सुके मासे १) करंदी/सुकट्/अंबाड

जागु's picture
जागु in पाककृती
23 Nov 2012 - 11:29 pm

साहित्यः
करंदी १ ते २ वाटे
२ कांदे चिरुन
१ वांग्याच्या फोडी
२ छोट्या टोमॅटोच्या फोडी
२ मिरच्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ ते १ १/२ मसाला
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
चविनुसार मिठ
२ पळ्या तेल

पाककृती :
करंदीचे शेपुट डोक्याकडील टोकेरी भाग व मधले पाय काढून टाकावेत. डोके पूर्ण काढायचे नाही. त्याच भागाला जास्त चव असते.

भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर कांदा बदामी रंग येई पर्यंत तळून घ्या.

तळलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून परता. आता ह्या मसाल्यावर धुतलेली करंदी व वांगी घालून परतून घ्या.

जर रस्सा करायचा असेल तर गरजेपुरते पाणी घाला.

साधारण १०-१२ मिनीटांत करंदी शिजेल. मग त्यावर टोमॅटो, कोथिंबीर मिरच्या (मोडून), मिठ घाला.

रस्सा असणार्‍या करंदीला ढवळून एक उकळी येऊ द्या. सुके करायचे असेल तर एक वाफ आणा आणि गॅस बंद करा.

हे आहे करंदीचे कालवण (रस्सा)

अधिक टिपा:
१) करंदी म्हणजे छोटी कोलंबी सुकवलेली. सुके मासे खारट असतात त्यामुळे मिठ थोडे कमी प्रमाणात घालावे.
२) टोमॅटो ऐवजी चिंच, कोकम घालू शकता.
३) कोणत्याही सुक्या माश्यांमध्ये वांगे, शेवग्याच्या शेंगा चविष्ट लागतात. करंदीत बटाटाही घालता येतो.
४) करंदीचे सुके करताना सिमला मिरची घातल्यासही छान लागते.
५) मसाला असेल तर दिड चमचा तिखट असेल तर १ सपाट चमचा वापरावा.
६) सुक्या माश्यांमध्ये लसुण सहसा घालत नाहीत. पण मन साशंक असेल तर घालू शकता फोडणीला किंवा पेस्ट करुन.

प्रतिक्रिया

ह्म्म्म. आता यावर काय बोलू?
आजचं जेवणं गळ्याखाली उतरायचं नाही माझ्या.

यश पालकर's picture

23 Nov 2012 - 11:39 pm | यश पालकर

भारतात आलो कि नक्की बनवून बघेन :) इथे कॅनडामध्ये सुकी करंदी मिळणे जरा मुश्कील आहे :(

इरसाल's picture

24 Nov 2012 - 9:42 am | इरसाल

अंबाड सुकट कोरडी काय आणी थोड्या रश्शाबरोबर काय स्वर्गसुख ते दुसरे काय?
ह्यात इंच साइझचे कापलेले बटाटे टाकुन कोरडे करुन पहा एकदा

सोत्रि's picture

24 Nov 2012 - 12:23 pm | सोत्रि

ह्यात इंच साइझचे कापलेले बटाटे टाकुन कोरडे करुन पहा एकदा

आहाहा, काय आठवण करून दिलीत. उद्या सुकट आणि इंडीयन व्हिस्की मेनु लंचला :)

- (सुकट आवडणारा लठ्ठ) सोकाजी

खायला एकदम झ्यॉक लागते.साफ करायला खुप लहान असतात. आणि वेळ पण खुप लागत असेल नाही?

पप्पु अंकल's picture

24 Nov 2012 - 10:54 am | पप्पु अंकल

सुकट जाम आवडली.आता एकदा तेंडली ची अगदी खास तुझी अशी पाकृ येउदे
धन्यवाद

सुहास..'s picture

24 Nov 2012 - 11:09 am | सुहास..

_/\_

सुकेमासे प्रेमी

जागु's picture

24 Nov 2012 - 7:03 pm | जागु

गणपा, यश, सोत्री, इरसाल, सुहास धन्यवाद.

वेताळ सवय असल्यावर काही वाटत नाही.

पप्पु अंकल पुढची रेसिपी तेंडलीची.

संपत's picture

24 Nov 2012 - 9:02 pm | संपत

सुकटा सुकटा तुझा वास मोठा, तुझ्या वासाने घास जातो पटापटा..

ह्यालाच सोडे म्हणतात का ? की ते वेगळी असतात ?
मी खात नाही पण आज्जीला ही फक्कड रेसेपी करुन खाउ घालीन म्हणते

बालपण आठवले. लहान असताना याच्याशिवाय जेवायचो नाही आणि आता मत्स्याहार केव्हाच बंद केलेला आहे.

पियुशा सोडे वेगळे. सोडे म्हणजे सोललेली सुकी कोलंबी. वरील अंबाड ही सालासकट असते.

पिंगू प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

विशाखा राऊत's picture

26 Nov 2012 - 2:11 am | विशाखा राऊत

अगदी तोंडाला पाणी सुटले बघ बघुनच :)

शिद's picture

26 Nov 2012 - 9:03 pm | शिद

करंदीसोबत फक्त कांदा घालुन केलेले फ्राय देखील चखणा म्हणुन उत्तम लागते...शिवाय तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा अप्रतिम चव लागते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Nov 2012 - 3:41 am | निनाद मुक्काम प...

तोंडाला पाणी सुटले
मी येथे इंडियन दुकानात सुके मासे पहिले होते त्यात करंदी होती बहुदा ,परत एकदा पाहतो. असल्यास नक्की करणार..

ज्ञानराम's picture

28 Nov 2012 - 2:34 pm | ज्ञानराम

ह्यालाच सोडे म्हणतात का ? की ते वेगळी असतात ?>>>
नाही .. सोडे सुकवलेल्या कोलंबीला म्हणतात. सोड्यात सांडगे टा़कून मस्त भाझी होते..

पाक्रू मस्तच...