आपण यांना का खाल्लंत ?

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
9 Jan 2015 - 1:28 pm
गाभा: 

पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच.

लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे.

एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल!

पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.imoti

प्रतिक्रिया

रोचक विषय.. मनातली खदखद काढून मोकळे होण्यास उत्तम विषय नि धागा.

......

कपिलमुनी's picture

9 Jan 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

या मध्ये मिळणारे युनिक खाद्यपदार्थ दुर्मिळ आहेत

१. गवारीची भरपूर पाणी घातलेली आमटी
२. बटाट्याचा पिठलं
३. फरसाणची सुक्की भाजी
४.अनोळखी रस्सा ( बरेचदा मटकी , मूग किंवा तत्सम कडधान्ये मिक्सर मधून वाटून घ्यायची म्हणजे खूप लोकांना पुरतात आणि त्याचा रस्सा बनवायचा)
६. दुधी भोपळ्याची आमटी / पातळ भाजी . ही तर एवढी जबरदस्त असते की १ वाटी १ माणून या हिशोबाने पुरते.
७. पोह्याची आमटी

कोणतीही रेसिपी हवी असल्यास फोटोशिवाय मिळेल

अत्रन्गि पाउस's picture

9 Jan 2015 - 9:36 pm | अत्रन्गि पाउस

सांगा

कपिलमुनी's picture

13 Jan 2015 - 1:31 pm | कपिलमुनी

साधा पिठलं करून घ्यावा.
बाजारातून सकाळी बटाटेवडे आणावेत ते संध्याकाळपर्यंत गार करावेत किंवा बटाट्याची भाजी करावी
संध्याकाळी पिठल्यामध्ये ते वडे वरचं कव्हर काढून घालावेत आणि स्मॅश करावे .
इथे पिठल आमटी एवढा पातळ हवे .
मग हे मिश्रण उपकार केल्यासारखे पानात वाढावे.

ही अतिशयोक्ती नाही . आम्हीच ते दुर्दैवी जीव होतो . मालकाची हॉटेल + मेस होती . तो समोश्याचा भाजीची सुद्धा पावभाजी करायचा. १ महिना भोग भोगले आणि पळालो

हरकाम्या's picture

10 Jan 2015 - 5:20 pm | हरकाम्या

राव याच्या रेसिपी टाकाकी.

भूक लागली म्हणून खाल्लं.

'चवलेस' पदार्थ खायची़ उत्तम जागा - जगातली कुठलीही मेस (खानावळ)

पावभाजीवरून आठवलं. मुंबईत रहात असे तेव्हा प्रभादेवीच्या दीपक टॉकीज जवळच्या एका टपरीछाप हॉटेलात जेवायला जवळजवळ रोज जात असे. पोळी-भाजी बरी असायची. त्या हॉटेलाची ख्याती बहुदा "स्वस्तात अमर्याद पावभाजी खा" टैप असावी. (जवळच एक लेडीज बार होता. त्यात पैसे उधळून टैट होऊन स्वस्तात पोट भरायला आलेले चिक्कार लोक्स असायचे.) बरं पावभाजीचा खप एवढा, की दहा प्लेट पावभाजीमागे एक प्लेट इतर डिश, असा.

एकदा उत्सुकतेने पावभाजी मागवलीच. आणि... अरारारारारा... त्याचं वर्णन करण्यातही अर्थ नाही.

पावभाजी कधीच बिघडू शकत नाही असा माझा समज होता - कारण तेल टाकायचं, मसाला टाकायचा आणी त्यात भाज्या चेचायच्या, इतकी सोप्पी पाकृ. पण त्यादिवशी त्याने हा समज मोडून पाडला!

१) पुरणपोळी म्हणून पानात वाढला जाणारा, पुरण एकीकडे आणि पोळी एकीकडे झालेला पदार्थ
२) उकडीचा मोदक म्हणून दिला जाणारा तांदळाच्या उकडीचा मुटका
३) करंजीचा खुळखुळा
४) पुलाव म्हणून वाढलेला मसालेभात
आणखी आठवेल तसं लिहीतो.

हाडक्या's picture

9 Jan 2015 - 3:50 pm | हाडक्या

चायना मध्ये (अथवा कुठेही खरेतर) मिळणारे "ओरिजिनल" चायनीज .. !!
कसे खातात त्यांनाच माहीत.

गवि's picture

9 Jan 2015 - 4:12 pm | गवि

http://misalpav.com/node/19503

वरील लिंक वाचून घ्या..

कपिलमुनी's picture

9 Jan 2015 - 4:27 pm | कपिलमुनी

गवि,
फोटू गायबलेत

नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती!

ह. ह. पु. वा.

मागे एकदा ओरिसातल्या मित्रांनी काही मीठाया आणल्या होत्या. आम्ही मीठाया पाहून त्यावर तुटून पडलो पण लगेच लक्षात आले त्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नर्मदेतील पाण्यातल्या आहे. मित्र समोर असल्यामुळे ३-४ बेचव मीठाया खाव्या लागल्या.

मित्रहो's picture

9 Jan 2015 - 11:05 pm | मित्रहो

हल्ली आमच्या घरात वांग्याची भाजी खाणारा मीच त्यामुळे घरातला साराच राग, रुसवा, गोडवा त्या भाजीत मिसळला जातो. एक दिवस भाजी लाल भडक होती. लंच टेबलवर सर्वानांच आश्चर्य वाटले. मी म्हटले सारा राग काढला वाटतो भाजीवर. तेंव्हापासून भाजीचा रंग पाहूनच आमच्या ऑफिसची मंडळी घरातल्या वातावरणाचा अंदाज बांधतात.

बोका-ए-आझम's picture

9 Jan 2015 - 11:58 pm | बोका-ए-आझम

प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरासमोर कोहिनूर नावाचं हाॅटेल/बँक्वेट हाॅल आहे. गेली अनेक वर्षे बेचव अन्न देण्याचं सतीचं वाण त्यांनी निष्ठेने स्वीकारलेलं आहे! ;)

खमंग भाजलेल्या तिळाची वडी पूर्वी मला थोडीफार का होईना आवडत असे पण एका ओळखीच्या बाईंनी त्यांच्या घरातील उरलासुरला तिळगूळ (वास येणारा) आम्हा आजूबाजूला मुलांना खायला लावला होता. एका घासात पोरकिडा आल्याने माझी तीळवडीची आवड कायमची संपली. तसेच कोणाकडेतरी गेल्यावर त्यांनी फो. पोह्याबरोबर (चांगले झाले होते) रव्याची अतिगोड वडी दिली होती त्याने गोडाची कळ मस्तकात गेली होती. त्या वडीचीही आवड संपली. आईने त्यांना वड्या चांगल्या झाल्याचे सांगून साखरेचे प्रमाण विचारल्यावर त्यांनी रव्याच्या तिप्पट साखर घेतल्याचे सांगितले होते. तसेच क्रीमची बिस्किटे या प्रकाराची शिसारी बसलीये. पुणे नासिक प्रवासात एका मुलीने क्रिमची बिस्किटे बकाबका खाल्ली. त्यातून तिला गाडी लागत होती. माझ्या अगदी दुसरी तिसरी यत्तेच्या आसपास बर्‍याच पदार्थांची नावड निर्माण झालीये ती आजतागायत. बाकी पूर्वी हाटेलात खाण्याची पद्धत फारशी नसल्याने कोणत्या हाटेलातील अमूक एक पदार्थ असे सांगता येणार नाही पण माझ्या धाकट्या जावेनं माझी दडप्या पोह्यांची आवड अतोनात आग्रह करून, खायला लावून बरीच कमी केलीये. नुकत्याच झालेल्या लग्नाच्या आधी घरगुती मेंदी कार्यक्रमात त्यांनी चवदार मिसळ व आणखी पदार्थ ठेवले होते. ते चांगले असले तरी खूप प्रमाणात केलेला पदार्थ बघितल्यावरही खायला नको वाटते.

पिवळा डांबिस's picture

10 Jan 2015 - 1:31 am | पिवळा डांबिस

एक 'राजधानी' नांवाची गुजराती थाळी विकणारी रेस्टॉरंट्सची चेन आहे.
आमच्या लॉसेंजेलिसात एकदा तिथे गुजराती थाळी खाल्ली. खूप आवडली, म्हणून मग नंतर बयाचदा खाल्ली...
उत्तम चव, उत्तम क्वालिटी, उत्तम व्हरायटी, उत्तम सर्व्हिस. एक सुंदर अनुभव!
आता इथे इतकी चांगली थाळी मिळते तर भारतात याहूनही चांगली असेल म्हणून गेल्या खेपेला मुंबईला गेलो असतांना मालाडच्या राजधानीत थाळी मागवली...
अतिभिकार, महाभिकार होती!!! चव आणि क्वालिटी दोन्ही!!!
झक मारली आणि तिथे गेलो असं झालं!!!
त्यातून तिथले शिंदळीचे वाढपी दर मिनिटाला काय ना काय चिमूट्भर वाढण्यासाठी टेबलाशी गर्दी करत होते!
धड जेवू देईनात की नीट गप्पा मारू देईनात!
हे 'गुजराती आदरातिथ्य' असं मला कोणीतरी सांगितलं...
अरे पण शिंच्या जो नावडलेला पदार्थ (बहुतेक तसेच होते)एकदा नकोय म्हणून सांगितलं तरी पुन्हा दोन मिनिटांनी तोच पदार्थ पुन्हा घेऊन कशाला येतोस माझ्या टेबलाशी? आदरातिथ्य करायचं तर जरा कस्टमरला काय आवडलंय काय नाही ते जरा लक्षात ठेव ना!!!
डोंबलाचं आदरातिथ्य!!!
:(
खरं सांगतो, आपल्या विजुभाऊच्या घरचं आदरातिथ्य अगोदर अनुभवलेलं नसतं ना तर ह्या गुजराती आदरातिथ्याविषयी कायमचा गैरसमज मनात निर्माण झाला असता!!!

पहाटवारा's picture

10 Jan 2015 - 6:15 am | पहाटवारा

आमच्या लहानपणी वाड्यात रहाताना घर्-मालकीणबाईंचा एक आवडता पदार्थ होता - ताकातले पराठे !
घरचे दूध्-दुभते असल्याने सारखाच ह्या पाक्-क्रुतीचा आविष्कार होत असे. अन नेह्मी त्या आम्हाला आग्रह करुन आणून देत असत. एक तर त्याची चव एकदम बेकार होती पण वास ..तो पूर्ण वाडाभर भरून राही. त्यांना नको म्हणावे, तर विचारत असत, कि आवडले नाहि का ? अन आवडले म्हंटले,कि मग घेत का नाहि ? सौजन्याच्या आडून तो एक तोंड दाबून .. सोरी .. तोंड भरून बुक्यांचा मार होता तो !
-पहाटवारा

नाखु's picture

10 Jan 2015 - 12:47 pm | नाखु

अनोखा मिक्स भाजी करण्याचा मान फक्त होस्टेल कँन्टीन आणि कंपनी कँन्टीन कडे जातो.

भेंडी-बटाटा.
बटाटा-वांगे-फ्लोवर रस्सा
ढोबळी-बटाटा वांगे वीथ शेवगा..

सौंदाळा's picture

13 Jan 2015 - 2:51 pm | सौंदाळा

कँटीनवरुन आठवले.
आमच्या कंपनीतले जुने लोक एक किस्सा सांगायचे...
एकाला कँटीनमधे एकदा आमटी भुरकताना आमटीत झुरळ दिसले. त्याने आकांडतांडव करुन कँटीनवाल्याला बोलवुन आणले. कँटीनवाल्याने ते आमसुल आहे सांगितले तर हा झुरळच आहे म्हणत होता. शेवटी कँटीनवाल्याने निर्विकारपणे ते उचलुन तोंडात घातले आणि चावुन चावुन आमसुल असल्याचे कन्फर्मेशन दिले आणि निघुन गेला.

सविता००१'s picture

13 Jan 2015 - 3:00 pm | सविता००१

अग आई ग्गं...........

एका पंचतारांकीत हॉटेलमधे कुठल्याश्या कॅनेडीयन कस्टमरला सूप पिताना त्यात झुरळ आढळलं. त्याने तक्रार केली तर मॅनेजरने शेफ ला बोलावलं. तो शेफ सरदार होता. ते झुरळ नसुन बडी इलायची आहे असं म्हणत सरदारजींनी सरळ ते खाऊन दाखवलं. त्याच्या बिझनेस कमिटमेण्टला ओळखुन कॅनेडीयन सरळ त्याला कॅनेडाला घेऊन गेला.

hitesh's picture

14 Jan 2015 - 8:13 am | hitesh

मी आईस्क्रीम माशी व बेदाणा अशी ऐकली आहे. या स्टोरीतला चाणाक्ष वेटर ताज हॉटेलातुन अमेरिकेला गेला

अन्या दातार's picture

13 Jan 2015 - 3:46 pm | अन्या दातार

यच्चयावत कँटीन्सचा नंबर विविध काँबिनेशन्स करण्यात लागावा.

मागे एकदा व्हेज बिर्याणी (पक्षी रंगी-'बेरंगी' भात) मध्ये उकडलेला बटाटा!!! अरे काय हे???

पैसा's picture

13 Jan 2015 - 3:55 pm | पैसा

मी लांजा इथे नव्वीन हाटेलात एकदा पुलाव मागितला तर मस्त हळद घातलेला पिवळाजर्द मसालेभात आणून दिला. म्हटलं हे काय, तर तो हाटेलवाला म्हणे की इथल्या लोकांना असाच आवडतो! =))

नाखु's picture

13 Jan 2015 - 4:10 pm | नाखु

गोंधळ असतोच.
सुमारे १२-१५ वर्षांपूर्वी बेंगलोरात कंपनी सहकार्याने सांगेपर्यंत "चाव्-चाव भात" म्हणजे गोड शिरा आणि उप्पीट एकाच प्लेटमध्ये (मिक्स करून नाही स्व तंत्र*)दिले जाते हेच माहीत नव्हते.मी बापडा नावावरून हा पदार्थ "चायनीज" *nea* *NO* *NO* असावा असा समज करून दुर्लक्षीला होता.
स्व तंत्र*) शब्दश्रेय : अनवट खादाडी सम्राट "बुवा"

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Jan 2015 - 9:05 pm | लॉरी टांगटूंगकर

चाव्-चाव भात नाही, चाउ चाउ बाथ

बॅटमॅन's picture

14 Jan 2015 - 6:14 pm | बॅटमॅन

चाउ चाउ बाथ

अनुभव! याला म्हंत्यात अण्भव!

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2015 - 1:52 am | प्रभाकर पेठकर

पुलाव पांढरा आणि पिवळा अशा दोन्ही प्रकारे करतात. पिवळा पुलाव करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर तो फोडणीचा भात दिसतो.

पिवळ्या पुलावात भाज्या, मटार आणि पनीर घालताना हळद नीट शिजलेली असावी नाहीतर हळदीचा पिवळा रंग भाज्या, मटार आणि पनीरला लागून त्यांचे 'वेगळेपण' उणावते.

किंचित पिवळा भात, शेंदरी रंगाचे गाजराचे तुकडे, हिरव्या रंगाचे मटार आणि फरसबीचे तुकडे, पांढर्‍या रंगाचे पनीर आणि वर भुरभुरलेली कोथिंबीर मोठी आकर्षक दिसते.

पैसा's picture

14 Jan 2015 - 10:05 am | पैसा

नवीन प्रकार कळला! आता लगेच पुढची मागणी. डिट्टेल रेशिपी द्या ना!

त्या हाटेलात पुलावात खास पुलाव मसाल्याचा पत्ताच नव्हता हो! आणि हळदीचा कच्चा वास पण येत होता. त्यामुळे जास्त वैताग आला. काहीतरी वेगळंच रसायन झालं होतं. निदान मसालेभात तरी नीट केला असता तरी आवडला असता!

प्रभाकर पेठकर's picture

14 Jan 2015 - 1:22 pm | प्रभाकर पेठकर

डिट्टेल रेशिपी द्या ना!

लवकरच.... *smile* :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2015 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती

खपलो, मेलो. =))

-दिलीप बिरुटे

अामच्या एक नातेवाईक आहेत.त्यांच्या घरी भीषण स्वयंपाक असतो.आणि तेच स्वतःच्या जेवणाची इतकी वाहवा करतात ते बघुन आपण अवाक्!त्यांनी एकदा रव्याची खीर नामक लगदा बचकन एवढा मोठ्ठा वाढला होता.माझा भाऊ तेव्हा लहान आणि त्यामुळे स्पष्टवक्ता होता.त्याने हा शिरा मला नको घाण लागतो म्हणून गळा काढुन पंचाईत केली होती.ती चवहिन खीर मग त्यांनी याची ताई खाते गोड म्हणून मला वाढला.त्या दिवसानंतर मी कधीही रव्याची खीर कम शिरा खाऊ शकले नाही.याच खाद्य शत्रुंनी एकदा रावणभात म्हणून भयानक प्रकार खाऊ घातलेला.त्यानंतर मात्र त्यांच्या घरी जावे लागले की मी मला याची अॅलर्जी आहे म्हणून सांगते ^_~

तिमांच लेखन पाहूनच फार आनंद झाला.
बाकि ताटात पडेल ते खायची सवय असल्याने सांगण्याजोगं काही नाही.

विवेकपटाईत's picture

10 Jan 2015 - 5:39 pm | विवेकपटाईत

एकदा लग्न झाल कि 'अन्न हे पूर्णब्रह्म' का म्हणतात याचा अर्थ आपसूक उलगडतो.

कुडाळला विट्ठल कामतमधे दगडी इडली आणि थंडगार सांबार अर्धा तास वाट बघून घ्या एकदाचे म्हणून निर्विकारपणे दिले होते. त्यानंतरच्या चहात किमान चार चमचे साखर घालून उकळला होता. पिऊन बघा म्हटलं तर बहुधा तोच चहा परत पाणी घालून आणून दिला होता.

विट्ठल कामत यांची खरी हॉतेल्स किती आहेत आणि फ्रँचाईसी किती आहेत देवजाणे. कदाचित हे असले खाणे फ्रँचाईसींमधे मिळत असावे.

हल्लीच आलेला आकुर्डी सीसीडीचा अण्भव असाच. एसी बंद, ऊन सगळ्या बाजूंनी भाजत होतं आणि त्याला मॅचिंग कोमट आणि वल्लीच्या भाषेत रूपहीन, रंगहीन, गंधहीन निर्विकार कापी. वल्लीने त्या कॉफीचा उद्धार तिथेच मोठ्याने केला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2015 - 11:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही आकुर्डीला आलात आणि चुकीच्या ठिकाणची कॉफी प्यायलात. सी.सी.डी. ला बोगस कॉफी मिळते. पुन्हा आलात की लिक्वीड बिस्त्रो ची कॉफी प्या. सी.सी.डी. बरिस्ता वगैरे वगैरे च्या तोंडात मारेल अशी चव आणि क्वांटीटी असते.
दुर्गा नामक फालतु प्रकाराच्या अजिबात नादी लागु नका. त्यांच्या आकुर्डी शाखेतल्या कॉफीपेक्षा पाणी घटट आणि चविष्ट असतं.

आजानुकर्ण's picture

14 Jan 2015 - 12:04 am | आजानुकर्ण

कुठंय हे लिक्विड बिस्त्रो?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 9:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी चौक माहिती आहे का? बिजलीनगरचा पुल ते संभाजी चौकादरम्यान डावीकडे आहे.

ह्यानिमित्ताने इथे कोल्ड कॉफी कुठे कुठे छान मिळते हे सांगुन ठेवतो.

१. कॅफे कुल (चतुश्रुंगी टेकडीच्या पार्किग पासुन सिंबिकडे येताना साधारण १०० मी. वर एक मोठ्ठा आईसक्रीम चा कोन दिसतो तिथे) कॉफी स्ट्रॉ नी पिता येत नाही अशी घट्ट आणि सविष्ट असते.

२. लिक्वीड बिस्त्रो (प्राधिकरण सेक्टर २८) वर दिलेल्या पत्त्यावर मस्त चवं आणि सजावट. शिवाय हँगिंग आउट स्पॉट म्हणुन पण मस्त आहे. अजुन इथे व्हेज आणि नॉन व्हेज सॅडविचेस मस्तं मिळतात.

३. चिल आउट कॅफे (हा आता चालु आहे का नाही माहित नाही. भारती विद्यापीठाची मागची बाजु पहिली बिल्डींग) ह्याच्याकडे कोल्ड कॉफी आणि कॉफी मॉकटेल्स मस्त मिळायची.

४. सिटी प्राईडच्या शेजारच्या बोळामधे एक छोटी टपरी आहे. नाव लक्षात नाही. त्याच्या कडे कॉफी मस्त आणि मस्ट असते.

५. वासु वडापाव सेंटर प्राधिकरण से. २६ ठिकठाक कोल्ड कॉफी मिळते.

६. एम.आय.टी. च्या जवळ फ्रुट ज्युस आणि कॉफीची मारामारी मिळते. कोणाला नावं आठवत असेल तर सांगा. एक मित्र खुप कौतुक करत असतो त्याचं.

अजुन यादी अपडेट करीन.

धागा बंडल खाद्यपदार्थांचा आहे की नाही? मग ही चिटींग आहे. आता सहा भंगार कॉफी मिळणारी ठीकाणे प्रायश्चित्त म्हणून टाका. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फक्त सहा? ठिके

१. सी.सी.डी.
२. बरिस्ता
३. दुर्गा (पुर्वी छान आता बोगस)
४. स्टारबक्स (एकदाच गेलोय, किंमती आणि त्या तुलनेनी मिळणारी चव आणि प्रमाण माझ्या गणितात बसत नाही.)
५. ऑल टाईम मस्ती (कोथरुड, हे अजुन चालु आहे का?)
६. कॅड (एम) कॅड (बी) (कॉफी साठी बोगस बाकी कॅड (एम आणि बी छान)
७. बर्गर बार्न

जिन्क्स's picture

14 Jan 2015 - 1:26 pm | जिन्क्स

"ऑल टाईम मस्ती" मध्ये कॉफी सोडुन बाकी पदार्थ खूप छान मिळतात. पिझ्झा, पास्ता, बर्गर्स खूपच छान असतात. पुण्यात असे indianised bread delicacies देणारे हॉटेल्स कमी आहेत ह्याचे वाइट वाटते.

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 10:22 am | टवाळ कार्टा

वासु वडापाव सेंटर >>>> =))

प्रभो's picture

14 Jan 2015 - 10:41 am | प्रभो

च्यामारी, एवढी सगळी नावं घेतली प्राधिकरणातली....नायडू आठवू नये (गरम) कॉफी साठी...? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 1:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्यायली नाही हो कधी. हे कुठे आहे? सांगीतलत तर ट्राय करीन.

कपिलमुनी's picture

14 Jan 2015 - 4:46 pm | कपिलमुनी

ते डोसा + कॉफी का हो ?

प्रभो's picture

14 Jan 2015 - 5:02 pm | प्रभो

नाही....नाही....
पावभाजी + पुलाव + मसाला पाव + गरम कॉफी.

कँप शाळेजवळ. HDFC बँक च्या कोपर्‍याला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 10:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्राय करीन. लोकमान्यकडे जाणारा रस्ता का संभाजी चौकाकडे जाणारा?

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 10:57 am | पिलीयन रायडर

राधिका आहे ना.. त्याच्या समोर बहुदा.. बरोबरे का हो प्रगो?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 1:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो ते होय. कँप एजुकेशन माझीचं शाळा आहे. मग माहीती आहे ही जागा. पण कधी खाल्लं प्यायलं नाहीये इथे =))

>> कॉफी स्ट्रॉ नी पिता येत नाही अशी घट्ट आणि सविष्ट असते.

सविष्ट ... श्शी!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 10:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चविष्ट!!!!

आजानुकर्ण's picture

14 Jan 2015 - 10:39 pm | आजानुकर्ण

संभाजीनगर माहिती आहे. माहितीबद्दल धन्यवाद.

सी.सी.डी. ला बोगस कॉफी मिळते

..त्रिकालाबाधित ज्वलंत सत्य !

hitesh's picture

14 Jan 2015 - 8:10 am | hitesh

चेंबुरच्या कामत हॉटेलातही कामत या अपेक्षेने गेलो होतो.भानिराशा झाली

मी-सौरभ's picture

13 Jan 2015 - 8:33 pm | मी-सौरभ

हे सगळे आण्भव पाहता. रेल्वे स्टेशन वर मिळणारा चहा नामक पदार्थ बरा वाटू लागलाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 12:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मॅगीचे डिसगस्टींग प्रकार कोणी कोणी खाल्लेत?

प्रकार १: (स्वीट कोफ्ता मॅगी)
मॅगी दुधामधे उकळुन त्यामधे कोफ्ते, वेलची आणि साखर घालुन खाणे. :O :O

प्रकार २: मॅगीची खिर

सगळं प्रमाणामधे घालुन ते मिश्रण प्रमाणाबाहेर उकळवणे. नुडलच्या दोर्‍याचं पिठलं व्हायच्या बेताला आलं की ते गिळगिळीत मिश्रण खायला घालणे.

वरचे प्रकार अनुक्रमे पुण्यामधल्या जंगली महराज रोडवरच्या एका प्रसिद्ध कॉलेजजवळच्या एका प्रसिद्ध घरगुती हाटेल कम मेस कम ब्लाऊज शिवायच्या दुकानात तर दुसरा प्रकार एस.एस.पी.एम.एस. च्या पार्किंग कम कँटीन कम अ‍ॅडमिसन ऑफिस ला मिळतो.

काळा पहाड's picture

14 Jan 2015 - 2:01 am | काळा पहाड

असे प्रकार पुण्यनगरीतच मिळू शकतात. बाय द वे, नाय काय म्हणालात त्या प्रसिद्ध घरगुती हाटेल कम मेस कम ब्लाऊज शिवायच्या दुकानाचं. एकदा टेस्ट करावीच म्हणतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 9:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

घरोबा किंवा पोटोबा असं काहीतरी आहे. बाकी पदार्थ छान मिळतात हे एक सोडलं तर.

त्यांच्याकडची वरणफळं बरीचं प्रसिद्ध आहेत.

पोटोबा ऐकलय कारण तिथे म्हणे फोडणीचा भातही मिळतो.

खटपट्या's picture

14 Jan 2015 - 12:05 am | खटपट्या

राजापूरच्या एसटी कँटीनमधे कोणी सकाळी नाश्टा केलाय का?
केला असल्यास माझ्यातर्फे नाश्टा केलेल्याचा जाहीर सत्कार करणेत येईल. (जाण्यायेण्याचे यष्टीचे तिकिट मिळेल)

सुबोध खरे's picture

14 Jan 2015 - 10:01 am | सुबोध खरे

आमचे शेजारी कुठूनतरी बेळगावी लोणी आणत आणि ते काढवून घरी तूप करीत असत. लोणी कढवायला घेतले कि सोसायटी भर वास "दरवळत" असे. त्यांच्या कडे जेवायचा प्रसंग आला तर आम्ही आवर्जून तूप घेणे टाळत असू.

सुबोध खरे's picture

14 Jan 2015 - 10:04 am | सुबोध खरे

काही दिवसांपूर्वी गुजरातेत उपलेटा नामक गावी जाण्याचा प्रसंग आला तेथील एका हाटेलात आम्ही व्हेज क्लियर सूप मागवले तर ते हॉट अण्ड साअर सूप सारखे दिसायला आणि चवीलाही होते. त्यांना आम्ही विचारले कि आम्ही व्हेज क्लियर सूप मागवले आहे त्यावर ते म्हणाले आमचे व्हेज क्लियर सूप असेच असते.

पिलीयन रायडर's picture

14 Jan 2015 - 10:59 am | पिलीयन रायडर

सॉल्ट नावाच्या एका हॉटेलात मशरुम-ब्रोकोली सुप मागवले तर चक्क कॉर्नफ्लॉअरच्या थिक पाण्यात एका ब्रोकोलीच्या तुर्‍याचे ४ तुकडे करुन आनी ५-७ मशरुमचे तुकडे (हे १५०/-) दिले.. म्ह्णलं कोणत्या जगात ब्रोकोली सुप असं बनवतात? शेवटी खुप बौद्धिक घेउन ते सुप परत दिलं आनी त्याचे पैसे देणार नाही म्हणुन सांगितलं..

मृत्युन्जय's picture

14 Jan 2015 - 11:24 am | मृत्युन्जय

आमचे व्हेज क्लियर सूप असेच असते.

हमारे यहा ऐसेइच मिलता हय यावरुन खालील प्रसंग आठवला. माझ्याच एका धाग्यातुन घेतलाय - एकापेक्षा एक

************************************************************************************************
स्थळ: पुणे. मध्यवस्तीतले आता बंद पडलेले एक उडुपी उपाहार गृह

" १० चीज बर्गर द्या हो" ( मास्तरच्या पैशाने खायला मिळते आहे तर का सोडा या सदसदविवेकबुद्धीने पार्सल घ्यायाला आलेला एक यडचाप तरुण. एरवी गपगुमान हातगाडीवरचा वडापाव खाणार. पण फुकट मिळतय तर "आम्ही ब्वॉ रोज चीज बर्गरच खातो") (मीच तो. मीच तो. )

"थोडा रुको. अभी देता है"

१५ मिनिटांनतर "देताय ना. उशीर होतो आहे"

" बन ला रहा है. रुकिये ५ मिनिट सिर्फ" (उशिर होतो आहे म्हटल्यावर रुको च रुकिये झाले होते आता. थोड्यावेळाने तो "स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार." असेही म्हणाला)

हे बन ला रहा है प्रकरण मला काही झेपले नाही. इथे काय बर्गरची ऑर्डर मिळाल्यावर जवळच्या बेकरीतुन बन आणायला पळतात का?

अजुन १० मिनिटांनी " किती वेळ लागेल अजुन?"

"क्या स्सर?" (आता याला मराठी कळेनासे पण झाले. बोलता तर आधीपासुनच येत नव्हते)

"कितना टाइम लगेगा? अर्धे घंटेसे वाट बघ रहा हू मै. अभी क्या चीज लावोगे क्या?"

"स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार."

अजुन १० मिनिटानी मरो ते बर्गर म्हणुन उठु पाहणार्‍या माझ्या हातात १० बर्गर शेवटी एकदाचे कोंबले गेले.

मी धावत पळत ऑफिसला गेलो. एव्हाना मास्तरचे ४ फोन आले होते (हापिसात गेल्यावर काय रे गाय पकडुन तिचे दूध काढुन त्याचे चीज करुन घेउन आलास काय? असे ऐकायला लागले ते वेगळे)

बर्गरचे खोके उघडल्यावर अस्मादिकांच्या लक्षात आले की अरेच्चा यात तर कटलेटच नाही. फक्त चीजच आहे. (बनसुद्धा बनपावाचा बन होता हो).

चरफडत अखेर ते तसेच खाल्ले. परत जाउन घेउन येण्याइतकी भूक कोणाला धरवत नव्हती. बर्गर (सॉरी चीज बन) खाता खाता सगळे मला शिव्या घालत होते.

हा अपमान असह्य होउन मी एक बाणेदार पुणेकर तडक त्या मद्राश्याच्या हॉटेलात जाउन धडकलो.

"तुम्हारे बर्गर मै कटलेट नही था"

"ऐसा हो ही नही सकता"

"मग मी काय खोटे बोलतोय का?" रागवताना इनोदी हिंदी नको म्हणुन मी सुंबडीत मराठीवर आलो.

त्यावर २ मद्रासी एकमेकांशी अगम्य भाषेत यंडु गंडु पांडु नारु सारु असे काहिसे बोलले आणि मग तिसराच बाबा माझ्याकडे आला.

"क्या हुआ सर?"

एव्हाना रागावर नियंत्रण मिळवलेला मी त्याला सर्व डिटेलात सांगण्याच्या मुडात आलो होतो. सगळे ऐकुन त्याच्या चेहर्‍यावर "देयर यु आर" असे भाव आले:

"चीज बर्गर मे कटलेट नही होता है सर? व्हेज बर्गर मे होता है. आपने चीज बर्गर लिया था ना? तभी तो."

"चीज बर्गर मध्ये कटलेट नसते? काहितारी काय? सगळीकडे मिळते"

"नही सर इटली मे भी ऐसेहीच रहता है"

"इटलीत पिझ्झा मिळतो. बर्गर नाही"

" हा. पर हमारे यहा बर्गर ऐसेही मिल्ता है"

"अर्रे तुम कल बर्गर मे शेपुकी भाजी डाल के दोगे और बोलोगे हमारे यहा ऐसेहीच मिलता है. ऐसा थोडेही ना होता है?" (माझ्या चेहर्‍यावर क्षणभर गड सर केल्याचे भाव होते. क्षणभरच राहिले)

"हमारे यहा शेपुकी भाजे नही डालते बर्गर मे" म्यानेजर ने तेवढ्याच मख्खपणे सांगितले.

यानंतर त्या **** शी भांडण्याचे त्राण अंगात नसल्याने आणि असाही तो बर्गर फु़कटच असल्याने (माझ्यासाठी. दिडक्या मास्तरने मोजल्या होत्या ना), मी हताशपणे चालता झालो. जाताना "ऐसा करोगे तो हॉटेल बंद हो जायेगा जल्दी ही" असे म्हणायला विसरलो नाही. माझी शापवाणी खरी ठरली. थोड्याच वर्षात हॉटेलचा बाजार उठला. आता तिथे एक कॅफे दिमाखात उभा आहे. पण अजुनही त्या जागेत जायचे धैर्य होत नाही मला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 1:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

बॅटमॅन's picture

14 Jan 2015 - 6:17 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

जेपी's picture

14 Jan 2015 - 11:27 am | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री. तिमा आणी कप्तान चिमणराव यांचा सत्कार एक एक मिसळ देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते

नाखु's picture

14 Jan 2015 - 12:46 pm | नाखु

कुठली ते सांगा म्हंजे जोर्दार अणुमोदनाचं ठरेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 1:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद. कुठे कधी? =))

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2015 - 1:13 pm | टवाळ कार्टा

ती फ्लेक्ष वाली मिसळ हाय...फक्त फ्लेक्ष वरच असते =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jan 2015 - 1:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फ्लेक्स वरची मिसळ असायला जेपी काय पुणे (३०) मधले आहेत का? आता म्हणले म्हणजे देणार ते =))...तुला पण देतील पटवुन देण्यासाठी. =))

ठाण्यातील मामलेदारची मिसळ देण्यात येईल *blum3* अर्थात आमचा मिरचीच खळ संपवुन येतो. *wink* =))

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा

चला...आणखी येक ठाणे कट्टा होणार मग :)

श्रीगुरुजी's picture

14 Jan 2015 - 10:44 pm | श्रीगुरुजी

पुण्यात मार्केटयार्ड रस्त्यावरील "वाडेश्वर" अत्यंत बोगस हॉटेल आहे. तिथे ईडली सोडून उरलेले सर्व पदार्थ अत्यंत बेचव आहेत. २-३ वेळा वेगवेगळ्या वेळी जाऊन वेगवेगळे १०-१२ पदार्थ ट्राय केले होते. प्रत्येकवेळी तोच वाईट अनुभव आला.

यमन's picture

15 Jan 2015 - 11:25 pm | यमन

२-४ वेळा तोंड फोडून घेतल्यावर आता जात नाही .त्या पेक्षा मार्केट यार्ड मधलं हमाल कॅन्टीन बरंय राव !!