क्रिकेट विश्वचषक स्पर्धा - २०१५

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
9 Feb 2015 - 2:41 pm
गाभा: 

क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यांची ११ वी विश्वचषक स्पर्धा शनिवार १४ फेब्रुवारी २०१५ या दिवशी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारीला न्यूझीलँड वि. श्रीलंका हा स्पर्धेतील सर्वात पहिला सामना खेळला जाईल. १८-२१ मार्च या चार दिवशी ४ उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत, उपांत्य फेरीचे २ सामने २१ मार्च व २४ मार्च रोजी आहेत व अंतिम सामना रविवार २९ मार्च या दिवशी खेळला जाईल.

ही स्पर्धा न्यूझीलँड व ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तपणे आयोजित करीत आहेत. यापूर्वी १९९२ मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा याच देशांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.

पहिल्या १० स्पर्धांची संक्षिप्त माहिती अशी आहे.

(१) वर्ष - १९७५, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - ऑस्ट्रेलिया
(२) वर्ष - १९७९, यजमान - इंग्लंड, विजेता - वेस्ट इंडीज, उपविजेता - इंग्लंड
(३) वर्ष - १९८३, यजमान - इंग्लंड, विजेता - भारत, उपविजेता - वेस्ट इंडीज
(४) वर्ष - १९८७, यजमान - भारत व पाकिस्तान, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - इंग्लंड
(५) वर्ष - १९९२, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - पाकिस्तान, उपविजेता - इंग्लंड
(६) वर्ष - १९९६, यजमान - भारत, पाकिस्तान व श्रीलंका, विजेता - श्रीलंका, उपविजेता - ऑस्ट्रेलिया
(७) वर्ष - १९९९, यजमान - इंग्लंड, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - पाकिस्तान
(८) वर्ष - २००३, यजमान - द. आफ्रिका, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - भारत
(९) वर्ष - २००७, यजमान - वेस्ट इंडीज, विजेता - ऑस्ट्रेलिया, उपविजेता - श्रीलंका
(१०) वर्ष - २०११, यजमान - भारत, बांगलादेश व श्रीलंका, विजेता - भारत, उपविजेता - श्रीलंका

(११) वर्ष - २०१५, यजमान - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड, विजेता - ?, उपविजेता - ?

________________________________________________________________________________

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ

बसलेले (डावीकडून) - दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, कपिलदेव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावसकर, मदनलाल
उभे (डावीकडून) - पी आर मानसिंग (संघ व्यवस्थापक), यशपाल शर्मा, कृष्णम्माचारी श्रीकांत, बलविंदरसिंग संधू, रवी शास्त्री, संदीप पाटील, रॉजर बिन्नी, कीर्ति आझाद, सुनील वॉल्सन
________________________________________________________________________________

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता भारतीय संघ

(डावीकडून) - झहीर खान, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुनाफ पटेल, गौतम गंभीर, श्रीशांत, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सुरेश रैना, पियूष चावला, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, आशिष नेहरा, रविचंद्रन अश्विन, युसुफ पठाण

________________________________________________________________________________

पूर्वीच्या स्पर्धांवर नजर टाकली तर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात.

- ऑस्ट्रेलिया सर्वाधिक म्हणजे ४ वेळा विजेते ठरले आहेत. त्याखालोखाल भारत व वेस्ट इंडीजने ही स्पर्धा प्रत्येकी २ वेळा जिंकली आहे.

- ऑस्ट्रेलिया २ वेळा उपविजेता सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया १० पैकी ६ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत.

- इंग्लंड ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचून सुद्धा त्यांना विजेतेपद मिळविता आलेले नाही. श्रीलंका व भारत देखील ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचले होते. श्रीलंकेने एकदा तर भारताने दोन वेळा अंतिम फेरीत विजय मिळविला आहे.

- पहिल्या ३ स्पर्धात वेस्ट इंडीजचा जबरदस्त दबदबा होता. तीनही स्पर्धात ते अंतिम फेरीत पोहोचले व २ वेळा विजेते झाले. त्यानंतर त्यांची कामगिरी एकदम ढेपाळली व नंतरच्या ७ स्पर्धात ते एकदाच १९९६ मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २०८ धावांचा पाठलाग करताना जेमतेम ५ धावांनी त्यांचा पराभव झाला होता.

- न्यूझीलँड १० पैकी ६ स्पर्धात उपांत्य फेरीत पोहोचले होते. परंतु उपांत्य फेरीचा अडथळा त्यांना पार करता आलेला नाही.

- १९९२ पासून स्पर्धेत सामील झालेल्या द. आफ्रिकेने खेळलेल्या ६ पैकी ३ स्पर्धात उपांत्य फेरी गाठली. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी नेहमीच कच खाल्ल्यामुळे त्यांचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जातो.

- पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९७५-१९९६) व भारताचा सचिन तेंडुलकर (१९९२-२०११) हे दोघे प्रत्येकी ६ स्पर्धा खेळलेले आहेत. वेस्ट इंडीजचा शिवनरीने चंद्रपॉल, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन व केनयाचा थॉमस ओडोयो हे प्रत्येकी ५ स्पर्धा खेळलेले आहेत.

- कोणत्याही स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या करण्याचा मान कॅनडाकडे आहे. कॅनडाचा संघ दोन वेळा (एकदा श्रीलंकेविरूद्ध व १९७९ मध्ये इंग्लंडविरूद्ध) ४५ धावसंख्येवर बाद झाला होता. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने केलेली आहे (२००७ मध्ये बर्म्युडाविरूद्ध ४१३ धावा).

- भारत व पाकिस्तान एकमेकांविरूद्ध एकूण ५ सामने खेळलेले आहेत. सर्व सामने भारताने जिंकले आहेत. ४ सामन्यात प्रथम फलंदाजी करून व एका सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करून भारताने विजय मिळविला होता. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता व त्यापैकी २ सामन्यात त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला होता. या स्पर्धेतसुद्धा भारत वि. पाकिस्तान ही लढत होणार आहे व प्रथमच भारत सचिनशिवाय सामन्यात खेळेल.

- मागील ५ स्पर्धांमध्ये अंतिम फेरीतील किमान १ संघ हा आशियातील संघ आहे.

- २००७ मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने द. आफ्रिकेविरूद्ध लागोपाठ ४ चेंडूवर ४ बळी मिळविले होते.

_________________________________________________________________________________

२०१५ मधील विश्वचषक स्पर्धा एकूण १४ संघात खेळली जाईल. संघांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे.

'अ' गट - न्यूझीलँड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, स्कॉटलँड, अफगाणिस्तान, बांगलादेश

'ब' गट - द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, झिंबाब्वे, आयर्लँड, संयुक्त अरब अमिराती

_________________________________________________________________________________

स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.

प्राथमिक फेरीतील सामने

(१) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. श्रीलंका, स्थळ - ख्राईस्टचर्च
(२) शनिवार १४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, स्थळ - मेलबोर्न

(३) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. झिंबाब्वे, स्थळ - हॅमिल्टन
(४) रनिवार १५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. पाकिस्तान, स्थळ - अ‍ॅडलेड

(५) सोमवार १६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), आयर्लँड वि. वेस्ट इंडिज, स्थळ - नेल्सन

(६) मंगळवार १७ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन

(७) बुधवार १८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. बांगलादेश, स्थळ - कॅनबेरा

(८) गुरूवार १९ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), यूएई वि. झिंबाब्वे, स्थळ - नेल्सन

(९) शुक्रवार २० फेब्रुवारी, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. इंग्लंड, स्थळ - वेलिंग्टन

(१०) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज, स्थळ - ख्राईस्टचर्च
(११) शनिवार २१ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, स्थळ - ब्रिस्बेन

(१२) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. श्रीलंका, स्थळ - ड्यूनेडीन
(१३) रविवार २२ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. द. आफ्रिका, स्थळ - मेलबोर्न

(१४) सोमवार २३ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. स्कॉटलँड, स्थळ - ख्राईस्टचर्च

(१५) मंगळवार २४ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), वेस्ट इंडीज वि. झिंबाब्वे, स्थळ - कॅनबेरा

(१६) बुधवार २५ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. यूएई, स्थळ - ब्रिस्बेन

(१७) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), अफगाणिस्तान वि. स्कॉटलँड, स्थळ - ड्यूनेडीन
(१८) गुरूवार २६ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), श्रीलंका वि. बांगलादेश, स्थळ - मेलबोर्न

(१९) शुक्रवार २७ फेब्रुवारी, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. वेस्ट इंडीज, स्थळ - सिडने

(२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड
(२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ

(२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन
(२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन

(२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा

(२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर
(२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ

(२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन

(२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ

(२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड
(३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट

(३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर
(३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने

(३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड

(३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन

(३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट

(३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन

(३७) शुक्रवार १३ मार्च, वेळ - सकाळी ०६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. बांगलादेश, स्थळ - हॅमिल्टन
(३८) शुक्रवार १३ मार्च, वेळ - पहाटे ९:३० (भाप्रवे), अफगानिस्तान वि. इंग्लंड, स्थळ - सिडने

(३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड
(४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट

(४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर
(४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल
_______________________________________________________________________________

उपांत्यपूर्व फेरीतील सामने

(१) बुधवार १८ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना ('अ' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ) , स्थळ - सिडने

(२) गुरूवार १९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना ('अ' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - मेलबोर्न

(३) शुक्रवार २० मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना ('अ' गटातील तृतीय क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील द्वितीय क्रमांकाचा संघ) , स्थळ - अ‍ॅडलेड

(४) शनिवार २१ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना ('अ' गटातील चौथ्या क्रमांकाचा संघ वि. 'ब' गटातील प्रथम क्रमांकाचा संघ) , स्थळ - वेलिंग्टन

________________________________________________________________________________

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील पहिला सामना, स्थळ - ऑकलँड

(२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), उपांत्य फेरीतील दुसरा सामना, स्थळ - सिडने

________________________________________________________________________________

अंतिम सामना

रविवार २९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्थळ - मेलबोर्न

________________________________________________________________________________

२०११ व २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील नियमातील फरक खालीलप्रमाणे -

(१) २०११ ची स्पर्धा - २०११ मध्ये सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असायचा. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. नंतर षटक क्रमांक ११ ते ५० या दरम्यान ५ षटकांचे २ पॉवरप्ले असायचे व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येत होते.

२०१५ ची स्पर्धा - २०१५ च्या स्पर्धेत सुरवातीला १० षटकांचा पॉवरप्ले असेल. या १० षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त २ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. नंतर षटक क्रमांक ११ ते ४० या दरम्यान ५ षटकांचा एकच पॉवरप्ले असेल व तो फलंदाजी करणार्‍या संघाला आपल्या सोयीने घेता येईल. ३६ व्या षटकाच्या आधी पॉवरप्ले घेतलाच नाही तर षटक क्रमांक ३६-४० ही पॉवरप्लेची षटके असतील व त्यात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ३ क्षेत्ररक्षक ठेवता येतील. पॉवरप्ले नसलेल्या उर्वरीत ३५ षटकात ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक ठेवता येतील.

३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर जास्तीत जास्त ४ क्षेत्ररक्षक असल्याने फलंदाज वर्तुळाच्या बाहेर उंच फटके मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अर्धवेळ गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाज कमी वापरले जातील. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या तशाही फिरकी गोलंदाजांना फारशी साथ देत नाहीत. त्यामुळे फिरकी गोलंदाज एकंदरीतच कमी वापरले जातील.

(२) २०११ ची स्पर्धा - एकच पांढरा चेंडू ५० षटके वापरला जात असे. जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी व फिरकी गोलंदाजांना चेंडू जुना झाल्यावर फायदा मिळे. जर खराब व्हायला लागला किंवा खूप ओला झाला तर ३४ षटकानंतर तितकाच झिजलेला वेगळा चेंडू वापरला जात असे.

२०१५ ची स्पर्धा - - विकेटच्या दोन्ही बाजूने २ नवीन पांढरे चेंडू वापरले जातील. ५० व्या षटकापर्यंत कोणताही चेंडू जास्तीत जास्त २४-२५ षटके वापरला गेला असेल. जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळेल. फिरकी गोलंदाजांना व जलदगती गोलंदाजांना रिव्हर्स स्विंगसाठी फारसा फायदा नाही.
________________________________________________________________________________

स्पर्धेतील संघ

(१) भारत

महेंद्रसिंग धोनी*, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहीत शर्मा, मोहम्मद शमी

भारताने २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. सर्वात धक्क्कादायक बातमी म्हण्जे त्या विजयी संघातील १५ खेळाडूंपैकी फक्त ४ च खेळाडू या संघात आहेत (धोनी, कोहली, रैना, अश्विन). इतर कोणत्याही देशाच्या संघात मागील स्पर्धेतील संघातील इतके कमी खेळाडू आताच्या संघात नसावेत. या चौघांपैकी रैना ९ पैकी फक्त ४ सामने खेळला होता तर अश्विन फक्त २ सामने खेळला होता. कोहली व धोनी सर्व ९ सामने खेळले होते.

भारताची फलंदाजी बर्‍यापैकी दिसत असली तरी गोलंदाज अत्यंत निष्प्रभ आहेत.

या संघात स्टुअर्ट बिन्नीची निवड सर्वात धक्कादायक आहे. त्याचे वडील रॉजर बिन्नी निवडसमितीत आहेत हा योगायोग नसावा. स्टुअर्ट बिन्नीऐवजी सध्या रणजी स्पर्धेत असलेला युवराज सिंग संघात हवा होता. परदेशात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनऐवजी सध्याच्या रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करत असलेला सेहवागला घेता आले असते किंवा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत यशस्वी ठरलेल्या मुरली विजयला घेता आले असते. तसेच रायडूऐवजी रॉबिन उथप्पा हवा होता. रविंद्र जडेजा सध्या जायबंदी आहे. जायबंदी असल्याने त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी व तिरंगी स्पर्धेतील ४ पैकी ३ एकदिवसीय सामने खेळता आले नाहीत. जो एकमेव सामना तो खेळला त्यातही तो अपयशी ठरला. यावर्षीच्या रणजी स्पर्धेतील एकही सामना तो खेळलेला नाही. थोडक्यात गेले अनेक महिने तो एकही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अनेक महिने सरावाशिवाय असलेल्या या जायबंदी खेळाडूला कशाला घेतले? स्पर्धा सुरू होईपर्यंत तो तंदुरूस्त झाला नाही तर पंचाईत आहे. अश्विन, रोहीत शर्मा हे परदेशात फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांच्याऐवजी इतर खेळाडूंचा विचार करायला हवा होता.

भारत यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे.

(२) ऑस्ट्रेलिया

मायकेल क्लार्क*, जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॅडीन, जॉश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन

ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंत समतोल आहे. या संघात स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, मायकेल क्लार्क, जेम्स फॉकनर अशा अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ हे फलंदाजीत तुफान फॉर्मात आहेत, तर गोलंदाजीत मिचेल जॉन्सन आणि मिचेल स्टार्क फॉर्मात आहेत. तरीसुद्धा या संघात रायन हॅरिस व नेथन लायन ची उणीव जाणविते.

ऑस्ट्रेलिया यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे.

(३) इंग्लंड

ऑईन मॉर्गन*, मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, ईयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, स्टिव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स

मॉर्गन, जो रूट, ईयान बेल आणि जॉस बटलर हे चांगले फलंदाज इंग्लंडच्या संघात आहेत. जेम्स अँडरसन, फिन आणि ब्रॉड हे चांगले गोलंदाज देखील आहेत. मोईन अली व रवी बोपारा हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत.

इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल का याविषयी मी साशंक आहे.

(४) न्यूझीलँड

ब्रँडन मॅकलम्*, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट ईलियट, मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, मिचेल मॅकलेंघॅन, नेथन मॅकलम्, कायल मिल्स, अ‍ॅडम म्लाईन, ल्यूक राँकी, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनियल व्हिटोरी, केन विल्यमसन

किवीज सध्या तुफान फॉर्मात आहेत. ब्रँडन मॅकलम् ने २०१४ मध्ये २ त्रिशतके, १ द्विशतक, एकदा १९५ अशी तुफान वेगवान शतके केली आहेत. केन विल्यमसन देखील जबरदस्त फॉर्मात आहे. कोरी अँडरसन, टॉम लॅथम, ल्यूक राँकी हे देखील भरात आहेत. तुफान फटकेबाज रॉस टेलर हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. परंतु तो अजून फारसा भरात नाही, परंतु घरच्या मैदानावर तो कधीही फॉर्मात येऊ शकतो. किवींची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत जरा दुर्बळ वाटते. बोल्ट बर्‍यापैकी फॉर्मात आहे. परंतु इतर गोलंदाज तितके चांगले वाटत नाहीत. तरीसुद्धा जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलँड यावेळी चमत्कार करून दाखवतील असं वाटतंय.

न्यूझीलँड यावेळी उपांत्य फेरीत नक्की प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यावेळी प्रथमच न्यूझीलँड अंतिम फेरीत दिसेल असाही माझा अंदाज आहे.

(५) पाकिस्तान

मिसबाह उल हक*, अहमद शेहझाद, एहसान आदिल, हॅरिस सोहेल, नासिर जमशेद, मोहम्मद इरफान, सर्फराजअहमद, शाहीद आफ्रिदी, सोहेब मकसूद, सोहेल खान, उमर अकमल, वहाब रियाझ, यासीर शाह, युनिस खान

या संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. कर्णधार मिसबाह हा ४० वर्षांचा असून युनिस खान (३७ वर्षे), मोहम्मद हफीझ (३४ वर्षे), मोहम्मद इरफान (३२ वर्षे), शाहीद आफ्रिदी (३४ वर्षे), सोहेल खान (३० वर्षे) असे अनेक ३०+ वयाचे खेळाडू या संघात आहेत. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा संघ आहे. हा संघ एखाद्या दिवशी तुफान कामगिरी करून लगेच दुसर्‍याच दिवशी अत्यंत खराब कामगिरी करून दाखवू शकतो. अत्यंत गुणी खेळाडू असूनही सातत्याचा अभाव व खेळाडूंना बेटिंग आणि मॅचफिक्सिंगचे लागलेले ग्रहण यामुळे या संघाबद्दल कोणताच अंदाज करता येत नाही. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच या संघाकडे देखील जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत. शाहीद आफ्रिदीसारखा जबरदस्त फटकेबाज असलेला अष्टपैलू या संघात आहे. परंतु अत्यंत बेभरवशाची फलंदाजी असल्याने पाकिस्तान कधीही अपेक्षित कामगिरी करीत नाही.

१९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मधील ५ वी विश्वचषक स्पर्धा पाकिस्तानने नशीबाची जबरदस्त साथ मिळाल्याने जिंकली. त्या स्पर्धेत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यांपैकी पाकिस्तान ४ सामन्यात पराभूत होता. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची अवस्था सर्वबाद ८७ अशी दयनीय होती. पाकिस्तानच्या सुदैवाने मध्यंतरापासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडला फलंदाजी करताच आली नाही व सामना अनिर्णित घोषित होऊन दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला होता. पाकिस्तानने नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकले. परंतु उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरूद्ध नशीबाने मिळालेल्या १ गुणाचा फायदा झाला होता.

आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान ५ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सर्व ५ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरूद्ध १५ फेब्रुवारीला आहे व यावेळी सचिन नाही. या सामन्याची तिकिटे ऑनलाईन विक्री सुरू झाल्यावर काही मिनिटातच संपलेली आहेत. बघूया यावेळी काय होतंय ते.

अत्यंत बेभरवशाचा संघ असल्याने यावेळी पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करेल की नाही हे नक्की सांगता येणे अवघड आहे.

(६) दक्षिण आफ्रिका

एबी डी व्हिलिअर्स*, हशीम आमला, कायल अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डिअन, क्विंटन डी कॉक, जीन पॉल ड्युमिनी, फाफ डू प्लेसि, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, वेन पार्नेल, एरॉन फांगिसो, व्हरनॉन फिलँडर, रिली रॉसॉ, डेल स्टेन

अत्यंत समतोल आणि जबरदस्त संघ. याही संघात बर्‍याच वयस्कर मंडळींचा भरणा आहे. तब्बल ९ खेळाडू ३०+ वयाचे आहेत. अत्यंत जबरदस्त गोलंदाज व जबरदस्त फलंदाज हे या संघाचे वैशिष्ट्य. एबी डी व्हिलिअर्स, आमला, फाफ डू प्लेसि, रॉसॉ, डेव्हिड मिलर इ. फलंदाज तुफान फॉर्मात आहेत, तर मॉर्नी मॉर्केल, डेल स्टेन, फिलँडर हे फलंदाजांना धडकी भरविणारे वेगवान गोलंदाजही भरात आहेत. या संघाचे क्षेत्ररक्षण देखील अत्यंत उच्च दर्जाचे आहे. अत्यंत गुणी खेळाडू असूनही महत्त्वाच्या सामन्यात आयत्यावेळी कच खाऊन अनेकवेळा या संघाने सामने गमाविलेले आहेत. अनेकवेळा नशीबाने देखील या संघाला तडाखा दिलेला आहे. विश्वचषक स्पर्धेत १९९२ पासून ६ वेळा सहभागी होऊन त्यात ३ वेळा उपांत्य फेरी गाठूनही या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलेले आहे.

आतापर्यंत झालेल्या १० विश्वचषक स्पर्धेत भारत-द. आफ्रिका ३ वेळा एकमेकांशी लढले आहेत व सर्व सामने भारताने गमावले आहेत. या सर्व ३ सामन्यात सचिन तेंडुलकरचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना द. आफ्रिकेविरूद्ध आहे आणि यावेळी सचिन नाही. बघूया यावेळी काय होतंय ते.

या स्पर्धेत हा संघ नक्कीच उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बहुतेक प्रथमच अंतिम फेरीत सुद्धा असेल आणि कदाचित यावेळी प्रथमच विश्वचषकावर आपले नाव कोरेल असा अंदाज आहे.

(७) श्रीलंका

अँजेलो मॅथ्यूज*, लाहिरू थिरीमाने, दिनेश चंडीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगाना हेराथ, माहेला जयवर्धने, दिमुथ करूणारत्ने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, जीवन मेंडीस, थिसारा परेरा, धम्मिका प्रसाद, कुमार संगक्कारा, सचित्र सेनानायके

श्रीलंका संघाची कामगिरी लक्षात घेताना १९९२ पूर्वी व १९९२ नंतर (म्हणजे १९९६ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९९२ पर्यंत श्रीलंका हा एक अत्यंत दुर्बल व अतिसामान्य संघ म्हणून ओळखला जात होता. परंतु अचानक नशीबाची साथ मिळून १९९६ ची विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेने जिंकली आणि त्या संघाने एकदम कात टाकली. तेव्हापासून हा संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. १९९६ पासून झालेल्या ५ विश्वचषक स्पर्धांमध्ये ४ वेळा हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यापैकी ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचला व एकदा अंतिम फेरी जिंकली.

आताच्या संघात एकाहून एक जबरदस्त फलंदाज आहेत. कुमार संगक्कारा व दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत. यांच्या जोडीला अत्यंत शैलीदार व सभ्य फलंदाज जयवर्धने सुद्धा आहे. जयवर्धने हा माझा अत्यंत आवडता फलंदाज आहे. संघात अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा व कुलसेकरा सारखे अष्टपैलू आहेत. मलिंगासारख्या अत्यंत भेदक यॉर्कर टाकून हमखास बळी घेणारा गोलंदाज आहे. हेराथ सारखा खडूस फिरकी गोलंदाजही आहे. परंतु या संघाची गोलंदाजी खूपच दुर्बल वाटते.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल असा माझा अंदाज आहे.

(८) वेस्ट इंडीज

जेसन होल्डर*, मर्लॉन सॅम्युअल्स, सुलीमान बेन, डॅरेन ब्राव्हो, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, दिनेश रामदीन, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरोमी टेलर

वेस्ट इंडीज संघाची कामगिरी लक्षात घेताना १९८३ पूर्वी व १९८३ नंतर (म्हणजे १९८७ पासून) असे दोन वेगळे कालखंड लक्षात घेतले पाहिजेत. १९८३ पर्यंत विंडीज हा एक एकदिवसीय तसेच कसोटी सामन्यातील सर्वाधिक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जात होता. १९७५ व १९७९ अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा या संघाने जिंकल्या. १९८३ च्या स्पर्धेत देखील हा संघ अंतिम फेरीत आला होता. परंतु अचानक दुर्बल समजल्या जाणार्‍या भारताने तो सामना जिंकला आणि तेव्हापासूनच विंडीजची सर्व प्रकारच्या सामन्यात घसरण सुरू झाली. १९८७ पासून २०११ पर्यंत फक्त एकदाच १९९६ मध्ये हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. इतर सर्व स्पर्धात हा संघ उपांत्य फेरीपूर्वीच गारद झालेला आहे.

आताच्या संघात खरं तर जबरदस्त खेळाडू आहेत. परंतु एक संघ म्हणून त्यांची एकत्रित कामगिरी होताना दिसत नाही. ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, डॅरेन सॅमी हे अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. आंद्रे रसेल, सॅम्युअल्स यासारखे तुफानी अष्टपैलू खेळाडू आहेत. डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी अत्यंत कमकुवत आहेत. नियामक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे ड्वेन ब्राव्हो व किरॉन पोलार्ड या अत्यंत जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान न देण्याचा धक्कादायक निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यात भर म्हणून जादूभरा फिरकी गोलंदाज सुनील नारायण त्याच्या शैलीविषयी शंका व्यक्त केली गेल्यामुळे स्वतःहूनच बाहेर पडला. या ३ खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला खूपच महागात जाणार आहे.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची फारशी शक्यता वाटत नाही.

लिंबूटिंबू संघ

(९) बांगलादेश

मुश्रफ मोर्तझा*, अल-अमीन होसेन, अनामूल हक, अराफत सनी, महंमदुल्ला, मोमिनूल हक, मुशफिकर रहीम, नासिर होसेन, रुबेल होसेन, सब्बीर रहमान, शकीब अल हसन, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, तमीम इक्बाल, टस्किन अहमद

बांगलादेश कडे काही चांगले खेळाडू आहेत. कर्णधार मुश्रफ मोर्तझा, शकीब अल हसन, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम, महंमदुल्ला या खेळाडूंवरच या संघाची मदार आहे. तसा हा लिंबूटिंबू संघ आहे, परंतु काहीवेळा या संघाने बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पहिल्याच सामन्यात बांगलादेशाकडून झालेला पराभव व त्यामुळे प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेला भारतीय संघ ही कटू आठवण भारतीय कधीच विसरणार नाहीत. तरीसुद्धा हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

(१०) आयर्लँड

विल्यम पोर्टरफील्ड*, अँडी बॅलबर्नी, पीटर चेस, अ‍ॅलन कुसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जॉईस, अँडी मॅकब्राईन, जॉन मूनी, केव्हिन ओ'ब्रायन, नील ओ'ब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन, क्रेग यंग, टीम मर्टाघ

आय्रलँडने २००७ व २०११ या दोन्ही स्पर्धात काही बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तान व बांगलादेशाला पराभूत करून झिंबाब्वेबरोबर सामना बरोबरीत सोडवून त्यांनी धक्के दिले होते. २०११ मध्ये इंग्लंडच्या ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना केव्हिन ओ'ब्रायन ने केवळ ५० चेंडूत शतक झळकाविले होते. यांच्याकडे ब्रायन बंधू, पोर्टरफील्ड, कुसॅक, जॉन मूनी इ. चांगले खेळाडू आहेत. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. फारतर एखाद्या बलाढ्य संघाला अपसेट करू शकेल इतकेच.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

(११) झिंबाब्वे

एल्टन चिगुंबुरा*, रेजिस चकाब्वा, टेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग एरविन, टफाड्झ्वा कामुंगोझी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मॅट्सिकेन्येरी, सॉलोमन माईर, तवांदा मुपारिवा, तिनाशी पन्यानगारा, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर, प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स

झिंबाब्वेने कधी कधी बलाढ्य संघांना धक्के दिले आहेत. परंतु हा संघ लिंबूटिंबू संघच आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

(१२) अफगाणिस्तान

मोहम्मद नबी*, अफसर झझाई, अफताब आलम, अश्गर स्टानिकझाई, दौलत झद्रान, गुलबदीन नैब, हमिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अश्रफ, नजीबुल्ला झद्रान, नासिर जमाल, नवरोझ मंगल, समीउल्ला शेनवारी, शापूर झद्रान, उस्मान घनी, हशमतुल्ला शैदी, इझातुल्ला दौलतझाई, शफीकुल्ला, शराफुद्दीन अश्रफ

अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाने बांगलादेश संघाला हरवून धक्का दिला होता.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

(१३) स्कॉटलँड

प्रेस्टन मॉमसेन*, कायल कोएटझर, रिची बेरिंगटन, फ्रेडी कोलमॅन, मॅथ्यू क्रॉस, जॉश डेव्ही, अ‍ॅलासडेर इव्हान्स, हॅमिश गार्डिनर, मजिद हक, मायकेल लीस्क, मॅट मॅकन, कॅलम मॅकलीऑड, सफयान शरीफ, रॉब टेलर, ईयान वॉर्डलॉ

हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

(१४) युनायटेड अरब अमिराती

मोहम्मद तकीर*, खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅंड्री बेरेंगर, फहाद अल्हाश्मी, मंजुळा गुरूगे, कामरान शहजाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नवीद, नासिर अझीझ, स्वप्निल पाटील, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमन अन्वर

हा संघ लिंबूटिंबू संघ आहे. हा संघ फार काही करू शकेल असे वाटत नाही. या संघात ठाण्याचा मराठमोळा स्वप्निल पाटील हा यष्टीरक्षक आहे.

या स्पर्धेत हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अजिबात शक्यता वाटत नाही.

________________________________________________________________________________

लिंबूटिंबू संघांकडून फारसे अपसेट्स होतील असे वाटत नाही. विश्वचषक स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात आजतगायत अंदाजे ३२५ हून अधिक सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त १४ सामन्यात (म्हणजे फक्त ४ टक्के सामन्यात) अनपेक्षित निकाल लागलेला आहे. खालील यादीवरून हे लक्षात येईल.

(१) १९७९ - भारत वि. श्रीलंका (श्रीलंका विजयी)
(२) १९८३ - ऑस्ट्रेलिया वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी)
(३) १९९६ - वेस्ट इंडीज वि. केनया (केनया विजयी)
(४) १९९९ - भारत वि. झिंबाब्वे (झिंबाब्वे विजयी)
(५) १९९९ - बांगलादेश वि. पाकिस्तान (बांगलादेश विजयी. हा सामना फिक्स केलेला होता असा दाट संशय आहे.)
(६) २००३ - केनया वि. झिंबाब्वे (केनया विजयी)
(७) २००३ - केनया वि. श्रीलंका (केनया विजयी)
(८) २००७ - भारत वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी)
(९) २००७ - पाकिस्तान वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी)
(१०) २००७ - द. आफ्रिका वि. बांगलादेश (बांगलादेश विजयी)
(११) २००७ - झिंबाब्वे वि. आयर्लँड (सामना बरोबरीत)
(१२) २००७ - बांगलादेश वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी)
(१३) २०११ - इंग्लंड वि. आयर्लँड (आयर्लँड विजयी)
(१४) २०११ - बांगलादेश वि. इंग्लंड (बांगलादेश विजयी)

२००७ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले होते. आतापर्यंत बांगलादेश, केनया, आयर्लँड व झिंबाब्वे यांनीच सर्वाधिक अपसेट्स केलेले दिसताहेत. एकंदरीत २०१५ मध्ये लिंबूटिंबू संघ एखाददुसरा अपसेट करू शकतील. परंतु त्या निकालाने फार फरक पडेल असे वाटत नाही.
________________________________________________________________________________

माझे अंदाज

१९८७ पासून भारताची कामगिरी एकाआड एक स्पर्धेत चांगली होत आहे. भारताने १९८७ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, १९९२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारताने नंतर १९९६ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला, पण १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. २००३ मध्ये भारत चक्क अंतिम फेरीत पोहोचला, पण २००७ मध्ये भारतावर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की आली. त्यापाठोपाठ २०११ मध्ये भारत चक्क विजेता बनला. हाच क्रम सुरू राहिला तर भारताला २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा नाही.

याच्या बरोबर उलटा क्रम दक्षिण आफ्रिकेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने १९९२, १९९९ व २००७ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली, तर १९९६, २००३ व २०११ मध्ये ते उपांत्य फेरीपूर्वीच गारद झाले. या इतिहासावरून असं वाटतंय की २०१५ मध्ये हा संघ नक्की उपांत्य फेरीत पोहोचणार.

यातला योगायोगाचा भाग सोडला तरी भारताची गेल्या काही काळातील कामगिरी पाहिली तर या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसतेय. २०११ च्या तुलनेत भारताचा संघ खूपच दुर्बल वाटतो. २०११ च्या संघातील तब्बल ११ खेळाडू या संघात नाहीत. त्यांच्या जागी जे आले आहेत ते तितके चांगले नाहीत. शिखर धवन, जडेजा, रायडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, अश्विन इ. खेळाडूंच्या कामगिरीबद्दलच शंका आहे. त्यांच्याऐवजी मुरली विजय, रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज सिंग इ. खेळाडू हवे होते. मुरली विजय इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर चांगला खेळल होता. रॉबिन उथप्पा, सेहवाग, युवराज हे स्थानिक स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. अक्षर पटेल, धवन, अश्विन हे तिघेही ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरले आहेत. रायडूलाही फारसा प्रभाव पाङता आलेला नाही. जडेजा जवळपास साडेतीन महिने दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब होता. तो नंतर एकच सामना खेळला व त्यातही अपयशी ठरला. स्टुअर्ट बिन्नी २ सामने खेळला. त्यातल्या एक सामन्यात त्याने बर्‍यापैकी फलंदाजी केली व दुसर्‍या सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केली. परंतु त्याच्याऐवजी युवराज सिंग कधीही जास्त योग्य ठरला असता. भारतीय गोलंदाजांबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. स्वतः धोनी निवृत्तीच्या मूडमध्ये असल्याने त्याच्या देह्बोलीतून उत्साहाचा पूर्ण अभाव जाणवितो.

हे सर्व लक्षात घेता भारत या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असे मला वाटते.

माझ्या अंदाजानुसार द. आफ्रिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीत असतील.

अंतिम लढत न्यूझीलॅंड व द. आफ्रिकेत होऊन द. आफ्रिका विजेता होईल.

न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल.
________________________________________________________________________________

विनंती - वरील लेखातील तपशिलात काही चुका असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2015 - 2:19 pm | श्रीगुरुजी

भारतावरचा राग आफ्रिकन्सनी विंडीजवर काढला. विंडीज १२ षटकांत ५ बाद ५३. खूप मोठ्या फरकाने विंडीज हरणार असं वाटायला लागलंय. आधीच्या दोन सामन्यात जे कमावलं ते विंडीज एकाच सामन्यात गमावणार आणि निव्वळ धावगती खूप कमी होणार. पाकड्यांच्या आशा प्रज्वलित होणार.

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2015 - 2:22 pm | श्रीगुरुजी

उद्याचे सामने -

(२०) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - ऑकलँड
(२१) शनिवार २८ फेब्रुवारी, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. यूएई, स्थळ - पर्थ

भारत यूएई विरूद्ध अगदी सहज जिंकेल. किवीज वि. ऑसीज सामना रंगतदार होईल. दोन्ही संघ तगडे आहेत. परंतु सामना न्यूझीलँडमध्ये होत आहे. किवीजचे पारडे जड वाटते. न्यूझीलँड थोड्या फरकाने जिंकेल असा अंदाज आहे.

साधा मुलगा's picture

27 Feb 2015 - 10:03 pm | साधा मुलगा

या विश्वचषकात आयर्लंड ने उपान्त्यपूर्व/ उपांत्य फेरीत धडक मारावी अशी माझी अपेक्षा आहे.

अपेक्षे प्रमाणॅ अफ्रिका जबरदस्त पणे जिंकली. येथे लॉग इन नव्हतो.

अंदाज

न्युजिलंड वि ऑस्ट्रेलिया = न्युजिलंड

विल्यमसन आणि बोल्ट चांगले खेळतील
भारत वि. यु.ए.ई = भारत

रोहित शर्मा या मॅच मध्ये मॅन ऑफ थे मॅच असेन असे वाटते

विल्यमसन आणि बोल्ट चांगले खेळतील

कील ठोक के!!!

_/\_

गणेशा's picture

1 Mar 2015 - 12:24 am | गणेशा

धन्यवाद, असेच आपले ,
रोहित शर्मा पण मॅन ऑफ द मॅच :)

चौकटराजा's picture

28 Feb 2015 - 2:27 pm | चौकटराजा

अबी डिलिव्हर्स ने जी खेळी विंडीज विरूद केली त्यातील काही फटके केवळ उपरवालाच मारू शकतो. आज अफ्रिदी, जयसूर्या,
विव रिचर्डस , ख्रिस केर्स्न सहवाग सर्वाना त्याने पुसून टाकले.

असंका's picture

28 Feb 2015 - 2:28 pm | असंका

नजर हटी दुर्घटना घटी....

आता बोरिंग आहे म्हणून बघणं बंद केलं आणि तेव्ढ्यात सगळी अ‍ॅक्श्न आटोपली सुद्धा. तेही दोन वेळा.

:-(

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2015 - 2:35 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे न्यूझीलँड वि. ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलॅंड विजयी झाले. ऑस्ट्रेलियाच्या १५१ धावांना न्यूझीलॅंडच्या फलंदाजांनी गांभिर्याने न घेता आपण सहज जिंकू या भ्रमात राहून बेजबाबदार खेळ करून सामना जवळपास घालविला होता. शेवटी नशिबानेच जिंकले.

दुसरीकडे यूएई विरूद्धचा सामना अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होऊन भारत अगदी सहज जिंकण्याच्या मार्गावर आहे.

उद्याचे सामने -

(२२) रविवार ०१ मार्च, वेळ - पहाटे ३:३० (भाप्रवे), इंग्लंड वि. श्रीलंका, स्थळ - वेलिंग्टन
(२३) रविवार ०१ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), पाकिस्तान वि. झिंबाब्वे, स्थळ - ब्रिस्बेन

इंग्लंड व पाकिस्तान जिंकतील असा अंदाज आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2015 - 8:57 pm | श्रीगुरुजी

तब्बल ३१० धावा करूनसुद्धा इंग्लंडला सामना जिंकता आला नाही. थिरीमानेचा शून्यावर स्लिपमध्ये सोडलेला झेल भयंकर महाग पडला. आता इंग्लंडची परिस्थिती अवघड आहे. तीनही तगड्या संघाविरूद्ध ते हरले. उरलेल्या ३ लिंबूटिंबू संघापैकी स्कॉटलँड विरूद्ध ते जिंकलेले आहेत. ४ सामन्यात त्यांचे फक्त २ गुण आहेत. त्यांचे उरलेले सामने बांगला व अफगाणिस्तान विरूद्ध आहेत. बांगलाचे ३ सामन्यात ३ गुण आहेत. बांगलाचे उर्वरीत सामने न्यूझीलँड, इंग्लंड व स्कॉटलँड विरूद्ध आहेत. इंग्लंड अफगाणिस्तानला व बांगला स्कॉटलॅंडला नक्की हरवेल. बांगला न्यूझीलँडविरूद्ध नक्की हरेल. त्यामुळे ५ सामन्यात बांगलाचे ५ गुण असतील तर इंग्लंडचे ४ गुण असतील. इंग्लंड व बांगलाचा शेवटचा एकमेकांविरूद्धचा सामना 'अ' गटातील ४ था संघ ठरवेल. तो सामना बांगलाने जिंकला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे अनिर्णित राहिला तरी बांगलाचे ६ किंवा ७ गुण होतील व इंग्लंडचे ४ किंवा ५ गुण होऊन बांगला बाद फेरीत जाईल. तो सामना इंग्लंडने जिंकला तर इंग्लंडचे ६ व बांगलाचे ५ गुण होऊन इंग्लंड बाद फेरीत जाईल. जर बांगला-न्यू झीलँड, बांगला-स्कॉटलँड आणि इंग्लंड-अफगाणिस्तान या ३ सामन्यापैकी एकतरी सामन्याचा अनपेक्षित निकाल लागला तर चित्र एकदम वेगळे होईल.

त्यामुळे सध्या तरी 'अ' गटातून न्यूझीलँड प्रथम क्रमांकाने, ऑस्ट्रेलिया/श्रीलंका दुसर्‍या/तिसर्‍या किंवा तिसर्‍या/दुसर्‍या क्रमांकाने आणि इंग्लंड वि. बांगलादेश सामन्यातील विजेता ४ थ्या क्रमांकाने बाद फेरीत येईल.

दुसरीकडे 'ब' गटातही अनिश्चितता आहे. भारत व द. आफ्रिका पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर असतील हे निश्चित. वेस्ट इंडीजचे ४ सामन्यात ४ गुण असून त्यांचे उर्वरीत सामने भारत व यूएई बरोबर आहेत. ते भारताविरूद्ध नक्की हरतील व यूएई विरूद्ध नक्की जिंकतील व शेवटी त्यांचे ६ गुण असतील. त्यांची निव्वळ धावगती अजूनही पाकड्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे विंडीज बहुतेक तिसर्‍या क्रमांकाने बाद फेरीत नक्कीच येतील.

पाकड्यांचे ३ सामन्यात २ गुण असून त्यांचे उर्वरीत सामने द. आफ्रिका, आयर्लँड व यूएई विरूद्ध आहेत. आफ्रिकेविरूद्ध ते नक्की हरतील व यूएईविरूद्ध नक्की जिंकतील. त्यामुळे त्यांचे ५ सामन्यात ४ गुण असतील. आयर्लँडचे २ सामन्यात ४ गुण असून उर्वरीत ४ सामन्यांपैकी ते भारत व आफ्रिकेविरूद्ध ते नक्की हरतील. झिंबाब्वेविरूद्ध ते बहुतेक जिंकतील. त्यामुळे त्यांचे ५ सामन्यात ६ गुण होतील.

पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातून बाद फेरीत जाणारा ४ था संघ असेल. अर्थात काही उर्वरीत सामन्यांचा अनपेक्षित निकाल लागला तर 'ब' गटातील उर्वरीत दोन संघ वेगळे असतील. झिंबाब्वे व यूएई बाद फेरीत येण्याची जवळपास काहीच शक्यता नाही. त्यामुळे विंडीज, आयर्लँड व पाकडे यापैकी २ संघ बाद फेरीत येतील.

भारत 'ब' गटात पहिला संघ असेल. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ 'अ' गटातल्या ४ थ्या संघाशी पडेल (इंग्लंड किंवा बांगलादेश). बांगलादेश 'अ' गटातून बाद फेरीत आल्यास भारताची उपांत्य फेरी नक्की. अर्थात इंग्लंड लागोपाठच्या पराभवाने इतके खचलेले आहेत की त्यांच्याविरूद्ध सुद्धा भारत नक्कीच जिंकेल.

विश्लेष बरोबर, तरी एक अंदाज चुकीचा वाटत आहे.

पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातील विजेता हा 'ब' गटातून बाद फेरीत जाणारा ४ था संघ असेल. अर्थात काही उर्वरीत सामन्यांचा अनपेक्षित निकाल लागला तर 'ब' गटातील उर्वरीत दोन संघ वेगळे असतील. झिंबाब्वे व यूएई बाद फेरीत येण्याची जवळपास काहीच शक्यता नाही. त्यामुळे विंडीज, आयर्लँड व पाकडे यापैकी २ संघ बाद फेरीत येतील.

जरी पाकिस्तान ने आयर्लंड ला हरवले ह्या सामन्यात तरी त्यांचे जास्तीत जास्त ६ गुण होतील(द. अफ्रिकेविरुद्ध हरतील हे गृहित धरुन) पण आयर्लंड जर आधीच झिंबाब्वे बरोबर जिंकलेला असेन तर निव्वळ धावगतीवरती सुद्धा हा संघ बाद फेरीत जाईल.

अश्या परस्थीती मध्ये पाक - आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांचे ६ गुण असतील.
त्यामुळे रिझल्ट पाक - आयर्लंड या मॅच वर तेंव्हा डिपेंड असेन जेंव्हा आयर्लंड जिम्ब्वावे कडुन हरलेले असतील.

उलट आता असे वाटत आहे. आयर्लंड हा जिंब्वावे किंवा पाकड्यांना हारवुन ८ गुणांसह तिसर्या नंबरला जातात का काय ?
आयर्लंड हा बाद फेरीत जावा असे वाटत आहे.

----------------------------

बाकी सुरवातीला सांगितल्या प्रमाणे न्युजिलंड आणि आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होइल असे वाटत होते, परंतु यावेळेस ही अफ्रिकेला वर्ल्ड कप जिंकायचे असेन तर खडतर प्रवास असेन असे वाटते.
या तीन्हीतला नक्की फायनला कुठले दोन संघ जातील हे सांगणॅ कठीण होउन बसल्याने फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया निदान पोहचेल असे वाटते आहे. कारण (न्युजिलंड आणि अफ्रिका कदाचीत सेमी फायनल ला समोरा समोर येतील)

नया है वह's picture

28 Feb 2015 - 7:20 pm | नया है वह
नया है वह's picture

28 Feb 2015 - 7:26 pm | नया है वह

जाहिरात जबरदस्त
UAE vs India या सामन्यापेक्षा
पुढे जाहिरातीमधे काय याची जास्त उत्सुकत

तिमा's picture

28 Feb 2015 - 8:04 pm | तिमा

आत्तापर्यंतच्या सर्व सामन्यांत आजची ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझिलंड मॅच जबरदस्त झाली. आपल्या टीमची कुठलीही लढत न्यूझिलंड बरोबर त्यांच्या होमपीचवर व्हायला नको.

अखेरच्या क्षणापर्यंत कुठेही झुकू शकली असती अशी अप्रतिम मॅच!

व्यत्यासः फायनलला न्यूझीलंड खेळले तर..आणि ती MCG वरची मॅच ऑस्ट्रेलियाच नव्हे तर इतर कुठल्याही टीमविरुद्ध असली तरी, ऑस्ट्रेलियन प्रेक्षक न्यूझीलंडच्या खेळाडूंना हतोत्साही करणार हेही नक्की!

गणेशा's picture

1 Mar 2015 - 12:30 am | गणेशा

आजच्या मॅच सोप्प्या आहेत असे वाटत असेन तरी काहीच रोख ठोक प्रेडिक्ट करता येणार नाही असे वाटते, तरीही

२२. इंग्लंड वि. श्रीलंका, = इंग्लंड
इंग्लंड बॉलिंग जबरदस्त झाल्याने जिंकतील असे वाटते,
Anderson विकेट घेईन जास्त असे वाटते. श्रीलंकेला पुन्हा एकदा महेला जयवर्धनेचाच आधार सापडेन असे वाटते.

२३. पाकिस्तान वि. झिंबाब्वे = पाकिस्तान

मनातुन तर वाटत आहे झिंबाब्वे बॅटींह चांगली करेल पाकिस्तान पेक्षा.
उमर अकमल मुळॅ पाकडे वाचतील असे वाटते.
चतारा च्या बॉलिंग मुळे झिंबाब्वे ला थोड्या आशा वाढतील.

उमर अकमल मॅन ऑफ द मॅच असु शकतो

मॅच चांगली चालु आहे, ज्यो रुट वरती १०० पॉइंट लावले होते मिळाले.
मस्त. आता विकेट पडल्या पाहिजेत इंग्लंड ला, अपेक्षित बॉलिंग इफेक्ट जानवला नाही

गणेशा's picture

1 Mar 2015 - 11:13 am | गणेशा

हारला इंग्लंड.
इंग्लंड मला वाटते बाहेर जाईन स्पर्धेतुन.. विनाकारण अपेक्षा ठेवल्या गेल्या या संघाकडुन असे वाटते आहे

साधा मुलगा's picture

1 Mar 2015 - 11:37 am | साधा मुलगा

इंग्लंडला अजूनही संधी आहे. पुढले सामने बांगलादेश आणि स्कॉटलंडशी आहेत. जर दोन्ही जिंकले तर ते पुढे जाण्याची शक्यता आहे.
कारण ते नाही तर मग बांगलादेश. त्यांचे तीन सामने बाकी आहेत. इंग्लंड , स्कॉटलंड आणि न्यूझीलंड. त्यापैकी ते स्कॉटलंडशी जिंकतील.
न्यूझीलंड आणि इंग्लंडशी कठीण आहे. बांगलादेशचे नशीब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पावसामुळे एक गुण मिळाला. जिथे त्यांना भोपळा मिळाला असता.
run rate वर आता सगळे अवलंबून आहे. इंग्लंड वि. बांगलादेश हा सामना निर्णायक ठरेल असे वाटते. दोघांनाही पेपर कठीण आहे.

गणेशा's picture

1 Mar 2015 - 1:53 pm | गणेशा

बरोबर आहे तुमचे म्हणने.

गटा ब तील ३ आणि ४ संघ कुठला असु शकतो असे वाटते ?

भारत आणि साउथ आफ्रिका हे सोडले तर बाकीच्याचे सांगणे कठीण आहे. सर्वांना समान संधी वाटते.
१) वेस्ट इंडीज
दोन सामने बाकी , भारत आणि युएइ, सध्याचा आपला form पाहता आपल्याशी हरतील आणि युएईशी जिंकतील असे वाटते.
तरीही त्यांच्या खात्यात ६ गुण जमा होतात. ८ नाही , त्यामुळे पुन्हा run rate शी संबंध येतो. तरीही यांना चांगली संधी आहे असे वाटते. तिसर्या क्रमांकावर यायला हरकत नाही.
२) झिम्बाब्वे
पेपर कठीण आहे. राहिलेले सामने भारत आणि आयर्लंडशी आहेत. यातील एक जरी जिंकले तर त्यांना ४ गुण मिळतात. चुकून दोन्ही जिंकले तरी run rate चे गणित आहेच. यांच्यावर फुली मारायला हरकत नाही.
३) पाकिस्तान
राहिलेले सामने युएई , साउथ आफ्रिका आणि आयर्लंडशी आहेत. युएईशी जिंकून ४ गुण जमा होतात. त्याच्यापुढील दोन्हीपैकी एकात तरी त्यांना जिंकावेच लागेल. एवढे करून ६ गुण जमा होतात. पुढे run rate नावाचा राक्षस उभा आहेच. आणि run rate च म्हणालात तर त्यांचा अतिशय वाईट म्हणजे -१.३७३ आहे. त्यामुळे सध्या जो काही खेळ करत आहेत ते पाहून मला यांचा काही भरवसा वाटत नाही.
४) आयर्लंड
या संघाकडून मला खूप अपेक्षा आहेत. यांनी पहिले दोन्ही सामने जिंकून ४ गुण खिशात टाकले आहेत. त्यांचा run rate +०.३३८ आहे. पण पुढील सर्व सामने मोठ्या अथवा तुल्यबळ संघांशी आहेत. सा.आफ्रिका,झिम्बाब्वे,भारत आणि पाकिस्तान अश्यांचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यापैकी झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध त्यांना संधी आहे. त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवला तर त्यांचा उपान्त्यपूर्व फेरीतील विजय सुकर होतो. सध्याचा त्यांचा form पाहता त्यांना चांगले संधी आहे आणि ते या संधीचे सोने करतील असे वाटते.
शेवटी आयर्लंड वि. झिम्बाब्वे आणि आयर्लंड वि. पाकिस्तान या दोन सामन्यांच्या निकालावर सर्व अवलंबून आहे.

गणेशा's picture

1 Mar 2015 - 11:40 pm | गणेशा

बरोबर वाटते आहे,

म्हणजे वेस्ट इंडिज आण आर्यलंड ला जास्त चान्स आहे. आणि तसेच व्हावे असे वाटते
पण झिंब्वावे ने भारत आणि आर्यलंड ला जास्त फरकाने हरवले तर त्यांचा ही चान्स वाढत आहे.

पाकड्यांचे मात्र अवघड वाटत आहे.

दोन्ही गृप निट अनालिसीस करुन पाहिले तुम्ही म्हणता तसे

ए गृप मधुन अनुक्रमे
१. न्युजिलंड
२. ऑस्ट्रेलिया
३. श्री लंका
४ इंग्लंड

आणि ब गृप मधुन अनुक्रमे

१. इंडिया
२. द. अफ्रिका
३. वेस्ट इंडिज
४. आर्यलंड

असे ८ संघ पुढे जातील असे वाटते. त्यामुळे या गृहितकाला धरुन च पूढील मॅच कडे बघितल्यास मजा येइन.

धन्यवाद.

असे जर झाले, तर मात्र सेमी फायनल दणक्यात होणार.
त्या अश्या असु शकतील

न्युझिलंड विरुद्ध द. आफ्रिका
ऑस्ट्रलिया विरुद्द भारत ( किंवा इग्लंड २० % चांन्स)

साधा मुलगा's picture

2 Mar 2015 - 10:49 am | साधा मुलगा

आयर्लंडने जर झिम्बाब्वे आणि पाकिस्तान अशा दोघांनाहि हरवले तर त्यांचे ८ गुण होऊन ते तिसर्या क्रमांकावर जातील. आणि मग सेमीज मध्ये त्यांची गाठ पडेल ती ऑस्ट्रेलियाशी तरी पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच सेमी फायनल होतील.
शक्यता दुसरी
जर ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका सामन्यात जर श्रीलंका जिंकली आणि जर श्रीलंकेचा run rate जास्त असेल तर
ए गृप मधुन अनुक्रमे
१. न्युजिलंड
२.श्रीलंका
३.ऑस्ट्रेलिया
४ इंग्लंड
असे चित्र होईल.

गणेशा's picture

2 Mar 2015 - 1:25 pm | गणेशा

हो.

तुम्ही म्हणता तसे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया च्या ऑर्डर मध्ये काहीसांगता येत नाही, आणि वेस्ट इंडिज चापण रन रेट कमी आहे. त्यामुळॅ अवघड आहे. आणि ते ही बे भरवाशाचे आहेत.

त्यात कोण फायनल मध्ये जाईन हे कळत नाहीये आताच.

मी न्युजिलंड आणि अफ्रिका असे गृहित धरले होते पण ते सेमी फायनलाच एकत्र येणाअर.
आणिचुकुन ऑस्ट्रेलिया ३ र्‍या कंमाकावर गेली तर ऑस्ट्रेलिया वि अफ्रिका कॉर्टर फायनलाच समोरा समोर ठाकणार.
(नशीब इंडियाचे, दोन्ही यजमानाबरोबर त्यांना कॉर्टर फायनल मध्ये नाही लढायचे)

विजेता कोण असेल असे सांगताना. फायनल कोणाच्यात होइल हाच प्रश्न पडला आहे.

न्युजिलंड वि ऑस्ट्रेलिया फायनल
किंवा
अफ्रिका वि ऑस्ट्रेलिया
हे कळत नाहिये. आणि जर ऑस्ट्रेलिया ३ र्‍या नं ला आली तर
न्यिजिलंड वि. अफ्रिका फायनल पण होउ शकते.

म्हणजे या तीन मधील कोणती टीम शक्यतो फायनल मध्ये नसेल ?

(आज हे सगळॅ प्रेडिक्शन क्रमा़आनुसार द्यायचे आहे येतेह कंपणीत ) काहीच कळत नाही. कुठली एक टीम मी निवडु जी फायनल मध्ये जाईन.

असंका's picture

2 Mar 2015 - 11:56 am | असंका

इंडिया आणि आर्यलंड!!!

;-)

तिमा's picture

1 Mar 2015 - 5:41 pm | तिमा

झिंबाब्वे फक्त २० रन्सनी हरले. पाकिस्तानला जर झिंबाब्वे विरुद्ध एवढे झगडावे लागताय तर साउथ अफ्रिकेविरुद्ध कसे होणार? वैयक्तिक राग नाही पण बहुतांशी पाकिस्तानी खेळाडुंची देहबोली अतिशय वाईट आहे. त्यामुळेच, ते हरावे असं वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झिंबाब्वे जिंकता जिंकता हरले येडपट साले. २७ चेंडुत ३७ धावा हव्या होत्या. तो येडपट ढोला काय नाव त्याचं त्याने शाहिद आफ्रिदीची ओव्हर मेडन घातली आणि म्याच गेला. पाकडे फुकट जिंकले. :(

-दिलीप बिरुटे
(दु:खी)

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2015 - 9:00 pm | श्रीगुरुजी

>>> तो येडपट ढोला काय नाव त्याचं त्याने शाहिद आफ्रिदीची ओव्हर मेडन घातली आणि म्याच गेला.

त्याचे नाव "पान्यंगारा". मूर्खासारखे ४७ वे षटक निर्धाव खेळून सामना जिंकण्याची उरलीसुरली आशा सुद्धा धुळीला मिळविली.

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2015 - 9:03 pm | श्रीगुरुजी

पुढील सामने - (निकाल अपेक्षितच लागतील)

(२४) मंगळवार ०३ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. आयर्लँड, स्थळ - कॅनबेरा
द. आफ्रिका

(२५) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. यूएई, स्थळ - नेपिअर
पाकडे

(२६) बुधवार ०४ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान, स्थळ - पर्थ
ऑस्ट्रेलिया
(२७) गूरूवार ०५ मार्च, वेळ - सकाळी ३:३० (भाप्रवे), बांगलादेश वि. स्कॉटलँड, स्थळ - नेल्सन
बांगलादेश

पाकिस्तानच्या सुमार कामगिरी पाहुन पाकिस्तान बहुतेक युएइ विरुद्ध हारेल असे वाटत आहे.

आपण आपल्या गटात एक नंबरला आणि इंग्लंड त्यांच्या गटात चौथ्या नंबरावर तर येत नाहित ना.... दोन्दा धुत्लाय इग्लंडने आपल्याला इतक्यात....

श्रीगुरुजी's picture

1 Mar 2015 - 9:07 pm | श्रीगुरुजी

ते बरोबर आहे. त्यामुळेच थोडीशी धाकधूक आहे. परंतु विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यावर दोन्ही संघात एकदम बदल झालाय. द. आफ्रिका आणि पाकड्यांना हरवून भारत एकदम प्रखर आत्मविश्वासाने तळपायला लागलाय तर दुसरीकडे इंग्लंड तीनही तगड्या संघाविरूद्ध हरल्याने एकदम खच्ची झाल्यासारखे वाटताहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध आता आपले पारडे जड झाले आहे.

इंग्लंड ला आपण सहज हरवु असे वाटत आहे.
आधीचे रीझल्ट जरी वेगळॅए असले तरी आपली बॉलिंग पण आता त्यांचय पेक्षा चांगली वाटत आहे.
बॅटींग तर आहेच

गणेशा's picture

2 Mar 2015 - 7:19 pm | गणेशा

द. आफ्रिका वि. आयर्लँड = द. आफ्रिका

डेल स्टेन, इम्रान ताहिर आणि हासिम आमला मॅच विनर ठरतील असे वाटते.
प्रथम बॉलिंग असल्यास डेल स्टेन मॅन ऑफ द मॅच ही असु शकतो.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2015 - 1:00 pm | श्रीगुरुजी

द. आफ्रिकेने तब्बल ४११ धावा केल्या. लागोपाठ दुसर्‍या सामन्यात आफ्रिकेने ४००+ धावा केल्या. आयर्लँड जिंकणे अशक्य आहे. निदान ३००+ धावा करून पराभवाचे अंतर कमी करून निव्वळ धावगती फार कमी होउ नये हीच अपेक्षा. वेस्ट इंडीजप्रमाणे आयर्लँड स्वस्तात बाद झाले तर निव्वळ धावगती खूप कमी होऊन ते पाकड्यांना फायदेशीर ठरेल.

थॉर माणूस's picture

3 Mar 2015 - 2:38 pm | थॉर माणूस

सध्या पाकड्यांना सगळंच अवघड आहे. त्यांना पण दक्षिण आफ्रीकेविरुद्ध खेळायचंय. त्यामुळे तो सामना गेलाच त्यांचा. यूएई विरुद्ध जिंकतील... मग त्यांचे ४ गुण होतात. यानंतरही पाकीस्तानला पुढच्या फेरीत जाण्यासाठी आयर्लंड झिंबाब्वे विरुद्ध हरण्याची प्रार्थना करावी लागेल आणि मग त्यांना हरवावंही लागेल.

तिसर्‍या-चौथ्या क्रमांकासाठी सध्याची झूंज...

संघसामनेविजयपराजयअनिर्णितरद्दगुणNRR
West Indies422004-0.313
Ireland321004-1.137
Pakistan312002-1.373

गणेशा's picture

3 Mar 2015 - 8:03 pm | गणेशा

२५. पाकिस्तान वि. यु.ए.ई = पाकिस्तान

हॅरीस सोहेल मॅच विनर असु शकतो. बॉलिंग मध्ये इरफान चांगली बॉलिंग करेन

२६. ऑस्ट्रेलिया वि. अफगणिस्तान = ऑस्ट्रेलिया

जॉन्सन, वॅटसन चांगले परफार्मर असतील.

फिन्च आणि वॉर्नर दोघातील एक जन चांगलीच खेळी करेन

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 1:02 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांनी यूएई विरूद्ध चक्क ३३९ धावा केल्या. शाहजादचा १० वर असताना पॉईंटवर सोडलेला झेल फारच महागात गेला. सुदैवाने यूएईचे फलंदाज बर्‍यापैकी झुंज देत आहेत (३४.४ षटकांत १३१/४). यूएई हरणार हे नक्की, परंतु २०० च्या पुढे जाऊन पाकड्यांना खूप मोठ्या फरकाने विजय मिळू देणार नाहीत असं दिसतंय. विंडीजने व आयर्लँड आफ्रिकेविरूद्ध तब्बल २५७ आणि २०१ धावांनी हरून स्वतःची निव्वळ धावगती खूपच कमी करून घेतली व त्यामुळे पाकड्यांच्या आशा प्रज्वलित झाल्या. आज पाकडे जिंकतील पण २००+ धावांच्या फरकाने ते जिंकणार नाहीत. त्यामुळे पाकड्यांची निव्वळ धावगती प्रचंड प्रमाणात वाढणार नाही. त्यातून यूएईने २५०+ धावा केल्या तर सोन्याहून पिवळं.

कपिलमुनी's picture

4 Mar 2015 - 1:44 pm | कपिलमुनी

यूएई चा प्रशिक्षक अकिब जावेद आहे . याचा परीणाम म्हणून पर्थ सारख्या वेगवान खेळपट्टीवर यूएईने प्रथम फलंदाजी करून पायावर धोंडा मारला आणि आता मात्र पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी देवून त्यांचा रन रेट उंचावण्यास मदत केली आहे.

हे.मा.वै.म.

मोडला भारताचा रेकॉर्ड....आउस्ट्रेलिया ४१७...वि. अफगाणिस्तान

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2015 - 10:24 pm | श्रीगुरुजी

'ब' गटात भारत व द. आफ्रिका प्रथम दोन क्रमांकावर आहेत. प्राथमिक फेरीनंतर बहुतेक हाच क्रम राहील. भारत विंडीज/आयर्लँड कडून हरले किंवा द. आफ्रिका पाकड्यांकडून हरले तरच बदल होऊ शकेल. ४ सामन्यानंतर विंडीजची निव्वळ धावगती -०.३१३ व पाकड्यांची निव्वळ धावगती -०.३८५ आहे. आयर्लँडची निव्वळ धावगती -१.१३७ असली तरी त्यांचे अजून ३ सामने शिल्लक आहेत (पाकडे, भारत व झिंबाब्वेविरूद्ध). पाकड्यांचे उर्वरीत सामने द. आफ्रिका व आयर्लँड विरूद्ध आहेत. विंडीजला अजून भारत व झिंबाब्वेविरूद्ध खेळायचे आहे. विंडीज बहुतेक बाद फेरीत येईल. 'ब' गटातला बाद फेरीत जाणारा ४ था संघ हा पाकडे वि. आयर्लँड या सामन्यातला विजेता असेल.

'अ' गटात न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका नक्कीच बाद फेरीत येतील. बांगलादेश वि. इंग्लंड या सामन्यातला विजेता 'अ' गटातील ४ था संघ असेल.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 5:38 pm | श्रीगुरुजी

बांगलाच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून स्कॉटलँडच्या ३१८ धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकला. हातात तब्बल ३१८ धावा असूनसुद्धा स्कॉटलँडच्या गोलंदाजांनी अत्यंत खराब गोलंदाजी करून सामना घालविला. आजचा सामना बांगलादेश हरला असता तर त्यांचा पुढील मार्ग बंद होऊन इंग्लंडची वाट सुकर झाली असती. परंतु आजच्या विजयामुळे बांगलादेशाला बाद फेरीत जाण्याची अजूनही आशा आहे.

अर्थात हा निकाल भारतासाठी चांगलाच आहे. बांगलादेश 'अ' गटातून ४ थ्या क्रमांकाने बाद फेरीत आल्यास त्यांची 'ब' गटात प्रथम असणार्‍या भारताशी गाठ पडून भारत उपांत्य फेरीत नक्कीच जाईल.

मात्र उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळता येणार नाही. दोन्ही संघ अत्यंत भरात असल्याने भारत त्यांच्याविरूद्ध जिंकणे अत्यंत अवघड आहे. तरीसुद्धा भारत न्यूझीलँडविरूद्ध ऑस्ट्रेलियामध्ये किंवा ऑस्ट्रेलियाविरूद्ध न्यूझीलँडमध्ये खेळल्यास भारत जिंकण्याची शक्यता वाढते.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2015 - 5:45 pm | श्रीगुरुजी

आतापर्यंत झालेल्या २७ सामन्यांपैकी १ पावसामुळे रद्द झाला. उर्वरीत २६ सामन्यांसाठी केलेल्या भाकितामध्ये २२ सामन्यांच्या निर्णयाचे भाकीत बरोबर आले आणि ४ सामन्यांचे भाकीत चुकले.

पुढील सामने -

(२८) शुक्रवार ०६ मार्च, वेळ - सकाळी १२:०० (भाप्रवे), भारत वि. वेस्ट इंडीज, स्थळ - पर्थ

भारत नक्की जिंकणार. गेल अपयशी ठरेल. सॅम्युअल्स, डॅरेन ब्राव्हो, सिमन्स हेच फलंदाज चांगले खेळतील. विंडीजचे बहुतेक सर्व गोलंदाज अपयशी ठरतील. रोहीत शर्मा "सामनावीर" असेल. किमान शतक ... कदाचित द्विशतकही करेल.

(२९) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), पाकिस्तान वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड

द. आफ्रिका निर्विवादपणे मोठ्या फरकाने जिंकेल.

(३०) शनिवार ०७ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. झिंबाब्वे, स्थळ - होबार्ट

अत्यंत चुरशीचा सामना होईल. आयर्लँड थोड्या फरकाने जिंकेल.

आपल्या महान आणि युगप्रवर्तक इ. इ. सिद्धांताची अग्नीपरीक्षा चालू आहे....

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 8:47 pm | श्रीगुरुजी

संघर्षपूर्ण सामन्यात भारत जिंकला. हा एकच अंदाज खरा ठरला. गेल अपयशी ठरणार हा अंदाज वगळता इतर सर्व अंदाज चुकले. भारत जोपर्यंत जिंकत आहे तोपर्यंत अंदाज चुकले तरी दु:ख नाही.

पर्थच्या खेळपट्टीने आज आपले रंग दाखविले. विंडीजने २२५+ धावा केल्या असत्या तर ते नक्कीच जिंकले असते. आज एकवेळ भारत हरेल अशी कुशंका मनात यायला लागली होती. परंतु धोनी व अश्विनने शांतपणे फलंदाजी करून सामना जिंकला. विंडीजच्या गोलंदाजांनी अनेक वाईड व नो-बॉल टाकून भारताच्या विजयाला हातभार लावला.

भारताचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले झाले नाही. गेल चे ३ झेल सुटले, परंतु ते झेल खूपच अवघड होते. जडेजा व रोहीत शर्माने मात्र दोन सोपे झेल सोडले.

या विश्वचषकातील ज्या ज्या सामन्यात रोहीत शर्मा अयशस्वी होतो त्या त्या सामन्यात भारत विजयी होतो हा एक सिद्धांत आज पुन्हा एकदा सिद्ध झाला. रोहीत शर्मा ४ पैकी ३ सामन्यात अयशस्वी आहे. धवन पहिल्या दोन सामन्यानंतर उर्वरीत दोन सामन्यात चांगला खेळलेला नाही. आज बर्‍याच दिवसांनी धोनीने चांगली फलंदाजी केली.

विंडीजची निव्वळ धावगती ५ सामन्यानंतर -०.५११ आहे व गुण ४ आहेत. पाकड्यांची निव्वळ धावगती ४ सामन्यानंतर -०.३८५ आहे व गुण ४ आहेत, तर आयर्लँडची निव्वळ धावगती ३ सामन्यानंतर -१.१३७ असून गुण ४ आहेत.

विंडीजचा शेवटचा सामना यूएई बरोबर असून विंडीजला तो खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. पाकड्यांचे उर्वरीत २ सामने द. आफ्रिका व आयर्लँड विरूद्ध असून ते आफ्रिकेबरोबर नक्कीच हरतील. त्यामुळे त्यांना आयर्लँडविरूद्ध जिंकावेच लागेल. आयर्लँडचे उर्वरीत सामने भारत, झिंबाब्वे आणि पाकड्यांबरोबर असून त्यांना झिंबाब्वे व पाकड्यांविरूद्ध जिंकावेच लागेल. सध्या तरी आयर्लँडची उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची शक्यता पाकडे आणि विंडीजच्या तुलनेत कमी आहे.

रोहित शर्मा वाला सिद्धांत अजून एक दोन्दा खरा ठरला तर हा सिद्धांत पूर्णपणे बेकार ठरेल कारण अपयशी रोहित शर्मा किती दिवस संघात राहिल....

श्रीगुरुजी's picture

6 Mar 2015 - 9:18 pm | श्रीगुरुजी

२०१२ मध्ये त्याला १३ सामन्यात खेळविण्यात आले होते. १३ सामन्यात एकूण धावा १६८ होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १२ सामन्यात मिळून ८५ धावा होत्या. श्रीलंकेविरूद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत पहिल्या ४ सामन्यात एकूण १४ धावा करूनसुद्धा त्याला ५ व्या सामन्यात खेळविण्यात आले होते व त्यात त्याने ४ धावा केल्या होत्या. लागोपाठ ५ सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुद्धा त्याला त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात घेतलेले होते. अनेकवेळा एक आकडी धावसंख्येवर बाद होऊन सुद्धा त्याला तेव्हा इतके सामने खेळावयास मिळत असतील तर, सध्याच्या काळातही अजून अनेक सामन्यात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात टिकून राहील.

अपेक्षेप्रमाणे बांग्लादेश जिकले.

अंदाज

भारत वि. वेस्ट इंडीज = भारत ( वेस्ट इंडिज पण चांगला खेळ करेन आणि गेम पालटवु शकतो )

अजिंक्य रहाने सर्वात चांगला खेळेल इंडिया कडुन असे वाटते.
गेल चा ऑल राउंड परफॉर्मन्स आणि टेलर च्या गोलंदाजीने वेस्ट इंडिज ला पण चान्स आहे.

कपिलमुनी's picture

6 Mar 2015 - 4:41 pm | कपिलमुनी

India 2 out

गणेशा's picture

6 Mar 2015 - 9:29 pm | गणेशा

शनिवार ते सोमवार च्या मॅचेस :

१. अफ्रिका वि. पाक : अफ्रिका (प्लेअर ओफ मॅच : अमला, मॉर्केल,एबी)
२. झिंब्वावे वि आयर्लंड : आयर्लंड (स्टर्लिंग, मसक्दजा, जॉइसे, चतारा)
३. न्युझीलंड वि अफगान : न्युझीलंड ( विल्यमसन, साउदी, मॅक्युलम)
४. ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका : ऑस्ट्रेलिया ( पुन्हा वार्नर, स्टार्क, स्मिथ)
५ इंग्लंड वि बांग्ला : इंग्लंड ( मोईन अली, फिन , बेल्/रुट)

मी कॉर्टर फायनल मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड ला पाठवले आहे त्यामुळे तेच जिंकावेत अशी अपेक्षा)

साधा मुलगा's picture

6 Mar 2015 - 9:39 pm | साधा मुलगा

मलाही तीच अपेक्षा आहे, उद्या दोन महत्वाचे सामने आहेत जे पूल b चे चित्र थोड स्पष्ट करतील.

पाकिस्तानने हरवलं आफ्रिकेला...!!
घ्या गणितं करायला पुन्हा सगळी....

तुषार काळभोर's picture

7 Mar 2015 - 2:38 pm | तुषार काळभोर

हिशोब तुम्ही करायचा! :)

तुषार काळभोर's picture

7 Mar 2015 - 2:37 pm | तुषार काळभोर

आफ्रिकेने माती खाल्ली.
एबीने थोडा आणखी संयम दाखवला असता तर हिरो झाला असता.

साधा मुलगा's picture

7 Mar 2015 - 5:31 pm | साधा मुलगा

खरे आहे तुम्ही म्हणता ते. आता पुन्हा नव्याने गणिते करा. आता वेस्ट इंडीजची वाट बिकट झाली आहे!

तिमा's picture

7 Mar 2015 - 5:43 pm | तिमा

सा. अफ्रिकेला एवढी घाई कसली होती ? रन रेट चांगला होता, तर धोनीसारखं शांतपणे खेळून जिंकता आली असती मॅच. ते हरल्यापेक्षा पाकडे जिंकले याचं जास्त दु:ख झालं!

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2015 - 10:37 pm | श्रीगुरुजी

श्या! आफ्रिकेने दगा दिला. पूर्ण अंदाज चुकला. आता पाकड्यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश बराचसा नक्की झालाय आणि विंडीज व आयर्लंड दोघेही संकटात सापडलेत. पाकडे सुरवातीचे दोन सामने हरल्यावर एकदम बदलले आणि लागोपाठ ३ सामने जिंकलेत. त्यांनी चक्क द. आफ्रिकेला हरवलं.

पाकडे आणि विंडीजचे ५ सामने झालेत आणि आयर्लंडचे ४ झालेत.

उर्वरीत सामने - पाकडे वि. आयर्लँड, भारत वि. आयर्लँड आणि विंडीज वि. यूएई.
निव्वळ धावगती - पाकडे: -०.१९४, विंडीज: -०.५११, आयर्लंड: -०.८२०,
गुण - पाकडे: ६, विंडीजः ४, आयर्लंडः ६

पाकडे पुढील फेरीत येऊ नयेत ही माझी इच्छा आहे. परंतु पाकडे बहुतेक येतील असं दिसतंय. विंडीज यूएई विरूद्धचा सामना नक्की जिंकेल. परंतु त्यांना तो मोठ्या फरकाने जिंकावयास हवा. तरच त्यांचे ६ गुण होऊन निव्वळ धावगती वाढेल.

सामना: भारत वि. आयर्लंड - भारत हरला किंवा जिंकला तरी भारताला फार फरक पडणार नाही. आयर्लँड जिंकल्यास त्यांचे ८ गुण होतील आणि ते उपांत्यपूर्व फेरीत जातील व विंडीजची परिस्थिती अजूनच अवघड होईल.

सामना: विंडीज वि. यूएई- यूएई जिंकल्यास विंडीजची वाट बंद होईल. विंडीजला कोणत्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल. सामना जिंकल्यास विंडीजचे ६ गुण होतील.

सामना: पाकडे वि. आयर्लँड - आयर्लंड जिंकल्यास विंडीजची परिस्थिती अत्यंत अवघड होईल. पाकडे जिंकल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत जातील.

म्हणजे आयर्लंड भारताविरूद्ध जिंकले व पाकड्यांविरूद्ध हरले तर विंडीजच्या शेवटच्या सामन्याला महत्त्व राहणार नाही. समजा आयर्लँड ने दोन्ही सामने जिंकले तर आयर्लंड कदाचित दुसर्‍या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत जाईल व विंडीजच्या आणि पाकड्यांच्या आशा यूएई विरूद्धच्या सामन्यावर अवलंबून राहतील. विंडीज यूएई विरूद्ध हरला तर सगळाच गोंधळ संपतो आणि पाकडे व आयर्लंड पुढील फेरीत जातील.

पाकडे: पुढील फेरीसाठी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकणे किंवा हरल्यास विंडीज यूएई विरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती कमी रहावी यासाठी प्रार्थना करावी लागेल. हा सामना अनिर्णित राहिल्यास किंवा बरोबरीत सुटला तर विंडीज बाहेर जाऊन हे दोघेही आत येतील.

विंडीजः पुढील फेरीसाठी आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे ही प्रार्थना करावी लागेल आणि यूएईविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावाच लागेल.

आयर्लंड: भारत किंवा पाकड्यांविरूद्ध जिंकावे लागेल (यातला एकही सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल). जर दोन्ही सामने हरले तर विंडीज यूएईविरूद्ध हरावे किंवा त्यांची निव्वळ धावगती आपल्यापेक्षा कमी रहावी अशी प्रार्थना करावी लागेल.

एकंदरीत पाकड्यांची स्थिती पुष्कळ बरी आहे. विंडीज व आयर्लँड मध्येच आता चुरस आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2015 - 10:40 pm | श्रीगुरुजी

पुढील सामने -

३१) रविवार ०८ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. अफगाणिस्तान, स्थळ - नेपिअर

न्यूझीलँड सहज जिंकेल.

(३२) रविवार ०८ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका, स्थळ - सिडने

ऑस्ट्रेलिया जिंकेल.

(३३) सोमवार ०९ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), इंग्लंड वि. बांगलादेश, स्थळ - अ‍ॅडलेड

अत्यंत महत्त्वाचा सामना. या सामन्यातला विजेता 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ असेल. बांगलाला हा सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी चालेल. इंग्लंडला मात्र हा सामना जिंकायलाच हवा.

(३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन

भारत जिंकेल.

साधा मुलगा's picture

8 Mar 2015 - 2:49 pm | साधा मुलगा

श्रीलंका चांगली खेळत आहे.
२१ ओवर १३५/१ चांगल्या स्थितीत आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2015 - 11:20 pm | श्रीगुरुजी

श्रीलंकेने जबरदस्त झुंज दिली. श्रीलंकेला शेवटच्या १० षटकात १०५ धावा हव्या होत्या व फक्त ४ गडी बाद झाले होते. चंडीमल व मॅथ्यूज तुफान मारत होते. फक्त २४ चेंडूत नाबाद ५२ धावा करणार्‍या चंडीमलचा अचानक स्नायू दुखावला व त्यामुळे त्याला निवृत्त व्हावे लागले. तो आज जाताच लगेचच मॅथ्यूज व थिसारा परेरा बाद झाल्याने श्रीलंकेची झुंज संपली.

आज श्रीलंका जिंकले असते तर 'अ' गटातून श्रीलंका २ र्‍या क्रमांकाने व ऑस्ट्रेलिया ३ र्‍या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत आले असते. अशा परिस्थितीत उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ 'ब' गटातील दुसर्‍या क्रमांकाच्या आफ्रिकेशी पडून दोघातला एक धारातिर्थी पडला असता. परंतु आता तसे होईल असे दिसत नाही. उपांत्य फेरीत बहुतेक न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व भारत हे देश असतील. भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूप अवघड आहे. जर ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला आपापल्या मायभूमीवर उपांत्य फेरीचा सामना खेळायला मिळाला नाही तरच विरूद्ध संघाला थोडी जास्त संधी आहे.

'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका नक्की येणार. ४ था संघ इंग्लंड असेल की बांगलादेश याचे उत्तर उद्या मिळेल. बांगलाचे ४ सामन्यात ५ गुण आहेत तर इंग्लंडचे ४ सामन्यात २ गुण आहेत. बांगला आपला शेवटचा न्यूझीलँड बरोबरचा सामना नक्की हरणार व इंग्लंड आपला शेवटचा अफगाणिस्थान बरोबरचा सामना नक्की जिंकतील. त्यामुळे उद्याचा सामना इंग्लंडला जिंकावाच लागेल. बांगलादेशाला उद्याचा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तरी चालेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने उद्याचा सामना 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत जाणारा ४ था संघ ठरवेल.

अविनाश पांढरकर's picture

9 Mar 2015 - 8:09 am | अविनाश पांढरकर

मिसळपाववरील कोणी Espncricinfo Fantansy League खेळत तर एक 'मिसळपाव' ग्रुप तयार करून एकत्र खेळु शकतो.

साधा मुलगा's picture

9 Mar 2015 - 11:32 am | साधा मुलगा

मी आहे cricinfo वर. वेगळा धागा काढायचा का? password आणि id साठी?
पाच दहा लोक तरी पाहिजेत. दोघात मजा नाही येणार.

अविनाश पांढरकर's picture

9 Mar 2015 - 12:22 pm | अविनाश पांढरकर

मी create केली आहे, ज्यांना कुणाला आवड असेल त्यांनी जॉईन करा.

league name : misalpav
password : misalpav

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

बांगलाने २७५ धावा करून बर्‍यापैकी आव्हान दिले आहे. इंग्लंडची फलंदाजी व बांगलाची गोलंदाजी बघता हे आव्हान इंग्लंडला फारसे अवघड नाही. १४ षटकात १ बाद ६७ धावा करून इंग्लंडने चांगली सुरूवात केली आहे. खराब फटके मारून बळी गमावले नाहीत तर इंग्लंड नक्की जिंकेल असं दिसतंय.

थॉर माणूस's picture

9 Mar 2015 - 5:14 pm | थॉर माणूस

आता फक्त एक करा... भारताच्या बाजूने एकही कौल देऊ नका. :D

ते तर लेखाच्या सुरुवातीलाच होऊन गेलेलं आहे....त्यांच्या मते भारत काही सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार नाही..!

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2015 - 6:57 pm | श्रीगुरुजी

तसा सुरवातीला अंदाज होता कारण भारत 'ब' गटात २ र्‍या क्रमांकावर असेल असा अंदाज होता आणि त्यामुळे 'अ' गटातील ३ र्‍या संघाशी (श्रीलंका किंवा इंग्लंड) भारताची गाठ पडेल असे वाटत होते. भारतीय संघाची तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहिली तर भारत या दोघांविरूद्ध नक्की हरेल असे दिसत होते.

पण प्रत्यक्षात भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही द. आफ्रिकेला अनपेक्षितपणे हरविले व त्यामुळे 'ब' गटातून भारत १ ल्या क्रमांकावर राहील व त्यामुळे अर्थातच 'अ' गटातील ४ थ्या संघाशी भारत उपांत्यपूर्व फेरी खेळेल. भारताच्या सुदैवाने इंग्लंड किंवा श्रीलंकेऐवजी बांगलादेश गटातून थ्या क्रमांकावर (बहुतेक) असेल. इंग्लंडची अत्यंत खालावलेली कामगिरी आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशाला पावसाच्या कृपेमुळे अत्यंत अनपेक्षितपणे ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिळालेला मोलाचा १ गुण. या १ गुणामुळे बांगला सतत इंग्लंडच्या पुढे राहिले व अंतिमतः त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बांगलाशी उपांत्यपूर्व फेरीचा सामना असल्याने भारत तो सामना नक्कीच जिंकून उपांत्य फेरीत जाणार. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलँडला टाळणे खूपच अवघड दिसते. समजा तसे झाले तर निदान हे दोन्ही संघ आपापल्या मायदेशात न खेळता दुसर्‍या देशात खेळले तर भारत उपांत्य फेरी जिंकण्याची शक्यता वाढते. या दोघांव्यतिरिक्त द. आफ्रिकेशी किंवा श्रीलंकेशी गाठ पडली तरी अवघड आहे. जर उपांत्य फेरीत पाकडे किंवा विंडीज आले तर मात्र आपण आरामात जिंकू.

कपिलमुनी's picture

9 Mar 2015 - 4:04 pm | कपिलमुनी

१६३- ६ अजून ११३ धावा हव्यात.
बांग्लादेश ही मॅच जिंकून उप उपांत्य फेरीमधे आले तर आपल्यासाठी फार चांगले होइल

इंग्लंड एवढं वाईट खेळतंय तर तेच आले तर जास्त चांगलं....

:-))

असंका's picture

9 Mar 2015 - 5:12 pm | असंका

हरलं इंग्लंड...!!

श्रीगुरुजी...सर्टीफिकेट द्या...खराब फटके मारून इंग्लंड्ने पराभव ओढवून घेतला ना?

भारताची सेमीफायनलमध्ये जायची वाट थोडी सोपी झाली.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2015 - 8:12 pm | श्रीगुरुजी

शी! बांगलासारख्या फालतू संघाकडून इंग्लंड हरले. बांगला उपांत्यपूर्व फेरीत आल्याने भारताची वाट सोपी झाली असली तरी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही. मोईन अली आणि नंतर जॉर्डन मुर्खासारखे धावबाद झाले. मॉर्गनला आल्याआल्या विकेट फेकायची काहीही गरज नव्हती. आपण बाद झालेल्या चेंडूवर कसे वेड्यासारखे खेळलो हे जेम्स टेलरला अजूनही समजलं नसेल. आज स्टीव्ह फिनला का बाहेर ठेवलं ते समजलं नाही. बोपाराला एकही सामना खेळविला नाही.

विश्वचषक सुरू होण्याच्या तोंडावर कुकची हकालपट्टी करण्याची आणि केव्हिन पीटरसन् ला बाहेर ठेवण्याची किंमत इंग्लंडला मोजावी लागलेली आहे.

१९९२ पर्यंत इंग्लंड विश्वचषकातला बर्‍यापैकी दादा देश होता. पहिल्या ५ स्पर्धात, ४ वेळा इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल झाले होते. त्यापैकी ३ वेळा त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. १९९६ पासून इंग्लंड कधीही उपांत्य फेरीत पोहोचले नाही. यावेळी तर प्राथमिक फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला आहे.

'अ' गटातून आता न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत आले आहेत. 'ब' गटातून उपांत्यपूर्व फेरीत फक्त भारताचा प्रवेश नक्की झाला आहे. पाकडे, द. आफ्रिका, विंडीज आणि आयर्लँड या ४ पैकी ३ देश उपांत्यपूर्व फेरीत येतील. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 'अ' गटातील ४ थ्या क्रमांकाच्या संघाशी म्हणजेच बहुतेक बांगला देशाशी होईल. काही अनपेक्षित निकाल लागले तर कदाचित श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाशीही गाठ पडू शकते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2015 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला हरविण्यात जी मजा आली असती, तशी मजा बांगलाला हरविण्यात येणार नाही.

आपल्यालाला इंग्लंड झेपलंच नसतं आणि बांगलाने आपल्याला एका विश्वचषकात पहिल्याफेरीतच घरचा रस्ता दाखवला होता हे विसरलात वाटतं. पण, तरीही बांगलादेश आपल्याला सोपं वाटतंय.

मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :)

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2015 - 8:29 pm | श्रीगुरुजी

आपण सध्याच्या इंग्लंडच्या संघाला नक्कीच हरवलं असतं. बांगलाने २००७ मध्ये आपल्याला हरविलं होतं तो एक अपवाद होता. एकदा कधीतरी हरवलं म्हणून कायमच बांगलाला घाबरण्याची गरज नाही. बांगलाला लगेचच २०११ च्या विश्वचषकात आपण मोठ्या फरकाने हरविले होते. त्यानंतर बांगलाने अजून एकदा भारताला हरविले होते (२०१२ च्या आशिया चषक स्पर्धेत). हे दोन प्रसंग वगळता बांगलाला भारताविरूद्ध फारसे काही करता आलेले नाही.

काही महिन्यांपूर्वी भारताचा संघ बांगलाच्या दौर्‍यावर गेला होता. धोनी संघात नव्हता. ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होती. बांगलाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून २७० च्या आसपास धावा केल्यावर भारताने चांगली फलंदाजी करून नंतर पाऊस आल्याने डकवर्थ-लुईस च्या आकडेमोडीनुसार सामना जिंकला. दुसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत सर्वबाद १०४ अशी भीषण अवस्था झालेली असताना भारताने बांगलाला ५८ धावात बाद करून ४६ धावांनी सामना जिंकला (स्टुअर्ट बिन्नी ६ बळी आणि मोहीत शर्मा ४ बळी). तिसरा सामना पावसामुळे अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आला.

>>> मला उद्या आपण हरावं वाटतंय. म्हणजे पाकडे बाहेर पडतील आणि आपण नंतर झिंब्वावेला पाणी दाखवावं. :)

उद्या आपण हरलो तरी पाकडे लगेच बाहेर पडणार नाहीत. पाकडे बाहेर पडण्यासाठी त्यांना आयर्लँडने हरवावे लागेल आणि विंडिजने यूएई ला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. तरच पाकडे घरी जातील.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2015 - 8:17 pm | श्रीगुरुजी

एकूण ४९ सामन्यांपैकी ३३ म्हणजे दोन तृतीयांश सामने संपलेले आहेत. आगामी सामने -

(३४) मंगळवार १० मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), भारत वि. आयर्लँड, स्थळ - हॅमिल्टन

भारत जिंकेल. जर आयर्लँड जिंकले किंवा दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला तर आयर्लंडचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान नक्की होईल.

(३५) बुधवार ११ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), स्कॉटलँड वि. श्रीलंका, स्थळ - होबार्ट

श्रीलंका जिंकेल. चुकून लंकन्स हरले तर त्यांचा 'अ' गटातील २ र्‍या किंवा ३ र्‍या स्थानाचा दावा डळमळीत होईल.

(३६) गूरूवार १२ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), द. आफ्रिका वि. यूएई, स्थळ - वेलिंग्टन

द. आफ्रिका जिंकेल. चुकून आफ्रिकन्स हरले तर त्यांचा 'ब' गटातील २ र्‍या किंवा ३ र्‍या स्थानाचा दावा डळमळीत होईल.

धर्मराजमुटके's picture

10 Mar 2015 - 5:22 pm | धर्मराजमुटके

एक शब्द कळाला नाही. पाकडे म्हणजे काय ? वन डे सारखा हा क्रिकेटचा प्रकार आहे की मन्डे, ट्युसडे सारखा एखादा वार आहे ?

तिमा's picture

10 Mar 2015 - 9:13 pm | तिमा

पाकचे खेळाडु नेहमी वाकडे वागतात, म्हणून गुरुजी त्यांना पाकडे म्हणत असावेत.

धर्मराजमुटके's picture

10 Mar 2015 - 9:18 pm | धर्मराजमुटके

बरीच वर्षे सामना पेपर वाचला नाही. बाकी काही असो, ह्या शब्दाचे निर्माते बहुतेक सेनाप्रमुखच असावेत असा अंदाज आहे. आणि हो उगाचाच सापाचा आणि नागाचा जोक आठवून गेला. :)

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2015 - 7:11 pm | श्रीगुरुजी

भारताने आयर्लँडला अगदी सहज हरविले. हा विजय अपेक्षितच होता. आता 'ब' गटात आयर्लॅडची अडचण झाली आहे. आयर्लँड (६ गुण), पाकडे (६ गुण) व विंडीजचा (४ गुण) प्रत्येकी १ सामना शिल्लक आहे. आयर्लँड व पाकडे एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत त्यामुळे त्यातला १ संघ ६ गुणांवरच थांबेल (अनपेक्षितपणे सामना रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांचे ७ गुण होऊन विंडीज घरी जातील), तर विंडीजची दुबळ्या यूएई बरोबर गाठ आहे. विंडीज हा सामना नक्की जिंकून ६ गुण मिळवतील. या सामन्यात विंडीजला १ किंवा ० गुण मिळाले तरी विंडीज घरी जातील.

या दोनपैकी कोणताही सामना रद्द झाला नाही किंवा बरोबरीत सुटला नाही तर विंडीजचे ६ गुण असतील आणि पाकडे व आयर्लंड पैकी एकाचे ६ व दुसर्‍याचे ८ गुण असतील. ज्या २ संघांचे ६ गुण असतील त्यातल्या निव्वळ धावगती सरस असणारा संघ उपांत्यपूर्व फेरीत जाईल.

सध्या पाकडे (निव्वळ धावगती : -०.१९४), विंडीज (निव्वळ धावगती : -०.५११) आणि आयर्लँड (निव्वळ धावगती : -१.०१४) अशी आहे. पाकड्यांनी केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४८ धावांचा फरक आहे. विंडीजने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात फक्त ४० धावांचा फरक आहे. आयर्लंडने केलेल्या धावा व दिलेल्या धावा यात तब्बल १९३ धावांचा फरक आहे.

समजा आयर्लंड हरले व विंडीज जिंकले तर आयर्लंड व विंडीजचे ६ गुण होतील आणी आयर्लंडची निव्वळ धावगती अजून कमी होईल व विंडीजची निव्वळ धावगती वाढेल, त्यामुळे आयर्लंड घरी जातील.

समजा आयर्लंड जिंकले व विंडीजही जिंकले तर आयर्लंड उपांत्यपूर्व फेरीत जातील व पाकड्यांची निव्वळ धावगती आतापेक्षा कमी होईल. सध्या पाकडे व विंडीज यांच्या निव्वळ धावगतीत फारच थोडा फरक असल्याने विंडीजला ६०-७० धावांचा विजय पुरेसा होईल व पाकडे घरी जातील.

त्यामुळे विंडीज आपला सामना साधारण ६०-७० धावांच्या फरकाने जिंकले तरी ते उपांत्यपूर्व फेरीत नक्की जातील व उपांत्यपूर्व फेरीतला शेवटचा संघ पाकडे व आयर्लंडमधील विजेता असेल.

श्रीगुरुजी's picture

11 Mar 2015 - 11:08 pm | श्रीगुरुजी

संगकारा जबरदस्त फॉर्मात आहे. दिलशान आणि मॅथ्यूज सुद्धा फॉर्मात आहेत. आजच्या विजयामुळे श्रीलंकेचे 'अ' गटातील तिसरे स्थान जवळपास नक्की झाले आहे. ऑस्ट्रेलिया व बांगलादेश बहुतेक दुसरा व चौथा क्रमांक घेतील.

आपल्या सुदैवाने उपांत्यपूर्व फेरीत आपली गाठ इतर तीन देशांऐवजी बांगलाशी पडेल (बहुतेक). त्यामुळे उपांत्य फेरीत भारत जाणारच. द. आफ्रिका व श्रीलंका या दोन देशांपैकी १ देश उपांत्यपूर्व फेरीतच गारद होणार. परंतु उपांत्य फेरीत या दोन देशातील १ व त्याबरोबरीने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड असतील. त्यामुळे उपांत्य फेरी जिंकणे अवघड आहे.

कपिलमुनी's picture

13 Mar 2015 - 11:29 am | कपिलमुनी

बांगलादेश आज जिंकला तर ३ र्या नंबर वर जाईल आणि आपल्याला श्रीलंकेसोबत उपउपांत्यफेरी खेळावी लागेल.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2015 - 3:47 pm | श्रीगुरुजी

हुश्श! बांगला हरले. बांगलाने किवीजच्या तोंडाला फेस आणला होता आणि किवीज हरतील की काय या भीतिने भारतियांना फेस आला असावा. आज बांगला जिंकले असते तर 'अ' गटात ते दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर गेले असते व श्रीलंका निर्विवादपणे ४ थ्या क्रमांकावर राहिली असती. श्रीलंका संघात सध्या दिलशान, संगक्कारा आणि मॅथ्यूज अत्यंत भरात आहेत. अशा संघाशी उपांत्यपूर्व फेरी अवघड गेली असती.

आता बांगलादेशासारखा तुलनेने सोपा संघ उपांत्यपूर्व फेरीत आपल्याविरूद्ध लढेल. बांगला सध्या जोरदार लढत देताहेत. न डगमगता ठराविक अंतराने प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना बाद करून दडपण कायम ठेवण्यात ते यशस्वी होताहेत. आपल्याला त्यांच्याविरूद्धची लढत वाटते तितकी सोपी जाणार नाही. आपण नक्की जिंकणार पण सामना एकतर्फी होणार नाही.

कपिलमुनी's picture

13 Mar 2015 - 4:02 pm | कपिलमुनी

बांगलाचा मनोबल सध्या जबरदस्त वाढले आहे. भारतीय संघाला पूर्ण ताकदीने खेळावा लागणार आहे. तासी १४० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजे करणारे २ गोलंदाज, २ स्पिनर , २ इन फॉर्म बॅट्समन आणि ऑल राउम्डर यामुळे बांगलाची टीम चांगलीच भरात आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2015 - 4:08 pm | श्रीगुरुजी

बरोबर.

स्पिनर्स फक्त २ नाहीत. बरेच जण फिरकी टाकतात. शकीब, तैजुल, नासिर होसेन हे मुख्य आणि सौम्य सरकार, साबिर, महंमदुल्ला असे अनेक फिरकी गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरील झेलही अचूक टिपत आहेत. बांगलाची कामगिरी बरीच सुधारली आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2015 - 3:54 pm | श्रीगुरुजी

उद्याचे सामने -

(३९) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ६:३० (भाप्रवे), भारत वि. झिंबाब्वे, स्थळ - ऑकलँड
(४०) शनिवार १४ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), ऑस्ट्रेलिया वि. स्कॉटलँड, स्थळ - होबार्ट

भारत किंवा झिंबाब्वेच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. भारत अगदी सहज जिंकेल. त्याचप्रमाणे स्कॉटलँडच्या दृष्टीने या सामन्याला काहीच महत्त्व नाही. परंतु ऑस्ट्रेलियासाठी सामन्याचा निर्णय फरक पाडू शकतो. ऑस्ट्रेलिया सामना जिंकला तर गटात दुसर्‍या क्रमांकावर येतील, १ गुण मिळाला तर श्रीलंकेइतकेच गुण होऊन गटातील क्रमांक (२ रा किंवा ३ रा) निव्वळ धावगतीवर ठरेल. आणि सामना हरला तर बांगलादेशाइतके गुण होऊन ३ रा किंवा ४ था क्रमांक निव्वळ धावगतीवर ठरेल.

अर्थात ऑस्ट्रेलिया हा सामना अगदी सहज जिंकेल, त्यामुळे फारशी चिंता नाही.

अद्द्या's picture

14 Mar 2015 - 12:26 pm | अद्द्या

९३/४

मुश्किल दिसतंय

तुषार काळभोर's picture

14 Mar 2015 - 1:41 pm | तुषार काळभोर

धोनी अशा पाठलागांचा हिरो आहे..

पण टेलर लईच भारी खेळला.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2015 - 2:54 pm | श्रीगुरुजी

जिंकलो एकदाचे. हरलो असतो तरी स्पर्धेच्या दृष्टीने काही फरक पडला नसता. पण लिंबूटिंबू संघाकडून हरल्यामुळे उगाच नाचक्की झाली असती. ४ बाद ९२ असताना पाल चुकचुकायला लागली होती. परंतु नंतर रैना व धोनी जबरदस्त खेळले. रैना बराच नशीबवान ठरला. बर्‍याचदा झेल उडाले. एक सोपा झेल सुटला. परंतु शेवटी भारत जिंकलाच.

भारताने लागोपाठ सहाव्या सामन्यात प्रतिपक्षाचे सर्व १० गडी बाद केले. हा एक नवीन विक्रम असावा. धवन, कोहली, रहाणे, रैना, धोनी इ. पैकी १-२ जण अपयशी ठरले तरी आळीपाळीने उरलेले खेळतातच. त्यामुळेच लागोपाठ ६ सामने जिंकता आले. मात्र रोहीत शर्माचं अपयश चिंताजनक आहे. ६ सामन्यात तो ४ सामने अपयशी ठरलाय व उर्वरीत २ सामन्यात लिंबूटिंबू संघासमोर अर्धशतके केलीत. पण त्याला पर्याय आहे कोठे? रायडू, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर आणि अक्षर पटेल हे चारच खेळाडू राखीव आहेत. रोहीत शर्माच्या जागी त्यातला फार तर रायडू आत येऊ शकतो. परंतु धोनी पुढील सामन्याकरीता संघात बदल करेल असे वाटत नाही. हाच संघ उर्वरीत सामने खेळेल हे नक्की.

चला. आता पुढचा निर्णायक सामना गुरूवारी १९ मार्चला सकाळी ९ वाजता बांगला विरूद्ध मेलबोर्नमध्ये.

उद्याचे २ सामने महत्त्वाचे आहेत.

(४१) रविवार १५ मार्च, वेळ - सकाळी ०३:३० (भाप्रवे), यूएई वि. वेस्ट इंडीज, स्थळ - नेपिअर
(४२) रविवार १५ मार्च, वेळ - पहाटे ९:०० (भाप्रवे), आयर्लँड वि. पाकिस्तान, स्थळ - ओव्हल

वेस्ट इंडिज, पाकिस्तान व आयर्लँड या तीन संघांपैकी नक्की कोणते २ संघ व कोणत्या क्रमांकाने उपांत्यपूर्व फेरीत येतील ते उद्या ठरेल.

या दोन सामन्यांपैकी कोणताही एक सामना बरोबरीत सुटला, रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर वेस्ट इंडीजची वाट बंद होऊन आयर्लँड व पाकिस्तान बाद फेरीत जातील.

वेस्ट इंडीज यूएईला अगदी सहज हरवेल असा अंदाज आहे. ते जितक्या मोठ्या फरकाने विजय मिळवितील, तितकी जास्त संधी त्यांना गटात तिसरा क्रमांक मिळविण्यासाठी मिळेल.

आयर्लंड पाकड्यांविरूद्ध जिंकावे अशी इच्छा आहे. परंतु पाकडे थोड्या फरकाने जिंकतील असं वाटतंय.

सध्या तरी पाकिस्तान व वेस्ट इंडीज बाद फेरीत येतील असं वाटतंय. आयर्लंडला बाद फेरीत येण्यासाठी पाकड्यांवर साधा विजय मिळविला तरी चालेल. पाकड्यांची निव्वळ धावगती इतर दोघांपेक्षा सरस असल्याने ते सामना हरूनसुद्धा बाद फेरीत येण्याची बरीच शक्यता आहे. आयर्लंडने पाकड्यांवर मोठा विजय मिळविला व विंडीजने यूएईला मोठ्या फरकाने हरविले तर मात्र पाकडे बाहेर जातील.

तिमा's picture

14 Mar 2015 - 5:22 pm | तिमा

आजचा झिंबाब्वे वरचा विजय तसा निर्भेळ वाटला नाही. रैनाच्या सुटलेल्या झेलाने सामना फिरला. टेलरचे कौतुक करावे तेवढे थोडेच. बिचार्‍याला सोडतानाही पराभव पत्करावा लागला.

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2015 - 10:49 pm | श्रीगुरुजी

वेस्ट इंडीजसाठी वाईट बातमी -

उद्याच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय यायची शक्यता आहे.

There should be plenty of runs on offer from the surface but mitigating circumstances overhead could make it difficult. A cloudy day is forecast as tropical Cyclone Pam makes its way towards New Zealand. The major rains should only arrive on Monday but some showers are forecast for game day as well.

पावसाने किंवा इतर कोणत्याही कारणाने सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला तर विंडीजला एकूण ५ गुण मिळून विंडीज गटात ५ व्या क्रमांकावर राहिल्याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही.

निव्वळ धावगती व गुण : पाकिस्तान = -०.१९४, ६ गुण, वेस्ट इंडीज = -०.५११, ४ गुण, आयर्लंड = -१.०१४, ६ गुण
______________________________________________________________________________

पाकिस्तानची निव्वळ धावगती इतरांच्या तुलनेत चांगली असल्याने आयर्लंडबरोबर हरले तरी त्यांना बरीच संधी आहे. समजा विंडीजने यूएई विरूद्ध ३०० धावा करून ५० धावांनी विजय मिळविला आणि पाकड्यांविरूद्ध आयर्लंडने ३०० धावा केल्या तर पाकड्यांना विंडीजच्यापेक्षा जास्त निव्वळ धावगती राखण्यासाठी किमान २७४ धावा कराव्या लागतील.

समजा विंडीजने यूएईविरूद्ध २५१ धावांचे लक्ष्य ४० षटकांत पूर्ण केले आणि पाकड्यांनी आयर्लंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले तर आयर्लंडला ते लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानने आयर्लंडला किमान ४६ षटके तरी खेळवायला हवे.

समजा विंडीजने यूएईवर किमान ७५ धावांनी विजय मिळविला किंवा यूएईने ठेवलेले लक्ष्य किमान ८१ चेंडू राखून पार केले तर मात्र पाकड्यांना आयर्लंडला हरवावेच लागेल किंवा किमान १ गुण मिळवावाच लागेल.
______________________________________________________________________________

विंडीजने यूएईला हरविले तर कोणत्याही परिस्थितीत आयर्लंडला पाकिस्तानला हरवावेच लागेल. अन्यथा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार नाही.
______________________________________________________________________________

एकंदरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची सर्वात कमी शक्यता आयर्लंडची आहे व सर्वात जास्त शक्यता पाकड्यांची आहे. परंतु उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारे हे दोन्ही संघ तिसर्‍या/चौथ्या क्रमांकावर असल्याने त्यांची पुढील फेरीत ऑस्ट्रेलिया/न्यूझीलँड या तगड्या संघांशी पडेल व ते सामने यांना फारच भारी जातील.

असो. बघूया उद्या काय होतंय ते. आयर्लंडने पाकड्यांना हरवावे व विंडीजने यूएईवर मोठा विजय मिळवून पाकड्यांना घरी पाठवावे अशी मनोमन इच्छा आहे. विंडीज यूएईला नक्की हरवेल, परंतु पाकडे आयर्लंडवर निसटता विजय मिळवतील असा अंदाज आहे.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

15 Mar 2015 - 2:53 pm | लॉर्ड फॉकलन्ड

इन्डिया वर्ल्डकप जिन्कणार.

पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground

दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground

तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval

चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington

शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं.

बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल!

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2015 - 8:52 pm | श्रीगुरुजी

>>> शुक्रवारी पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी जीव तोडून खेळेल, (दिवस शुक्रवारचा आहे हे बाजूला ठेवलं तरी) पाकिस्तानची कामगिरी गेले काही सामने उंचावत चालली आहे हे लक्षात घेता हा सामना चुरशीचाच होईल असं वाटतं.

पाकडे १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत जसे खेळले तसेच या स्पर्धेत खेळत आहेत अशी शंका यायला लागली आहे. १९९२ मध्ये प्रत्येक संघाला प्राथमिक फेरीत ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यानंतर पाकड्यांच्या खात्यात फक्त १ गुण जमा होता (इंग्लंडविरूद्ध सर्वबाद ८३ धावा होऊनसुद्धा पावसामुळे पुढे खेळ न झाल्याने पाकड्यांना १ गुणाचा बोनस मिळाला होता.). नंतर उर्वरीत तीनही सामने जिंकून धावगतीच्या जोरावर पाकडे उपांत्य फेरीत पोहोचले आणि नंतर अंतिम फेरी जिंकून विश्वचषक जिंकला.

योगायोगाने ही स्पर्धाही ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये आहे. या स्पर्धेतही प्राथमिक फेरीतील पहिल्या ६ सामन्यांपैकी पहिले २ सामने पाकडे हरले होते. परंतु उर्वरीत चारही सामने जिंकून पाकडे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अर्थात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीत हरविणे ही पाकड्यांच्या दृष्टीने अत्यंत अवघड गोष्ट आहे. तो सामना बहुतेक पाकडे हरतीलच.

>>> बांगला देशाला भारताने गुरूवारी हरवलं तर उपांत्य फेरीत शुक्रवारच्या सामन्यातील विजेत्याशी २६ मार्चला Sydney Cricket Ground वर भारत खेळेल. तिथे जगलो-वाचलो तर मार्च २९ला Melbourne Cricket Ground ला फायनल!

बांगलाला भारत नक्कीच हरवेल. परंतु उपांत्य फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल. तो सामना जिंकणे भारताला खूप अवघड आहे.

उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांच्या निकालांचे अंदाज -

पहिली उपांत्यपूर्व लढतः साऊथ आफ्रिका-श्रीलंका, मार्च १८, Sydney Cricket Ground

चुरशीची लढत होईल. या स्पर्धेत द. आफ्रिका २ सामने हरलेले आहेत व दोन्ही पराभव धावांचा पाठलाग करताना आशियायी संघाकडून झाले आहेत. आता पुन्हा एकदा आशियायी संघाशी लढत आहे. आफ्रिकन्स धावांचा पाठलाग करताना दडपणाखाली गडबडतात. त्यामुळे आफ्रिकन्सना जिंकायचे असेल तर प्रथम फलंदाजी करावी लागेल. या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो जिंकेल.

दुसरी उपांत्यपूर्व लढतः भारत - बांगला देश, मार्च १९, Melbourne Cricket Ground

भारत जिंकणार

तिसरी उपांत्यपूर्व लढतः ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान, मार्च २०, Adelaide Oval

ऑस्ट्रेलिया जिंकणार

चौथी उपांत्यपूर्व लढतः न्यूझीलंड - वेस्ट इंडिज, मार्च २१, Westpac Stadium, Wellington

न्यूझीलँड सहज जिंकेल.

एक एकटा एकटाच's picture

17 Mar 2015 - 8:24 pm | एक एकटा एकटाच

सहमत

चला संपत आलं धाग्याचं आयुष्य.....अजून बारा दिवस फक्त.

त्यात भारत आधीच बाहेर पडला धाग्याकर्त्याच्या अंदाजानुसार तर आणखीन आधी संपेल.

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2015 - 8:19 pm | श्रीगुरुजी

भारत बाहेर पडो वा आत राहो, अंतिम सामना संपेपर्यंत धागा चालेल.

बाळ सप्रे's picture

17 Mar 2015 - 4:49 pm | बाळ सप्रे

उद्या दक्षिण आफ्रिका परत चोक होइल का?

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2015 - 8:21 pm | श्रीगुरुजी

चोक होऊ नयेत अशी इच्छा आहे. आफ्रिका धावांचा पाठलाग करताना डगमगतात हे लक्षात घेता, प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची जास्त शक्यता आहे.

आफ्रिकेचे पारडे श्रीलंकेच्या तुलनेत किंचित जड आहे. आफ्रिकन्स जिंकावेत हीच मनोमन इच्छा आहे.

एक एकटा एकटाच's picture

17 Mar 2015 - 8:35 pm | एक एकटा एकटाच

पण संगकाराचा फ़ॉर्म सध्या जबरदस्त आहे.
सोबत महेला जयवर्धने चालला तर मग डायरेक्ट डबल बार ची बंदूक चालेल श्रीलंकेची.

ह्या उलट अफ्रिकेची फलंदाजी AB वर आहे.

फ़क्त आफ्रिकेचा बॉलींग अटेक श्रीलंकेपेक्षा निदान कागदावर तरी जोरदार आहे.
पण भारताने आणि दुबळ्या झिम्बाब्वेनेही त्यांची काढलेली लक्तरं पहाता अफ़्रिकेचं थोड बेभरवश्याच वाटतं

पण काहीही झालं तरी उद्याचा सामना रंगत आणणार हे नक्की

So guys
Be ready to experience the thrill of
'SUDDEN DEATH'

बाळ सप्रे's picture

18 Mar 2015 - 12:23 pm | बाळ सप्रे

लंकाच चोक झालेली दिसतेय सध्या :-)

श्रीलंकेने उप्-उपांत्य फेरीत परेराला सलामी पाठवायचा धाडसी निर्णय घेतला, कदाचित त्याला फटकेबाजी करण्याच्यासुध्दा सुचना दिल्या त्याचा फटका संघाला बसलेला दिसतोय. लंका ८९/४, २६ षटके. संगकारा शेवट्पर्यंत टिकला नाही तर अवघड आहे. थरंगालासुध्दा या सामन्यासाठी बाहेर बसवला आहे.
एकंदरीत सध्या तरी आफ्रिकेची परिस्थिती मजबुत आहे.

एक एकटा एकटाच's picture

18 Mar 2015 - 12:12 pm | एक एकटा एकटाच

सहमत

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2015 - 12:50 pm | श्रीगुरुजी

लंकन्स अगदीच सादळलेला फटाका निघाले. लंकेची सर्वबाद १३३ अशी भीषण अवस्था होईल अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. भारताप्रमाणेच फिरकी गोलंदाजी खेळणारे सर्वोत्तम फलंदाज ज्या संघात आहेत, त्या संघाविरुद्ध एका पार्टटाईम फिरकी गोलंदाज हॅटट्रिक घेतो आणि १० पैकी ७ फलंदाज फिरकी गोलंदाजासमोर बाद होतात यावर विश्वास बसणे अवघड आहे.

आफ्रिकेने उत्तम गोलंदाजी केली यात शंकाच नाही. थिरीमन्नेला खाली ठेवून कुसल परेराला सलामीला पाठविण्यामागची योजना समजलीच नाही. कुसल परेरा पहिल्या चेंडूपासून ऑफस्टंपाबाहेरील चेंडूंचा पाठलाग करत होता. दोन वेळा स्लिपच्या डोक्यावरून फटका गेलां. शेवटी एका उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. संगक्कारा आज इतका नांगर टाकून का खेळला हे एक गूढच आहे.

आता ६.२ षटकांत नाबाद ४० धावा करणारे आफ्रिकन्स उपांत्य फेरीत पोहोचल्यासारखेच आहेत. दुर्दैवाने त्यांना उपांत्य फेरीत बहुतेक न्यूझीलँडशी खेळावे लागेल व या दोनपैकी एका संघाला गाशा गुंडाळावा लागणार. दोनही संघ यापूर्वी अनेकवेळा उपांत्य फेरीत पोहोचून हरलेले आहेत. यावेळी यातला एक संघ नक्की अंतिम फेरीत असेल व दुसर्‍याला इतिहासाची पुनरावृत्ती करत उपांत्यफेरीत पुन्हा एकदा हरावे लागणार. दोनही संघ आवडते असल्याने कोण हरावे आणि कोण जिंकावे याचा विचारच करवत नाहीय्ये.

मध्यंतरी येथे नव्हतो .. पण मजा आली क्रिकेट पाहुन.
विशेषता, बांग्ला आणि इंग्लंड मॅच.

अफ्रिका जिंकली.. टॉस हारुन ही जिंकली .. मस्त वाटले.

पुढील मॅचेस प्रेडिक्टेबल असल्या थोड्याफार प्रमाणार तरी मला वेस्ट इण्डिज जिंकतील असे वाटते आहे.

दक्षिण अफ्रिका
इंडिया
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज असे संघ सेमी ला येतील असे वाटते.

पाहुया काय होते ते.
---
उद्याच्या मॅच मध्ये धवन, कोहली आणि मुशफिकर रहिम चांगले खेळतील असे वाटते.

(कालच्या मॅच ला डीकॉक लावला होता मी मोस्ट रन साठी मिळाले पॉईंट सगळे)

साधा मुलगा's picture

19 Mar 2015 - 1:25 am | साधा मुलगा

cricinfo ची fantasy league खेळत आहात का?
मिसळपावची private league बनवली आहे.
id : misalpav
password : misalpav

मला हे माहीत नाही . कसे खेळले जाते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Mar 2015 - 7:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

यंदाचा वर्ल्ड कप भारत किंवा साउथ आफ्रिकेनी जिंकायला हवा. साऊथ आफ्रिका डिझर्व्ज धिस.

भारत किंवा साउथ आफ्रिका...+१

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2015 - 8:54 pm | श्रीगुरुजी

माहेला जयवर्देना आणि कुमार संगक्कारा या दोन महान श्रीलंकन खेळाडूंचा हा कारकिर्दीतला शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यानंतर हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. दुर्दैवाने त्यांची निवृत्ती संस्मरणीय ठरली नाही. श्रीलंका सामना हरले आणि दोघांचीही फलंदाजी चांगली झाली नाही आणि श्रीलंका स्पर्धेतून बाद झाले अशी सर्व दृष्टीने वाईट अशी त्यांची निवृत्ती ठरली. जयवर्देना फक्त ४ धावांवर बाद झाला तर संगक्काराने जरी ४५ धावा केल्या तरी त्या त्याने अत्यंत संथ खेळून दडपणाखाली केल्या.

थिरिमन्नेऐवजी कुशल परेराला सलामीला पाठवायचा श्रीलंकेचा निर्णय पूर्ण चुकला. तरीसुद्धा २ बाद ४ अशा धावसंख्येवर खेळायला आलेल्या थिरीमन्नेने चांगली सुरूवात केली होती. आल्याआल्या अ‍ॅबॉटला दोन उत्कृष्ट चौकार मारून त्याने दडपण नाहीसे करायचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने संगक्कारा आपला नेहमीचा खेळ विसरून विनाकारण दडपण घेऊन खेळत होता. खाते उघडायला त्याने तब्बल १६ चेंडू घेतले. थिरीमन्नेने ३० चेंडूत ३० धावा केल्या असताना संगक्काराच्या नावावर ३८ चेंडूत फक्त ५ धावा होत्या.

संगक्काराने १-१ धाव घेऊन वेगात खेळत असलेल्या थिरीमन्नेला जास्तीत जास्त चेंडू खेळायची संधी दिली असती तर कदाचित चित्र वेगळेच दिसले असते. संगक्कारामुळे श्रीलंकेची धावगती वाढलीच नाही. पहिल्या १० षटकांत २ बाद ३५, २० व्या षटकानंतर ३ बाद ७२, ३० व्या षटकानंतर ४ बाद १०५ ... पहिल्या षटकापासून ३० व्या षटकापर्यंत श्रीलंकेच्या डावाची गती प्रतिषटक ३.५० च्या आसपासच राहिली. त्यात घट/वाढ झालीच नाही. एकाच गतीने श्रीलंकन फलंदाजांनी धावा केल्या व त्याला मुख्यत्वेकरून कारणीभूत होता संथ खेळणारा संगक्कारा.

अगदी शेवटी संगक्काराने धडपड केली. ९० चेंडूत नाबाद ३४ अशी केविलवाणी फलंदाजी करणार्‍या संगक्काराने मग एकदम आक्रमक पवित्रा घेतला. पण तेव्हा खूपच उशीर झाला होता. तोपर्यंत श्रीलंकेचे ८ फलंदाज बाद झाले होते आणि धावसंख्या होती ८ बाद ११६. शेवटच्या ८ चेंडूत ११ धावा करून शेवटी संगक्कारा ९६ चेंडूत ४५ अशी फारशी स्पृहणीय कामगिरी न करता आपल्या कारकीर्दीतल्या शेवटच्या डावात बाद झाला.

जरी जयवर्देना व संगक्कारा आजच्या सामन्यात फारसे काही करू शकले नाहीत तरी त्यांची कारकीर्द असामान्यच राहील. विशेषतः अत्यंत शैलीदार व मैदानावर अत्यंत सभ्य असलेला जयवर्देना हा माझा अत्यंत आवडता खेळाडू. आज तो निवृत्त झाल्याने जरा उदास वाटत आहे.

३७ वर्षीय संगक्काराने ४०४ एकदिवसीय सामन्यात १४,२३४ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने लागोपाठ ४ सामन्यात शतके केली आहेत.

१९९७ मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरूवात करणार्‍या ३८ वर्षीय जयवर्देनाने १४९ कसोटी सामन्यात ११,८१४ धावा व ४४८ एकदिवसीय सामन्यात १२,६५० धावा केल्या आहेत.

जयवर्देना कसोटी सामन्यातून काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाला. संगक्कारा कसोटी सामन्यातून जुलै-ऑगस्ट मध्ये निवृत्त होणार आहे. या दोघांच्या पाठोपाठ ३८ वर्षीय दिलशानही लवकरच निवृत्त होईल. कुलसेकरा व हेराथ आपली शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळत आहेत. एकंदरीत २०१५ मध्ये श्रीलंका संघाला मोठे भगदाड पडणार आहे. अनेक महाण खेळाडू निवृत्त होत असून त्यांची जागा भरायला तितकेच तोलामोलाचे खेळाडू अजूनतरी मिळताना दिसत नाहीत.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2015 - 8:58 pm | श्रीगुरुजी

उद्याचा सामना भारत सहज जिंकेल. बांगलाने नाणेफेक जिंकली तर बहुतेक ते प्रथम फलंदाजी करतील. प्रथम फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, भारत सामना जिंकणार.

एक एकटा एकटाच's picture

18 Mar 2015 - 9:52 pm | एक एकटा एकटाच

फायनल
ऑस्ट्रेलिया आणि न्युजिलंड मध्ये होईल
आणि न्युजिलंड विश्वकप जिंकेल

एक एकटा एकटाच's picture

19 Mar 2015 - 11:06 am | एक एकटा एकटाच

विराटकडून अपेक्षाभंग
:-(

असंका's picture

19 Mar 2015 - 12:58 pm | असंका

काय खेळतोय रोहित!!!

अर्र् प्रतिसाद द्यायच्या आतच बदलायला लागणार वाक्य--

काय खेळला रोहित!!

सौंदाळा's picture

19 Mar 2015 - 3:31 pm | सौंदाळा

बांगला ९०/४, जिंकणार आपण
शामीचा दुसरा स्पेल मस्तच पडला.
बाकी बांगला गोलंदांजांनी आपले फलंदाज बाद केल्यावर २-३ वेळा अगदी हिडीस सेलेब्रेशन केले.
कोहली, जडेजा वगैरे याची सव्याज परतफेड त्यांचे गोलंदाज फलंदाजीला आले की करतीलच

जिंकले...दोघं मराठी गडी भारी खेळले आज!!

तुषार काळभोर's picture

19 Mar 2015 - 4:55 pm | तुषार काळभोर

Seven matches, seven teams, seventy wickets. Seven Victories!!!

तुषार काळभोर's picture

19 Mar 2015 - 4:58 pm | तुषार काळभोर

०७/०७

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Mar 2015 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छोट्या पाकिस्तानला हरवल्याचा आनंद झालेला आहे. =))

तिमा's picture

19 Mar 2015 - 6:49 pm | तिमा

त्यांची फिल्डिंग महाभिकार होती आणि खेळाडुंची देहबोलीही. हरण्याच्याच लायकीचे होते.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2015 - 8:43 pm | श्रीगुरुजी

बांगलाविरूद्ध अगदी आरामात जिंकलो. जिंकणारच होतो. भारत जिंकणार याविषयी मनात कणभरही शंका नव्हती. बांगलादेश फारच माजलेल्या अवस्थेत होता. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला म्हणजे स्वर्गातल्या ७२ कुमारिका अप्सरा मिळाल्यासारखे त्यांचे वर्तन होते. भारताची "मौका" ही जाहीरात कॉपी करून त्यांनी विनाकारण आपले हसे करून घेतले. आजच्या सामन्यापूर्वी भारत व बांगलादेश एकमेकांशी एकूण २८ एकदिवसीय सामने खेळले होते. बांगलाला त्यातले फक्त ३ जिंकता आले आहेत. "मौका" जाहीरात कॉपी करून त्यात २००७ मधल्या विश्वचषक स्पर्धेत व नंतर २०१२ च्या आशियायी चषक स्पर्धेत बांगलाने भारतावर विजय मिळविल्याची क्लिप दाखवित होते. कधीतरी मिळालेल्या विजयांचा आनंद अजून किती वर्षे साजरा करणार? ४-५ महिन्यांपूर्वी बांगलादेशात भारताच्या दुय्यम संघाने सर्वबाद १०३ धावा केल्यावर बांगलाच्या मुख्य संघाला ५८ धावात गुंडाळून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आणली होती हे जाहीरातकर्ते विसरलेले दिसतात. भारतापुढे आपली लायकी किती हा विचार जाहिरात बनविणार्‍याने केलेला दिसत नाही. बांगलाचे खेळाडूही माजलेले दिसत होते. कोहलीला बाद केल्यावर रुबेल होसेनचे आविर्भाव अत्यंत चीड आणणारे होते.

भारताने बांगलासारखा बालिशपणा न दाखविता शांतपणे आपल्या खेळातून उत्तर दिले. सामना फारच एकतर्फी झाला. शेवटी रूबेल होसेन खेळायला आल्यावर धोनीने कोहलीला गोलंदाजीला आणावे अशी माझी इच्छा होती.

असो. भारत उपांत्य फेरीत दाखल झाला याचा अतिशय आनंद झाला आहे. भारत उपांत्यपूर्व फेरीतच हरेल असे स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी मला वाटले होते. सुदैवाने माझा अंदाज खोटा ठरला. आता उपांत्य फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलियाशीच गाठ पडेल. तो सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे, परंतु नव्याने भरात आलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर हरवू शकेल असा आत्मविश्वास वाटत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2015 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> कोहलीला बाद केल्यावर रुबेल होसेनचे आविर्भाव अत्यंत चीड आणणारे होते.
लै मस्तीचं सिलेब्रेशन होतं ते. पण, अशी मस्ती दिसलीच पाहिजे.
बाकी, सुरुवातीच्या विकेटा गेल्यावर आज बांगला अडीचशे तरी करु देतं की नै असा विचार चमकुन गेला होता.

बाय द वे, गुरुजी आता फक्त एकाच सामन्यापुरते उरणार का आपण ?
ऑस्ट्रेलियाशी खेळायचं म्हटलं की खेळाडुंचं माहिती नै पण माझेच हातपाय ढिले पडतात.

जिकंण्याची संधी चाळीस टक्के भारतीय तर साठ टक्के ऑष्ट्रेलिया.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2015 - 9:13 pm | श्रीगुरुजी

>>> बाकी, सुरुवातीच्या विकेटा गेल्यावर आज बांगला अडीचशे तरी करु देतं की नै असा विचार चमकुन गेला होता.

तसं काही वेळ वाटलं होतं खरं. भारत १० षटकांत नाबाद ५१, ३० षटकांत ३ बाद १२६ (मधल्या २० षटकांत फक्त ७५ धावा) आणि नंतर ३५ षटकांत ३ बाद १५५ (म्हणजे १० षटकानंतरच्या २५ षटकात फक्त १०४ धावा) अशी अवस्था पाहिल्यावर २७५ सुद्धा जरा अवघड वाटत होते. परंतु फक्त ३ गडीच बाद होते, त्यामुळे नंतर टॉप गिअरमध्ये येतील अशी खात्री होती. समजा भारताला २६० चा आकडा सुद्धा पार करता आला नसता तरी काळजी नव्हती कारण त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देत आहे हे दिसले असते व आपल्या गोलंदाजांसमोर बांगला हरलेच असते.

>>> बाय द वे, गुरुजी आता फक्त एकाच सामन्यापुरते उरणार का आपण ?
ऑस्ट्रेलियाशी खेळायचं म्हटलं की खेळाडुंचं माहिती नै पण माझेच हातपाय ढिले पडतात.

ऑस्ट्रेलियाशी खेळायची भीतिच वाटतेय. परंतु सांघिक कामगिरीच्या जोरावर आपण ऑस्ट्रेलियाला नमवू शकतो असं वाटतंय. ऑस्ट्रेलियाविरूद्ध शक्यतो पहिली फलंदाजी केल्यास उत्तम.

>>> जिकंण्याची संधी चाळीस टक्के भारतीय तर साठ टक्के ऑष्ट्रेलिया.

आज माझेही हेच मत.

गणेशा's picture

19 Mar 2015 - 11:24 pm | गणेशा

ऑस्ट्रेलिया जिंकणारच.

स्टीव स्मिथ आणिक स्टार्क चांगले खेळतील असे वाटते.

मला फॅन्टसी लीग कशी अ‍ॅड करायची सांगताल काय कोणी ?

साधा मुलगा's picture

22 Mar 2015 - 9:21 am | साधा मुलगा

आता लई उशीर केलात राव , आमी कवापासून खेळतोय.
मागे तुम्ही याच धाग्यावर "कालच्या मॅच ला डीकॉक लावला होता मी मोस्ट रन साठी मिळाले पॉईंट सगळे" अशी कमेंट केली होती त्यामुळे मला वाटले तुम्ही fantasy league खेळत आहात.
असो. हे घ्या दुवा देतो.
http://games.espncricinfo.com/Fantasy/Login
तुमच्या fb,twitter किंवा google + च्या account ने लोगिन व्हा अथवा cricinfo वर register व्हा.
आत आल्यावर उजव्या कोपर्यातील tutorial तुम्हाला मार्गदर्शन करेल. खेळाचे सर्व नियम वाचा कसे pts मिळतात वगैरे. तुमची team बनवा.
मिसळपाव league join करण्यासाठी :
leagues option > Join league> Private League> League name: misalpav, password: misalpav

गणेशा's picture

22 Mar 2015 - 10:41 am | गणेशा

धन्यवाद, व्यनी केला आहे

अक्शु's picture

20 Mar 2015 - 12:55 am | अक्शु

lol

आज ऑस्ट्रेलिया जिंकावं की पाकीस्तान? म्हणजे भारताच्या जिंकण्याची शक्यता पाकिस्तानविरुद्ध अधिक असेल की ऑस्ट्रेलियाविरुद्ध...?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Mar 2015 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही पाक जिंकावं असं वाटलं आपण त्यांना हरवणे ऑस्ट्रोलिया पेक्षा सोपं होतं पण क्रिकेट मधे जर तर चालत नाही आता मुक़ाबल्याची तयारी !

-दिलीप बिरुटे

अमित मुंबईचा's picture

20 Mar 2015 - 11:17 am | अमित मुंबईचा

१३९-५ ८०% सामना पाकिस्तानच्या हातून निसटालेला दिसतोय. आता आफ्रिदी काही कमाल दाखउ शकला तरच.

अमित मुंबईचा's picture

20 Mar 2015 - 11:30 am | अमित मुंबईचा

आफ्रिदी सुद्धा गेला आता तर २०० चे सुद्धा वांदे

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2015 - 12:36 pm | श्रीगुरुजी

पाकडे सर्वबाद २१३ (४९.५ षटकांत). आज पाकच्या गोलंदाजांनी कमाल दाखविली नाही तर ऑसीज अगदी सहज जिंकणार. मिसबाह, उमर अकमल आणि आफ्रिदी हे तिघेही डीप मिडविकेटवर फिंचच्या हातात झेल देऊन बाद झाले. तिघेही बाद होण्यापूर्वी चांगले स्थिरावले होते. आफ्रीदीने हातोडा फिरवायला सुरूवात केली होती. परंतु ऑस्ट्रेलियांच्या गोलंदाजांनी त्यांना फटक्याच्या मोहात पाडून फसविले.

मिसबाह व आफ्रिदीचा कारकीर्दीतला हा बहुतेक शेवटचाच सामना. विश्वचषक स्पर्धेनंतर मिसबाह व आफ्रिदी निवृत्त होणार असल्याने आजचा सामना पाकडे हरले तर (तीच जास्त शक्यता आहे) त्यांचा हा शेवटचाच सामना.

पाकडे उपांत्य फेरीत आपल्याविरूद्ध असते तर उपांत्य फेरी जिंकल्यातच जमा होती. परंतु आता ऑस्ट्रेलियाच येण्याची दाट शक्यता आहे.

२०११ च्या विश्वचषकात पाकड्यांनीच प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलियाला १७६ धावात बाद करून व सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकातील सलग २७ विजयांची माला खंडीत केली होती. आज तसाच चमत्कार पाकिस्तानचे गोलंदाज दाखवतील का ते दुसर्‍या डावात कळेलच.

तुषार काळभोर's picture

20 Mar 2015 - 4:36 pm | तुषार काळभोर

आता ऑस्ट्रेलियाबरोबर उपांत्य सामना!
असो,
शेवटच्या चारामध्ये असू, अशीही अपेक्षा नव्हती स्पर्धा सुरू झाली तेव्हा.
ऑस्ट्रेलियाची आजची कामगिरी पाहता भारताची शक्यता ४०-६० वरून ३५-६५ झाल्यासारखी वाटतेय.

तिमा's picture

20 Mar 2015 - 6:48 pm | तिमा

ते 'पाकडे' म्हणण्याच्याच लायकीचे का आहेत हे आज त्या वहाबने सिद्ध केले. वॅटसनवर तर तो सरळ 'बॉडीलाईन' बोलिंग करत होता. तोंडाने तर शिव्यांचा भडिमार चालूच होता. २०३ धावा झाल्यावर तो वॅटसनवर धावून गेला तेंव्हा त्याला मिळालेले प्रत्युत्तर उत्तम होते, फक्त एक स्मितहास्य! खिलाडुपणा अंगी नसेल तर तुमची कुठलाही खेळ खेळायची लायकीच नाही.

नाही तसे नव्हते, त्या आधी स्टार्क ने त्याला तसे केले होते.
आणि जश्यास तसे उत्तर त्याने दिले.
स्तार्क ने त्याला तर बॉल दिसतो का असे काही तरी पण बोलले आणि टाळ्या वाजवत त्याच्या जवळुन गेला. सेम वहाब ने केले. तसेच केले पाहिजे होते

बाकी अपेक्षेप्रमाणे स्टीव स्मिथ चांगला खेळला.

उद्याची मॅच पहायला मजा येणार आहे.
मला तरी वेस्ट इंडिज जिंकतील असे वाटते.

प्लेसर ऑफ त मॅच हे असु शकतील

गेल, साउदी आणि अ‍ॅन्द्र्यु रस्सेल

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2015 - 8:28 pm | श्रीगुरुजी

>>> मला तरी वेस्ट इंडिज जिंकतील असे वाटते.

आपण जिंकू असे विंडीजच्या खेळाडूंना सुद्धा वाटत नसेल. विंडीज जिंकण्याची शक्यता फार तर १० टक्के आहे.

हो संघ म्हणुन ते निट खेळत नाहीयेत हे मान्य.
तसे प्रेडिक्शन न्युजिलंड केले आहे, परंतु सगळे खेळाडु वेस्ट इंडिजचेच लावले आहेत.

कुठे तरी न्युजिलंड ची फलंदाजी ढेपाळेल असे वाटते. विल्यमसन सोडल्यास कोणी तग धरुन खेळेल असे वाटत नाहिये खरे.
उद्याच कळेल.

अतिशय खराब खेळ वेस्ट इंडिज कडुन.
तुम्हि म्हणता तसे त्यानाच जिंकायचे नव्हते असेच खेळत होते.
प्रेडिक्शन नशिब न्युजिलंड लावले होते. खेळाडु कदाचीत चुकतीलच
गेल - साउथी - रस्सेल. बघु.

तिमा's picture

21 Mar 2015 - 12:27 pm | तिमा

वेस्ट इंडिज च्या पोटांत 'गुप्ती' खुपसली गेलीये.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2015 - 2:23 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे न्यूझीलँड जिंकले. परंतु वेस्ट इंडीजच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी सकारात्मक व वेगवान खेळ केला. जवळपास ४०० धावा करण्याचे आव्हान यशस्वीरित्या पार करणे जवळपास अशक्यच होते. परंतु विंडीजच्या खेळाडूंनी सातत्याने प्रतिषटक ८ धावांच्या वेगाने फलंदाजी केली व सामन्यात मजा आणली. न्यूझीलॅंडच्या ३९३ धावात २४६ धावा (६२% धावा) चौकार व षटकारांच्या मदतीने झाल्या होत्या (३९ चौकार व १५ षटकार). विंडीजने जेमतेम २५० धावा केल्या. परंतु त्यातील १९६ धावा (७८%) चौकार व षटकारांच्या मदतीने झाल्या होत्या (२५ चौकार व १६ षटकार). या आकडेवारीवरून विंडीजच्या आक्रमक खेळाची कल्पना येईल. वेस्ट इंडीजला शेवटपर्यंत एक बाजू लावून धरणारा फलंदाज कमी पडला. अन्यथा आज ते लक्ष्याच्या जवळपास जाऊ शकले असते. ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड व सुनील नरीनेला न घेतल्याची चूक विंडीजला नक्कीच महागात गेली.

उपांत्यपूर्व फेरीतील सर्व चार सामने विजेत्यांनी मोठ्या फरकाने जिंकले. हे सामने इतके एकतर्फी होतील असे वाटले नव्हते. आता वाट पाहूया पुढील आठवड्यातील उपांत्य फेरीतील सामन्यांची.

तसे पाहिले तर, वर्ल्ड कपच्या बर्याच मॅचेस प्रेडिक्टेबल असतात, कारण २० -२० सारखे एखादा प्लेअर चालला तरी कुठलाही संघ सामना जिंकुन देतो तसे येथे क्वचित होते. शिवाय दुबळे संघ कोणते हे लक्षात असतेच.

परंतु आता सेमी फायनल मध्ये तगडे प्रतिस्पर्धी समोरा समोर आले आहेत आणि सर्वांना फायनल ला जाण्याचे तितकेच चान्स आहेत.
तरी अंदाजे

न्युजिलंड आणि ऑस्ट्रेलिया फायनल ला येतील असे वाटते

तिमा's picture

22 Mar 2015 - 1:47 pm | तिमा

खेळाप्रमाणे पाहिले तर न्यूझिलंड- ऑस्ट्रेलिया फायनल ला येणे पटते. पण काही चमत्कार होऊन भारत-सा. अफ्रिका आले तर जास्त आनंद होईल. मग भले सा. अफ्रिका फायनलला जिंकले तरी!

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2015 - 8:28 pm | श्रीगुरुजी

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी हा लेख लिहिला होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅंड, द. आफ्रिका व श्रीलंका हे चार देश उपांत्य फेरीत येतील असा अंदाज केला होता.

खालील अंदाजही केला होता.

न्यूझीलँड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया 'अ' गटात व द. आफ्रिका 'ब' गटात असल्याने उपांत्यपूर्व फेरीतच द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिका वि. न्यूझीलॅंड किंवा द. आफ्रिका वि. श्रीलंका असा सामना होण्याची ७५ टक्के शक्यता आहे. तसे झाले तर उपांत्य फेरीतील संभाव्य ४ संघातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत होईल व त्यामुळे इंग्लंड, भारत किंवा पाकिस्तानला उपांत्य फेरीत जायची संधी मिळू शकेल. कदाचित त्यामुळे अंतिम फेरीत अंदाजापेक्षा एखादा वेगळाच संघ असेल.

द. आफ्रिका व श्रीलंका उपांत्यपूर्व फेरीतच समोरासमोर आल्याने एक अंदाज चुकला व संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत भारताने धडाकेबाज कामगिरी केल्याने भारत उपांत्य फेरीत आला आहे.

उपांत्य फेरीतील सामने

(१) मंगळवार २४ मार्च, वेळ - सकाळी ६:३० (भाप्रवे), न्यूझीलँड वि. द. आफ्रिका, स्थळ - ऑकलँड

न्यूझीलँड वि. द. आफ्रिका हा अंतिम सामना होऊन द. आफ्रिका विजेता होईल असा सुरवातीचा अंदाज होता. परंतु हे दोघे उपांत्य फेरीतच समोरासमोर आले आहेत. न्यूझीलँड सातव्यांदा तर द. आफ्रिका चौथ्यांदा उपांत्य फेरीत आले आहेत. दोघांनाही आजवर एकदाही उपांत्य फेरीचा सामना जिंकता आलेला नाही. यावेळी मात्र दोघांपैकी एकजण नक्कीच प्रथमच अंतिम फेरीत जाणार.

हा सामना खूप चुरशीचा होईल असे वाटते. परंतु न्यूझीलॅंडचा आतापर्यंतचा धडाका व सामना न्यूझीलँडमध्ये होत आहे हे लक्षात घेतल्यास न्यूझीलॅंड सामना जिंकतील असं वाटतंय. न्यूझीलँड सामना जिंकण्याची शक्यता ६० टक्के आहे.

(२) गुरूवार २६ मार्च, वेळ - सकाळी ९:०० (भाप्रवे), भारत वि. ऑस्ट्रेलिया, स्थळ - सिडने

ऑस्ट्रेलिया सातव्यांदा तर भारत सहाव्यांदा उपांत्य फेरीत आले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी उपांत्य फेरीत कधीच पराभूत झालेला नाही. भारताने उपांत्य फेरीच्या ५ पैकी ३ सामन्यात विजय मिळविलेला आहे. एकंदरीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. परंतु नुकत्याच संपलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मर्यादा काही प्रमाणात उघड्या पडलेल्या आहेत. भारताचा संघ अत्यंत जोमात आहे. सिडनेची खेळपट्टी बर्‍याच प्रमाणात फिरकीला साथ देते. हे लक्षात घेता हा सामना एकतर्फी न होता बर्‍यापैकी चुरशीचा होऊन ऑस्ट्रेलिया विजयी होईल असे वाटते. ऑस्ट्रेलिया जिंकण्याची शक्यता ६० टक्के वाटते. हा अंदाज चुकुन भारत निर्विवाद विजयी व्हावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

गणेशा's picture

23 Mar 2015 - 6:00 pm | गणेशा

१.
न्युजिलंड विरुद्ध अफ्रिका = विजेता न्युजिलंड

प्लेअर ऑफ द मॅच -
बोल्ट , विल्यमसन आणि कर्णधार ब्रँडन मॅक्युलम.

२. इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विजेता ऑस्ट्रेलिया

प्लेअर ऑफ द मॅच
स्टीव्ह स्मिथ, अश्विन आणि मॅक्सवेल.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2015 - 6:18 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलँडचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने टाचेच्या दुखापतीमुळे उद्या (आणि उद्याचा सामना जिंकल्यास अंतिम सामनासुद्धा) खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी बहुतेक मॅट हेन्री आत येईल. मॅट हेन्रीने आतापर्यन्त फक्त ८ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत व त्यात त्याने २१ बळी मिळविलेले आहेत. मॅट हेन्रीला न घेतल्यास न्यूझीलॅंडकडे मिचेल मॅकलेनघॅन, कायल मिल्स व नेथन मॅकलम् हे पर्याय उपलब्ध आहेत.

उद्या पाऊस येण्याची ६०% शक्यता आहे. परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी बुधवारचा दिवस राखीव असल्याने उद्या सामना पूर्ण झाला नाही तर सामना बुधवारी पुढे सुरू होईल.

द. आफ्रिका व न्यूझीलँड हे दोन्ही संघ आवडते असल्याने सामन्याच्या निकालाने आनंद व दु:ख एकाचवेळी होणार. न्यूझीलँड सामना जिंकण्याची तुलनेने जास्त शक्यता आहे.