खरा काँग्रेसभक्त

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
23 Nov 2013 - 12:44 pm
गाभा: 

कुमार केतकरांचा अवतार छ.गडमधे जन्माला आला की काय अशी शंका यावी असा हा एक अस्सल काँग्रेसप्रेमी भारतीय!

http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-chhatisgarhs-rajeshwarao...

राजेशराव पवार नामक छत्तीसगडमधील कुणी विभूती महाराणी सोनिया, युवराज राहुल, युवराज्ञी प्रियांका यांची रोज साग्रसंगीत पूजा करतात. आपले जाणते पवार ह्यातून काही स्फूर्ती घेतील काय ?

असो. केतकरांच्या दिव्य मराठीत ह्या भक्तश्रेष्टाची बातमी यावी हा किती दुग्धशर्करा योग नाही? ज्योतीने तेजाची आरती याहून वेगळी ती काय असेल?
धन्य धन्य ते भगत गण आणि धन्य ते राजघराणे!

प्रतिक्रिया

उद्दाम's picture

23 Nov 2013 - 1:08 pm | उद्दाम

देव देतो हे चूक आहे.

जो देतो तो देव..

ज्याचा त्याचा देव वेगळा.

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2013 - 5:34 pm | टवाळ कार्टा

हे तुझे लॉजिक आहे हे सगळ्यांना आधीच माहित आहे...आणि तुझा देव कोणता ते सुध्धा :प

नितिन थत्ते's picture

23 Nov 2013 - 1:27 pm | नितिन थत्ते

त्याला कदाचित सोनिया-राहुल-प्रियांकाभक्त म्हणता येईल. काँग्रेसभक्त कशाला म्हणायचं?

हुप्प्या's picture

23 Nov 2013 - 8:55 pm | हुप्प्या

प्रिय चिच्याजी, एम ए च्या विद्यार्थ्याला असा बिगारीचा प्रश्न का पडावा? की हा रेटोरिकल की काय त्यातला प्रकार आहे?

म. सोनियाजी, यु. राहुल व यु. प्रियांका म्हणजेच काँग्रेस हे अद्वैत शेंबड्या पोरालाही ठाऊक आहे.
काँग्रेस म्हणजे काय मनमोहनसिंग वा दिग्विजयसिंग असे वाटते का आपल्याला?

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2013 - 5:32 pm | टवाळ कार्टा

मग दीदींवर इतकी टीका का झाली???

क्लिंटन's picture

23 Nov 2013 - 2:00 pm | क्लिंटन

असे कोणाचे तरी भक्त सगळीकडे बघायला मिळतील. उघड्या अंगावर तिरंगा काढून त्यावर सचिनच्या जर्सीचा दहा नंबर लिहून सचिनच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी हजेरी लावणारा सचिनचा सुधीर नावाचा निस्सिम पंखा आहेच की.अशा प्रकारचे fan following अनेक ठिकाणी बघायला मिळते.हा मनुष्य आपल्या भक्तीपायी इतरांना काही त्रास देत नाही किंवा स्वत:चेच नुकसान करून घेत आहे असे चित्र आहे असे वरकरणी तरी वाटत नाही (उदाहरणार्थ जयललिता हरल्यावर आत्मदहन करणारे जयललिता भक्त इत्यादी). मग यात त्यात चर्चा करण्यासारखे नक्की काय आहे हे लक्षात आले नाही. म्हणजे---
१. अशी कोणाचीच भक्ती करणे चुकीचे आहे आणि तसे करू नये
२. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची अशी भक्ती करणे चुकीचे आहे आणि तसे करू नये
३. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची कोणत्याही स्वरूपात भक्ती करणे चुकीचे आहे आणि तसे करू नये
४. अशी कोणाचीच भक्ती केल्याची बातमी कुमार केतकर संपादक असलेल्या वर्तमानपत्रात देणे चुकीचे आहे
५. आपल्या मुलांची नावे इतर कोणत्या सेलेब्रिटीवरून ठेवणे चुकीचे आहे (म्हणजे यात स्वत: सचिनचे पालक आणि सुनील गावसकर पण आले)
..............

यापैकी नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा लेखकाला अपेक्षित आहे हे समजले नाही आणि खरे म्हणजे या लेखाचा उद्देशच समजला नाही.

हुप्प्या's picture

23 Nov 2013 - 9:05 pm | हुप्प्या

सचिन आणि सोनिया यात थोओओओओओडा फरक आहेच. सचिन हा क्रिकेटमधील श्रेष्ट खेळाडू तर महाराज्ञीजी देशाच्या सर्वोच्च नेत्या. सचिनचे स्थान हे त्याच्या क्रिकेटमधील गुणांमुळे मिळालेले आहे. सोनियाजी लोकशाही प्रक्रियेच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघाल्या आहेत अशी किंवदंता आहे.
क्रिकेट न आवडणार्‍या लोकांना त्याकडे दुर्लक्ष करता येते. पण देशाच्या सर्वोच्चपदी असणार्य नेत्यापासून सुटका नाही. प्रत्येक बर्‍या वाईट धोरणाचा थेट वा आडवळणाने प्रत्येक नागरिकावर परिणाम होतो. तेव्हा क्रिकेट वा सिने स्टार ह्यापेक्षा हे वेगळे असे माझे मत.
सगळे नागरिक असे निस्सीम भक्त असतील तर निवडणुका कशा सरळ सोप्या होतील. ना प्रचाराचा खर्च ना जाहिराती ना ब्यानर्स. उलट काही लोकांना हे लोकशाहीला मारक वाटेल म्हणून हा विषय.

केतकरांची गांधी घराण्यावरील भक्ती जगजाहीर आहे. विठ्ठल आणि नामदेवाची आठवण यावी इतकी ही असीम श्रद्धा आहे. तेव्हा असले भक्त गण त्यांच्या वृत्तपत्रात हिर्‍याला कोंदण असावे असे शोभतात हे माझे मत. आपले वेगळे असल्यास जरून मांडा.

श्रीगुरुजी's picture

26 Nov 2013 - 12:58 pm | श्रीगुरुजी

>>> क्रिकेट न आवडणार्‍या लोकांना त्याकडे दुर्लक्ष करता येते. पण देशाच्या सर्वोच्चपदी असणार्य नेत्यापासून सुटका नाही. प्रत्येक बर्‍या वाईट धोरणाचा थेट वा आडवळणाने प्रत्येक नागरिकावर परिणाम होतो. तेव्हा क्रिकेट वा सिने स्टार ह्यापेक्षा हे वेगळे असे माझे मत.

+१

>>> केतकरांची गांधी घराण्यावरील भक्ती जगजाहीर आहे. विठ्ठल आणि नामदेवाची आठवण यावी इतकी ही असीम श्रद्धा आहे. तेव्हा असले भक्त गण त्यांच्या वृत्तपत्रात हिर्‍याला कोंदण असावे असे शोभतात हे माझे मत. आपले वेगळे असल्यास जरून मांडा.

+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९...

आशु जोग's picture

23 Nov 2013 - 2:12 pm | आशु जोग

>> केतकरांच्या दिव्य मराठीत ह्या भक्तश्रेष्टाची बातमी यावी हा किती दुग्धशर्करा योग नाही

उगा रेटींग मिळावे म्हणून केतकरांचे नाव घेवू नका... कुठल्याही बातमीचा धागा काय करताय !

हुप्प्या's picture

23 Nov 2013 - 9:08 pm | हुप्प्या

दिव्य मराठी हे वर्तमानपत्र केतकरांच्या मार्गदर्शनाखाली आहे अशी माझी माहिती आहे. आणि केतकरांची अलोट गांधीघराणेभक्ती जगजाहीर आहे. आणि ही बातमी मी कुठल्याही अन्य मराठी वर्तमानपत्रात वाचली नाही. तेव्हा ह्या अजब "योगायोगाचा" उल्लेख करणे मला उचित वाटले. आपणास झोंबले असल्यास कसे ते जरूर सांगा.

आशु जोग's picture

23 Nov 2013 - 11:18 pm | आशु जोग

>> आपणास झोंबले असल्यास कसे ते जरूर सांगा.
मला कशाला तुला झोंबले असले तर पहा

संपादक मंडळानेही दखल घ्यावी असे वाटते
त्यांची हरकत नसेल तर केतकरांचे नाव घेवून 'दिव्य मराठी'तल्या बातम्यांचे आणखी दहा धागे का टाकेनास :)

:| फक्त मिसळीचे फेसबुक होवू नये असे वाटते

हुप्प्या's picture

23 Nov 2013 - 11:58 pm | हुप्प्या

मला काही झोंबायचे कारणच नाही. कारण विषय मी मांडला आहे. मात्र आ़क्षेप आपण घेतला आहे तेव्हा ह्या विषयाबद्दलची आपली वेदना कळून घ्यायची होती.
संपादक मंडळाला मदतीची आर्त हाक मारण्याइतके आक्षेपार्ह ह्या धाग्यात काय आहे हे सांगितल्यास बरे होईल.
मिसळीचे फेसबुक का आणि कसे होऊ घातले आहे तेही सांगता आले तर पहा.

चेतनकुलकर्णी_85's picture

24 Nov 2013 - 12:26 am | चेतनकुलकर्णी_85

आजकाल कोणाला कशावरून आणि काय झोंबेल ते काही सांगता येणार नाही .
महाराष्ट्रातील पावर फुल्ल पवारांनी नाही हो करत करत गांधी घराण्याला आपले दैवत बनवले तर ह्या छत्तीस गड मधील ह्या पवारची काय गोष्ट सांगता ?
बाकी गांधी घराण्याला ह्या पवारांनी आपले कुलदैवत बनवले तर खरे पण ते रोज हिंदू पद्धतीने त्यांची पूजा करतात ते त्यांच्या देवांना मान्य आहे का ?

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2013 - 5:28 pm | टवाळ कार्टा

व्यक्तीपुजा करणे हे कधीही चुकच... मग ती गांधी घराण्याची असो वा मोदींची (एकच अपवाद ...सच्चु)
पण आपल्याला डोके बाजुला ठेउन आंधळेपणाने कोणाच्यातरी मागे मागे जाणेच आवडते कारण ते सोपे असते ना