वारी......

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Jul 2013 - 12:10 am
गाभा: 

दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात.
आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात.
त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो.
खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत.
गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.
आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत.
त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात.
तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2013 - 2:58 am | प्रसाद गोडबोले

चर्चेतली काही विधाने अगदीच तर्कविसंगत. ''हिंदुधर्मासाठी कोणी काय केले आहे म्हणून त्याने टीकेचा 'अधिकार' आपल्याकडे घ्यावा" हे म्हणजे तुम्ही अंडे घातले आहे का, घातले असेल तरच त्याचा आकार,रंग चव इ.वर टीका करा- इतपत बाळबोध.

एक उदाहरण देवु का .... जरा शांत चित्ताने पहाल का ...न रागावता?

"राही तुम्ही बावळट आहात "

आता हे हे वाक्य वाचल्यावर संपादक हा प्रतिसाद डिलीट करतील ...तुम्हालाही राग येईल कदाचित वैयक्तिक टीका केली म्हणुन ...अणि शांत चित्तने वाचणार्‍याला राग येईल की ओळख नापाळख असं कसं काय बोलु शकतं कोणी ...
बरोबर आहे की नै ??

सेम ...एक्झ्यॅक्टली सेम फीलींग ...असतं वारकर्‍यांचं जेव्हा कोणी ओळख नापाळख , विषयाचा अभ्यास नाही , क्षेत्रात कार्य केलेलं नाही तरीही वारी बंद करा अशी पिंक टाकत असतो किंव्वा त्याला समर्थन देत असतो ....

अहो कोणत्याही गोष्टीवर बोलण्या आधी त्यागोष्टीचं ज्ञान असणं अनुभव असणं ही बेसीक नीड आहे ... उगाचच उठ सुट कोणी म्हणाला आपल्या हे आईन्स्टाईन्ची रीलेटीव्हिटी थेरी काय पटली नाही ...फालतु आहे ..डिस्कार्ड करुन टाकली पाहिजे ... तर सगळे हसतील अन त्याला यड्यातच काढतील ... आधी फिजिक्सचा अभास तर करा , प्रयोग तर करा , अन मग नाही पटलं तर बोला की आईनस्टाईन यडा होता म्हणुन ....

जे लॉजिक विज्ञानात वापरता ते धर्मात/ तत्वज्ञानात का नको ?

आता हे ही लॉजिक बाळबोध असेल तर कळ्वा

बाकी कुठेही अपमान करायचा हेतु नव्हता हे कृपाकरुन लक्षात घ्यावे ही नम्र विनंती .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jul 2013 - 12:44 am | विश्वनाथ मेहेंदळे

इतके अध्यात्मिक आहात… हरिपाठ, कीर्तन, वेदांचे दाखले देताय... तर जरा शांतपणे मुद्दे मांडा की. का उगा जहाल भाषा वापरताय? या सगळ्यातून काय फत्रं शिकलात ??

प्रसाद गोडबोले's picture

13 Jul 2013 - 1:39 am | प्रसाद गोडबोले

पुढील प्रतिसादापासुन काळजी घेईन .

कोणाही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पुजनाचे ||

मर्यादा सुटत असल्याची जाणीव करुन दिल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !!

आइनस्टाईनची थेअरी पटली नाही म्हणणारास तो ते सप्रमाण सिद्ध करुन दाखवत. आणि महत्वाचे म्हणजे आईनस्टाईनची थेअरी पटली नाही असे साम्गणाराचे म्हणणे लोक नीट ऐकून घेतात. आइनस्टाईनने म्हंटले आहे म्हणून कोणी त्यावर आंधळेपणे विश्वास ठेवत नाही. आइनस्टाईनची थेअरी मानणारे चिकित्से साठी तयारी दाखवतात. किंबहुना चिकीत्सा हाच त्याचा पाया असतो.
पण आपल्या इथे कोणत्याही प्रथेचा चिकीत्सेसाठी विरोध असतो. कारण त्यामुळे प्रस्थापितांची दुकाने बंद होतात.

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2013 - 2:43 am | प्रसाद गोडबोले

आइनस्टाईनची थेअरी पटली नाही म्हणणारास तो ते सप्रमाण सिद्ध करुन दाखवत.

>> काय सांगता !! उटसुट टीका करणार्‍या प्रत्येक सोम्यागोम्याला आईन्स्टाईन समजावुन सांगत होता ? हे नवीनच ...ह्या आमची संधी हुकली राव !

आईनस्टाईनची थेअरी पटली नाही असे साम्गणाराचे म्हणणे लोक नीट ऐकून घेतात.

हेही म्हणणारा कोण आहे ह्यावर अवलंबुन आहे ... किमानपक्षी फिजिक्सचा विद्यार्थी असावा ...पुने म्युनिसिपाल्तीत उंदीर मारणारा नसावा ... असा अंदाज आहे

आइनस्टाईनने म्हंटले आहे म्हणून कोणी त्यावर आंधळेपणे विश्वास ठेवत नाही.

विज्ञानातही कित्येक गोष्टी लोकं आंधळेपणाने विश्वास ठेवतात हे मी पैजेवर सिध्द करु शकतो. पृथ्वी सुर्याबोवती फिरते ह्याचा पुरावा कधी शोधलाय का तुम्ही ? किंवा १ > ० अर्थात एक शुन्यापेक्षा मोठ्ठा असतो ह्याचा पुरावा शोधलाय का ? किंवा डारविन म्हणतो तो एव्होलुशन सिध्दांत किती जणांनी व्हेरीफाय करुन पाहिलाय ?
(सोडा हो हा विषय... जगात "मी आहे" ह्याव्यतिरिक्त काहीच सिध्द करता येत नसतं ... एव्हरीथिंग इज ज्स्ट बिलीफ !! थ्यांक्यु देकार्त )

आइनस्टाईनची थेअरी मानणारे चिकित्से साठी तयारी दाखवतात. किंबहुना चिकीत्सा हाच त्याचा पाया असतो.पण आपल्या इथे कोणत्याही प्रथेचा चिकीत्सेसाठी विरोध असतो.

कोणीही चिकिस्तेला विरोध दाखवल्याचे मला अख्ख्या चर्चेत दिसले नाही ... उलट सगळे जण आधी चिकित्सा करा आधी चिकित्सा करा ...मग बोला... हेच वारंवार सांगत आहेत !!

कारण त्यामुळे प्रस्थापितांची दुकाने बंद होतात.

ह्म्म्म्म ... आता वारीच्या बाबतीत कोण प्रस्थापित आणि कोणाची दुकाने बंद होणार ते कळवा ... कारण प्रस्थापित म्हणलं की लगेच कळतं म्हणणारा चर्चा कुठे घेवुन चालालाय ते ...

असो व्यनिला उत्तर द्या हं नक्की . एकत्र अभ्यास करु वैदिक धर्माचा :)

मोदक's picture

15 Jul 2013 - 11:24 am | मोदक

चर्चा वाचतोय..

जगात "मी आहे" ह्याव्यतिरिक्त काहीच सिध्द करता येत नसतं

धिस इस अ व्हेरी डेंजरस स्टेटमेंट. वारीचा धागा हायजॅक होण्याची क्षमता आहे या वाक्यात!! ;-)

लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचलेत. वेळ फारसा चांगला गेला असे म्हणत नाही.. पण असो.

अन् वारी बंद व्हावी - न व्हावी वगैरे बद्दल बोलायचे तर -
कोणी काय वाट्टेल ते म्हणो अन् करो..वारी तर कधी बंद पडणार नाहीच, उलट आणिक तिचा प्रभाव वाढतच जाईल.

बाकी पुढे मागे कधीतरी वारी करावी म्हणतो!
काय रे धम्या? कधी येणार का नाही परत म्हाराष्ट्रात? आलास तर जाऊ सोबत.. त्या बाणालाही घेऊन जावे म्हणतो बरोबर.. :)

राघव

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 2:51 am | धमाल मुलगा

विषय लैच्च धार्मिक अन श्रध्दा वगैरे गोष्टींकडं वळत गेला अन पपलिक वारीच्या सोशिओ-इकॉनॉमिकल बाबीकडं दुर्लक्ष करुन श्रध्दांना झोडपत सुटल्यावर निवांत तंगड्या पसरून वाचत बसलो. :)

वारीला जाऊ की राव! पुर्वी जायचो थोडंसं. आता परत जायलाही आपल्याला लै आवडेल. हां, देवासाठी जाईन ह्याची ग्यारेंटी नाही, पण आमच्या मोडकमास्तरांनी वारीचे दाखवलेले पैलू निरखायला मात्र नक्कीच येईन.

अवांतरः एकुण प्रतिसाद वाचता, जी वारीबद्दलची लोकांची निरिक्षणं/मतं दिसली त्यावरुन बहुतांश लोकांनी ना वारी कधी केली, ना कोणी वारकरी ओळखीचे/माहितीतले आहेत असं जाणवतं. लोकांना दिसतो तो एका दिवसाच्या ट्रॅफिक जॅमचा त्रास अन हागणदारी! साला, वारीचा गाभाच नाय बघत राव जन्ता. दया आली रे!

प्रसाद गोडबोले's picture

12 Jul 2013 - 3:07 am | प्रसाद गोडबोले

खरंच राव ...एकदा फुल्ल वारीला जायचंय देहु पासुन पंढरपुरपरयंत !!

मागे एकदा एका छोट्याश्या गावात ( हनुमान टाकळी वस्त १००० च्या आसपास असेल ) हरीपाठ अन रात्रीचे कीर्तन ऐकले होते ... तेव्हा काय अनुभव आला होता काय सांगु ...

|| सोपे वर्म आम्हा सांगितले संती | टाळ मृदुंग हाती घुवुनि नाचा ||
समाधीचे सुख टाका ओवाळुनी | ऐसा ह्या कीर्तनी ब्रह्मरस ||

अहाहा ...
नुसतं एक हरिपाठ ऐकल्याचं हे फळ तर पुर्ण वारी केल्याचं काय फळ !!

आमच्या काकांनी नुकतीच एक मोठी तीर्थयात्रा केली ( मिपावर प्रसिध्द(की कुप्रसिध्द ) असलेली ;) ) तेव्हा त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले तेव्हा म्हणाले ....
" ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत ...आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे !! "
वारीचं ही असंच काहीसं असणार ... :)

एकदा जायलाच हवे ...

इन्दुसुता's picture

13 Jul 2013 - 8:51 pm | इन्दुसुता

धमाल रावांशी ( पहिला प्रतिसाद) सहमत. सोशिओ इकॉनॉमिक मुद्दे आहेतच, राजकारण तरी कुठे सुटले आहे?
वर पेठकरांनी म्हटलेच आहे

मुद्द्यांचे खंडण करताना अनेकांना विजुभाऊंवर वैयक्तिक हल्ला करण्याचा मोह आवरलेला नाही

ते पाहून खरेच वाईट वाटले. प्यारे यांच्याशी बर्‍याच अंशी सहमत.

बॅटमॅन's picture

14 Jul 2013 - 12:38 am | बॅटमॅन

+११११११११११११.

पूर्ण सहमत.

तिमा's picture

14 Jul 2013 - 11:06 am | तिमा

वारी वरुन एवढं वॉर पेटेल असं वाटलं नव्हतं.
जगांत चालणार्‍या अनेक चांगल्या वाईट प्रथांवर सामान्य माणसाचे नियंत्रण कुठे असते ? तेंव्हा ज्याला त्याला आपापल्या मार्गाने जाऊ द्यावे. पटत नसेल तर आपण त्या जागी जाणे टाळावे. गेली काही वर्षे, हा विचार घेऊन वागल्यामुळे बरीच मनःशांती मिळाली आहे.
उत्सवातला आवाज आणि गोंगाट सहन करण्यासाठी विज्ञानाने मला इअर प्लग उपलब्ध करुन दिलेत. घाण वास सहन करण्यासाठी, विज्ञानाने मला सुगंध दिले आहेत. नको ते बघावे लागू नये म्हणून डोळे बंद करण्याची सुविधा जन्मजात मिळाली आहे. या देशाचे काय होणार, या चिंतेतून वाचवण्यासाठी मर्यादित आयुष्य मिळाले आहे. बास, आणखी काय पाहिजे ?

मालोजीराव's picture

17 Jul 2013 - 8:47 pm | मालोजीराव

विजुभाऊ तुमच्या धाग्याला माउली पालखी चे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी प्रतिसाद दिलेला दिसतोय…चांगला लेख आहे सकाळ ला आलेला :)

नव्या वारकऱयांनो, शिस्तीचा वसा घ्या

बॅटमॅन's picture

17 Jul 2013 - 8:55 pm | बॅटमॅन

लेख फारच उत्तम आहे! स्वतः पालखीप्रमुखाने बर्‍याच गोष्टी मोकळ्या मनाने कबूल केल्या आहेत हे सर्वांत जास्त आवडलं. आशा आहे काही प्रमाणात तरी यावर मार्ग निघेल.

विजुभाऊ's picture

17 Jul 2013 - 11:09 pm | विजुभाऊ

हा धागा आता वाचनमात्र करावा ही विनंती

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2013 - 12:21 am | प्रसाद गोडबोले

इतक्यात हा धागा वाचनमात्र करु नये अशी माझी संपादकांना नम्र विनंती आहे ...

कार्तिकी वारीच्या वेळी विजुभाउंनी वारीसुधारणेसाठी काय काम केले हे मला विचारायचे आहे ह्या धाग्यावर... म्हणुन कार्तीकी एकादशी पर्यंत हा धागा जिवंत ठेवावा ही अतिनम्र विनंती.

विजुभाऊ's picture

18 Jul 2013 - 3:09 am | विजुभाऊ

कार्तिकी वारीच्या वेळी विजुभाउंनी वारीसुधारणेसाठी काय काम केले हे मला विचारायचे आहे
हा हा हा. मी इकडे अफ्रीकेत. तुम्ही सौदीत.
बाय द वे . मला इकडे बरेच सावळे विठोबा भेटतात.

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2013 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले

आपल्यावर चिखलफेक करायचा कुठेच उद्देश नहीये.... नव्हता .

मी आधी आपल्या सारखाच होतो. आमच्या सज्जनगडावर सध्या जी "डेव्हलपमेन्ट" चाललीये त्याच्यावर कडाडुन टीका करायचो . जागोजाग भक्त निवास बांधुन ठेवलेत , सामान ने आण करणारी गाढवं घाण करतात सगळ्या गडावर ....शिवाय पोटभरु लोकांची गर्दी झालिये . सगळे भोजनबंधु गडावर येवुन राडा करतात... स्माधी मंदीरात एसी बसवलाय एकुणच सगळी अध्यात्मिकता घालवुन बाजारुपणा आनलाय वगैरे वगैरे ...

मग एके दिवशी घरातुन तंबी मिळाली " येवढं वाटतय तर गडावर जा ...सेवेकरी व्हा .. उत्स्ववकाळात तिथे जा समस्या समजुन घ्या मग बोला ... नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं नको"
मग एकदा उत्सवात गेलो ... जमेल तितकी सेवा केली ... आजुबाजुला पाहिल्यावर लक्षात आलं की ही लोकं आधीच प्रचंड काम करीत आहेत ... त्यांना नावे ठेवुन हतोशाहित करण्यात काहीच गम्य नाही .

आजपर्यंत वारीला गेलो नाहीये ...पण हा ठाम विश्वास आहे की ही माणसे आधीच प्रचंड कार्य करीत असली पाहिजेत ...त्यांना नावे ठेवुन वारी बंद करा म्हणुन काहीच उपयोग नाही .

आणि इथे येवुन अजुन एक शिकलो ... ह्या देशातही एक भव्य यात्रा होते जगभरातुन लोक येतात ... ह्या देषातल्या लोकांचीही गैरसोय होते , व्यवस्थेवर ताण पडतो पण म्हणुन यात्रा बंद करा असे म्हणणारा एकही जण अजुन तरी भेटला नाहीये मला . भेटेल अशी शक्यताही नाही .... खूप काही शिकण्या सारखं आहे ह्या लोकांकडुन आपल्याला .

आता एकदा वारीला जाऊनच येतो ...मगच बोलतो ह्या धाग्यावर ...तोवर राम राम !!

अवश्य जाऊन या वारिला आधी माझे सुद्धा आपल्या सारखेच विचार होते पण माझी आई निव्रुत्त झाल्यावर सलग १० वर्शे वारीला जात होती तेव्हा मी एकदा काही अन्तर चालत गेलो होतो आणि माझे सुद्धा आपल्या सार्खे मत परिवर्तन झाले.

स्पा's picture

18 Jul 2013 - 3:11 pm | स्पा

(फायनली )

अच्चा असं झालं तर सर्व