मला माहीत असलेले रामायण

पोटे's picture
पोटे in काथ्याकूट
13 Sep 2014 - 10:42 pm
गाभा: 

(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)

________________________________________________________

आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.

सीता ही भूमीकन्या होती.

________________

वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?

दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?

नवर्‍याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?

बलात्काराने स्त्री उपभोगणार्‍या वानराला मृत्युदंड दिला.

तोच गुन्हा करणार्‍या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.

निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.

१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.

२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.

______________________

रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.

मग शूर्पी अनार्या कशी ?

रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.

पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?

बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.

आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.

अशी कथा मी वाचलेली आहे.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

16 Sep 2014 - 6:44 pm | अनुप ढेरे

प्रक्षिप्त वगैरे या अशा कॉमेंट्स रँडम नसाव्यात. श्लोकांची रचना, वृत्त यावरून अंदाज बांधतात असं वाचल्याचं स्मरतं. वल्ली, बॅट्मॅन यांनी प्रकाश टाकावा.

पैसा's picture

16 Sep 2014 - 7:02 pm | पैसा

साध्या गोष्टी असतात. संस्कृत बरीच बदलत आलेली आहे. रचनेचे पाणिनीपूर्व आणि नंतरचे असे सऱळ दोन कालखंड असतील तर शब्द, शब्दरचना यावरून कळतात. बेटमन जास्त लिहील.

रामायणात ठळक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे युद्धकांडाच्या शेवटी फलश्रुती आहे. (तशी जुन्या सगळ्या संस्कृत रचनांमधे असते.) शिवाय उत्तरकांडाच्या शेवट पुन्हा फलश्रुती आहे. जर रामायण एकसंध असते तर ती एकच असायला हवी होती. रामायणाला शेवटचे कांड नंतर जोडले गेले असावे. पण महाभारताचे तसे नाही. त्यात सगळीकडेच भर पडत गेल्याने असे स्वतंत्र दोन तुकडे लक्षात येत नाहीत.

कोणता भाग प्रक्षिप्त असावा हे ठरवण्यासाठी इतर साहित्याचीही मदत घ्यावी लागते. म्हणजे शंबूक वधाची कथा घुसडण्यात कोणाचा हात आहे हे ठरवायचे असेल तर मनुस्मृती कधी लिहिली गेली हे पहावे लागते. हे सगळे इतिहासातच शोधावे लागते, कारण त्यावेळी तुम्ही आम्ही कोणीच साक्षीदार नव्हतो!

बरं झालं राव रामानंद सागरांनी मिपा सुरु व्हायच्या बरंच आधी रामायण मालिका बनवली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2014 - 4:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धाग्यात एका मुख्य मुद्द्याचा अभाव पाहून अंमळ दुःख झालं -

सीतास्वयंवरात धनुष्याला प्रत्यंचा लावावी असा पण होता, रामाने धनुष्य मोडून फाऊल केला, जनकाने त्याकडे दुर्लक्ष करून राम-सीता लग्न लावून दिलं आणि नंतर नस्ती लफडी घडली. जनकाने असं चीटींग केलं नसतं तर रामायण घडलं कसं असतं?

विटेकर's picture

17 Sep 2014 - 9:51 am | विटेकर

रामाने ..... फाऊल केला,

नंतर नस्ती लफडी घडली

जनकाने असं चीटींग केलं नसतं

मूळ वाल्मिकी रामायणात काय आहे?? बाकी ऐकीव कथा इथे ऐकवू नका..
मूळ वाल्मिकी रामायणात नक्कीच प्रत्यंचा लावल्यानंतर ओढताना ते तुटलेले असेल. म्हणजे टेक्निकली राम जिंकल्यानंतर.
धर्म ग्रंथात काही चुकीच अन-फेअर असुच शकत नाही हे तुम्हाला माहीत नाही का??
मूळ रामायण आधी वाचून या मग बोलू..

विटेकर's picture

17 Sep 2014 - 9:41 am | विटेकर

ज्या पद्धतीने आणि अनादराने इथे हिंदू देव- देवतांचा उल्लेख आणि चर्चा सुरु आहेत ती गोष्ट एक हिंदू म्हणून मला अत्यंत आक्षेपार्ह वाटत आहेत. या संदर्भात मी माननीय संपादक यांच्याशी यापूर्वी संपर्क केलेला आहे.
मिपाचे संपादक सूज्ञ असून योग्य तो निर्णय घेतीलच , पण तसे झाले नाही तर मला नाईलाजाने अन्यत्र या विषयावर बोलावे लागेल. कदाचित त्याचा परिणाम होईल अथवा होणार नाही पण मी माझे काम केल्याचे निश्चित समाधान मला मिळेल.
जे या धाग्यावर सूज्ञ आहेत आणि ज्यांची विवेकबुद्धी थोडीफार शाबूत आहे अशांनी प्रतिसादातील काही वाक्यात श्रीरामाच्या ऐवजी महम्मद साहेब अथवा येशु असे नाव घालून पहावे आणि परिणामांची कल्पना करावी.
मी गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ इथे सदस्य आहे , सहसा मी इतका चिरडीला कधी येत नाही , पण अतिच झाले,काही लोकांचा हेतुच मुळी हिण्दुत्वाला बदनाम करणे आणि हिणकस शेरेबाजी करणे असाच आहे . डोळ्यावर कातडे तरी किती ओढ्णार ?
या प्रतिसादाचा परिणाम म्हणून कदाचित माझे सदस्यत्व रद्द होईल , तेव्हा आमचा सर्वांना राम राम !
काही चुकले असल्यास आपण संतजनानी मोठ्या मनाने क्षमा करावी ! उदंड आयुष्य आहे आणि चांगुलपणावर माझा विश्वास आहे, तेव्हा निश्चित भेट होईलच !
आणि तसे झाले नाही तर आहेच , काव्य -शास्त्र - विनोद अशी भरपूर मजा करु !

बाळ सप्रे's picture

17 Sep 2014 - 9:59 am | बाळ सप्रे

पण तसे झाले नाही तर मला नाईलाजाने अन्यत्र या विषयावर बोलावे लागेल

महम्मद साहेब अथवा येशु असे नाव घालून पहावे आणि परिणामांची कल्पना करावी

पहिल्या वाक्यातील गर्भित धमकी आणि दुसर्‍या वाक्यातील विचारसरणी यात काय फरक आहे??

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 10:37 am | काळा पहाड

लैच एक्स्पेक्ट करता राव तुम्ही हिंदू धर्माकडून.

वीटेकर साहेब मी आपल्याशी बराच सहमत आहे. पण तरीही हे होत रहाणारच. आपल्याला जमेल तसा प्रतिवाद करावा. न जमल्यास दुर्लक्ष करावे. कोणीही सोम्यागोम्याने काही बाही लिहील्याने धर्माला काहीही फरक पडत नाही हो. तो आहे तसाच रहातो. सर्व जगाने साथ दिली तरीही किंवा एकानेही साथ नाही दिली तरीही.

माझी धर्माची व्याख्या: निसर्गनियम.

उदा: दुसर्याला दु:क्ख द्यायचा विचार केला तरीही मन अशांत होते आनी सद्भावना जागवली तर मन प्रसन्न होते.
कोणीही हे करुन पहावे. आनी हे सर्व मानवजातीला लागु होते मग तो अनुयायी कोणत्याही धर्माचा का असेना.

कवितानागेश's picture

17 Sep 2014 - 10:08 am | कवितानागेश

ज्याचा त्याचा अनुभव मत मर्जी समज इत्यादि

सुहास पाटील's picture

17 Sep 2014 - 10:55 am | सुहास पाटील

मिपा वाल्यांनी हा धागा त्वरित बंद केला पाहिजे हा धागा जर कोणी समाज कन्टकानि पहिला तर खूप प्रोब्लेम होइल

संपादक मंडळ's picture

17 Sep 2014 - 11:02 am | संपादक मंडळ

धाग्याच्या मूळ विषयावरील चर्चा संपून संबंध नसलेल्या विषयांवर चर्चा सुरू झाल्यामुळे धागा वाचनमात्र करत आहोत. ज्यांना अन्य विषयांवर चर्चा करायची असेल त्यांनी आपापले स्वतंत्र धागे काढावेत ही विनंती.