नक्की किती पैसे पुरेसे?

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
30 Dec 2014 - 11:49 am
गाभा: 

नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.

तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

12 Jan 2015 - 12:46 pm | प्रसाद१९७१

एखादा माणूस शेती करायला जात असेल (यात तुमची गुरे वळणे सुद्धा आले),

पैसा ताई, इथे मला गुरे हाकणे म्हणजे ऑफिस मध्ल्या माणसांना कामाला लावणे हा अर्थ होता.
आणि माझ्या मते, खरी गुरे हाकणे हे कदाचित जास्त अवघड काम असेल

पैसा's picture

12 Jan 2015 - 7:05 pm | पैसा

ओके! पॉइंट लक्षात आला नव्हता. आयायटीत शिकलेल्या माणसाने आयटीत किंवा बँकेत काम करणे म्हणजे अपव्यय आहे खराच!

क्लिंटन's picture

12 Jan 2015 - 8:34 pm | क्लिंटन

आयायटीत शिकलेल्या माणसाने आयटीत किंवा बँकेत काम करणे म्हणजे अपव्यय आहे खराच!

भारतात विद्यार्थी पहिल्यांदा इंजिनिअर होतात आणि नंतर त्यांना काय करायचे आहेत याचा विचार करतात ही परिस्थिती आहे तोपर्यंत असा अपव्यय चालूच राहणार.अगदी आय.आय.टी मधल्या इंजिनिअरांना इतरांपेक्षा डोके बरे असले तरी या बाबतीत इतर इंजिनिअरांपेक्षा फार वेगळे नाहीत हे नक्कीच.

जर का सगळ्यांना त्यांची आवड नक्की कशात आहे हे कळले आणि त्या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली तर भारताचे जीडीपी चीनच्या तोंडात मारेल इतक्या वेगाने वाढेल हे नक्कीच.

हल्ली मिपावर कौल घेता येत नाही नाहीतर इथल्या इंजिनिअरांचा कौल घेऊन किती जणांना त्यांच्या मुळातल्या शाखेची (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इत्यादी) खरोखरच आवड अजूनही आहे आणि त्या शाखेला प्रवेश घेण्यापूर्वी त्या शाखेत काय असणार आहे याची निदान थोडीशी ओळख आणि आपल्याला नक्की कशाचा अभ्यास करायचा आहे याची माहिती होती का हा कौल घेतला तर कसे निष्कर्ष येतील याचाच विचार करत आहे :)

(इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर बर्‍याच वर्षांनी आपल्याला नक्की काय करायचे हा विचार करू शकलेला एक नंबरचा बत्थड इंजिनिअर) क्लिंटन

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2015 - 8:59 pm | टवाळ कार्टा

मला मी करतो ते काम आवडते :)

कपिलमुनी's picture

12 Jan 2015 - 9:14 pm | कपिलमुनी

मला आवडता म्हणून मी काँप्युटर इंजिनीयर झालो आणि अजूनही (८ वर्षांनी ) मला माझे काम फार आवडते . टीम मॅनेजमेंट , डॉक्युमेंटेशन , क्लायंट कम्युनिकेशनपेक्षा प्रोग्रामिंग जास्त आवडते आणि ३ इडियटस बघूनही माझ्या मतात फरक पडला नाही

चित्रपट पाहिल्याबरोबर माझ्या काही मित्रांना दिव्य साक्षात्कार झाले होते ;)

रेवती's picture

12 Jan 2015 - 9:56 pm | रेवती

मी पण.

अर्धवटराव's picture

12 Jan 2015 - 10:06 pm | अर्धवटराव

थ्री इडीयट्सचा फंडा आपल्या जागी बरोबर आहे. पण मला नेमकं उलटं वाटतं... माणसाने आपला बिझनेस आणि आवड शक्यतो वेगवेगळी ठेवावी. बिझनेसमधे थंड डोक्याने फक्त रिझल्ट बघावा व छंद जोपासताना उत्कटतेने फक्त काम बघावं.

प्रसाद गोडबोले's picture

5 Jan 2015 - 2:20 pm | प्रसाद गोडबोले

बर्‍याच जणांना वेळेआधी निवृत्त व्हायचे आहे

अधिकाधिक कर्तृत्व दाखवून विजिगिषु वृत्तीने जगण्याची भारतीयांची उमेद खचत चालली आहे का ?

आज आम्हा भारतीयांची ही स्थिती आली आहे का ?

>>> मी अजुनही थोडासा फिलॉसॉफीकल डायलेमा मध्ये अडकलोय विटेकर बुवा .
लोकमान्य टिळक गीतारहस्य मध्ये म्हणतात की गीता कर्मपरच आहे प्रवृत्तीपरच आहे ... निष्काम भावनेने कर्म करत रहाणे हाही मोक्षच आहे ... यत्स्थानं प्राप्यते सांख्यै: तद्योगैरपि गमत्ये ||
पण आचार्य म्हणतात की "चित्तस्य शुध्दये कर्मः " कर्म केवळ चित्त शुध्दी करिता आहे , निव्वळ कर्माने मोक्ष प्राप्ती होणार नाही .
परवाच , शनिवारी , एका स्वामींना भेटलो तेही तेच म्हणाले की ""नुसते कर्म करत राहुन मोक्ष कसा मिळवणार , कर्म केलेच पाहिजे , जोरदार कर्म करुन अवघाचि सम्सार सुखाचा करुन दाखवला पाहिजेच पण .... पण कुठे थांबायचे हे कळाले पाहिजे योग्य वेळ आली की सार्‍याच्या त्याग करुन ह्यातुन बाहेर पडा " ...

आता ह्यातील नक्की योग्य मार्ग कोणता हे एकदा १००% कन्फर्म झाले की बाकीचे सोप्पे आहे :)

तुर्तास मी ९९.९% टिळकांच्या मताच्या बाजुला झुकलेलो आहे , गीता , इशोपनिषद , रादर मी वाचलेले प्रत्येक 'वैदिक' साहित्य निश्काम कर्म करत रहाणे हाच मोक्ष असा संदेश देत आहे माझ्या मते .... आता उअरलेला ०.१% कन्फ्युजन क्लीयर झाले सुटलो :)

विजुभाऊ's picture

5 Jan 2015 - 5:01 pm | विजुभाऊ

व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार !
शेअर बाजारात असलेली मंडळी तरी असा काय वेगळे दिवे लावत असतात. ते नुसत्या व्याजावर नाही तर सट्टेबाजीवर जगत असतात.
अवांतरः शेअर बाजार गुंतवणूक करणारी कुणीही मंडळी त्या कंपनीचे काम वाढेल त्यांचे प्रॉफिट वाढेल मला अधीक डिव्हीडन्ट मिळेल या भाबड्या अपेक्षेने शेअर घेत नाहीत. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणारे भांडवल उपलब्ध करून देतात हे कारण कोणी देत असेल तर ब्यांकेत व्याजावर ठेव ठेवणारे लोक देखील ब्यांकेला भांडवलाचा पुरवठा करतात हे लक्षात घ्यावे.

प्रसाद१९७१'s picture

5 Jan 2015 - 10:35 am | प्रसाद१९७१

असे असेल तर भारत म्हणून ही स्थिती चिंताजनक वाटते ! व्याजावर जगणारी नोन- प्रोडक्टीव लोकांची अधिकाधिक संख्या म्हणजे समाजावरील वाढ्णारा भार ! शिवाय समाजाच्या पैशाने मिळवलेली स्किल सेट्स वाया जाणार हे ही एक नुकसानच !

स्वीडन कींवा जपान ला हा प्रॉब्लेम असु शकेल पण भारतात नक्कीच नाही. उलट दुसर्‍या लोकांना जॉब मिळेल

क्लिंटन's picture

5 Jan 2015 - 10:41 am | क्लिंटन

स्वीडन कींवा जपान ला हा प्रॉब्लेम असु शकेल पण भारतात नक्कीच नाही. उलट दुसर्‍या लोकांना जॉब मिळेल

दरवेळी असे जॉब मिळालेले दुसरे लोक तितक्याच कुवतीचे असले तर फार काही तक्रार करण्यासारखे नाही. पण भरपूर पैसे मिळवायचे आणि नंतर केवळ व्याजावर जगायचे हा प्रकार कुठल्यातरी क्षेत्रात खूपच एन्टरप्रायझिंग लोक असतील तेच करू शकतील (लॉटरी लागलेले वगळता). एखादा फुंगसूख वांगडू आपल्या शोधांच्या जोरावर भरपूर पेटन्ट मिळवून श्रीमंत झाला आणि नंतर काही न करता नुसता बसला तर त्या प्रतिभेचा दुसरा फुंगसूख वांगडू त्याची जागा घ्यायला मिळाला नाही तर समाजाचे नुकसान नाही का?

प्रसाद१९७१'s picture

5 Jan 2015 - 2:27 pm | प्रसाद१९७१

@क्लिंटन - तुम्ही वादासाठी वांगडू चे टोकाचे उदाहरण दिले आहे.

इथे जे माझ्यासारखे सामान्य माणसे निवृत्तीची इच्छा धरुन आहेत त्यांच्या कडे काही फार भारी स्कील वगैरे नाहीत ( कोणाला वाटत असेल की त्यांच्याकडे आहेत तर त्यांनी इग्नोर मारा ). मला रीप्लेस करायला पैशाला पाच माणसे मिळतील भारतात.

आणि ज्यांच्या कडे कुवत आहे ते कशाला निवृत्तीची भाषा करतील?

क्लिंटन's picture

5 Jan 2015 - 2:53 pm | क्लिंटन

@क्लिंटन - तुम्ही वादासाठी वांगडू चे टोकाचे उदाहरण दिले आहे.

अहो ती फार जुनी सवय आहे माझी :) (कळफलकावर वाय च्या शेजारीच टी असल्यामुळे चुकून "फार जुनी सवत आहे माझी" असे लिहिणार होतो :) )

आणि ज्यांच्या कडे कुवत आहे ते कशाला निवृत्तीची भाषा करतील?

हिरव्या देशातील मिपाकरांना अगदी पटेल असे उदाहरण देतो.कुठेही मॉल किंवा वॉलमार्टमध्ये गेल्यावर अ‍ॅमवेवाले पिडायला आले नाहीत असे सहसा होत नाही.काही काळ मी पण त्या जाळ्यात अडकलो होतो आणि त्यांच्या दोन कॉन्फरन्सेसही बघितल्या होत्या.त्यात एका कॉन्फरन्समध्ये चांगले एम.आय.टी चे पी.एच.डी असलेले लोक मला "फायनान्शिअल फ्रिडम" हवे आहे आणि मी वयाच्या ४५ च्या आत निवृत्त होणार आहे असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगताना बघितले होते.भरपूर पैसे मिळावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते तेव्हा "फायनान्शिअल फ्रिडम" हवे असल्यास त्यात काहीच गैर नाही.पण लाखांमधून एकाला पी.एच.डी ला प्रवेश देणार्‍या (आणि पी.एच.डी क्वालिफायर परीक्षांमध्ये एक तृतीयांश विद्यार्थ्यांना नापास करणार्‍या) एम.आय.टी मधून यशस्वीरित्या पी.एच.डी घेऊन बाहेर पडलेली मंडळीही वयाच्या ४५ वर्षाच्या आत निवृत्त व्हायचे स्वप्न बघतात तेव्हा असे लोकही या जगात असतात हे बघून खरोखरच वाईट वाटते. त्याच कॉन्फरन्समध्ये मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमधील चार सर्जन अ‍ॅमवेमधून भरपूर पैसे कमावून कसे निवृत्त झाले याच्याही कहाण्या ऐकल्या होत्या.आता बोला.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2015 - 5:21 pm | श्रीगुरुजी

>>>

त्यात एका कॉन्फरन्समध्ये चांगले एम.आय.टी चे पी.एच.डी असलेले लोक मला "फायनान्शिअल फ्रिडम" हवे आहे आणि मी वयाच्या ४५ च्या आत निवृत्त होणार आहे असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगताना बघितले होते.

त्याच कॉन्फरन्समध्ये मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमधील चार सर्जन अ‍ॅमवेमधून भरपूर पैसे कमावून कसे निवृत्त झाले याच्याही कहाण्या ऐकल्या होत्या.आता बोला.

अहो, हे खरं नसतं. नवीन मासे गळाला लावण्याकरीता अशा कॉन्फरन्स मॅनेज केलेल्या असतात. अ‍ॅम्वे किंवा तत्सम नेटवर्क मार्केटिंग प्रकारात काम करून आपण कसे प्रचंड पैसे कमावतो हे मुद्दामहून सांगितलं जातं जेणेकरून कॉन्फरन्सला आमंत्रित केलेल्या नवोदितांना भुरळ पडून ते यांच्या कळपात सामील होतील.

मी काही वर्षांपूर्वी "सिम्बियॉनिक मार्केटिंग" नावाच्या अशाच टोळक्याच्या कॉन्फरसला उपस्थिती लावलेली होती. उपस्थितांपैकी ७५ टक्के हे आधीच सभासद झालेले होते. संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये आधीच ठरविलेले प्रश्न विचारणे, नेमक्या ठिकाणी टाळ्या वाजविणे, "वॉव"/"ग्रेट्"/"अमेझिंग्"/"ऑसम्"/"अनबिलिव्हेबल" असे मोठ्यांदा उद्गार काढणे, नंतर काही सभासदांनी स्टेजवर जाऊन स्वतःचे अनुभव सांगून आपण थोड्या कालावधीत किती प्रचंड पैसे कमावले आणि मी आता पूर्णवेळ हेच काम करतो असे सांगणे हे सर्व मॅनेज केलेले प्लॅनिंग होते. सुरवातीला ५०,००० रूपये भरून त्यांचे काहीतरी प्रॉडक्ट घ्यायचे (म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप, हॉलिडे प्लॅन, फर्निचर इ.) आणि नंतर आपल्यासारखेच ५०,००० रू. गुंतविणारे अजून ३ सभासद आणले की तुम्हाला पुढील प्रत्येक व्यवहारात ५-६ टक्के कमिशन मिळायला सुरूवात होणार अशी काहीतरी योजना होती. सुरवातीला ५०,००० रूपये घालवून ज्या वस्तू मिळायच्या त्याची प्रत्यक्ष बाजारातली किंमत १५-२० हजार रूपयेच असायची. म्हणजे सभासद झाल्यावर तुमचे ३०-३५ हजार रूपये अक्कलखाती गेलेले असायचे. ते परत मिळविण्याकरीता आपल्यासारखे ३ बकरे शोधायचे आणि त्यांच्या बलिदानातून आपले गेलेले पैसे परत मिळवायचे या हेतूने फसलेले बकरे जिवापाड प्रयत्न करीत होते. आणि त्यासाठीच नवीन बकरा बळी मिळावा यासाठी ती कॉन्फरन्स होती व मॅनेज केलेल्या प्रेझेंटेशनमधून नवोदितांना भुलविण्याचा व त्यातून आपले दगडाखाली अडकलेले हात मोकळे करण्याचा तो प्रयत्न होता.

तुम्ही अटेंड केलेल्या कॉन्फरन्समधील काही जण आपण भरपूर पैसे कमावून कसे निवृत्त झालो आहोत्/होणार आहोत हे सांगणे म्हणजे असाच नवोदितांना भुलविण्याचा प्लॅन होता. त्यामुळे तो अजिबात गंभीरतेने घ्यायची आवश्यकता नाही.

विटेकर's picture

5 Jan 2015 - 2:55 pm | विटेकर

@ प्रगो,
१.कुठे थांबायचे हे देखील धर्मानेच सांगितले आहे. अर्थ आणि काम हे प्रवाह धर्म आणि मोक्ष याच्या सीमेच्या आतच चालले पाहीजेत. लहान बाळ पोट भरले की आईने कितीही प्रभाव टाकला तरी तोंड फिरवते. गरजेपेक्षा जास्त ही आसक्ती ! .. तेन त्यक्तेन भुंजिता!
२. जीवनाचे अंतिम ध्येय हे मोक्षच आहे यात निवृत्तीपर अथवा कर्मप्रधान या दोन्ही विचारधारामध्ये अजिबात संदेह नाही. तो मिळवायचा कसा याबाबत काही सूक्ष्म मतभेद आहेत.
३. पैकी आचार्यानी ज्या पद्धतीने वेदान्त मांडला त्याचे कारण फारच भिन्न होते. त्यांना समाजात निर्माण झालेली पराकोटीची भोगललसा आणि निरिश्वरवाद मोडून काढायचा होता. जैन आणि बौद्ध तत्वाज्ञान मोडून काढणे ते ही शक्य तितक्या कमी वेळात ! हे एकमेव ध्यय होते. सनातन वैदीक धर्म संकटात होता. आणि म्हणून आचार्यांनी आपली सारी प्रतिभा आणि तपःश्चर्या धर्म वाचविण्यासाठी आणि अद्वैतमत प्रस्थापित करण्यासाठी पणाला लावली.
४. आचार्य स्वतः जर निवृतीमार्गी होते तर कालाडी ते केदारनाथ आणि चारी ठिकाणी मठ स्थापना करण्याची उठाठेव त्यांनी का केली?
५. आचार्यांनी धर्माची लवचिकता वापरून सनातन धर्माची सार्वकालिकता सिद्ध केली एवढाच मी त्याचा अर्थ घेईन. एक अट्ळ आपद धर्म म्हणून जाणून बुजून स्वीकारलेली ती भुमिका होती.
६. कर्म करावे की वेळ हरिचिन्तनात व्यतित करावा याचे उत्तर टिळकमहाराजांनी दिलेच आहे. पुनुरुक्तीचा दोष स्वीकारुन लिहीन की ,

आसक्ती विरहीत केलेले कर्म हे हरिचिंतनच आहे.

जसे भगवान गीतेत म्हणतात- मला मिळावायचे आहे असे काहीच नाही ! समर्थ म्हणतात देह आहे तोपर्यन्त देहबुद्धी आहे आणि म्हणून सगुण उपासना आहे म्हणजे संतोषवावी कोणीतरी काया ! म्हणजेच कर्म करा !
आचारधर्माचे नीट पालन केले तर हे प्रश्न पडत नाहीत. धर्माची कास सोडून मोक्षाकडे लक्ष न ठेवता केवळ चार्वाक वृत्तीने अर्थसाधना केली की समाज पौरुषहीन होतो आणि म्हणूनच मी म्हणालो की अधिकाधिक लोक वेळेआधी निवृती घेत असतील तर तो समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने फारसे हितकारक नाही.
जसा आचार धर्म तसाच आश्रम धर्म ! ग्रूहस्थाश्रमाचे पालन करण्याऐवजी २४ पैकी १८ तास जर अर्थार्जनात घालवले तर वानप्रस्थ लवकर घ्यायची पाळी येणारच ना ?
असो , तुमच्या ०.०१% कन्फुजन मुळे माझे थोडेसे चिन्तन झाले. धन्स !

प्यारे१'s picture

5 Jan 2015 - 3:35 pm | प्यारे१

छान प्रतिसाद विटेकर साहेब.

प्रसाद गोडबोले's picture

5 Jan 2015 - 4:22 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्या ०.०१% कन्फुजन मुळे माझे थोडेसे चिन्तन झाले

पण माझे ०.०१% कन्फ्युजन अजुनही आहेच ...

जर कर्म हाच मोक्ष असेल तर निवृत्ती घेण्याचा प्रश्नच येत नाही , अखंड अविरत कर्म करत रहाणे हीच साधना आणि नैष्कर्म्यता हीच सिध्दी :)

आणि जर कर्माने मुक्ती मिळणारच नसेल तर "लटिका व्यव्हार सर्व हा संसार " असे म्हणुन ह्या संसाराचा मलवत त्याग करुन ( अर्थात ज्यांना जमेल त्यांनीच ) बाहेर पडणेच श्रेयस्कर !!

पण कृष्ण तर स्पष्ट पणे सांगतोय की
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः । कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥6-46.
सध्या महाभारत वाचत आहे त्यातही "गृहस्थाश्रमच सर्वश्रेष्ट आहे" अशा अर्थाचे २-३ श्लोक सापडलेत ...

महाभारत/गीता स्पष्टपणे कर्मयोगी होण्याचा उपदेश देत असताना निवृत्ती घेण्याचा संन्यास घेण्याचा विचार आचार्य , माऊलीं वगैरे बर्‍याच साधुसंत लोकांनी का बरे मांडला असेल ? ह्या प्रश्नाचे उत्तर १००% गवसत नाही ... ( अष्टावक्रगीतेचा प्रभाव कारणीभुत असेल काय असे मनात येते )

असो .

अवांतर : आपला प्रतिसाद वाचताना अचानक समर्थांचा हा श्लोक आठवला
"आधी करावे ते कर्म | कर्ममार्गी उपासना | उपासका सापडे ज्ञान | ज्ञाने मोक्षचि पाविजे || "

मन:पुर्वक धन्यवाद :)

प्रसाद गोडबोले's picture

5 Jan 2015 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले

अतिअवांतर :

अर्थ आणि काम हे प्रवाह धर्म आणि मोक्ष याच्या सीमेच्या आतच चालले पाहीजेत

ह्या पेक्षा अर्थ आणि काम ह्यांच्या प्रवाहांना सामावुन घेईल इतकी धर्म आणि मोक्षाची सीमा विस्तारली पाहिजे :)
ह्या वर चर्चा होवु शकते पण ते अति अवांतर असल्याने इथे टाळत आहे . पुढे मागे कोठे तरी नक्कीच बोलुयात ह्यावर जर आपली इच्छा असेल तर :)

अर्धवटराव's picture

6 Jan 2015 - 11:51 pm | अर्धवटराव

निवृत्ती म्हणजे "कर्म न करणे" नसुन कर्मातुन "स्व" वगळणे आहे. कर्मत्याग असंभव आहे. माऊली तर समाधी अवस्थेतुन अजुनही कर्मरत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

7 Jan 2015 - 2:44 pm | प्रसाद गोडबोले

इथे नोकरीतुन निवृत्ती अर्थात रीटायरमेन्ट असा अर्थ अपेक्षित होता .

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2015 - 4:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

१.कुठे थांबायचे हे देखील धर्मानेच सांगितले आहे. अर्थ आणि काम हे प्रवाह धर्म आणि मोक्ष याच्या सीमेच्या आतच चालले पाहीजेत. लहान बाळ पोट भरले की आईने कितीही प्रभाव टाकला तरी तोंड फिरवते. गरजेपेक्षा जास्त ही आसक्ती ! .. तेन त्यक्तेन भुंजिता! या जगाची सर्वात मोठी समस्या ही आहे की... बाळ जसजसे मोठे होते तसतसे त्याचे पोट वयाच्या अनेक पटींत मोठे होत जाते... आणि काहींचे कितीही खाल्ले तरी कधीच पोट भरत नाही. त्यामुळे तोंड फिरवणे सोडाच, पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! :) :(

विटेकर's picture

5 Jan 2015 - 5:31 pm | विटेकर

पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! SmileSad
१००% बाडीस !
आणि मग अशा लोकांना धर्माच्या कक्षा रुंदावून हव्या असतात ! ( प्रगो , हलके घ्या )

प्रसाद गोडबोले's picture

5 Jan 2015 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले

प्रगो , हलके घ्या

>>>

:)

अगदी हलके घेतोय :)

लवचिकता नसलेल्या धर्मांची काय अवस्था होते हे पाहुन आलोय मी !

:)

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jan 2015 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

अनिश्चितता नावाचा फॅक्टर हा सगळी गणीते कोलमडुन टाकतो.अर्थात म्हणुन नियोजन करायचेच नाही असे नाही. पण नियोजनाच्या नावाखाली भविष्याची अधिक चिंता केली तर वर्तमानाचा आनंद पण गमावण्याची शक्यता असते.

कपिलमुनी's picture

5 Jan 2015 - 4:49 pm | कपिलमुनी

रीटायरमेंट साठे १ कोटी corpus तयार करा असे एका कॉन्फरन्स मधे सांगितले . बर्‍याच साईट्वर पण हाच आकडा दिसतो.
सध्या ३० वय आहे तर ५५ पर्यंत एव्ढे जमा करायचे अवघडच आहे .

त्या पेक्षा दुसरा एखादा जॉब किंवा स्किलसेट शोधलेला बरा !

प्रसाद१९७१'s picture

5 Jan 2015 - 4:51 pm | प्रसाद१९७१

हे एक कोटी आत्ताचे आहेत. तुम्ही ५५ वर्षाचे होइ पर्यंत ५० कोटी साठवायला लागतील

अनुप ढेरे's picture

5 Jan 2015 - 5:29 pm | अनुप ढेरे

एग्झॅक्टली!
पण ५० कोटी नाही, आजच्या १ कोटींची गरज भागवायला अजून २५ वर्षांनी साधारण १० कोटी लागतील. (दरवर्षी १०% वाढ)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2015 - 5:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांनी तुम्हाला "तुमचं होरायझन काय असं नाही विचारलं का ?" corpus ची किंमत होरायझन-(क्षितीजा-)वर अवलंबून असते असं म्हणतात. पण आमच्या मते corpus ची किंमतच होरायझन असते... आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे होरायझन (क्षितीज) अजून पुढे पुढे जात राहते :)

तेव्हा १ कोटीची माया ही केवळ माया आहे असेच समजा. कारण १ कोटीच्या जवळपास पोचल्यावर तुम्हाला होरायझन {तुमच्या कल्पनाशक्तीच्या (कधी कधी याला greed असे पण म्हणतात) आवाक्यावर अवलंबून} २ ते ५ कोटीच्या मध्ये कोठेतरी किंवा त्यापलिकडे आहे असे दिसू लागेल ;)

कपिलमुनी's picture

5 Jan 2015 - 6:40 pm | कपिलमुनी

त्यांच्या म्हणन्याअनुसार १ कोटीचे वार्षिक व्याज ८ लाख - ९ लाख येइल त्यामध्ये तुम्हाला मध्यमवर्गीय आयुष्य जगता येइल. महिना ७०-७५००० रु खर्च.
त्यात महागाई , रु. ची घसरती किंमत ईई गणिते होती

टवाळ कार्टा's picture

6 Jan 2015 - 9:02 am | टवाळ कार्टा

चायला १ कोटी १ वर्षांत कसे कमवावे? (दुसर्याला न फसवता)

काळा पहाड's picture

6 Jan 2015 - 12:19 pm | काळा पहाड

मी सांगतो ना. माझ्याकडून मॅग्नेटीक गादी घेता का? किंमत फक्त १ लाख रुपये. मग ३ खरेदीदार शोधा आणि करोडपती व्हा.

कपिलमुनी's picture

6 Jan 2015 - 2:51 pm | कपिलमुनी

एका वर्षात कशाला ट्का ?
ज्या वर्षी रीटायर व्हायचा असेल त्या वेलेस हवे असे काही जाणकारांचे (?) मत होते.

अनुप ढेरे's picture

6 Jan 2015 - 3:09 pm | अनुप ढेरे

तुम्ही आज ५५चे असाल आणि अजून ३० वर्षं व्याजावर जगायला लम्पसम क्ष रुपये लागत असतील.
पण तुम्ही आज ३०चे असाल, आणि ५५ ला निवृत्त होऊन पुढे ३०वर्ष जगणार असाल तर तुम्हाला ५५व्या वर्षी साधारण १०क्ष लागतील.

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 9:38 am | टवाळ कार्टा

चायला तरी पण कसेबसे जमतील :(

टवाळ कार्टा's picture

7 Jan 2015 - 9:38 am | टवाळ कार्टा

"?" हे टाकायला विसरलो :(

सुधीर's picture

11 Jan 2015 - 10:38 am | सुधीर

निवृत्ती म्हणजे काम सोडून आराम करत पडून राहणं ही कवीकल्पना आहे. निवृत्तीनंतर नक्कीच काहीतरी प्रॉडक्टीव्ह करता येऊ शकतं, कशाततरी मन रमवता येतं. मनही रमेल आणि अर्थार्जनही होईल अशा नव्या वाटा शोधता येतात. रोजीरोटीमुळे जे करणं अगोदर शक्य नव्हतं. अशीच एक वाट आपणही चोखाळाल यात शंका नाही.

माझ्या स्वानुभवावरून मी असं म्हणेन,
दर वर्षाच्या सुरुवातीला १०,०००/- च्या (महिन्याला जितके पैसे लागतील तेव्हढ्या रकमेच्या) १२ एफडीज ज्या दर महिन्याला रीडीम होतील अशा पद्धतीने राष्ट्रीयकृत बँकेत वर्षाच्या सुरुवातीला कराव्यात. टोटल होतील १,२०,०००/-
व्याजदर कमी होणार आहेत ते पाहता काही रक्कम डेट म्युचल फंड/एफ. एम. पी./गिल्ट फंड मध्ये गुंतवणं फायद्याचं होईल असे मला वाटते. माझ्या मते डेट आणि एफडी (फिक्स्ड इन्मम अ‍ॅसेट क्लासमध्ये) सगळे मिळून १२-१५ लाख. असावेत.
उरलेल्या ५-७ लाखांचा इक्वीटी पोर्टफोलीओ बनवण्यास हरकत नाही. ज्याचा उद्देश ३-५ वर्षात कॅपिटल अ‍ॅप्रिशिएशन हा असेल.
ही ५-७ लाखांची गुंतवणूक एका फटक्यात करण्याऐवजी येत्या सहा महिन्यात दोन-तीन फेज मध्ये केली जावी. ज्यात लार्ज कॅप-मिड कॅप वर जास्त भर असावा. संपूर्ण इक्विटीच्या ५-१०% सिलेक्टेड स्मॉल कॅप मध्ये गुंतवण्यासही हरकत नाही.

*बाकीच्या बर्‍याच गोष्टी मला माहित नाहीत (जसे की इतर उत्पन्न, स्थावर मालमत्त, टेक्स ब्रॅकेट, रिस्क घेण्याची तुमची क्षमता आणि इच्छाशक्ती इ.). त्यामुळे कदाचीत हा सल्ला चुकीचाही ठरू शकेल.

फंड मॅनेजमेंटसाठी सध्या बनवलेली एक एक्सेल इव्हॉलमेंट फेज मध्ये आहे. ज्यात इन्व्हेस्टमेंट पॉलिसी स्टेटमेंट, फिनान्शल प्लान, पोर्टफोलिओ अ‍ॅसेट अलोकेशन अमंग अ‍ॅसेट क्लासेसचा ग्राफ, रिअलाइज्ड गेन, टॅक्स कंप्युटेशन, पोर्टफोलिओ परफॉर्मन्स मेजरमेंट इ. असेल. एकदा का ते व्यवस्थित मनाजोगं झालं की वेब अ‍ॅप्लिकेशन्स बनवून घेता येईल जे सगळे सहज वापरू शकतील.

अनुप ढेरे's picture

11 Jan 2015 - 12:00 pm | अनुप ढेरे

प्रतिसाद आवडला!

आपण सर्वजण ज्या क्षेत्रात काम करत असतो ते क्षेत्र प्रत्येकाचे आवडीचे असतेच असे नाही. बर्‍याच जणांना भलतेच करीअर करायचे असते आणि ते वेगळ्याच क्षेत्रात असतात. आवडीच्या गोष्टी करायच्या राहून जातात. जसे माझ्याबाबतीत, मला कलाशिक्षण घ्यायची फार ईच्छा होती. पण घरच्यांच्या दबावामुळे नाही जाता आले. निव्रुत्त झाल्यावर परत त्या क्षेत्रात काम करायची ईच्छा आहे. त्यातून अर्थार्जन झाले तर चांगलेच आहे. पण नाही झाले तरी जे करायचे राहून गेले आहे ते करण्याचा आनंदतर मिळावता येईल.

सुधीर's picture

12 Jan 2015 - 6:45 pm | सुधीर

"त्यातून अर्थार्जन झाले तर चांगलेच आहे. पण नाही झाले तरी जे करायचे राहून गेले आहे ते करण्याचा आनंदतर मिळावता येईल."
बरोबर... अर्थार्जन झाले, आर्थिक मूल्य असलेले काम झाले तर ते चांगलेच आहे.
पण मला असं वाटतं, केलेल्या कामाचं मूल्य नेहमीच अर्थशास्त्राच्या दृष्टीने मो़जणं योग्य होणार नाही. जसं ते व्यक्तींच्या आवडी-निवडी नुसार बदलू शकतं तसंच ते कालानुसारही बदलू शकते.

गुंतवणीकी विषयी तज्ञ सांगतील. विटेकर साहेब, खरे साहेब ह्यांचे प्रतिसाद ( कार्यरत राहण्याविषयीचे) आवडले.

ह्या शिवाय "ईतरांना मदत करु शकणे (कुठल्याही स्वरुपात)" ही मनुष्याला लाभलेली एक देणगी आहे. ह्या जगाचा निरोप घेण्यापुर्वी ईतरांना जमेल तशी मदत करावी असाही एक दृष्टीकोन बाळगायला हरकत नाही.

नक्की किती पैसे पुरेसे? त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. दरम्यानच्या काळात तुम्ही आर्थिक विवंचनेतून मुक्त होण्यासाठी काय केलं ?

तुम्ही लेखात दिलेली लिंक या विषयासाठी निरुपयोगी आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक चिंतनेतून मुक्त होता येणार नाही.

संक्षींचा हा लेख पैसा तुम्हाला मार्गदर्शक ठरु शकेल.

विवेक ठाकूर's picture

19 Feb 2016 - 10:10 pm | विवेक ठाकूर

या आपण सारे गुलाम आहोत का? लेखासाठी आहे.

उडन खटोला's picture

20 Feb 2016 - 8:15 am | उडन खटोला

"नक्की किती पैसे पुरेसे?" या प्रश्नाचे उत्तर मी स्वत:पुरते शोधून त्यानुसार वागत आहेच ....

पैसा हे साध्य नसून साधन आहे ,हे एकदा मनात ठसले की मग बरेच प्रश्न सुटतात

माझे विचाराल तर सध्या मी सर्व जबाबदारी अन बंधांनांतुन मुक्त आहे .... एखाद्या चांगल्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधात ....

दत्तप्रभू , शंकराचार्य अन इतर अनेकांना जे सहजसाध्य होते त्या "आध्यात्मिक वैराग्या"च्या धुंदीत बुडवून घ्यायचे आहे ...

पण त्याच वेळेस आपला भार इतरांवर पडणार नाही , आपण इतरांवर अवलंबून असणार नाही , तसेच इतरांकडून फसविले देखील जाणार नाही , याची काळजी घ्यायला हवी

पूर्वायुष्यात आध्यात्माच्या बाजारात मोठा फटका बसलेला - उ.ख.

Dinesh Mittal's picture

23 Aug 2017 - 4:49 pm | Dinesh Mittal

Take mediclaim health policy which helps you during the time of sickness and also takes Accident Cover for Bike Insurance.
An accident cover is nothing but a policy that assures a certain compensation to the insured individual, in case the
person was injured to disablement or suffered loss of life during a road accident.

https://www.acko.com/two-wheeler-insurance/add-on-covers/accident-cover

अभ्या..'s picture

23 Aug 2017 - 7:01 pm | अभ्या..

ह. घ्या. पण मित्तल वगैरे नावाचा माणूस मराठी साईटवर लिहितेय हे पाहून मन भरुन आलंय हो.

धर्मराजमुटके's picture

3 Nov 2019 - 8:43 pm | धर्मराजमुटके

उडन खटोला साहेब !
तुम्ही अजून मिपावर असाल आणि प्रतिसाद वाचत असाल असे गृहित धरुन लिहितो आहे. आजकाल बँकेत तरी पैसे सुरक्षित आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपले सगळे पैसे एकाच बँकेत असेल तर ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Mar 2022 - 5:36 pm | प्रकाश घाटपांडे

आज अमृत बंग चे व्याखान ऐकले. तरुणांकडूनही शिकण्यासारखे खूप काही असते हे प्रकर्षाने जाणवले. नक्की किती पैसे पुरेसे हा प्रश्न तिथेही चर्चिला आहे.
प्रत्येक तरुणाला त्या त्या कालानुरुप काही प्रश्न पडत असतात. अनेक तरुण संघटना, पक्ष, सामाजिक चळवळी यांच्याशी जोडून घेउन त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.
अर्थपूर्ण आयुष्याची कास धरून जेव्हा तरुण-तरुणी वाटचाल करतात तेव्हा आपल्याला काय पहायला मिळते?

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी युवांची काय भूमिका असावी?

निर्माण या युवांच्या विकासासाठी काम करणाऱ्या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?

अमृत बंग, प्रकल्प प्रमुख, निर्माण, हे कवी अनंत फंदी प्रतिष्ठान, सांगमनेर यांचयाद्वारे आयोजित व्याख्यानमालेत वरील मुद्द्यांविषयी माहिती देतात. निर्माणविषयी अधिक माहितीसाठी तसेच निर्माणच्या युवा विकासाच्या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण पहा.

मानवाला आयुष्य कंठण्यासाठी जीवन जगण्यासाठी कुठलीतरी प्रेरणा हवी.

(बहुधा) वि स खांडेकरांच्या मते "प्रीती आणि पराक्रम ह्या तरुण मनाच्या दोन मोठ्या प्रेरणा असतात."

सतत पैसा कमावत राहणे ही मनुष्याला दीर्घायुरारोग्य प्राप्त करून देणारी सर्वोत्तम प्रेरणा आहे.

वीस-तीस वर्षांचा व्यावसायिक अनुभव, सामाजिक-व्यावसायिक स्टेटस, जीवन कौशल्ये इ वाया घालविण्यापेक्षा त्याचे धनप्राप्ती करून देणाऱ्या उद्योगात रूपांतर केलं तर मग म्हातारं व्हायला (आणि त्याअनुषंगाने रिटायरमेंट प्लॅनिंग करायला) वेळच मिळणार नाही!

अर्थात, कमावलेला पैसा वेळच्यावेळी योग्य ते नियोजन करून खर्चही करायला हवा. मग त्यासाठी प्रीती आणि पराक्रम आहेतच!