समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
11 Dec 2013 - 6:53 pm
गाभा: 

ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे.
या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे. या निर्णयांवर प्रतिक्रीया देतांना वृंदा करात यांनी असे म्ह्टले आहे की “हा अतिशय चुकीचा निर्णय आहे दोन प्रोढ व्यक्तींनी परस्पर संमतीने केलेल्या संबधाना बेकायदा ठरविणे चुकीचे आहे.” तर बाबा रामदेव यांनी अशी प्रतिक्रीया दिलेली आहे की समलैंगिकता ही मुळात अनैसर्गिक आहे आणि हे फ़क्त एक वाईट व्यसन फ़क्त आहे. शिवाय त्यांनी समलैंगिकांना आपल्या आश्रमात येण्याच निमंत्रण दिलेल आहे आणि अस सांगितले आहे की ते ह्या व्यसनापासुन समलैंगिकांची मुक्ती करुन देउ शकतात.
तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे?
कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती.

प्रतिक्रिया

विकास's picture

13 Dec 2013 - 12:20 am | विकास

बापरे! नंदनराव तुम्ही मनुवादी आहात? ;)

असो, पण येथे इतके वैचारीक आणि मुद्देसूद लिहीलेले असल्याने मनुस्मृतीत काय लिहीले आहे आणि खजुराहो काय म्हणते त्याच्याही काही देणेघेणे नाही. ;)

नंदन's picture

13 Dec 2013 - 12:28 am | नंदन

>>> नंदनराव तुम्ही मनुवादी आहात? Wink
--- व्हेन इन काशी, बिहेव्ह लाईक अ पंड्या ;) (हे तत्सम प्रतिसादांना उद्देशून)

बाकी वैचारिक आणि मुद्देसूद ही विशेषणं प्रतिसादात येऊ नयेत, असं म्हणतात ब्वॉ! (केरीकाकांना कमी 'फ्रेंच' दिसण्याचा सल्ला मिळाला होता त्या धर्तीवर) :)

विकास's picture

13 Dec 2013 - 12:31 am | विकास

व्हेन इन काशी, बिहेव्ह लाईक अ पंड्या

पटले! म्हणजे (अशा) पंड्यांची काशी करता येते असे म्हणायचे आहे का? ;)

नंदन's picture

13 Dec 2013 - 12:34 am | नंदन

पटले! म्हणजे (अशा) पंड्यांची काशी करता येते असे म्हणायचे आहे का? Wink

उदा. पोपला मार्क्सिस्ट ठरवणे ;)

बाबा पाटील's picture

13 Dec 2013 - 12:10 am | बाबा पाटील

बट नो कमेंट्स....तुर्त पुर्णविराम....

वडापाव's picture

13 Dec 2013 - 12:52 am | वडापाव

बघावं तिकडे नुसतं एल-जी-बी-टी चालू आहे. वैताग आलाय याचा. टाईम्स नाऊ वर अर्णब गोस्वामीच्या डिबेटमध्ये सुद्धा तेच, मिसळपाववर सुद्धा तेच, न्यूजपेपर मध्ये सुद्धा तेच... इव्हन व्हॉट्स अ‍ॅपवर सुद्धा तेच.

गे-लेसबिअन असणं हे ज्याने-त्याने आपापलं बघावं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान हक्क-वर्तणूक आणि ते सगळं ठीक आहे.

पण पुढे याचा किती वाईट परिणाम होईल हे कसं कळत नाही या लोकांना. आपल्या कडे आधीच स्त्री-पुरुष गुणोत्तर कमी आहे. राज्यानुसार वर्गवारी केली तर काही राज्यांची अवस्था त्याबाबतीत अगदीच वाईट आहे. अशा स्थितीत गे विचारसरणीला उत्तेजन दिलं गेलं, तर याच क्षेत्राशी संबधित गुन्हे वाढीस लागतील. दहा जणांनी मिळून एका स्त्रीचा गँगरेप केला, तसं दहा जणांनी मिळून एका पुरुषाचा गँगरेप केला अशा बातम्या ऐकायला मिळतील. लोकलमध्ये सुरक्षेच्या प्रश्नामुळे 'फक्त स्त्रियांसाठी' असा वेगळा डबा काढण्यामागचं उद्दिष्टच अर्थहीन होऊन बसेल. ऐन गर्दीत आपल्यावर एका समलिंगी व्यक्तीने चान्स मारल्याची जाणीव झाली की आपल्यासारख्या माणसांसाठी त्याहून अधिक किळसवाणी भावना ती कोणती असेल? कारण एक वेळ भिन्न लिंगांच्या व्यक्तींनी मारलेला चान्स पचवता येऊ शकतो, त्याबद्दल कोणासमोर तरी मोकळेपणे बोलताही येऊ शकतं. याबाबतीत बोलणार तरी कसं?? भिन्नलिंगाच्या व्यक्तीने आपला गैरफायदा घेतला हे सांगितल्यावर सहानुभुती मिळते (किंवा पुरुषांना 'नशीबवान' आहेस असं ऐकायला मिळतं) पण समलिंगी व्यक्तीने आपल्यावर चान्स मारला हे जर कोणाला सांगायला गेलो तर आपलंच हसं होण्याचे जास्त चान्सेस असतात. समलिंगी संबंधांना मोकळीक दिल्याने नुसतं शरीरसुख अनुभवू पाहणा-या, मग ते शरीर स्त्रीचं असो वा पुरुषाचं, उतावळ्या माकडांच्या हातात आयता कोलीत नाही का मिळणार(बायसेक्शुअल्स)? याने (संभोगजन्य रोग??) सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज चा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

मुळात ही एक विकृती आहे. निसर्गाच्या प्रचलित नियमांना डावलून मानवाला अधोगतीकडे नेणारी एक विकृती. निसर्गात आधी समलैंगिकत्व पाळणारे जीव होते. ते उत्क्रांत होत गेले आणि भिन्नलैंगिकत्वाकडे वळले. आता उत्क्रांतीच्या एवढ्या कालखंडानंतर माणूस स्वतःला पुन्हा मूळपदावर आणायला का पाहतोय तेच कळत नाही मला. मानव हा समलैंगिकत्वाची पायरी ओलांडून उत्क्रांत झालेला जीव आहे. त्याने निसर्गाचा नियम मोडून पुन्हा पाठच्या पायरीवर का यावं? अर्थात, उत्क्रांती काही एका विशिष्ट जातीच्या सर्वच जीवांमध्ये एकाच वेळी दिसून येते असं नाही. प्रगती करण्यासाठी उत्सुक असणारे जीव स्वतः उत्क्रांत होतात व त्यांच्या पाठोपाठ त्यांची संतती. याचाच अर्थ त्यांचेच इतर सजातीय सजीव उत्क्रांत व्हायला वेळ लाऊ शकतात, वेगळ्या प्रकारे उत्क्रांत होऊ शकतात किंवा उत्क्रांत न होता, परिस्थितीशी जुळवून घेऊ न शकल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट होऊ शकतात. सध्या समलैंगिकत्वाची टिमकी वाजवणा-यांची गत अशीच होऊ शकते. कारण ते उत्क्रांतीच्या पाय-या चढायचं सोडून मागे फिरून उतरंडीला लागल्येत. ते निसर्गतः निर्मिती करु शकत नाहीत. त्यामुळे आज समाजाने जरी त्यांना समजा आपल्यात सामावून घेतलं, तरी काळाच्या ओघात ते नष्टच होतील. कारण उत्क्रांत होण्यासाठी, उत्क्रांतीच्या पथावर चालणा-या जीवाकडून निसर्गतः पुनर्निर्मिती होणं गरजेचं आहे. ते या मंडळींना जमणारच नाहीये. त्यामुळे ही मंडळी निसर्गाचा नियम धाब्यावर बसवतायत.

समलैंगिकत्व निसर्गाच्या विरोधात आहे म्हटलं, की मानवाप्रमाणेच इतरही (एरवी भिन्नलैंगिक संबंध राखणा-या) काही प्राण्यांच्या प्रजातींमध्येही समलैंगिकत्व आढळून येतं त्याचे दाखले मिळतात. पण म्हणून त्याने समलैंगिकत्व योग्य आहे हे जस्टिफाय होत नाही. प्राण्यांमध्ये अशा ब-याच पद्धती आढळून येतात ज्या बहुतांशी सुसंस्कृत समाजातील मानवी मनाला न पटणा-या असतात. म्हणून काय लगेच त्यांचे दाखले देऊन माणूस cannibalism इ. चा पुरस्कार करेल का?

बाकी धाग्यातील सुबोध खरे, साती, यांचे सर्व प्रतिसाद पटले. सुहास, बाबा पाटील यांचे सर्व प्रतिसाद आवडले. :)

बॅटमॅन's picture

13 Dec 2013 - 1:40 am | बॅटमॅन

शब्दयोजना विलोभनीय आहे. प्रतिसाद एलजीबीटी अन समाज या दोन स्थळांभोवती फिरतो. एक मुग्ध विचारसरणी व्यामिश्र शब्दांत मांडून प्रतिपादन उत्तम केलेले आहे. एक तथ्य सोडले तर बाकी सर्व काही आहे या प्रतिसादात.

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 2:59 am | रामपुरी

गेल्याच आठवड्यात पुण्यामध्ये एका माणसाला रस्त्यावरच्या कुत्र्याला घरी नेऊन त्याच्याशी लैंगिक चाळे करताना पकडलं होतं. आता हे सुद्धा उद्या नैसर्गिकच ठरणार असेल तर अवघड आहे बाप्पा...

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 5:09 am | खटासि खट

कुत्र्याची संमती होती का ?

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 5:15 am | रामपुरी

कुत्र्याने बोंब मारली असं काही बातमीत लिहीलं नव्हतं. कुणीतरी आगाऊपणे त्या माणसाच्या मागे मागे जाऊन त्यांच्या "व्यक्तिगत आणि खासगी" कामात अडथळा आणला. आणि मग पोलिसांनी त्याला पकडून नेलं. कुत्र्याला पण अटक झाली का वगैरे उल्लेखही त्या बातमीत नव्हते. बातमी कुठे सापडती का बघतो म्हणजे दुवाच देता येईल.

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 5:40 am | खटासि खट

कुणीतरी आगाऊपणे त्या माणसाच्या मागे मागे जाऊन >>>>

हंग अश्शी ! त्याला पैले झुठच म्हाईत व्हतं काय घडणार हाय त्ये *lol*
असो. कुत्र्याच्या संमतीविना केला तर तो बलात्कार ठरेल. आताच्या आपल्या सर्वांच्या संमतीने ती विकृती ठरेल.
पण एखाद्याला वेगळा विचार करावासा वाटेल आणि माणसाला असं का वागावंसं वाटतं याचा शोध तो घेईल.
कशालाच बंदी नाय बगा..

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 6:02 am | रामपुरी

"कशालाच बंदी नाय" असं कसं म्हंता?
आता बंदी हाये म्हनूनच तेला आत घातला ना. का उगाच फोलीसाना तेचा हेवा वाटला म्हनून आत टाकला?

अर्धवटराव's picture

13 Dec 2013 - 5:24 am | अर्धवटराव

प्राणि पाळताना, मारुन खाताना त्यांची संमती घेण्यात येते काय ?

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 5:38 am | रामपुरी

परस्पर संमती असेल तर काहीही केलं तरी चालतं काय? उदा. परस्पर संमतीने एकमेकांना मारहाण (नुकतीच इथे प्रकाशित झालेली एक कथा आठवली), परस्पर संमतीने केलेली जोडीदारांची अदलाबदल (आठवा: फौजेतल्या अधिकार्‍यांवर या कारणासाठी दाखल झालेले गुन्हे). आत्महत्या सुद्धा खाजगीच गोष्ट म्हणायला पाहीजे. त्यातून वाचलेल्यावर (आणि मेलेल्यावर पण) गुन्हा दाखल करायची सोय कायद्यात आहे.
अतिअवांतर समाप्त...

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 5:46 am | खटासि खट

परस्पर संमतीने केलेली जोडीदारांची अदलाबदल >>

असं करणं हे काही कंपल्शन नाही. तरीही ते केलं जात असेल, समलैंगिकता ही अपरिहार्य नसताना समलैंगिक संबंध जस्ट फॉर फन म्हणून ठेवणे हे वेगळं. कुत्र्याशी संबंध याच्याशी त्याची तुलना हे वेगळं आणि सामाजिक नीतीनियमांचा फायदा घेऊन आपल्या प्लेझरच्या स्वातंत्र्यासाठी भांडणं हे सगळेच निरनिराळ्या पातळीवरचे इश्श्यु एकमेकांत मिक्स झाले कि चव गेलीच समजा.

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 5:57 am | रामपुरी

"समलैंगिकता ही अपरिहार्य नसताना समलैंगिक संबंध जस्ट फॉर फन म्हणून ठेवणे हे वेगळ"
समलैंगिकता अपरिहार्य केव्हा असते आणि "जस्ट फॉर फन" केव्हा असते? आणि हे ठरवणार कोण? हे सगळे इश्श्यु निरनिराळ्या पातळीवरचे कसे काय?

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 6:01 am | खटासि खट

खाली एक मोठी पोस्ट लिहीलेली आहे. वेळ मिळाल्यास पहावी ही नम्र विनंती.

रामपुरी's picture

13 Dec 2013 - 6:04 am | रामपुरी

पण चित्रा पालेकरांचे या विषयातील नक्की ज्ञान किती आणि कशावर आधारीत हे माहीत नसल्याने "पास" दिला :)

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 6:08 am | खटासि खट

चर्चा ऐकली होती का ?
त्यांची मुलगी समलैंगिक आहे. तिचे अनुभव सांगताना एक पालक म्हणून त्यांचं म्हणणं अभ्यासपूर्ण होतंच शिवाय आपल्या धारणा अभ्यासाने बदलाव्यात असं वाटायला लावणारं होतं असं मत झाल्याने पास द्यावासा वाटला नाही. मला वाटलेलं तुम्हाला वाटायलाच हवं हा इथल्या चर्चेचा हेतू नसल्याने सध्या पास ! असो.
वेळही नाही आणि...... हॅ हॅ हॅ !!

अर्धवटराव's picture

13 Dec 2013 - 5:57 am | अर्धवटराव

इश्यु एकमेकांत मिक्स होतातच. गैरप्रकारांचा चंचुप्रवेश असाच होतो व तसेच ते फोफावतात. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एखाद्याने प्राणि मारुन खाणे व दुसर्‍याने प्राण्याला व्यवस्थीत खाऊ-पिऊ घालुन त्याच्याशी संघोग करणे... यात डावं-उजवं कसं ठरवायचं ?

जोवर चर्चा चालू आहे तोपर्यंत ठीक. तिचं वादात रुपांतर होतंय असं वाटल्यास उत्तर देण्याची गरज राहत नाही.

अर्धवटराव's picture

13 Dec 2013 - 6:44 am | अर्धवटराव

असो.

सुमीत भातखंडे's picture

13 Dec 2013 - 10:31 am | सुमीत भातखंडे

खाणारे किंवा बनवणारे त्या-त्या प्राण्यांची संमती घेतात का त्यांना मारण्यापूर्वी?

चौकटराजा's picture

13 Dec 2013 - 5:35 pm | चौकटराजा

मानव हा समलैंगिकत्वाची पायरी ओलांडून उत्क्रांत झालेला जीव आहे. त्याने निसर्गाचा नियम मोडून पुन्हा पाठच्या पायरीवर का यावं?

अरे बापरे कसलं तर्कदुष्ट विधान आहे हे ! @ वडापाव , आपण समलिंगी व्हायचा नुसता विचार मनांत आणून पहा . पुरूषाचे चुंबन घेणे ही कल्पना करून पहा .असे होणे किती अवघड आहे हे कळेल. मी एकदा मटण खाउन पाहिले आहे पण मी आता ते खाण्यची कल्पना देखील करू शकत नाही. भेडीची भाजी एकदा थीडी खाउन पाहिली धडाधडा ओकलो. आपले मन कसे असते याचे हे उत्तर आहे. काही माणसे नैसर्गिक रित्या काहीतरी असतात काही परिस्थेतीने काहीतरी होतात. हेच संपूर्ण सत्य आहे.
बाकी आपल्या वरील उदाहरणाला मी तरी केवळ पोकळ हायपोथिसेस मानतो.

खटासि खट's picture

13 Dec 2013 - 4:41 am | खटासि खट

आयबीएन लोकमत वरच्या चर्चेत चित्रा पालेकर (मिसेस अमोल पालेकर) यांनी सांगितल्याप्रमाणे समलैंगिकता आईच्या पोटातच ठरते असं नव्याने संशोधन झालेलं आहे. याच चर्चेत असंही सांगण्यात आलेलं आहे कि आजपर्यंतची जी आकडेवारी आहे ती एडस बद्दलच्या आकडेवारीतून गोळा करण्यात आलेली आहे, जिचं उद्दीष्ट वेगळं होतं. एडस बद्दल जनजागृती ही मोहीम जबरदस्तच होती यात शंका नाही. पण या मोहीमेतूनच समलैंगिक संबंध ठेवणारे लोक मोठ्या प्रमाणावर एडसला जबाबदार आहेत असा समज झालेला आहे. माझाही तसाच समज होता.

व्हरायटी किंवा थ्रिल किंवा फन म्हणून उगाचच समलैंगिक संबंध ठेवणा-या लोकांबद्दल माहीती नाही. मुळातच अद्याप कुठलाच समलैंगिक व्यक्ती पाहण्यात आलेला नाही तसंच कुणी मी समलैंगिक आहे असं सांगितलेलंही नाही. टीव्हीवरच्या मोर्च्यातच ते पाहीलं होतं. अशोक रावकवी नावाचा व्यक्ती होता तो. गे लोकांच्या हक्कासाठी लढणा-या संघटनेचा बहुतेक तो संस्थापक होता. त्या वेळी माझी मतंही इतकीच असंवेदनशील होती. आम्ही मित्र अशोक रावकवीची टिंगलच करत असू. याला कारण म्हणजे आपल्या समाजात ओपननेस नसणं हेच आहे. काही गोष्टींवर चर्चा हेच निषिद्ध असल्याने इथं चर्चा होतात. इथे ख-या अर्थाने फेसलेस एनकाउंटर होत असल्याने मनातले गैरसमज दूर करण्यासाठी ही एक संधी असते. आपल्या भूमिकेवर अडून राहण्याला कुणीच नाही म्हणणार नाही. पण आपल्यापुरतं शिकता येणं हे कुणाला शिकवण्यापेक्षा जास्त महत्वाचं असावं. इथे व्यवसायाने डॉक्टर किंवा वकील व्यक्ती असल्याने त्यांनी केलेली स्टेटमेण्ट्स ही त्यांच्या ज्ञानातून आलेली असल्याने काही गोष्टी पटल्या नाहीत तरी त्याला चॅलेंज करताना आपल्याकडे लेटेस्ट आणि बिनचूक माहीती असावी किंवा त्यांच्या म्हणण्यावर विचार करावा.
वेळोवेळी पुढे आलेल्या माहीतीप्रमाणे आपल्या धारणा बदलायच्या कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. समजा काही कारणाने टुंड्रा प्रदेशात जायचा योग आला तर कपडे घालणे हे योग्य आहे हे त्यांना समजावून सांगितलं तर ते त्यांना पटेल का ? काही काळापूर्वी अंदमान निकोबार बेटांवरही कपडे घालण्याची पद्धत नव्हती. तसच बाहेरून आलेल्या आणि कपडे घालणा-यांबद्दल संशयाचं वातावरण होतं. आता किती बदल झालेला आहे सांगण्याची गरज नाही. हा बदल म्हणजे संस्कृती, धर्म बुडवणे आहे कि त्यांच्यात आलेल्या विकृती समजायच्या ? कपडे घालणे हेच अनैसर्गिक आहे हे देखील मान्य करावं लागेल. तसं असेल तर आपण सारेच अनैसर्गिक (निसर्गाच्या विरुद्ध) कृत्य करतो आहोत. गंमत म्हणजे आपले सामाजिक नीतीनियमही कपडे घालण्यावरून ठरत असतील तर आपल्या धारणा नेमक्या नैसर्गिक कि अनैसर्गिक हे ठरवता आलं पाहीजे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर इतक्या हिरीरीने चर्चा घडण्यामागे स्वतःच्या या धारणांचा शोध घेणे हा देखील एक सुप्त हेतू असू शकतो. मुळात बहुसंख्यांक नाही म्हणून त्यांच्या वतीने आपण कायदे करून मोकळे होऊ शकतो का या मनाला पडलेल्या प्रश्नातूनच मानवतावादी हक्कांच्या रक्षणासाठी या चर्चा झडत असाव्यात असा आपला अंदाज आहे.

या प्रश्नाला कोर्टाच्या आडून गोळ्या झाडण्याच्या कृतीला न्यायालयाने बॉल इज इन युवर कोर्ट ही देखील एक बाजू असू शकते असं मानता येईल. पण तो स्वतंत्र चर्चेचा भाग असायला हवा असं वाटतं..

देशपांडे विनायक's picture

13 Dec 2013 - 10:10 am | देशपांडे विनायक

" तर एक संवेदनशील विचारी भारतीय नागरीक म्हणुन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णया कडे आपण कशा रीतीने बघतात ? एकंदरीत समलैंगिकता ही तुम्हाला विकृती वाटते की नाही ? यात समलैंगिकाच्या मुलभुत मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे अथवा नाही ? एकुण समाजाला हा निर्णय अधोगती कडे नेणारा आहे की प्रगती कडे?
कृपया यावर गंभीर रीत्या मतप्रदर्शन करावे ही अतिशय नम्र विनंती."

विचारी भारतीय नागरिकाने सुप्रीम कोर्टाचे निर्णय मानलेच पाहिजेत . { आपल्या सर्वांचा विरोध या कायद्याला जर अपवाद म्हणून काही सांगितले तर नाहीसा होऊ शकतो}
आपला विरोध कायद्यातील या तृटीला आहे . हि तृटी सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणली. तृटी भरून काढण्याची जबाबदारी घटनेप्रमाणे न्यायालयाची नाही . हा निर्णय आपण बेजबाबदार आहोत असे दर्शवितो आणि म्हणून आपला थयथयाट !!
समलैंगिकाता आणि मुलभूत मानवी हक्क यावर केंव्हा चर्चा झाली ? IPC ३७७ या कलमामुळे आपल्या मुलभूत हक्कावर गदा येते असे म्हणून कोणी न्यायालयाचे दरवाजे ठोठा वले ? कधी ?
हा कायदा १९४७ पासून आहे . समलैंगिकाता हा मानवी हक्क मानण्यासाठी १९४७ पासून समाजाने काय केले ?चर्चा होण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची गरज नव्हती .
समाजाला जागे करणारा हा निर्णय आहे
आज जात्यात समलैंगिक आहेत
कायदे करण्यासाठी आपण ज्यांना निवडून देतो ते कधीही आपल्याला सुपात ढकलू शकतात हे सांगणारा हा निर्णय आहे

पिंपातला उंदीर's picture

13 Dec 2013 - 10:16 am | पिंपातला उंदीर

भारतासारख्या देशात जिथे straight लोकांच्या लैंगिक भावनाची प्रचंड गळचेपी होते त्या देशात समलैंगिक लोकाना कसल्या कसल्या यातनामधून जाव लागत असेल हा विचार केला तरी अंगावर काटा येतो . अजून एक म्हणजे एखाद्या ठार खेड्यातला माणसाला आपण समलैंगिक आहोत याची जाणीव झाल्यावर त्याचे काय होत असेल ? स्वतःच्या शारीरिक गरजा कश्या पूर्ण करत असेल तो ? शहरात निदान थोडी बरी स्थिती आहे . बाकी जाती -धर्म आणि अनेक compartment वरून माणसाला जज करणारया समाजात समलैंगिक म्हणून जन्माला येण हा शापच.

बाळ सप्रे's picture

13 Dec 2013 - 11:24 am | बाळ सप्रे

नैसर्गिक, अनैसर्गिक, योग्य, अयोग्य, नैतिक, अनैतिक all these are relative terms.
प्रत्येकाची आपापली व्याख्या असेल तसे तो/ती वागेल..

कायद्याने प्रत्येक गोष्टीची व्याख्या करायची गरजच काय??
प्रत्येकाने कसं वागायच याचं स्वातंत्र्य असलं की झालं. या कींवा कुठल्याही विषयात दुसर्‍याला बाधा पोहोचत नाही तिथपर्यंत गुन्हा ठरवण्याची आवश्यकता नाही..

साती's picture

13 Dec 2013 - 2:22 pm | साती

काही वेळा लगेच बाधा पोचत नसेल पण जवळच्या /दूरच्या भविष्यात बाधा पोहोचायची शक्यता असेल तर कायद्याला मध्ये पडावेच लागते.

बाकी हे कायदे ब्रिटीशांनी आपल्या प्रशासकीय सोयीसाठी केलेत भारतीयांची नितिमत्ता जपण्यासाठी नव्हे.
त्यामुळे खरंच भारतीयांना आपल्या अधिकारांची चिंता असेल तर आपल्या लोकप्रतिनिध्हींमार्फत संसदेत कायदे बदलून घ्यावेत.

बाळ सप्रे's picture

13 Dec 2013 - 3:56 pm | बाळ सप्रे

जवळच्या /दूरच्या भविष्यात बाधा पोहोचायची शक्यता असेल

मान्य!!

पण दोन समलैंगिकांच्या संबंधाने जवळच्या /दूरच्या भविष्यात बाकीच्यांना काय बाधा पोहोचणार आहे??

याला अनैसर्गिक ठरवुन काय प्रशासकीय सोय झाली??

अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते.

There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality

That means this is just an opinion.Its not a truth.

the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence.

That means this just the way (Wrong way) of expressing feelings.
This is nothing natural. If somebody is very much sure about this show us the people who develop homosexuality in their mind
in early stage of mind when they have no knowledge about sex. I have doubt about this.

अश्यावेळी जर होमो इज ऑल्सो अ नॉर्मल वे ऑफ लिविंग हे त्यांच्या कानीकपाळि सतत आदळलं गेलं तर चुकून होणारी पर्वर्जन्स, पौगंडावस्थेतील लैंगिक साहसे यांनाच ते नॉर्मल समजतील आणि आयुष्यातल्या एका मोठ्या सुखाला मुकतील अशी सार्थ भिती मला वाटते.

अगदी सहमत . जे लोक ह्याला व्यक्तिस्वातंत्र्य, जगण्याचा हक्क हिरावून घेणा असली गोंडस विशेषणे लावत अहेत. ते स्वताच्या मुलांनी, किवा स्वताच्या घरातल्या कुणी अस काही केला कि कस lightly घेतील हे बघण्यासारख असेल .

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2013 - 3:45 pm | प्रसाद गोडबोले

"समलिंगी संबंध नैसर्गिक आहेत आणि म्हणुन त्यात काही गैर नाही काही गुन्हा नाही "

असे म्हणणार्‍यांचे बहुपत्नीत्व / बहुपतित्वाविषयी काय मत आहे हे जाणुन घ्यायला आवडेल. ( बहुतांश लोक तिथे मात्र कोलांटी उडी मारतात असे पाहण्यात आले आहे) .( स्वतंत्र काथ्याकुटजिलेबी टाकु का ? ;) )

मराठी कथालेखक's picture

13 Dec 2013 - 4:06 pm | मराठी कथालेखक

आनंद घेताना फार नियम असू नयेत..पार्टनर स्व्यापिंग, ओपन रिलेशन्शिप ई गोष्टी समंजसपणे आणि झेपत असतील तर कराव्यात. नियम एकच : यातून निखळ आनंद मिळावा. उगाच गुंतागुंत निर्माण होवून मनस्ताप पदरात पाडून घेवू नये.

साती's picture

14 Dec 2013 - 1:02 pm | साती

एक क्रॉस समर्पणाची निर्व्याज्य प्रेमकथा होऊन जौदे.
आनंद ही आनंद!

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2013 - 12:59 pm | मराठी कथालेखक

पण "पुन्हा असल्या कथा टाकू नका" म्हणणारे संस्कृतीरक्षक स्वतःचा क्रोध अनावर होवून उगाच जिवानिशी जातील अशी भिती वाटते..

कवितानागेश's picture

13 Dec 2013 - 5:42 pm | कवितानागेश

तिथे मुलांची सुरक्षितता, त्यांचे वारसाहक्क वगरै प्रॉब्लेम्स मध्येमध्ये येतिल.
शिवाय जेंव्हा एखाद्या लैन्गिक संबंधाला विरोध करायचा असतो तेंव्हा लैन्गिक आजार मदतीला धावून येतातच! ;)

बाबा पाटील's picture

13 Dec 2013 - 3:59 pm | बाबा पाटील

कुनेीतरेी वाचा राव....

मृत्युन्जय's picture

13 Dec 2013 - 5:33 pm | मृत्युन्जय

भारतीय राजघटनेचे काय इथे? सगळीकडे (अ)योग्य ती कायदेशीर पाचर मारुन ठेवलेली आहेच घटनेने. पण ते घटनेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात जाते.

मंदार कात्रे's picture

13 Dec 2013 - 7:21 pm | मंदार कात्रे

समलैंगिकता हा गुन्हाच.... सुप्रीम कोर्ट
Absolutely Right.... निसर्गाविरुध्द वागणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं..यावर अनेकजण अनेक युक्तिवाद करतात. कोणी प्राण्यांकडे, कुणी जुन्या शिल्पकलेतल्या नमुन्यांकडे तर कोणी आणखीन कशाकडे तरी बोटं दाखवतात...अरे हट, बाईला पुरुष आणि पुरुषाला बाईच आवडायला हवी इतका सोपा नियम आहे...
आज आमच्याकडे कामावर आलेल्या एका मजुराने पेपरमधली ही बातमी वाचून मला "शेट, ही नेमकी काय भानगड आहे हो?" असा प्रश्न केला. त्यावर मी सगळं नीट समजावून सांगितल्यावर तो ठो ठो हसत म्हणाला.... "शेट, सादी सिंपल गोष्ट आहे हो...कुलुप उघडायला किल्लीच पायजे. दोन कुलपं घेऊन एकमेकांवर दिवसभर ठोकत बसलं तरी ती थोडीच उघडणार आहेत? आणि तेच किल्लीचंही...." या अजब उदाहरणावर आम्ही दोघेही हसत बसलो...

साभार -सचिन परान्जपे

बाबा पाटील's picture

13 Dec 2013 - 7:27 pm | बाबा पाटील

"शेट, सादी सिंपल गोष्ट आहे हो...कुलुप उघडायला किल्लीच पायजे. दोन कुलपं घेऊन एकमेकांवर दिवसभर ठोकत बसलं तरी ती थोडीच उघडणार आहेत? आणि तेच किल्लीचंही...." या अजब उदाहरणावर आम्ही दोघेही हसत बसलो...जे मजुराला कळत ते आपल्या विचारजंतूंना कळत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Dec 2013 - 8:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजूर विसाव्या शतकात आले नसतील, पण तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला विसाव्या शतकात येता येणं सोपं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कुलपंही असतात. बोटांवरचे ठसे आणि डोळ्यातल्या बुब्बुळांच्या स्कॅननेसुद्धा कुलपं उघडतात.

उपमा द्यायला हरकत नाही, पण आधी अभ्यास करा. कुलपांचा असो किंवा लैंगिकतेचा. (बाकीचं जग एकविसाव्या शतकात आहे, जमलं तर अभ्यास करून तिथेही या.)

रामपुरी's picture

14 Dec 2013 - 2:44 am | रामपुरी

भलताच विनोदी प्रतिसाद...

जर समलैंगिक जोडपी चालायला हवीत असा आग्रह असेल तर बहुपतित्व, बहुपत्नित्व, बहुपतिपत्नित्व ह्याविरुद्ध बोलायचा कायद्याला काय हक्क आहे?
तोही कायदा बदला. सज्ञान व्यक्तीला अन्य सज्ञान व्यक्तीशी विवाह करता आला पाहिजे. मग ती एक सज्ञान व्यक्ती असो वा अनेक.
कायद्याने सज्ञान कितीही लोक लग्नबंधनात अडकणार असतील तर त्याविरुद्ध कायदा का म्हणून आक्षेप घेतो?
केवळ बहुसंख्य विवाह हे दोघांमधे होतात म्हणून विवाह्बंधन हे दोघांतच असावे असा आग्रह करणेही बुरसटलेले आणि प्रतिगामी आहे. असे बंधन झुगारलेच पाहिजे.
निसर्गाला प्रमाण मानायचे असेल तर तिथे कितीतरी बहुपत्नी, बहुपती उदाहरणे दिसतात.

मी काय म्हणतो, विवाहच रद्द करा ना. मग कसं अगदी निसर्गात निर्माण झाल्याप्रमाणे यकदम मोक्ळं ढाक्ळं!

(बाकी 'निसर्गाने निर्माण केलेलं' म्हणून ओरडणार्‍यांनो, निसर्गाने काय तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं का त्याने निर्माण केलं म्हणून)

संपादित

साती's picture

14 Dec 2013 - 1:04 pm | साती

तू कुणाच्या बाजूने आहेस ते आधी स्पष्टं कर.
;)

बाजूने पेक्षा कोणाच्या विरोधात आहे ते विचारा, शेवटी, हेहे, सर्वद्वेष्टाच नं मी! ;-)

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात. अरे, याच ब्रिटीशांनी ट्युरिंगला मारला आणि नंतर जाहीर माफि मागितली. http://en.wikipedia.org/wiki/Alan_Turing

समलैंगिकता नैसर्गिक की अनैसर्गिक असा वाद घालणार्‍यांच्या विरोधात. काय फरक पडतो? त्यांनाही तुमच्या-माझ्यासारखंच आयुष्य जगायचा अधिकार आहे, त्यांना लैंगिक प्रेरणा तुमच्या-माझ्यासारखी नसली म्हणून काय झालं? तुमची-माझी लैगिंक प्रेरणा बदला म्हणून ते सांगायला येतात का?

बाकी याने संस्कृती वगैरे बुडेल म्हणणर्‍या गाढवांच्यातर कट्टर विरोधात. ब्राह्मणेतरांना जसजसे सामान्य अधिकार दिले जाऊ लागले तेव्हाही हे लोक रडतच होते. स्त्रियांना सती देऊ नका असे जेव्हा लोक म्हणू लागले तेव्हाही हे रडतच होते. अशा लोकांमुळेच देश मागे आहे असे आमचे मत आहे.

कधी नव्हे ते नायल्याशी चक्क सहमत आहे ;)

आनंदी गोपाळ's picture

15 Dec 2013 - 12:46 am | आनंदी गोपाळ

बरीच गरमा गरम चर्चा सुरू आहे.
नैसर्गिक या शब्दाच्या व्याख्येवरून थोडी अजून चर्चा होऊ शकते.
खरे साहेबांनी शिक्षा नको असे म्हटलेय.
साती यांनी संपूर्ण विरोध नोंदविला आहे.
बाबासाहेब विकृती म्हणताहेत.

साती's picture

15 Dec 2013 - 12:36 pm | साती

विरोध कायदेशीर मान्यतेला आहे.
शिक्षा व्हावी असे मी म्हटलेले नाही.

बॅटमॅन's picture

15 Dec 2013 - 12:57 pm | बॅटमॅन

कायदेशीर मान्यतेला विरोध असेल तर त्याचा अर्थ बेकायदेशीर ठरवावे असाच होतो ना? अन बेकायदेशीर गोष्टींना कायद्यान्वये शिक्षा होते की सन्मान होतो?

न्यायालयाने काहीसा बचावात्मक निकाल दिला आहे खरा.

मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असावे, पण जितपत उल्लंघन होते, ते करण्यालायक आहे, असे विधिमंडळाचे मत आहे, असे मानले पाहिजे. असा काहीसा विचार सांगितलेला आहे. त्याहूनही विशेष म्हणजे विधिमंडळाची शांतता म्हणजे मूकसंमती आहे, आणि मूकसंमतीचा आदर "विधिमंडळाचा निर्णय" म्हणून दिला पाहिजे, असा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा युक्तिवाद आहे.

विधिमंडळाच्या स्पष्ट-सांगितलेल्या विचारांच्या विरुद्ध कधीकधी न्यायालय निकाल देते (पुष्कळदा) त्यामुळे "विधिमंडळाच्या नि:शब्दतेचा मूकसंमती म्हणून आदर" हा प्रकार जरा जास्तच बचावात्मक वाटतो.

पिडां म्हणतात, त्याप्रमाणे कालांतराने येणारा बदल रोखता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय म्हणजे खूप लोकांचा होणारा छळ त्यातल्या त्यात लवकर थांबवायची संधी न्यायालयाने हुकवली, असा इतिहास पुढे लिहिला जाईल. परंतु भविष्यातील बदलाच्या विरोधात कुठला क्रूर वाटणारा "क्वोटेबल क्वोट" न्यायाधीशांनी लिहिला नाही, हा प्रकारही बचावात्मकच आहे.

समलैंगिकता अनैसर्गिकच भाजपची प्रतिक्रिया या बातमीवरचा एक प्रतिसाद वाचताना खुर्चीतून खाली पडलो.