कुंदन मोर

इशा१२३'s picture
इशा१२३ in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 4:14 pm

कुंदन मोर

r

नमस्कार मंडळी! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची खरेदी केली असेलच. कपडे खरेदी , भेटवस्तू याबरोबरच महत्त्वाची खरेदी असते ती गृहसजावटीच्या वस्तूंची. मोठ्या वस्तूंपासून ते छान छान पणत्या, दिवे, तोरण, लाइटच्या माळा इ. एक ना दोन वस्तू खरेदी केल्या जातात.

त्यातच रांगोळीच्या विविध रंगाची खरेदी येते. रांगोळी येत असो वा नसो चार रेघा काढून रंग भरावेसे वाटतातच. आजकाल तयार छापही मिळतात तेही आणले जातात.

या रांगोळीतच थोडी विविधता आणण्यासाठी आता बाजारात सुबक लाकडी साचे विविध आकाराचे मिळू लागलेत. त्यावर रंगीबेरंगी कुंदन चिकटवून रांगोळ्या तयार करता येतात.

http://www.misalpav.com/node/26882

चाळणीने रांगोळीचे रंग पसरून वा विविधरंगी फुलांच्या पाकळ्या पसरून या कुंदनच्या रांगोळ्या मांडता येतात. कधी हेच साचे ताटाभोवती महिरप म्हणून मांडता येतात तर कधी देवापुढे मांडता येतात. साच्यांचे वेगवेगळे प्रकार आकर्षक दिसतात.

या वेळेस दिवाळीसाठी मी आणले मोराचे साचे. आणि त्यावर चिकटवायला विविध कुंदन.

मोरासाठी वापरलेले साहित्य:

  • मोराचे लाकडी साचे
  • सोनेरी आणि जांभळ्या रंगाची मण्यांची चेन
  • रंग (जांभळा आणि सोनेरी)
  • आवडीप्रमाणे विविध आकाराचे आणि रंगाचे कुंदन (डिझाइनवर अवलंबून)
  • चिकटवायला ग्लु

r1

प्रथम साच्याला हवा तो आकर्षक रंग देऊन घ्यावा. मोर असल्याने मी जांभळा रंग वरच्या भागाला आणि पिसार्‍यासाठी सोनेरी रंग दिला. रंग साधारण दोन वेळा द्यावा लागतो तरच तो नीट बसतो.

r2

रंग वाळल्यावर त्यावर कडेने सोनेरी रंगाची बारीक मण्यांची चेन चिकटवून घेतली. पिसारा कुंदनने पूर्ण भरून घ्यायचा होता म्हणून मोराच्या वरच्या भागात कमी कुंदन वापरले. मोराचा पोटाचा भाग उठावदार होण्यासाठी वेगळा आखून घेतला. तो चेन आणि कुंदन लावून पूर्ण केला.

r3

त्यानंतर मोराच्या पिसार्‍याला दुहेरी सोनेरी आणि मधे जांभळी चेन लावली. (चेन चिकटवताना आकारानुसार कापून घ्यावी.) मग मधल्या पिसार्‍यावर कुंदनने डिझाईन बनवले.

r4

असे दोन मोर तयार केले. दोन्ही मोरांमधे वेगळ्या आकाराची कुंदन रांगोळी ठेवून फुले आणि पणत्यांनी एक मोठी रांगोळी सजवली.

r5

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

सुंदर संकल्पना व माहितीपूर्ण लेख!

साती's picture

21 Oct 2014 - 3:11 pm | साती

छानच आहे रांगोळी.

Maharani's picture

21 Oct 2014 - 4:00 pm | Maharani

अप्रतिम...सुरेख...

मधुरा देशपांडे's picture

21 Oct 2014 - 7:51 pm | मधुरा देशपांडे

सुंदर.

सानिकास्वप्निल's picture

27 Oct 2014 - 9:58 pm | सानिकास्वप्निल

सुरेख दिसत आहेत कुंदन मोर

अनन्न्या's picture

28 Oct 2014 - 7:02 pm | अनन्न्या

अजून काही नमुने द्यायला हवे होतेस.

सखी's picture

28 Oct 2014 - 8:16 pm | सखी

किती सुरेख दिसत आहेत रांगोळ्या, एकदम मस्त!

सस्नेह's picture

28 Oct 2014 - 9:27 pm | सस्नेह

शेवटच्या फोटोतली रंगसंगती अप्रतिम साधली आहे.

स्पंदना's picture

29 Oct 2014 - 4:35 am | स्पंदना

अप्रतिम!!
मी कोयर्‍या आणलेत लाकडाच्या. आता हे पाहून, नक्की कस बनवायचं ते समजल.
धन्यवाद.

आरोही's picture

3 Nov 2014 - 12:54 pm | आरोही

खुप सुंदर झालेत मोर ..

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2014 - 4:56 pm | प्रभाकर पेठकर

दिल माँगे (कुंदन) मोर...!

इशा१२३'s picture

5 Nov 2014 - 4:10 pm | इशा१२३

सगळ्यांचे खूप आभार.

पैसा's picture

8 Nov 2014 - 11:08 am | पैसा

कल्पनाशक्ती लढवायला भरपूर वाव आहे यात! हे मोर मस्तच झालेत!

सविता००१'s picture

11 Nov 2014 - 4:52 pm | सविता००१

इशा, मस्तच गं

कविता१९७८'s picture

14 Nov 2014 - 6:55 am | कविता१९७८

खुपच सुरेख

नूतन's picture

2 Dec 2014 - 7:14 pm | नूतन

मस्त दिसतेय