मगरीचा वावर

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
23 Mar 2015 - 7:29 am
गाभा: 

हि बातमी वाचल्यावर

विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय
आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.
दिलीप यार्दी, पक्षीमित्र

निसर्गमित्र वगैरे ठीक आहे पण एक प्रश्न असा कि जिथे अनेक लोक रोज वावरतात /पोहायला जातात अशा ठिकाणी मगरी सारखा खतरनाक प्राणी अचानक आल्यावर ...त्याने आत्तापर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही हे मानून चालणे कितपत योग्य ?

मागे आमच्या सोसायटीत एक ५-६ फुटी साप सापडला होता ... आता तो विषारी कि बिनविषारी हे ओळखत बसायचे कि त्याला मारून टाकायचे अशी चर्चा झाली .... सर्पमित्र उपलब्ध नव्हते ...तथापि त्याला मारून टाकायचे असे ठरल्यावर अचानक कुणीतरी "नको ...पितृपक्षात सर्पदोष लावून घ्यायला नको" असा एक पवित्रा घेतल्याने अचानक खळबळ माजली व शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"

मुद्दा असा कि अशा वेळी काय करावे ? नै शहरीकरण /कोण कुणाच्या घरात शिरलेयवगैरे ठीक आहे पण समोर एखादा साप किंवा तत्सम खतरनाक जीव अचानक प्रकट झाला (कोणतीही मदत उपलब्ध नसेल) तर त्याला ठार करून टाकावे कि (तो काही तुम्हाला इजा करायला आलेला नाही असे समजून) सोडून द्यावे ? नंतर थोड्या वेळाने तो परत आला तर ?

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

23 Mar 2015 - 8:09 am | चलत मुसाफिर

'कोणताही प्राणी हा मूळतः धोकादायकच असून दिसताच मारण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे' ही मानसिक बैठक आधी बदला.

प्राणिजगताचे ज्ञान मिळवा. प्राण्यांचे वर्तनविशेष समजून घ्या.

शक्य झाल्यास प्राणिविश्वाशी जवळीक साधा. मुलाबाळांनाही सवय आणि गोडी लावा.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2015 - 8:17 am | अत्रन्गि पाउस

मी कोणताही प्राणी म्हटलेले नाही ...मगर / साप वगैरे हे अतिशय धोकादायक ठरू शकतात त्याविषयी माहितीये असेल तर सांगा ..बाकी ज्ञान वर्तनविशेष मुलाबाळांना सवय गोडी वगैरे नेहेमीची उत्तरे ठीक आहेत
अचानकपणे समोर आलेल्या प्रसंगात काय करावे हा प्रश्न आहे.... त्याचे उत्तर अपेक्षित आहे ...

चलत मुसाफिर's picture

23 Mar 2015 - 10:06 am | चलत मुसाफिर

उत्तर भारतातील मर्यादित मानववस्ती असलेल्या एका जंगलमय प्रदेशात दीर्घकाळ राहिलो आहे. तिथे बिबळ्यांचा नियमित वावर असे. रात्रीच्या वेळी समूहाने पायी जात असताना समोर अंधारात बिबळ्या उडी मारून पसार झाल्याची घटना अनेकदा घडली. मी स्वतः एकदा अपरात्री आडवाटेला (वाहनाने) प्रवास करीत असताना दोन बिबळे रस्त्यावर आरामात पहुडलेले पाहिले. तिथे नैसर्गिक भक्ष्य मुबलक उपलब्ध असल्याकारणाने बिबळ्यांनी कधीही माणसावर हल्ला केला नाही. किंबहुना ते शक्यतो माणसापासून दूरच रहात. मात्र पाळीव कुत्रे हे पकडण्यास सोपे असल्यामुळे बिबळ्यांचे आवडते खाद्य झाले होते.

असे 'खेळीमेळीचे' वातावरण असूनही एकदा (नेहमीप्रमाणे) निवासतळात शिरलेल्या बिबळ्याला एका नवशिक्या तरुणाने निव्वळ भीतीपोटी गोळी झाडून उडवले होते. नंतर वनखात्याचा ताप निस्तरताना त्या बिबळ्याचा तळतळाट लागला असल्याची खात्री पटली.

मार्मिक गोडसे's picture

23 Mar 2015 - 12:14 pm | मार्मिक गोडसे

<ins>तिथे नैसर्गिक भक्ष्य मुबलक उपलब्ध असल्याकारणाने बिबळ्यांनी कधीही माणसावर हल्ला केला नाही. किंबहुना ते शक्यतो माणसापासून दूरच रहात. मात्र पाळीव कुत्रे हे पकडण्यास सोपे असल्यामुळे बिबळ्यांचे आवडते खाद्य झाले होते.>
नैसर्गिक भक्ष्य मुबलक उपलब्ध असल्यास बिबळे मानवी वस्तीत कुत्रे खायला कशाला येतील?
बिबळ्याला कुत्रे पकड्ण्यास सोपे असेल तर जंगलात फिरायला आलेल्या माणसालाही पकडणे तितकेच सोपे असेल.निदान ठाण्याच्या येऊर परिसरातील बिबळे असा भेदभाव करताना आढळत नाही.

चलत मुसाफिर's picture

23 Mar 2015 - 12:34 pm | चलत मुसाफिर

आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे मानववस्ती व संचार हे अत्यंत विरळ होते. निवासतळामध्ये येऊन बिबट्यांनी कधी कुत्रे पळवले नाहीत. पण कुत्र्यांच्या मागावर ते नेहमी असत. गंमतीची गोष्ट म्हणजे कुत्र्यांनाही ते कळून चुकले होते. त्यामुळे कुत्रे निवासतळापासून दूर जायला बघत नसत. गेलेच तर आमच्याबरोबर जात असत.

ब़जरबट्टू's picture

23 Mar 2015 - 10:18 am | ब़जरबट्टू

शेवटी काहीच होत नाही असे पाहून तो सापही हळूहळू निघून गेला"

हे हे.. मस्तच बघा,,, :))

तुम्हांला काही सांगण्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्ही अशा प्रसंगात स्वतः सापडल्यास ऐनवेळी जे सुचतेय ते करा. Fight or Flight.

इतरांसाठी - Ignore them. प्राणिवर्तनाचा जरासा अभ्यास असेल तर अगदी वाघ, नाग, मगर, बिबट्या इत्यादी कोणतेही प्राणी मानवी संपर्क शक्यतो टाळतातच हे माहित असेल. त्यामुळे थोडी सावधानता बाळगल्यास व काही पथ्ये पाळल्यास मनुष्य व प्राणीजगत यांच्यातील संघर्ष नक्कीच टाळता येतो.

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 10:59 am | पिवळा डांबिस

एका ५-६ फुटी विषारी किंवा बिनविषारी सापाच्या अनुभवारून एकदम तुम्ही मगरींविषयक वाचीव माहीतीचा बादरायण संबंध कसा काय जोडलात?
तुमच्या निवासस्थानाजवळ मगरी विपुल प्रमाणात आहेत काय?
अन्यथा शीर्षक दिशाभूल करणारे आहे....

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2015 - 11:21 am | अत्रन्गि पाउस

अजून एक प्रयत्न करतो
विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय
आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही.
दिलीप यार्दी, पक्षीमित्र
प्रस्तुत बातमीमधील एक वेचा ...

खार / चिमणी किंवा तत्सम प्राणी पक्षी समोर आल्यास आपण फार दखल घेत नाही किंवा त्यांची भीती वाटत नाही ...

तथापि साप किंवा वरील बातमीतील मगर हे असे अनुभव आल्यास जनरली त्यातील तद्न्य लोक (किंवा ज्यांना त्याची सवय आहे ते) त्यांच्या प्रतिक्रिया हंडल करू शकतात ... बाकी सामान्य लोक (आमच्यासारखे) fight किंवा flight हेच स्वीकारतात ...

ते प्राणी माणसाच्या वाटेला जात नाहीत वगैरे खरे म्हणावे तर सर्पदंशाने / विंचू दंशाने मृत्यू होतात ते कसे ?
नशनल पार्क मधील बिबटे वगैरे आदिवासींवर हल्ले करतात (क्वचित किंवा नेहेमी) हे हि आपण वाचतो...

मुद्दा असा आहे कि आपल्या आजूबाजूला अचानक एखादा साप आला किंवा ह्या वरच्या बात्मिल्या सारखी मगर ..किंवा एखादा चित्ता /बिबटा वगैरे आली / आला तर "आत्ता पर्यंत हल्ला केला नाही त्यामुळे धोका नाही ...हे असे म्हणावे का ??"

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 11:51 am | पिवळा डांबिस

श्री. अपासाहेब,
तुम्ही हा जो मगरींचा प्रश्न मांडलाय तो खरोखरच तुमच्या बाबतीत जेन्युइन आहे का? हे मी माझ्या पूर्वीच्या प्रतिसादात विचारलं होतं...
तुम्ही कुठे रहाता ते मला माहिती नाही. तुम्ही जिथे रहाता तिथे मगरीचा खूप मोठा सुळसुळाट आहे का?
मी लुइझियानामध्ये राहिलोय जिथे मगरी आणि मगरींची पोरं सहज आढळून येतात. सकाळी घराच्या पायर्‍यांवर बसलेली असतात. पण तिथल्या लोकांना मगरी कशा हॅन्डल करायच्या ते ठाऊक असतं. मगरी उगाच माणसाच्या अंगावर धावून येत नाहीत कारण् माणूस हे त्यांचं नैसर्गिक भक्ष्य नाही...
आमच्या कोकणात रात्री धामणी चुलीजवळ उबार्‍याला येतात. सकाळी घरातले लोकं ह्या ८-१० फुटी धामणी शेपटाला उचलून मागच्या परसात नेऊन टाकतात. त्यांना मारायची गरज नसते...
मुंबै-पुण्यात लांडगे, कोल्हे वगैरे जनावरं रानटी मानली जातात. पण मी सध्या जिथे रहातो तिथे ती सहज आढळतात. रात्री कुंपणाच्या बाहेर तुम्हाला त्यांचे डोळे चमकतांना दिसतात वा उत्तररात्री त्यांचं ओरडणं (हाऊलिंग)ऐकू येतं. म्हणुन घाबरून जाउन लगेच त्यांना मारून टाकायची गरज नसते. ते जोपर्यंत तुमच्या कुंपणाच्या आत येऊन तुमचं काही नुकसान करत नाहीत (उदा. तुमची पाळीव कुत्री मारणे वगैरे) तोपर्यंत त्यांना मारायची गरज नसते. हे जग त्यांचंही आहेच ना!
त्या प्राण्यांची बुद्धी मर्यादित आहे म्हणून ती त्यांच्या नॅचरल इंस्टींग्जवरच जगतात. पण निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली आहे मग आपण त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल अधिक माहिती मिळवून त्यांच्यासमवेत सामंजस्यात रहाणं जास्त योग्य नाही का?

खटपट्या's picture

23 Mar 2015 - 12:06 pm | खटपट्या

+१
खूप छान प्रतिसाद...

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2015 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

जोपर्यंत मानव जंगली प्राण्याच्या वस्तीच्या जागांवर आक्रमण करून त्यांचे जगणे आणि खाणे दुष्कर करत नाही तोपर्यंत जंगली प्राणी मानवावर अथवा त्याच्या भूमीवर आक्रमण करत नाहीत. पिरियड.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2015 - 1:11 pm | अत्रन्गि पाउस

माझी काही उत्तरे खालील प्रमाणे ...आणि प्रतिसादासाठी धन्यवाद

तुम्ही हा जो मगरींचा प्रश्न मांडलाय तो खरोखरच तुमच्या बाबतीत जेन्युइन आहे का?

नाही हा माझा प्रश्न नाही पण आज सकाळी बातमी वाचून "आता अचानक मगरी पण येऊ लागल्यात ??" असा एक प्रश्न उपस्थित झाला
तुम्ही कुठे रहाता ते मला माहिती नाही. तुम्ही जिथे रहाता तिथे मगरीचा खूप मोठा सुळसुळाट आहे का?
मुंबई/ठाणे ...इथे सुल्सुलात अजिबात नाही ...
मी लुइझियानामध्ये राहिलोय जिथे मगरी आणि मगरींची पोरं सहज आढळून येतात. सकाळी घराच्या पायर्‍यांवर बसलेली असतात. पण तिथल्या लोकांना मगरी कशा हॅन्डल करायच्या ते ठाऊक असतं. मगरी उगाच माणसाच्या अंगावर धावून येत नाहीत कारण् माणूस हे त्यांचं नैसर्गिक भक्ष्य नाही...
ओह हे फारच थरारक वाटते वाचल्या वर पण ते कसे हॅन्डल करावे हे सांगाल तर बरे होईल..जास्तीत जास्त लोकांना पोहोचवता येईल..

आमच्या कोकणात रात्री धामणी चुलीजवळ उबार्‍याला येतात. सकाळी घरातले लोकं ह्या ८-१० फुटी धामणी शेपटाला उचलून मागच्या परसात नेऊन टाकतात.
हम्म मुंबईत राहणार्यांना हा अनुभव नाही आणि त्यामुळे शेपटाला धरून बाहेर नेऊन टाकणे वगैरे फारच धाडसी ...

त्या प्राण्यांची बुद्धी मर्यादित आहे म्हणून ती त्यांच्या नॅचरल इंस्टींग्जवरच जगतात. पण निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली आहे मग आपण त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल अधिक माहिती मिळवून त्यांच्यासमवेत सामंजस्यात रहाणं जास्त योग्य नाही का?

आहे नं ..पण ज्यांना अजिबात अनुभव / पार्श्वभूमी नाही ते बेसिक इंस्तीन्क्त वर वागण्याची शक्यता

तो वरचा विषारी /बिनविषारी सापांचे चित्र असलेला प्रतिसाद उपयुक्त आहे ...

खटपट्या's picture

23 Mar 2015 - 11:45 am | खटपट्या

मगर कधी पाण्याच्या बाहेर शिकार करताना पाहीली नाही. निदान टीव्हीवर तरी. पाण्याबाहेर मगरीच्या हालचाली कमालीच्या मंद असतात.

जाणकारांनी (कींवा माहीतगारांनी) प्रकाश टाकावा...

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 10:01 am | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय चुक मगर ही धावु सुद्धा शकते , इतकेच नाही तर ताशी ३० किमी वेगाने धावु शकते फ़क्त त्यांचा पल्ला कमी असतो जास्तीत जास्त काहीशे मीटर्स , त्यांचे धावणे हे वरती जसे माणसाला "फाइट ऑर फ्लाइट" सांगितले आहे त्यातल्याच् फ्लाइट ह्या प्रकारचे असते अर्थात हे पलायन फ़क्त जीवराक्षणार्थ प्रॉब्लेम पासुन दूर केलेला पोबारा असतो इतकेच

खटपट्या's picture

6 Apr 2015 - 11:40 am | खटपट्या

ओके, मगर धाउन शिकार करते का ते माहीत नाही.

नितिन५८८'s picture

23 Mar 2015 - 11:47 am | नितिन५८८

discovery वरील man Vs Wild हा कार्यक्रम पाहावा खूप काही माहिती मिळते

स्व रक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे. म्हणजे माणसाला आणि प्राण्याला सुद्धा ! ऐकीव माहितीनुसार वाघ, सिंह, मगर इ प्राणी त्यांना भूक लागल्याशिवाय किंवा डिवचल्याशिवाय हल्ला करत नाही. भूक लागल्यावर सुद्धा माणसापेक्षा त्यांचे नैसर्गिक खाद्य खाण्यास ते जास्त प्राधान्य देतात. फक्त अस्वल या प्राण्याविषयी ऐकलेली माहिती फार भीतीदायक आहे. अस्वल गुदगुल्या करते ही कविकल्पना आहे. अस्वल अतिशय हिंस्त्र प्राणी आहे. आणि हल्ला केल्या वाचण्याचे चान्सेस कमीच !
तरीसुद्धा प्राणी दिसला म्हणून त्याला ठार मारणे चुकीचे आहे . कारण हीच पद्धत त्या प्राण्यांनी वापरली तर आपली धडगत नाही ! शक्य असेल तिथे प्राणी मित्रांना बोलवावे.

नांदेडीअन's picture

23 Mar 2015 - 12:12 pm | नांदेडीअन

सोप्पा उपाय आहे यावर.
जिथे मगरींचा किंवा सापांचा नैसर्गिक अधिवास आहे, तिथे राहायला जाऊ नका.
ना रहेगा बांस और ना बजेगी बांसुरी ।

जोक्स(?) अपार्ट, हा खालचा फोटो संदर्भ म्हणून वापरायला काही हरकत नाही.
जमल्यास व्हाट्सऍपवर सगळ्यांसोबत शेअर करा.

आपल्याकडे बहुतांशी साप बिनविषारी असतात.
अगदी बोटांवर मोजता येतील इतक्याच सापांच्या जाती अतिविषारी आहेत. (उदा. मण्यार, फुरसे, घोणस, नाग इ.)
अजूनही काही विषारी जाती आहेत, पण त्या आपल्याकडे सहज आढळत नाहीत.

नजरभेट झाल्या झाल्या साप काही कुणाला चावत नाही, त्यामुळे हा फोटो बघून साप ओळखण्याचा प्रयत्न करा.
बिनविषारी साप असल्यास त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या.
विषारी असल्यास किंवा ओळखता येत नसल्यास एखाद्या सर्पमित्राला फोन करून बोलवा.
वर्तमानपत्रात अधून मधून त्या त्या भागातल्या सर्पमित्रांची माहिती प्रकाशित होत असते.

snakes

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2015 - 1:13 pm | अत्रन्गि पाउस

उपयुक्त आहे ...धन्यवाद.

कोंबडी प्रेमी's picture

23 Mar 2015 - 4:19 pm | कोंबडी प्रेमी

+१

जॅक डनियल्स's picture

25 Mar 2015 - 4:42 am | जॅक डनियल्स

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्, पण यातील बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत, आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो.

"आपल्याकडे बहुतांशी साप बिनविषारी असतात.
अगदी बोटांवर मोजता येतील इतक्याच सापांच्या जाती अतिविषारी आहेत. (उदा. मण्यार, फुरसे, घोणस, नाग इ.)
अजूनही काही विषारी जाती आहेत, पण त्या आपल्याकडे सहज आढळत नाहीत."

हे विषारी साप, (बिनविषारी सापंसारखे) आपल्या आजूबाजूलाच वावरत असता,त्यांचे प्रमाण कमी आहे असे नाही. पुण्यासारख्या शहरात मी स्वतः ते ४ ही साप लोकांच्या घरातून पकडले आहेत. साप हा पृथ्वी वर लाखो वर्षे आहेत त्यामुळे कुठल्यापण परिस्थितीशी जुळवून घ्यायचे कसब त्यांच्यात आहे. महाराष्टातील जवळपास सगळ्या शहरात जे सर्पमित्र आहेत ते भर वस्तीतून विषारी/बिनविषारी साप पकडून जंगलात सोडत आहेत.

आता तो

अमेरिकन फोटो

, साप दिसल्यावर हा फोटो बघून त्याला ओळखणे फार कठीण आहे-
१. प्रत्येक वेळी तो पूर्ण दर्शन देणार नाही.
२. वेगळ्या वेगळ्या प्रकाशात त्याच्या अंगावरचा रंग वेगळा दिसतो.
३. काही बिनविषारी साप, विषारी सापासारखे दिसतात - धूळ नागीण/ नाग, कवड्या/मण्यार इ.
त्यामुळे हा फोटो बघून बिनविषारी समजलेला साप विषारी निघू शकतो, आणि अपघात होऊ शकतो.
त्यामुळे जो साप दिसेल त्याला "विषारी" मानून चला आणि सर्पमित्रांना फोन लावा, हा एक उपाय आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 8:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेडी तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडुन अजुन माहिती येऊ द्या.

आदूबाळ's picture

25 Mar 2015 - 11:50 am | आदूबाळ

जेडी आलं!

नांदेडीअन's picture

25 Mar 2015 - 11:59 am | नांदेडीअन

अजूनही काही विषारी जाती आहेत, पण त्या आपल्याकडे सहज आढळत नाहीत.

हे वाक्य खोडायची गरज नव्हती.
मण्यार, फुरसे, घोणस, नाग या बिग फोरव्यतिरिक्त अजूनही काही विषारी साप भारतात आढळतात, पण या चार सापांएव्हढे सहजपणे आढळत नाहीत.
^ असे वाचा ते.

साप दिसल्यावर हा फोटो बघून त्याला ओळखणे फार कठीण आहे.

मी काही सर्पतज्ञ नाही, पण हाच फोटो बघून मी ३-४ वेळा साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखले आहे.
माझे गावाकडचे नातेवाईक शेतामध्ये दिसला साप की मार टाईपचे होते.
बर्‍याच जणांच्या मोबाईलमध्ये मी हा फोटो टाकून दिलेला आहे.
आत्तापर्यंत किमान २०-२५ सापांचे प्राण वाचले आहेत.
नातेवाईकांपैकी एकाला तर सापांची आवड निर्माण झाली आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन तो आज ‘सर्पमित्र’ झालाय.

सांगायचा मुद्दा असा की साप दिसल्यावर हा फोटो बघून त्याला ओळखता येईलच असे नाही, पण ओळखणे फार कठीणसुद्धा मुळीच नाही.

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 12:34 pm | सुबोध खरे

आपण म्हणता आहात ते बरोबर आहे
परंतु याला एक दुसरा पदरही आहे. साप बिनविषारी आहे असे समजून लोक त्याच्याशी खेळायला जातात आणि निष्कारण चावून घेतात किंवा बिनविषारी सापांची विषारी समजून सर्रास हत्या होते उदा. धामण हि नागासारखी दिसते म्हणून किंवा नागीण आहे हे समजून तिची हत्या होते.
तेंव्हा सर्वात उत्तम म्हणजे साप दिसला कि काढता पाय घेणे. बिनविषारी म्हणून जास्त जवळ जाणेही नको कि विषारी म्हणून साप दिसला कि मार हेही नको.

चलत मुसाफिर's picture

23 Mar 2015 - 12:22 pm | चलत मुसाफिर

तुम्हाला वाटणारी भीती रास्त आहे यात शंका नाही. मात्र ही भीती अनभिज्ञतेतून निर्माण झालेली आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे ही इच्छा. तुम्ही उल्लेखलेले प्राणी हे स्वसंरक्षणार्थ माणसावर हल्ला करतात हे खरे. पण शहरी भागात असे घडण्याची शक्यता नगण्य असते. आणि या कारणासाठी सदर प्राण्यांचा ताबडतोब नायनाट करणे हे अयोग्य आहे.

सुबोध खरे's picture

23 Mar 2015 - 12:42 pm | सुबोध खरे

आठ फुटी मगर माणसाला अक्खे गिळणे शक्य नाही. मगरी माणसाला लांडग्या कुत्र्यान सारखे फाडून खात नाहीत. एवढ्या मोठ्या भाक्षाला पकडण्यासाठी बर्याच मगरी तेथे असाव्या लागतील. त्यामुळे त्या मगरीचा मोठ्या माणसाला काही उपद्रव होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु लहान मुलांनी अशा ठिकाणी पाण्यात पोहायला जाणे हे धोकादायक ठरू शकते.
राहिली गोष्ट साप किंवा विंचू. हे काही तुम्हाला स्वतः होऊन चावायला येत नाहीत. सापावर किंवा विंचवावर तुमचा पाय पडला तर तो चावू शकतो. शेतात किंवा जंगलात अशा घटना तुरळक पणे घडतात पण तो अपघात आहे.
सापाबाबत मी एक गोष्ट म्हणून शकेन कि सापाच्या पासून चारच काय पण आठ हात लांब राहावे. कारण सहा इंच लांबीच्या फुरश्यामुळे झालेली सर्पविषबाधा मी पाहीली आहे. बर्याच वेळेस कुतुहलापायी लोक विषारी आहे कि बिनविषारी आहे हे पाहण्याच्या नादात सापाच्याफार जवळ जातात आणी सर्प दंश करवून घेण्यास कारणी भूत होतात. तो बिचारा शेवटी स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. तेंव्हा साप म्हणू नये धाकला.
जंगले कमी व्हायला लागल्यामुळे वन्य प्राणी आणी माणसांचा संपर्क वाढला आहे आणी यातून असे प्रसंग जास्ती वाढले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख लोक बेकायदेशीरपणे सरकारी आणी राजकारणी लोकांशी साटेलोटे ठेवून राहत आहेत. राजकारणी लोक तर हे मानायला तयार नव्हते. परंतु आय आर एस ( INDIAN REMOTE SENSING SATELLITE) ने सप्रमाण दाखवून दिलेले असल्यामुळे आता त्यांना कुरकुरत का होईना पण मान्य करावे लागले आहे. परंतु हे लोक येथे कसे आले आणी त्यांना अभय देणारे कोण याची चौकशी करायला किंवा या लोकांचे पुनर्वसन कसे करायचे याचा साधा विचारही करायला ते तयार नाहीत. मग बिबळ्याने/ अस्वलाने माणसावर हल्ला केला या बातम्या रोजच्या झाल्या तर याला जबाबदार कोण?
लोकसंख्यावाढीचा हा भस्मासुर काय काय गिळंकृत करेल हे सांगता येणार नाही.

ओके ..पण गंभीररित्या जखमी करू शकेल किंवा पाण्यात ओढून नेऊन गुदमरून मारू शकेल का ?

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 1:21 pm | टवाळ कार्टा

जास्त काही नाही...टेस्ट करून सोडून देईल ;)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2015 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

किंवा पोट फार मोठे असेल्,तर फोडून देइल. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 2:23 pm | टवाळ कार्टा

rofl

magar

कानडाऊ योगेशु's picture

23 Mar 2015 - 5:27 pm | कानडाऊ योगेशु

देखो "मगर" प्यार से!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2015 - 5:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 10:56 am | वेल्लाभट

हाहाहाहाहाहा !

खटासि खट's picture

26 Mar 2015 - 8:20 am | खटासि खट

मगर असलेल्या तळ्याकाठी ...
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते
मगर जी नही सकते तुम्हारे बिबा

हे गाणं म्हणावे. मगर निघून जाते.

सुबोध खरे's picture

26 Mar 2015 - 9:09 am | सुबोध खरे

अहो
तो पी जे असा नाही
एका माणसाने मगरी पाळलेल्या असतात. तो नेहेमी मुलीना पटवून त्या तळ्याकाठी घेऊन येत असे. एकदा एक मुलगी ठरवल्याप्रमाणे येत नाही त्यावर तो गाणे काय म्हणेल?
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते,
"मगर" जी नही सकते तुम्हारे बिना.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Mar 2015 - 9:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 9:21 am | श्रीरंग_जोशी

यावरून सुचंलेलं गाणं

मगर ने किया है इशारा...
घडी भर का है खेल सारा...

सुबोध खरे's picture

26 Mar 2015 - 9:26 am | सुबोध खरे

अजून एक
एकदा माकडाचे मगरीवर प्रेम असते.
माकड मगरीला संध्याकाळी तळ्याकाठी बोलावतो पण मगर येत नाही तर माकड गाणे काय म्हणेल?
चांद फिर निकला
मगर तुम न आये
आता शेवटचे
एका माणसाचे मगरीवर प्रेम असते आणि ते रोज तळ्याकाठी भेटत असतात.
एके दिवशी दुसरीच मगर येते तर तो माणूस गाणे काय म्हणेल?
रोज शाम आती थी
मगर ऐसी न थी.

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

दुसरे तर खासंच....

बादवे मगरीवर प्रेम करणार्‍या माणसाचे गाणे.

मगर तुम मिल जाओ, जमाना छोड देंगे हम... :-)

एकदा एका पुरात मगर वाहून गेली. माकड़ म्हणालं,

हम जुदा हो गए, रासते खो गए,
मगर हम मिलेंगे, मगर हम मिलेंगे! ये याद रखना, मेरी राह तकना.

अजया's picture

26 Mar 2015 - 5:17 pm | अजया

=))

क्रॉकाडू नामक धमाल कार्टून कोणे एके काळी त्रेतायुगातील कार्टून नेटवर्कवर लागायचे ते आठवले. वरील मगर काहीशी त्यासारखीच आहे. हिंदीकरणाचा तेव्हा त्याला स्पर्षही झालेला नव्हता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2015 - 5:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्रुप्त किंवा टवाळ मगर असा डुआयडी घेण्यास हरकत नाही =))

जॅक डनियल्स's picture

25 Mar 2015 - 4:50 am | जॅक डनियल्स

डॉ. खरे बरोबर अगदी सहमत !
माझ्या स्वः अनुभवातून सांगतो- मगर, सुसर स्वतःहून माणसावर हल्ला करायचे प्रमाण कमी आहे. कुठला पण सरपटणारा प्राणी पहिल्यांदा पळून जायला बघतो, अगदी कोपऱ्यात घेतला गेला तरच हल्ला करतो. अजून एक, जेंव्हा त्यांचा मिलनाचा कालावधी असतो तेंव्हा ते आपली हद्द जपायचा प्रयत्न करतात. अश्या वेळी जर कोणी जरी मध्ये आला तरी मग त्याला माफी नसते. त्यामुळे जर तुम्ही असल्या वेळी सापडला तर तो काय करेल हे सांगता येत नाही. हॉलीवूड आणि बॉलीवूड च्या सिनेमांनी या प्राण्यांना खालीपिली बदनाम केले आहे.

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 10:19 am | टवाळ कार्टा

हॉलीवूड आणि बॉलीवूड च्या सिनेमांनी या प्राण्यांना खालीपिली बदनाम केले आहे.

आणि ते सुध्धा वेगवेगळ्या कारणांसाठी ;)

कपिलमुनी's picture

25 Mar 2015 - 11:28 am | कपिलमुनी

आता त्यांचा हनिमून आहे हे कसा कळणार ? :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 11:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पोगो ऐवजी कधीतरी डिस्कव्हरी बघा =))

(ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)

नाखु's picture

26 Mar 2015 - 4:04 pm | नाखु

विना अभिनयाचे एकमात्र डिस्कव्हरी-अ‍ॅनिमल प्लनेट आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2015 - 4:54 pm | टवाळ कार्टा

आणि क्रॅशकोर्स मधे शिकायचे असल्यास ज्येष्ठ समाजसेविका सन्नीबाई लिओनी यांच्या मार्गदर्शनपर चलतचित्रे बघा =))

मी राहाते त्या भागात सापांचा बर्यापैकी सुळसुळाट आहे.अगदी सुरुवातीला आला साप की मार असंच वाटायचं भीतीने.नंतर लक्षात येत गेलं की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय.ते इथे आधीपासुन होतेच.मग त्यानंतर घराभोवतालचा बराचसा भाग फरश्यांचा केला.मग फक्त बाऊंड्रीवर साप दिसतात. घराजवळ चिमणीचं घरटं होतं.तेव्हा मात्र अगदी दारात आला होता.एकदा आरामात पहुडलेलं बारकंसं फुरसं पण विझिट देऊन गेलेलं.त्यांचं प्रमाण आता कमी झालंय.मधुनच विशेषतः नोव्हेम्बर ते जानेवारीत साप दिसतात.पण ते गटारातुन फिरणारे बिनविषारी असतात हे एका सर्पमित्राकडुन समजुन घेतलंय.मी त्यांना घाबरण्यापेक्षा सापच चाहुल लागली काठी आपटली की निघुन जातो घाबरुन हे लक्षात आलंय.तेव्हापासुन मारणं बंद.कालच संध्याकाळी गवतावर पाणी मारताना दुसर्या टोकाला साप दिसला.हालचालीच्या जाणीवेने भरकन निघुन गेला.मी त्याच्यापासुन सुरक्षित अंतरावर लांब होते.त्यामुळे उगा साप साप करत गोंधळ न घालता जाऊ दिला.तो आला त्या बाजुला एक दगड लावुन टाकला मात्र नंतर.एक प्रवेश बंद त्याला त्याच्याच एरियात!!

पॉइंट ब्लँक's picture

23 Mar 2015 - 5:21 pm | पॉइंट ब्लँक

साप मगरी अशा अनोळखी प्राण्यांपेक्षा ओळखीचे लोक लै जास्त डेंजरस असत्यात. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2015 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

पॉइंट ब्लँक पॉइंट :)

यसवायजी's picture

23 Mar 2015 - 6:08 pm | यसवायजी

BBC
-A variety of poisonous snakes kill 50,000 Indians a year. In fact as many people die of snakebites in India as the rest of the world put together.
ज्यांच्या घरात कुणी सर्पदंशाने गेलंय, त्याला कुणी सांगावं की, "अभ्यास कमी पडतो रे तुमचा! हाताळायला जमत नाही"
-
मावशीला विषारी साप चावला होता.राहत्या घरातच. तेंव्हा मरता मरता वाचली ती.
-
त्यानंतर एकदा माझ्या घरी साप आला होता. घरी नात्यातलीच एक अपंग मुलगी होती त्यावेळी. तिने भोकाड पसरले. भूतदया वगैरे नाही सुचली काही. दगड़ाने ठेचला. वाईट वाटलं. पण पर्याय नाही.
-
वरची आकडेवारी सांगते की,भारतात सर्पदंशावर लगेच उपचार न मिळाल्याने जास्त मृत्यु होतात. ती परिस्थीती बदलायची आपली ताकद नाही. जान सलामत तो स्नेक शोज पच्चास.

तर त्यांच्या घरात घुसता कशाला,तो साप किंवा मगर तुम्हाला चावेल म्हणुन त्याला दगडाने ठेचुन मारणार मग त्यांच्या जिवाला धोका निर्माण करताय म्हणुन माणसाला कश्या कश्याने ठेचुन मारले पाहिजे,तो साप अथवा मगर निदान निर्सगाचा समतोल तरी ठेवतोय्,तुमचा खरच जगुन काही उपयोग आहे का ?(यात तुम्ही आणी मी सगळेच आलो.)

@एव्हडी भिती वाटते या मुक्या प्राण्यांची>>
हो. भितीचं कारण लिंकमधे दिलंय.

@ तर त्यांच्या घरात घुसता कशाला,>>
हम्म. पण तसं पाहायला गेलं तर मग माणसाला कुठेच राहायचा अधीकार नाही. जंगलच होतं की सगलं. मी ज्या ठिकाणी राहतोय तिथे ८० वर्षापुर्वी शेती होती.
अशी जागा सांगा की जी फक्त माणसासाठी आहे. (माझ्या वरच्या केसमधे साप घरी आला होता)

@ तुमचा खरच जगुन काही उपयोग आहे का ? >>
माहीत नाही. याचे उत्तर भल्याभल्यांना नाही मिळालंय. तुमच्याकडे असेल तर दयाच. ;)

प्रसाद१९७१'s picture

24 Mar 2015 - 3:49 pm | प्रसाद१९७१

सापाला कोणी आंदण दिले आहे का ती जागा. माणुस महत्वाचा, त्याची गरज भागली की मग बाकी प्राणीमात्र.

बाबा पाटील's picture

23 Mar 2015 - 6:17 pm | बाबा पाटील

मग याच भारतात विनाकारण किती लक्ष साप मारले जातात दरवर्षी याची काही आकडेवारी द्या की.

@विनाकारण किती लक्ष साप मारले जातात.>>>
विनाकारण नाही. कारण काय असेल?
मरणाची भिती? जर मेडीकल हेल्प वेळेत मिळाली, मृतांचे आकडे कमी झाले तर साहजीकच भीती कमी होईल. आशा करतो की असे लवकर होवो.

मुळात आपण सापाच्या अधिवास असलेल्या क्षेत्रात राहात असलो की काही काळजी घेणे आवश्यक आहेच.उदा.घराला जाळीचा दरवाजा असणे.उंबर्याला फळी असणे.उंदीर घराच्या परिसरात येऊ नयेत म्हणून भंगार कचरा नियंत्रण ठेवणे,घराच्या वावरत्या अंगणात प्रखर उजेड देणारे लाईट असणे,चप्पल घातल्याशिवाय न फिरणे,काठी हाताशी असणे.मांजरांचा वावर असणे.फरसबंदी अंगण असावे.तसेच मी माझ्या घराच्या आजुबाजुला फोरेटचा फवारा करते.त्यामुळे साप सहसा घरापाशी फिरकत नाहीत.

बर्‍याचदा नागाबो वस्तीला असतो,काठी आपटली की बिचारा निघुन जातो,गावतल्या कौलारु घरात तर वरच्या रिफाडात कायमस्वरुपी घोरपड्,मुंगुस्,साप यांचा मुक्काम असतो,कधी कधी कोल्होबा किंवा लांडगोबा दर्शन देवुन जातो,आता चासकामानच्या पाण्यामुळे उस वाढलाय त्यामुळे बिबट्याचीही वंदना आहे,यातल्या एकानेही कधी हल्ला केल्याच ऐकु आल नाही.एकदा अकरावीत असताना कांद्यात पाणी धरत होतो तर चक्क नागराजाने दर्शन दिले,माझ्या कमरेच्यापेक्षा जास्त मोठा फणा काढुन, ख्याली खुशाली विचारुन महाराज निघुन गेले.ही मुकी जणावरे खरच काही त्रास देत नाहीत हो, जोपर्यंत माणुस त्यांच्या जिवाला धोका उत्पन्न करत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे ढुंकुन ही पहात नाहीत.

हुप्प्या's picture

24 Mar 2015 - 9:57 am | हुप्प्या

मु़की जनावरे त्रास देत नाहीत हा गैरसमज आहे. माणसाच्या कुठल्या वागण्याने त्यांना आपल्या जिवाला धोका वाटेल हे सांगता येत नाही. अंधारात चुकून सापावर पाय पडला तर साप चावणारच. त्यात माणसाचा दोष नाही आणि सापाचाही नाही. पण तरी दोघे मरू शकतात. कुठल्या प्राण्याला नुकतेच पिल्लू झाले असेल तर आणि एखादा माणूस त्या आई आणि पिल्लाच्या मधे अनवधाने आला तर ती आई जीवावर उदार होऊन हल्ला करेल. मग ते अस्वल असेल वा बिबळ्यासारखा प्राणी असेल. हत्ती वा रानरेडा असला तर काय विचारायलाच नको!
तेव्हा मुके प्राणी कारणाशिवाय हल्ला करत नाहीत हे खरे असले तरी आपली कुठली हालचाल त्यांच्या आक्रमणाला कारणीभूत ठरेल हे नेहमीच सांगता येत नाही. बर्‍याचदा ते कळेपर्यंत उशीर झालेला असतो. तेव्हा अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे दोघांच्या हिताचे आहे.

नांदेडीअन's picture

24 Mar 2015 - 11:13 am | नांदेडीअन

अंधारात चुकून सापावर पाय पडला तर साप चावणारच. त्यात माणसाचा दोष नाही आणि सापाचाही नाही.

माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कंदिल, टॉर्चसारख्या गोष्टींचा शोध लावलेला आहे.
इतक्या अंधारात जर त्या गोष्टी वापरायच्या नसतील तर परत त्याच बुद्धीचा वापर करून त्याला अल्टरनेट ठरतील असे शोध लावावेत.

एखादा माणूस त्या आई आणि पिल्लाच्या मधे अनवधाने आला तर ती आई जीवावर उदार होऊन हल्ला करेल.
मग ते अस्वल असेल वा बिबळ्यासारखा प्राणी असेल.
हत्ती वा रानरेडा असला तर काय विचारायलाच नको!

ज्या जागी हे प्राणी आपल्या पिल्लांसोबत राहतात, तिथे माणसाने ‘अनावधानाने’ का जायचे ?

मुके प्राणी कारणाशिवाय हल्ला करत नाहीत हे खरे असले तरी आपली कुठली हालचाल त्यांच्या आक्रमणाला कारणीभूत ठरेल हे नेहमीच सांगता येत नाही.

मुक्या प्राण्यांच्याच बाबतीत कशाला, हे अगदी माणसांच्या बाबतीतसुद्धा लागू पडते.

हुप्प्या's picture

24 Mar 2015 - 8:38 pm | हुप्प्या

>>माणसाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कंदिल, टॉर्चसारख्या गोष्टींचा शोध लावलेला आहे.
इतक्या अंधारात जर त्या गोष्टी वापरायच्या नसतील तर परत त्याच बुद्धीचा वापर करून त्याला अल्टरनेट ठरतील असे शोध लावावेत.
>>
कितीही शोध लावले तरी एका पावलापुरता जर माणूस बेसावध असेल तर काय करायचे? तेवढ्या अवधीत सापावर पाय पडू शकतो. जर साप चावण्याचे अपघात पाहिलेत तर बहुधा कुणीही आपणहून धोका पत्करत नाही. तो अपघातानेच घडतो. अशी चूक होताच कामा नये अशी अपेक्षा बाळगणे खुळचटपणाचे आहे.

>>
ज्या जागी हे प्राणी आपल्या पिल्लांसोबत राहतात, तिथे माणसाने ‘अनावधानाने’ का जायचे ?
<<
ह्यातले अनेक प्राणी जसे हत्ती, रेडा, अस्वल हे कुठे "रहात"नाहीत. ते अनेक चौरस मैल परिसरात भटकत असतात. अन्नासाठी त्यांना तसे करणे भागच असते. आता एखादा पर्यटक, हायकर वगैरे जंगलात फिरत असताना, एखाद्या वळणावर, झाडाच्या आडोशामुळे, खडकामुळे अचानक प्राण्याच्या अगदी जवळ येऊ शकतो. माणसाचे नाक वा कान तितके तिखट नसतात. त्यामुळे हे होऊ शकते. अस्वलांचे, रेड्यांचे, हत्तीचे हल्ले ह्यांचे रेकॉर्ड तपासलेत तर हे स्वच्छ कळेल की हल्ला झालेली व्यक्ती जाणूनबुजून त्या स्थळी गेली नव्हती. निव्वळ अनवधानाने.
हौशी भटक्यांचे जंगलात, डोंगरात भटकणे वा रानटी प्राण्यांचा मुक्त वावर ह्यापैकी कशावरही बंदी घालणे व्यवहार्य नाही. आणि तोवर असे अपघात होतच रहाणार. निदान आजवरचा इतिहास तरी हेच सांगतो.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2015 - 2:19 pm | अत्रन्गि पाउस

भयंकर क्लिप आहे ती

कपिलमुनी's picture

24 Mar 2015 - 2:23 pm | कपिलमुनी

दया आली त्यांची !

स्वप्नांची राणी's picture

24 Mar 2015 - 3:20 pm | स्वप्नांची राणी

जिथे हे फीचर केले गेले ती सपेरा लोकांची वस्ती आहे. ही क्लीप शूट करतेवेळी, सापांचे अजून बारकाईने निरीक्षण करु द्यावे ही विनंती त्या लोकांनी धुडकावली होती. नंतर ह्या क्लीप वर एका सर्पतज्ञाचे स्पष्टीकरण आले होते. हे जे त्या मुलीच्या आजु-बाजुला फिरणारे साप-नाग आहेत त्या सगळ्यांची तोंडे शिवलेली आहेत, हे त्याने दाखवून दिले. तसेच ह्या मुलीपेक्षाही लहान, अवघा २ वर्षाचा मुलगाही साप असेच कसेही धरुन आपटत होता, खेळत होता.त्याला तर एका नागाने चक्क दंशही केला. त्याही बाबतीत त्या साप, नागांचे विषदंत काढून टाकलेले आहेत, हे सिद्ध केले होते.

ईथे मला, मिपा वरच असलेली सापविषयीची एक मालिका आठवतेय. लेखक सर्पमित्र होते, भारतात असताना. त्यांनी एकेठीकाणी लिहीले होते की अचानक साप-नागाशी सामना करायची वेळ आली तर, तो विषारी आहे की नाही, याची शहानिषा करत बसण्यापेक्षा तिथून कलटी मारणे योग्य. किंवा अश्या परिस्थीतीत त्या सापाला मारणेही योग्यच.

अत्रन्गि पाउस's picture

24 Mar 2015 - 4:08 pm | अत्रन्गि पाउस
बॅटमॅन's picture

24 Mar 2015 - 8:42 pm | बॅटमॅन

हे जे त्या मुलीच्या आजु-बाजुला फिरणारे साप-नाग आहेत त्या सगळ्यांची तोंडे शिवलेली आहेत, हे त्याने दाखवून दिले. तसेच ह्या मुलीपेक्षाही लहान, अवघा २ वर्षाचा मुलगाही साप असेच कसेही धरुन आपटत होता, खेळत होता.

:(

जॅक डनियल्स's picture

25 Mar 2015 - 4:55 am | जॅक डनियल्स

सगळ्या नागांची तोंडे शिवली आहेत नाही तर त्यांनी तोंड इकदा तरी उघडून जीभ काढली असती.
अश्या किल्पस मुळेच खूप अंधश्रध्दा पसरतात. माझ्या एका नागपंचमी च्या लेखात मी हे गारुडी कसे तोंड शिवतात ते दिले आहे, खूप क्रूर आहे सगळे.

मार्मिक गोडसे's picture

25 Mar 2015 - 12:15 pm | मार्मिक गोडसे

शिवलेल्या तोंडानी नाग खातात कसे? कि रोज खायला घालताना नागांचे तोंड मोकळे केले जाते. असे रोज करावे लागत असल्यास नागांना शारिरीक इजा व त्रास होत नाही का?

शिवलेल्या तोंडांनी नाग काय, कुणीच काही खाऊ शकत नाही. असे साप भुकेने किंवा वेदनेने, सेप्टिक होऊन, न्यूमोनिया होऊन, अशा कारणांनी शेवटी मरतात. नागपंचमीला गारुड्याकडचा नाग दूध पितो हे सर्वांनी पाहिलेले असेल. वास्तविक पाहता नाग/साप हे सस्तन प्राणी नाहीत. ते दूध कधीही पीत नाहीत. मग दुधाची वाटी पुढे ठेवली असता नाग त्यात तोंड का घालतो? कारण नागपंचमीच्या आधी काही दिवस पकडलेल्या नागांना उपाशी ठेवण्यात येतं. त्यांची तोंडे अशा प्रकारे शिवली जातात. अन्नपाण्याविना व्याकूळ झालेला तो साप मग आपसूकच दूध प्यायला मजबूर होतो. दूध हे सापांचे नैसर्गिक अन्न नसल्याने त्यांना न्यूमोनिया होतो आणि काही दिवसांनी ते मरण पावतात. नाही लगेच मेले तर त्यांना त्याच तोंड शिवलेल्या अवस्थेत पुन्हा सोडून दिलं जातं. शेवट नाहीतरी हृदयद्रावक असतोच.

इतका राग येतो की अशा लोकांची तोंडेही शिवली पाहिजेत असं वाटतं... :-|

जेपी's picture

24 Mar 2015 - 8:46 pm | जेपी

हाफशेंच्युरीssss...

जाऊ द्या आजचा कोटा संपलाय

आदूबाळ's picture

24 Mar 2015 - 9:18 pm | आदूबाळ

एक एक क्रोकोडाईल स्किन ह्यांडब्याग देऊन सत्कार करून टाकाचा.

खटपट्या's picture

24 Mar 2015 - 9:51 pm | खटपट्या

आखिल भारतिय मगर बचाव संघटनेतर्फे मगरीचे अंडे देउन सत्कार....

आदूबाळ's picture

24 Mar 2015 - 9:58 pm | आदूबाळ

मगरपट्टा सिटीतर्फे दोन मगरीच्या चामड्याचे पट्टे देऊन सत्कार

बत्तीस शिराळ्याकडून त्येस्सीस प्लेट शिरा देऊन सत्कार!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Mar 2015 - 11:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मगरपट्ट्यात एखादा ३ बी.एच.के. मिळत असता सत्कार समारंभात तर धाग्यात हिरिरिने भाग घेतला असता.

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 11:32 am | सुबोध खरे

भंपक व्हिडियो
काय सिद्ध करायचे आहे त्यात?
सवंग लोकप्रियता सोडून? आणि हे नाग काय तिच्याशी खेळायला स्वतः आले होते? कि आपले तोंड शिवून घ्यायला?
तुमचा खेळ होतो आणि आमचा जीव जातो याचे दुसरे वाईट उदाहरण सापडणार नाही.

सुनील's picture

26 Mar 2015 - 9:03 am | सुनील

मगर आणि सुसर यांत काय फरक आहे? की दोन्ही एकाच प्राण्याची दोन वेगळी नावे आहेत?

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा

सुसरीचा जबडा लांब असतो

सुनील's picture

27 Mar 2015 - 8:42 am | सुनील

धन्यवाद!

मला वाटलं, सुसरीची पाठ मऊ असते, असा प्रतिसाद येतोय की काय? ;)

खटपट्या's picture

27 Mar 2015 - 9:00 am | खटपट्या

मगर
magar
सुसर
susar

कपिलमुनी's picture

26 Mar 2015 - 1:54 pm | कपिलमुनी

मगर धोकादायक असते . कृष्णा नदीमधे असलेल्या मगरींनी कित्येकवेळा हल्ले केल्याच्या घटना आहेत.
नरसोबाच्या वाडीमधे कितीतरी बळी गेले आहेत. कदाचित नैसर्गिक भक्ष्यांच्या कमतरतेमुळे असेल पण मगरीने पोहणार्‍यांवर , कडेला धुणार्‍या बायकांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

त्यामुळे मगर ही धोकादायकच आहे. तिला मानवी अधिवासापासोन दूर पाण्याच्या ठिकाणी सोडला पाहिजे

अत्रन्गि पाउस's picture

26 Mar 2015 - 5:38 pm | अत्रन्गि पाउस

म्हणजे तिथे लोक सतत ह्या शक्यतेत वावरतात ?
आधी वर अमेरिकेत लोक मगरी दिसल्या कि परिस्थिती विशिष्ट प्रकारे हाताळतात ...इथे तसे नाही का ? त्यांना काही माहिती देता येईल का ?

रॉजरमूर's picture

11 Jun 2015 - 1:28 am | रॉजरमूर

हो
चांगलीच दहशत बसलीय लोकांना
हे वृत्त वाचा .

का चवताळल्या कृष्णेतल्या मगरी?

नरसोबाच्या वाडीमधे कितीतरी बळी गेले आहेत.
च्यामारी... या बद्धल मी कधी नाही ऐकल ते !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }