तंदुरी पॉंफ्रेट

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
5 Mar 2013 - 3:07 pm

खुप दिवसांत तंदुरी पॉंफ्रेट खाल्लेला नव्हता, आणि तंदुरी चिकनप्रमाणे सहजही न मिळणरा प्रकार म्हणून हा घाट.. सर्व मत्स्यप्रेमी खवैंयासाठी........

साहित्य -
२-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट)

मॅरिनेट १ साठी-

  • १ लिंबू
  • १ चमचा मीठ

मॅरिनेट २ साठी-

  • पाच-सहा चमचे घट्ट दही
  • २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
  • १ चमचा धणे पावडर
  • १ चमचा तंदुर मसाला
  • अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे ऑलिव्ह ऑईल

 

कृती -
पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा
पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल.

पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे.

दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.

मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे.

पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत.

ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.

गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

प्रतिक्रिया

शिद's picture

5 Mar 2013 - 3:15 pm | शिद

लाजवाब...आणखी शब्दचं नाहीत.

महीन्याअखेरी होळी येत आहे, तेव्हा हा प्रयोग करुन चाखण्यात येईल...पण ओवन न वापरता धगधगत्या कोळश्यावर.

मी_देव's picture

5 Mar 2013 - 3:26 pm | मी_देव

धन्यवाद..
नक्की करून बघा, आणि धगधगत्या कोळश्याची सर ओव्हनला कुठून येणार.. :)

त्रिवेणी's picture

5 Mar 2013 - 3:17 pm | त्रिवेणी

शेवटचे दोन फोटो एकदम तोपासु

नीलकांत's picture

5 Mar 2013 - 3:18 pm | नीलकांत

एकदम मस्त झालाय :)

वा... मेले मी.... अप्रतिम फोटो... का जळवताय???

अक्षया's picture

5 Mar 2013 - 5:04 pm | अक्षया

+ १

कातिल पाकृ आणि फोटो... शेवट्चा फोटो पाहुन,"दिल पाप्लेट, पाप्लेट हो गया!"... :D

ज्योति प्रकाश's picture

5 Mar 2013 - 3:32 pm | ज्योति प्रकाश

शेवटचे दोन फोटो बघुन डोळे धन्य झाले.तों.पा.सु.

भावना कल्लोळ's picture

5 Mar 2013 - 3:37 pm | भावना कल्लोळ

काय राव …. कायला असे करून राहिले तुमी , जीव घेताय का? तो पा सु ना

पैसा's picture

5 Mar 2013 - 3:37 pm | पैसा

कसले भारी फोटो आलेत!

तुमचा अभिषेक's picture

5 Mar 2013 - 3:49 pm | तुमचा अभिषेक

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.

रविवारी वाशीला एका कोकण मेळाव्यात हादडून आलोय, उद्या शेवटचा दिवस परत हादडायला आणि पार्सल घ्यायला जातोय. पापलेटच खाल्ले होते पण आकाराने आणखी मोठे असते तर आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटत होते तरी ती कसर या फोटोंनी भरून काढली. आता काय, वाट बघतो उद्याची.. :)

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.

एखाद्या सुंदरश्या ललनेच्या फोटोवरून नजर हटत नाही तसे ते शेवटचे दोन फोटो बघून झालेय.

एकदम खरं... भूक चाळवते असले फोटो बघितले की...

खादाड's picture

5 Mar 2013 - 3:49 pm | खादाड

शेवटचे दोन फोटो एकदम मस्त !!!

पियुशा's picture

5 Mar 2013 - 3:54 pm | पियुशा

पेहलेही बॉल पे सिक्सर !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2013 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा....!!! केवळ जब्रा फ्राय.

सानिका स्वप्निल, गंपा, तुम्ही आणि अजून चार पाच माष्टर लोकांची एक पाककृतीची स्पर्धा घ्या.
आणि मी एकटाच परिक्षक. :)

-दिलीप बिरुटे

एकच परीक्षक क्सा काय? सर्व स्पर्धांना आता तीन जजेस असतात. त्यामुळे मी दुसरा फिक्स. आता तिसरा नसला तरी माझा काही हट्टाग्रह नाही. तुम्ही "महाजज" व्हा हवं तर..

धागाकर्त्यासः वरचा "सा".. सांडाबबाडा परफॉर्मन्स. तोडलंत.. क्या बात.. क्या बात.. क्या बात...!!

इरसाल's picture

5 Mar 2013 - 5:34 pm | इरसाल

ऐवजी महाजन चालेल काय ?

सुहास झेले's picture

5 Mar 2013 - 5:35 pm | सुहास झेले

दोन अनुभवी जजेस असताना तिसरा कमी अनुभवी चालतो नं.. ;-)

जबरदस्त पाककृती आणि फटू :) :)

इरसाल's picture

5 Mar 2013 - 8:04 pm | इरसाल

जजेस च्या संख्यांवर काही बंधन नाहीये. आम्हीपण चालुन जावुसे वाटते.

बाकी पाकृ लै म्हन्जे लैच खत्रा हाये.जीभ नुसती पाणावली आहे.केव्हा खाईन केव्हा खाईन असे झालेय नुसते. आल्या आल्या पदार्पणातच डब्बल-टिब्बल शेंचुरी मारलीय देवाने.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2013 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी एकटाच परिक्षक राहणार आहे, कृपया कोणीही विनंत्या बिनंत्या करु नये. पाककृत्यांवर मी निर्णय घ्यायला समर्थ आहे. पाककृती सादर केल्यानंतर पाककृती आणि भांडे स्पर्धकांनी सोडून गेले पाहिजे ही अट राहीलच.

(मुंबैत या लोकांना बोलावून खर्रखर्र खादाडीचं नियोजन केलं पाहिजे)

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

5 Mar 2013 - 11:57 pm | मोदक

ब्वॉर.. ठीक आहे.

(आत्ता "हो" म्हणायला काय जाते आपले..? ;-))

दिपक.कुवेत's picture

5 Mar 2013 - 4:50 pm | दिपक.कुवेत

हे काय वाढलयं? नुसते फोटो पाहुनच जळजळ झाली. आता ईनो घ्यायलाच हवा.

स्मिता चौगुले's picture

5 Mar 2013 - 5:07 pm | स्मिता चौगुले

फोटोत ओवन ग्रिल वर ठवलेल्या पापलेट्ला जे मरिनेशन केले आहे ते इतके व्यवस्थित कसे? (एकदम प्लेन आणि घट्ट) मरिनेट करुन फ्रीज मधे ठेवल्याने तो घट्टपणा आला का?

मी_देव's picture

6 Mar 2013 - 8:26 am | मी_देव

मरिनेट करुन फ्रीज मध्ये ठेवल्याने थोडा घट्टपणा आला, त्यासाठीच १ तास फ्रीजमध्ये ठेवणे मस्ट!

चेतन माने's picture

5 Mar 2013 - 5:29 pm | चेतन माने

शेवटचे दोन फोटू किलर आहेत
तोंपासू
(च्यायला मंगळवारी वाचतोय )

कपिलमुनी's picture

5 Mar 2013 - 5:41 pm | कपिलमुनी

लैच भारी !!
अलिबागला 'फुलोरा' मधे खाल्ला होता ...अगदी तसाच आहे !!
तोंपासु !!

लक्ष्या's picture

5 Mar 2013 - 5:48 pm | लक्ष्या

माझि आवडती ङिश...

भटक्या..'s picture

5 Mar 2013 - 6:23 pm | भटक्या..

क्या बात..!!

प्रतिज्ञा's picture

5 Mar 2013 - 7:43 pm | प्रतिज्ञा

:)

ओन्ली द बेस्ट................. खलास आइटम

तिमा's picture

5 Mar 2013 - 8:12 pm | तिमा

अगदी नेत्रसुखद फोटो. चवही तशीच असणार!
एक प्रामाणिक शंका: असा सबंध पापलेट खाताना तो डोळाही खातात का हो? मी कायम पापलेटचे तुकडेच खाल्लेत म्हणून विचारलं.

मी_देव's picture

6 Mar 2013 - 8:28 am | मी_देव

धन्यवाद तिमाजी, हो सबंध पापलेट खाताना डोळाही खातो (निदान मी तरी!)

यशोधरा's picture

5 Mar 2013 - 8:16 pm | यशोधरा

आई ग्गं! भन्नाट!

निवेदिता-ताई's picture

5 Mar 2013 - 8:27 pm | निवेदिता-ताई

व्वा..............क्या बात है

सानिकास्वप्निल's picture

5 Mar 2013 - 8:43 pm | सानिकास्वप्निल

काय भन्नाट दिसत आहेत अहाहा... पापलेट म्हणजे जीवकीप्राण
जबरदस्त :)

लौंगी मिरची's picture

5 Mar 2013 - 10:14 pm | लौंगी मिरची

मस्त पाकक्रुती .

मला एका गोष्टीचं कौतुक वाटलं .. बोटांची नखं एकदम नखशिकांत कापलेली असल्यामुळे हात एकदम स्वच्छ दिसतायत देवाचे . इतक्या स्वच्छ हातांनी जे बनवाल ते भारी .
( बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि .)

स्पंदना's picture

6 Mar 2013 - 5:41 am | स्पंदना

अतिशय सहमत !

मी_देव's picture

6 Mar 2013 - 11:45 am | मी_देव

धन्यवाद लौंगी मिरची!!

बर्‍याच वेळा नखं ढीगभर वाढवुन अन्नपदार्थ बनवनार्‍यांच्या हातचं कितीहि सुंदर दिसलं तरी खावसं वाटत नाहि

:D १००% सहमत

मुक्त विहारि's picture

5 Mar 2013 - 10:24 pm | मुक्त विहारि

झक्कास

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2013 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

हे पॉंफ्रेट म्हणजे काय असते,ते बघायला धागा उघडला,तर समोर हा मत्स्यावतार!!! सर्व इतके भारी दिसते आहे,पण जळ्ळे मेले (तंदूर/ओव्हन मधे) तरी ते मासे(च) शेवटी...त्यामुळे आमच्या साठी वाइड बॉल..!!!
तरी पण एकंदर टापटीप/पद्धती/फोटूंमुळे कुणीतरी गंपाच्या जोडिचे अवतरले असे वाटायला लागलेय. :-)

अ वांतर---अता चोरून खाइन म्हणतो एकदा...!!! ;)

मी_देव's picture

6 Mar 2013 - 7:55 pm | मी_देव

चोरुन नको, विकत घेऊन खा! ;) :D

निमिष ध.'s picture

6 Mar 2013 - 1:42 am | निमिष ध.

या रविवारिच बन्ग सहकर्याच्य घरी यान्चा रस्सा खाल्ला. आता हे करुन पहय्लाच हवे.

स्पंदना's picture

6 Mar 2013 - 5:58 am | स्पंदना

हाय! हाय! इधरकु प्रॉमफ्रेट मिलता नय. अब क्या करेंगे?
देख देख के जान जायली हय. ये भगवान इसकु माफ कर, ये जानता नही ये क्या कर रहा है।

कच्ची कैरी's picture

6 Mar 2013 - 8:44 am | कच्ची कैरी

झकास !!! फोटो बघून पापलेट लगेच उचलून खावासा वाटतोय
http://mejwani.in/

मनुराणी's picture

6 Mar 2013 - 9:10 am | मनुराणी

अतिशय तोंपासु पाककृती आहे.देवदत्त साहेब, घरी कधी येऊ आपल्या?

शिल्पा ब's picture

6 Mar 2013 - 9:53 am | शिल्पा ब

नक्की करुन बघणार.

माशाचं तोंडसुद्धा खायचं असतं का? मी नेहमी तो तुकडा टाकुन देते.

हासिनी's picture

6 Mar 2013 - 10:48 am | हासिनी

अप्रतिम फोटो! मस्त पाकृ.करुन बघायलाच हवी!!
:)

जेनी...'s picture

7 Mar 2013 - 2:45 am | जेनी...

वॉव !

मिपावरची आत्तापर्यंतची जबरी सर्वात बेस्ट बेस्ट पाक्रु ....

फोटो तं क्या केहेने आलाय देवामामा एक्दम दिल्खुश ! :)

इरसाल's picture

8 Mar 2013 - 4:14 pm | इरसाल

पापलेटांनी नातं बदललं

मी_देव's picture

9 Mar 2013 - 2:35 pm | मी_देव

धन्यवाद मंडळी.. :)

ब़जरबट्टू's picture

31 May 2013 - 4:08 pm | ब़जरबट्टू

तोन्डाला पाणी म्हणून प्रॉमफ्रेट धागा वर ;)...

काय खल्ल्लास फटू राव !!!!

भटक्य आणि उनाड's picture

31 May 2013 - 8:35 pm | भटक्य आणि उनाड

अप्रतिम फोटो आलेत... जळ्वु नका हो...

गणपा's picture

12 Jun 2013 - 2:53 pm | गणपा

परत टोंपासू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2013 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त आवडले.

अनाम's picture

12 Jun 2013 - 4:14 pm | अनाम

भारीच दिसतय हे प्रकरण.