एका शेतकर्याची आत्महत्या

आकाश कंदील's picture
आकाश कंदील in काथ्याकूट
24 Apr 2015 - 11:01 am
गाभा: 

केजरीवाल नावाचा हिमनग पाण्यात किती आणि दिसतो किती

जे झाले ते खूपच दुखदायी होते पण खालील मुद्दये सौंशय उत्पन करतात

१. १० एकर शेत, २ फळबागाचा मालक.
२. फेटा बांधायाचा व्यावसाय करत होता.
३. आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे १.५० लाख होते(शंका वाटते)
४. समाजवादी पार्टीतून २ वेळा निवडणूक लढला.
५. कॉंग्रेस मध्ये गेला होता.
६. आता आप मध्ये होता.
७ झी न्यूज (२३/०४/१५) दाखवलायानुसार, त्याचा भाऊ सांगतो आत्महत्येच्या चिट्ठीतले अक्षर त्याचे नाही, पुरावा
म्हणून त्याचे हस्ताक्षार दाखवले.
७. श्री मनीष सिसोदियानि बोलावले म्हणून दिल्लीला गेला असे घरचे सांगतात.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

24 Apr 2015 - 2:03 pm | क्लिंटन

खरोखरच धक्कादायक. अशाही बातम्या येत आहेत की गजेंद्र सकाळी ११ च्या सुमारास मनीष सिसोदियांच्या घरी गेला होता. तसेच त्याच्या नातेवाईकांना त्याने फोन करून काही वेळात मला टिव्हीवर बघा असेही म्हटले होते. त्याच्या शेतीचे नुकसान झाले पण तो आत्महत्या करणार्‍या इतर शेतकर्‍यांप्रमाणे गरीब नव्हता अशा बातम्याही येत आहेतच. त्याचा फेटे बांधायचा व्यवसाय होता आणि (खरे) बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांना राजस्थानी फेटा या गजेंद्रनेच बांधला होता. त्याची देहबोली आत्महत्या करायला प्रवृत्त झालेल्या माणसाप्रमाणे नव्हती आणि तो व्यवस्थित होता निराशेच्या गर्तेत नव्हता असे त्याला ओळखणार्‍या अनेकांनी म्हटले आहे.तसेच तो झाडावर चढला त्यावेळी हातात आपली पादत्राणे घेऊन चढला असे फोटो आले आहेत. आत्महत्या करणारा माणूस आपल्या पादत्राणांची काळजी करेल हे जरा अनाकलनीयच वाटते. एकूणच या प्रकरणातून अनेक प्रश्न जन्माला आले आहेत--

१. हा मोठ्या कटाचा भाग होता का? म्हणजे आआपने नेहमीप्रमाणे कोणतीतरी नौटंकी करायचे ठरविले होते पण आयत्या वेळी तो प्रयत्न फसला म्हणून आता ते पोलिसांना दोष देत आहेत?
२. मनीष सिसोदियाशी त्याचा काय संबंध होता?
३. त्याच्या तथाकथित आत्महत्येपूर्वीच्या पत्रात त्याने स्वतःचे नाव सुरवातीला उपेन्द्र लिहिले होते आणि मग ते खोडून गजेन्द्र केले. आत्महत्या करायला जाणारा माणूस आपले नावच चुकीचे कसे लिहेल? मुख्य म्हणजे ते तथाकथित पत्र त्याने लिहिले होते का? कारण त्यातील हस्ताक्षर आणि गजेन्द्रचे हस्ताक्षर वेगळे होते (असे त्याचा बहिणीने म्हटले आहे)---कंसातील भाग स्वसंपादन करून लिहिला आहे.
४. त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण त्याला उतरवून हॉस्पिटलमध्ये नेले जात होते हे तर स्पष्टच होते. तरीही कुमार विश्वासने गजेन्द्रने लिहिलेल्या पत्राचा उल्लेख स्टेजवरून करताना 'मी आत्महत्या करत आहे' हे गजेन्द्रच्या पत्रात नसलेले वाक्य त्याच्या तोंडी का घातले?

या सगळ्यातून हा मोठा कट होता असे वाटायला लागले आहे.

इतरही अनेक प्रश्न आहेत.चर्चा रंगल्यास लिहिनच.

पैसा's picture

24 Apr 2015 - 6:15 pm | पैसा

संध्याकाळी परत येतो असे तो बोलल्याचेही त्याच्या बहिणीने सांगितले.

अर्धवटराव's picture

24 Apr 2015 - 9:19 pm | अर्धवटराव

सिसोदिया साहेबांनी प्रथम यादव, भूषण वगैरे मंडळींना बाहेरचा रस्ता दाखवला. आता केजरीसाहेबांविरुद्ध डावपेच सुरु केलेत?

या साठमारीत एक जीव हकनाक गेला :(

मृत्युन्जय's picture

24 Apr 2015 - 3:30 pm | मृत्युन्जय

हे तर आहेच. याहुन घाणेरडी गोष्ट म्हणजे आपच्या नेत्यांनी नंतर केलेली किळसवाणी चेष्टा आणि चाळे:

१, तिकडे तो माणूस मरतो आहे आणि इकडे हे नालायक लोक भाषणबाजी करत होते
२. तो मेल्यानंतर २ तास यांची भाषणबाजी चालू होती. आपल्यामुळे एक माणूस प्राणाला मुकला याची यांना ना खंत ना खेद. युगपुरुष तर हसत होते आणि टाळ्या वसूल करत होते.
३. पोलिसांनी त्या माणसाला वाचवायचा प्रयत्न केला पण आप्टार्ड्सनी त्यांना पुढे जाउच दिले नाही. वर मखलाशी केली की पोलिस आपच्या विरोधात आहेत म्हणुन त्यांना पुढे जाउ दिले जाणार नाही. असे म्हणाणारे आणि पोलिसांना त्या माणसाला मदत करण्यास विरोध करणारे सगळे खूनी आहेत आणि त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. लोकांच जीव जातो आणो यांचा खेळ होतो.
४. आप्टार्डस चक्क टाळ्या वाजवुन त्याला प्रोत्साहन देत होते. चक्रम आणि विकृत. किळसवाणे तर नक्कीच.
५. तो माणूस झाडावरुन खाली पडल्यावर पोलिस त्याला हॉस्पिटल मध्ये घेउन जाण्यासाठी सरसावले होते. कदाचित तो त्यावेळेस जिवंत असेलही. पण खुन्यांनी पोलिसांना पुढे जाउ दिले नाही.
६. आशुतोषने तर हद्द केली "पुढच्यावेळेस मी केजरीवालना स्वतः जाउन मरणार्‍या माणसाला झाडावरुन उतरवायला सांगेन" असे म्हटला.
७. आशुतोषने अजुन मखलाशी करताना म्हटले की जर मिडीयाला असे वाटाते की त्या शेतकर्‍याच्या मृत्युसाठी आम्ही जबाबदार आहोत तर महाराष्ट्रात झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्मह्त्येबद्दल काय? दोन्हीमधला फरक न कळण्याइतपत तो मुर्ख आहे????
८. खालील व्हिडीयो खरा असेल तर कुमार विश्वास हा एक थर्ड ग्रेड माणूस आहे असे मी म्हणेनः

https://www.youtube.com/watch?v=3KELpbzBPQM

तिकडे तो माणूस मेला आहे आणि हा निर्लज्जपणे विचारतो आहे "लटक गया?" आणि मग फाशी घेतल्याची अ‍ॅक्शन करतो? डिसगस्टिंग. माणसं नाहित ही जनावरं आहेत. विकृत, किळसवाणी, निलाजरे.

अवांतरः वरील सर्व गोष्टी बातम्या वाचुन लिहिल्या आहेत.

स्पंदना's picture

24 Apr 2015 - 4:05 pm | स्पंदना

अतिशय डिस्टर्बिंग घटना.
त्या माणसाचा शेवटचा फोटोसुद्धा त्याला काही मरायची इच्छा आहे असे दाखवत नाही. मे बी त्याला तू असं नाटक कर अस सांगुन ऐनवेळी मदत न करता मारलेला दिसतो आहे.
खूप वर्षापूर्वी एका अश्याच आंदोलनात दोन तरुणांना आत्मदहन करण्याच्या नावाखाली जाळलं होतं अशी बातमी अस्पष्टशी आठवते आहे. फार वर्ष झाली.
पण काल पासून तो पेपरमध्ला झाडावर चढलेला फोटो अतिशय अस्वस्थ करुन राह्यलाय.

नेहमीप्रमाणे कोणतीतरी नौटंकी करायचे ठरविले होते पण बिचारयाच्या दुर्दैवाने तो खरच लटकला. मरणारा माणुस आपले नाव चुकिचे कसे लिहेल ? उपल्ब्ध माहिति वरुन तरि हा धडधडीत खुन आहे. केजरीवाल ह्या प्राण्याचा आणि त्याच्या आजुबाजु ला असलेल्या चाटु मंडळि (कधि कधि तर वाटते आता लाळ गाळतात का हे) सिसोदिया, हा लिंगपिसाट विश्वास चा मला पहीले पासुन तिरस्कार, चिड येते.. पण जे काहि अकलेचे आंधळे ह्यांच समर्थन करतात त्यांची किव येते मला. मरणारी व्यक्ति झाडावरुन घोषणा देत होति त्याच्या गळ्याच्या भोवति त्याने फास होता आणि हे येडझवे त्याला आणखि उत्तेजित करित होते, तो सुधा कहि तिथे मरायला नव्हता आला पण त्याचि नौटंकि त्यालाच नडलि.
पण जे काहि आहे आणि दिल्लित पुढिल ५ वर्ष होणार आहे ते दुर्दैवि आहे.

पण जे काहि आहे आणि दिल्लित पुढिल ५ वर्ष होणार आहे ते दुर्दैवि आहे.

हे दुर्दैवी असले तरी दिल्लीकरांनी ते स्वतःवर ओढावून घेतले आहे.आआपने दिल्लीकरांना पहिल्यांदा शेंडी लावली तेव्हा त्याचा दोष आआपवर. पण आता दिल्लीकरांनी आआपला दुसर्‍यांदाही शेंडी लावू दिली असेल तर ती चूक दिल्लीकरांचीच.

मला वाटते की दिल्लीत पूर्ण ५ वर्षे केजरीवालांच्या आणि आम आदमी पक्षाच्याच मर्कटलीला चालू राहूदेत. सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर काय परिणाम होतात हा दिल्लीचा अनुभव इतर राज्यातील मतदारांना दिसायलाच हवा.

आता मी पण म्हणतो #पाचसालकेजरीवाल

विकास's picture

24 Apr 2015 - 5:08 pm | विकास

आपने स्वतःची (ना)लायकी परत एकदा सिद्ध केली आहे. काल कुठेतरी वाचले (आणि लॉजिकल वाटले) हेच एकेंना अण्णांच्या आमरण उपोषणाच्या वेळेस करायचे होते पण सुदैवाने जमले नाही. ते दुर्दैवाने गजेंद्र सिंगच्या बाबतीत घडले. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ....

"आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये तो मौत बन जाये" असे समजून शहाण्यांनी यांच्यापासून चार हात लांब राहीलेले उत्तम....

विकास's picture

24 Apr 2015 - 5:21 pm | विकास

(लेखनामधे किमान वापरायचे,आदरार्थी बहुवचन मला वापरावेसे देखील वाटत नाही...)

तो आशुतोष टाईम्सच्या टिव्हीवर आकांडतांडव करत रडत भाजपा-काँग्रेस-मोदींच्या नावाने अक्षरशः गळे काढत होता. दुसर्‍या बाजूला गजेंद्र्ची १२-१४ वर्षाची मुलगी संयमीत पणे फोन वर होती, ती "मला बोलू द्यात म्हणत होती" पण शेवटपर्यंत त्याच्या कोल्हेकुईने तीला धड बोलू दिले नाही.

दिल्लीकरांना जो उषःकाल वाटला होता ती भयावह कालरात्र आहे.

तो आशुतोष टाईम्सच्या टिव्हीवर आकांडतांडव करत रडत भाजपा-काँग्रेस-मोदींच्या नावाने अक्षरशः गळे काढत होता. दुसर्‍या बाजूला गजेंद्र्ची १२-१४ वर्षाची मुलगी संयमीत पणे फोन वर होती, ती "मला बोलू द्यात म्हणत होती" पण शेवटपर्यंत त्याच्या कोल्हेकुईने तीला धड बोलू दिले नाही.

पुर्ण नाटकीपणा आहे हा. इतका कळवळुन रडलाय की ढोंगीपणा स्पष्ट दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2015 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

हाच तो व्हिडिओ ! ज्याने त्याने व्हिडिओ बघून आपले मत बनवावे...

कालच्या टाईम्सनाऊ वरच्या रात्रीच्या न्युज अवर चर्चेमध्ये नेहमी सर्वांच्या बोलण्यात अडथळे आणणार्‍या (हेकलिंग करणार्‍या) खैतान यांना बसलेली दातखीळही बरेच काही सांगून जाते

क्लिंटन's picture

25 Apr 2015 - 2:12 pm | क्लिंटन

महानालायक माणूस आहे तो (अर्थात आआपमध्ये महानालायक नसलेले असे कोण आहेत हा एक प्रश्न आहेच).

२२ एप्रिलला ही घटना घडली. २३ तारखेला पक्षाच्या वतीने कुमार विश्वास, संजय सिंग आणि आशुतोष यांची पत्रकार परिषद झाली त्याचा व्हिडिओ खाली दिला आहे. त्यात बघता येईल की सुमारे ५ मिनिटे व्हिडिओत झाल्यावर तो चक्क हसत आहे. म्हणजे २३ तारखेला त्याला काही धक्काबिक्का बसलेला नव्हता पण २४ तारखेला मात्र रडायचे नाटक करता आले.

हाच मनुष्य आआपकडून लोकसभा निवडणुकांमध्ये चांदनी चौकमधून कपिल सिब्बलविरूध्द उभा होता. कपिल सिब्बल परवडला इतका उध्दटपणा आणि रग या माणसात भरलेला आहे.या निवडणुकीत एक वेळ कपिल सिब्बल परत जिंकला असला तरी चालले असते पण हा हलकट माणूस जिंकू नये असे वाटत होते आणि सुदैवाने कपिल सिब्बल आणि आशुतोष दोघेही हरले :)

दुसरे म्हणजे याच पत्रकार परिषदेत गजेन्द्रसिंग आणि मनीष सिसोदिया यांचा नक्की संबंध काय या प्रश्नाला मात्र संजयसिंगने कशी बगल दिली हे बघायला मिळेल.

क्लिंटन's picture

25 Apr 2015 - 2:18 pm | क्लिंटन

कालच्या टाईम्सनाऊ वरच्या रात्रीच्या न्युज अवर चर्चेमध्ये नेहमी सर्वांच्या बोलण्यात अडथळे आणणार्‍या (हेकलिंग करणार्‍या) खैतान यांना बसलेली दातखीळही बरेच काही सांगून जाते

हा आशिष खैतान म्हणजे दुसरा महानालायक आणि हलकट माणूस आहे. तो पूर्वी तहलकामध्ये होता यातच सगळे काही आले.कालच टाईम्सनाऊवरील कार्यक्रम (वरील प्रतिसादात उल्लेख केलेला) बघितला.यांना प्रश्न विचारणारा प्रत्येक माणूस म्हणजे अडानी-अंबानींचा एजंट आहे आणि भाजपच्या पे-रोलवरचा आहे असली बकवास सर्वप्रथम याच आशिष खैतानने सुरू केली. काल तो अडानी-अंबानीचे एजंट असल्याचा आरोप इतरांवर कधी करतो याचीच वाट बघत होतो.पण कुठचे काय? हा मनुष्यच स्वतः रूईयांचा एजंट असल्याचे आता उघडकीस येत आहे हा दैवदुर्विलास म्हणायचा का?

मार्मिक गोडसे's picture

26 Apr 2015 - 10:33 am | मार्मिक गोडसे

अरे मी तर ह्याला चांगलाच ओळखतो, हा तर आमचा 'आंसु'तोष.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2015 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

मागे एकदा आपसंबंधीच्या एका धाग्यावर टिव्ही डिबेटमध्ये (त्यावेळेस आपमध्ये असलेल्या) यादव यांचे वागणे कांगावाखोर आणि वाद-प्रतिवाद सहेतूक अर्धसत्यावर आधारीत आहेत आणि असे करणारी कांगावाखोर माणसे किती धोकादायक असू शकतात याबाबत लिहीले होते.

आपच्या बाबतीतल्या आतापर्यंतच्या घटना पाहता असेच मत बनत आहे की, "आपमधल्या अतीकांगावाखोर लोकांनी कांगावाखोर लोकांना यशस्वीरित्या आपबाहेर काढले आहे !"

काल नेपाळ आणि उत्तर भारतात झालेल्या अत्यंत दुर्दैवी महाभूकंपामुळे सगळ्या देशाचे आणि माध्यमांचे लक्ष सहाजिकपणे यांच्या कारवायांवरून तिकडे वळले आहे.

होबासराव's picture

24 Apr 2015 - 6:48 pm | होबासराव

माझ्या प्रतिक्रियेत भाषा थोडि असभ्य वापरल्या गेली.. पण नाहि संयम राह्त हो.. हा सगळा वेडगळ पणा पाहिला कि.

तिमा's picture

24 Apr 2015 - 6:54 pm | तिमा

हे प्रकरण 'आप' ला भलतेच जड जाणार आहे.

प्रदीप's picture

24 Apr 2015 - 7:41 pm | प्रदीप

हे प्रकरण 'आप'ला अजिबात जड जाणार नाही.

आता दिल्ली पोलिसांबद्दल कांगावा सुरू होईल. आम्ही त्यांच्याशी सहकार्य करू इच्छित होतो,पण त्यांनी आम्हाला झिडकारले, अशी हवा करून देण्यात येईल. कालांतराने दिल्ली पोलिसांनी कुणास अटक केलीच, तर ती राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा कांगावा केला जाईल.

आतापासून काही वर्तमानपत्रे 'आप'बद्दद्ल अतीव सहानुभुतीची भूमिका घेत आहेत असे दिसते. हिंदुस्तान टाईम्सच्या प्रमदर्शनी पानावर 'आशुतोशला रडू कोसळले' ही बातमी (त्याच्या फोटोसह) व तोच व्हिडीयोही रूजू आहेच. ह्याच वर्तमानपत्राच्या संस्थळावर मघा एक अगदी सविस्तर लेख होता, त्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा साईनाथांच्या रिपोर्टासकट अगदी सविस्तर 'उहापोह' केला गेला होता, व ही आत्महत्याही त्याच मालिकेचा पुढील बिंदू आहे, व तो मोदी सरकारला लांछ्नास्पद आहे, वगैरे बतावणी केलेली होती.

ह्या सगळ्या गदारोळात 'आप'मधल्या नुकत्याच झालेल्या व अद्यापि सुरू असलेल्या अंदधुंदीपासून हटवून प्रकाशझोत, पद्धतशीरपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेल्या भाजपाच्या केंद्र सरकारवर टाकण्यात आप नेतृत्व यशस्वी झाले आहे.

आता इथून पुढे काय होईल? चार दिवस ह्या घटनेचे उलटसुलट चर्वितचरण होईल. कालांतराने नवे स्कँडल समोर दिसू लागेल (खरे अथवा, बहुधा काल्पनिक), मग त्यामागे सगळा रेटा जाईल. ही घटना, मुख्यत्वे त्याच्यामागील 'आप'चा असलेला भाग संपूर्ण विसरला जाईल. नंतर, भाजपच्या केंद्रातील सरकारवरील एक नवा कलंक म्हणूनच ह्या आत्महत्येचा उल्लेख संबंधित मंडळी जाहीरपणे करीत राहतील.

विकास's picture

24 Apr 2015 - 8:23 pm | विकास

तुम्ही काही म्हणा पण सागरीका बाई म्हणतात तेच खरं आहे... (थोडक्यात "आप" हे त्यातून विसरून जा!)

आणि (त्यांच्या मते) मोदी काय करतात ते पहा...

प्रदीप's picture

24 Apr 2015 - 8:50 pm | प्रदीप

And the scumbags continue their march, their voices getting shriller and shriller!

क्लिंटन's picture

25 Apr 2015 - 4:57 pm | क्लिंटन

कालांतराने नवे स्कँडल समोर दिसू लागेल (खरे अथवा, बहुधा काल्पनिक), मग त्यामागे सगळा रेटा जाईल.

सध्या तरी नेपाळमधील दुर्दैवी भूकंपामुळे पुढील २-३ दिवस तरी बर्‍याचशा महत्वाच्या बातम्या त्याविषयीच्या असतील असे वाटत आहे. आपच्या पापापासून लोकांचे लक्ष दूर घालवायला मिडियाला एक आयताच मुद्दा मिळाला आहे.

विवेकपटाईत's picture

26 Apr 2015 - 8:40 am | विवेकपटाईत

दिल्लीत सर्व लोक याला आपची नौटंकी म्हणतात आहे. ह्या नाटकाचे परिणाम आपला भोगावेच लागणार आहे.

विकास's picture

24 Apr 2015 - 6:59 pm | विकास

जाहीर प्रश्न विचारू इच्छितो...

येथे इतर वेळेस आपचे आणि केजरीचे गुणगान करणारे आप समर्थक कुठे गेले? त्यांच्या कडून त्यांचे प्रांजळ मत मांडले जावे ही विनंती.

मृत्युन्जय's picture

24 Apr 2015 - 7:09 pm | मृत्युन्जय

केजरु के गुलाम हे नामाभिधान सार्थ करण्यासाठी तोंड लपवुन बसलेत ते. मालकाने छू केल्याशिवाय येणार नाहित

क्लिंटन's picture

24 Apr 2015 - 9:38 pm | क्लिंटन

येथे इतर वेळेस आपचे आणि केजरीचे गुणगान करणारे आप समर्थक कुठे गेले? त्यांच्या कडून त्यांचे प्रांजळ मत मांडले जावे ही विनंती.

छे हो भलत्याच अपेक्षा तुमच्या. मागे मिपावर उंटाच्या एका अवयवाचा उल्लेख झाल्यानंतर ही मंडळी तुटून पडली होती.पण नंतर दस्तुरखुद्द केजरीवालांनी माणसाच्या नेमक्या त्याच अवयवाचा उल्लेख केल्याचे उघडकीला आल्यावर हे केजरूचे गुलाम गायब झाले होते.असे एक ना दोन अनेक अनुभव आहेत तरीही तुम्ही ही भाबडी अपेक्षा ठेऊच कशी शकता?

विकास's picture

24 Apr 2015 - 10:04 pm | विकास

खरे आहे! :(

खालील व्टीट्स बघण्यासारखी आहेत... एके ९:०४ ला काय म्हणतात आणि ९:०९ ला काय म्हणतात ते...

पण जाउंदेत. तेच (म्हणजे आपसमर्थक/केजरी के गुलामच बरोबर आहेत. ;)

होबासराव's picture

24 Apr 2015 - 7:35 pm | होबासराव

ते कदाचित येतिलहि आणि नेहमि सारखे कार्ड (ते कोणितरी नेहमी मीपा वर दिल्ली सरकार चे अपडेट देत असतात ना) वगैरे दाखवतिल, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे "आप" ले पाप / चुक म्हणा हव तर कंपेअर टु मोदि सरकार किति कमी आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतिल, आशुतोष हेच करत असतो.
अवांतरः- पाकिस्तानात निवड्णुकिच्या प्रचार्‍यादरम्यान जो पक्ष भारता विषयि जास्त गरळ ओकतो तो निवडुन येत असतो. कारण तिथल्या राजकारण्यानि त्या लोकांचि विचार करण्याचि क्षमताच हिरावुन घेतलि आहे.

संदीप डांगे's picture

24 Apr 2015 - 9:42 pm | संदीप डांगे

इतना सन्नाटा क्युं है भई....? कोई मर गया क्या.....?

- हां जी, 'आप'

मीआपला's picture

25 Apr 2015 - 12:01 am | मीआपला

आज अरविन्द केजरिवाल खरया अर्थाने राजकारनात आला असे बोलायला हरकत नसावि

केजरीवाल ना भारतात रक्तरंजित क्रांति आणायची आहे. प्रश्न फ़क्त इतकाच् रक्त कुणाचे?
अण्णा याला का झटकुन टाकत होते ते आत्ता समजते आहे.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा

कस्ले य्झ लोक आहेत...तो माणूस लटकल्यावर पण कोणी लगेच दोरी तोडली नै...भविष्यातील राजकारण कसे आणि कुठल्या लेव्हलचे असेल याची ही घटना म्हणजे सुरुवात म्हणायची का?

केजरीवाल यांची आप कोणत्याही स्तराला जाऊ शकते. कसेही करून प्रकाश झोतात राहायचे. सतत खोटे बोलायचे हे त्यांचे ठेरलेले. आता तर कळस. एक माणूस मेला तरी आपला सोहळा चालू.

http://www.rashtravrat.blogspot.in/2015/04/opportunist-insensitive-kejri...

लॉर्ड फॉकलन्ड's picture

25 Apr 2015 - 2:37 pm | लॉर्ड फॉकलन्ड

A hardened TV anchor and a journalist for more than two decades, Ashutosh must have seen worse but YET he broke down because he couldn’t take the guilt of having not been able to save Gajendra Singh? Seems a bit hard to digest. Let’s just go over the reasons for being cynical:

• Ashutosh has been in journalism and at the forefront of tabloid like TV that passes for journalism in India, where sensationalising an issue is part of the job description. Having covered innumerable deaths, accidents and bloodshed Ashutosh knows the futile and unjust nature of how life and politics works. But by training he also knows exactly how to make a splash of it for maximum viewer impact.

• The timing of the "breakdown" is also suspect – not too early in the day for other news events or analysis to take away the impact before evening prime time hits on TV. Not too late in the day for it to not being able to create enough buzz across social media and word of mouth. Ashutosh also knows very well that editorial meetings at news TV stations are held around midday so doing it at 1pm would mean that editors are still in the process of firming up the plan for primetime.

• The choice of platform – Ashutosh for his "breakdown" to have maximum impact needed a platform that was Live and had a good reach. He needed a live situation so that in the second window Gajendra’s daughter could be there for the viewers to see. If Ashutosh had shown remorse at a press conference or during an interview to a wire service, the story might have been carried by every channel, but emotion tugging would not have been possible without the presence of Gajendra’s daughter sharing screen space with his crying visage.

• Why Aaj Tak? Ashutosh has primarily worked with two stations during his decade and half stint in TV - Aaj Tak and IBN 7 and with IBN being seen as funded by BJP backers the choice had to be Aaj Tak the No 1 news channel in terms of viewership in India. The spinoffs were also promising – if he goes crying live on Aaj Tak the sister channel Headlines Today would also cut to the show – bringing in the English audience and so will Delhi Aaj Tak, which is the leading local channel in Delhi - AAP’s core constituency.

• Ashutosh has had practice before – while anchoring on IBN 7 during a news broadcast of the Delhi gang rape, he sniffled and seemed about to break down. (You can watch it here.) His commentary at that point displayed the beginnings of a politician’s hyperbole. Not long after that he quit journalism and joined the AAP.

• Ashutosh’s party the AAP and its think-tank are past masters at playing the media to their advantage. The timing, the emotions and the effect are all too pat to be actually believable.

To sum up this curious case of a politician's crocodile tears, I would say that if and when a normal someone, like an aam aadmi, becomes emotionally distraught, the first reflex is to move away, leave the spot, shun people and seek solitude or some loved one's shoulders to cry on. But we are talking not about an aam aadmi but about an Aam Aadmi Party politician and he, of course, does the opposite, he does not move away from camera, he does not tear the mike off, he does not seek solitude, what he does instead is to bawl away and make gestures of supplication, at the same time taking care not to block his microphone so that his words are not lost or garbled.

Ashutosh knows how to get the most out of TV news because he knows how it works and how to make it work to his advantage.

http://www.dailyo.in/politics/farmer-suicide-gajendra-singh-aap-ashutosh...

प्रतापराव's picture

26 Apr 2015 - 6:27 pm | प्रतापराव

केजरीवाल्चे ठीक आहे पण मोदींकडून हि अपेक्षा नव्हती....
https://www.youtube.com/watch?v=ZPpbynbzRsI&feature=youtu.be

अरे हो तो पोलीसवाला मेला नाही वाचला म्हणजे मोदी निष्ठुर नाहीत

विकास's picture

26 Apr 2015 - 6:55 pm | विकास

केजरीवाल्चे ठीक आहे

ठीक आहे?

तुम्ही दाखवलेल्या तूनळीतील दुव्यातून काय दिसते तर मागचा अंगरक्षक/पोलीस याचा तोल गेला. "लटकला" नव्हता तो...

आणि मोदींचे वर्तनच पहायचे असेल तर हा व्हिडीओ पहा...

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2015 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

अश्या अतर्क्य तुलना करण्याने आपणच "आप"ची अब्रू वेशीवर टांगतोय हे आपटार्डसना कळत नाही हे मोठे विलक्षण आहे !... पण हे नेहमीचेच आहे म्हणा !! +D

१. मंडपात भाषण चालू असताना एकजण घेरी येऊन पडणे आणि त्याची काळजी घ्यायला पाचदहा माणसे तैनात आहेत हे पाहून मग भाषण चालू ठेवणे.

आणि

२. (अ) मंडपाशेजारी असलेल्या झाडावर स्वतःच्या पक्षाचे चिन्ह हातात घेऊन फासावर लटकणार्‍या माणसाकडे दुर्लक्ष करणे,
(आ) त्या घटनेचे "लटक गया" असे मंडपात सर्वांसमोर हावभावासकट वर्णन करणे,
(इ) लगेच त्याच मंडपात राजकारण करून इतराना दोष द्यायला सुरुवात करणे,
(ई) तथाकथित "आत्महत्या चिठ्ठी" त्याच मंडपात वाचून लगेच दाखवणे,
(उ) तो माणूस मृत झाला हे माहीत झाल्यावरही कोणताही शोक व्यक्त न करता आधी ठरल्याप्रमाणे ४५ मिनीटे सभा चालू ठेवणे,
(ऊ) पुढचे दोन दिवस असंवेदनाशीलपणे आणि उद्धटपणे माध्यमांत विधाने करत राहणे,
(ए) नंतर, सर्व प्रकरण गळ्याशी येते आहे असे दिसून आल्यावर आमची चूक झाली असे म्हणत माफी मागणे आणि वर माध्यमांत गळा काढून रडून रडून आकांडतांडव घालणे,
इत्यादी, इत्यादी, इत्यादी,...

"आप" स्टाईल असंवेदनशीलता आणि टोकाचा कांगावाखोरपणा असल्याशिवाय या वरच्या दोन घटनाक्रमांमध्ये असलेला जमीनअस्मानाचा फरक न कळणे फार्फार कठीण आहे !

होबासराव's picture

27 Apr 2015 - 2:05 am | होबासराव

तुमच्या धैर्याला आणि तुमच्या आशावादाला सलाम. मोदि लाख वाईट माणुस असेल, पण "आप" का क्या?
"आप"लि ओढलेलि रेघ लहान दाखवायला तुम्हि ईतरांचि रेघ मोठि दाखवायला लागलात.
वर एक्का साहेबांनि म्हटल्या प्रमाणे "खाप" फक्त कांगावाखोर होते / आहेत. तुम्हि जर तरी ह्या मर्कटांचे समर्थन करत असाल, तर मग काय बोलणार... आणि हा आयडि फक्त काडया सारण्या साठि च क्रियेट केला असेल तर मग बोलुन हि काहि फायदा नाहि, कारण झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्या नाहि. इतका सगळा तमाशा कॅमेरा समोर होउनहि, सज्ज्ड पुरावे असुन हि जर सोंगाड्याना सोंग च करायचा असेल तर मग एक लक्षात असु द्या कि स्वतः ची पाप लपवण्यासाठि तुम्हि सोंगाडे ज्या माणसावर चिखफेक करताय ना तो एक राजकारणि आहे महत्वकांक्षि आहे आणि आपल्या कर्तुत्वाने इथ पर्यन्त पोचलाय.
नौटंकि, स्टिंग, निलाजरेपणा (प्रचंड कोटिचा कोडगेपणा) हा तुमच्या सोंगाड्या नेत्रुत्वाला लखलाभ. मिपा वर किल्ला लढवत रहा.
अपनि तो जैसे तैसे कट जायेगि "आप" क्या होगा खुजानेवाल.

अभि तो हम भि बोलेंगे "पाच साल केजरीवाल" कारण दिल्लीतल्या जनतेला कळायला तर हवे कि त्यांनी कुठल्या माकडांच्या हाति सत्ता दिलिय. पाच वर्ष किमंत दिल्लि देइल आणि अप्र्त्यक्ष्ररीत्या पुर्ण देश देइल कारण या अडाणचोटानि आपल्या मर्क्टलीलानी असा हैदोस घातलाय कि आता जनता अशा कुठल्याहि स्वप्न दाखवणार्या लोकांवर आणि त्यांच्या नविन पक्षा वर विश्वास ठेवणार नाहि.

होबासराव's picture

28 Apr 2015 - 5:42 pm | होबासराव

आपले मुक्ताफळे
मी मागेच एका प्रतिसादात लिहिलेय आप वाले जर एकमेकांच्या उरावर बसले तरी जनतेला त्याचे घेणे देणे नसावे हा मात्र जर मोदी सरकारसारखे शेतकरी नि सर्वसामान्यांच्या उरावर ते बसू लागले तर मात्र जनतेचा संबंध पोहोचतो.

मुक्ताफळाची लिंक
http://www.misalpav.com/comment/683562#comment-683562

आप वाल्यानी एक दुसर्‍याला पिसाळलेल्या कुत्र्यां सारखे चावे जरी घेतले तरी आम्हाला काहीही घेणे देणे नाही पण एका शेतकर्‍याच्या प्राणांशी हे खेळले आहेत.

क्लिंटन's picture

28 Apr 2015 - 5:52 pm | क्लिंटन

आप वाल्यानी एक दुसर्‍याला पिसाळलेल्या कुत्र्यां सारखे चावे जरी घेतले तरी आम्हाला काहीही घेणे देणे नाही पण एका शेतकर्‍याच्या प्राणांशी हे खेळले आहेत.

+१. अहो हे सोडून इतर सगळे 'मिले हुए है' :)

बाकी माझ्यासारखेच (किंबहुना थोडेसे जास्तच) आआपवाल्यांच्या मानगुटीवर बसणारे मिपावर अनेक सदस्य आहेत याचा अगदी परमसंतोष होत आहे :)

(आआपचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा) क्लिंटन

विकास's picture

28 Apr 2015 - 6:54 pm | विकास

पण एका शेतकर्‍याच्या प्राणांशी हे खेळले आहेत.

पण आप वाले शेतकर्‍याच्या प्राणांशी खेळले हे गृहीतकच चुकीचे आहे मुळी! नंतर बाहेर आल्याप्रमाणे गजेंद्र सिंग हे तर बिझिनेसमन होते. ;)

होबासराव's picture

27 Apr 2015 - 2:31 am | होबासराव

आपल्या प्रचारसभांमध्ये तेंव्हाच्या पंतप्रधानांचा उल्लेख प्रधानमंत्रीजी असा करत आणि हे चीधीं चोर आपल्या पंतप्रधानांचा उल्लेख एकेरीत करतात. माज आहे... बकरे कि मा कब तक खैर मनायेगि.. २०२० तक.

क्लिंटन's picture

27 Apr 2015 - 10:40 am | क्लिंटन

माज आहे...

मिपावरही बीजेपीवाले माजले आहेत म्हणून दिल्लीत आआप निवडून यावा असे वाटणारे लोक होते.अशी मंडळीही गेल्या दोनेक महिन्यात आआपने जो सावळागोंधळ घातला आहे त्याविषयी काहीच बोलायला तयार नाहीत. असो.

एकूणच काय की नरेंद्र मोदींना/भाजपला शिव्या घातल्या किंवा "कुठे आहेत अच्छे दिन" वगैरे विचारणे म्हणजे मोठे पुरोगामी असल्याचे लक्षण अनेकांना वाटत असते.

मृत्युन्जय's picture

27 Apr 2015 - 11:20 am | मृत्युन्जय

हे मात्र मान्य नाही क्लिंटनशेठ. मोनिका की कसम हमने अपना ऐतराज जताया है.

क्लिंटन's picture

27 Apr 2015 - 12:36 pm | क्लिंटन

:)

आनन्दा's picture

30 Apr 2015 - 10:09 am | आनन्दा

+१.. दिल्लीत आप यावे असे वाटणार्‍य १% मोदी समर्थकांपैकी मी पण एक होतो.
मला असे वाटण्याची कारणे निराळी होती हा भाग वेगळा..

राहुल गांधीची शप्पथ मला असं काही वाटत नव्हतं क्लिंटनराव . केजरीवालविषयी माझे १० कलमी प्रामाणिक मत मी आपल्याच एका धाग्यावर लिहिलं होतं

क्लिंटन's picture

30 Apr 2015 - 10:57 am | क्लिंटन

राहुल गांधीची शप्पथ....

ह.ह.पु.वा

चिनार's picture

30 Apr 2015 - 11:52 am | चिनार

राहुल गांधीची शप्पथ

हे मुद्दामुन!
चुकून त्यावेळी माझ्या मनात जर केजरीवाल मुख्यमंत्री व्हावे असा विचार एक क्षणाकरिता जरी आला असेल तर राष्ट्रकार्याला मदतच होईल !!

गणेशा's picture

30 Apr 2015 - 11:23 am | गणेशा

आप मध्ये जे चालले आहे, ते योग्य नाही.. केजरीवाल काही तरी चांगले करेल असे वाटले होते.
ही घटनाच नाही.. इतर ही बर्‍याच गोष्टी खटकत आहे.. जे चालले ते योग्य नाही

जरी मनात असे वाटत असेल की काहीतरी गेम असु शकते तरी मी वयक्तीक रीत्या माझा आपचा पाठिंबा काढुन घेत आहे..... तसेही मतदारांनी जे चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये.. कोणाचाच काही भरवसा नसतो.. आणि शेवटी पाच साल मे कुछ अच्छा कर दिखाना पडेगा इसे...

या पेक्षा आमची राष्ट्रवादी काहीच वाईट नाही असेच वाटुन गेले...

- गणेशा

क्लिंटन's picture

30 Apr 2015 - 11:59 am | क्लिंटन

आप मध्ये जे चालले आहे, ते योग्य नाही.. केजरीवाल काही तरी चांगले करेल असे वाटले होते.
ही घटनाच नाही.. इतर ही बर्‍याच गोष्टी खटकत आहे.. जे चालले ते योग्य नाही

अरे वा. बरेचसे आआपचे (सद्यकालीन किंवा भूतपूर्व) समर्थक असे म्हणायचा प्रांजळपणा दाखवत नाहीत या पार्श्वभूमीवर हे वाक्य अधिकच उठून दिसते.

तसेही मतदारांनी जे चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये.. कोणाचाच काही भरवसा नसतो.. आणि शेवटी पाच साल मे कुछ अच्छा कर दिखाना पडेगा इसे...

याला अगदी +१ अब्ज.

नाखु's picture

30 Apr 2015 - 1:00 pm | नाखु

गणेशा सलाम स्वीकारा _/\_

प्रांजळपणाचे काही नाही क्लिंटन साहेब, मते वेगवेगळी असु शकतात बर्याचदा.. मग ते आप बद्दल असतील भाजप बद्दल असतील किंवा इतर अनेक घटनांबद्दल असतील .. परंतु आपण सारे मिपापरिवारात आहोत हे जाणुन पुढच्याच्या विरोधाला विरोध न करता आपल्याला काय वाटते ते वयक्तिक लेवल ला न जाता लिहिले पाहिजे असे माझे नेहमी म्हणने असते. भले कित्येकदा चुकीचीही असतील मते परंतु सयंत प्रतिक्रीया असाव्यात असे नेहमी वाटते. आणि पुढच्याने ही त्या वयक्तीक घेवु नये असे वाटते
उद्या, नेटवरती विरुद्ध टोकाने बोलणारे एकत्र आले तरी त्यांचे व्यक्तिमत्व वेगळेच असते असे जानवु शकते..
असो... आणि मतदारांच्या वाक्याबद्दल .. मी स्वता एकदा राष्ट्रवादी.. एकदा जनता दल.. एकदा भाजप आण एकदा शिवसेने ला मत दिले आहे, त्यामुळे जरी कोणत्याही पक्षाच्या बाजुने बोललो तरी वयक्तिक रित्या विधानसभेला उमेदवार पाहुन आनि लोकसभेला पक्ष पाहुनच मी मदतान करतो, त्यामुळे भक्त, समर्थक असे आवडत नाही मला तरी. अतिरेक नसावा बस्स..
आप ने वेळीच सुधारले नाही सगळे तर मात्र ही पार्टी जशी वर आली त्याच स्पीड मध्ये खाली जाईन असे वाटते.

बाकी

अवांतर :
मला वाटते राजकारणावर मी आता लिहिणे बंद करावे.. तेव्हडा अभ्यास नाहीही आणि माझे आवडते भटकंती आणि काव्य विभाग मस्त आहे या पेक्षा असे उगाच वाटुन गेले
राजकारण सोडले तर मला वाटते गांधी..एक विचार या धाग्यावर आपण बोललो होतो बहुतेक

मृत्युन्जय's picture

4 May 2015 - 10:09 am | मृत्युन्जय

अनाठायी समर्थनाच्या पल्याड जाउन (जी आजकाल फ्याशन झाली आहे) प्रांजळ मते मांडण्याच्या तुझ्या धाडसाचे कौतुक आहे गणेशा. आजकाल तशी दुर्मिळ गोष्ट आहे ती.

कपिलमुनी's picture

30 Apr 2015 - 1:04 pm | कपिलमुनी

हाच प्रांजळपणा मोदी समर्थक कधीच दाखवत नाहीत .
अगदी परदेशात जाउन आपलया देशाला नावे ठेवली तरीदेखील.

मृत्युन्जय's picture

4 May 2015 - 10:07 am | मृत्युन्जय

अभ्यास वाढवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2015 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम विचार. ब्राव्हो * !!

फक्त खालच्या विधानात...

तसेही मतदारांनी जे चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये..

एक थोडासा फरक सुचवतो. तो असा...

तसेही मतदारांनी जे देशाच्या दृष्टीने चांगले वाट्टेल तिकडेच जावे कायमचे ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये..

कारण वैयक्तीक फायदा तात्पुरता असतो आणि त्यात देशाचा फायदा असेलच असे नाही. पण, देशाचा फायदा झाला तर तो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे देशाच्या सद्य नागरिकांपर्यंतच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतो.

आजचे तथाकथित विकसित देश ज्या स्थितीवर पोहोचलेले आहेत, ते केवळ सद्याच्या पिढीच्या कर्तृत्वामुळे नाही तर त्यामागे देशाच्या भल्याचा विचार करणार्‍या अनेक पिढ्यांचा हातभार लागलेला आहे.

======

*
प्रत्येक माणसाची कळत नकळत कधीना कधी चूक होतेच... तो माणूसधर्मच आहे ! मात्र ती चूक प्रामाणिकपणे पत्करून, त्या अनुभवांतून शिकून पुढे तशी चूक परत होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा माणूस प्रामाणिक आणि प्रगतीशील असतो.

त्याउलट, चूक डोळ्यासमोर धडधडीत दिसत असताना ती चूक नाहीच असे म्हणत, चुप्पी साधणारे किंवा तिचे प्रत्यक्ष समर्थन करणारे, अप्रामाणिक आणि/अथवा कांगावाखोर असतात. असे लोक इतर लोकांची दिशाभूल करता करता स्वतःच्याच खोट्या मायाजालात गुरफटून स्वतःचे नुकसान करतात, हे त्यांच्या मूर्खपणाचे फळ असते. पण त्याबरोबर त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणार्‍या त्याच्या पाठीराख्यांचेही त्यापेक्षा जास्त नुकसान करतात, हे अक्षम्य आहे.

हाडक्या's picture

30 Apr 2015 - 7:43 pm | हाडक्या

त्याउलट, चूक डोळ्यासमोर धडधडीत दिसत असताना ती चूक नाहीच असे म्हणत, चुप्पी साधणारे किंवा तिचे प्रत्यक्ष समर्थन करणारे, अप्रामाणिक आणि/अथवा कांगावाखोर असतात. असे लोक इतर लोकांची दिशाभूल करता करता स्वतःच्याच खोट्या मायाजालात गुरफटून स्वतःचे नुकसान करतात, हे त्यांच्या मूर्खपणाचे फळ असते. पण त्याबरोबर त्यांच्यावर अंधविश्वास ठेवणार्‍या त्याच्या पाठीराख्यांचेही त्यापेक्षा जास्त नुकसान करतात, हे अक्षम्य आहे.

+१११

सभा आपची होती, अन ज्याच्या सोबत ही दुर्घटना घडली तो त्या क्षणी तरी आप सोबत होता हे नाकारु शकत नाही.
ह्या घटनेच्या संदर्भात तरी आप विरुद्धचा रोष चुकीचा वाटत नाही.