महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

पडघम २०१४-भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश

Primary tabs

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
10 May 2014 - 12:22 pm

पडघम २०१४-भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश

यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली

सुरवातीला हिमाचल प्रदेशमध्ये २००७ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.

तक्ता क्रमांक १

             
हिमाचल प्रदेश २००७ २००९   २००७ २००९ २००७ २००९
  मते % मते % मतांमधील फरक विधानसभा जागा विधानसभा जागा आघाडी लोकसभा जागा आघाडी लोकसभा जागा
भाजप ४३.८% ४९.६% ५.८% ४१ ४८
कॉंग्रेस ३८.९% ४५.६% ६.७% २३ २०
बसपा ७.३% १.६% -५.७%
इतर १०.०% ३.२% -६.८%

तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांकडे मते अधिक प्रमाणात वळतात तर लहान पक्षांची मते कमी होतात. हिमाचल प्रदेशात २००७-०९ मध्ये हे प्रकर्षाने दिसून आले.विधानसभा निवडणुकांमध्ये बसपा आणि इतर यांना १७.३% इतकी फ्लोटिंग मते मिळाली होती.ती लोकसभा निवडणुकांमध्ये ४.८% पर्यंत कमी झाली.
२. बसपा आणि इतर यांची कमी झालेल्या १२.५% मतांपैकी कॉंग्रेसने भाजपपेक्षा थोडी अधिक मते आपल्याकडे वळवली. तरीही भाजपला विधानसभेत कॉंग्रेसपेक्षा ४.९% मतांची आघाडी होती.ती आघाडी भरून काढेल इतपत प्रमाणावर मते कॉंग्रेसने आपल्याकडे फ्लोटिंग मतांमधून वळवली नाहीत.त्यामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये २००७ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच निकाल लागले--भाजपला ३ तर कॉंग्रेसला १ जागा मिळाली.

तक्ता क्रमांक २ मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दिले आहेत. सोयीसाठी २००७ च्या विधानसभा निवडणुकांचे निकालही परत एकदा त्याच तक्त्यात दिले आहेत.

तक्ता क्रमांक २

           
हिमाचल प्रदेश २०१२     २००७    
  मते % विधानसभा जागा लोकसभा जागा आघाडी मते % विधानसभा जागा लोकसभा जागा आघाडी
भाजप ३८.५% २६ ४३.८% ४१
कॉंग्रेस ४२.८% ३६ ३८.९% २३
हिमाचल लोकहित पक्ष २.४%      
बसपा १.२% ७.३%
इतर १५.१% १०.०%

तक्ता क्रमांक २ वरून आपल्याला खालील गोष्टी कळतात:
१. हिमाचल प्रदेशात सत्ताधारी पक्षाचा पराभव होणे हा १९९० च्या विधानसभा निवडणुकांपासून बघितला गेलेला कल २०१२ मध्येही कायम राहिला. तरीही एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे भाजप नेते महेश्वर सिंग यांनी स्वत:चा हिमाचल लोकहित पक्ष स्थापन केला.या पक्षाला विधानसभेत ६८ पैकी एकच जागा मिळाली पण अन्य पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये या पक्षाने मतविभागणी करून भाजपचा पराभव घडवून आणला.
२. बसपाची मते २००७ च्या तुलनेत खूपच कमी झाली.अपक्ष आणि इतरांना तब्बल १५.१% मते मिळाली.

तक्ता क्रमांक ३ मध्ये २०१२ च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी दिली आहे.

तक्ता क्रमांक ३

             
लोकसभा मतदारसंघ भाजप कॉंग्रेस हिलोप बसपा इतर आघाडी पक्ष आघाडी %
हमीरपूर ४६.२% ४२.०% १.७% १.२% ८.९% भाजप ४.२%
कांगरा ३२.६% ४३.०% १.९% १.५% २१.०% कॉंग्रेस १०.४%
मंडी ३९.०% ४३.६% ४.५% १.०% ११.९% कॉंग्रेस ४.६%
सिमला ३६.०% ४२.७% १.४% १.०% १८.९% कॉंग्रेस ६.७%
एकूण ३८.५% ४२.८% २.४% १.२% १५.१%  

तक्ता क्रमांक ३ वरून आपल्याला कळते की भाजपला १ तर कॉंग्रेसला ३ मतदारसंघात आघाडी मिळाली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे अंदाज
माझे अंदाज पुढील गृहितकांवर आधारीत आहेत:
१. २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपा आणि इतर यांना १६.३% इतकी फ्लोटिंग मते मिळाली होती.लोकसभेत यापैकी किमान १२% मते कमी होऊन ती कॉंग्रेस आणि भाजपकडे वळतील. ही मते किती प्रमाणात कोणत्या पक्षाकडे वळतात यावरून लोकसभा निवडणुकांचे निकाल अवलंबून असतील.
२. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते थोडेसे बॅकफूटवर आले आहेत असे चित्र आहे. तसेच देशातील युपीए सरकारविरोधी वातावरण लक्षात घेता कॉंग्रेसपुढे डोकेदुखी निर्माण होईल हे नक्कीच.
३. तसेच राज्यात आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. ते दोन्ही पक्षांची मते काही प्रमाणावर खातील.

या पार्श्वभूमीवर मला वाटते की राज्यात पुढीलप्रमाणे निकाल लागतील:
कांगरा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शांताकुमार आणि हमीरपूरमधून माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर यांना विजय मिळवायला फार कठिण जाऊ नये. हमीरपूरमध्ये परमवीरचक्र विजेते कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या मातोश्री आआपच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत.तरीही हमीरपूर हा धुमल यांचा बालेकिल्ला आहे.तिथून अनुराग ठाकूर यांना विजय मिळवणे कठिण जाऊ नये.मंडीमधून मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग उमेदवार आहेत.त्यांना निवडून यायला फार अडचण येऊ नये.सिमला मतदारसंघ हा इतकी वर्षे कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता.भाजपने तिथून १९९९ आणि २००९ या दोन वेळाच विजय मिळवला होता. तरीही देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता सिमलामधून भाजप निवडून येईल असे वाटते.

तेव्हा मला वाटते की हिमाचल प्रदेशमध्ये पुढीलप्रमाणे निकाल लागतील:

 
एकूण जागा
भाजप
कॉंग्रेस

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 May 2014 - 3:47 pm | पैसा

आप कशी मते फोडतो त्यावर बरेच अवलंबून आहे असे दिसते. एरवीही मला एक प्रश्न पडतो, हे फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत? सहसा सुशिक्षित आणि इथे आंतरजालावर वावरणारे लोक तर शेंडी तुटो वा पारंबी, आपली मते कधी बदलताना दिसत नाहीत. वाटेल त्या कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करताना दिसतात. तेव्हा हे बिनचेहर्‍याचे आणि मत बदलणारे मतदार कोण असावेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!

क्लिंटन's picture

11 May 2014 - 12:07 pm | क्लिंटन

फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत?

अगदी.मला वाटते की हा विषय पोलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या दोन्हींमध्ये मोडेल.या जन्मी पी.एच.डी करायला मिळाली तर हा विषय पी.एच.डी साठी नक्कीच आवडेल.( माझी हिलरी सायकॉलॉजिस्ट आहेच.तिचीही मदत होऊ शकेल :) )

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 May 2014 - 4:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त विष्लेशण.

या लेखमालेत आता पर्यंत ११ लेखमालांमधे एकुण १८७ मतदार संघांचे अंदाज मिळाले आहेत. म्हणजे साधारण पणे ३४% निकालांचा कल आपल्याला समजला आहे. बाकिच्या ६६% बद्दल उत्सुकता वाढली आहे.