चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
6 Oct 2014 - 4:46 pm
गाभा: 

आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना
चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले. काही सामाजिक गटांनी याचा प्रतिकार केला परंतु त्यावेळच्या कुलीन-सामाजिक गटांनी (संस्कृती, परंपरा, धर्म याच्या नावाखाली)प्रखर विरोध करून प्रतिकार मोडून काढला. अश्या महिलांवर हिंसक हल्ले झाले. कुलीन पुरुष, दलित महिलेला स्पर्श करायला लागू नये म्हणून, भाल्यासारख्या शस्त्रांचा वापर करून, वस्त्र फाडून टाकायचे.
सार्वजनिक जागी झाडाला अश्या महिलांना बांधले जायचे कि ज्यामुळे इतर स्त्रिया दहशत घेतील.
सामाजिक गटांचा ५० वर्षांचा प्रतिकार व मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस त्रवेलीन यांच्या अथक दबावापुढे झुकून २६ जुलै १८५९ रोजी संस्थानाने चोळीच्या वापराचा हक्क मान्य केला.
स्वामी विवेकानंद आपल्या 'फ्युचर ऑफ इंडिया' पुस्तकात लिहितात, 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'.

प्रतिक्रिया

एस's picture

6 Oct 2014 - 5:00 pm | एस

'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'

कदाचित आपला इतिहासच अशा प्रथापरंपरांनी भरलेला असावा. असो. लेख आजच्या काळाच्या संदर्भातही महत्त्वाचा.

भिंगरी's picture

7 Oct 2014 - 10:27 am | भिंगरी

ज्यांनी चोळी घालण्यासाठी लढा दिला,त्रास सहन केला.
आणि आता
धन्य त्या चित्रपटातल्या आणि तशाच बाहेर वावरणार्‍या स्त्रिया ज्यांना चोळी घालायचे किंवा पूर्ण चोळी घालायचे वावडे आहे.

नानासाहेब नेफळे's picture

7 Oct 2014 - 10:37 am | नानासाहेब नेफळे

अमेरीकन कल्चर! काय करणार!!
अमेरीकेत स्त्रीमुक्तीसाठी काही बायकांनी चोळी काढून अनावृत्त वक्षांचे प्रदर्शन केले होते व चोळ्यांचे दहन केले होते, ब्रा बर्निंग फेमिनिझम मुवमेंट असे त्याला म्हणतात.
याउलट भारतात स्त्रीमुक्ती म्हणजे चोळी घालण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेले एक आंदोलन.कल्चरल डीफरंन्स.

मार्मिक गोडसे's picture

7 Oct 2014 - 10:58 am | मार्मिक गोडसे

स्टॅचू ऑफ लिबेर्टी च्या हातात मशाली ऐवजी ब्रा असलेल्या व्यंगचित्राची आठवण जागी झाली.

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Oct 2014 - 5:29 pm | माम्लेदारचा पन्खा

कितीही शिक्षणाचा आणि सभ्यतेचा मुलामा दिला तरी माणसाची पाशवी वृत्ती जाणार नाही.. ती ह्या ना त्या प्रकारे डोके काढतच राहणार !

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 8:22 pm | काउबॉय

:(

रेवती's picture

6 Oct 2014 - 6:49 pm | रेवती

नको वाटतं हो असलं काही वाचायला.

नानासाहेब नेफळे's picture

6 Oct 2014 - 8:36 pm | नानासाहेब नेफळे

तुम्हाला वाचायची लाज / घृणा वाटतेय, त्यांना प्रत्यक्ष ते भोगायला लागत होते.

लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं. लाज असलीच तर माणूसकीला लाज वाटायला हवी. अजूनही कित्येक आदिवासी स्त्रियांवर, लहानग्या मुलींवर अत्याचार होतात.

आता किमान त्याला समाजमान्यता नाही(?) कायद्याने तर हे गुन्हे आहेत हीच काय ती रुपेरी किनार पण अजुनही पाशविपण डोके वर काढतचं संधि मिळाली तर :(

आणि सतीला चितेत ढकलण्याची प्रथा काय गौरवास्पद आहे ?

हरकाम्या's picture

6 Oct 2014 - 11:13 pm | हरकाम्या

उगीच असे काही धागे टाकु नका राव. वाचले की यातना होतात. आणि आपल्या लोकांची चीड येते.
मागे असाच " भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास " वाचला आणि आपल्या थोर "संस्क्रुतीचा " व्रुथा अभिमान
गळून पडला.

बाबा पाटील's picture

7 Oct 2014 - 10:01 am | बाबा पाटील

ही असल्या गोष्टी वाचल्या की तळपायाची आग मस्तकात जाते,दुर्देवाने कित्येक समाजसुधारकांना देखिल या हरामखोर संस्कृतीरक्षकांपुढे शरणागती पत्करावी लागली होती.माणसाच जगण नाकारणारा कसला आलाय धर्म ? थु त्यांच्या जिंदगाणीवर. (कोनाला माझे शब्द टोचत असतील तर ***** जा.)

पगला गजोधर's picture

7 Oct 2014 - 10:42 am | पगला गजोधर

धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. आणि वर तयांना कोणी ओळखतच नव्हते, उलट हत्येमुळे पब्लिसिटी मिळाली, अशे सनातनी टोमणे, ऐकायाला मिळतात. काय तर म्हणे, "आपल्या महान प्राचीन वैदिक संस्कृती बाद्नाम करण्याचं ऐक मोठ्ठ षड्यंत्र आहें", की जे असे समाजसुधारक करत आहेत, असा पद्धतशीर अपप्रचार केला जातो.

सूड's picture

7 Oct 2014 - 10:31 pm | सूड

>>दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात.
दाभोलकरांचं कार्य नक्कीच चांगलं असेल, पण सगळ्या हिंदू धर्मातल्याच गोष्टी त्यांना चुकीच्या का वाटल्या असाव्या असा प्रश्न पडतो. देवासाठी मुकी जनावरं मारणे ही अंधश्रद्धा असेल तर बकरी ईदच्या दिवशी अंनिस वाले कुठे जनजागृती करताना का दिसत नाहीत? हे असं पाह्यलं की दाभोलकर आहेत की मोठे पण या अशा पक्षपाती मोठेपणाची नोंद आमच्या खात्यावर कुठे करायची हा प्रश्न पडतो.

आता याचा अर्थ हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांना समर्थन असा मुळीच नाही, पण नियम सगळ्यांसाठी सारखा असावा येवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो ना?

मृत्युन्जय's picture

7 Oct 2014 - 10:50 pm | मृत्युन्जय

असं नसतं विचारायचे. खुपच मागास ब्वॉ तुम्ही. अहो ते स्वतःचा धर्म पहिल्यांदा सुधारणार होते. आता मला माहिती आहे तुमच्यासारखे खवचट लोक विचारणार की दाभोळकर कुठे धर्म मानायचे म्हणुन. चीज नाही हो तुम्हाला त्यांच्या कामाचे म्हणुन असले प्रश्न विचारता.

दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा. त्यांनी उघड विरोध करायचे धाडस दाखवले नसेल कदाचित. पण गांघीजीनीही अहींसेचा उपदेश हिंदुनाच केला होता. हिंदुंच्या अहींसेने बकीच्यांचे (ईंग्रज / मुसलमान) हृदय परीवर्तन होईल अशी त्या (दोघांचीही) धारणा असावी.

म्हया बिलंदर's picture

26 Aug 2015 - 10:36 pm | म्हया बिलंदर

आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2014 - 10:27 am | llपुण्याचे पेशवेll

अरे वा असं आहे होय. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून कोनी केला हे अजून माहीत नाही आणि आपण तथाकथित संविधान आणि न्यायावर विश्वास असलेले लोक निष्कर्ष काढून मोकळे? वा!
शाहू फुले आंबेडकर वाल्यांनी या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना झोडायची कमी दाखवली असती का? जर मारेकरी हिंदुत्ववादी असते तर सापडले असते ना!
राहून राहून याचे आश्चर्य वाटते की दाभोळकर संपादक असलेल्या साधना मधे लवासाच्या जाहीराती कशा असंत बरे?

चलत मुसाफिर's picture

25 Aug 2015 - 5:01 pm | चलत मुसाफिर

पण दाभोळकरांच्या हत्येचे गूढ अद्याप उकललेले नाही. त्यामुळे निराधार तर्क लढवणे टाळावे.

अर्धवटराव's picture

13 Oct 2014 - 9:39 am | अर्धवटराव

हा पण एक साहित्यप्रकार आहे.

pic

हक्क
.
.
.
.

आजकाल जनरल नॉलेज वाढवण्याबाबतीत ज्यांना उत्साह आहे त्यांनी वरील लिंक जरूर अभ्यासावी, आपल्या नॉलेजमधे भर घालावी.

तुडतुडी's picture

25 Aug 2015 - 1:16 pm | तुडतुडी

संस्कृतीला शिव्या घालणाऱ्यांनी वैदिक संस्कृतीत 'चोळी घालू नये' असा आदेश आहे का हे तपासून बघण्याची तसदी अर्थातच घेतली नसणार .
स्वताच्या मनाने काहीही अतिरेकी , बिनडोक विचार घुसमडवून संस्कृतीला, धर्माला बिघडवनार्यांना शिव्या घालण्यापेक्षा संस्कृतीला किवा धर्मालाच शिव्या
घालणं जास्त सोपं आहे ना . म्हणजे मग आम्ही करतो ते बरोबर . संस्कृती चुकीची आहे असा युक्तिवाद करता येतो . बंगाली स्त्रिया गेल्या शतकापर्यंत चोळी वापरत नसत .फार पूर्वी स्त्रिया पुरुषांसार्ख्याच खाली पितांबर नेसत आणि वरचा भाग उघडाच असे . चोळी घालायची फ्याशन नंतर आली .आधी चोळी घालत नसत म्हणून ओरडा आणि आता घालतात म्हणून ओरडा . अश्या खूप सगळे नियम आपणच आपल्या सोयीप्रमाणे ठरवत असतो .

मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी
हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत . इतर धर्मियांत तस दिसत नाही . उलट अश्या चुकीच्या प्रथा
धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त कठोर केल्या जातायेत

दाभोळकरांबद्दल बोलायचं तर त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रधा मध्ये खूप गफलत केलीये . अंधश्रद्धेवर हल्ला करण्याच्या नादात त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं .
आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ? भगवद्गीतेतल्या वचनांवर टीका करून आपण श्री कृष्णापेक्षा जास्त शहाणे आहोत असं कदाचित त्यांना वाटत असेल . मी स्वतः एकदा भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिस शी संपर्क साधला होता . बर्याच वेळा मागे लागून सुधा मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .जिथे प्रसिद्धी मिळेल अश्याच गोष्टी करण्यात अंनिसने रस घेतलाय . अनेक अध्यात्मिक लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं . त्यालाही अंनिसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही .

मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत .

वानगीदाखल मी दोन उदाहरणे देतो

जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक
चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2015 - 2:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

नका कळफलक बडवु प.ग दादा ! उपयोग नाही तिथे काहीच त्याचा!!!

अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!

विकास's picture

25 Aug 2015 - 5:31 pm | विकास

सरकार हे जनतेच्या मागण्या दबावामुळे अथवा इतर अशाच कारणांंमुळे मान्य करते..

जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक

राजा राम मोहन रॉय यांनी या संदर्भात लढा दिला होता.

चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन
इतरत्र वाचल्याप्रमाणे ही प्रथा त्रावणकोर महाराजाने बंद केली. (मद्रास प्रांताच्या गव्हर्नरने ट्रेवलिनने त्याचा पाठपुरावा केला होता.)

तुम्हीच वर स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देता तो वेगळाच!

एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

पगला गजोधर's picture

2 Feb 2018 - 5:50 pm | पगला गजोधर

एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे

कोरेगाव भीमा धाग्यावर तर म्हटलं जातंय की आजकाल,

मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.

रेफ : https://www.misalpav.com/comment/977761#comment-977761

'गोबेल्सने' डु-आयडी घेतला की काय मिपावर? उथळपणाचीसुद्धा एक हद्द असते. 'म्हैस' या आयडीची आठवण झाली.

प्रचेतस's picture

25 Aug 2015 - 5:46 pm | प्रचेतस

आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ?

दाभोलकरांना कशाला मधे आणलंत?
हमीद नावाचा संदर्भ तुम्हाला माहीत आहे काय?
हमीद दलवाई हे नाव कधी ऐकलंय काय?

बाप्पु वादच नाहि अतिशय घृणास्पद परंपरा होती ती. पण मियां गधा-धर ह्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काहि वेगळेच आहे. हे आता आता पर्यंत बरे होते पण महराष्ट्र भुषण वादा पासुन खरच त्यांचा "पगला" झालाय.

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 4:42 pm | पगला गजोधर

होबाबा माफ करो मुझे ओर....

विकास's picture

25 Aug 2015 - 5:12 pm | विकास

मूळ धाग्यातील इतिहास माहीत नव्हता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच घृणास्पद आहे. महाराष्ट्रात (जर मला आठवत असलेले बरोबर असेल तर) वडारी समाजातील स्त्रीया पण चोळी घालत नसत. त्याचे कारण देखील तेच आहे का? हे मी किमान ८०च्या दशकापर्यंत तरी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामधे पण होते असे म्हणेन. (हा खरेच प्रश्न आहे. उपरोध नाही).

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 5:21 pm | पगला गजोधर

महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही, त्यामुळे क्षमस्व…

दत्ता जोशी's picture

25 Aug 2015 - 5:33 pm | दत्ता जोशी

सगळ्याच परंपरा आणि रूढी धर्माशी निगडीत असतात असे नाही. चोळी न घालण्याची प्रथा त्या समाजात का सुरु झाली, ती बंद करण्यास त्यांना कोणी आणि का विरोध केला याची हि माहिती येवू द्या. तुम्ही जे लिहिलेय ते भयानक आणि अमानवीच आहे. पण "धर्म/संस्कृती रक्षक" असे म्हणून काही अजेंडा पुढे ढकलायचा असेल तर चालुद्या. चित्रात तरी असे कोणी "संस्कृती रक्षक" दिसत नाहीत. मला आठवते, महाराष्ट्रात वडार समाजाच्या स्त्रिया काही वर्षापूर्वीपर्यंत चोळी घालत नसत ( अगदी गेल्या काही वर्षापर्यंत) . त्यांना तसे करण्यास कोणी "धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते. हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत. वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 5:56 pm | पगला गजोधर

आधी लिहिल्याप्रमाणे

महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही

त्यामुळे ("धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते / किंवा होते) याविषयीचा वाद होवू नये म्हणूनच वरील वाक्य लिहिलेले. असो.....

वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!
का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )

चौथा कोनाडा's picture

25 Aug 2015 - 6:19 pm | चौथा कोनाडा

पगदादा, सश्रम कारावास ? अहो, तो कष्टकरी लोकांचा गट होता असे कित्येक गट वेगवेगळ्या प्रकारची श्रमाची कामे कारायचे. . तेव्हाच्या सिस्टीमला सरसकटपणे "सश्रम कारावास"ठरवु नका.

काळा पहाड's picture

26 Aug 2015 - 9:59 pm | काळा पहाड

अहो, त्यांच्या भावना समजून घ्या. कशीही करून टीकाच करायचीय त्यांना. जळजळ अशी नाही तर तशी व्यक्त होणारच.

थॉर माणूस's picture

25 Aug 2015 - 5:42 pm | थॉर माणूस

हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत.

हे इतक्या खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते? खरंच आपल्या धर्मात मुर्खपणाचा कळस वाटावेत असे नियम नव्हते? ते मोडल्याबद्दल शिक्षा दिली जात नव्हती?

दत्ता जोशी's picture

25 Aug 2015 - 6:48 pm | दत्ता जोशी

<<<अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!>>>>>
घामामुळे अश्या जखमा ह्वू शकतात आणि अश्या जखमा झाल्यामुळे स्किन cancer सारखे आजार होऊ शकतात याची माहिती आणि वैद्यकीय अनुमोदन आपल्याला सहज मिळू शकेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेत काही ठराविक कैद्यांना त्रास देण्यासाठी सायसाल चे खुदरे कपडे घालून काम करायला लावले जावे जेणेकरून दमात वातावरणात काम करतांना त्यांना घाम येवून त्वचा घासली जावून यातना व्हाव्यात हा उद्देश असे.

<<<का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )>>>>
गाडी वळणावर येवू लागली आहे कि काय? माझी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला राग आला वाटते.
आपल्या पूर्वापार समाजात बारा बलुतेदार हि व्यवस्था होती. व्यवसायातील बारकावे आणि कुशलता अनुवांशिक आणि पिद्यान्पिध्या येत असे. अत्यंत कलाकुसर आणि अचूक परिमाणांनी पुरेपूर अशी मंदिरे, शिल्पे आणि राजवाडे कदाचित हाच वडार समाज घडवीत होता म्हणजे त्यांना राजाश्रय आणि प्रतिष्ठा होती. अर्थात वंश परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त इतक व्यवसाय/ कौशल्य मिळवण्याचे आणि अर्थार्जन करण्याचे स्वतंत्रही त्यांना होते. जर लिहिणे वाचण्यावर बंदी असती तर चोखा मेळा, नामदेव महाराज, सावता माळी, तुकाराम महाराजांसारख्या संतांची वचने, अभंग, गाठ कश्या लिहिल्या गेल्या असत्या? त्यांनी भागवत, रामायण कसे वाचले असते?
राहिला प्रश्न शिक्षणातील फतव्याचा असा कोणताही फतवा कधीच निघाला नव्हता. फक्त वैदिक शिक्षण हे ब्राह्मणासाठी मर्यादित होते, इतर विद्या गणित, काव्ये, रसायन शास्त्र, वैद्याक्शास्त्र, वास्तुशास्त्र, नगर रचना शास्त्र, जनरल हिशोब, लिहिणे आणि वाचणे यावर सर्वांचा अधिकार होता. अस्त्र, शस्त्र, न्याय इ शास्त्रे पात्र क्षत्रियांना शिकवली जात. जेणेकरून त्यांचा दुरुपयोग होऊ नये.
मधल्या काही काळात समाजात अनिष्ट रूढी आणि परंपरा आल्या हे खरेच आहे. आणि ती भुशणवह गोष्ट नाहीच. त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. पण म्हणून सगळ्या चुकीच्या आणि वीत परंपरा प्रथा रूढी या धर्मातून आल्युअ नी विशेषतः त्या ब्राह्मणांनी आणल्या असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का?
असो. बाकी चालू द्या.

सुबोध खरे's picture

25 Aug 2015 - 8:45 pm | सुबोध खरे

दया पवार यांच्या बलुतं या आत्म चरित्रात गऊ नावाच्या वडारणी बरोबर त्यांची मैत्री झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे त्यात
"सीतेला रामायणात कान्चनमृगाची चोळी मिळाली नाही तेंव्हा पासून आम्ही चोळी घालत नाही" असे गऊने सांगितल्याचे त्यांनी लिहिले आहे.

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 1:26 pm | प्यारे१

महर्षीना बोलवावं लागेल वाचायला!
(सॉरी फॉर टवाळ प्रतिसाद ऑन सीरियस टॉपिक)

जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक >>
चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन >>

बास एवढंच ?
सती प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह - राजा राममोहन राय
संमती वयाचा कायद्याला पाठींबा , स्त्रियांचं लग्नाचं वय वाढवणं - गोपाळ गणेश आगरकर
स्त्री शिक्षण , जुलमी प्रथांपासून मुक्तता - ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले , गोपाल हरी देशमुख
दलित शिक्षण , दलित अन्यायाचा विरोध - शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , भाऊराव पाटील
समाजातील चुकीच्या रूढींना विरोध आणि शिक्षणाचा प्रसार - अण्णासाहेब धर्माजी जाधव

अजून बरेच असतील . मला काही सगळे माहित नाहीत .काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या . मान्य आहे . पण हिंदू समाजाने त्या स्वीकारल्या आहेत

प्रचेतस दाभोलकर आणि अनिस बद्दल आम्हालाही थोडंफार माहिती आहे . एवढे काही अडाणी नाही आम्ही . स्वतः अनुभव घेतला आहे

अत्रुप्त आत्मा's picture

26 Aug 2015 - 2:02 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत अपेक्षित .
सुधारणा वाद्यांचि साक्ष स्वत:च्या बाजूनी काढता
मग सांगा तुम्ही स्वत:ला काय मानता?

(काय जिलबी पडली मेली ! :-D)

काळा पहाड's picture

26 Aug 2015 - 10:11 pm | काळा पहाड

आता बोलायचंच तर बोलूयाच ना. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या धर्माच्या प्रेषितानं ६ वर्षाच्या मुलीबरोबर लग्नं केलं आणि ती ९ वर्षाची असताना तिला गरोदर केलं. त्या वेळी या आदरणीय व्यक्तीमत्वाचं वय ५३ वर्षे होतं. त्या धर्माचे कथित "अतिरेकी" विचारांचे लोक १५० वर्षापूर्वीच्या कोणा त्रावणकोर संस्थानातल्या प्रथा सांगून आमच्या धर्मावर टीका करायचं विषारी कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता पुढं " 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'" मधला "कदाचितच" चा विरुद्धार्थी अर्थ पहायचा असेल तर या महाशयांच्या "लीला" याच धाग्यावर मी क्रमशः प्रसिद्ध करत जाईन. शिवाय कुमारी माता कुमारी होतीच का, चर्च नं किती लोकांना जिवंत जाळलं, संपूर्ण दक्षिण अमेरिकन संस्कृती चर्च नं कशी नष्ट केली, बौद्ध धर्मानं देशाला चुकीचा संदेश देवून देशाचं नुकसान कसं केलं वगैरे गोष्टी पण असतीलच.

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 9:53 am | पगला गजोधर

आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

आपला वरील प्रतिसाद खूपच बोलका आहे, धन्यवाद…

अंतर्मुख होउन आत्मचिंतन करून जो कोणी बोध घेईल, त्याचं भलं,
आणि जो दुसर्याच्याकडे बोट दाखवत बसेल त्याचंही चांगभलं

तुडतुडी's picture

27 Aug 2015 - 12:58 pm | तुडतुडी

काळा पहाड>>> +११११११११११११
त्याच पोरीनं त्या प्रेषिताचा (?) वैतागून खून केला . ह्या महान माणसाने अन्नाची मागणी करणार्यांना उंटाचा मूत प्यायला लावला . मदीने मध्ये रक्तरंजित दंगली केल्या . मक्केतल्या ३६० मुर्त्या फोडल्या आणि शिवमंदिरं उध्वस्त केली . 'दानव' धर्म बळकट करण्यासाठी मुद्दामच आर्य धर्मातल्या प्रथांच्या अगदी उलट प्रथा निर्माण केल्या . स्वतः दिलेल्या नियमा प्रमाणे न वागणाऱ्यांचे शिरच्छेद केले .(सगळ्याचा संदर्भ अल बुखारी खंड ४ आणि ५ आणि आयेशाने स्वतः लिहिलेले लेख . नक्की नाव आत्ता आठवत नाही ) स्वताचं बघा आधी मग दुसर्यावर टीका करा .

कृपया हा प्रतिसाद डिलीट करू नये . हा भडकपणा नसून सत्य आहे . ह्यात थोडं जरी असत्य असेल तर त्याचा प्रतिवाद करावा .

तुडतुडी's picture

27 Aug 2015 - 1:01 pm | तुडतुडी

काळा पहाड त्या महाशयांच्या लीला प्रसिद्ध कराच . भारतातले मुस्लिम डोळ्यांवर झापडं लावून बसलेत . त्यांना आणि त्यांची बाजू घेणाऱ्या इतरांनाही कळू दे सत्य काय आहे ते . माझा फुल support आहे तुम्हाला

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Aug 2015 - 10:11 am | अनिरुद्ध.वैद्य

पगदादा,

माहिती मिळाली. प्रथा सुरुय का अजून कोठे? आज काल हाफ चड्डी किंवा जीन्स घालू द्या असे आंदोलने होतात. त्याबद्दल पण लिहा :D