भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
25 Jun 2014 - 4:44 pm
गाभा: 

महत्वाची सुचना:
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!

चर्चेचा विषय:
निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते??
लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ?

उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ?

लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते?
तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात?

उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ?

कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे.
धन्यवाद!!!

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2014 - 12:22 pm | प्रसाद गोडबोले

योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला

>>> ह्या आव्हानाला कोणी ज्योतिषी/ ज्योतिषसमर्थक उत्तर देतो का ह्याची वाट पहात आहे :)

थॉर माणूस's picture

30 Jun 2014 - 1:51 pm | थॉर माणूस

त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन

अरे??? तुम्ही कोण? तुम्हाला ज्योतिषाचे ज्ञान नाही, तुम्ही त्यातले तज्ञ नाही मग आमी नै ज्जा... आम्ही तुमच्याशी बोलणारच नै. ज्योतिष हे थोतांड आहे हे सिद्ध करण्याचा हक्क फक्त ज्योतिषविषारदांस आहे. ज्योतिषासमोर बसून त्याच्याशी सांगोपांग चर्चा करून त्याला त्याचे शास्त्र थोतांड आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा हक्क त्याच्या तोलामोलाच्या ज्योतिषांनाच आहे. उगाच कुठल्या अंनिस/नारळीकर सारख्या ऐर्‍यागैर्‍यांना आम्ही खपवून घेत नाही मग तुमची काय कथा?

अरे बापरे, अवांतर झालं वाट्टं... स्वारी हां. ज्योतिष हे शास्त्र असल्याचं किंवा नसल्याचं शास्त्रीय पद्धतीने सिद्ध होत नाही तोवर आमचा बेंबट्या होत रहाणार बहुतेक.

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 2:00 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी!!!

अगदीच बेसिक प्रश्न मला कधीचा पडलेला आहे.
जेव्हा कुंडली / पत्रिका बनवली जाते (कुंडली आणि पत्रिकेमधे का फरक आहे हा उपप्रश्न) तेव्हा जन्मवेळेला फार महत्व असतं. माझा प्रश्न असा की ही जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती?
- पुरूषाच्या शुक्राणुचं स्त्रीबीजात रोपण होते ती ?
- गर्भधारणा होते ती ?
- गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरू होतात ती ?
- प्रसुती वेदना प्रथम सुरू होतात ती ?
- गर्भाचं डोकं प्रथम बाहेर येतं ती?
- बाळ पूर्ण बाहेर येतं ती?
- नाळ कापली जाते ती?
- बाळ पहिल्यांदा रडतं ती?
- की बाळ जन्माला आलंय असं डॉक्टर / नर्स सांगातात ती?
(सिझेरियन झालं असेल तर तत्सम वेगळे प्रश्न)

ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच शास्त्रकारांनी लिहून ठेवलं असणार कारण, जर एखादं मिनीट इकडचं तिकडे झालं तर कुंडलीतले ग्रह जागा बदलतात.

कोणीतरी प्लीज ह्याचं फायनल उत्तर द्या हो! बरीच वर्षं हा प्रश्न मला छळतोय.

आयुर्हित's picture

30 Jun 2014 - 11:35 pm | आयुर्हित

जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती?
उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ.

परंतु बर्‍याच वेळेला ही नोंद चुकलेली असते असा अनूभव आहे, त्यासाठी अचुक गणित करून "जन्मवेळशुद्धी" करावी लागते.

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2014 - 1:06 am | संजय क्षीरसागर

जन्मवेळ म्हणजे नक्की कोणती?
उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ.

म्हणजे नाळ कापण्यापूर्वीच्या ग्रहस्थितीचा बालकवर शून्य परिणाम असतो असा अर्थ होतो. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य, केवळ उत्तम ग्रहस्थिती बघून नाळ कापल्यास घडू शकेल असा विद्वत्तापूर्ण दावा आपण केला आहे.

त्याहूनही मोठा विनोद म्हणजे, ज्योतिषाच्या दृष्टीनं (तुमच्या मते), अत्यंत महत्त्वाची असलेली ही वेळेची नोंद, बर्‍याच वेळा चुकलेली असते! म्हणजे आईला शुद्ध नसते, नर्सला एक्झॅक्ट वेळेशी घेणं-देणं नसतं, त्यातही तुमच्यासारख्यांचा तीनं सांगितलेल्या वेळेवर विश्वास नसतो म्हणजे मुदलातच घोळ! तसल्या भंपक वेळेच्या नोंदीवर केलेली कुंडली आणि त्यावरनं केलेली भविष्यवाणी म्हणजे ज्योतिषशास्त्र!!

त्यावर नामी उपाय काय तर "जन्मवेळशुद्धी"! म्हणजे काय? ज्योतिषाच्या अगाध ज्ञानानं (ज्याचा `ऐन प्रसंगाशी' सुतराम संबंध नाही) ठरवलेली नाळ कापण्याची वेळ!

सरळमार्गी म्हणतात ते योग्य आहे, उगीच लुंग्यासुंग्यांशी चर्चा करण्यात अर्थ नाही!

आयुर्हित's picture

1 Jul 2014 - 10:26 am | आयुर्हित

बहुत अकुशळ मिळ्ती|स्वामींचे कार्य नाशिती| काही न बोले तयाप्रती| तो बुद्धिमंत||
तेथे नीतिमार्ग बोलता| मूर्ख प्रवर्तती अनर्था| यास्तव जाणोनि होय नेणता| तो बुद्धिमंत||

बहुत भंपक जमती | भलतेच कार्य करिती | काय बोलावे तयाप्रती | सर्व लुंगीसुंगी ||
तेथे उघडगोष्ट बोलता | मूर्ख प्रतिवादती अनर्था | यास्तव कळोनि होय नाकळता | तो बुद्धिमंद||

बाळ सप्रे's picture

1 Jul 2014 - 11:19 am | बाळ सप्रे

उत्तरः बाळ पूर्ण बाहेर येउन नाळ कापली जाते ती वेळ

बाकी ज्योतिष समर्थकांचे यावर एकमत आहे का?

अचुक गणित करून "जन्मवेळशुद्धी" करावी लागते.

एकदा वेळ निघुन गेली आणि त्यावेळी अचूक नोंद झाली नाही की It's just manipulation of data
जन्मवेळ्शुद्धीने सापडलेली जन्मवेळ ही प्रत्यक्ष जन्मवेळेशी अचूक जुळण्याचे प्रमाण काय??

सर्वात महत्वाच्या अचूक जन्मवेळ नोंदीसाठी ज्योतिषात काय तरतूद आहे ??

पैसा's picture

30 Jun 2014 - 11:20 pm | पैसा

या भांडणांच्या नेहमीच्या यशस्वी विषयांसाठी (ज्योतिष - विज्ञान, आस्तिक -नास्तिक, भाजपा - खान्ग्रेस, पुणे -मुंबै इ. इ.) एक मारामार्‍या पेश्शल धागा काढूयात का? म्हणजे मारामार्‍या काय त्या त्या धाग्यावर करा आणि चर्चा शिल्लक राहिलीच तर अशा धाग्यांवर करा!

एस's picture

1 Jul 2014 - 10:48 am | एस

पेश्शल इभाग काडून द्या. थितं काय दोरखांड वळायचं त्ये वळू द्या लोकास्नी.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2014 - 11:59 am | प्रसाद गोडबोले

महत्वाची सुचना:ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे.त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद!!!

पैसा ताई , माझ्या मते सदर लेखकाने वरील वाक्य टाकले नसते .... अन त्याच्या जागी "ज्योतिश ही माझी वैयक्तिक श्रध्दा आहे ,त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही कृपया विषयांतर करु ही विनंती नये"
असे टाकले असते तर कदाचित वाद उद्भवला नसता असा एक अंदाज आहे !

संजय क्षीरसागर's picture

1 Jul 2014 - 12:12 pm | संजय क्षीरसागर

त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही

असल्या चर्चांसाठी व्य. नि. ही सुविधा देण्यात आली आहे. ज्यांची असल्या भंपक गोष्टींवर श्रद्धा आहे त्यांच्याशी, त्या सुविधेमार्फत मनमुराद वार्तालाप केला तर अशी वेळ यणार नाही.

Once it is on the Open Forum, one can't claim a privacy protection.

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2014 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले

हे ही बरोबरच आहे म्हणा !

पैसा's picture

1 Jul 2014 - 12:13 pm | पैसा

राईचा पर्वत करणारे लोक आहेत आपल्याकडे! तसंही एखादे गोष्ट करू नका म्हटलं की मुद्दाम करायची हे सगळेच सामान्य माणूसप्राणी करतात. असामान्य लोकांची गोष्ट वेगळी! *blum3*

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2014 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे टाकले असते तर कदाचित वाद उद्भवला नसता असा एक अंदाज आहे ! नक्की ?!

काही विषयांच्या "डि एन ए" मध्येच वाद असतात हे केव्हाच सिद्ध झालंय... =))

("काही विषयांच्या पाचवीला वाद पुजलेले असतात" हे वाक्य महत्प्रयासानं लिहीण्याचं टाळलं आहे हे ध्यानात आलं असेलच ;) )

पैसा's picture

1 Jul 2014 - 12:36 pm | पैसा

नैतर तुमच्या दिशेने शरवर्षाव सुरू झाला असता!