कॅलिग्राफी ऑन टीशर्टस्

एस's picture
एस in काथ्याकूट
17 Sep 2013 - 1:51 am
गाभा: 

कॅलिग्राफी ऑन टीशर्टस्

काही नम्र सूचना:

१. खालील वाक्यांचा अर्थ विचारू नये. आम्ही क्लायंटला विचारला नव्हता.
२. सर्व वाक्ये त्यांच्या रिस्पेक्टीव फॉन्ट कलरसकट आमच्या क्लायंटची कॉपीराईट्स आहेत.
३. हे टीशर्ट घातलेला इसम दिसल्यास आम्हांला खव अथवा व्यनिमार्फत कळवण्याच्या भानगडीत पडू नये.
४. त्या इसमालाही हटकू नये.
५. कापडावर कुंचलाकारी करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने आणि ऐनवेळी जसे (ज्याला) सुचेल तसे बदल केल्याने त्यात सौंदर्यदृष्टी शोधत बसू नये.
६. जुन्या बाजारात जेवढे मिळाले तेवढेच रंग आणि भव्य लिमिटेड सेलमध्ये पेप्रांतून फाडलेली कुपने देऊन जेवढे व ज्या रंगांचे मिळाले तेच टीशर्ट वापरले आहेत. त्यामुळे कुठल्याही शंका वा कुशंका काढू नयेत.
७. फालतू? येस्स, इट इज फालतू.
८. मिपावरती का टाकलात असेही विचारू नये.
९. कुणाला त्यात तत्त्वज्ञान सापडेल तर कुणाला खिक् करावेसे वाटेल. ज्याचा त्याचा प्रश्न.
१०. आमच्या क्लायंटने आजतागायत आमचे पैसे दिले नाहीयेत. (वर तुझ्यातला एक कलागुण माझ्यामुळे जगाला कळला म्हणून तूच माझे आभार मान असा सल्ला देऊन टाकूनिया बाबा गेलेला आहे.) त्यामुळे ही कला येथेच थांबवण्यात येत आहे. सबब आमच्याही टीशर्टांवर द्याहो काढून अशी गळ घालू नये.

जग गुलछबू आबा तळीराम
T-Calligraphy4

'बिडी' फक्त माझ्यासाठी जळणारी
TT-Calligraphy3

feelings जाळून टाका.
T-Calligraphy2

"दारू प्यावी" का?
T-Calligraphy1

हेहेहेहे... पण हे सगळं रंगवताना जाम मजा आली. आमच्या मानगुटीवर बसून हे असलं काही करून घेणार्‍या आमच्या (तळीराम गुलछबू) मित्राला धन्यवाद!

अवांतर: कलादालनाला काय झालंय?

अवांतर अवांतर: लेखनप्रकार व लेखनविषय दोहोंमध्ये ह्या प्रकाराला साजेसे असे काही मिळाले नाही. ब्वॉर्र, सुलेखनाऐवजी कुलेखन असा जरी पर्याय दिला तरी चालेल.. खिक्! ;)

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

17 Sep 2013 - 4:26 am | खटपट्या

प्रयत्न चान्गला आहे..

यसवायजी's picture

17 Sep 2013 - 11:56 pm | यसवायजी

असेच म्हंतो..

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 7:48 am | स्पंदना

अक्षरे छान आहेत.
आमचे प्रतिसाद द्याय्चे सारे पर्याय आधीच खाट मारल्यामुळे निषेध!!

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Sep 2013 - 9:24 am | लॉरी टांगटूंगकर

लै भारी.

आदूबाळ's picture

17 Sep 2013 - 9:35 am | आदूबाळ

चारही टिशर्टस आवडले!

"फीलिंग्ज जाळून टाका" ची पार्श्वभूमी म्हणून माओचा (हात उंचावलेला) किंवा स्टॅलिनचा (टोकदार मिशाधारी) फोटो शोभला असता! बारक्या अक्षरांत "१९८४" सुद्धा समर्पक ठरलं असतं :)

एस's picture

18 Sep 2013 - 12:00 am | एस

हा जाळून टाका वाला टीशर्ट एका ताज्या प्रेमभंगवीराने आमच्या क्लायंटाकडून रडून-भांडून-मस्का लावून वगैरे हर प्रयत्नांनी (फुकटात) ठेऊन घेतला आहे असे क्लायंटाने आजच कळवलंय. :P बिचारा!

"फीलिंग्ज जाळून टाका" ची पार्श्वभूमी म्हणून माओचा (हात उंचावलेला) किंवा स्टॅलिनचा (टोकदार मिशाधारी) फोटो शोभला असता! बारक्या अक्षरांत "१९८४" सुद्धा समर्पक ठरलं असतं

नक्कीच.

आय मस से.

पाऊस's picture

17 Sep 2013 - 9:49 am | पाऊस

सुन्दर. ..:-)

पैसा's picture

17 Sep 2013 - 10:51 am | पैसा

मस्त आहे! आणखी काही भयंकर वाक्यं निव्वळ कल्पना म्हणून लिहून ठेवा! कधीतरी उपयोगी पडतील!

एस's picture

17 Sep 2013 - 11:40 pm | एस

पैसाताई, या क्लायंटाच्या रूमच्या भित्ताडांवर अशीच दिव्यवचने पूर्वी रंगवलेली होती.

आदिजोशी's picture

17 Sep 2013 - 11:16 am | आदिजोशी

टिशर्ट वरची कॅलिग्राफी हा एक अत्यंत नावाजलेला प्रकार आहे. त्यात केलेले वेगवेगळे प्रकार बघता थक्क व्हायला होतं. आपण जे केलंय ते प्रयत्न म्हणून नक्कीच स्तुत्य आहे. बेस्ट ऑफ लक.

अभ्या..'s picture

17 Sep 2013 - 12:50 pm | अभ्या..

कॅलिग्राफी हा प्रकारच इंटरेस्टींग आहे.
टीशर्ट वर, मग्जवर, ग्रीटींग्ज वर हे त्यांचे वेगवेगळे अ‍ॅप्लीकेशन झाले. सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी मराठी अशी कॅलिग्राफीची गोडी लावली.
बाकी धागाकर्त्याने स्वतःच इतक्या अटी जाहीर करुन टाकल्यात त्यामुळे कशाबद्दल काय बोलावे हेच सुचत नाही. :(
तूर्तास स्वतःला लै सीलबंद करुन धागा टाकला त्याबद्दल अभिनंदन. :)

एस's picture

17 Sep 2013 - 11:51 pm | एस

आदिभौ, निव्वळ मजा म्हणून केलंय. खरंतर शक्य तितकी गिचमिड करायची असं ठरवलं होतं पण अच्युत पालवांच्याचपासून स्फूर्ती घेतलेले आमचे हात अंमळ बरे चालू लागलेले पाहून ऐनवेळी ज्याला जसे सुचेल तसे बदल केले आहेत. त्यात फॉण्टटाईप, साइज, जाडी वग्रै सगळंच आलं. ;) (डेव्हिल मोड ऑफ्. फालतूच आहे याची पूर्ण कल्पना आहे. डेव्हिल मोड ऑन्.)

अभ्या, वरील अटींमुळे खरंतर चेकाळून सगळे धांगडधिंगा घालतील अशी अपेक्षा होती पण सगळा विरस झाला. छ्याट् च्या मारी... ती क्यालिग्राफी गेली खड्डयात. अटींवर तरी बोला बिंदास!

मस्त वाक्ये आणि तितकेच मस्त सादरीकरण. मजा आली.

सूड's picture

17 Sep 2013 - 6:28 pm | सूड

Lee Cooper चे टीशर्ट्स ह्या असल्या प्रकारासाठी वाया घालवले??

परत एकदा वाचा.

बादवे ह्या असल्या प्रकारासाठी माझे जलरंगांचे महागडे कुंचले आणि रंगतबक कायमचे वाया गेले ह्याचं जास्त वाईट वाटलं. आणि करायचंच म्हणल्यावर ली कूपर काय किंवा आणखी काय, मागेपुढे पाहिलं असतं असं वाटतं का?

बाकी प्रतिसाद आवडेश

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Sep 2013 - 7:33 pm | भ ट क्या खे ड वा ला

अटी लिहिताना कोणा पुणेकराचा सल्ला घेतला का ?
का सर्व ग्राहक पुण्याचे आहेत?

आणि पुण्याच्या पुणेरीपणावर प्राणपणाने प्रेम करणारे आहोत.

मुक्त विहारि's picture

18 Sep 2013 - 7:32 am | मुक्त विहारि

झक्कास...

पैसा's picture

18 Sep 2013 - 9:21 am | पैसा

आता नेमके जे करू नका म्हटलंत ते सगळे केलंय आणि प्रश्न विचारलेत असं समजून तुमची "पुणेरी" स्टायलीतली उत्तरं द्या!! :-/