माझे फोटोग्राफीचे प्रयत्न …

काव्यान्जलि's picture
काव्यान्जलि in मिपा कलादालन
28 Jan 2015 - 10:46 pm

मी काढलेले फोटो पहिल्यांदाच मिपा च्या कलादालनात टाकते आहे.
सूचनांचे स्वागत!!!


M

वरंध घाटात काढलेला माकडाचा फोटो


S

माझी भाची


S

माऊ…


M

हि वाट दूर जाते …

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Jan 2015 - 12:07 am | मुक्त विहारि

विशेषतः शेवटचा...

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2015 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

फोटो आवडले.

अभिदेश's picture

29 Jan 2015 - 12:31 am | अभिदेश

कैमेरा आणि लेन्स कोणती आहे , ह्याचि माहिति टाका..Bokeh चान्गल आलाय..

खटपट्या's picture

29 Jan 2015 - 12:55 am | खटपट्या

शेवटचा फोटो खूप छान...

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 7:22 am | अत्रुप्त आत्मा

छाण! :)

तीसरा फोटू नयनरंगा मुळे अतिशय ओळखिचा वाटतोय! =))
कोलिंग वल्ली! :-D

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 5:56 pm | अत्रुप्त आत्मा

https://lh5.googleusercontent.com/-bclZyVLQfqE/VMkPqvE7DTI/AAAAAAAAAvs/A-GSe87fQfU/w850-h567-no/IMG_4552.JPG
सदर फोटूतलं तारेचं कुंपण,हे ठाकुर्ली नामक रेल्वे ठेसनाच्या भायेर आहे म्हणे! =))

(संदर्भः- मि.पा.वरील आगोबाचा एक प्राचीन प्रतिसाद! =)) )

तुम्हाला हिरव्या डोळ्यांचं मांजर म्हणायचं आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2015 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा

होय होय.. तेच्च ते! =))

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 2:23 pm | वेल्लाभट

पहिला, व शेवटचा उत्तम !!!

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2015 - 3:29 pm | दिपक.कुवेत

भाची खुप गोड आहे. पण पहिला फोटो दिसत नाहिये. वरंध घाटात काढलेला माकडाचा फोटो - ह्या नावाखाली तुमच्या भाचीचा फोटो दिसतोय. जरा दुरुस्त करायला सांगा.

किल्लेदार's picture

29 Jan 2015 - 6:21 pm | किल्लेदार

"वरंध घाटात काढलेला माकडाचा फोटो - ह्या नावाखाली तुमच्या भाचीचा फोटो दिसतोय."

हा हा हा.... *LOL*

काव्यान्जलि's picture

29 Jan 2015 - 11:26 pm | काव्यान्जलि

फोटो canon 600 D कॅमेरा ,18--55, 55-250 लेन्स ने काढले आहेत .
जाणकारांनी काही सूचना असल्यास नक्की सांगाव्यात . जेणेकरून मला माझी फोटोग्राफी सुधारण्यास मदत होईल. :)
पहिला फोटो दिसत नाहीये , या बाबत संपादक मंडळाने कृपया मदत करावी .

तुमचा हात पोट्रे ट /कैंडिड साठी(कळत /नकळत टिपलेली छबि) चांगला आहे त्यामुळे कैमरा आणि लेन्सचा पुरेपूर वापर झाला आहे.
चांगले भाव {चेहऱ्यावरचे }येण्यासाठी मुलांचे ३ आणि मोठ्यांचे पाच फोटो काढल्यावर पुढे फोटोग्राफर आहे हे विसरतात, बोका चिमणी पाहिली तर विसरतो, पण अॅक्ट्रेस पहिल्या फोटोपासूनच विसरतात {असे म्हणतात}. भाचीच्या फोटोत माझा फोटो काढताहेत हा भाव दिसतो आहे. आणि चमचा पूर्ण न दिसल्याने
हात उगाचच मध्ये आल्यासारखा वाटतोय.
पोट्रेटमध्ये मुद्दाम कैमऱ्याकडे बघितलेलं चांगलं वाटतं.
शटरस्पीड १/३० ठेवला तर खूप तरल भावना रेकॉर्ड होतात. खूप उजेडात हा स्पीडमात्र मिळत नाही.
बोक्याच्या फोटोला १० कारण:-कुंपणावर बसलेली चिमणी पकडण्याअगोदरचे भाव दोन्ही डोळयांत आले आहेत आणि जे दाखवायचं आहे तेच ठळक आलं आहे .इथे आख्खा बोका गैर ठरला असता.

विशाल कुलकर्णी's picture

30 Jan 2015 - 10:20 am | विशाल कुलकर्णी

सुरेख छायाचित्रे :)

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 10:35 am | नांदेडीअन

मांजरीचा फोटो छान आलाय.

जागु's picture

30 Jan 2015 - 10:37 am | जागु

सुंदर आहेत फोटो.

काव्यान्जलि's picture

30 Jan 2015 - 7:05 pm | काव्यान्जलि

सर्वांना धन्यवाद !!
कंजूष ..आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद …पुढच्या वेळी फोटो काढताना नक्की सुधारणा करेन .. :)

ज्योति अळवणी's picture

5 Feb 2015 - 10:44 am | ज्योति अळवणी

ख़ास करून शेवटचा फोटो..

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 12:23 pm | मदनबाण

मस्तच ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

एस's picture

27 Feb 2015 - 6:14 pm | एस

प्रतिसाद द्यायला अक्षम्य उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व. मला छायाचित्रण या विषयाची थोडीबहुत आवड असल्याने यासंबंधीच्या धाग्यांवर/खरडींना ताबडतोब एकदोन वाक्यांमध्ये प्रतिसाद देण्यापेक्षा जरा सवडीने, परंतु जास्त सविस्तर प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो, म्हणून उशीर होतो. तेवढं समजून घ्याल अशी आशा आहे!

वरंध घाटात काढलेला माकडाचा फोटो
हा फोटो संगणकावरून धागा पाहिल्यास दिसत नाहीये, पण मोबाइलवरून दिसतोय. सर्वच छायाचित्रांमधील रचनाविचार बराचसा जमलाय. अगदी छोट्याछोट्या काही गोष्टी पाळल्यास प्रतिमा अजून भारी वाटतील याबद्दल शंका नाही. वन्यजीवछायाचित्रणात नुसतेच पक्षी-प्राण्यांचे पोर्ट्रेट्स काढण्यापेक्षा त्यातील 'अ‍ॅक्शन' मधील एखादा क्षण पकडल्यास असे छायाचित्र प्रभावी वाटते. यादृष्टीने हा फोटो मस्त आला आहे. फक्त वरच्या बाजूने अजून क्रॉप करायला पुष्कळ जागा आहे असे वाटले. दुसरे म्हणजे प्रकाश. प्रकाश माकडाच्या चेहर्‍यावर व्यवस्थित नाहीये. अर्थात घाटात वाहनातून फोटो घेतल्यामुळे फारशी संधी मिळाली नसणार हे गृहित धरतो. तरीही पुढच्या वेळी 'Pre-visualization' चे तंत्र वापरून सुधारणा करता येईल. अजून एक म्हणजे माकडाच्या डोळ्यांवर फोकस हवा. हेही एका क्षणात सेटिंग करून कसे साधायचे हे सरावाने जमेल. त्यासाठी कॅमेर्‍यामध्ये AF-S पेक्षा AF-C किंवा कंटिन्यूअस फोकसिंग मोड वापरावा.

माझी भाची
इथेही तो क्षण पकडण्याचे कसब मस्त आहे. फोकसिंगही बरोबर आहे. रचनाविचार इतका तिरपा नको होता. व्यक्तिचित्रणात शक्यतो तिरपे कॉम्पोजिशन तितके प्रभावी ठरत नाही. आणि अजून थोडा उजवीकडून फोटो घेता आला असता तर वेगळाच अँगल मिळाला असता असे वाटते. यात आणखी एक प्रयोग करायचा झाला तर भाचीच्या मागून फोटो घेणे, ती आरशाकडे पाहत आहे आणि आरश्यात तिचे प्रतिबिंब आहे असा मस्त रचनाविचार करता आला असता आणि मुख्य विषयवस्तूकडे फोटो पाहणार्‍या प्रेक्षकांचे लक्ष जास्त गेले असते.

माऊ…
अतिशय सुरेख फोटो. कॉम्पोजिशन, फोकसिंग, बोके, फोरग्राउंड इत्यादी सर्वच चांगले.

हि वाट दूर जाते …
अशा फोटोंमध्ये शीर्षकाचा खरोखरचा परिणाम मिळवण्यासाठी ओल्या समुद्रकिनार्‍यावरील प्रतिबिंबे आणि सावल्यांचा परिणामकारक वापर करता येणे महत्त्वाचे असते. कॅमेरा जमिनीच्या जवळ घेऊन, वाइडअ‍ॅन्गल लेन्स वापरून, क्षितिजरेषा व्यवस्थित चित्रचौकटीला समांतर ठेऊन आणि दोन-तृतीयांशाचा नियम पाळून घेतलेले सूर्यास्ताचे फोटो जास्त चांगले येतात. जमीन आणि आकाश यांचे संयुक्त फोटो घेताना ज्या भागावर जास्त महत्त्व द्यायचे आहे तो भाग फोटोत दोन-तृतीयांश आला पाहिजे. उदा. आकाशातील रंगीबेरंगी ढग, सोनेरी पखरण दाखवायचे तर आकाश जास्त दिसले पाहिजे. समुद्राच्या लाटा जास्त उठावदार दिसायला हव्यात तर समुद्र आणि किनारा जास्त दिसला पाहिजे. अशा फोटोंमध्ये मिनिमॅलिस्टिक अ‍ॅप्रोचही छान दिसतो.

तुम्ही काढलेला फोटोही मस्त आहे. क्षितिज अगदी काटेकोरपणे समांतर ठेवा. कललेले नको. आणि हा फोटो थोडासा अजून कमी उंचीवरून व थोडा लांबून घेतला असता तर आणखी छान आला असता असे वाटते.

खूपखूप शुभेच्छा आणि आम्हां मिपाकरांना अशाच सुंदरसुंदर फोटोंची मेजवानी वेळोवेळी देत चला अशी विनंती!

- धन्यवाद!

सौरभ उप्स's picture

1 Mar 2015 - 12:27 am | सौरभ उप्स

वाह छान प्रयत्न...

प्रभाकर पेठकर's picture

1 Mar 2015 - 12:52 am | प्रभाकर पेठकर

सर्व छायाचित्र आवड्ली.

स्वॅप्स ह्यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. ते वाचून छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या मौलीक मार्गदर्शनाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.

काव्यान्जलि's picture

2 Mar 2015 - 9:01 am | काव्यान्जलि

सर्वांना धन्यवाद!!
स्वॅप्स सर आपण केलेल्या सुचना, पुढच्या वेळेस फोटो काढताना नक्की लक्षात ठेऊन आचरणात आणेन.
तुम्ही ज्या बारकाईने माझ्या फोटोंचे निरीक्षण केले आहे, मी देखील तेवढे कधी केले नव्हते. :) (आता इथून पुढे करेन :P)
तुमच्या सुचानाबद्दल खूप खूप धन्यवाद !!
अजून चांगले फोटो काढायचा आणि मिपावर टाकायचा नक्कीच प्रयत्न करेन.

हर्शरन्ग's picture

8 Apr 2015 - 10:16 pm | हर्शरन्ग

छान आहेत फोटो :)