निमंत्रण --- आई आणि मी.. मस्त टीम!

इनिगोय's picture
इनिगोय in भटकंती
24 Mar 2014 - 9:10 am

उन्हाळी सुट्टी म्हणजे कैर्‍या, आंबे, कॅरम, पत्ते, भटकंती आणि अर्थातच उन्हाळी शिबीरही!
त्यातून हे शिबीर जर आई आणि मूल या दोघांसाठीही असेल तर? ६ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना आपल्या आईची वेगळी ओळखही यातून घडेल आणि एरवी आईचा पुरेसा न मिळणारा वेळही मनसोक्त मिळेल. याच विचाराने एका तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करीत आहोत.

शिबिराचे तपशील असे -
कुठून - पुणे, मुंबई
कुठे - कोकण (देवरुखपासून पुढे)
कधी - ९ मे २०१४ ते ११ मे २०१४ (शुक्र, शनि, रवि)
खर्च किती - एकूण ६०००/- (यात दोघांचे प्रवासखर्च, राहणे व जेवण समाविष्ट आहे.)

शिबिराचा कार्यक्रम कसा असेल?
- ३५ आसनी प्रवासी बसमधून प्रवास
- उत्तम, स्वच्छ, सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी मुक्काम
- देवरुख, जयगड, कर्‍हाटेश्वर, गणपतीपुळे, मार्लेश्वर अशा ठिकाणांना भेट
- खास कोकणातल्या पदार्थांचा आस्वाद
- वेगवेगळे बौद्धिक, शारीरिक खेळ
- आमराई, शेत, नर्सरी अशा ठिकाणांचा फेरफटका

मे महिन्याची सुरूवात, हापूस आंब्याचा दरवळ, आणि कोकणची लाल माती.. एका अविस्मरणीय अशा अनुभवासाठी अजून काय हवं?

आम्ही फक्त १५ मुलांनाच आईसोबत शिबिराला नेणार आहोत, त्यामुळे सहभाग नक्की करण्यासाठी लवकरात लवकर या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क करा -
पुणे - वर्षा बेटावदकर - ९८८१ २३० ९७७
पुणे - श्रीकला कानडे - ९५०३ ८३९ ०३१
मुंबई - इनिगोय - ८९७६ ०९० ५६०

आईखेरीज फक्त मुलाला/मुलीला नेणे शक्य होणार नाही, कारण शिबिराची मूळ संकल्पनाच आई आणि मुलाला एकमेकांसोबत मजा करता यावी, अशी आहे.

सहभाग निश्चित केल्यानंतर पुढील माहिती देणे आवश्यक आहे -
पाल्याचे संपूर्ण नाव
जन्मतारीख
पत्ता व दूरध्वनी
शाळेचे नाव व इयत्ता
विशेष आवडीचे छंद
गुणविशेष

आईचे संपूर्ण नाव
जन्मतारीख
भ्रमणध्वनी
शिक्षण व व्यवसाय
कामाचे स्वरूप
आवडीचे कार्यक्षेत्र
छंद

*** धाग्यावर अवांतर टाळावे हेवेसांनल. ***
विशेष विनंती - आर्थिक व्यवहार केवळ वर्षा बेटावदकर यांच्याशी होतील. हे आर्थिक व्यवहार संपूर्णतः स्वतःच्या जबाबदारीवर करावेत. त्याच्याशी मिपा व्यवस्थापनाचा कोणताही संबंध असणार नाही. तसंच ही सहल नसून शिबीर आहे, याची स्पष्ट कल्पना असू द्यावी.

प्रतिक्रिया

दिव्यश्री's picture

24 Mar 2014 - 11:28 am | दिव्यश्री

अरे वा ...सही कल्पना आहे . मनापासून शुभेच्छा . ओळखीत कळवते . :)

भावना कल्लोळ's picture

25 Mar 2014 - 1:59 pm | भावना कल्लोळ

शुभेच्छा

पिलीयन रायडर's picture

24 Mar 2014 - 11:48 am | पिलीयन रायडर

सुंदर कल्पना!!

तुमचा अभिषेक's picture

24 Mar 2014 - 11:53 am | तुमचा अभिषेक

कोकण. मस्त जागा निवडलीत. बजेट सुद्धा ओके आहे. कोणी उत्सुक दिसले तर कळवेन नक्की.
सर्वांसाठी म्हणून एक शंका
या वयोगटात एखाद्या आईला दोन मुले असल्यास?

इनिगोय's picture

24 Mar 2014 - 12:54 pm | इनिगोय

आई आणि दोन मुलं असं असेल तर ९००० इतका खर्च येईल.
अशा स्थितीत किमान वयाची अट थोडी शिथिल करणंही शक्य आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2014 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर कल्पना !

सुहास झेले's picture

24 Mar 2014 - 12:17 pm | सुहास झेले

उत्तम कल्पना... डिटेल्स forward केल्यात, इच्छुक संपर्क साधतील नक्कीच :)

रेवती's picture

24 Mar 2014 - 6:33 pm | रेवती

कसली भारी कल्पना आहे!

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 6:43 pm | प्यारे१

इथेही डिस्क्लेमर येऊ द्या.

आत्मशून्य's picture

24 Mar 2014 - 8:00 pm | आत्मशून्य

हां प्रकार माझ्या आईने माझ्याबाबत केला आहे. ती आणी तिच्या निवडक मैत्रिणी त्यांच्या पोराबाळान्ना घेउन ट्रिपा आखत असत. अर्थातच कुणालाच पोराङ्क्डे फार लक्ष द्यावे वाटत नसे व आमची ओळ्ख करुण दिल्यावर एकत्र खेळा यला लाउन महिला बर्ग त्यांच्या हसने खिदळ्ने गप्पा टप्पा करत आख्खा दिवस घालवत असे. आम्हीमुले उगाच आम्हालाही विनोद कळ्तो हे भास्वायाचा क्षीण यत्न करत त्यांच्या विराट विकट विनोदान्ना सर्व समजले आशा पध्दतीने मान डोल्वत हसत असू. फार्मज्या यायची. नवे सवंगडी भेटले

तसंच ही सहल नसून शिबीर आहे, याची स्पष्ट कल्पना असू द्यावी.

याची कल्पना होतीच म्हणुनच वरिल प्रतिसाद लिहला आहे... लहान पोराला काय कळते सहल आणि शिबीरातील फरक ? का त्यानीही ही सहल नसुन शिबीर आहे याची दखल घेऊन विशीष्ट वर्तन करणे अपेक्षीत आहे ?

जाता जाता.. वॉल्ट डिस्ने थिम पार्क बांधत होता, जेंव्हा बांध्काम चालु असे तेंव्हा तो वरचेवर तेथील ठिकाणांना भेट देत असे... तेव्हां भले इन्जिनीअर्स, तंत्रज्ञ, मोठ मोठ मोठ्या व्यक्ती सोबत असुनही तो बोलता बोलता मधेच गुढग्यावर रांगायला लागत असे.... त्याचे असे वर्तन पाहुन न राहुन एकाने शेवटी विचारलेच काय हो महाशय आपण मधेच का गुढग्यावर रांगता... त्याने फक्त एव्हडेच सांगितले मी थिमपार्क लहान मुलांसाठी बांधतोय... तेंव्हा त्यांच्या नजरेतुन तो कसा दिसतो हे बघायचे असेल तर मला गुढघ्यावर रांगतच फेरि मारायला नको काय ?

माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं. आणि फार जुन्या मानसिकता आजही लागू असतीलच असं नाही. पोरांना टाकून सहली करणार्‍या आया आजकाल केसरीच्या ' माय फेअर लेडी' सारख्या सहली करतात की. संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये.

इनि, मला यायला खूप आवड्ले असते, पण माझी पिल्लू लहान आहे अजून.

आत्मशून्य's picture

25 Mar 2014 - 1:58 pm | आत्मशून्य

माझ्या मते गुढघ्यावर रांगतच फेरि मारण्यापेक्षा त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे एक लहान मूल असतं, त्याच्या नजरेने बघायला हवं होतं.

ओह! आय सी... वाल्ट डिस्नेका तो चुक्याच म्ह्ट्लं पाहिजे. तरिही उसगावात असाल तर डिस्नेवर्ल्ड ला भेट द्याय्ला विसरु नका.

संकल्पना कळली नसेल तर निदान तिच्या विरोधी मत तरी जाहीर करू नये.

मी कोणतेही विरोधी मत प्रकट केलेले नाही हे समजुन घेतले तर बरे होइल अन्यथा मी जे व्यक्त केलय ते आपणास क्ळाले नसल्यास त्याचे जाहिर प्रदर्शन करु नये ही विनंती.

इनिगोय's picture

25 Mar 2014 - 9:59 pm | इनिगोय

काल आणि आज दिवसभरात या शिबिरासाठी नाव नोंदवू इच्छिणार्या बर्याच जणांनी/जणींनी संपर्क साधला.. इतक्या जणांपर्यंत हा उपक्रम पोचवता आला, त्याबद्दल मिपाचे आभार!

ज्यांना अजूनही यात सहभागी व्हायचंय त्यांनी लवकर संपर्क साधावा, ही विनंती. पंधरापेक्षा अधिक नावं नोंदवली गेली (तसे होण्याची शक्यता दिसतेय) तर दोन शिबीरं घेता येतील.

कवितानागेश's picture

25 Mar 2014 - 11:20 pm | कवितानागेश

खूपच छान आहे उपक्रम. विशेषतः एरवी नोकरीत व्यग्र असलेल्या आयांना आणि त्यांच्या मुलांना हा बदल खूपच छान होईल.

मनीषा's picture

27 Mar 2014 - 1:17 pm | मनीषा

खूप चांगली कल्पना आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा

लीलाधर's picture

27 Mar 2014 - 11:39 pm | लीलाधर

माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

लीलाधर's picture

27 Mar 2014 - 11:40 pm | लीलाधर

माझ्या गावाला शिबिर घेतेय्स फारच छान आनंद झाला. जयगड नांदिवडे कर्र्हाटेश्वर फिरून आण हो त्या दरम्यान तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन हो संकल्पना आवडल्या गेली आहे.

>>तेथे असेन तर मीही सहपरिवार हजेरी लावेन

वयोमर्यादा बघता तुला परवानगी मिळेल की नाही ही शंका आहे.

बापाने काय घोडे मारले आहे? वडिलांबरोबरही असे एखादे शिबीर आयोजित करता नाही का येणार?
खरं तर आईपेक्षाही बापाची वेगळी ओळख होण्ञाची आणि त्याचा पुरेसा वेळ मिळण्याची जास्त गरजा आहे असे मला वाटते. असो!

किंवा मग आई-वडील दोघांनाही येऊ द्या की!

हा मुद्दा उपस्थित करणार होतो पण मूर्ख कमेंटचा निष्कारण पाऊस पडण्याच्या भीतीने गप्प राहिलो.

पिलीयन रायडर's picture

28 Mar 2014 - 2:00 pm | पिलीयन रायडर

अहो आयोजन करणार्‍या बहुदा सगळ्या स्वतः आया असतील.. त्यांना बायकांना मॅनेज करणं सोप्प आणि कंफर्टेबल वाटत असेल.. जनरली परगावी १०-१५ पुरुषांना नेण्यापेक्षा बायकांना नेणं त्यांना सेफ वाटत असेल.. किंवा इमोशनली त्यांना आई-मुल हे बाँडिंग जास्त रिलेट करता येत असल्याने त्या दृष्टीने शिबीरात काय उपक्रम घ्यायचे हे ठरवणं त्यांना सोपं जाईल पण बाप्-मुल ह्या नात्याच्या दृष्टीने घ्यायचे उपक्रम त्यांना कदाचित तेवढे रिलेट करता येणार नसतील.. अशी काहीही १०० कारणं असु शकतात.. शिवाय "आमचं शिबीर..आमची मर्जी" हे मुख्य कारण असुच शकतं ना!

मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?

आत्मशून्य's picture

28 Mar 2014 - 3:21 pm | आत्मशून्य

हेच बोलतो म्हणतो.

अभिनव कल्पनेचे कवतुक करायचे सोडून उलट लोक पण काहीही कमेंट टाकत असतात शिंचे... अशाने का राम राज्य येणार आहे की ब्रेन ड्रेन थांबणार आहे कि जनतेचे भले होणार आहे की मिपा प्रगल्भ बनणार आहे .... लोकांना पण ना कळतच नै धागा कोणाचा आपण कशाचा अन आपण कमेन्ट काय लिहतोय.... बर गप वाचुन पोसिटिव बोलता येत नसेल तर शांत रहावे ना आले मोटे मत व्यक्त करायला... उचलले बोट लावले कळफ्ल्काला

बाप काय रोजच पोरगं सान्भाल्तो हवं नको ते बघतो कधी आईला ती संधी दया की राव..
..

मुद्दाम काही घडत नाहीये ना, मग कशाला असले प्रश्न काढायचे..?

म्हणजे पडलेला प्रश्नही बोलून दाखवायचा नसेल तर तसं सांगा हो. नै म्हणजे डिस्क्लेमर लावलेला बरा की पुरुषांनी प्रतिक्रिया देणे वर्ज्य आहे इ.इ.इ.?

मुद्दाम काही घडो न घडो, प्रश्न विचारला की आभाळ कोसळल्यागत करण्याचे कारण समजले नाही. प्रतिक्षिप्त क्रियेगत वाक्य पाहून चिकार करमणूक मात्र झाली.

बॅटमॅन's picture

29 Mar 2014 - 3:20 pm | बॅटमॅन

शिवाय धागा कुणाचा आणि पुढेपुढे कोण करतंय ते पाहून तर अजूनच करमणूक झाली. स्वयंघोषित प्रवक्तेपद सगळीकडे मिरवू लागले की त्याचं हसं होतं.

सुनील's picture

28 Mar 2014 - 2:15 pm | सुनील

हेतू स्तुत्य परंतु आई-मूल टीम असे घडण्याची शक्यता कमी!

१५ आया आणि त्यांची पोरे असे दोन प्रमुख गट पडतील. खेरीज, १५ असल्यामुळे प्रत्येक गटात किमान ३ उपगटदेखिल पडतील!!

आयांचा गट आपल्या गप्पाटप्पांत (सांसदीय शब्द!) मग्न तर पोरे-टोरे खेळण्यात गुंग!!!

सहल शिबिर संपल्यावर जर कुणी प्रांजळपणे वृत्तांत लिहिलाच तर याचा प्रत्यय येईलच!!!!

टीप - असे दोन गट पडण्यात चूक काहीच नाही किंबहुना असे होणे हेच नैसर्गिक आहे.

असो, शुभेच्छा!

सस्नेह's picture

28 Mar 2014 - 2:35 pm | सस्नेह

उपक्रम छान आहे. शुभेच्छा !

गणपा's picture

28 Mar 2014 - 3:50 pm | गणपा

कल्पना झक्कास आहे.

आत्मशून्य's picture

29 Mar 2014 - 1:50 pm | आत्मशून्य

विविध अयान्नी टीम सोबत काय धमाल केली हे जाणुन घ्यायला उत्सुक....