दाभोळ जेटीवर कोकण क्रुज फेस्टीवलचे आयोजन

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in भटकंती
5 Dec 2014 - 11:53 am

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ फेरीबोट जेटीवर २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘कोकण क्रुज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील क्रुज संस्कृती कोकणच्या भूमिवर अनुभवण्याची संधी दाभोळ क्रुजवर मिळणार आहे. या महोत्सवात ५० मिनिटांचा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असून, यामध्ये गोवन फोक डान्स, पोर्तुगीज डान्स, कोळीडान्स, मराठमोळी लावणी तसेच बच्चे कंपनीकरीता खास डान्सचे आयोजन करण्यात आले आहे.

ferry

प्रतिक्रिया

५० मिनिटांचा कार्यक्रम जसा गोव्यातल्या बोटीवर असतो कि तसा!
पण आता हे महाराष्ट्रात होणार आहे, हे एक चांगले आहे.

दाभोळ येथील चांगली हॉटेल्स कुठली हा प्रश्न आहे.
अर्थात दापोलीवरून जाणे असल्यासहि शक्य होईल.
पण फक्त पिणाऱ्यांना न पिता गाडी चालवावी लागेल.

सत्याचे प्रयोग's picture

5 Dec 2014 - 3:27 pm | सत्याचे प्रयोग

सविस्तारात कळेल काय

क्रुझचे वेळापत्रक :
२५ ते ३१ डिसेंबर २०१४
१ ली फेरी : ६ - ६.५०
२ री फेरी : ७ - ७.५०
३ री फेरी : ८ - ८.५०
४ थी फेरी : ९ - ९.५०
५ वी फेरी : १० - १०.५०
ठिकाण : दाभोळ फेरीबोट जेटी (दापोली), चिपळूण व दापोली पासून तासाच्या अंतरावर
पुणे ते दाभोळ : २०० किमी.
पनवेल ते दाभोळ : २०८ किमी.

बुकींग संपर्क : चव्हाण ईलेक्ट्रॉनिक्स - +९१ ९१३० ३०० ४०१, +९१ ७०८३ १०९ २०१

त.टी. (डिसक्लेमर) : सदर माहीती फक्त र.टा. मधील जाहिरातीनुसार...अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.(वैयक्तिक जबाबदारी वर..) कदाचित क्रुझ सुद्धा ते पांढरवाल आहे.. वरील चित्रामधील जहाज हे माणसे, माल आणि गाड्यावाहू जहाज आहे...