अष्ट्विनायक यात्रा खाजगी गाडीने करण्या बाबत माहीती ह्वी आहे.

शिल्पा नाईक's picture
शिल्पा नाईक in भटकंती
28 Nov 2013 - 11:16 am

नमस्कार,

इथे कोणाला खाजगी गाडीने अष्टविनायक यात्रा करण्याबद्दल माहिती आहे का? जसे की,
आम्हाला डोंबिवली हून २ दिवसात ही यात्रा पुर्ण करायची आहे. सोबत ४ वर्षाची २ मुलं आणी ६० च्या आतील जेष्ठ नागरीक आहेत.

प्रतिक्रिया

नाखु's picture

28 Nov 2013 - 11:41 am | नाखु

मी स्वतः अष्टविनायक यात्रा केली नाही फक्त माहीती आहे.
Distances and Routes from Pune to Ashtavinayak
From-To Distance Route via
Pune-Theur 25 km. Pune-Hadapsar-Loni-Theur
Theur-Moregaon 70 km. Loni-Yavat-Supa-Moregaon
Moregaon-Siddhatek 65 km. Supa-Choufula-Patas-Daund-Siddhtek
Siddhatek-Rajangaon 92 km. Daund-Kashti-Belvandi-Shirur-Rajangaon
Rajangaon-Ozar 100 km. Shikrapur-Chakan-Rajgurunagar-Narayangaon-Ozar
Ozar-Lenyandri 15 km. Ottur-Lenyandri
Lenyandri-Mahad 134 km. Junnar-Narayangaon-Manchar-Rajgurunagar-Chakan-
Wadgaon-Lonvala-Khopoli-Mahad
Mahad-Pali 42 km. Khopoli-Pali
Pali-Pune 111 km. Khopoli-Lonavla-Wadgaon-Pune

शिल्पा नाईक's picture

28 Nov 2013 - 11:45 am | शिल्पा नाईक

पुण्यातून नाही न करायची आहे. मला डोंबिवली हून करायची आहे.

कोणी मुंबईहून नाही का केलीये?

2 दिवसात यात्रा शक्य होणार नाही . सोबत मुले आणी जेष्ठ आहेत . बाकी चौधरी यात्रा कंपनी चांगली आहे . त्यांची टुर 3 दिवसाची असते . custom tour करुन देतील . संपर्क करुन पाहा . अनुभव चांगला आहे . दरमहा टुर असते .

कवितानागेश's picture

28 Nov 2013 - 2:17 pm | कवितानागेश

मुंबईहून केली आहे. सांगते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 2:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

शिल्पा
मी अष्टविनायक यात्रा कल्याणहुन कमीत कमी ६-७ वेळा केली आहे. ती पण २ दिवसात.
काहीजण म्हणतात की शास्त्राप्रमाणे ही यात्रा सर्वाद्यपीठ मोरगावपासुन चालू करावी. पण मला वेळेचे बंधन महत्वाचे वाटते तेव्हा माझा सल्ला असा.........
पहीला दिवस
डोंबिवलीहुन निघणे--कल्याण-माळशेज घाट-बनकर फाटा मार्गे लेण्याद्री गणपती अंदाजे ३ तास लागतील.लेण्याद्री ते ओझर अंतर साधारण २० कि.मी.पण जेवायची सोय लेण्याद्रीला चांगली आहे त्यामुळे उलट क्रम बरा पडेल.
जेवणानंतर नगर रस्ता पकडुन रांजणगावला येणे. मंदीर हायवेला लागुनच आहे. चहापर्यंत पोचाल :)
पुढे परत नगर हायवे पकडुन साधारण ५ कि.मी वर चौफुला गावाकडे जाणारा फाटा उजवीकडे लागेल.( नाव विसरलो बघा)तो पकडा आणि सरळ चौफुला पार करुन सुपे घाटातुन मोरगावला जा. तिकडे राहण्याची घरगुती उत्तम सोय होइल . सहज सांगतो आमच्या श्री. किशोर वाघ गुरुजींचा पेशवाइ थाटाचा वाडा आहे आणि जेवायची पण सोय करतात.तुम्ही भक्त निवासातपण राहु शकता.

दुसरा दिवस--
मोरेश्वराचे दर्शन घेउन मोरगाव सोडा आणि पुन्हा मागे चौफुला (पुणे-सोलापुर रोड)ला या. हा चार रस्ता आहे .उजवीकडे वळ आणि दौंड्मर्गे सिद्धटेकला या. आता मंदीरापर्यंत वाहने येतात. पुर्वी होडीतुन नदी पार करावी लागे. दर्शन घेउन चहा नाश्ता करुन परत मागे या आणि दौंड चौफुला करत करत (पुन्हा पुणे-सोलापुर रोड) थेउरला या. थेउर फाटा पुण्याच्या अलीकडे २० कि. मी.थेउरला जेवुन पुणे ओलांडुन जुन्या मुंबै-पुणे हायवेला या आणि घाट उतरुन महड आणि पालीचा गणपती करणे.डोंबिवली-महड साधारण १.३० तासावर आहे्. जुन्या मुंबै-पुणे हायवेवर डावीकडे महड फाट्याला पाटी असल्याने आपण चुकणार नाही.
महड पाली अंदाजे १० कि.मी. आहे.पाली गावात घरगुती जेवणाची सोय होउ शकते श्री.पावगी मला माहीत आहेत. तासभर आधी सांगावे लागेल. देवळात चौकशी केल्यासही समजेल.
तिकडुन वाकणफाटामार्गे पेण,पनवेल व शीळ्फाटामार्गे डोंबिवलीला परत. हाच क्रम उलटसुद्धा करु शकता.

शिल्पा नाईक's picture

28 Nov 2013 - 3:15 pm | शिल्पा नाईक

श्री. किशोर वाघ गुरुजींचा आणी श्री.पावगी यांचा नंबर मिळेल का? व्य. नी. केला तरी चालेल.

सोत्रि's picture

28 Nov 2013 - 8:50 pm | सोत्रि

धन्यवाद!
ह्याला म्हणावे यथायोग्य आणि परिपूर्ण प्रतिसाद!

- (भटक्या) सोकाजी

शैलेन्द्र's picture

29 Nov 2013 - 12:17 am | शैलेन्द्र

अगदी बरोबर मार्ग,
मी देखील माझ्या १ वर्षाच्या मुलाला व आई वडीलांना घेवुन ही यात्रा, डोंबिवलीहुन दोन दिवसात केली, शिवाय वाटेत देहु- आळंदी देखील केले..

तुम्ही तीन दीवस करणार असाल, तर मुक्काम रांजणगावला करा, भक्त निवास चांगले आहे.

कवितानागेश's picture

28 Nov 2013 - 2:48 pm | कवितानागेश

डोम्बिवलिहून निघायचे असेल तर माळशेजमार्गे आधी लेण्याद्रीला जायचे. माझ्याबरोबर आईपण होती (६०+). लेण्याद्रीला चढण आहे, त्यामुळे घरुन निघाल्यावर फ्रेश असतानाच ते ठिकाण केलेले बरे पडले. त्यानन्तर आम्ही ओझर आणि भीमाशन्कर केले होते. हे एका दिवसात होउन रात्रीच्या मुक्कामाला रांजणगावात गेलो. हे सगळे प्रवास बाहेरच्या बाहेर होतात. मध्ये शहरात /पुण्यात शिरावं लागत नाही. रांजणगावाहून सकाळी निघून सिद्धटेकला गेलो. परत त्याच रस्त्यानी मागे येउन थेउर आणि रात्री मुक्कामाला मोरगाव. मोरगावातून सकाळी निघून एक्स्प्रेस वे नी खोपोलीतून पाली आणि महड करुन पनवेलमार्गे परत तिसर्‍या दिवशी संध्याकाळी.
आम्ही जरा सावकाश केला होता प्रवास. कारण मोरगावला राहून आम्हाला मध्ये वर्ल्ड्कप फायनल पहायची होती. :) पण ही सगळी ठिकाणं २ दिवसात होणं शक्य आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 2:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

ही यात्रा मी सायकलने ९ दिवसात केली आहे :) फार मस्त अनुभव होता तो. खुप शिकलो

शिल्पा नाईक's picture

28 Nov 2013 - 3:09 pm | शिल्पा नाईक

@ राजेंद्र मेहेंदळे, @ लीमाउजेट धन्यवाद,
आम्ही असाच प्लान बनवला आहे. पण बर्याच जणांनी २ दिवसात होणे शक्य नाही अस सांगीतल. मह्णून मिपाच्या जाणकार मंडळींना विचारयच ठरवल.

"ही यात्रा मी सायकलने ९ दिवसात केली आहे Smile फार मस्त अनुभव होता तो. खुप शिकलो"

प्रवासवर्णन वाचायला आवडेल :)

जेजुरीपण करता येते ना ह्यात. मोरगावजवळच जेजुरी आहे.

शिल्पा नाईक's picture

28 Nov 2013 - 4:23 pm | शिल्पा नाईक

जेजूरी टाळण्याच कारण मह्णजे त्याने २ दिवसात यात्रा पुर्ण होणार नाही, शिवाय तिथल्या पुजार्यांची प्रचंड चीड आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2013 - 8:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

मोरगाव -जेजुरी २३ कि.मी. आहे. पण ते बारामती रस्त्याला पडते. तिथुन घाटाने थेउरला उतरता येइल. पण मग सिद्धटेक फार लांब राहते आणि २ दिवसात धावपळ फार होते.
त्यापेक्षा पुणे-सोलापुर आणि पुणे-नगर हायवे पकडुन चालल्यास प्रवास सुखाचा होतो.

एक सामान्य मानव's picture

29 Nov 2013 - 8:32 am | एक सामान्य मानव

पाली महड ओझर व मुक्काम लेन्याद्रि करा. लेन्याद्रिला भक्त निवास फार छान आहे. फार गर्दि नसते. जमल्यास रात्रि वर मन्दिरात जा. तो एक फारच सुन्दर अनुभव आहे. दुसरा दिवस. रान्जनगाव, सिद्धटेक, मोरगाव व शेवटि थेऊर असा क्रम असुदे. एकुण अन्तर १००० किमि पडेल.

सुहास..'s picture

29 Nov 2013 - 8:45 am | सुहास..

पेपर वाचता का हो तुम्ही ?

शिल्पा नाईक's picture

29 Nov 2013 - 11:25 am | शिल्पा नाईक

का हो?
त्या उस आंदोलनाबद्द्ल बोलताहात का?

स्नेधा's picture

29 Nov 2013 - 11:07 am | स्नेधा

आम्ही अष्टविनायक यात्रा विघ्नेश्वर ट्रँव्हल्स (बोरिवली)यांच्याकडून केली होती. यांची यात्रा दर शुक्रवारी सकाळी सुरु होऊन रविवारी संपते. शुक्रवारी महड, पाली येथील गणपतीचे दर्शन घेऊन लोणावळा इथे दुपारचे जेवण केले. संध्याकाळी रांजणगाव इथे गेलो. रात्रीची राहण्याची आणि जेवणाची सोय वाकड येथे केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळीच थेऊर येथील गणपतीचे दर्शन घेऊन सिद्धटेक व मोरगाव च्या गणपती चे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणानंतर जेजुरी व नारायणपूर च्या तिरुपती बालाजी चे दर्शन घेतले. रात्रीच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था आधीच्याच हॉटेल मध्ये. रविवारी सकाळी ओझर व लेण्याद्री दर्शन करून मुंबईस परतलो. हा प्रतिसाद तुमच्या माहितीसाठी. :)

शिल्पा नाईक's picture

29 Nov 2013 - 11:23 am | शिल्पा नाईक

आम्ही पण ५ वर्षापुर्वी त्याच travels कडुन केली होती खुप छान अनुभव होता. पण आता मुलं आहेत बरोबर तर नवर्याच म्हणणं पड्ल की स्वतः प्रवास करु म्हणजे जर काही बर वगरे वाटल नाही/प्रवास झेपला नाही कोणाला तर सरळ मागे फिरता येइल.
जाताजाता: त्या tour मध्ये travels ने नीवडलेली होटेल्स छान होति.. जेवण पण्न छान. :)

आणि ४ वर्षाची २ मुलं आणी ६० च्या आतील जेष्ठ नागरीक (वाटल्यास उकडीचे मोदक करुन त्यावर व्यवस्थित तूप घालून त्याचा आस्वाद घेत) सर्वांनी पाहा.

शिल्पा नाईक's picture

29 Nov 2013 - 12:57 pm | शिल्पा नाईक

अष्ट्विनायक दर्शन हा हेतु आहेच शिवाय फिरायला जाण हा पण.

सो तो १० वेळा पहिलेला चित्रपट (तो पण सचिन चा) पुन्हा बघण्यापेक्षा थोडा त्रास काढुन गेलेलं बरय.... :)

भटक्या .'s picture

29 Nov 2013 - 7:44 pm | भटक्या .

प्रवासात स्वताच वाहन असेल तर यवत जवळ भुलेश्वर मंदिर पहा डोळ्याचे पारणे फिटेल
जमल तर आग्रह नाही पण शिल्पकलेची आवड असेल तर जरूर जा;'

प्रचेतस's picture

29 Nov 2013 - 9:50 pm | प्रचेतस

:)

भटक्या .'s picture

29 Nov 2013 - 8:52 pm | भटक्या .

अष्ट्विनायक दर्शन पूर्ण करायचं असेल तर लेण्यांद्रीचे अर्धपीठ मंचर [ पुणे नाशिक हायवे ]जवळ वडगाव काशिंबेग येथे आहे ते सुद्धा करा यात्रा सुफळ संपूर्ण होईल

हे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे! जरा विस्ताराने सांगाल का?

कपिलमुनी's picture

30 Nov 2013 - 4:14 pm | कपिलमुनी

मिपावर पूर्वी लेख येउन गेला अहे
http://www.misalpav.com/node/16662

शिल्पा नाईक's picture

10 Dec 2013 - 4:22 pm | शिल्पा नाईक

जाउन आलो.
१ ला दिवस :- लेण्याद्रि-ओझर-रांजणगाव-सिध्ध्टेक-मोरगाव- हडपसर मुक्काम
२ रा दिवस :- थेउर-महड-पाली - वडखळ मार्गे पनवेल हुन डोंबिवली परत

विटेकर's picture

10 Dec 2013 - 4:40 pm | विटेकर

गण पती बापा मोरया !
काही फोटो - बिटो..?