चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
१. देवादिकांच्या पौराणिक कथा, हा जगभरातील कलवंतांना शतकानुशतके आव्हान देणारा लोकप्रिय विषय. भारतात लेणी व मदिरांमधील भित्तिचित्रांखेरीज हस्तलिखित पोथ्यांमधील चित्रांची समृद्ध परंपरा होती. उदाहरणार्थ खालील चित्रे बघा:
रावण-वध: (जलरंग) उदयपूर, इ.स. १६४८
कुंभकर्ण वध : उदयपूर, इ.स. १६४८
विराट रूपदर्शन (तपशील अनुपलब्ध)
रामचरितमानस मधील एक प्रसंग : जोधपूर, इ.स. १७७५
‘पद्म राजाच्या प्रासादावरून आकाश-गमन करताना जालंदरनाथ आणि पद्मिनी’ चित्रकार: अमरदास भट्टी.जोधपुर, इ.स. १८३०
वानरसेनेसह रामाचा लंकेत प्रवेश. (जलरंग) जोधपूर इ.स. १७७५.
२. मात्र ही चित्रे फक्त राजे-रजवाड्यांकडे असल्याने सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी वा घरात लावण्यासाठी चित्रे उपलब्ध नसत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लिथोग्राफीचा प्रसार झाल्यावर मात्र ही परिस्थिती बदलली. सुरुवातीच्या काळात ही चित्रे जर्मनीतूनच छापून येत.
..
लिथोग्राफीची शिळा, व त्यावर रेखाटलेले चित्र.... लिथोग्राफीचे छपाई यंत्र (पेटंट १८५० लंडन)
३. १८७८ साली पुण्यास चित्रशाळा प्रेस सुरु झाला, त्यात छापलेली चित्रे:
.
.
दुर्गा, सिद्धिविनायक, नृसिंहावतार : चित्रशाळा प्रेस, पुणे (१८८०)
४. त्याच सुमारास कलकत्त्यात विविध आर्ट स्टुडियो/प्रेस सुरु झाले, त्यांची काही चित्रे:
.
दुर्वास - शकुंतला, अभिमन्यु - उत्तरा, शंतनु - गंगा.
कृष्ण-बलराम, अक्रुरासह मथुरेस (कंस-वधासाठी ?) जाताना.
द्रौपदी वस्त्र - हरण.
५. एकोणीसाव्या शतकात संगीताची छापील पुस्तके उपलब्ध झाली. त्यांची मुखपृष्ठ चित्रे:
.
.
प्रल्हाद संगीत १८६६, लावनी नविन विलास १८७३, गोपिचंद राजा का सांग १८७७.
६. तात्कालीन प्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी स्वप्रयत्नाने पाश्चात्त्य पद्धतीच्या, प्रत्यक्ष मानवी मॉडेल वरून तैलरंगात चित्रण करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवून, देवी-देवतांची, पौराणिक विषयांवरची चित्रे बनवून ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केले.
रविवर्माच्या तैलचित्रांना त्याकाळी एवढी मागणी होती, की तेवढी निर्मिती करणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून निवडक चित्रांचे ‘ओलीयोग्राफ’ जर्मनीतून बनवून आणावेत, असे त्रावणकोर (आणि नंतर बडोदे) संस्थानचे दिवाण टी. माधवराव यांनी त्यांना सुचवले. पुढे जर्मनीतून शिळाचित्र छपाईचे यंत्र व सामान मागवून ‘फ़ाईन आर्ट एंड लिथो प्रेस’ नामक छापखाना १८९४ साली रविवर्माने सुरु केला. त्यासाठी जर्मन विशेषज्ञ Fritz Schleicher, आणि त्याचा सहायक P. Gerhard यांना सुद्धा आणले. रविवर्मा प्रेस मध्ये छापलेल्या अनेक प्रकारच्या चित्रांमुळे त्याकाळी भारतातील घरा-घरात चित्रकला पहुचली.
.
सीता स्वयंवर
.
विश्वामित्र - मेनका, जळ-क्रिडा
.
शिव-पार्वती-गणेश, वनवासी राम
७. एकाच चित्रात अनेक दृष्ये दाखवणारे लिथोग्राफ सुद्धा तेंव्हा खूप प्रचलित होते. उदाहरणार्थः
.
दशावतार आणि यमयातना.
मार्कंडेय पुराण: विविध पापांबद्दल विविध नरकयातना
७. त्याकाळी पारंपारिक चित्रकलेस ग्रहण लागून त्याजागी पाश्चात्त्य पद्धतीच्या चित्रकलेचा प्रसार वेगाने होऊ लागला होता.
एका गणिकेचे व्यक्तिचित्र, दिल्ली. (हस्तिदंतावर जलरंग (१८३०-५०).
------------------------- क्रमशः --------------------------------------------
टीप: कोणत्याही कलाकृतीकडे बघताना आपण आस्वादक, अभ्यासक, समीक्षक, अश्या विविध भूमिका घेऊ शकतो. पैकी समीक्षकाच्या भूमिकेची खरेतर बहुतेकदा गरज नसतेच. एकदा समीक्षकाचा चष्मा चढवला, की आस्वादकाची भूमिका गळून पडते, आणि त्या कृतीतील असतील-नसतील त्या उणीवाच तेवढ्या दिसू लागतात.
या लेखमालेत आपण आस्वादकाच्या भूमिकेतून विविध चित्रांकडे बघणार आहोत. पुढील लेखात भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रांकन-पद्धतीतील फरक जाणून घेऊ.
(कलादालनात हा लेख देण्याचा प्रयत्न फसल्याने काथ्याकुटात देत आहे)
-----------------------------------------------------------------------------
ब्रिटिश म्युझियममधील आणखी काही चित्रे:
http://www.britishmuseum.org/whats_on/past_exhibitions/2009/indian_summer/garden_and_cosmos.aspx

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
अप्रतिम संग्रह .
भारतीय चित्रांत परस्पेक्टिव्ह
असहमत.
अर्थ वेगळे
पर्स्पेक्टिव्ह वगैरे
पहिला भाग खुप आवडला. यातील
दत्तात्रेय
व्वा!!!
असं का असावं ?
छानच! यातल नृसिंहाचे चित्र
लिथोग्राफी
चित्र क्र. २ मधील प्रसंग
कुंभकर्णाचे चित्र
लेख आवडला. च हित्रे तर खूपच
बरीच नविन माहिती आणि चित्रे
नागा साधु आणि जळक्रिडा
खरे रसिक होते आपले पूर्वज.
छान धागा
औंध संस्थानात असलेल्या "यमाई
यमाई देवीच्या देवळातील चित्रे
@दत्ता काळे
राजा रविवर्म्याची तर आहेतच पण
यमाई देवीचे देऊळ
सुरेख
बाकी काही म्हणा गणपती बाप्पा
-
छान
सुंदर
सौदर्याशास्त्रावर नाशिकच्या राम कर्वे यांचे पुस्तक
चित्रे
कोहलींचा हनुमान...
चित्रगुप्तांची चित्रे अन
चित्रान्चा खजिना
सुंदर लेख