थेसियस चे जहाज - पॅरॉडॉक्स

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
5 Aug 2013 - 4:55 am
गाभा: 

प्लुटार्क ने एक थेअरी मांडली होती. त्यावर अजुनही चर्चाचर्वणे होत असतात.
त्याने हा मुद्दा अथेन्सच्या लोकांसमोर मांडली म्हणून त्याला थेसियस च्या जहाजाचा वाद असे उल्लेखले जाते.
त्याच्या थेअरी नुसार.
एखादे जहाज दुरुस्त करताना त्याचे काही भाग बदलून त्याजागी नवे भाग टाकले जातात.
समजा हळूहळू त्या जहजातील सर्वच भाग काढून टाकाएव लागले आणि त्याजागी नवे भाग बसवले. तर त्या जहाजाला जुने जहाज म्हणायचे का?
त्या जुन्या जहाजाचे काढून टाकलेले भाग वापरून एखादे नवे जहाज बनवले तर त्या जहाजाला नवे जहाज म्हणायचे का?

हे उदाहरण थोडे व्यापक करुया.
गृहीत धरुयात की श्री लेले हे एक काटकसरी गृहस्थ आहेत. त्याना व्यर्थ उधळपट्टी आवडत नाही.
समजा श्री लेलेंच्या स्लीपर चा बंद तुटला. म्हणून तुम्ही नवा बंद घातला.
काही दिवसानी त्या स्लीपरचा तळ झिजून गेला म्हणून श्री लेलेनी स्लीपर ला नवा तळ टाकला.
काटकसरी असलेल्या श्री लेलेंच्या डोक्यात एक आयडीया आली.त्यानी जुने बंद आणि जुने तळ एकत्र करून त्यातून घरात घालायला म्हणून एक स्लीपरचा जोड बनवला.
आता त्यांच्या कडे दोन स्लीपर जोड आहेत. त्यापैकी कोणत्या जोडाला नव्या स्लीपर म्हणायचे.
हा वाद खूप जुना आहे. सर्वप्रथ हे प्रमेय प्लुटार्क ने मांडले.
Plutarch thus questions whether the ship would remain the same if it were entirely replaced, piece by piece. Centuries later, the philosopher Thomas Hobbes introduced a further puzzle, wondering: what would happen if the original planks were gathered up after they were replaced, and used to build a second ship. Which ship, if either, is the original Ship of Theseus?
त्यानंतर सॉक्रेटीस , प्लेटो यानी त्यावर काही प्रमेये मांडली आहेत.
Another early variation involves a scenario in which Socrates and Plato exchange the parts of their carriages one by one until, finally, Socrates's carriage is made up of all the parts of Plato's original carriage and vice versa. The question is presented if or when they exchanged their carriages.
तुमचे काय मत आहे.
आपल्या राजकारणातही अशी बरीच उदाहरणे आहेत.
उदा:
१) इंदीरा गांधीना कोंग्रेस एस मधून यशवंतराव चव्हाण वगैरे प्रभूतीनी काढून टाकले.त्यानंतर इंदीरा गांधीनी काँग्रेस आय पक्ष काढला.
त्यानंतर एस काँग्रेस लयाला गेली. यशवंतराव चव्हाण हे स्वगृही आलो असे म्हणत इंदीरा कोंग्रेस मध्ये आले.
प्रश्न हा पडतो की खरी काँग्रेस कोणती.
२)जनसंघ हा पूर्वी संघाचा राजकीय चेहेरा होता. आणीबाणी नंतर त्याचा जनता पक्ष झाल. जनता पक्षात फूट पडून भाजप चा उदय झाला. लालूनी जयप्रकाशांचा वारसा चालवतो म्हणत जनतापक्षाचे जनता दल केले. भाजप च्या रथ यात्रे ला त्याच लालूनी विरोध केला. खरा जनता पक्ष कोणता. भाजप की जनता दल?
३) शरद पवारानी विदेशी नागरीकत्वाच्या मुद्द्यावरून सोनीयागांधीना विरोध केला. आणि पक्षाबाहेर पडले. मात्र त्याच काँगेस सोबत हातमिळवणी करून निवडणुका लढवल्या.मग विदेशी नागरीकत्वाच्या मुद्द्याचे काय झाले.

अगदी असले नाही पण याच प्रकरात मोडणारे एक उदाहरण कमल हसनच्या एका चित्रपटात आहे.
कमल हसन राजकुमारचा मुलगा दाखवला आहे.
पद्मिनी कोल्हापुरे हेमामालीनीची मुलगी दाखवली आहे.
पद्मिनी कोल्हापुरे राजकुमारशी लग्न करायचे ठरवते.
कमल हसन हेमामालीनीशी लग्न करायचे ठरवतो.
चौघे समोरासमोर येतात. कोणी कोणाच्या पाया पडायचे हा प्रश्न निर्माण होतो.
कमल हसन+ हेमामालीनी = वडील आणि नवी आई पद्मिनी कोल्हापुरेच्या पाया पडणार की
राजकुमार +पद्मिनी कोल्हापुरे = सासू आणि नवे सासरे कमलहसनच्या पाया पडणार?
बघा सुटतय का गणीत?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

5 Aug 2013 - 9:01 am | अर्धवटराव

याचं उत्तर "जहाज" शब्दाच्या परिभाषेत आहे. जहाज म्हणजे काहि घटक वापरुन बनवलेला आकार नव्हे तर पाण्यावर तरंगणारं, काहि विशिष्ट परिस्थितीत चालणारं (वजन, आकारमान, ज्या पाण्यात ते चालणार त्या पाण्याचे गुणधर्म, त्याच्या वापराचे उद्देश इ.) ते एक ब्लु प्रींट आहे. एखादं जहाज बांधुन तयार झालं व कालांतराने त्याचे पार्ट्स रिप्लेस करत गेलं... असं करत करत जरी संपूर्ण जहाज बदललं गेलं पण ते मूळ ब्लुप्रींटच्या बरहुकुम राहिलं तरी त्याला जुनच जहाज म्हणावं.

तसच, जुने पार्ट्स वापरुन नवीन जहाज बनवलं तर ते नवीनच म्हणावं, कारण जुन्या जहाजाच्या ब्लुप्रींटशी ते १००% मॅच होणार नाहि कधि.

अवांतरः तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्ट अगदी हरघडी बदलत असते, त्यामुळे कुठलंही नाविन्य त्या एका वर्तमानकाळापुरतं असतं.

अतिआवांतरः हे फिलॉसॉफी मंडळं अशा सहजासहजी उत्तर देण्यालायक कोट्या करणार नाहित. खरच काय निश्कर्ष काढला त्या मंडळींनी??

अर्धवटराव

पैलवान's picture

5 Aug 2013 - 1:29 pm | पैलवान

एका नदीत दोनदा हात बुडवता येत नाही (कारण ती वाहती असते), तसं काहीसं..

एक तारा's picture

5 Aug 2013 - 12:33 pm | एक तारा

movie सध्या सिनेमा घरात चालू आहे. माझ्या मते story लई भारी आहे. यात ३ वेगवेगळे कथानकं आहेत जी थोडी फार आपल्या आजूबाजूच्या जगात घडू शकतात. याच संदर्भात म टा च्या कालच्या (दि ४ aug) संवाद पुरवणीत एक परीक्षण आला होतं. ते मी शोध शोध शोधला पण नेट वर काही केल्या सापडत नाही आहे. ते कोणाला सापडताय का?

आदूबाळ's picture

5 Aug 2013 - 1:21 pm | आदूबाळ

अजूनही हेच घड्याळ मी वापरतो. खिशातून काढलं की वाटतं - जुन्या काय नि नव्या काय, घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पहायला, तबकडी आणि पट्टा कसा का असेना! घड्याळाचं काय आणि माणसाचं काय - आतला तोल सांभाळणारं चक्र नीट र्‍हायलं, की फार पुढेही जायची भीती नाही आणि फार मागे पडायचीही भीती नाही.
- पुलदे

जुने/नवीन ठरवण्याआधी वस्तुची ओळख ठरवणे आवश्यक असते. जसे चॅसिस + इंजिन (कॉम्पोझिट की) ही कारची ओळख असते. इतर भाग हे अ‍ॅट्रीब्युट्स असतात. चॅसिस किंवा इंजिन बदलल्यास ती नवीन कार ठरेल.. बाकी कुठलाही भाग बदलल्यास ती नवीन गाडी म्हणता येणार नाही. हेच तत्व स्लीपर, काँग्रेस, जनसंघ यांना लावा.. नात्यांच उदाहरण मात्र यापेक्षा वेगळं आहे. त्यात प्रत्येकाचं आत्ताचं नातं आणि नवीन नातं यात तुलना करावी लागेल. पण नवीन नाते हे dual relationship असल्याने तुलनाही दोन्ही नव्या नात्यांशी करावी लागेल.

विजुभाऊ's picture

5 Aug 2013 - 5:19 pm | विजुभाऊ

आणखी एक उदाहरण
एका अभिनेत्रीने एक लग्न केले
त्यानंतर डिव्होर्स घेतला.
त्यानंतर तीने पुन्हा लग्न केले
दुसर्‍या लग्नातल्या नवर्‍यासोबत दोन वर्षे नांदल्यानंतर तिला कंटाळा आला.
तीने डायव्होर्स घेतला.
एकटी असताना तीला पहिला नवरा भेटला.
त्या दोघानी पुन्ह्या नव्याने लग्न केले.
त्या अभिनेत्रीचे हे लग्न कितवे मानावे. पहिले (मागील पानावरुन पुढे चालू) की तिसरे.?

बाळ सप्रे's picture

5 Aug 2013 - 5:28 pm | बाळ सप्रे

लग्न तिसरे, नवरा दुसरा..
इथे लग्न - नवरा हे many to many relation आहे.. :-)

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2016 - 7:24 pm | टवाळ कार्टा

इंद्राणीला विचारा =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2016 - 10:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपली ओळख आहे का काही कारणानी?

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2016 - 12:12 am | टवाळ कार्टा

नाय ब्बा

धर्मराजमुटके's picture

5 Aug 2013 - 7:21 pm | धर्मराजमुटके

आणखी एक उदाहरण
एका व्यक्तीने एका कंपनीत काम केले.
त्यानंतर राजीनामा दिला.
त्यानंतर पुन्हा दुसर्‍या कंपनीत काम केले.
दुसर्‍या कंपनीत दोन वर्षे नांदल्यानंतर त्याला कंटाळा आला.
त्याने राजीनामा दिला.
घरी असताना त्याला पहिल्या कंपनीची परत ऑफर आली.
त्याने पुन्हा पहिली कंपनी जॉईन केली.
त्या व्यक्तीची ही कितवी नोकरी मानावी ? पहिली ? (मागील पानावरुन पुढे चालू) की तिसरी ?

यांनी दोनदा लग्न केलं होतं. कायद्याच्या दृष्टीने ती दोन वेगवेगळी लग्नं मानली गेली असावीत असा अंदाज आहे.

नवरा कसा दुसरा? मग दुसर्‍या लग्नाच्या नवर्‍याला कितवा नवरा म्हणायचे?

बाळ सप्रे's picture

5 Aug 2013 - 5:35 pm | बाळ सप्रे

त्या क्रमाने पाहिजे असल्यास पहिला नवरा तिसरे लग्न.. इथे लग्न आणि नवरा ह्या दोन वेगवेगळया एंटिटीज आहेत हे ध्यानात घेतले की तिसर्‍या लग्नात पहिलाच नवरा कसा असे प्रश्न पडणार नाहीत. कारण इथे एकाच नवर्‍याशी अनेक लग्न होउ शकतात असे रिलेशन (एंटिटीजचे, नवरानवरीचे नव्हे ) आहे.

दादा कोंडके's picture

5 Aug 2013 - 7:06 pm | दादा कोंडके

विक्रम वेताल मध्ये अशीच एक गोष्ट वेताळ सांगतो. एका तरुणाचं लग्न शेजारच्या गावातल्या अनुरुप मुलीशी होतं. लग्नानंतर जंगलातून ही मंडळी जात असताना डाकू हल्ला करतात आणि लढताना नवरा मुलगा आणि त्याचा जवळचा मित्र मारले जातात. डाकू त्या दोघांचं मुंडकं उडवतात. इकडं त्या गोंधळात नवरी मुलगी पळून जाते आणि थोड्या वेळानं येउन बघते तर हे दोघं मेलेले. देवीची प्रार्थना केल्यावर ती प्रसन्न होते आणि त्यांना जिवंत करण्याचं तीला वर्दान देते. ही नवरी हर्षभरीत होउन याचं मुंडकं याला आणि त्याचं मुंडकं याला लावते. ती दोघं जिवंत झाल्यावर तीला आता तीचा नवरा कोणता हे कळत नाही. (या सीन मध्ये त्या नवर्‍याचा मित्र हसत असतो का ते कळतच नाही)

हुशार विक्रम मग नवर्‍याचं मुंडकं असलेल्या मित्राचं शरीर म्हणजेच तीचा खरा नवरा असं सांगतो. नंतरच्या सीन मध्ये ती नवर्‍याची निवड करते. (या सीन मध्ये देखील त्या नवर्‍याचा मित्र हसतच असतो!)

त्यामुळे त्या वस्तूत किंवा व्यक्तीची/प्राण्याची वैग्रे आयडेंटीटी कशात आहे ते शोधून काढायला हवं. नसेल तर मग त्या प्रश्नाचं उत्तर 'बुलीन' पद्धतीनं देता येणं अवघड आहे.

या कथेवर आधारीत असलेले नाटक "हयवदन"
पण त्याचा मतीतार्थ वेगळा आहे.

मांडलेला प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

चांदणे संदीप's picture

16 Feb 2016 - 10:37 pm | चांदणे संदीप

तुम्ही राजकुमारला मध्ये आणायला नको होतं! ;)

सुनील's picture

17 Feb 2016 - 8:05 am | सुनील

लेखातील उदाहरणात दिलेले लेले हे गृहस्थ माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनी आपल्या नावाचा एकाक्षरी रबरस्टँप बनवून घेतला आहे - "ले"!

रबरस्टॅम्पला अक्षरावर पैसे घ्यायची पध्दत जाऊन जमाना झाला. आता लाईन अथवा मोठा असेल तर स्केवर सेमीवर पैसे आकारतात.

गामा पैलवान's picture

17 Feb 2016 - 7:21 pm | गामा पैलवान

लोकहो,

दादा कोंडकेंच्या प्रतिसादात आयडेंटिटी हा शब्द पाहिला. त्यावरून माणसाची ओळख काय असावी असा प्रश्न आठवला.

माणसाचं शरीर सतत बदलत असतं. सहा महिन्यांत त्वचा बदलते. सुमारे तीन वर्षांत सगळं मांस व चरबी बदलते. तर बारा वर्षांत हाडे बदलतात. मग आता माणूस नक्की कशाला म्हणायचं? चेहराही सतत बदलत असतो. जर त्यावरून माणूस ओळखायचा झाला तर चेहरा डीएनए वरून बनतो. म्हणजे डीएनए ही खरी ओळख धरावी लागेल. पण काही वेळेस एका माणसांच्या अंगात दोन डीएनए ही असतात म्हणे! अशांना चिमेरा म्हणतात.

तर मग माणूस म्हणजे नक्की काय? शरीर? मन? डीएने? की आत्मा? एकाच शरीरात दुसरं मन राहू लागलं तर माणूस बदलला का? यक्षप्रश्न आहेत.

आ.न.,
-गा.पै.