अरब जगतातील प्रताधिकार नियमांची स्थिती आणि आंतरजालाच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय ज्युरीस्डीक्शन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Apr 2015 - 3:56 pm
गाभा: 

मी एकाही अरब देशात कधी राहीलो नाही, (नाही म्हणायला दोन-चार दिवसांचा अनुभव गाठीशी आहे, तेवढाच). अर्थात आंतरजाल कोणत्याही देशातून पाच मिनीटांसाठी वापरल आणि प्रताधिकारीत मजकुराची देवाण अथवा घेवाण केलीत की देश-विदेशांचे प्रताधिकार कायदे तुमची पाठराखण करू लागतात. काही आंतरराष्ट्रीय करारांमुळे बहुतांश देशांचे कायद्यांमध्ये साम्य असले तरीही फरकही बर्‍यापैकी आढळतात. थोडी फार मिपाकर मंडळी अरब देशातून असतील त्यांच्याकडून त्या त्या देशातील प्रताधिकार विषयक त्यांना काही माहिती आहे का ? असल्यास जाणून घेण्यास आवडेल. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्या साठी अरब जगतातील प्रताधिकार नियमांची स्थितीची ढोबळ माहिती देणारा दुवा देत आहे.

सहसा कायदा बनवण्याच्या आधी/ बनवताना आंतरराष्ट्रीय करारांचा विचार होतो, कायदे लागू होताना तिथले तिथले कायदे लागू होतात.

एक भारतीय नागरीक व्यक्ती आहे, समजा गल्फ मधल्या एका देशात वास्तव्यास आहे, विमानाने प्रवास करताना मधल्या ब्रेक कालावधीत तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या देशातून इंटरनेट वापरते सहाव्या देशातील प्रताधिकारीत मजकुर सातव्या देशातल्या वेबासाईटवर वापरते, आणि त्यापुढे जाऊन वेबसाईटचा अ‍ॅक्सेस मुख्यत्वे आठव्या देशातून आहे. तर कायदे कोणत्या देशाचे लागू होतील प्रताधिकार उल्लंघन झाले असल्यास कोणकोणत्या देशातील न्यायालयापुढे दावा दाखल होऊ शकेल ? (म्हणजे पतंग उडवणार्‍याच नागरीकत्व एका देशातल सर्वसाधारण रहीवास दुसर्‍या देशातला तिसर्‍या देशाच्या भूमीवरून चौथ्या देशाच्या माणसाचा पतंग घेऊन पाचव्या देशाच्या भूमीवरच्या पतंगाशी काटाकाटीचा खेळ खेळला तर कायदे कोणत्या देशातील लागू होतील ? )

आंतरजाल आणि तंत्रज्ञान वेगाने पुढे जात असले तरीही या विषयावरील कायदे आणि विधीतत्वमिमांसा (jurisprudence) अत्यंत मंदगतीने प्रगती करते आहे. या विषयावर साराह बर्ड यांचा लेख या विषयाची ओळख करून घेण्यासाठी चांगला वाटला.

वरील परिच्छेदातील केस मध्ये मजकुर वापरणारा आणि मजकुर ज्याच्या मालकीचा आहे त्यांच्यात आपापसात काही करार असेल आणि त्या करारात काही फिसकटल्यास कोणत्या देशातील कोर्टात केस चालावी याचा उल्लेख आहे का ? वेबसाईटच्या वापरावयाच्या अटींचे स्वरूप त्यात नमुद कायदे आणि ज्युरिस्डीक्शन विषयक भूमिका, वेबासाईटचा वाचक आणि ग्राहक मुख्यत्वे कोणत्या देशात आहे, ज्याच्या मजकुराच्या प्रताधिकाराचा भंग झाला त्याच्या देशातले कायदे काय म्हणतात, व्यक्ती रहीवासास कोणत्या देशात आहे त्या देशातील कायदे काय म्हणतात असा सगळा कायद्यांचा खीस (की कचकचाट ?) असतो. ज्याच्या मजकुराचा कॉपीराईट भंग झाला आणि दावा दाखल करण्याचे आणि त्या साठी कुठेही जाऊन दावे दाखल करण्याची त्याची तयारी आणि त्यासाठी लागणारी क्षमता या प्रॅक्टीकल गोष्टीही असताततच. एवढ्या सार्‍या अडचणी असूनही कायद्याचे हात लांब असतात हे दाखवणारी उदाहरणेही आहेत. आपण सोईस्करपणे कायद्यांना विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते पाठराखण आणि पाठ शिवणी दोन्हीसाठी मागे उभे असतात. Spider Robinson नावाच्या लेखकाच वाक्य आहे To live outside the law, you must be lucky.

तळटिप: भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ चे प्रकरण ९ हे आंतरराष्ट्रीय कॉपीराइट संबंधाने आहे आणि भारत सरकारची इंटरनॅशन कॉपीराइट ऑर्डर १९९९ सुद्धा या संदर्भात महत्वाची आहे.

उत्तरदायकत्वास नकार: या धागालेखातील आणि प्रतिसादांमधील माहिती जुजबी स्वरुपाची असून कोणताही कायदेशीर सल्ला नाही. कुणास कायदे विषयक सल्ल्याची गरज असल्यास परवाना धारक ज्ञानवंत कायदे विषयक सल्लागाराकडून घ्यावा.

प्रतिक्रिया

एस's picture

28 Apr 2015 - 7:45 pm | एस

पास! :-)

कपिलमुनी's picture

29 Apr 2015 - 7:08 pm | कपिलमुनी

मी पण नापास

सुधीर जी's picture

4 May 2015 - 2:59 pm | सुधीर जी

काहिच समजले नाहि.

माहितगार's picture

5 May 2015 - 1:41 pm | माहितगार

गल्फ मध्ये राहणार्‍या एन आर आय मंडळींनी मिसळपाव अथवा भारतीय संस्थळांवर मजकुर अथवा छायाचित्रे प्रकाशित केल्यास नेमके कोणत्या कोणत्या देशाचे कॉपीराइट कायदे लागू होतील ? आणि का ? मला वाटते बर्‍यापैकी मिपाकर मंडळी गल्फाच्या वाळवंटातून वावरत असतात. त्या पैकी कुणी याविषयावर माहिती घेतली आहे का ? असल्यास आमच्याशी शेअर करा असा या धाग्याचा उद्देश आहे.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी

मूळ मजकुर वा छायाचित्रे ज्या देशातील सर्वरवर प्रकाशित असेल त्या देशातील कायद्याच्या कक्षेत येईल असे वाटते.

जाणकार लोकांच्या प्रतिसादाची वाट पाहूया.

>>ज्या देशातील सर्वरवर प्रकाशित असेल त्या देशातील कायद्याच्या कक्षेत----
आपण धागालेखात सुचवलेला साराह बर्ड यांचा लेख वाचल्या नंतरही ही प्रतिक्रीया देत आहात का? या संस्थळ आणि सर्वरचे मालक सहाजिकपणे त्या देशातील कायद्याच्या कक्षेत येतील असे वाटते. एरवी इतर लोक कोणत्या कायद्याच्या कक्षेत येणार याचे गणित एवढे साधे सोपे नसण्याची शक्यता लक्षात आल्यामुळेच ह्या धागा लेखाचा प्रपंच माझ्याकडून केला गेला आहे.

याच धागालेख विषयाचे आणखी एक रोचक उदाहरण माझ्या समोर आले आहे. नव्हेंबर २०१४ मधीले मराठी म्हणींविषयीच्या एका मिपा चर्चेत मिपा सदस्य आदुबाळ यांनी, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात राहून गेलेले एक ख्रिश्चन धर्मगुरु अल्फ्रेड मानवरींग नामक लेखकाने मराठी म्हणींच्या इंग्रजी अनुवाद इ.स. १८९९ मध्ये इंग्लंड मधून प्रकाशित केला आहे आणि तो (Marathi proverbs (1899) by Alfred Manwaring) अनुवाद ग्रंथ अर्काइव्ह डॉट ऑर्गवर (गूगल सौजन्याने) उपलब्ध केला गेला आहे याकडे लक्ष वेधले.

आमेरीकन (US) कायद्यान्वये १९२३ पुर्वी प्रकाशित ग्रंथ प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातात (अर्काइव्ह डॉट ऑर्ग आणि गूगलनी बहुधा याचा आधार घेतला असावा). १८९९ ह्या पुस्तकाच्या प्रकाशन वर्षी भारतातील १८४७चा कॉपीराईट कायदा लागू होतो ज्यात पुस्तकांच्या बद्दल प्रताधिकार विषयक तरतुद लेखकाचे आयुष्य + ७ वर्षे (किंवा पुस्तक प्रकाशना पासून ४२ वर्षे जो कालावधी अधिक असेल तो) अशी काहीशी आहे. आल्फ्रेड मानवरींग सायबांचा जन्म १८५५ मध्ये झाला असावा, मृत्यूचे नेमके वर्ष माहित नाही पण ते १९५० असण्याची शक्यता आहे. १८४७च्या भारतीय कॉपीराइट कायद्यानुसार भारतात हे पुस्तक १९५७ अथवा लेखकाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचा कयास बांधल्यास फारतर (१९५५+७ =) १९६२ मध्ये प्रताधिकार मुक्त होते. इंग्लंडात भारतातल्याच १८४७ च्या आधीच्या म्हणजे १८४२ चा कायदा लागू होतो त्यातही लेखकाचे आयुष्य + ७ वर्षे अशीच तरतुद आहे पण तरीही ब्रिटनमधल्या नंतरच्या इतर कायद्यांनी (युरोपीयन युनियन सोबत) कॉपीराईट तरतुदी लेखकाचे आयुष्ञ + ७० वर्षे एवढ्या एक्स्टेंड केल्या त्या मुळे अल्फ्रेड मानारींग यांचे सदर पुस्तक युरोपात २०२० किंवा २०२५ पर्यंत कॉपीराईटेड राहील.

थोडक्यात आमेरीकेतला कॉपीराइट केव्हाच संपला, भारतातला मध्येच संपला आणि युरोपात मात्र सदर पुस्तकावर अद्याप कॉपीराइट आहे. आता विकिप्रकल्प हे विकिमिडीया फाऊंडेशनच्या आमेरीकेतल्या सर्वर वर असले तरी त्यांच्याच वेगवेगळ्या साइटची भूमिका वेगवेगळी आहे. कसे ते पाहू.

मी सदर ग्रंथ इंग्लंडातही कॉपीराइट फ्री आहे या गैरसमजुतीने विकिमिडीया कॉमन्स या प्रकल्पात चढवण्याचा प्रयत्न केला परंतु विकिमिडीया कॉमन्सवरील इतर सदस्यांनी माझा गोड गैरसमज मोडीत काढून सदर ग्रंथ ब्रिटनमध्ये आणि बहुतांश युरोपात अद्याप प्रताधिकारीत असल्याचे लक्षात घेऊन ग्रंथ विकिमिडीया कॉमन्सवर ठेऊ देण्यास नकार देऊन वगळण्याचा निर्णय घेतला कारण विकिमिडीया कॉमन्सवर सर्व देशांच्या दृष्टीने साहित्य १००% कॉपीराइटमुक्त असेल तरच ठेवता येते. सदर ग्रंथ भारतीय कायद्यांच्यानुसार प्रताधिकार मुक्त असल्यामुळे मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पास हा ग्रंथ चढवता आणि वापरता येईल कारण मराठी विकिस्रोत प्रकल्पाचा उपयोग (अ‍ॅक्सेस) मुख्यत्वे भारतात होणार आहे हे लक्षात घेऊन विकिमिडीया फाऊंडेशन भारतीय भाषी विकिंना भारतीय कायद्यांप्रमाणे निती अनुसरण्यास सुचवते कारण ग्रंथ चढवणार्‍या भारतीय व्यक्तीस भारतीय कायदे लागू होतील. विकिमिडीया फाऊंडेशनचे सर्वर आपण म्हणता तसे आमेरीकेत असल्यामुळे आमेरीकेतसुद्धा ग्रंथ प्रताधिकार मुक्त आहे का नाही हे पाहण्यास सांगीतले जाते पण त्याचा हेतु विकिमिडीया फाऊंडेशन आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या दृष्टीकोणातून आहे. भारतीयांसाठी भारतीय कायद्यांखालील नितींचेच अनुसरण करण्यास सांगीतले जाते हे इथे लक्षात घेतले पाहीजे. इंग्रजी विकिस्रोत प्रकल्प आमेरीकेतून जास्त अ‍ॅक्सेस होतो म्हणून त्या प्रकल्पाची निती सदर ग्रंथ आमेरीकन कायद्यांचा हवाला देऊन अपलोड करू देते हे खरे पण कायद्याची वस्तुस्थिती पहा कशी गमतीची असेल की आमेरीकेत सर्वसाधारण रहिवास (डोमीसाईल) असलेल्या व्यक्तीने सदर ग्रंथ आंतरजालावर उपलब्ध केल्यास त्याच्यासाठी प्रताधिकारभंग होणार नाही (सर्वसाधारण रहिवास डोमीसाईल महत्वाच नागरीकत्वाची कसोटी दुय्यम आहे हे लक्षात घ्यावे) युरोपात सर्वसाधारण रहिवास (डोमीसाईल) असलेल्या व्यक्तीने सदर ग्रंथ आंतरजालावर उपलब्ध केल्यास त्याच्यासाठी युरोपात प्रताधिकारभंग होत असेल.

अर्थात या विषयावरील कोर्टकेसेस आणि कायदे यांचा अधिक अभ्यास सातत्याने चालू ठेऊन अधिकाधीक लेखन होणे गरजेचे आहे. उपरोक्त माहिती सर्वसाधारण व्यक्तीगत मते आहेत कायदेविषयक सल्ला नव्हेत. कायदे विषयक सल्ला नेहमी ज्ञानवंत परवानाधारक सल्लागाराकडून घेणे श्रेयस्कर असते. सर्व उत्तर दायकत्वास नकार.

माहितगार's picture

8 May 2015 - 7:48 am | माहितगार

आपण एखाद्या संस्थळाला भेट देत असतो तेव्हा ते संकेतस्थळ वापरण्याच्या अटींबरोबर वाचक आणि उपयोगकर्त्यांशी करार होत असल्याचे जाहीर करून अटींसोबतच कायदे आणि न्यायालयीन कार्यक्षेत्र कुठले लागू होईल हे जाहीर करत असतात. असे एक उदाहरण झी मराठीच्या वेबसाइटच्या वापरण्याच्या अटींमध्ये वाचण्यात आले.

त्यात This Agreement is made between Zee Entertainment Enterprises Limited and you as a site visitor and /or Member ("You").... अशी करार होत असल्याचे सुचवत सुरवात आहे. त्यातील क्लॉज १ principal place of business जाहीर करतो. क्लॉज २ The www.zeemarathi.com website is hosted in India and is subject to the laws governing the Republic of India. आणि You are only authorized to use the www.zeemarathi.com website (regardless of whether your access or use is intended) if you agree to abide by all applicable laws and to these Terms of Use and the privacy policy referred to in Clause 1 above

यात तुमचा उद्देश अथवा अ‍ॅक्सेस जगात कुठूनही असू दे भारतीय कायदे लागू होतील हे या वापरण्याच्या अटींमध्ये सुस्पष्ट नमुद केले आहे.

कायदे कुठले लागू होतील हे, करारात नमुद करणे आणि नमुद न करणे यांचा (संबंधीत देशातील कायदे आणि न्यायालये यांना हे करार कुठ पर्यंत मान्य होतात त्यावर अवलंबून) न्यायालयीन दाव्यांच्यावेळी अंशतः परिणाम होत असावा.