च वै तू हि आणि मराठी मालिका ....

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
30 Jan 2015 - 9:24 pm
गाभा: 

संस्कृत काव्यामध्ये च वै तू हि ह्याचे अनन्यसाधारण महत्व आहे ...फिलर्स म्हणून अतिशय कामास येणारे

हल्ली मराठी मालिकांमधील काही संवाद ... अत्यंत फुटकळ बाबही काहीतरी विशेष महत्वाची असल्यासारखे दाखवणे ...तसेच काही दृश्यांकने ह्या फिलर्स सारखे पण अत्यंत डोक्यात जाणारे

१. कुणीही कुठूनही बाहेरून आले कि : तू 'फ्रेश' होऊन ये ...अरे तो/ती फ्रेशच दिसत असतांना पुन्हा काय ...आणि हात पाय धुवून घे असे सोपे वाक्य नाही ...फ्रेश होऊन ये

२. कोणताही तणाव आला कि : त्याला / तिला थोडा वेळ दे
किंवा

तू आधी/थोडी शांत हो

३. अत्यंत फालतू समस्या मांडली तरी "मी समजू शकतो"

४. कसल्याहि फालतू विधानावर स्क्रीनवरच्या प्रत्येकाच्या चेहेर्यावर हलका प्रकाश झोत आणि त्यांची प्रतिक्रिया ...

५. काही ठिकाणी पांचट तकिया कलाम
-"नानामृत (नाना +अमृत)...मला पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला भलतेच वाटले होते "
-"शोधलं कि सापडते"

तरी हल्ली ते 'त्रिवार नकार' किंवा त्रिवार होकार with slight एको फार ऐकू येत नाहीत ...

प्रतिक्रिया

सगळ्यात जबरदस्त प्रकार म्हणजे एकमेकांना सांगणे.

उदा. चंदूला ठेच लागली. चंदू बायकोला फोन करून सांगतो. बायको सासूबाईंना. सासूबाई सासर्‍यांना. सासरे व्याह्यांना. एकच ठेच चांगली वीस मिनिटं पुरवते.

अजून एक प्रकार अगदी सुरुवातीच्या डेलीसोप्समध्ये बघायला मिळायचा. एपिसोडाच्या शेवटच्या शीनमध्ये दारावरची घंटी वाजायची. एखादे स्त्रीपात्र दार उघडायचे. चमकून, चेहेर्‍यावर विस्मय दाखवत म्हणायचे:

"तुम!"

आणि एपिसोड संपायचा.

दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा!

दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा!

*lol*

अत्रन्गि पाउस's picture

30 Jan 2015 - 9:56 pm | अत्रन्गि पाउस

*LOL*

रेवती's picture

30 Jan 2015 - 10:02 pm | रेवती

हा हा हा.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2015 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा!

=)))))

जातवेद's picture

31 Jan 2015 - 9:20 am | जातवेद

*lol*

फारएन्ड's picture

2 Feb 2015 - 7:24 pm | फारएन्ड

दाराबाहेर कोण असावं या उत्कंठेने पुढचा एपिसोड लावावा, तर सिलेंडरवाला, रद्दीवाला वगैरे असायचा! >>> लोल महान आहे हे! तोंडात कॉफी असल्याने समोरचा लॅपटॉप धोक्यात आला हे वाचताना :)

सिरुसेरि's picture

30 Jan 2015 - 10:18 pm | सिरुसेरि

फ्रेश होऊन ये - बहुतेक इथे संवाद लेखकाला (वॉशरुम / बाथरुम / रेस्टरुम) =( फ्रेशींग रुम ) हा अर्थ अभिप्रेत असावा . ते आधुनीक कालानुरूप सुसंगतही आहे आणी बरेच ठिकाणी वापरातही आहे .

जातवेद's picture

31 Jan 2015 - 9:22 am | जातवेद

पण जायचे असल्यास ते पात्र जाईल की ईतरांनी कशाला सांगायला पाहिजे?

पैसा's picture

30 Jan 2015 - 10:23 pm | पैसा

ती सहा सासवांची एक सीरियल आहे त्यात काही झालं की प्रत्येक सासूची रिअ‍ॅक्शन दाखवतात. दोन प्रसंग नाय झाले तर एपिसोड संपला!

अत्रन्गि पाउस's picture

30 Jan 2015 - 11:07 pm | अत्रन्गि पाउस

असं कसं असं कसं

उगा काहितरीच's picture

31 Jan 2015 - 12:17 pm | उगा काहितरीच

डेली सोप म्हणजे केवळ तुमच्या संयमाची परीक्षा !

प्रियाजी's picture

31 Jan 2015 - 1:07 pm | प्रियाजी

वाचुन खूप खूप हसले.

कोंबडी प्रेमी's picture

31 Jan 2015 - 1:43 pm | कोंबडी प्रेमी

शी आय डी मध्ये बी
१. २-५ मिनिटात DNA टेस्ट वगैरे तडक ..
२. अगम्य केमिकल्स ची नावे ठोकून (फोर एग्झंपल टेट्रासायक्लोमाय्तोमोर्फिन)...त्या वर असामी असामी

ओह कोस्मोस

ष्टैल बाकीचे तो इस लाश मी टेट्रासायक्लोमाय्तोमोर्फिन था ??? ह्म्म्म
३. फोरेन्सिक वाले ये देखो वो देखो करून मायक्रोस्कोप मधून काय दाखवतात देव जाणे
४. त्यात ते तोड दो दरवाजा ..
५. फ्रेडरिकचे आत्मा वगैरे
३.

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 4:20 pm | वेल्लाभट

लोलच म्हणजे एकदम

सिरीयलातील, ऐका मध्यवर्ती कुटुंबातील, २ नं च्या सुनेच्या ३ ऱ्या कन्येच्या, ४ इयत्तेतील क्राफ्ट पेंटिंग विषयासाठी केलेला व रंगवलेला घडा हरवतो, आणी त्या कुटुंबातीलच नव्हे तर सोसायटीतील सर्व लहान मोठे, वॉचमन, रिक्षावाले काका…म्हणजे जेवढे दिग्दर्शकाला त्यावेळी आठवलेले ती सर्व लोकं,
तो रंगीत घडा, दिवसभर शोधात फिरतात, लहानाचं ठीक, पण बाकीच्या लोक्कांना नोकरी/व्यवसाय/शिक्षण/कॉलेज असल्या गोष्टी वै असं काय नसतं का ? काय झालं ? काय नाही बेबीन रात्रंभर जागून घडा रंगवला अन तो आता सापडत नाही म्हटल्यावर, लागले लगेच शोधायला, अरे गधड्या सकाळी सकाळी ऑफिसला निघालेला तू ? लोकल पकडणे, म्यानेजरला रिपोर्ट देन असा काय ह्यांच्या जगात असत कि नाही ?

धागा बिगा अशा गोष्टीत सामावणा-या गोष्टी नाहीत या.
असो
सर्वात पहिले खटकणारी गोष्ट....

एखाद्याने दुस-याला काहीतरी सांगावं, आणि दुस-याने 'काय????' असं मोठ्ठ्याने, अचंबित वगैरे होऊन विचारावं.
अरे बहिरेपणा आलाय का? की मंदपणा आलाय?
काय काय काय! डॉक्क्यात जातं !

शोधलं की सापडतंच बद्दल मला जे वाटतं
ते 'लिहून' कुणापर्यंत पोचवण्याची पात्रता माझ्या अंगी नाहीच....

वेल्लाभट's picture

2 Feb 2015 - 4:26 pm | वेल्लाभट

मराठी दैनिक साबणांमध्ये इंग्रजी शब्द वापरणं.... डोक्यात जातं.

तू फ्रेश होऊन ये एक झालं.
त्याने मला गाईड केलं.
मी सजेस्ट करू का?
तुला शेवटचं वॉर्न करतोय
तिने मला यूज केलं

अरे काय लावलंय? येत नसेल मराठी तर नका काढू मालिका.

हे असलं १००% मराठी बोलणं डाऊन्मार्केट आहे ना पण?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 5:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सिर्यल मधे असं बोल्लं नाही तर इफेक्टीव्ह कम्युनिकेशन होतं नाही ओ.....प्रेक्षकांच्या हेडवरुन बाउन्सर जाउ नये म्हणुन चार मराठीचे शब्द प्लांट करतात म्हणे आजकाल. वी शुड प्रोटेस्ट अगेन्स्ट इंग्लिश वर्ड्स युस्ड इन मराठी सिरिअल्स, आफ्टरॉल वी मस्ट रिस्पेक्ट अवर लँग्वेज अँड कल्चर. चलो कँडल निकालो, काडेपेटी निकालो मराठी के लिये मोर्चा निकालो.

असंका's picture

2 Feb 2015 - 9:43 pm | असंका

:-))

अत्रन्गि पाउस's picture

2 Feb 2015 - 5:48 pm | अत्रन्गि पाउस

मोजून १९ सेकंद गेले समजायला
*LO**

फारएन्ड's picture

2 Feb 2015 - 7:22 pm | फारएन्ड

जबरी आहे हे! :)

माझा फारसा अभ्यास नाही. पण सीन मधे कोणीतरी काहीतरी "अ‍ॅलेजेडली" धक्कादायक वाक्य म्हणते व त्यावर इतर लोकांच्या रिअ‍ॅक्शन चे शूटिंग दाखवण्याच्या विविध पद्धती साधारण अशा आहेतः

ऐकणारे लोक हादरले - लेव्हल १: अनईव्हन झूम शॉट्स
ऐकणारे लोक हादरले - लेव्हल २: वरून, खालून, उजवीकडून, डावीकडून एकाच्याच चेहर्‍यावर कॅमेरा आणणे व बाजूला वादळी पार्श्वसंगीत.
ऐकणारे लोक हादरले - लेव्हल ३: टी-रेक्स येत असल्याप्रमाणे थरथरणारे स्क्रीन.

टी-रेक्स येत असल्याप्रमाणे थरथरणारे स्क्रीन.

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

मराठे's picture

2 Feb 2015 - 11:12 pm | मराठे

प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याचा चेहरा दाखवलाच पाहिजे असा काही नियम आहे का? उगाच चार वाक्यांचा संवाद म्हणायला दहा मिनिटं लावतात. शिवाय बोलणारा/री संथ स्वरात बोलत असतात.. त्यापेक्षा टाईप करून होईल लवकर.

अत्रन्गि पाउस's picture

3 Feb 2015 - 3:08 pm | अत्रन्गि पाउस

अहो त्याशिवाय प्रत्येकाच्या मनातले तरंग कसे कळतील बापड्या प्रेक्षकांना ... म्हणजे साधे पोहे करूयात का असे विचारले तरी..
हम्म..
हो..
अय्या हो...
चालेल कि
पण फोडणीचे
नको बाई ..
बटाटे भरपूर हवेत
का डोक्यातले कमी आहेत का ?
मग पकडापकडी ... धपाटा
आSSSSSई ...बघ नं ..
मग पुन्हा आई हसून नाही नाही अशी मान
कुणी काय हे असा चेहेरा
कुणी कपाळाला हात लाऊन
कुणी मान मागे टाकून हा हा हा
आणि मग पुन्हा
चला मी पोह्यांची तयारी करतो/ते ...
...सुरु ...

नाखु's picture

3 Feb 2015 - 4:27 pm | नाखु

माई मोड ऑन "मराठी असो कि हिंदी शिरियल ह्या खानावळीतल्या आमटी सारख्या असतात त्यात "डाळ" शोधायला जावू नये असे आमच्या "ह्यांनी" कधीच सांगीतलय ना! माई मोड ऑफ.

याचा माईंना मोड असा विपर्यास करू णये.