आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
22 Jul 2014 - 1:42 pm
गाभा: 

अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का? म्हणजे पिवळ्या रंगाला मूळ रंग न म्हटल्याने कोणाची अस्मिता आहत होत असेल काय? काय अस्मिता नि काय सामान्य प्रेम, आत्मियता, आदर असा भेद कसा करायचा? हे सारे प्रश्न क्लिष्ट आहेत. उत्तर वाटलं तर द्या.

पण तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगू शकताच. तुम्हाला जनास्मिता संकुचित वाटतात का? नाहीतर का नाही? तुमच्या कोणकोणत्या अस्मिता आहेत नि का आहेत? त्या देखिल संकुचित आहेत असे प्रामाणिकपणे मान्य कराल का?

माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे -

माझे छोटेखानी जग (हे लिहायची गरज नसावी), भारतीय ग्रामीण जीवनपद्धती (सर्वोच्च), माझा प्रांत (मराठवाडा), पारंपारिक ईश्वरप्रणित व धर्मप्रणित कौटुंबिक व सामाजिक जीवनाची संकल्पना, मानवी तंत्रज्ञानाची प्रगती.

जशा माझ्या काही अस्मिता आहेत, तसाच काही अस्मितांबद्दल माझ्या मनात बर्‍यापैकी हिनभावना आहे. हिन नाही म्हटले तरी राग तरी आहेच आहे. त्या अशा -

नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन.

कोणत्या अस्मितांना आपला दृढ विरोध, हिनभाव, द्वेष, इ इ आहे?

प्रतिक्रिया

एस's picture

22 Jul 2014 - 2:07 pm | एस

एक पाटलांची होती, बॉयकटवाली. पण आडनाव पाहून आमचं अवसान गळपटलं होतं त्याकाळी. नको त्या आठवणी! जीवनभौंच्या कथा वाचाव्या लागणार आता उतारा म्हणून... :-(

(कृहघ्या!)

जळगावला कधी धावती भेट दिली होती का हो स्वॅप्स सर ?

एस's picture

22 Jul 2014 - 6:49 pm | एस

पण जळगाववाले पुण्यात येत असत अधूनमधून. *man_in_love* बाकी माऊंनी दटावल्याप्रमाणे आम्ही आमची अस्मिता अजिबात उघड करून दाखवणार नाही. *secret*

विटेकर's picture

22 Jul 2014 - 2:35 pm | विटेकर

.
.
.
.
.
कळ एक जीव घेणी आमच्या उरात आली !.

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 3:13 pm | कवितानागेश

अशा आपल्या अस्मिता इथे उघड करणं डेन्जरस होणार नाही का?

एस's picture

22 Jul 2014 - 3:24 pm | एस

खरंच की!
अशा >>> म्हणजे कशा?
आपल्या >>> आपापल्या!
इथे >>> ह्म्म्म्
डेन्जरस >>> धोका समजला...! आमचा पहिला प्रतिसाद उडवा हो प्लीज!!!!!!!!!!! ;-)

ज्या अस्मिता स्वतःसोबत जाहिरपणे घेऊनही जाता येत नाहीत त्या सच्च्या अस्मिता नव्हेत वा तो (ती) सच्ची अस्मिताधारी नव्हे.

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 4:19 pm | कवितानागेश

प्रत्येक सच्ची गोष्ट जाहीर कशाला करायला हवी?

विटेकर's picture

23 Jul 2014 - 10:20 am | विटेकर

काल विटुकाकूने विचारले ना .. कोण रे ही अस्मिता म्हणून !
बाब्बौ.. कशी-बशी वेळ मारुन नेली ...
च्यायला लोक पण ना.. काहीही धागे कहाडतात.. लोकाले कायं...
....

अरुणजी,
नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन.

यातला एकही शब्दार्थ कळलेला नाहि!
असे मोघम शब्द विस्कटुन सांगा कि राव.....

arunjoshi123's picture

22 Jul 2014 - 4:54 pm | arunjoshi123

१. नागरभाव = आपण शहरी, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत, कळते लोक आहोत नि खेड्यात/जंगलात राहणारे लोक मूर्ख, अज्ञानी, दु:खी जीवन जगणारे, ज्यावर दया वा कीव यावी असे जीवन जगणारे, अभागी, गरीब, इ इ आहेत असा माझ्या भोवतीच्या शहरात जन्मल्या वाढलेल्या काही लोकांचा, क्वचित प्रसंगी तुच्छतेचा, भाव.
२. जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च)- आर्थिक नेट वर्थ अधिकतम करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट मानून, काही सुखे प्राप्त करण्यासाठी बरीच अन्य सुखे न विचार करता त्यागण्याची वृत्ती. मूल्येच नसणे. मूल्ये दृढ नसणे. वाईट मूल्ये असणे.
३. मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था - तंत्रज्ञानामुळे मानवांच्या गरजा गतकाळापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी काँप्लेक्स संस्था असायला हव्यात. म्हणजे मला टीवी आवडत असला तरी मी घरात बनवू शकत नाही नि प्रोग्राम्स देखिल घरात बनवू शकत नाही. मग देवाणघेवाणीसाठी जी व्यवस्था नि नियम बनवले आहेत तिचे अनपेक्षित नि वाईट परिणाम मूळ उद्देशांपेक्षा जास्त आहेत. उदाहरण म्हणून बिस्किटपुड्याच्या किमतीत एकूण किती कर आहे नि किती श्रममूल्य/मार्जिन्स कोणाकोणाच्या आहेत याचा पाई चार्ट रोचक ठरावा.
३. नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था- न्यायदानात नैतिकतेला जागा नाही. जेव्हा कायदे बदलतात तेव्हा मूल्ये बदलतात कि प्रोसिजर्स? शिवाय सगळी शुद्ध पोथिनिष्ठा आहे.
४. मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था - कोणी राज्य करावे, कसे कसे करावे, इ इ बद्दलचे विचित्र नियम. राज्यकर्ते कसे निवडावेत, ते काय काय करू शकत नाहीत, इ इ बद्दलचे नियम.
५. बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान - विज्ञानातल्या जितक्या गोष्टींचे वास्तवात उपयोजन झाले आहे त्याला नि ज्याचे होऊ शकते त्याला मी तंत्रज्ञान म्हणतो. वर सांगीतल्याप्रमाणे ती माझी पॉझिटीव अस्मिता आहे. पण विज्ञान जेव्हा अबस्ट्रॅक्ट डोमेन मधे जाते तेव्हा गडबड होते. तिथेही "प्रयोगशाळेतील" विधानांबद्दल माझी काही हरकत नाही. पण वैज्ञानिक शोध मानवतेला लावताना जी सबूरी हवी ती आढळत नाही. याने मानवी मूल्ये योग्य दिशेने बदलत आहेत का हे कळत नाही हे एक. दुसरे म्हणजे कल्याणात्मक विज्ञानाच्या जागी विज्ञान + अर्थकारण + राजकारण यांचा डेडली काँबो वापरून स्वार्थ साधणे.
६. आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन - नंतर कधीतरी सांगेन.

कृपया लक्षात घ्या कि माझा हा सगळा अस्मिताद्वेष हा आधुनिक मानवी संस्थांतील फ्रॉडशी नाही. त्याबद्दल न बोलणेच उचित. माझा विरोध फक्त विशुद्ध स्वरुपात वरील तथाकथिक चांगल्या संस्थांना जे अभिप्रेत आहे त्याला आहे.

आयुर्हित's picture

22 Jul 2014 - 8:46 pm | आयुर्हित

मनूष्य हा एक प्राणिच आहे. त्यामूळे तो मूळात स्वार्थीच असणार आहे. त्यासोबत तो जन्मतः अज्ञानी देखिल आहे. परंतू त्याला योग्य वेळी योग्य ते ज्ञान व मार्गदर्शन मिळाले तर तो नक्किच आपल्या आजुबाजुचे जग बदलवू शकतो हे ही तितकेच खरे आहे. यातील काही उदाहरणे देणारे निवडक धागे मिपावर आहेतच कि.

एक एक मनूष्य एकत्र येवुनच समाज बनत असतो. जर एक एक मनूष्य जर ज्ञान मिळवण्यासाठी आग्रही असेल तर तो समाजही प्रगतिशिल असणार आहे.

मूलभुत प्रव्रुत्ती समजुन न घेता जर अशा अज्ञानी व अनुभवहीन समाजाकडुन फक्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्या वाट्याला अपेक्षाभंगाचे दु:ख हे येणारच! त्यापेक्षा ह्या सार्‍या गोष्टी कशा लवकरात लवकर बदलता येतील हा सारासार विचार व त्यावर कार्यवाही देखील प्रत्येकाकडुन आवश्यक आहे.नाहीतर आपले हे सारे मुद्दे फोल ठरतील.

आपण मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर एक वेगळा धागा काढला तर सोदाहरण अजुन विस्त्रूत प्रतिसाद देता येइल.

साती's picture

22 Jul 2014 - 6:19 pm | साती

हीन अस्मिता काय त्या कळल्या नाहीत.किंवा त्या शब्दांना अस्मिता म्हणावे का ते ही कळले नाही.

असो.
सध्या कुठल्याही अस्मिता नाहीत.
ज्याला तुम्ही माझे छोटेसे जग म्हणता तसे छोटेसे जग आहेच.
पण त्याबद्दल 'प्रेम' वाटते. अस्मिता वैगेरे नाही.उद्या कुणी तुझ्या मुलाला पटकन काही समजत नाहि म्हटलं किंवा नवर्यातील असलेले फोष दाखविले किंवा हॉप्सिट्लातल्या एखाद्या खरोखर असलेल्या गैरसोयीबद्दल बोलले तर माझ्या अस्मिता दुखावणार नाहीत.

फार फार पूर्वी स्वतःचा प्रांत, भाषा, धर्म , जात आणि स्त्रीत्व याबद्दल थोड्याफार अस्मिता होत्या, आता त्या काहिही राहिल्या नाहीत.
:)

साती's picture

22 Jul 2014 - 6:20 pm | साती

फोष नाही दोष

समीरसूर's picture

24 Jul 2014 - 11:20 am | समीरसूर

आवडला.

मराठी असल्यामुळे मराठी लोकांनी मराठी लोकांशी मराठीतच बोलावे, घरातल्या इंग्रजी शाळांत शिकणार्‍या मुलांनादेखील व्यवस्थित मराठी लिहिता-वाचता यावे, बाहेर कुठेही मराठीची खिल्ली उडवली जाऊ नये, मराठी वाचनाला कमी लेखले जाऊ नये, सरसकट हिंदीच्या प्रभावाखाली आपली मराठी ओळख पुसली जाऊ नये, वगैरे मनोमन वाटते. यात अस्मितेचा भाग किती नक्की सांगता यायचे नाही पण मला वाटते जे आपल्याला व्यवस्थित येते त्याचा आग्रह धरणे ही काय अस्मिता असू शकत नाही. आणि मराठी असलो म्हणून अमराठी व्यक्तीशी अट्टहासाने मराठीच बोलण्याचा अस्मिताकळस नसावा असे वाटते. किंवा महाराष्ट्रात असणार्‍या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा बालिश आग्रहदेखील नाही. मी बेंगळूरुला होतो तेव्हा मी कन्नड शिकलो होतो का? नाही! मग मी अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. पण सलग १०-१५-२० वर्षे महाराष्ट्रात राहणार्‍यांना नेहमीच्या बोलीतली मराठी नेटकी यावी ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. पण म्हणून इतर भाषांचा राग नाही. हे माझ्या भाषेवरचं प्रेम झालं कारण मी मराठीच बोलत आलोय जन्मापासून. साहजिकच मी मराठीमधून सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकत असेन तर माझे त्या भाषेवर प्रेम असणारच. हे प्रेम ठीक आहे पण अस्मितेच्या नावाखाली बालिश अपेक्षा ठेवणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते.

एक मित्र माझी इमारतीबाहेर वाट बघत उभा होता. मी बाहेर आलो आणि म्हटलं, "चला, जाऊया". आम्ही निघालो. पाऊस पडत होता. मी म्हटलं, "अब कैसे जायेंगे भैय्या?". त्याला राग आला. मी अगदी सहजच हे वाक्य बोललो होतो. तोडणारी अशी निरर्थक अस्मिता नसलेलीच बरी.

१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व
२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा
३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज
४)भारताचा जाज्वल्य इतिहास
५)आपण सारे भारतिय नागरीक.
६)महाराष्ट्राची संत परंपरा
७)मराठी भाषा

भृशुंडी's picture

23 Jul 2014 - 2:49 am | भृशुंडी

१)आसेतू हिमाचल अखंड भारत व भारताचे सार्वभौमत्व
४)भारताचा जाज्वल्य इतिहास
५)आपण सारे भारतिय नागरीक.

समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?

२)विज्ञाननिष्ठ हिंदू धर्म व धार्मीक परंपरा
३)हिंदवि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज

समजा तुम्ही केरळात किंवा आसामात अहिंदू (मुसलमान, ख्रिश्चन, यहुदी) जन्मला असतात तर वरच्या वाक्यांत तदनुरुप बदल झाला असता का?

आयुर्हित's picture

23 Jul 2014 - 10:08 am | आयुर्हित

फक्त जन्म घेवुन काही फरक पडत नाही, तर त्या सोबत चांगले संस्कारही घडले पाहिजेत, तरच "अस्मिता" तयार होतात. मला या पवित्र भुमीत जन्म मिळण्यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे आजी,आजोबा,आई,वडिल,गुरुजन, स्नेहि,मार्गदर्शक भेटत गेले आहेत व सत्य-असत्य, मंगल-अमंगल,हित-अहित याची जाण निर्माण झाली असल्यानेच माझ्या या अस्मिता बनल्या आहेत.

यामूळे फक्त जन्मठिकाण वा धर्म महत्त्वाचा नाहि, असे वाटते.

पण तरीही प्रत्येक प्रांतात व धर्मात बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अभिमान बाळगुन असलेल्या त्रूटि दुर करण्यासाठी नक्किच काहितरि केले असते, हेही तेव्हढेच खरे.

व्यक्तिच्या जन्माच्या वा कार्याच्या वातावरणातील काही अस्मिता या इन्-बिल्ट असू शकतात. म्हणून त्या गैर ठरत नाहीत.

विटेकर's picture

23 Jul 2014 - 11:07 am | विटेकर

समजा तुम्ही अझरबैजानला जन्मला असतात तर तुमच्या वरच्या तीन अस्मितांमध्ये "अझरबैजान" आला असतात की "भारत"च राहिला असता?

आदरणीय भृशुण्डी ,
भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..
हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...
त्यामुळे "अझरबैझान " आणि " भारत " अशी तुलना उदाहरण म्हणून देखील होऊ शकत नाही !
हिन्दू आणि अहिन्दू
अहिन्दू केरळ मधे कसे असतील ? त्यांच्या उपासना पद्धती आणि कर्मकांडाचे आचरण भिन्न असू शकेल पण त्यामुळे ते अहिन्दू ठरत नाहीत. ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा.( उदा. छत्रपती शिवाजी महाराज ) केरळातील मुस्लिम आणि आसामातील ख्रिश्चन हे अनुक्रमे पाकीस्तान आणि इटली तून आलेले नाहीत !
आमच्या लेखी हिन्दू आणि भारतीय समानार्थी शब्द आहेत !

भृशुंडी's picture

23 Jul 2014 - 11:59 pm | भृशुंडी

भारतची अस्मिता असे जेव्हा आपण म्हणतो , तेव्हा ती सारे विषव सामावून घेणारी अस्मिता असते . कृण्वन्तो विश्वमार्यम..हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर...

म्हणजे तुम्ही "भारत गणराज्य" ह्या अर्थी भारत म्हणत नाही आहात तर. तुमच्या कल्पनेतील भारत हा माझ्या आणि सध्याच्या वास्तवातील भारतापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे मग त्या अर्थाने खरं तर भारत ही अस्मिताच उरणार नाही कारण संपूर्ण विश्वच तुम्ही भारताशी जोडले आहे

ही भारत भूमी ज्याची मातृभूमी आहे तो अहिन्दू कसा ? आणि जे भारतीय आहेत त्यांना इथल्या समृद्ध परंपरांचा ( सन्दर्भ - पतिज्ञा) अभिमान असायलाच हवा

अमान्य. केवळ भारतात जन्मलो म्हणून कुठल्याही परंपरा वगैरेचा अभिमान बाळगायलाच हवा हे चूक. "काही" परंपरांचा अभिमान व्यक्तिसापे़क्ष वाटू शकतो, पण ते ऐच्छिक आहे.
तुमच्या लेखी हिंदू आणि भारतीय हे समान शब्द असले तरी घटना तसं मानीत नाही. उदा, एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

कवितानागेश's picture

24 Jul 2014 - 12:09 am | कवितानागेश

होय. असा मनुष्य हिन्दू असल्यानीच इतका मुक्त असू शकतो! :)

बाळ सप्रे's picture

24 Jul 2014 - 1:36 pm | बाळ सप्रे

हिन्दू असल्यानी इतका मुक्त असू शकतो

मोठ्ठा गैरसमज !! हिंदूधर्म/जीवनपद्धती नसलेले भारतातील किंवा इतरत्रही लोक असे मुक्त असतात !!!

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 2:09 pm | बॅटमॅन

सहमत.

विटेकर's picture

25 Jul 2014 - 1:40 pm | विटेकर

मी प्रतिवाद करणार नाही ..
कारण : १. It is like sacred cow for me !
२. मिठाचा खडा टाकून केवळ विरोधाला विरोध करणारे लोक आलेले आहेत, त्यामुळे आपला पास्स !

भृशुंडी's picture

25 Jul 2014 - 11:12 pm | भृशुंडी

उत्तर मिळाले नाही याची नोंद घेतली आहे!

विटेकर's picture

31 Jul 2014 - 12:58 pm | विटेकर

तुम्ही नोंद घेतली आहे याची दखल घेतली आहे..
इथे मिपावर य वेळा हा विषय चघळून झाला आहे. तेच ते आणि तेच ते कितीवेळा करायचे ? काही लोकाना समजून न घेता नुसताच काड्या सारण्यात विन्ट्रेस्ट आहे .. मी त्यांच्यासाठी माझी ब्यांड्विड्थ कशाला वाया घालवू ?

यशोधरा's picture

26 Jul 2014 - 2:46 am | यशोधरा

एक संपूर्ण नास्तिक मनुष्य स्वतःला भारतीय म्हणतो (त्याचा पासपोर्ट भारताचा आहे म्हणून) पण त्याल हिंदू ह्या संकल्पनेशी जोडायची अजिबात गरज भासणार नाही.

हिंदू ही संकल्पना तुमच्या मते काय आहे? जेन्यूइन प्रश्न आहे.

भृशुंडी's picture

26 Jul 2014 - 4:05 am | भृशुंडी

हिंदू ही काहीही आणि कशीही defined संकल्पना असू दे.
जर मी नास्तिक असेन (देव/धर्म/अध्यात्म इ.इ.) ह्यांवर विश्वास नसणारा, तरी मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का?
मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको.
@हिंदू - नक्की माहिती नाही. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भाषिते केली आहेत, त्यामुळे सरळसोट व्याख्या कधीच मिळाली नाही.

मला स्वतःला भारतीय म्हणता येतेच नाही का? >> अर्थात. :)

>>मग त्यासाठी "हिंदू काय आहे" असा प्रश्नच यायला नको. >> LOL. त्यासाठी विचारले नाही मी. इतकी गृहीतके बांधू नका दणादणा. तुम्ही ज्या ठामपणे विधान केले त्यावरुन मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हिंदू ह्या शब्दाविषयी तुमची काय संकल्पना आहे. इतरांनी केलेया व्याख्या सोडून द्या, ते त्यांचे पर्सेप्शन, मत. पण तुमचे 'स्वतःचे' काही मत आहे का किंवा बनले आहे का ह्याविषयी हे जाणून घ्यायचा प्रयत्न होता.

आता नक्की माहित नाही, हे कळाले. धन्यवाद :)

अर्धवटराव's picture

26 Jul 2014 - 7:56 am | अर्धवटराव

सत्याप्रति जिज्ञासेवर आधारीत एका प्राचीन जीवन प्रणालीचं नाव आहे "हिंदु". देव, धर्म (रिलीजन या अर्थाने) वगैरेशी तिचा काहि डायरेक्ट संबंध नाहि. आस्तिक-नास्तिक वादाशी तर मुळीच संबंध नाहि. (आस्तिक-नास्तिक वादाचा पारावरच्या टाईमपास गप्पा मारण्याव्यतिरिक्त तसाही काहि उपयोग नाहि)

समीरसूर's picture

24 Jul 2014 - 11:09 am | समीरसूर

अस्मिता, अभिमान, स्वत्व, स्वाभिमान वगैरे संकल्पना तशा थोड्या 'हँण्डल विथ केअर' असतात. थोडा मनमानीपणा केला की अनर्थ ओढवतात.

मला गौतम बुद्धांचं चित्र असलेलं फेसबुक पोस्ट आठवते. त्यात लिहिलं होतं, "आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट. आय हॅव नो प्राईड". मला खूप आवडलं ते पोस्ट.

अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो. जगातली सध्याची हिंसा या अस्मितेपोटी आणि अभिमानापोटीच सुरु आहे. आजच्याच टाईम्समध्ये बर्नॉड शॉचा विचार आलेला आहे. "You will never have a quiet world till you knock the patriotism out of the human race". हा विचार मला प्रचंड पटला. मला खूप आधीपासून असे वाटत असे. जर या देशाभिमानाच्या आणि धर्माभिमानाच्या इतक्या तीव्र भावना नसत्या तर इतकी हिंसा, युद्धे झालीच नसती. हकनाक बळी जाणारे सैनिक पाहिले की जीव हळहळतो. या ब्रह्मांडातली कुठलीच गोष्ट अशी नाही की त्यासाठी एखाद्या व्यक्तीचा (खरं म्हणजे समस्त सजीवांचा) बळी जावा. असो.

माझ्या अस्मिता अशा काही विशेष नाहीत. जात, धर्म, कुटुंब या अस्मिता अजिबातच नाहीत. यात माझं काहीच नाही. परंपरा-बिरंपरा सगळाच फालतू प्रकार आहे हे व्यवस्थित समजले आहे. फुटकळ कुवतीची अस्मिता बाळगणे म्हणजे उंदराने स्वतःला ऐरावत समजण्यासारखे आहे. आणि ढीग कुवत, हुशारी, कर्तबगारी असती तरी त्यात अभिमान वगैरे वाटण्यासारखे काही नाही. गोष्टी आवडतात किंवा आवडत नाहीत. प्रेम असतं किंवा तिरस्कार असतो. काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, काही अगदी नको-नकोशा होऊन जातात. बस्स एवढंच! :-) यापलिकडे काही नाही.

साती's picture

24 Jul 2014 - 2:17 pm | साती

आय अ‍ॅम अ बुद्धिस्ट आय हॅव नो प्राईड.

यशोधरा's picture

24 Jul 2014 - 3:08 pm | यशोधरा

:)

अस्मिता, अभिमान वगैरे जाज्वल्य झाले की आपोआपच त्यातून इतरांच्या अस्मिता, अभिमान हीन आणि दुय्यम आहेत अशा भावना जन्माला येतात आणि मग हाहाकार उडतो.

येथे आपली अभिमान आणि दुराभीमान यात गल्लत होत आहे.

माझ्या स्वतःच्या धर्म, प्रांत, भाषा याबद्दल अस्मिता जाग्रुत आहेत असे म्हटले कि आपोआप इतरांनाही त्या तशा अस्मिता,भावना, अभिमान असेल/असाव्यात अशीच विचारसरणी आहे व हवी. त्यासाठी सर्वांना योग्य तो संस्कार व धर्माची शिकवण मिळणेही गरजेचे आहे व ते अमलात आणले जात आहे म्ह्णुन जागरुकता हि हवीच.

"गदर" या चित्रपटात सन्नी देवोल "पकिस्तान जिंदाबाद" देखिल म्हणतो हे आपल्या लक्षात आले असेलच.
Hindustan Zindabad - Gadar
Hindustan Zindabad - Gadar

समीरसूर's picture

25 Jul 2014 - 1:35 pm | समीरसूर

तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो. लोकांना अभिमान आणि दुराभिमान यातली पुसट सीमारेषा कळत नाही. आणि त्यातून संघर्ष घडतो. धर्म, जात या अत्यंत खाजगी बाबी असल्या पाहिजेत. धर्माच्या आणि जातीच्या अस्मितेचा ज्वर तसा घातकच. आज महाराष्ट्रात जी 'नाद करायचा नाही, बाद करून टाकीन' ही ब्रिगेडी वृत्ती फोफावली आहे त्याला हा उन्मादच कारणीभूत आहे. अस्मितेचे (किंवा अभिमानाचे, प्रेमाचे, वगैरे) रुपांतर उन्मादात न होऊ देणे महत्वाचे. माझ्या भाषेवर माझे प्रेम आहे म्हणा किंवा माझी मराठी अस्मिता म्हणा, फरक काहीच नाही. हे जे काय आहे त्याचा ज्वर होऊन बेभान होणे टाळले पाहिजे.

तुमचे बरोबर आहे पण १०० पैकी ९० वेळेस बहुतेकांना दुराभिमानच असतो.

आपले परस्परविरोधी विचारसरणींचे स्नेही आहेत काय? म्हणजे तुम्ही न्यूट्रल, एक कट्टर साम्यवादी नि एक कट्टर स्वातंत्र्यवादी, इ इ ? तुम्ही तिघे एकत्र असताना कसे वागता?

९०% लोकांना किंवा ९०% वेळेस दुराभिमान असेल तर जगाची काय गत होईल याची कल्पना आहे का? ज्या गोष्टीला मी अस्मिता म्हणतो त्याला तुम्ही दुराभिमान म्हणताय. पण हे तुमचं जजमेंट झालं. माझ्या अस्मितेचा आधार काय आहे हे पहायची तुमची अनिच्छा हा देखिल दुराभिमान, इ इ असू शकतो.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले

बारावीत असताना एक अस्मिता आमच्या वर्गात होती .... काय सुंदर दिसायची काय सांगु *man_in_love* !

पण कॉलेजात असताना कधी बोलली नाही अन आता अगदी थांबुन बोलते गप्पा मारते पण आता काय उपयोग :( *beee*

arunjoshi123's picture

24 Jul 2014 - 2:59 pm | arunjoshi123

पण आता काय उपयोग

नक्की काय समस्या आहे?

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2014 - 12:50 pm | संजय क्षीरसागर

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 1:24 pm | प्यारे१

हे आले सर्वज्ञ!

सगळ्यातलं सगळंच कसं काय माहिती असतं कुणास ठाऊक?

बॅटमॅन's picture

25 Jul 2014 - 2:37 pm | बॅटमॅन

सगुण अवतारावर श्रद्धा ठेवणारेच सर्वज्ञ असतात असं नाही हे कळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 2:42 pm | प्रसाद गोडबोले

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे ... माझ्यासारख्या लिंबु टिंबु खेळाडुचा घोळ होतो ना भाऊ =))

एकदम इतक्या जणांनी ब्यॅटींगला उतरु नका रे

डब्ल्यू डब्ल्यू एफ मधलं रॉयल रंबल आठवलं =))

प्यारे१'s picture

25 Jul 2014 - 2:58 pm | प्यारे१

तो 'कळत नाही' वाला प्रतिसाद पेस्ट करुन घ्या तिकडच्या धाग्यातला. ;)

तुम्हाला वादिहाशु.

प्रगो, जरा सपोर्ट करायचा की राव. श्या! =))

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2014 - 2:21 pm | प्रसाद गोडबोले

जेव्हा उपयोग होता तेव्हा तिची अस्मिता मधे आली. आणि आता तिला अस्मिताच नाही म्हटल्यावर, मिळवायला यांची अस्मिता जागी होत नाही!

येकझ्यॅक्टली ! हेच म्हणणार होतो मी ! =))

वामन देशमुख's picture

25 Jul 2014 - 4:32 pm | वामन देशमुख

नक्की काय समस्या आहे?
अहो, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी समस्या आहे! ;)

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2014 - 10:25 am | टवाळ कार्टा

=))

अर्धवटराव's picture

26 Jul 2014 - 7:51 am | अर्धवटराव

कुठल्याही सिस्टीममधे संपन्नतेचे आणि सुरक्षेचे म्हणुन काहि विशिष्ट घटक असतात. जेव्हा सिस्टीम मोडायची वेळ येते तेव्हा या घटकांवरचा घाला एक प्रोटोटाईप म्हणुन टेस्ट केल्या जातो. त्यावरुन त्या सिस्टीमची रेसीप्रोकेट करण्याची सिध्दता जोखता येते. अशा घटकांपासुन अस्मिता तयार होतात.

सिस्टीममधले जे लोक या घटकांविषयी (आवष्यक किंवा अनावष्यक... कसेही) जागृत असतात ते अस्मितांप्रती सजगता दाखवतात (परत.. अनावष्यक किंवा आवष्यक... कसेही). इतरांनी तसच असावं असा दंडक जरी नसला तरी संकटाची चाहुल ओळखण्याएव्हढी सावधगिरी बाळगली तरी पुरे असतं.

जसंजसं हे सुरक्षेचे आणि संपन्नतेचे घटक बदलतात तसं तसं अस्मिता देखील बदलायला लागतात, व जेंव्हा असे बदल घडत नाहि तेंव्हा अस्मितांच्या माथी कालबाह्यतेचे शिक्के उमटतात.

साती's picture

1 Aug 2014 - 9:01 am | साती

परफेक्ट आन्सर.

मंदार कात्रे's picture

1 Aug 2014 - 10:41 am | मंदार कात्रे

अस्मिता असावी पण अहंकार आणि अभिनिवेष असू नये ...

स्वतःची अस्मिता जपताना दुसर्याची अस्मिता देखील दुखावली जाणार नाही , हे बघणे महत्त्वाचे !

झी tv मराठी वर अस्मिता येते . बरी असते .