पोरं vs मुलं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
11 Sep 2014 - 10:56 am
गाभा: 

नमस्कार!

मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे.

'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.

विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया

सुनील's picture

11 Sep 2014 - 11:01 am | सुनील

आपलं ते मूल; दुसर्‍याचं ते पोर!! ;)

पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही असो, आज तो अर्थ वापरात नाही. पोर हा शब्द आजमितीस ग्रामीण भागात जास्त वापरतात तर मूल हा शब्द शहरी भागात. त्यामुळे पोर/पोरगा/पोरगी/पोरं इ. शब्दांच्या वापराबद्दल उग्गीच अढी बसलेले शहरी लोक त्याला हीन समजतात. बाकी काही नाही.

नाव आडनाव's picture

11 Sep 2014 - 1:23 pm | नाव आडनाव

लई वेळा सहमत!

एस's picture

11 Sep 2014 - 1:39 pm | एस

आगदी आगदी ह्येच् म्हनाया आलतू. 'माह्यं पोर ते! आसं ब्वॉटं कानावं कडाकडा मोडणारी मायाळू म्हतारी कंदी बघीटल्यी न्हाय की काय?

कवितानागेश's picture

11 Sep 2014 - 12:12 pm | कवितानागेश

पोरवडा या शब्दामुळे कदचित पोर हा शब्द हीन झाला असावा.

मधुरा देशपांडे's picture

11 Sep 2014 - 12:14 pm | मधुरा देशपांडे

मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण अनेक भागात हा शब्द सहज वापरला जातो. माझ्या घरी आणि आजूबाजूला सुद्धा मी लहानपणापासून हे शब्द ऐकले आहेत. मुलगा/मुलगी आणि पोरगा/पोरगी दोन्ही शब्द वापरले जातात. यापैकी कुणीही पोरका या अर्थाने मुलांकडे बघणारे नाहीत. तो शब्द रुळला आहे सहज. लिखित मराठीत माहीत नाही, पण बोलीभाषेत हा शब्द चुकीचा वाटत नाही.

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 12:18 pm | बॅटमॅन

यग्जाक्टली असेच म्हणतो. बोलताना हे शब्द सहज वापरले जातात. त्यांना जज करणे चूक आणि अज्ञानमूलक आहे.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 2:54 pm | वेल्लाभट

असं? मग मी एखाद्याला भो*** म्हटलं तर त्याला शिवी म्हणून जज करणं चूक आणि अज्ञानमूलक आहे का हो?

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 3:06 pm | यसवायजी

चूक-बरोबर काही नाही. रां**सुद्धा प्रेमानं म्हणता येतं कोल्लाप्रात. आणी 'सदाशीवपेठी/खडकी-दापोडी' ही शिवी असू शकते पुण्यात.

स्थळ, काळ, व्यक्ती ब्ला ब्ला...

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 3:43 pm | बॅटमॅन

एक इनोसंट संबोधन आणि शिवी यांचा बादरायण संबंध जोडून मुद्दा भलतीकडे वळवणे जितके अज्ञानमूलक आणि चूक आहे त्यापेक्षा कमीच. :)

पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे ऐकून घ्यायची इच्छाच नाही त्याला इलाज नाही. चालूद्या.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:20 pm | वेल्लाभट

माफ करा;
माझ्या धाग्यात मला 'गावठी' हा शब्द शोधून दाखवावा आपण, आणि मग

पोर = वैट्ट गावठी इ.इ. तुम्ही अगोदरच ठरवून टाकल्यामुळे

असं म्हणावं.

काउबॉय's picture

11 Sep 2014 - 10:16 pm | काउबॉय

इट्स प्रोनाउन्स्ड अस प्वार आट मोस्ट ऑफ़ धी प्लेसेस ;)

मार्मिक गोडसे's picture

11 Sep 2014 - 12:28 pm | मार्मिक गोडसे

पोरंबाळं कशी आहेत असे खेड्यात सहज विचारले जाते.

त्याच खेड्यात एखादीला मूलबाळ आहे कि नाही असेही विचारले जाते.

पोरकीडे (धान्यात असतात काळ्या रंगाचे) त्यांचा आणि पोरांचा याचा काही संबंध आहे का? ;)

टवाळ कार्टा's picture

11 Sep 2014 - 1:34 pm | टवाळ कार्टा

आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच ;)

>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो अगदी तस्साच

हो, बालूशाहीत बालू, गुलाबजामात गुलाब, श्रीखंडात श्री (होणार सून मी धा घरची फेम), सीताफळात सीता हे राह्यलं. ;)

आसिफ's picture

11 Sep 2014 - 10:44 pm | आसिफ

>>> सीताफळात सीता हे राह्यलं.

सिताफळावरुन उगाचच सिताफळ ईडली (मुक्तपीठ फेम)आठवली. पाककृती आहे का कुणाकडे ? :D

~आसिफ.

एस's picture

11 Sep 2014 - 1:35 pm | एस

काय पोरकट प्रश्न आहे! :-)

मूलकट पण नाय बसत. हलकट वाटतं =))

सुहास..'s picture

11 Sep 2014 - 3:22 pm | सुहास..

मूलकट >>

=))

विसर्ग केल्यावर जरा वेगळ्या अनुभुती ची प्राप्ती होवु शकते अशी नोंद करण्यात येत आहे ;) ...असो ...वरील शब्द बर्‍याच धाग्यांना अतिशय अनुचित (फिट्ट ) बसेल :)

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 1:49 pm | यसवायजी

"हा काय मूलखेळ वाटला काय?"
कुछ जमेगा नही. पोरखेळच बराय.

बरेच प्रश्न पडतात तुम्हाला हल्ली ब्वा

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही शब्द मराठीचे शब्दभांडार आहेत. एका अर्थाचे अनेक शब्द भाषेचे श्रीमंतीचे लक्षन असते आणि त्या त्यांचा उपयोग अनेक भावनांच्या अनेक छटा व्यक्त करायला आणि लेखनात / बोलण्यात वेगवेगळ्या वातावरण निर्मिती करायला उपयोगी पडतात... किंबहुना त्या समानार्थी शब्दातला भावनेला/परिस्थितीला अनुरुप शब्द आपोआप आपल्या वापरात येतो.

उदा.

१. खेडेगावातील अशिक्षित माय (आई नाही !) "माजं पोर" असं न म्हणता "माझा पुत्र / मुलगा" असं म्ह्णणे खटकेलच, विनोदीही वाटू शकेल.

२. शहरातली शिकलेली बाई सुद्धा रागावलेली असताना बहुदा "जमत नाही पोरांना सांभाळायला तर... " असंच म्हणून आपला राग व्यक्त करते. तर यासंबद्धात नियतकालिकात लेख लिहीताना ती, "आपल्या मुलांची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे." असे लिहेल.

केदार-मिसळपाव's picture

11 Sep 2014 - 4:49 pm | केदार-मिसळपाव

पालक आमच्या वेळी भाजी होती हो...

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:54 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

"आमच्या पाल्याला" म्हटले की परसातली पालेभाजी वैग्रे आठवत असे क्वचित कधी ते आठवलं.

ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते. पोर अर्थात लेकरं यांच्याविषयी काळजी त्या वाक्यात उमटलेली असते असे मला वाटते. ग्रामीण बाजाचा हा शब्द हळुवार भावना घेवून येतो. मुलं हा शब्द ओठातून तर पोर किंवा लेकरू हा शब्द पोटातून (हृदयातून/मनातून) येत असावा याची जाणीव मला होत राहते 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? सगळीकडे आईची माया एक सारखीच मात्र 'आय' हा शब्द उच्चारताना मनाला आपुलकी, माया, ममता यांची जी जाणीव होते ती मोठी असावी असे मला नेहमी वाटते. आणि म्हणून मला शहरात सुद्धा पोर किंवा लेकरं या शब्दाचा वापर करताना आपल्याला घाटी म्हणतील या गोष्टीचा न्यूनगंड येत नाही.
प्रसिद्ध लेखक श्री. शंकर पाटील यांचे साहित्य अश्या ग्रामीण शब्द रत्नांनी भरून गेले आहे, त्याचे वाचन करण्याचे मी येथे आवाहन करतो.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 2:52 pm | वेल्लाभट

पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत. साहित्यात जे आहे तेच प्रमाण असं होत नाही.

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 3:47 pm | बॅटमॅन

मग पोरा इ. शब्द प्रेमाने वापरणारे लोक सगळे चु* आहेत का, त्याचाही खुलासा करावा.

आणि झालंच तर, निव्वळ चार टाळकी म्हणतात म्हणून त्या शब्दाचा अर्थ तो होतो असे बाकीच्यांनी का मानावे? या तथाकथित हुच्चभ्रू तुच्छतादर्शक मानसिकतेचा निषेध असो.

आता बघा, असे म्हटले की चर्चा लगेच डिफ्लेक्ट करणारच. ग्रामीण म्हणजे आदरहीन तर शहरी म्हणजे आदरयुक्त इ. हास्यास्पद बायस डोक्यात असलेले लोक ही मराठीची खरी शोकांतिका आहे.

एखाद्या शब्दाचा अर्थ कालौघात बदलत जातो, आणि डिक्षनरी अर्थापेक्षा प्रचलित अर्थच महत्त्वाचा असतो व्यवहारात हे साधे तत्त्व लक्षात न घेता समाजाला हाड थू म्हणण्याची ही जी वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती आहे तिला आवर घालणे वेळीच गरजेचे आहे. मिपावर असली तर्कटे अधूनमधून दिसतात ते पाहून वाईट वाटतं. मिपाच्या मोकळ्या इमेजला हे अगदीच विसंगत आहे.

आदूबाळ's picture

11 Sep 2014 - 3:57 pm | आदूबाळ

+१

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:22 pm | वेल्लाभट

उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ नाही.

मी शब्दाच्या अर्थाबद्दल मत विचारतोय; कुणाला उगाच चु* कशाला ठरवताय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते.

ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.

लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर 'ज्याचे आईवडील जिवंत नाहीत त्याला असं म्हणतात' हे ऐकलेलं आठवतंय. बाकी माहीत नाही.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 2:50 pm | वेल्लाभट

तेच.

लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर

अहो, ते पोरका/पोरकी असे असेल..

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2014 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा गैरसमज या गैरसमजूतीच्या मागे असावा असेच वाटते आहे :)

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 2:49 pm | वेल्लाभट

अर्थ लक्षात न घेताच वापरायचा असेल शब्द, आणि तोच्च बरोबर मानायचा असेल तर... हेहे ! आनंद आहे मग.
शहरात्/गावात चा प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटतं/पटतं चा प्रश्न आहे. असो.

मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले जाणारे बरेच शब्द मराठीत आहेत.
उदा: हौस हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे तो फार्सी शब्द " हवस" हा आहे. हा अर्थ लक्षात घेतल्यावर तुम्ही म्हणाला का कोणाला की अमूक तमूक फार हौशी आहेत म्हणून?

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 2:51 pm | वेल्लाभट

पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत.

एस's picture

11 Sep 2014 - 3:07 pm | एस

माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं.

ही तुमची समजूतही तितकीच निरर्थक, निराधार आणि साफ चुकीची आहे.

यसवायजी's picture

11 Sep 2014 - 3:09 pm | यसवायजी

+ मोदी ;)

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 3:53 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो.

या समजुतीस आधार काय तर सांगोवांगी! आयव्हरी टॉवरवाली तुच्छता मानसिकता दिसते, दुसरे काही नाही. इतकाच कळवळ आलाय तर निव्वळ डिक्षनरी मीनिंग तरी का म्हणून फॉलो करावे हे सांगा. अन डिक्षनरी तरी बनवली कशावरून? माणसांना विचारूनच ना? मग कशाला फालतूचा कळवळा?

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:26 pm | वेल्लाभट

हे बाकी बरोबर म्हणालात. डिक्शनरी ला अर्थच नाही. आपल्याला आवडेल तो शब्द आवडेल त्या अर्थाने आवडेल तेंव्हा आवडेल त्याला उद्देशून वापरायचा. हाय काय न्न नाय काय !

प्राणी फुल्ल कशाला उकाळा कडकलक्ष्मी उदित नारायण.
(याचा अर्थ तुम्ही सॉलिड विद्वान आहात)

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:38 pm | बॅटमॅन

आक्रस्ताळेपणामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. बहुसंख्य लोकांनी एखादा शब्द एखाद्या अर्थाने वापरला, तर तोच अर्थ रूढ होतो. याची इतिहासात कैक उदाहरणे आहेत. उदा. थेरडा या शब्दाचं पाहू. त्याचं मूळ आहे संस्कृतातला स्थविर हा शब्द. ज्ञानवृद्ध इ. छापाचा सन्माननीय अर्थ आहे त्याचा. अर्थ तोच ठेवून प्राकृतात तो शब्द थेर म्हणून आला आणि मराठीत मात्र त्याचा अपमानास्पद थेरडा झाला.

मग मराठी अर्थ चूक की बरोबर? मराठीपुरता त्याचा अर्थ सन्माननीय मानणार्‍यांची बहुसंख्या आहे काय? तर नाही. पण उद्या कधी झाली, तर हा शब्दही पुन्हा सन्माननीय अर्थाने वापरणे रूढ होईल.

तीच गोष्ट मर्द या शब्दाची. त्याचा वरिजिनल फारसी अर्थ 'मर्त्य' हाच आहे. किंबहुना तो शब्द हा संस्कृतच्या मर्त्य चाच कॉग्नेट आहे. त्या शब्दाला इतकं ग्लॅमर प्राप्त झालं असलं तरी तो त्याचा मूळ अर्थ नव्हे. पण व्यवहारातला अर्थ कालांतराने दृढमूल होतो.

अहो मग हे असंच तुम्ही आधी सांगू शकला असतात. आक्रस्ताळेपणा कशाला उगीच?

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:46 pm | बॅटमॅन

वरिजिनल दाव्याला सांगोवांगीपलीकडे विदा न देता भेदभाव पाहिल्यामुळे तसे जाहले, येकडाव मापी करा जमल्यास...

तूर्त मोल्सवर्थचा दुवा पहा.

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=304&table=moleswo...

पोर [ pōra ] n A child. Pr. पोरा आणि बुद्धि तेरा Children are fickle and flighty. 2 m A little boy. 3 f A little girl. 4 n Applied to a pup, cub, whelp &c.

पिंपातला उंदीर's picture

11 Sep 2014 - 5:25 pm | पिंपातला उंदीर

सह्मत. आमच्या परभणी भागात आई वडिलाना आमच म्हातार / आमची म्हातारी अस बोलण्याची पद्धत आहे . विशेषता बहुजन समाजात . पण त्यात तुच्छता नसून एक अकृत्रिम जिव्हाळा असतो

भिंगरी's picture

11 Sep 2014 - 7:11 pm | भिंगरी

म्हातारा/म्हातारी बरी आहे का?असं विचारलं जातं
त्याचा अर्थ आई/वडील किंवा सासू/सासरे बरे आहेत का? असा होतो.

मला हे असे वाटतं असे मी म्हणालो याचा अर्थ तो तुम्हाला पटलाच पाहिजे असे थोडेच आहे. ग्रामीण शहरी असे नाही मात्र कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. हा ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे.
पोर म्हणजे ममता आणि मूल म्हणजे शहरी काहीतरी.... वगैरे साफ चुकीच्या समजुती आहेत.
या बाबतीत माझी समजूत तुम्ही म्हणताय तशी चुकीची असू शकते त्याला जपतच जगत आलोय याचा खेद मुळीच नाही.
असो !

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:24 pm | वेल्लाभट

अच्छा आवडीचा विषय! ब...र !

चला अध्तम संपलं णी शहरी गावठी वाद सुरु झाला
कलाकार तेच =))

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 4:27 pm | सौंदाळा

पोरं (का मुलं?) लई दंगा करु लागलीत धाग्यावर
पोरी अजुन मागे कशा?

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:27 pm | वेल्लाभट

शब्दांच्या अर्थावर प्रश्न केला तर बिनातिकीट गावाला पोचली मंडळी !
धन्य धन्य धन्य !

मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम 'पौर' ह्या संस्कृत शब्दापासून झालाय. पौर म्हणजे राजाची प्रजा.
प्रजा ही राजाला पुत्रासमान. पौरचे प्राकृत रूप पोर असे होते.

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:31 pm | बॅटमॅन

लिट्रल मीनिंगच पायजे तर हे घ्या म्हणावं. मूळ प्राकृत अर्थापासून वेगळा अर्थ घ्यावयाची जुर्रत होणे आणि तो वेगळा अर्थच बरोबर असे सांगून बोंबा मारणे हे अतिशय रोचक आहे. यावरून दिसते की तथाकथित वाईट अर्थ हाच उपटसुंभ आहे आणि जन्ता सगळी वरिजिनल प्राकृत अर्थच नीट वापरत आहे.

आता बोला, कुणाचे चुकले? =))

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:35 pm | वेल्लाभट

तुम्हाला होता का माहित अर्थ?
जर हो.... तर सांगायचा होतात... माझंच्च्च बरोबर असा सूर धाग्यात नाही.
जर नाही.... तर तुम्हीही तुमचीच समजूत बरोबर मानून चालत होतात ना? मग तुम्ही वेगळे ते कसे?

जर यापैकी काहीही नाही; तर वल्लीशेट म्हणतात तोच्च्च बरोबर अर्थ आहे किंवा नाही याची खातरजमा करयाचा विचार केलात का? की सूर्य म्हणाला पूर्व....म्हणजे पूर्व?

स्पा's picture

11 Sep 2014 - 4:36 pm | स्पा

ब्यतयन लै शन बन्तो क..

मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?

मला तोवर लक्षात आले नव्हते. खातरजमा मी केलेली आहे म्हणूनच त्याला हो म्हणालो.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:44 pm | वेल्लाभट

संपला विषय ! उत्तर मिळालं मला. आभारी आहे.

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:32 pm | वेल्लाभट

असा एकतरी प्रतिसाद आला.
धन्यवाद; ही माहितीतली भर आहे माझ्या.

ज्येन्युनली विचारतोय !! अरे मग प्राधीकरण चा उगम कशापासुन झाला आहे ? ...;)

प्रचेतस's picture

11 Sep 2014 - 4:36 pm | प्रचेतस

प्राधीकरण हा माझ्या माहितीप्रमाणे सावरकरांनी सुचवलेला शब्द आहे (चुभूदेघे)

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 4:49 pm | बॅटमॅन

असे वाचल्यासारखे वाटते. पाहिले पाहिजे.

तिमा's picture

11 Sep 2014 - 4:42 pm | तिमा

माझ्या जन्माचा दाखला हवा होता म्हणून अनेक वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. ओरिजिनल कागद पानशेतच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांनी मग अमुक अमुक बाईंना पोरटे जन्मले, असा मजकूर असलेले एक सर्टिफिकेट आमच्या हाती सोपवले. ते वाचून त्यावेळेस आमची आई पुणे महानगरपालिकेला हंसली होती.

या विषयाच्या निमित्त्ताने: सध्या वर्तमानपत्रांत लहान मुलींचा उल्लेख 'चिमुरडी' असा करतात. उदा. 'चिमुरडीवर बलात्कार'. याठिकाणी त्यांना 'चिमुकली' हा शब्द जास्त सौम्य वाटत नाही का ? म्हणजे आधीच अत्याचार झालेला आणि त्यांत 'चिमुरडी' म्हणून हिणवल्यासारखे वाटते.

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 4:47 pm | सौंदाळा

+१
गळा चिरुन हत्या, पक्षातुन हकालपट्टी वाचुन पण असेच विचित्र वाटते.

आदूबाळ's picture

11 Sep 2014 - 5:12 pm | आदूबाळ

+२

"छोटेखानी" लेख/मुलाखत वगैरे वाचून छोटेखान या काल्पनिक ड्वार्फचं चित्र डोळ्यांसमोर येतं.

बॅटमॅन's picture

11 Sep 2014 - 5:13 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

खरंय.

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 4:46 pm | सौंदाळा

नेहमी संयत भाषेत प्रतिसाद देणारे वेल्लाभट यावेळी चवताळलेले पाहुन आश्चर्य वाटले. (ढोलाच्या धाग्यावर लोकांनी यापेक्षा जास्त टीका करुनही तेव्हा खुपच संयत प्रतिसाद होते)
१०० क्लब मधे जाण्याची / राहण्याची तयारी म्हणायची का ही?

वेल्लाभट's picture

11 Sep 2014 - 4:50 pm | वेल्लाभट

नाही ब्वा ! :D अशी तयारी बियारी नाही हं.
ते आपलं; पुढच्याने आपल्या सर्व्हिसला स्म्याश मारला की आपण पण त्याच्या सर्व्हिस ला स्म्याश मारतो ना... तसं काहीसं.

सौंदाळा's picture

11 Sep 2014 - 4:56 pm | सौंदाळा

हेच चुकते तुम्हा लोकांचे स्मॅश मारला की बर्‍याचदा प्वाईंट संपतो तिकडेच.
तुम्ही स्क्वॉशची प्रॅक्टीस केली पाहिजे. गेम बराच वेळ चालु राहतो. ;)

(स्क्वॉशसाठी मिपाच्या जाणत्या लोकांचे शिष्यत्व घेण्याच्या विचारात असलेला) सौंदाळा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2014 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्मॅश मारणं बॅडमिंटन आणि टेबलटेनिसमध्येही होतं. लॉन टेनिसमध्ये फारसं दिसत नाही, पण तोच शब्द वापरतात. भारतीय लोक (उकडलेला बटाटा, इ.) कुस्करण्याला इंग्लिश आणि हल्ली मराठीमध्येही स्मॅश म्हणतात. (बाकीच्या देशांमध्ये इंग्लिश शब्द मॅश).

ही उगाच आपली माहितीची देवाणघेवाण.

सुहास..'s picture

11 Sep 2014 - 4:59 pm | सुहास..

बोला श्री शब्दबंबाळी पाल्हाळेश्वर महाराSSज कीSS जय ;)

कितीची सुपारी हो वेल्लाकाका?

विजुभाऊ's picture

11 Sep 2014 - 5:21 pm | विजुभाऊ

शब्दबंबाळ हा शब्द योग्य अर्थाने आला आहे.
काही शब्द उदा : "वकूब" या मराठी शब्दाचा मूळ फार्सी शब्द वकूफ = शिक्षण हा आहे
अवांतर " पास हा शब्द इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेत ठेवायचा?

एस's picture

11 Sep 2014 - 5:31 pm | एस

मराठीत.

पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ लागलेत.
चालुद्या.
पोर,मुल,कार्ट या शब्दाने काही फरक पडत नाही.
(असे मानणारा)जेपी

विअर्ड विक्स's picture

14 Sep 2014 - 9:58 am | विअर्ड विक्स

पोर या शब्दावरून पोरकट वाद घालून काय पोरखेळ चालवलाय!!!!!!!!

अर्थ काहीही असो , पोर या शब्दावरून प्रौढातील पोरकटपणा मात्र नक्की ठळक दिसला….

प्यारे१'s picture

14 Sep 2014 - 12:25 pm | प्यारे१

आमची धाग्याला पोरकट भर!

साती's picture

14 Sep 2014 - 12:54 pm | साती

गळ्यान साखळी सोन्याची ह्या सुप्रसिद्ध लोकगीतात 'ही पोरगी कोणाची?'असेच विचारले आहे.
या गीतातच तिच्या आईवडिलांच्या शारिरीक ठेवणीचे, स्वभावाचे वर्णन येते. यावरून ती अनाथ नसून आईवडिलांसह रहाते असे अनुमान काढण्यास जागा आहे.
'आईस बी कडकी नी बापूस बी कडका ही जाडी पोरी कोणाची '
तसेच यावरून आईवडिलांकरिता आईस बापूस हा शब्द वापरला जातो, शिवी म्हणून नव्हे हे ही सिद्ध होते.

--संदर्भ महाराष्ट्र संस्कृती आणि भाषाकोश : लेखिका- डॉ साती काळे.

पैसा's picture

14 Sep 2014 - 1:41 pm | पैसा

तुमच्या संशोधनाला पूरक असे माझेही संशोधन आहे

गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय

या जगप्रसिद्ध गाण्याच्या शेवटच्या कडव्यात

आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर
पोरीचा बापूस कवटं चोर

असा उल्लेख आहे. म्हणजे पोर बापूस आणि कवटं हे तिन्ही शब्द ग्रामीण समाजमनात किती घट्ट मूळ धरून आहेत हे सहज समजून यावे.

-प्रा. डॉ. किती शहाणे

एस's picture

14 Sep 2014 - 10:15 pm | एस

प्रा. डॉ. ??? आपण प्रा. डॉ. असं म्हणालात का?

हम्म्म्...

पैसा's picture

14 Sep 2014 - 10:19 pm | पैसा

सातीने नुसतंच डॉ. लिहिलंय. मग मी तिच्याहून जास्त म्हणून दाखवायला नको? :-/ :P :D

एस's picture

14 Sep 2014 - 10:47 pm | एस

मूळ प्राडॉ यांचे बिरूद काढून आपणांस देण्यात येत आहे. प्राडॉ पैसातैकी जय. :-)

पैसा's picture

14 Sep 2014 - 10:54 pm | पैसा

नको नको! ते पोरं हाकायचं काम प्रा.डो. मस्त करतात. आपल्याला नाही झेपायचं ते!

अजया's picture

14 Sep 2014 - 2:03 pm | अजया

=))

आगाऊ म्हादया......'s picture

14 Sep 2014 - 6:08 pm | आगाऊ म्हादया......

batman आणि वेल्लाभट यांना..
तशी चांगली चर्चा रंगली..batman यांनी दिलेला धागा पण आवडला..सहज मनात एक प्रश्न आला...
कि आज आपण म्हणतो कि बोली भाषेतला अर्थ महत्वाचा वगैरे...ठीक आहे...(कि हा 'की' असा हवा होता,) पण आता अनेक शब्द आपण अनेक वेगळ्या अर्थाने वापरत आहोतच,"भावना पोहोचल्या पाहिजेत, भाषेची निर्मिती त्यासाठीच आहे...." हे सगळं पटत..पण आपण आज जी भाषा वापरतो , ती आपल्याला आपल्या पूर्वजांची देणगी आहे...समृद्ध होण वेगळं आणि हे असे शब्द मिळण वेगळं ना...
मला असा प्रश्न पडलाय की, आज नंतर लाखो वर्षांनी जेव्हा प्रलयानंतर आपला लिखाण उत्खनन करून काढलं जाईल, तेव्हा किती नवीन शब्द त्यांचे अर्थ कसे शोधतील?? फक्कड, सोम्डीत कोंबडी, वंटास, भिख हे अस..
म्हणून जरा भाषा आहे तशी वापरत राहावी असं वाटत मला..

यावर उपाय काय?? फारसी ,उर्दू या अनेक भाषांच्यामुळे आपल्याकडे अगदी मस्त शब्द रुळले आहेत. पण सध्या भाषा ज्या गतीने ट्रान्झिशन फेज मधून सरकतीय ते सहन नाही होत...

श्रीरंग_जोशी's picture

14 Sep 2014 - 8:03 pm | श्रीरंग_जोशी

माझे एक निरीक्षण आहे. शिक्षणानिमित्त किंवा नोकरी / व्यवसायानिमित्त स्वतःच्या गावापासून लांबच्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केल्यास बोलिभाषिक सहिष्णुता आपोआप वाढते.

माझ्या सुदैवाने शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहायला मिळाले जिथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून लोक शिकायला अन शिकवायला आले होते.

बोलीभाषा समजून घेणे होत असेल पण सहिष्णुता वाढेलच असे नाही.