फारच कंटाळा आल्याने ही एक जिलबी पाडण्याची खुमखुमी आली आहे ...
दांभिक तुही दांभिक मीही दांभिक मिपा अवघे
'सांडुनी वाया व्यर्थ कथा' तू दारुची चव घे ||०||
वट्वृक्षापरीविस्तार जयाचा नाव घेतसे वल्ली
अन 'प्या...रे' म्हणणारा आता होत नाही टल्ली *drinks* ||१||
"शेजारीणबाईंचा टीव्ही आमच्या पोरांना पाहु देईना"
अशा सज्जन माणसाने नाव घेतले 'किस'ना *air_kiss* ||२||
'जोकरा'परी खोड्या ज्याच्या सदैव जिकडे तिकडे
बॅटमॅन तो नाव घेवुनी धाग्या जाऊन जखडे ||३||
सद्गुणांचा दिसेपुतळा मुळीच नाही हूड
अन मिपावर येवुन त्याने नाव ठेवले सूड ||४||
काढ जोरबैठका थोड्या अन चिकन अंडी खा
'जीम' मधे जायचे सोडुन त्याने नाव ठेवले 'स्पा' ||५||
'सरळ' बिचारा 'गरीब' माणुस दिसती जिकडे तिकडे
ते स्वतःला म्हणवती येथे "धनाजी" आणि "वाकडे "||६||
तुडुंब ढेकर दिलावरती पानालाही म्हणती "नाही "
तो हा असा निष्पाप तु अतृप्त आत्मा पाही ||७||
"गोड-बोलु"नी समजावले हे आता तरी सावरा
साधुसंत नको पण दासबोधरेफरन्स आवरा *biggrin* ||८||
दांभिक तुही दांभिक मीही दांभिक मिपा अवघे
'सांडुनी वाया व्यर्थ कथा' तू दारुची चव घे ||०||
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर १: कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही , कोणाला राग आला का , ज्याला येतो राग त्याला खातो वाघ !
अवांतर २ :किमान सेंचुरी अपेक्षित आहे *lol*
प्रतिक्रिया
10 Jul 2014 - 11:41 pm | धन्या
या तुमच्या कवितेने मला प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या "रुतला पायी काटा" या सुंदर गौळणीमधील कसा गोड बोलूनी तू काटा काढीला ही ओळ आठवली.
11 Jul 2014 - 12:24 am | शशिकांत ओक
*mamba* *diablo* *dash1* *crazy*
11 Jul 2014 - 1:37 am | सूड
>>सद्गुणांचा दिसेपुतळा मुळीच नाही हूड
अन मिपावर येवुन त्याने नाव ठेवले सूड ||४||
अंमळ वारल्या गेले आहे. ;)
11 Jul 2014 - 2:06 am | सूड
'गोडबोल्याष्टक' असं नाव शोभून दिसेल या जिलबीला...आयमीन मुक्तक, काव्यप्रकार जे काही आहे त्याला. ;)
11 Jul 2014 - 9:21 am | नाखु
वेगळाच "सूड" घेतला असावा असा आमचा कयास आहे.
11 Jul 2014 - 1:57 am | प्यारे१
यमकांत मार खाल्ला आहे.
पु खु खु शु. ;)
11 Jul 2014 - 2:31 am | बॅटमॅन
पाहिली नवकविता, नवकवी सांप्रत प्रसाद गोडबोले |
चुरचुरीत म्याटर, जयात बहु स्फोटकांचेचि गो डबोले ||
राडे होता काडी टाकुनि, मज्जा इतरां डावळुनी पाहावी |
तेही नसतां मग विडंबनहस्तेचि खुल्ली सारावी ||
11 Jul 2014 - 8:04 am | अत्रुप्त आत्मा
@विडंबनहस्तेचि खुल्ली सारावी || >>>. *ROFL*
*lol* या खाटुकला मेल्याला बुकला रे कुणीतरी! =))
11 Jul 2014 - 9:28 am | स्पा
गोडबोलायदान
चाल कशे म्हणावे?
12 Jul 2014 - 9:14 pm | भम्पक
"मीही दांभिक अन तुही दांभिक ...दांभिक अवघे मिपा .....
हेतू मात्र पाक त्यामुळे त्यावरी सरस्वतिची कृपा II
नावात गोड परंतु अति कडू शार हि वाचा ...
नावावर अजून काही नाही
पण प्रसाद मात्र साचा ....II
एकेकाचे नाव ऐकण्या मौज वाटे कानी.....
कुत्सित ,खडूस बोल ऐकल्या मात्र
सपशेल येई ग्लानी....II
अवघ्या मिपा करांची माफी मागून , खरे तर खूप खरडायचे मनात होते परंतु सुरुवातीलाच ग्लानी येऊ द्यायची नव्हती.प्रसाद्जींचे आभार .....अन वरून त्यांचीच खिल्ली उडवल्याबद्दल माफी.अपेक्षा हलके घ्याल.
13 Jul 2014 - 10:11 am | किसन शिंदे
=)) =)) =))
31 Jul 2014 - 11:24 pm | पैसा
गिर्जाकाकू, रन औट झालात की हो! योग्य लोकांना योग्य वेळी सुपारी दिली नाहीत काय!
1 Aug 2014 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले
छ्या: छ्या:छ्या:छ्या: !
सुपारी वगैरे नाही हो , बाण जिकडे जिकडे सोदले तिकडे तिकडे जाऊन लागले , बाकी मग प्रतिसाद आले नाहीत तरी आपली काही हरकत नाही *biggrin*
1 Aug 2014 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
@जीम' मधे जायचे सोडुन त्याने नाव ठेवले 'स्पा' *ROFL* *yahoo*
1 Aug 2014 - 6:21 pm | धन्या
तुमचं आपलं काहीतरीच हा प्रगोकाका.
आमच्या एका मित्राने आमचे नेमके वर्णन केले आहे. ते म्हणतात, "आम्ही म्हणजे नुसतीच दिड दोनशे पुस्तके वाचलेले, स्वतःचा काहीच अनुभव नसलेले, स्वतःपुरतेच पाहत असल्यामुळे स्वतःला आणि लोकांना समजून घेण्यासाठी लोकांशी शाब्दिक चकामकींची गरज असलेले आणि इगो कुरवाळण्यासाठी वांझोटया चर्चा करणारे असे लोकांनी गांभिर्याने घ्यायची मुळीच गरज नसलेले व्यक्तीमत्व".
तरी बरं आहे की ते आम्हाला "रीमोटली" ओळखतात. विकांताआड जर भेट झाली असती तर त्यांना आमच्या सार्या अवगुणांची जाणिव होऊन त्यांनी आम्हाला भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट खलपुरुष ठरवले असते.
असो. या निमित्ताने का होईना, आमच्यात सुधारणेला बराच वाव आहे हे कळतंय ही चांगलीच गोष्ट आहे.
तुकोब्बारायांनी म्हटलेच आहे ना, "निंदकाचे घर असावे शेजारी" :)