टि टाईम स्नॅक्स प्रकार १ - अंडे के पकोडे

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
26 Dec 2013 - 5:44 pm

Pakode

साहित्यः

१. उकडलेली अंडि - ३
२. हिरव्या मिरच्या/पेरभर आलं बारीक चीरुन
३. १/२ जुडि प्रत्येकि मेथी आणि पालक बारीक चीरुन
४. ओवा - १/२ चमचा
५. हळद - १/२ चमचा
६. बेसन - गरजेप्रमाणे
७. चवीनुसार मीठ
८. चाट मसाला (ऑप्शनल)
९. तळण्यासाठि तेल

कॄती:
१. पकोडे तळण्यासाठि मंद आचेवर कढईत तेल तापत ठेवा
२. एका मोठया बाउल मधे/भांडयात उकडलेली अंडि किसुन घ्या. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, मेथी, पालक, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घालुन सारखं करा
३. गरजेप्रमाणे बेसन घालुन भज्यांच्या पीठप्रमाणे भीजवा
४. गरज लागली तरच पाणी (हबक्याने) घाला अन्यथा पालक/मेथीला जे पाणी सुटतं त्याने ज्यादा पाणी घालायची गरज उरत नाहि
५. गरम तेलात बुडवलेल्या चमच्याने पकोडे गोल्डन बाउन होईस्त तळुन घ्या. पकोडे तळताना आच मंदच असु द्या. मोठया आचेवर तळले तर पकोडे बाहेरुन लाल दिसतील पण आतुन कच्चे लागतील. (गरम तेलात चमचा बुडवुन घेतल्याने पीठ चमच्याला चीकटत नाहि)
६. टिश्यु पेपेरवर काढले कि गरम असतानाच त्यावरुन चाट मसाला भुरभुरा
७. आवडत्या चटणी/सॉस आणि वाफाळणार्‍या चहासोबत गरमागरम पकोडयांचा आस्वाद घ्या

टीपा:
१. हि पाकॄ अंडे न घालताहि करता येईल :D पण अंडयाची उणीव भरुन काढण्यासाठि त्यात किसलेला फ्लॉवर घालता येईल. पालक-मेथी-फ्लॉवर जरा वेगळं कॉम्बो होईल पण अगदिच वाईटहि लागणार नाहि.
२. अंडयात नुसती मेथी किंवा नुसता पालक घालुनहि करता येईल. मी पालक अश्यासाठि घेतलं ज्याने मेथीचा कडवटपणा जरा कमी झाला
३. कमी तेलात तळण्यासाठि आप्पेपात्राचा उपयोग करता येईल त्या करीता पीठ जरा घट्ट ठेवा आणि थोडया थोडया वेळाने पकोडे गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व बाजुनी सारखे शीजतील
४. ह्या पकोडयांबरोबर तिखट-गोड पुदिना चटणी बेस्ट लागेल (असा आपला माझा अंदाज)

प्रतिक्रिया

आयला अंडे उकडलेले हजर हायेत . बाकी मसाला बी हजर हाय करुन बघतो लगेच .

यशोधरा's picture

26 Dec 2013 - 5:49 pm | यशोधरा

भारीच फोटो! पाकृ मग वाचते! सद्ध्या फोटो बघत आहे!

गणपा's picture

26 Dec 2013 - 6:10 pm | गणपा

तोंडीलावायलाही उत्तम.
काय दिपकराव ३१ची तयारी जोरात दिसतेय. ;)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 7:16 pm | मुक्त विहारि

सौदी शँपेन पिउन...

ते काय यु.ए.ई., बहारिन, ओमान किंवा कतार आहे का?

दिपक.कुवेत's picture

26 Dec 2013 - 7:48 pm | दिपक.कुवेत

बघा ना हा गणपा कसा जखमेवर मीठ चोळतोय ते! त्यामुळे भारतात गेलो कि वर्षभराचा कोटा कप्लीट(च) करुन येतो....... सुरवात जेट एअरवेज नी कुवेत एअरस्पेस सोडला कि लगेच होते :D

मुक्त विहारि's picture

28 Dec 2013 - 6:21 pm | मुक्त विहारि

एयर इंडियाला पर्याय नाही.

प्यारे१'s picture

26 Dec 2013 - 6:37 pm | प्यारे१

भजी देखणी दिसत आहेत.

>>हि पाकॄ अंडे न घालताहि करता येईल पण अंडयाची उणीव भरुन काढण्यासाठि त्यात किसलेला फ्लॉवर घालता येईल.

अंड्याऐवजी पनीर घातलं तर कुस्करुन? बरं लागेल का?

दिपक.कुवेत's picture

26 Dec 2013 - 7:41 pm | दिपक.कुवेत

विचारशील म्हणुन. पनीर असल्यामुळे मिश्रण तेलात घातल्यावर कदाचीत फुटेल (बेसन असलं तरी) आणि कुठल्याच पदार्थाची नक्कि अशी चव कळणार नाहि (माझा अंदाज). बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) पहा आणि सांग ना........अरे हाय काय नाय काय!

>>बाकि प्रत्यक्ष तू करुन(च) पहा आणि सांग ना........अरे हाय काय नाय काय!

आयला!! मला वाटलं करुन बघतो आणि सांगतो म्हणाल. =)) . आता कधी रसगुल्ले किंवा पनीर पराठे करायची लहर आलीच तर वाटीभर पनीर बाजूला काढून करुन बघायला हवं. नायतर येवढ्यासाठी पनीर विकत आणून ते वाया गेलं तर प्रचंड हळहळ वाटेल राव. ;)

कवितानागेश's picture

26 Dec 2013 - 10:48 pm | कवितानागेश

हेच विचारायला आले होते, की पनीर कुठे गेले? ;)
पनीर कुस्करण्याऐवजी तुकडे कापून घातलं तर बरं पडेल... अर्थातच अंडे न घालता!

होतेत रे सुडक्या. मस्त पकोडे होतेत पनीराचे.
कर तू बिनधास्त. :) जोडीला मी कायतरी घेऊन येतो. ;)

अभ्या..'s picture

27 Dec 2013 - 1:27 am | अभ्या..

हायला दिपूकाकाला कॉम्प्लिमेंटस द्यायच्या राह्यल्याच की. ;)
दिपूकाका, भारीच हं. :)

यशोधरा's picture

29 Dec 2013 - 12:48 pm | यशोधरा

दरवेळी कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या राहून कशे वो जातेत तुमच्या? :P

अभ्या..'s picture

29 Dec 2013 - 2:34 pm | अभ्या..

बघा की हो. आजकाल प्रतिसाद उडायच्या भीतीने मुख्य मुद्दा लक्षातच राहात नाही काही. ;-)
सगळा वेळ भाषा चेक करने, लोकांचे इगो साम्भालने यातच जातो.

यशोधरा's picture

30 Dec 2013 - 12:29 pm | यशोधरा

खडखाव, खडकाव. आपके दिन हय :P

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 7:13 pm | मुक्त विहारि

फोटो आणि रेशीपी....

च्यामारी मी २००९-२०१० मध्ये कुवैतला होतो, तेंव्हा आला असतास तर?

दिपक.कुवेत's picture

26 Dec 2013 - 7:37 pm | दिपक.कुवेत

काय सांगताय काय? अहो कुवेत मधे मी २००६ पासुन आहे......आधी मिपा वाचक होतो फक्त. ह्या मागच्या वर्षभरात जssssssरा अ‍ॅक्टिव्ह झालोय एवढचं.

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 7:49 pm | मुक्त विहारि

दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम

और पल पल पे लिखा है मिलनेवाले का नाम....

जावू दे....

आता एक काम करु या.येण्यापुर्वी व्य.नी.करा.

कुठे तरी पिकनिक करू या आणि तिथेच अन्न बनवून खावू या.

(वरील आमंत्रण नागपूरकर स्टाईलने नसून, डोंबिवली स्टाईलने आहे.)

अंडे न घालता अंडे के पकोडे करता येतील हेवाचून भरून आले.
फोटू छान आलाय. तुमची मित्रमंडळी तुमच्यावर खूष असणारेत.

भाते's picture

26 Dec 2013 - 9:29 pm | भाते

दिवाळी अंकात ती सिगार्सची पाककृती बघितल्यापासुन मी ह्या माणसाच्या पाकृ बघणे सोडुन दिले आहे. करायला जमत तर काही नाही आणि ऊगाच फजिती होते.
३१ ला चकणा म्हणुन आयते करून मिळाल्यास ऊत्तम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

भयंकर देखणा चखणा !

तुमचा अभिषेक's picture

26 Dec 2013 - 11:56 pm | तुमचा अभिषेक

अंडा पकोडे नाव वाचून, एक टिपिकल एमेज डोक्यात ठेऊन धाग्यात शिरलो आणि.... या फोटोने झोपायच्या आधी पुन्हा भूक चाळवलीत हो..
आता पाकृ वाचतो ..

प्रभाकर पेठकर's picture

27 Dec 2013 - 1:38 am | प्रभाकर पेठकर

मला नुसती मेथी किंवा मेथी पालक भजी जास्त आवडतील. उगीच अंडी घालून ती भजी भ्रष्ट कशाला करा?

शुद्ध शाकाहारी भज्यांमध्ये वरणाचा घट्ट गोळा मिसळला की भजी हलकी होतील.

ज्ञानव's picture

28 Dec 2013 - 5:56 pm | ज्ञानव

अंडे कुठे "घालायचे" त्याचा विधी निषेध पाळला"च" पाहिजे.

अध्यक्ष : अंडी वाचवा चिकन पक्वा समिती

त्रिवेणी's picture

28 Dec 2013 - 12:25 pm | त्रिवेणी

फोटो मस्त.
शाकाहारी भजी करून खाणार.

अक्षया's picture

28 Dec 2013 - 5:27 pm | अक्षया

पनीर घालुन ट्राय करेन.

इन्दुसुता's picture

29 Dec 2013 - 4:59 am | इन्दुसुता

मला नुसती मेथी किंवा मेथी पालक भजी जास्त आवडतील. मलाही!!!!

उगीच अंडी घालून ती भजी भ्रष्ट कशाला करा?..... सहमत.
शुद्ध शाकाहारी भज्यांमध्ये वरणाचा घट्ट गोळा मिसळला की भजी हलकी होतील.
हे माहित नव्हते, वरण घातले तर डाळीचे पीठ घालायचे नाही काय?

प्रभाकर पेठकर's picture

29 Dec 2013 - 9:52 am | प्रभाकर पेठकर

>>>>वरण घातले तर डाळीचे पीठ घालायचे नाही काय?

घालायचे. दोन्ही वापरायचे. डाळीचे पीठ जास्त वरणाचा गोळा कमी असे प्रमाण घ्यायचे.

त्रिवेणी's picture

29 Dec 2013 - 8:32 am | त्रिवेणी

@इंदुसुता,
डाळीचे पीठ घालायाचेच. वरणाचा घट्ट गोळा म्हणजे आपण जी डाळ शिजवलेली असते त्यातली 2-3 चमचे डाळ भजीच्या पीठात मिक्स करायची.

सस्नेह's picture

29 Dec 2013 - 2:08 pm | सस्नेह

हत्तीकुल-अनुगामी असल्याने पनीर किंवा फ्लॉवर घालून करणेत येईल. कोबी चालेल का ?

दिपक.कुवेत's picture

30 Dec 2013 - 12:27 pm | दिपक.कुवेत

कोबी चालेल काय धावेल......पण तळण्यापेक्षा मिश्रणाला कोथींबीरीच्या वडयांप्रमाणे वाफवुन घे आणि मग शॅलो फ्राय कर. लज्जत अजुन वाढेल.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

सुहास..'s picture

30 Dec 2013 - 1:15 pm | सुहास..

ऑस्सम