट आहे परंतु कालांतराने सततच्या टीकेमुळे ब ही एक तर पेटून उठू शकते किंवा सगळंच सोडून देऊ शकते. ह्या ठिकाणी पुन्हा अ सगळं ब मुळेच झालंय असा शिक्का मारून मोकळा होतो. अशा परिस्थितीत नक्की ब ने अ बरोबर कसं वागावं जेणेकरून त्याला त्याच्या गैरवागणुकीची जाणीव होऊ शकेल ?

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

13 May 2015 - 9:29 pm | सौन्दर्य

थोडा विचार करू द्या.

आनन्दा's picture

13 May 2015 - 10:33 pm | आनन्दा

क आल्यावर सगळे ठीक होते हो.

चित्रगुप्त's picture

14 May 2015 - 12:06 am | चित्रगुप्त

क आल्यावर सगळे ठीक होते हो.

हे 'क' म्हणजे कोण ? पति पत्नी और "वो" ? मग आटोपलंच सगळं.

सतीश कुडतरकर's picture

14 May 2015 - 3:44 pm | सतीश कुडतरकर

त्यांना क 'झाल्यावर' म्हणायचे होते. पाळणा हलल्यावर म्हणायचं असेल.

माम्लेदारचा पन्खा's picture

14 May 2015 - 4:18 pm | माम्लेदारचा पन्खा

किंबहुना क नाहीच असे समजा....

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 4:32 pm | वेल्लाभट

प्रतिसाद प्रचंड आवडेश

जेपी's picture

13 May 2015 - 10:52 pm | जेपी

जागा पकडुन ठेवली आहे..

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2015 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा

थोडा तिक्कडे सरक जेप्या...,मी पण.. !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 6:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेप्या? जेSssप्या? बाबुभाई से सिधा बाबु? लगता है तेरा भाडा डबल करना पडेगा रे बाबा!! ;)

जेपी's picture

14 May 2015 - 8:28 am | जेपी

जेप्या ?जेSssप्या?>>>
दो बार जेप्या...लगता है तेरेको रामलाल के पास सुलाना पडेगा रे बाबा!!!
=))

प्यारे१'s picture

14 May 2015 - 9:18 am | प्यारे१

ये रामलाल कौन है?

llपुण्याचे पेशवेll's picture

14 May 2015 - 10:24 am | llपुण्याचे पेशवेll

गली का कुत्ता!

नाखु's picture

14 May 2015 - 9:21 am | नाखु

माझी झोपमोड होतेय आणि अन्या आला का भाजलेली कणसं घेऊन ? गरम चर्चेला भारी लागतात ती!!!

बुवांच्या बाजूला आणि बॅट्याची जागा पकडलेला
निरागस नाखु

बॅटमॅन's picture

14 May 2015 - 6:06 pm | बॅटमॅन

धन्स नाखुकाका.

जोकर तंदुरीची वाट पाहणारा,
बॅटमॅन.

स्वप्नांची राणी's picture

13 May 2015 - 11:13 pm | स्वप्नांची राणी

लग्नातच नाही, तर मैत्रीतही हे घडतं...

प्यारे१'s picture

14 May 2015 - 12:09 am | प्यारे१

+१
त्या अभिमान दुराभिमान अहंकार वगैरे मुळे end product काय हाती येतंय ते बघावं. ते तसं बघितल्यावर एकंदर शब्दांकडे कमी महत्व दिलं जावं. कधी प्रेमानं कधी हट्टानं तर कधी हुकुमाशाही वापरून देखील ती गोष्ट पार पाडावी.
त्या गोष्टीचा परिणाम काही दिवसांनी दिसतो, समजूत बदलते, माणूस बदलतं, मत बदलतं.
बाकी सगळ्या अपेक्षित गोष्टी सगल्यांच्या companion मध्ये नसतात म्हणून तर better half (50% च्या वर अपेक्षापूर्ती करणारा किंवा करणारी) असं सम्बोधन आहे.
(कधी कधी इंग्रजी संज्ञा उपयुक्त ठरतात त्या अशा... )

लेख वाचून, प्रथमदर्शनी माझ्या मनात असा विचार येतोय की, सौ. ब ने स्वतःसाठीसुद्धा ( स्वतःपुरते नव्हे) जगावे.

आजचा मेनू :
दिल मेरा, मुझसे है कह रहा, तू.... ख्वाब सजा, तू.... जिले जरा,
है तुझे भी इजाजत, करले तू भी मुहोबत्त.....
बेरंगसि है बड़ी झिंदगी, कुछ रंग तो भरू....
में आपनी तन्हाईके वास्ते, अब कुछ तो करू....
जब मिले थोड़ी फुरसत, खुद से करले मुहोबत्त
है तुझे भी इजाजत......

gogglya's picture

14 May 2015 - 12:53 am | gogglya

असेल तर अशी शक्यता कमी कराता येते. स्वता ह्या अनुभवातुन गेलो असल्यामुळे बरेच काही शिकता आले. मुळात कोणीही पुर्णपणे चान्गले किन्वा वाईट नसते. पण कोणी तरी एकाने सुसन्वाद साधन्याची तयारी ठेवाली तर पुढ्यच्या अडचणी टळू शकतात.

सतिश गावडे's picture

14 May 2015 - 9:58 pm | सतिश गावडे

पण कोणी तरी एकाने सुसन्वाद साधन्याची तयारी ठेवाली तर पुढ्यच्या अडचणी टळू शकतात.

फक्त एकजण सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल आणि दुसरा त्याला भिक घालत नसेल तर काही उपयोग नाही. ते दगडावर डोकं आपटणं झालं. संवाद साधू पाहणारा रक्तबंबाळ होतो.

अत्रन्गि पाउस's picture

14 May 2015 - 1:10 am | अत्रन्गि पाउस

जरा इस्कटून सांगा ...
उगीच अल्जेब्रा नको अ ब क वगैरे ..

विवेकपटाईत's picture

14 May 2015 - 10:19 am | विवेकपटाईत

म्हाळसा आणि भानू मुळे खंडोबाच्या आयुष्यात किती रंगत आली आहे पहा. एक दुसरे लग्न करतो आणि पहिल्या बायकोने ते सहन करावे ही अपेक्षा ही धरतो. मजेदार गोष्ट कधी सेरीअल न पाहणारे खंडोबाच्या दुसर्या लग्नाची कथा चव घेत पाहत आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनात एक वो असतेच. (केस पांढरे झाले, अजून तरी भेटली नाही) असो.

मराठी_माणूस's picture

14 May 2015 - 11:30 am | मराठी_माणूस

त्याच्या मते तो कायमच बरोबर आहे

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑफिस मधील बॉस

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 4:35 pm | वेल्लाभट

साधं उत्तर आहे....

आपला तो आत्मसन्मान, दुस-याचा तो दुराभिमान !

पगला गजोधर's picture

14 May 2015 - 5:15 pm | पगला गजोधर

आपली बहिण … मनमोकळी , दुसर्याची बहिण …. चालू !
आपला असतो … तो तत्वनिष्ठपणा, दुसर्याचा … हेकटपणा !

;) ह. घ्या.

सतीश कुडतरकर's picture

14 May 2015 - 5:09 pm | सतीश कुडतरकर

एक वर्षापूर्वी लग्न झाल्यापासून हेच सर्व अनुभवतोय. आधी आईला न सांगता कुठेही, कधीही रात्री-अपरात्री हुंदडण्याची सवय होती. आईच ती, बिचारी करून करून काय करणार, चार उपदेशाच्या गोष्टी सांगेल. लग्न झाल्यानंतरही हा माझा हक्कच आहे असाच माझा समज होता. बायकोला जणू त्यात गृहीतच धरल्यासारख केलं आणि तिने मला अजिबात आडकाठी करू नये अशीच माझी अपेक्षा होती (अहंगंड) .
मग मी घरी नसताना ती सुद्धा माहेरी जायची. यावरून सारखे खटके उडत होते.

पण सुदैवाने एका मित्राबरोबर नेहमीप्रमाणे मनमोकळेपणाने गप्पा मारीत असताना मी माझी 'व्यथा' त्याला सांगितली. उलट त्याने माझीच चांगली तासली. खरंच, मी तिला वेळच कुठे देत होतो, मी माझ्याच गोतावळ्यात.

शि बि आय's picture

14 May 2015 - 5:12 pm | शि बि आय

फारच गहन प्रश्न आहे बुआ..मानवी स्वभाव अजुन काय??

माझ्या मते ज्याला ज्या भाषेत समाजाते त्या भाषेतच उत्तर दिले तर लवकर समजेल. किंवा अ ला धडा
शिकवण्यासाठी खंडोबा सारखे धक्का तन्त्र वापरावे. बानुला खरे खुरे घरी न आणता नुसती हुल देणे किंवा संपूर्णअसहकार पुकारणे. थोडा त्रास होइल पण फायदा नक्की होइल.

कंजूस's picture

14 May 2015 - 8:58 pm | कंजूस

शब्दच्छल का बोच?

सतिश गावडे's picture

14 May 2015 - 10:23 pm | सतिश गावडे

माप, उत्तर तूच दिलं आहेस.

या सगळ्यांची सीमारेषा खूप धुसर आहे आणि ती काही केल्या शब्दात पकडता येत नाहीये.

कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही गोष्टीबद्दल लहानपणापासून स्वतःच्या अशा धारणा तयार झालेली असतात*. यास त्या व्यक्तीचा पिंड (Nature: genetics/temperament), त्या व्यक्तीची जडणघडण (Nurture: Upbringing/Environmental & Cultural Influence) आणि या दोन्हींचा परस्परांवरील परीणाम (fit of two) या तीन बाबी कारणीभूत असतात.

कुठलीही व्यक्ती सहसा आपल्या धारणा चुकीच्या आहे असं मानत नाही. मात्र ज्या व्यक्ती स्वभावाच्या बाबतीत लवचिक असतात त्या नातं जपण्यासाठी आपल्या मतांची धार बोथट करतात. मात्र ज्या व्यक्ती स्वभावाने आढ्यतेखोर (rigid) असतात त्यांना "त्यांचा विजय होणे" जास्त महत्वाचे असते, मग त्यासाठी नातं तुटलं तरी त्यांना त्याची पर्वा नसते.

*टोकाच्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये या धारणा बदलू शकतात.

अशा परिस्थितीत नक्की ब ने अ बरोबर कसं वागावं जेणेकरून त्याला त्याच्या गैरवागणुकीची जाणीव होऊ शकेल ?

ब ने अ ला विवाह समुपदेशकाकडे नेण्यास राजी करण्याचा प्रयत्न करावा. तसे झाल्यास विवाह समुपदेशक अ आणि ब दोघांनाही कसे वागावे हे सांगतील. त्याने कदाचित फायदा होऊ शकेल.

तसे न झाल्यास ब कसाही वागला तरीही अला त्याच्या गैरवागणुकीची जाणीव होण्याची शक्यता नाही म्हणण्याईतपत कमी आहे. बच्या वर्तनातील बदलाने गैरवागणुकीची जाणीव होण्याईतपत भान अला असतं तर ही वेळ आलीच नसतं. I feel bad for ब.

दुराभिमान विरुद्ध अभिमान होइल आत्मसन्मान नाही.

उपयोजक's picture

15 Jun 2015 - 1:20 pm | उपयोजक

आणि अ ला ब नकोच असेल तर?

नमकिन's picture

15 Jun 2015 - 6:58 pm | नमकिन

शिक्षण, स्वातंत्र्य, लोकशाही, सुबत्ता यासारख्या बाबी चूक की बरोबर हा विचाराला चालना देतात. खरंच चूक/बरोबर असं काही असतं का? की नुसतं असं समजुन (आपल्या तुटपुंज्या बुद्धिची मोजपट्टी लावुन सोक्षमोक्ष लावणे (हल्ली न्यायालयात / खोलात न जाता आपणंच ठरवुन मोकळे होतो). काळा ते धवल यात जेवढ्या छटा असतिल तेवढे सुक्ष्म पदर चूक/बरोबर मध्ये असतात. तेव्हा अ च्या दृष्टिकोनातुन "ब" ला चूक ठरवताना "अ" उपलब्ध संकल्पना, संकेत व समाज यांचा आधार घेऊन "ब" ला माघार/हार मानन्यास भाग पाडु शकतो.
आता जर यात भावनात्मक विरुद्ध व्यवहारीक असे अधिष्ठान प्राप्त असेल तर संघर्ष दोन धृवांवर जाणारा ठरतोच.
फक्त प्रेमाचा ओलावा ही नात्यांची माती घट्ट धरुन ठेवू शकतो, पण ओलावा टिकवुन ठेवणे ही फिरुन "अ"/ब" ची संयुक्त जबाबदारी असते याचे भान अति आवश्यक.
आयुष्यात कुठल्या टप्प्यावर (वय) यावरही बरंच काही अवलंबुन असते. मला वाटतं जो प्रामाणिक आहे त्याला यातना.

उदाहरणासाठी जो प्रसंग दिलेला आहे त्याला एवढे सूक्ष्म फरक असणारे शब्द वापरणे म्हणजे घाई होय. वादाला निकटचा किंवा दूरचा इतिहास असू शकतो ज्यात एखादा असा प्रसंग फक्त ( बहुतंशावेळी ) निमित्तमात्र असतो. एखादा महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे ( ज्याचा परिणाम आणि जबाबदारी नंतर स्वत: घ्यायची तयारी आहे ) अशावेळी उपयोगी पडतो तो अभिमान. दुराभिमान ही एक दृष्टीकोनात्मक व दुसऱ्याला वापरली जाणारी संज्ञा होय . आत्मसम्मान हा प्रतिक्रियात्मक भावनेचा तात्कालिक आवेग आहे.