बाइक्स घेताना - भाग ४

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in तंत्रजगत
27 Apr 2015 - 1:20 pm

बाईक्स घेताना - भाग १
बाइक्स घेताना - भाग २
बाइक्स घेताना - भाग ३

...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत

१३५ cc

"ना घर की ना घाट की" segment

१३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै...

बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त)
मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त
दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे)
किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी
तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच
अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे)

पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो
मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी?

अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे

Bajaj Pulser 135- LS

pulser-135-ls

Bajaj Discover DTSi 135

discover-135

Hero Honda Achiever

achiever

पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे

http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे

Bajaj Pulser 135- LS

बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला...

Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine

भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही)

4 valve इंजिनाचे फायदे

इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते
इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा
कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते

(अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव)

टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले

बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे
१३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.)
speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते
इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही

लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे

clip-on handlebars
split seats
DC circuit
5 step adjustable rear Nitrox shock absorber

ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन"

*ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;)

Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

प्रतिक्रिया

सामान्यनागरिक's picture

28 Apr 2015 - 3:20 pm | सामान्यनागरिक

बाईक फक्त बुलेटच ! बाकी सगळी खेळणी हो !
पण तूमचं चालु द्या ........

अच्च तल्ल...आमाला खेल्नीच आवल्ते...च्ला च्ला...

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 12:35 pm | टवाळ कार्टा

आयला तु अ‍ॅव्हेंजर वरून आता बुलेटच्या मागे?

नाय बुलेट नाय आत्ताच स्टेप बाय स्टेप जायच.आदी avenger नंतर पुढे..

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 12:43 pm | टवाळ कार्टा

जमीन आस्मानाचा फरक आहे रे :)

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 12:34 pm | टवाळ कार्टा

बाईक फक्त बुलेटच ! बाकी सगळी खेळणी हो !
पण तूमचं चालु द्या ........

बुलेटसाठी एक सेप्रेट धागाच काढायचा आहे...बाकी बाईक्स एक तरफ और बुलेट एक तरफ असे बुलेटवाले(च फक्त) बोलतात...पण माझ्यामते बुलेटची बाकीच्या बाईक्स बरोबर तुलना करणे हे सफरचंद आणि संत्र्याच्या तुलनेसारखे आहे

बाकी मागे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे माज असल्याशिवाय बुलेट देत नाहीत म्हणे ;) (हे ह.घे.)

gogglya's picture

18 May 2015 - 8:17 pm | gogglya

काय म्हणणे आहे? Reality-of-a-bullet-owner

कपिलमुनी's picture

30 Apr 2015 - 12:38 pm | कपिलमुनी

मारूतीच्या बेंबीत गार लागणे

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 12:43 pm | टवाळ कार्टा

खिक्क...तरी बरे तुम्ही बुलेटवाले असून असे बोलताय :)

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2015 - 12:46 pm | दिपक.कुवेत

+९९

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2015 - 12:47 pm | दिपक.कुवेत

आता काहि लिहायचचं म्हणून्...छान आहे धागा (न वाचता)....

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 12:50 pm | टवाळ कार्टा

आता काहि लिहायचचं म्हणून्...छान आहे धागा (न वाचता)....

कुठे फेडाल ही पापं :)

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2015 - 12:58 pm | दिपक.कुवेत

तुझ्याच धाग्यांवर!!!

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा

खिक्क

मुक्त विहारि's picture

30 Apr 2015 - 1:47 pm | मुक्त विहारि

आवडला...

मी २००७ पासून बजाज डिस्कवर १३५ सीसी चालवत आहे. आतापर्यंत जवळजवळ सव्वा लाख किमी चे रनिंग झाले आहे. मला बजाज अ‍ॅव्हेंजरचे बर्‍याच दिवसापासून कुतूहूल आहे. तिचा मायलेज कमी आहे हे अगोदरच माहित आहे पण एकूण सुरक्षितता, चालवण्यातील आराम याबाबतीतले अनुभव हवे आहेत. शक्यतो कोणी ही गाडी वापरत असेल तर आवर्जून लिहा.
वापर : सिटीमधे रोजचे रनिंग : ७० ते ७५ किमी. (कमीतकमी १५-२० दिवस)
मुंबई पुणे दौरा : महिन्यातून दोन वेळेस. एकूण वापर अंदाजे ७००-८०० किमी.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 11:32 am | टवाळ कार्टा

मी २००७ पासून बजाज डिस्कवर १३५ सीसी चालवत आहे. आतापर्यंत जवळजवळ सव्वा लाख किमी चे रनिंग झाले आहे. मला बजाज अ‍ॅव्हेंजरचे बर्‍याच दिवसापासून कुतूहूल आहे. तिचा मायलेज कमी आहे हे अगोदरच माहित आहे पण एकूण सुरक्षितता, चालवण्यातील आराम याबाबतीतले अनुभव हवे आहेत. शक्यतो कोणी ही गाडी वापरत असेल तर आवर्जून लिहा.
वापर : सिटीमधे रोजचे रनिंग : ७० ते ७५ किमी. (कमीतकमी १५-२० दिवस)
मुंबई पुणे दौरा : महिन्यातून दोन वेळेस. एकूण वापर अंदाजे ७००-८०० किमी.

परवडत असेल तर कार घ्या किंवा (वजन) झेपत असेल तर बुलेट :)

मी आत्ता Avenger 220 DTSi वापरतोय...रोज ५० कि.मी.

अ‍ॅवेंजर मस्त बाईक आहे...जर तुमचा चालवायचा रोजचा रस्ता पक्का डांबरी/काँक्रिटचा, खड्डे विरहीत, मध्ये मध्ये उंचवटे नसलेला असेल तर...एकदम आरामखुर्चीमध्ये बसून बाईक चालवल्याचा फील आहे...मला ४० kmpl चे मायलेज मिळते :)

पण जर रस्ता वर लिहिल्याप्रमाणे नसेल तर विचारसुध्धा करू नका, कारणे

ground clearance फार कमी आहे...बाईक खालून घासली जाऊ शकते
पाय पुढे सोडून बसायला लागते त्यामुळे खाचखळग्यांतून जाताना पाठीच्या मणक्याला खूप जास्त हादरे बसतात कारण हादरे बसल्यावर पायाच्या मदतीने हादर्यांचा परिणाम कमी नाही करता येत

डिस्क ब्रेक वापरायचा अनुभव नसेल तर आधी हळू हळू ब्रेक लावायची प्रॅक्टिस करा...अ‍ॅवेंजर बाकी बाईकपेक्षा लवकर स्किड होते (लांबलचक असल्याने) पण कमी स्पीडला (३५ kmph पेक्षा कमी) स्किड झाली तर बाईक दोन्ही पायांच्या मधून घसरून निघून जाईल व तुम्ही मात्र जागच्या जागी २ पायांवर उभे असाल :)

धर्मराजमुटके's picture

8 May 2015 - 3:05 pm | धर्मराजमुटके

सविस्तर प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद ! कार घेणे हा विचार आहेच पण मुंबईच्या ट्राफीकमधे कारवाले देखील वैतागतात. कधी कधी तर चक्क असुयेने बाईकवाल्यांकडे बघतात. रोजच्या प्रवासासाठी बाईकशिवाय पर्याय नाही. कमी वेळात इच्छीत स्थळी पोहोचता येते. शिवाय पार्कींगचा प्रश्न इतका बिकट झालाय की कधी कधी बाईकसाठी पार्की़ग शोधताना देखील नाकी नऊ येतात.

टवाळ कार्टा's picture

8 May 2015 - 3:13 pm | टवाळ कार्टा

मुंबईत असाल तर अ‍ॅव्हेंजर चालून जाईल

चौथा कोनाडा's picture

17 May 2015 - 5:51 pm | चौथा कोनाडा

नविन बाईक घ्यायची होती म्हणुन बाजरात तुलनात्मक अंदाज घेतला व होंडा युनिकॉर्न (१५० सीसी) घ्यायचे नक्की केले. युनिकॉर्न-१५० सीसीचे उत्पादन बंद करण्यात आले असुन नविन स्टाईल्ड युनिकॉर्न-१६० सीसीचे बुकींग चालु आहे, युनिकॉर्न-१६० ची डिलीव्हरी मिळायला दोन अडीच महिने लागतील असे शोरूम मध्ये सांगितले.

३१-मार्च-२०१५ किंमती वाढणार असल्याने व बाईकची निकड असल्याने व स्टाईलच्या तुलनेत होंडा ट्रिगर सरस वाटल्याने मग तीच घेतली. होंडा ट्रिगर स्टॅन्डर्ड: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । ऑन-रोड प्राईस रु. ८०, ५००

My_CB_Trigger

याच श्रेणीतल्या इतर काही बाईक्सच्या ऑन-रोड किंमती पुढील प्रमाणे होत्या (३१-मार्च-२०१५ पुर्वी) :

१) सुझुकी गिक्सार: १५५ सीसी । १४.८ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ८५,५००
२) यामाहा एफझी, सिंगल कलर : १५५ सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ९०,०००
३) यामाहा एफझी, डुअल कलर : १५५ सीसी । १४.८ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ९२,०००
४) होंडा ट्रिगर डिलक्स: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक । रु. ८४,०००
५) होंडा ट्रिगर सीबीएस: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक वुईथ सीबीएस । रु. ९१,०००
६) होंडा युनिकॉर्न, स्टॅन्डर्ड : १६० सीसी । १४.५ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ८४,०००
७) होंडा युनिकॉर्न, सीबीएस: १६० सीसी । १४.५ बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक वुईथ सीबीएस । रु. ९०,०००

टवाळ कार्टा's picture

17 May 2015 - 8:01 pm | टवाळ कार्टा

हिचे आणी युनीकॉर्नचे ईंजीन सारखेच आहे...फक्त डिझाईन मला यामाहा एफझी वरून "inspired" वाटते ;)

चौथा कोनाडा's picture

18 May 2015 - 11:22 am | चौथा कोनाडा

हो, अगदी, अगदी ! डिझाईन मला यामाहा एफझी वरून "inspired" आहे समजतेच, पण इंधन टाकीचे वशिंड (बम्प) जरासा माईल्ड केलाय. आफ्टर ऑल दिज आर जेन्ट्लमन्स बाईक्स ! :-) अति-स्टायलिंग ज्याना आवडत नाही, त्यांना पसंत पडण्या सारखी आहे.

वाट बघतोय ..

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2015 - 12:05 pm | टवाळ कार्टा

जर्रा आळसावलेलो आहे सध्ध्या...कट्ट्यांचा सिझन सुरु आहे ना :)
मिपाकर वाट बघत आहेत हे पाहून छान वाटले...आजच टंकायला सुरु करतो पण २०० cc च्या आधी २ भाग आहेत भौतेक :)

मुक्त विहारि's picture

26 May 2016 - 7:04 pm | मुक्त विहारि

वाखूसा.