रशियाचा धडा

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in काथ्याकूट
16 Aug 2008 - 2:01 am
गाभा: 

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले. एक-दोन दिवसात दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाच्या ताब्यात घेऊन जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीच्या आवारात जाऊन उभे राहिले.

आता पुढे काय?

  • दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाशी जोडले जातील वा स्वतंत्र देश बनतील.
  • जॉर्जियाने नाटो सदस्यत्व घेऊ नये असे बंधन त्यांच्यावर घातले जाऊ शकते.
  • रशियन सैन्यावर केवळ जॉर्जियाच नव्हे तर इतर शेजार राष्ट्रे सुद्धा हल्ला करण्याचा केवळ विचारही करणार नाहीत.

आता श्रीलंकेचे उदाहरण...
श्रीलंकेन सैन्याने तमिळ वाघांच्या बिमोडासाठी निकराची चढाई केली आहे. अगोदर हवाई हल्ला करून नगरीकांना हुसकावने व तमिळ वाघांचा सफाया करत गाव्/शहर कबिज करने हा त्यांचा धडाका चालू आहे.

आणि आता कश्मिर...
कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात व त्यांना आडवता आडवता पोलिसांना/सैन्याला गोळ्या चालवाव्या लागतात... काही तासाच्या आत भारताने मुस्लिमांचे रक्त सांडले अशा आशयाच्या सचित्र बातम्या बीबीसी, सिएनएन सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकतात व खुलेआम भारताची बदनामी करतात.

तात्पर्यः आपल्या नेतृत्वात हा प्रश्न सोडवन्याची इच्छाशक्ती संपली आहे का की ती कधीच नव्हती? जगातल्या दुसर्‍या क्रमांने मोठ्या सैन्याला कश्मिरप्रश्न हाताळता येत नाही यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही.

वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

16 Aug 2008 - 9:50 am | सखाराम_गटणे™

मित्रहो, फुकटचा मनाला ताण घेउ नका,
भारत सरकार असे काही ही करणार नाही. उगाच असले विचार मनात आणुन स्वतःला त्रास देउ नका.
आपण विचार करुन काहीही होणार नाही. जे सरकार संसदेवर ज्याने हल्ला केला त्याला फाशी देउ शकत नाही, ते असल्या गोस्टीचा विचार करु तरी शकतील???

ऐकादे विनोदी लिखाण वाचा, लिहा मस्त पैकी दुपारचे झोपा, आयुष्य उपभोगा.

मी विचार करतोय, भारतातील पक्ष, पाकीस्तानबरोबर झालेल्या लढाईमध्ये झालेली नुकसान भरपाई कधी पाकीस्तान ला कधी देता आहेत ते?
खुपच वाईट, बिचारा पाकीस्तान नाही का?

सखाराम गटणे

II राजे II's picture

16 Aug 2008 - 10:36 am | II राजे II (not verified)

१००% हेच म्हणतो !

मी विचार करतोय, भारतातील पक्ष, पाकीस्तानबरोबर झालेल्या लढाईमध्ये झालेली नुकसान भरपाई कधी पाकीस्तान ला कधी देता आहेत ते?
खुपच वाईट, बिचारा पाकीस्तान नाही का?

:&

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

संजय अभ्यंकर's picture

16 Aug 2008 - 10:41 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

16 Aug 2008 - 3:24 pm | सर्वसाक्षी

<<वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?>>

तसे करायची ईच्छा आहे कुणाला? खुर्ची मिळवा, खुर्ची टिकवा आणि नोटा छापा. खड्ड्यात गेलया समस्या - हो खड्डे मात्र मुबलक आहेत. समस्या संपतील पण ते नाही संपणार.

भास्करराव, रक्त आटवणे व्यर्थ आहे. काल लाल चौकात पाकसदृश ध्वज फडकला. आपल्या समंजस सरकारने काय केले?
असो.

चिन्या१९८५'s picture

16 Aug 2008 - 5:02 pm | चिन्या१९८५

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला.
अख्खा जॉर्जिया पादाक्रांत केलेला नाहीये तर दक्षिण आसेतिया केला आहे. आणि दक्षिण आसेतियात तसेही रशियाचे शांतीदुत होते.आंतरराष्ट्रीय मिडीयाचा साकश्विलीनी चांगला वापर करुन घेतला आहे पण वस्तुस्थिती ही आहे की जॉर्जियाने रणगाडे दक्षिण आसेतियात घुसवले होते

कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात
हाच आपल्या आणि रशियातल्या परीस्थितीतला फरक आहे.कारण दक्षिण आसेतियातील जनतेला रशियात जायचय तर काश्मिरमधील जनतेला पाकीस्तानात जायचय (अथवा स्वतंत्र रहायचय)

सुनील's picture

16 Aug 2008 - 5:37 pm | सुनील

काश्मिरवादाची रशिया-जॉर्जियाप्रकरणाशी तुलना मूळातच गैरलागू आहे. त्याची फारफारतर चेचन्यावादाशी तुलना होऊ शकेल.

दुसरे, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होत नाही. लष्करीबळाने काश्मिर प्रश्न सोडवला पाहिजे असे आपण सुचवित आहात का? तसे असल्यास, आजच्या घडीला जम्मू-काश्मिर राज्यात भारताचे (लष्करी-निमलष्करी) मिळून जवळपास ७ लाख जवान तैनात आहेत. शिवाय त्यांना भरपूर अधिकारदेखिल आहेत. एक कोटी लोकसंख्येसाठी ७ लाख म्हणजे दर शंभर व्यक्तींमागे ७ जवान (काश्मिरखोर्‍यात तर हे प्रमाण अधिकच वाढते). असे असूनही जर हा प्रश्न कायम असेल तर आपले रोगनिदानच चुकले आहे हे निश्चित! (आता निदानच चुकले तर उपचार चूकणारच).

वर चिन्या ह्यांनी म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य काश्मिरींना ना भारतात रहायचे आहे ना पाकिस्तातात जायचे आहे. त्यांना हवी आहे "आझादी". भारताने प्रचंड लष्करी ताकदीवर हा भूभाग (म्हणजे फक्त जमीन) भारतात ठेवली आहे. सर्वसामान्य काश्मिरी जनता मनाने कधीच भारतीय झालेली नाही. काश्मिरी पंडीत त्याला अपवाद. पण ते संख्येने अत्यल्प. उद्या सर्वच्या सर्व पंडीत काश्मिर खोर्‍यात परतले तरी काश्मिरची डेमॉग्राफी (आणि म्हणूनच परिस्थिती) फारशी बदलणार नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भास्कर केन्डे's picture

20 Aug 2008 - 12:07 am | भास्कर केन्डे

सर्वसामान्य काश्मिरी जनता मनाने कधीच भारतीय झालेली नाही.
-- काश्मिरबद्दल पूर्वी कुठेतरी वाचनात आले होते की काश्मिरी जनता भारताला पूर्णपणे अनुकूल कधीच नव्हती असे नव्हे. १९४७ ते ५० या वर्षांत काश्मिरमध्ये पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानातून जी प्रचंड घुसखोरी झाली त्याने प्रत्यक्ष (धुसखोर) तसेच अप्रत्यक्ष (खुसखोरांनी चिथावनी देऊन तयार केलेले) भारतविरोधी लोक वाढू लागले. त्यानंतर ऐंशीच्या दशकात सुरु झालेल्या हिंसाचारामुळे भारतविरोधी मतप्रवाह वाढू लागले. आता मात्र परिस्थिती हाता बाहेर गेली आहे असे वाटते.

लष्करीबळाने काश्मिर प्रश्न सोडवला पाहिजे असे आपण सुचवित आहात का?
-- केवळ लश्करी उपायांनी भागनार नाही. वेगेवेळे देश त्यांचे असे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत आहेत. त्यात बरेच यशस्वी प्रयोग आहेत. त्यांचा अभ्यास करून आपण आपल्याला योग्य असे प्रयोग केले पाहिजेत. पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती हवी. जसे की कायद्यामध्ये बदल करून इतर भारतीयांना काश्मिरात वसाहती निर्माणासाठी प्रोत्साहन देणे. उदा. तिबेट्-चिन, वेस्ट बँक - इस्त्राईल, अंदमान - भारत, वगैरे.

काश्मिरवादाची रशिया-जॉर्जियाप्रकरणाशी तुलना मूळातच गैरलागू आहे.
--रशियाने केलेल्या धाडसाने हा विचार पुन्हा डोक्यात आला एवढाच रशियाचा संदर्भ म्हणा हवे तर.

आपला,
(भारतीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.