रिंकू पाटील १९९०

देव मासा's picture
देव मासा in काथ्याकूट
24 Jan 2014 - 3:52 am
गाभा: 

काल एक कविता वाचनात आली . त्यात हि ओळ होती
“कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द.
भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ? ''
आणि अचानक मन १९९०चा दशकात गेले त्या वेळी मी ५वीत असीन. त्याच काळात रिंकू पाटील जळीत प्रकरण घडले होते , ९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती . या प्रकरणात तर मुलीला १०वीच्या परीक्षा केंद्रातच पेटवून दिले होते . हरीष पटेल असे काहीतरी तिच्या प्रियकराचे नाव होते . आणि तिची दुसरी सख्खी बहिण सुधा याच परीक्षा केंद्रात परीक्षा देत होती म्हणे असे पुसटसे आठवत आहे . हे प्रकरण सहज गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला म्हंटले पुढे काय झाले असेल या प्रकरणाचे पाहावे . तिच्या शाळेचे नाव माहित पडले Century Rayon High School कल्याण मध्ये आहे कुठे तरी हि शाळा , आर्कुट वर याच शाळेचा ग्रुप वर एक माणुस रिंकूची आठवण काढीत म्हणत आहे
Rinku Patil 1990 Batch
Do anybody still remember rinku patil.
Unfortunately I am also from that most infamous Batch.
Rinku was my class mate. We were in the same examination Hall.
I can still remember her bubbly face. She was so excited about the examination.
तिच्या प्रियकराने तिला का मारले?
या प्रकरणात पुढे काय झाले ? कुनाला माहित आहे का ?
अगदी जुने मराठी वर्तमान पत्र ओन- लाइन कुठे वाचू शकतो ?

तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे? तुम्हाला काय करायची आहे नसती उठाठेव म्हणाल , तर त्या वयात मी जर हेच प्रश्न विचारले असते लोकांना तर मला हेच उत्तर मिळाले असते '' तुला काय करायची आहे नसती उठाठेव. म्हणुन आता विचारीत आहे

प्रतिक्रिया

इथे थोडी माहीती दिली आहे. http://mobiletoi.timesofindia.com/mobile.aspx?article=yes&pageid=3&secti...

Rinku Patil (16) was set ablaze in a classroom in Ulhasnagar by a 22-year-old spurned lover,Haresh Patel,on April 30,1990.She was appearing for an SSC examination As he committed the murder inside,Patels friends Anup Pratapsingh Verma and Ashok Wagh guarded the entrance to the classroom with a sword and a revolver Patel committed suicide a day after the killing by leaping in front of a running train Verma and Wagh were held guilty for murder conspiracy and sentenced to life imprisonment by a trial court State classified Verma as one who committed an offence with highest perversity,which entails a jail term of 28 years

रिंकू पाटीलच्या वडिलांची मुलाखत, पान नं. १३ - http://documents.adventistarchives.org/Periodicals/OT/OT19911201-V35-11,...

हे शिवाजी ताठे काय प्रकर्ण आहे?

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jan 2014 - 1:22 pm | llपुण्याचे पेशवेll

मात्र या भाईगर्दीत शिवाजी ताठे नावाचा माणूस लख्ख आठवून जातो. फ्लेक्स नव्हते त्या काळापासून हा ताठे नावाचा माणूस मुंबईत सर्वत्र ‘ताठे’ असं आपलं नाव लिहून ठेवायचा. हा ताठे कोण होता, ते कधी कळलंच नाही. पण मोबाइल, चॅटिंग, एसएमएस, एफबी आणि व्हॉट्सअॅबपच्या काळातही जेवढा एखाद्याचा गाजावाजा झाला नसेल तेवढा या ताठे नावाच्या माणसाने खडूने मुंबईभर आपलं नाव लिहून केला होता.

धन्यवाद!

गूढकथेचं भारी पोटेन्शियल आहे यात!

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jan 2014 - 1:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी पण ठिकठिकाणी , विशेषतः रेल्वे स्टेशनवर ही अक्षरे बघितली आहेत. पण काय प्रकरण आहे ते कळले नाही.

जला है जिस्म जहां दिल भी जल गया होगा..अब कुरेदते हो खाक..आरजु क्या है???????

अर्धवटराव's picture

24 Jan 2014 - 1:48 pm | अर्धवटराव

पण त्याबद्दलच्या बातम्या वाचुन आईबाबांचे "हे काय चाल्लय" या भावनेचे काहिसे चिंताग्रस्त, काहिसे दु:खी चेहेरे अजुनही आठवतात. ज्या शेजार्‍यांना मुली होत्या त्यांचं धास्तावणं पण आठवतय.
बहुतेक याच प्रकरणावरुन तेजस्विनी चित्रपटात एका मुलीला परिक्षा हॉलमधे जीवंत जाळण्याचा सीन आहे. ते सर्व बघुन मुंबईबद्दल एकप्रकारची धास्ती वाटायला लागकी होती.

मी_आहे_ना's picture

24 Jan 2014 - 4:25 pm | मी_आहे_ना

"ते सर्व बघुन मुंबईबद्दल एकप्रकारची धास्ती वाटायला लागकी होती." -अगदी असेच म्हणतो.
शिवाय, ते अमृता देशपांडे (सांगलीचे) प्रकरण. (त्यावरही चित्रपट आलाच) आमच्या इंजिनियरिंगच्या वर्गातले बरेचसे तिचे पूर्वीचे बॅचमेट्स. आणि तेव्हाच तो 'दुश्मन' सिनेमा आलेला (काजोल आणि अशुतोष राणा)
हे सगळ आठवूनही अंगावर काटा येतो.

तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे?
हो, हे खरं आहे. त्याकाळी ठाणे एसटी डेपोत अनेक एसटींवर मी "ताठे" असे पांढर्‍या खडुने लिहलेले वाचले आहे. त्यावेळी मला असेच वाटले होते ही ताठे भानगड नक्की आहे तरी काय ?

अक्षर सारखंच असायचं का हो?

मदनबाण's picture

24 Jan 2014 - 8:59 pm | मदनबाण

आता ते कसं सांगणार ? पण जवळपास आगारातल्या प्रत्येक एसटीवर हे लिहलेले असायचे !

खटपट्या's picture

25 Jan 2014 - 5:38 am | खटपट्या

हो अक्षर सारखंच असायचं सगळीकडे. त्यातल्या त्यात "ठ" ची ठेवण सगळीकडे सारखीच असायची. आमची खूप चर्चा व्हायची या बाबतीत. आम्ही बरेच अंदाज बांधले होते
उदा. या माणसाकडे इतके खडू येतात कुठून? हा खडूच्या कारखान्यात कामाला असावा. त्याच्या कामामध्ये लोकल चा आणि बस चा प्रवास भरुपुर असावा. विशेष म्हणजे शेकडो ठिकाणी लिहून ठेवले होते तरीही त्याला प्रत्यक्ष लिहिताना कोणीच पहिले नव्हते. एक अंदाज असा कि रात्री चा लिहित असावा. फुलटू चर्चेचा विषय होता त्या वेळी. आमचा ग्रुप तर कुठेही लिहिलेले दिसले कि मोठ्याने एक सुरात वाचन करत असे "ताठे sssssssss " *smile*

देव मासा's picture

25 Jan 2014 - 1:34 am | देव मासा

हंस आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद , ताठे मधला ''ठ '' वळणदार होता , विक्रोळतील एल .बि .एस मार्गावरील सिपला Cipla कंपनीच्या भिंती वर हे नाव वाचले होते ,रोजचा येण्या -जाण्याचा रस्ता होता तों माझा , म्हणुन लक्षात आहे वळणदार ''ठ '' आणखी रस्त्यावरील दिव्यान साठी electrical junction box असतात , या लाल रंगाच्या बॉकस वर त्याचे विशेष प्रेम असावे , घाटकोपर ते भांडुप दरम्यान असलेल्या अश्या बऱ्याच लोखंडी बॉकस वर हे नाव वाचलेले आठवत आहे .

रेवती's picture

25 Jan 2014 - 2:08 am | रेवती

रिंकू पाटील प्रकरण झालं तेंव्हा मी मुलींच्या होस्टेलला रहायचे (दुसर्‍या गावात), तरी आईबाबा बरेच घाबरले होते. त्यातून आमच्या वसतीगृहातून एक मुलगी त्याचवेळी (योगायोगाने)मुलांच्या वसतीगृहातील एकाबरोबर पळून गेल्याने आमच्यावर आधीच असलेले निर्बंध कडक झाले. रोज मेंढरे सोडावीत तश्या मोजून मुली बिल्डींगीतून सोडायच्या व एक बंदूकधारी बुवा बरोबर असायचा. परत आल्यावरही गिनती व्हायची. मुलगी पळून गेली ती उंच भिंतीवरून उडी मारून पळाली, तीही अपरात्री. आमच्या रेक्टर बाईंना राजिनामा द्यावा लागला होता. त्यातून एकदा मुलीचा मित्र हिला भेटायला अपरात्री तिच्या रूमच्या खिडकीजवळ आला होता व नेमक्या तिच्या ठिकाणी झोपलेल्या दुसर्‍या मुलीला खिडकीतून हात घालून उठवायला लागल्यावर ती किंचाळून ओरडली असे आठवते आहे. एकंदरीतच रिंकू पाटील प्रकरण आम्हाला (काही कारण नसताना) महागात पडलं होतं. वर्ष संपल्यावर लगेच बाबांनी तिथून माझे नाव काढून घरी आणले.

मयुरा गुप्ते's picture

25 Jan 2014 - 2:27 am | मयुरा गुप्ते

रिंकु पाटील प्रकरण झालं तेव्हा माझी मोठी बहीणही दहावीच्या परिक्षेला बसली होती. खुपच तणाव व धास्ती बसलेली आठवते.ज्या क्रुर प्रकारांनी तीला मारलं गेलं तो प्रकार एवढ्या दिवसा ढवळ्या सगळ्या परिक्षार्थी,पर्यवेक्षकांसमोर,दहावीच्या केंद्रावर झाल्याने पुढची खुप वर्ष केंद्रांवर अधिकप्रमाणात सुरक्षा व्यवस्था लावायला सुरुवात झाली. दहावीच्या वर्षामध्ये अभ्यास्,शाळा आणि रिंकु पाटील प्रकरण हा पुढच्या अनेक बॅचेस चा विषय होता.

--मयुरा.

विकास's picture

25 Jan 2014 - 6:51 am | विकास

तसेच पुर्वी मुंबईत जागो जागी सार्वजनिक ठिकाणी '' शिवाजी ताठे '' किंवा नुसतेच ''ताठे '' पांढऱ्या खडुने लिहलेले आढळून येत असे . हे काय प्रकरण आहे?

कुठल्या काळात (वर्षातले) म्हणता? मी कधी बघितल्याचे आठवत नाही... हे ऐकून एकदम मारूती कांबळेच आठवला. :(

देव मासा's picture

25 Jan 2014 - 5:42 pm | देव मासा

कदाचित गिरणी संप सुरु झाला त्या नंतर पासुन अगदी १९९५ पर्यांत *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:

वेताळ's picture

25 Jan 2014 - 7:33 pm | वेताळ

फाशी झाली होती..पुढे काही महिती नाही.

रोहन कुळकर्णी's picture

25 Jan 2014 - 9:07 pm | रोहन कुळकर्णी
बंडा मामा's picture

25 Jan 2014 - 11:33 pm | बंडा मामा

जुन्या जखमेवरची खपली काढल्यासारख्या वेदना झाल्या..

त्यानंतरही अ‍ॅसिड फेकणे वगैरे भयंकर प्रकार बरेच झाले.
बंडामामा यांच्याशी सहमत. :(

माझीही शॅम्पेन's picture

26 Jan 2014 - 11:31 am | माझीही शॅम्पेन

रींकू पाटील आणि ताठे प्रकरण एकाच लेखात कस काय येऊ शकत हे काही कळल नाही?

तेव्हा जे वाटल तेच आता ही वाटताय दहावीत असतानाच एकदम प्रिय-कर असण म्हणजे खूप झाल !!!

पुण्यात बहुतेक त्यानंतर दोन तीन वर्षातच फर्ग्युसन कॅालेज मध्ये एका मुलीचा खून झाला होता आणि मग त्या मुलाने पण स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती, बहुदा जान्हवी तुपे असं नाव होतं मुलीचं!

तुषार काळभोर's picture

28 Jan 2014 - 5:26 pm | तुषार काळभोर

थोडा अधिक संदर्भ

तिकडे लिहिल्याप्रमाणे ती पुण्याचे माजी खासदार कै विठ्ठल तुपे यांची कोणीही नव्हती.
आणि त्या मुलाच्या कुटुंबाचीही कहाणी दुर्दैवी होती. त्या घटनेमध्ये मुलाने आत्महत्या केली, त्या धक्क्याने त्याची आई गेली.
मग त्याचे वडील व लहान भाऊ दोघे राहिले. पण काही वर्षांपुर्वी त्याच्या भावाचे निधन झाले, आणि त्या धक्क्याने त्याच्या वडीलांनी आत्महत्या केली.

हे माहित नव्हते. वाचून अंगावर शहारा आला!

वामन देशमुख's picture

28 Jan 2014 - 1:05 pm | वामन देशमुख

हे ताठे प्रकरण आहे काय नेमकं?

अनिरुद्ध प's picture

28 Jan 2014 - 7:19 pm | अनिरुद्ध प

'ताठे' असे सर्व रेल्वे स्थानका वरिल स्थानकाच्या नाम निर्देश अस्लेल्या पाट्यांवर लिहिलेले वाचले आहे मुम्बैत.

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2014 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

९०च्या काळात १०वीत शिकणाऱ्या मुलीला प्रियकर असणे हीच मोठी अशचर्यचि गोष्ट होती .

असायची हो. ९०च्या पूर्वीही खूप होती.
साठच्या दशकाच्या शेवटच्या वर्षांमध्येही शालेय प्रेमप्रकरणे होती. माझ्या वर्गातच (१९६८-६९) २ प्रेमप्रकरणे होती. पण अगदी असफल प्रेमातही एवढी क्रुरता नव्हती.

सुहास..'s picture

28 Jan 2014 - 7:27 pm | सुहास..

@ पेठकर काका,

तुमचे होते का काही ;)

( काही त्याकाळचे किस्से एकण्यास उत्सुक असलेला )

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2014 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर

आम्हाला तर ह्या भानगडवाल्यांचं कौतुक वाटायचं.

'प्रेमा'च्या पुढचं पाऊल 'लग्न' आणि लग्न करायचं म्हणजे अर्थार्जन पाहिजे (जबाबदरीचं भान होतं). शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं त्यामुळे ह्या पासून दूर होतो.

'प्रेम' म्हणजे फक्त 'लग्ना आधीची मौजमजा' हे समीकरण तरूणाईत नंतर रुजलं. 'तुम मेरी नही हो सकी तो किसी़की भी नही होगी।' हा स्वार्थी आणि स्वामित्व भावनेला खतपाणी घालणारा विचार त्याही नंतर तरूणाईच्या एका वर्गात रुजला. ह्या वर्गाकडूनच 'रिंकू पाटील' सारख्या घटना घडल्या.

प्रचंड सहमत..

देव मासा's picture

28 Jan 2014 - 7:01 pm | देव मासा

अगदी सामान्य माणूस आणि सामान्य विचाराने मला असे वाटते १६ वर्ष रिंकूचे मारण्याचे वय न्हव्ते , हंस यांनी दिलेल्या मासिकातील दुव्या मधील तिचा फोटो पाहून असे वाटते ती खूप काही करू शकली असती , ९० नंतर आलेल संगणक युग ती पाहु शकली नाही .आर्कुट , फेस -बुकची गंमत तिला अनुभवता आली नाही . म्मोल मधली शॉपिंग . पदवी नंतर सामान्य कुटुंबातील मुलांना मिळणारी एमएनसी कंपनीतल मोठा पगार आणि त्या मोठ्या पगारुतून घेता येणारा भौतिक आनंद ती उपभोगु शकली नहि. साधारण ९०चा दशका पर्यंत सुधा तुम्हाला शिक्षण पूर्ण करून चंगली नौकरी मिळेल याची शास्वती न्हवती .
अभाय्स करतोये असे म्हंटले कि गल्लीतली मोठी मुले म्हणायची '' अरे अभ्यास करून कुणाचे भले झाले आहे '' पेप्सी आणि कोला आल्या नंतरचा काळ , झपाट्याने सगळे काही बदलले . किमान पदवी मिळवली तर आज कुठल्याही बिपिओ मध्ये १०-१२ हज्जाराची नौकरी हमखास मिळणारच , अशी खात्री मिळते हल्ली .

sarita gangurde's picture

7 Feb 2017 - 1:28 pm | sarita gangurde

Rinku patil Che classmate ahe ka KonI mala tichya Baddal ani ata tiche aai vadil kay kartat kuthe asatst he kalel ka

प्राची अश्विनी's picture

11 Dec 2020 - 11:43 am | प्राची अश्विनी

http://www.tatheagarbatti.co.in/
ती ताठे अगरबत्तीची जाहिरात असावी का₹?

चौथा कोनाडा's picture

11 Dec 2020 - 1:25 pm | चौथा कोनाडा

हो. ही सोलापुरची आहे असे दाखवत आहे.
पंढरपुरची ताठे अगरबत्ती सुद्धा सुप्रसिद्ध आहे. (दोन्ही एकच आहेत का ते माहित नाही)
अगरबत्ती उत्कृष्ट असते. बर्‍याच वेळा वापरतो.

Rajesh188's picture

11 Dec 2020 - 12:57 pm | Rajesh188

हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती.
आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली.
पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.

Rajesh188's picture

11 Dec 2020 - 12:57 pm | Rajesh188

हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती.
आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली.
पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.

Rajesh188's picture

11 Dec 2020 - 12:57 pm | Rajesh188

हरीश पटेल नी आत्महत्या केली त्याची बॉडी 2 दिवसानंतर सापडली होती.
आणि त्याच्या दोन साथीदार ना पोलिस नी पकडले आणि त्यांना जन्म ठेप झाली.
पोलिस च्या दृष्टी नी हे प्रकरण संपले.