ऊसा चा रस...

म्या काय म्हन्तो...'s picture
म्या काय म्हन्तो... in काथ्याकूट
10 Apr 2014 - 5:55 pm
गाभा: 

मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः

नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः

ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी...
त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल...

पण या मधे आम्ही त्या स्त्री पात्राला अक्षरसश: विसरुन गेलो. पायीच जायच निश्चीत झाल. तर चालता चालता ५६ काल्स येऊन गेले त्या बाई चे स्वप्नील ला. याने मात्र मित्र लज्जे खतिर कापले ते सगळे काल्ल्स्स.... डेरीन्ग बाज पोरगा ..:
पण त्याच्या रिन्ग टोन्स मुळे मुले चिड्लेच होते सगळे...

एकदाच भैरवनाथ रसवंती ल पोहचलो अणि ऑर्डर केला. पण गड्याचा फोन काही शांत बसेना.. शेवटी चिडून व कन्टाळुण, आम्ची चक्क परवानगी घेऊन स्वप्निल ने फोन ऊचलला ..
काहि वेळ त्यांच सुरु होत. पण प्रेम धर्म त्याला फोन ठेऊ देइना. त्यात तिला न सांगता आलो होतो (कुठे हि, मी पण येणार म्हनूण मागे लागेल म्हनून).
हा तिला कुठे आहो हे सांगेच ना.
हा परत येत नाही म्हनुन आम्ही पण थोड लक्ष दिल, तर थोडासा सन्वाद (स्पीकर वर टाक्ला फोन त्याने):

ती: कहा हो? ( हिन्दी भाषीक होती ती)
स्वप्निल: ईधर ही है हम
ती: कहा हो बताओ तो? (स्त्री का इतक खोदुन विचारते देव जाने)
स्वप्निल: अरे कुछ नही बस ऐसे हि....
ती: क्या कर रहे हो ? ये तो बता दो..
स्वप्निल: कुछ भी नही..
ती: बताओ नही तो बात नही करुन्गी.. ('नको करु" सगळे मनातुन)
स्वप्निल: आरे बोला ना जान कुछ नही..

तेव्हड्यात एक मित्र वैतागुनः
"अरे उस को बोल की उस का रस्स पी रहे है " (अरे उस को बोल की ऊस का रस्स पी रहे है : असा म्हणायच होता भाम्ट्याला, पण, ऊसा ला हिन्दी मधे गन्ना म्हण्तात हे तो विसरला...)

आता हे ऐक्न्यात किती अश्लील वाटते राव !!!

हसुन हसुन खाली पडलो सगळे...

मराठी माण्साच्या हिन्दी चा विजय असो.!!!

प्रतिक्रिया

जेपी's picture

10 Apr 2014 - 6:08 pm | जेपी

विश्रांती मोड ऑफ -
ढँण ढँण ढँण , मी पयला . -विश्रांती मोड ऑन .

किसन शिंदे's picture

10 Apr 2014 - 8:51 pm | किसन शिंदे

अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द असं का?

शिद's picture

10 Apr 2014 - 9:08 pm | शिद

नया हय वह...

इरसाल's picture

11 Apr 2014 - 11:46 am | इरसाल

अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द
आणी मग बेशुद्ध. ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Apr 2014 - 8:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच रे.
(हसणारी पण खाली न पडणारी)माई

मराठे's picture

10 Apr 2014 - 9:02 pm | मराठे

ushacha ras

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2014 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा

फटूमुळे =)) वारल्या गेलो आहे! =))

आता हे ऐक्न्यात किती अश्लील वाटते राव !!!

नेमकं कसं अन काय अश्लील वाटतय जरा इस्कटून सांगता का?

रामपुरी's picture

10 Apr 2014 - 10:45 pm | रामपुरी

हसू नका बरे
हसा लेको
इत्यादी सदरात एकदम फिट्ट बसेल

तुमचा अभिषेक's picture

11 Apr 2014 - 12:11 pm | तुमचा अभिषेक

भारीयं

तुमचा अभिषेक's picture

11 Apr 2014 - 12:15 pm | तुमचा अभिषेक

असाच एक वस्तर्‍यावर जोक होता एका हिंदी चित्रपटात.. एक जण बोलतो उस्तरा .. समोरचा विचारतो, किस तरा ??

सांगावा की नको हा विचार करतोय... आता तो प्रसंग घडताना मी तिथे होतो ही काय माझी चुक काय ? पण मी इथे लिहला तर मात्र माझ्या नावे बोंबाबोंब सुरु करतील.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2014 - 7:04 pm | टवाळ कार्टा

व्यनी मधुन सांगा :)

शिद's picture

11 Apr 2014 - 7:34 pm | शिद

आम्हाला पण.

खटपट्या's picture

11 Apr 2014 - 10:36 pm | खटपट्या

मला पण

दांभिक संस्कृतिरक्षकांच्या दहशतवादापासून सुटका म्हणून व्यनिची सुविधा उपलब्ध आहे, कृपया तिचा वापर करणे. मला सांगावा ही इणंती.

दांभिक वगैरे काही नाही. आई-बहीणींसमोर जर हा जोक सांगू शकत असाल तर इथेही सांगावा. कारण इथेही ताई-माई-अक्का-आज्ज्या आहेत. :)

लंबूटांग's picture

11 Apr 2014 - 8:03 pm | लंबूटांग

आई बहिणींसमोर करता येण्यासारख्या सगळ्या गोष्टी आपण इतर ठिकाणी करतो का?

शुचि's picture

11 Apr 2014 - 8:05 pm | शुचि

उदाहरणार्थ?

ह्म्म्म .... मीच देते उदाहरण - आमटी भात ओरपून खाणे. ताट तोंडाला लावून आमटी ओरपणे.

पण लंबूटांग मुद्दा तो नाहीये की आईबहीणी पुढे जे करतो ते इतरत्र करतो की नाही.
______________________

मुद्दा हा आहे की जर मिपावर ताई-भाऊ-दादा-अक्का असे वातावरण असेल तर अश्लील विनोद सांगायचे की नाही.

बाकी वितंडवाद चालू द्या. मी रजा घेते.

इरसाल's picture

12 Apr 2014 - 9:29 am | इरसाल

भाउ-वडिलांसमोर करता येणार्‍या गोष्टी असतील तर त्या अनाहिता एवजी इथे सांगाव्यात ;)

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2014 - 7:23 pm | टवाळ कार्टा

मचाक बंद????

लंबूटांग's picture

11 Apr 2014 - 7:41 pm | लंबूटांग

आणि बायकांना अनाहिताची ;)

मला पण व्यनि करावा.

च्यायला खरंच एक संस्थळ आपणच सुरू केले पाहिजे. अर्रे हाय काय अन नाय काय.

>>च्यायला खरंच एक संस्थळ आपणच सुरू केले पाहिजे. अर्रे हाय काय अन नाय काय.

तसं झालं तर मचाक म्हणजे किस खेत की मूली होईल. ;)

कानडाऊ योगेशु's picture

11 Apr 2014 - 8:36 pm | कानडाऊ योगेशु

व्य.नी करा राव!

की काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ?

शुची मामी वैयक्तिक होउ नका. विनंती आहे. असो सुदन्य असा, नसा तर वहा.

शुचि's picture

11 Apr 2014 - 10:29 pm | शुचि

ओके.

आत्मशून्य's picture

11 Apr 2014 - 10:30 pm | आत्मशून्य

काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके

शुची मामी वैयक्तिक होउ नका.= ओके
विनंती आहे. = ओके
असो सुदन्य असा, नसा तर वहा. = ओके
_________________
असं काय करता आत्मशून्य भाऊ टकुरं वाईचं थंडगर ठिवा. आता समदं इस्कटून सांगाव लागतया तुमाला. असो!!

आत्मशून्य's picture

12 Apr 2014 - 12:35 am | आत्मशून्य

काही बोला अथवा नका बोलू पण उठ सूट आमच्या आया बहीनींना मधे आन्लच पायजे नाहिका ? = ओके

हे ओके कसेकाय ?

@मितभाषी

काय ओके? Lol

इट वाजंट टॅक्टीकल बट स्ट्रेटीजिकल मुव.

मितभाषी's picture

11 Apr 2014 - 10:32 pm | मितभाषी

काय ओके? =))
अरे बास झालं बाबा. चिपाडातून काय निथळनार?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2014 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-045.gif