भुलेश्वर भ्रमंती: शनिवार २६ जुलै २०१४ रद्द

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
21 Jul 2014 - 8:12 pm

a

भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर.
भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत. औरंगजेबाच्या दख्खन स्वारीत ह्या मंदिराची तोडफोड करण्यात आली, इथली अतिसुंदर शिल्पे घणांचे घाव घालून भग्न करण्यात आली पण इतकी तोडफोड झाली असूनही आजही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही.

१८ व्या शतकात ह्या मंदिराचे भाग्य पुन्हा उजळले. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराचा बाह्य भाग हा पेशवेकालीन आणि इस्लामिक अशा मिश्र शैलीचा बनला तर अंतर्भाग मूळ शैलीतच राहिला. पण ह्या जीर्णोद्धारात काही शिल्पपट चुकीच्या ठिकाणी बसवले गेले. मंदिरात बारकाईने पाहायला जाता हे चुकलेले शिल्पपट आपल्या नजरेस पडतात.

काय आहे ह्या शिल्पसमृद्ध मंदिरात?
विभिन्न शैलींचे मिश्रण, कोरीव स्तंभ, स्तंभावरील छत तोलून धरणारे विविध मुद्रांतील भारवाहक यक्ष आणि यक्षिणी, रामायण आणि महाभारतातील शिल्पपट, सप्तमातृका, प्रतिहारी आणि सुरसुंदरी

तर आपण येणार ना हे मंदिर पाहायला आमच्याबरोबर शनि. २६ जुलै २०१४ रोजी?

वेळ:
शनि. सकाळी साधारण ११.३० पर्यंत पोहोचणे अपेक्षित. पुण्याहून आम्ही ९.३० च्या दरम्यान निघू.

जावे कसे:

पुणे- सोलापूर महामार्ग
हडपसर - लोणी काळभोर - उरुळीकांचन करून यवतच्या अलीकडच्या टोलनाक्याच्या (दुसरा टोलनाका, पहिला लोणी काळभोरच्या जवळ लागतो) सुमारे दिड किमी पुढे उजवीकडे वळणारा फाटा आहे. त्या रस्त्याने आत गेल्यावर भुलेश्वर मंदिर साधारण ८ किमी. (हडपसरपासून ४५ किमी)
टोलनाक्याजवळ आल्यावर टेकाडावरील भुलेश्वर मंदिर त्याच्या सन्निध असलेल्या रेडियो टॉवर मुळे सतत खुणावत राहते.

आम्ही बाईकने जाणार आहोत. जे बाईकने येतील त्यांच्यासाठी हेल्मेट अत्यंत आवश्यक. चारचाकीने येणारे थेट मंदिरापाशी आम्हास गाठू शकतील.

मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे. तिथून साधारण ३ वाजता परत निघून ५ पर्यंत पुण्यास पोहोचणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत सहभाग नक्की केलेले सदस्य

धन्या
सूड
प्रसाद गोडबोले

तर येणार ना आमच्याबरोबर सुरसुंदरींच्या राज्यात भटकायला?

प्रतिक्रिया

सचिन कुलकर्णी's picture

21 Jul 2014 - 8:33 pm | सचिन कुलकर्णी

भ्रमन्तीस शुभेच्छा. इच्छा असूनदेखील हैदराबादेत व्यस्त असल्यामुळे येऊ नाही शकत. :(

कंजूस's picture

21 Jul 2014 - 9:10 pm | कंजूस

वाचतोय .

मुक्त विहारि's picture

21 Jul 2014 - 9:26 pm | मुक्त विहारि

हा पण कट्टा हुकला...

ओ, वल्ली शेठ , व्रुत्तांत कुणीही लिहो, त्या शिल्पांची माहिती मात्र न विसरता आणि न कंटाळता टंकाच.

बादवे,

ह्या कट्ट्याचा व्रुत्तांत यु-ट्यूब मार्फत टाकला तर?

नाही म्हणजे आमच्या सारख्या कमनशीबी लोकांना तेवढेच ४ क्षण आनंदात मिपाकरांसोबत घालवता येतील.

आयला, ह्या पापी पेटापायी काय चुकतय आणि अज्जुन काय भोगायला लागणार आहे, कुणास ठाऊक.

ता.क. : मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे.

प्रचंड हसतोय. ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय? एका तासात संपायला.

घारापूरीची ८ लेणी बघता-बघता आणि वल्लींकडून त्याचे रसग्रहण ऐकता-ऐकता एक २/४ तास कसे गेले ते पण समजले नाही. मिपाकर तुम्हाला एका तासांत सोडतील असे वाटत नाही.

एस's picture

22 Jul 2014 - 12:39 pm | एस

मंदिर पाहण्यास तासभर पुरेसा आहे.

मंदिर नीट पहायचे असेल आणि तेही वल्लीसारख्यांसोबत तर दिवसही अपुरा पडेल. बाकी सध्या तेथे कसलेतरी जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यामुळे आख्ख्या मंदिरात जिकडेतिकडे उभेआडवे बांबू बांधले असल्याने छायाचित्रणास जास्त वाव मिळणार नाही असे वाटतेय. (ही माहिती थोडी जुनी असू शकते. कुणी नुकतेच गेले असेल तर पडताळून पहा.) सध्या ढगाळ वातावरण असल्याने गाभार्‍याभोवतालच्या मंडपातून मुख्य शिखराचे छायाचित्र (जे बरेचजण घेतात) जास्त चांगले येईल व हायलाइट्स ब्लोआउट होणार नाहीत असा अंदाज आहे. सोबत एक छोटासा टॉर्च न्या आणि पांढरा रुमाल. दर्पणसुंदरी वा तत्सम मूर्तीचे छायाचित्र काढताना एका बाजूचा प्रखर प्रकाश संतुलित करायला दुसर्‍या बाजूने रुमाल डिफ्यूजरसारखा वापरून टॉर्चने थोडा लांबून प्रकाश पाडा (एखाद्या मिपाकराला पकडा ;-) ) आणि मग छायाचित्र काढा. ऑन-कॅमेरा पॉपअप फ्लॅश टाळा.

कट्ट्याला शुभेच्छा!

:)

वेळ तशी ढोबळमानानेच दिली होती. :)
आता २ महिन्यांपूर्वीच प्रशांतबरोबर पुरंदर आणि भुलेश्वरला एक चक्कर मारून आलो होतो तेव्हा हे बांबूचे पहाड दिसले होते. त्यामुळे बाह्यथरावरील आतल्या बाजूस असलेल्या मातृका पाहणे बरेच अवघड गेले होते.
बहुधा अजूनही हा अडथळा असेलच.

फोटो टिप्सबद्दल धन्यवाद. तुम्हीच आलात तर खूप आनंद वाटेल. :)

बाकी नका हो त्या दर्पणेची आठवण करून देऊ. माझी लै आवडती आहे ती.

a

एस's picture

23 Jul 2014 - 1:34 pm | एस

हो हीच ती प्रतिमा. चेहर्‍यावर अंधार असताना कशी बापुडी दर्पणात पाहून म्हणणार, "सांग दर्पणा, मी कशी दिसते?" :-)

तेव्हा थोडे उद्भासन समायोजन कमी वापरून चेहर्‍यावर कृत्रिम प्रकाश येऊ द्यात. पण फक्त चेहर्‍यावर. नाहीतर तिच्या गोलाईतील रेखीवपणा तितका ठसठशीत येणार नाही.

केवळ याच मूर्तीची प्रतिमा घ्यायची असेल तरीही बरेच काही करण्याजोगे आहे. रिफ्लेक्टर आणि डिफ्यूजर यांचा वापर नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रण करताना कसा करायचा याचा सराव करायला ही मूर्ती उत्तम आहे. पाहू. नंतर कधीतरी निवांत तुम्ही आणि चौरांसोबत जाऊयात. आणि फक्त छायाचित्रणाच्या उद्देशाने जाऊ. जरा ते बांबूचे पहाड निघू द्यात राव! ह्यावेळी मात्र क्षमस्व. २६/२७ ला थोडा इतर असाईनमेंटस् मध्ये असेन.

जाऊन यात. वृत्तांत मात्र आठवणीने टाका.

प्रचेतस's picture

23 Jul 2014 - 6:04 pm | प्रचेतस

वोक्के जी.

तुमच्या सवडीनुसार खास फोटोग्राफीसाठी नक्कीच जाउयात. :)

मी पण येणार - स्पॅप्स कॅमेरा घेऊन शिकवणार असतील तर मी पण नक्की येईन!

एस's picture

24 Jul 2014 - 1:52 pm | एस

पयला आमचा आयडी चेंज करा हो! कायतरी सोप्पं सुचवा बरं. काय आयडी घेऊ...? *scratch_one-s_head*

प्रचेतस's picture

24 Jul 2014 - 2:07 pm | प्रचेतस

=))

एस's picture

24 Jul 2014 - 4:51 pm | एस

"पयला" हाच आयडी कसा वाटतो? म्हणजे कुणीबी कुठल्याबी धाग्यावर कितीबी 'मीच पयला' आस्सं म्हन्लं तरीबी आपुन सगल्यात शेवटाला जाऊन आरामात म्हनू शकतो 'ये चल हाट. तू कसा काय रं पयला?'

;-)

प्रचेतस's picture

24 Jul 2014 - 5:46 pm | प्रचेतस

=))

करा आता आयडी 'स्वॅप' :)

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:35 pm | बॅटमॅन

=))

किंवा जीवनभौंच्या भाषेत बोलायचे झाले तर... स्वँप =)) *biggrin* *dance4*

नशीब 'स्वाँप' नाय म्हणलात! *new_russian*

यशोधरा's picture

23 Jul 2014 - 6:51 pm | यशोधरा

सुंदर फोटो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2014 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही कामामुळे २६ ला येणे जमणार नाही याचे खूsssप दु:ख आहे :( ...

पण वृत्तांत आणि फोटोने त्याची कसर काही प्रमाणात भरून निघावी अशी इच्छा आहे !

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2014 - 9:50 pm | स्वाती दिनेश

भ्रमंतीकट्ट्याला शुभेच्छा..
फोटो व वृत्तांताची वाट पाहत आहे.
स्वाती

येतो म्हटलं खरं पण जरा साशंक आहे. एखाद आठवडा पुढे ढकलता येतेय का बघा भटकंती.

स्पा's picture

22 Jul 2014 - 9:25 am | स्पा

शुभेच्छा!!!

सुहास झेले's picture

22 Jul 2014 - 1:43 pm | सुहास झेले

सहीच... शुभेच्छा :)

वल्लीशेठ... कान्हेरी प्लान करा की राव परत :)

अनिल तापकीर's picture

22 Jul 2014 - 2:51 pm | अनिल तापकीर

खुप वेळा जाऊन आलोय सुंदर आहे. शुभेछ्या

प्राध्यापक's picture

22 Jul 2014 - 8:00 pm | प्राध्यापक

मस्त बेत आहे,अगोदर भेट दिलेली असल्याने काही सुचना कराव्याश्या वाटतात.
गाड्या थेट मंदिरा पर्यंत जातात्,मात्र शेवटच्या टप्प्यातील उभी चढण जरा अवघड आहे,[चार चाकीं साठी].
गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो,व त्याच्या आत पेढे ठेवल्यानंतर ते गायब होतात्,असे तेथिल पुजारी सांगतो,वेळ आणी पेढे असल्यास पुजार्‍याला ते करायला सांगा.
सर्वात महत्वाचे .....यवत ला गोपाळकॄष्ण ची झणझणीत मिसळ विसरु नका.

बाकी भ्रमंतीकट्ट्याला शुभेच्छा..
फोटो व वृत्तांताची वाट पाहत आहे

गाभार्‍यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो

ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.

एस's picture

23 Jul 2014 - 1:22 pm | एस

ज्या शिवपिंडींचे असे वरच भाग सहज निघतात ती शिवपिंड पूर्वी मूर्तीभंजकांनी भग्न केल्याचे लक्षण आहे.

याबाबत अजून माहिती वाचायला आवडेल. (ऐकायला म्हटलेलं नाही. नाहीतर म्हणाल पुढील चर्चा कट्ट्याअंती. ;-) )

प्रचेतस's picture

23 Jul 2014 - 6:09 pm | प्रचेतस

माहिती म्हणजे अशी काही खास नाही पण बरेच ठिकाणी शिवपिंडीच्या जागी खोलगट खड्डा दिसतो (बहुध्गा यादवकालीन शिवमंदिरांत) उदा. सासवडचे चांगावटेश्वर, उपरोल्लेखित भुलेश्वर.
ही मंदिरे मूर्तीभञ्जकांनी फोडलेली आहेत आणि तिथली शिवलिंगेसुद्दा फोडून विहिरीच्या पायठणीवर, मोरीच्या तोंडाशी अशी बसवण्यात आली. कालांतराने आपल्या भाविकांनी खड्ड्याच्या ठिकाणी परत लिंगे बसवली.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले

ह्या वीकेन्डला आमच्याकडे डी-मार्ट + विजय सेल्स + लाईफस्टाईल ची भ्रमंती करण्याचा प्लॅन ठरल्याने आम्ही कटाप ... सॉरी लोक्स

*sorry2*

चला वल्लीबुवांची लाडकी पल्सार या निमित्ताने सफरी वर निघेल
हळू जा हो वल्लीबुवा...

बर्‍याच मिपाकरांना शनिवारी येणे जमत नसल्याने भुलेश्वर भ्रमंतीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे.
नवीन तारीख लवकरच कळवू किंवा सदस्यांनीच सुचवावी जेणेकरून पुढील कार्यक्रम ठरवता येईल.

शेवट्चा धागा बघुन आनद झाला.
मि पण येणार....

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 10:57 pm | प्यारे१

ओ ताल लय
तुमची समेवर यायची मात्रा चुकलीये.

बाबा पाटील's picture

1 Aug 2014 - 8:06 pm | बाबा पाटील

नक्की येणार.

पाटलानुं, रद केलांय तां बगतलांव नाय काय?

यसवायजी's picture

13 Dec 2014 - 8:50 pm | यसवायजी

कधी जायाचं?