यू. के. मधे फिरण्यासारखे ठिकाण

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
6 Apr 2015 - 9:06 pm

मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत अशी लंडन आणि उर्वरित यू. के. मधली ठिकाणे सांगा (शक्यतो निसर्ग सुंदर ठिकाणे. म्यूज़ियम्स बघण्यात आम्हाला इंट्रेस्ट नाही).

प्रतिक्रिया

काका खरडफळ्यावर टाका ना प्रश्न!! :)

रॉजरमूर's picture

7 Apr 2015 - 9:13 pm | रॉजरमूर

तुम्हाला काय अडचण आहे ?

या प्रश्नाच्या निमित्ताने जर काही माहिती सदस्यांनी दिली

तर इतरांना फायदाच होईल की

तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर तुम्ही नका वाचू हा धागा

धन्यवाद .

सानिकास्वप्निल's picture

6 Apr 2015 - 10:03 pm | सानिकास्वप्निल

डाॅर्सेट- डर्डल डोअर, वेमथ
बाथ
आयल आॅफ वाईट
दि नीडल्स
आयल आॅफ मॅन
स्काॅटलँड- हायलँड्स
बीच आवडत असतील तर बोर्नमथ,स्कारबराह.
ब्लॅकपूल प्लेझर बीच
लेक डिस्ट्रिक्ट
स्नोडोनिया
लेयन पेनिनसुुुला
पीक डिस्ट्रिक्ट
Stonehenge
शिवाय बालाजी मंदिर, स्वामीनारायण मंदिर, हॅराॅडस, शार्ड, टावर ब्रिज, आॅक्सफर्ड स्ट्रिट,पीकॅडली, ट्र्फलगार, लंडन अाय, लाॅर्ड्स, याॅर्क व्हिल, न्यु कासल, लेस्टर अशी ही ठिकाणं आहेत.

अभिजीत अवलिया's picture

7 Apr 2015 - 1:25 am | अभिजीत अवलिया

धन्यवाद. मी पूल, डॉरसेट इथेच जॉब ला आहे. त्यामूळे डाॅर्सेट- डर्डल डोअर,वेमथ,बाथ,आयल आॅफ वाईट,आयल आॅफ मॅन,बोर्नमथ,स्टोन्हेंज नक्की जाणार आहे.

टीपीके's picture

9 Apr 2015 - 3:08 pm | टीपीके

पूलला रहाता मग ब्राऊन सी आयलंड पण बघा. फेरी ने एक दिवसाची ट्रीप आणि ३ वर्षाच्या मुलाला मोर बघायला मजा येइल. पूल की वरून बोट मिळेल. ऑगस्ट मध्ये कुटुंब बरोबर असेल तर बोर्नमथ चा एअर शो चुकवू नका.

अभिजीत अवलिया's picture

10 Apr 2015 - 10:46 pm | अभिजीत अवलिया

हो नक्कीच करणार आहे. पूल की जवळच राहतो. वीसा 18 july पर्यंतच असल्याने बोर्नमथ चा एअर शो चुकेल. बघू कंपनी वीसा वाढवते का ते.

टीपीके's picture

11 Apr 2015 - 4:35 pm | टीपीके

गृप असेल आणि आवड असेल तर न्यू फाॅरेस्ट मधे कॅंम्पींग ट्रिपपण करता येइल

श्रीरंग_जोशी's picture

6 Apr 2015 - 10:03 pm | श्रीरंग_जोशी

मराठी आंतरजालावर युकेमधील प्रवासवर्णने (लंडनखेरीज) फारशी वाचायला मिळाली नाहीत आजवर.

अनेक इंग्रजी चित्रपटांत इंग्लंडचा उत्तर भाग, आयर्लंड व स्कॉटलंडमधली विरळ लोकवस्ती असलेली निसर्गरम्य स्थळे दाखवतात. संधी मिळताच हे सर्व बघण्याचा मानस आहे. त्यापैकी एक - Lulworth Cove.

Lulworth Cove

तुमच्या पर्यटन मोहिमांना शुभेच्छा. कृपया प्रवासवर्णन नक्की लिहा.

सानिकास्वप्निल's picture

6 Apr 2015 - 10:06 pm | सानिकास्वप्निल

लुलवर्थ कोव्ह अतिशय सुरेख, रमणीय ठिकाण आहे. डर्डल डोअर ला गेलो तेव्हा ह्या ठोकाणी भेट दिली होती.

डर्डल डोअर ही माझी सगळ्यात आवडती जागा. शांत आणि सुन्दर.

अत्रन्गि पाउस's picture

6 Apr 2015 - 10:18 pm | अत्रन्गि पाउस

लंडन आणि यमन ह्यात कमालीचे साम्य आहे ... एकच गाव एकच राग आहे ..संपत नाही ..दर वेळा नवीन ... प्रत्येक ट्यूब स्टेशन च्या वेगवेगळ्या गेट नि बाहेर पडले कि लंडन वेगवेगळे भासते ...
प्रत्येक वारी वेगळे, प्रत्येक प्रहराला वेगळे ...
कुठूनही आलापीला सुरुवात करा आणि ठरवा आज अमुक एक फ्रेज ...किंवा आज किशोरीचा यमन ..नंतर कुमारांचा यमन ...तसेच आहे आज विम्बल्डनहून त्राफ्ल्गरला या ...उद्या कॅनरी वार्फ हून या ...लंडन वेगळे भासेल ...

जो लंडनला कंटाळला तो आयुष्याला कंटाळला असे कुणीसे म्हटले आहे ...
....
कधी भेट आहे पुन्हा ती थेम्सच जाणे ...

आदूबाळ's picture

7 Apr 2015 - 1:23 am | आदूबाळ

एकदम टोट्टल सहमत.

आणि या सगळ्यांची अधिष्ठात्री देवता TfL.

हाडक्या's picture

7 Apr 2015 - 4:52 am | हाडक्या

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

जो लंडनला कंटाळला तो आयुष्याला कंटाळला असे कुणीसे म्हटले आहे ...

हायला ! हे माझ्या अगोदर त्याला कसे बरे सुचले ?! ;)

जुजुबी इंग्लिश वाचता येणार्‍यानेही फक्त सबवे मॅपच्या आधारे आठवडाभर तरी न चुकता आणी कंटाळा न येता मजेत हिंडत रहावे असे या अख्ख्या होल जगातले एकुलते एक शहर म्हणजे लंडन; असा आमचा साधार दावा आहे :)

बर्‍याच पहाणेबल जागांच्या गर्दीत क्यू गार्डनला भेट द्यायला विसरू नका !

पिवळा डांबिस's picture

8 Apr 2015 - 10:47 am | पिवळा डांबिस

युकेमध्ये जाऊन फक्त लंडन सर्वार्थाने बघायचे म्हंटले तरी १५-२० दिवस सहज लागावेत.
अशा परिस्थीतीत लंडन न बघता इतर युके बघायचे म्हणणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघता इतर प्रेक्षणीय स्थळे बघायची आहेत असे म्हणणे....
बघा हवी तर, पण यू आर वेस्टींग युवर टाईम!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2015 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच ! पण लेखकाला संग्रहालये पाहण्यात रस नाही म्हणून आठवडाभर म्हटले. संग्रहालये "नीट" पहायची म्हटली तर तीन आठवडेही कमीच पडतील.

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2015 - 8:38 pm | अत्रन्गि पाउस

५ झोन्स चा पास काढावा आणि एक ठरवावे कि बुवा आज हाईड पार्कला जावे ...
मग जवळच्या ट्यूब स्टेशन वर जाऊन शोधावे आणि सुरु करावे ...वाटले तर ..अपूर्वाईतल्या खाणाखुणा दिसतात त्या टाळून सुरु करावी भटकंती ...
काही तरी कुठेतरी सापडतेच ...खुशाल रमावे हो तिथे ...सायबाची शिस्त, टापटीप, साधेपणा त्याचबरोबर त्याचा टाइट अपर लीप सगळे दुरून बघत, मस्त हिंडावे ...
इंग्लिश ब्रेकफास्ट (जो पूर्ण दिवस मिळतो बर्याच ठिकाणी) खावा ..
एकच ...खिशात भरपूर पौंड, उत्तम कपडे, पायात स्पोर्ट्स शूज (म्हणजे चालायला सुकर)
अहाहा !!

नंदन's picture

11 Apr 2015 - 10:27 pm | नंदन

लंडनची अशी मनसोक्त भटकंती करायचं अनेक दिवस मनात आहे, त्याला तुमच्या प्रतिसादाने उजाळा मिळाला.

सुनील's picture

7 Apr 2015 - 9:05 am | सुनील

वर अनेकांनी अनेक स्थळे सुचवली आहेतच. लंडनच्या दक्षिणेला साधारण तासाभराच्या अंतरावरील ब्रायटन हे समुद्रकिनार्‍यावरील गाव तुमच्या आयटेनरीत जरूर ठेवा!

आयुर्हित's picture

8 Apr 2015 - 1:38 am | आयुर्हित

कदाचित ही यादी उपयोगी पडेल!
Shooting Locations of Bollywood Movies

अभिजीत अवलिया's picture

8 Apr 2015 - 10:39 pm | अभिजीत अवलिया

सर्वांचे धन्यवाद.
पिवळा डांबिस साहेब,'लंडन सर्वार्थाने बघायचे म्हंटले तरी १५-२० दिवस सहज लागावे' हे मान्य आहे मला. आम्ही लंडन सुद्धा पाहणार आहोतच. मात्र म्यूज़ियम्स बघण्यात इंट्रेस्ट नाही असे म्हणतोय. बाकीचे लंडन नक्कीच बघणार.

म्यूज़ियम्स बघण्यात इंट्रेस्ट नाही असे म्हणतोय

असे नका म्हणू हो, खासकरुन मुलासाठी तुमच्या.
तुमचा तीन वर्षांचा मुलगा तुमच्या बरोबर असेल तर आवर्जून ब्रिटीश म्युजियम, सायन्स म्युजियम अथवा नॅचरल हिस्टरी म्युजियम तरी पहाच असे म्हणेन. तुमची संग्रहालय याबद्दलची संकल्पनाच बदलेल याबद्दल खात्री आहे आणि तुमच्या मुलासाठी हा एक सुंदर अनुभव असेल हे ही नक्कीच.
फक्त एक करा, तुमच्या नियोजनानुसार एक दिवस घ्या ( जेव्हा पावसाचे अनुमान असेल असा वीकेंड घ्या हवेतर) आणि नेटवर त्या त्या संग्रहालयाची माहिती पहा. लहान मुलांसाठी समरमध्ये खूप सारे उपक्रम असतात. अगदी पर्वणीच असते. आधी असा एखादा उपक्रम निवडा ऑनलाईन आणि मग कोणती दालने पहाल तेही ऑनलाईनच ठरवा म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळात बाहेर पडायचे असेल तरी पडू शकाल. ( प्रत्यक्षात "ब्रिटीश म्युजियम" सारखी संग्रहालये लोक तीन तीन वीकेंड खर्च करुन बघतात तेव्हा मुलासाठी म्हणून तरी थोडा वेळ नक्कीच द्यावा असे म्हणेन..)

आणि हो या वर उल्लेखलेल्या संग्रहालयांमध्ये प्रवेश फी नाही (हा मुद्दा नाहीच पण तरीही पैसे फुकट जातील असे वाटू नये म्हणून.. :) )

असो.. निसर्गरम्य ठिकाणे पहायची असतील तर त्या वीकेंडचा हवामानाचा अंदाज पाहूनच ठरवा. जल्ला कदी पौस येल काय सांगता येत नै..

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2015 - 8:02 pm | अत्रन्गि पाउस

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी's picture

12 Apr 2015 - 8:37 pm | श्रीरंग_जोशी

Carrick-a-Rede Rope Bridge, Northern Ireland

Carrick-a-Rede Rope Bridge

ज्या लोकांचे वास्तव्य अशा ठिकाणांजवळ असते त्यांचा हेवा वाटतो.