नमस्कार,
मिसळपावचे मालक गेल्या वर्षी डिसेंबरात ठाण्याला आले होते. त्यावेळच्या भेटीत बोलता बोलता सहज विषय निघाला म्हणून त्यांना विचारलं "एवढं मोठं मराठी संस्थळ आहे, मग आपण दिवाळी अंक का काढत नाही?" तेव्हा हसून त्यांनी उत्तर दिलं "ह्यावर्षी आपण नक्की प्रयत्न करू."
जवळ जवळ १०-११ महिन्यापुर्वी पाहिलेलं ते स्वप्न आज सत्यात उतरलेय. दिड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मिसळपावचा पिडीएफ स्वरूपातील पहिला-वाहिला दिवाळी अंक आपल्यासमोर ठेवण्यात आम्हाला अत्यानंद होतोय.
या अंकासाठी सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि मनापासून केलेले प्रयत्न याबद्दल गविंनी अंकाच्या संपादकीय विभागात इतक्या सुंदर शब्दात मांडलंय कि मी आणखी काही बोलण्याची आवश्यकता उरली नाहीये.
२४१ पानांचा हा भलामोठा दिवाळी अंक खरंतर एखाद्या छापील स्वरूपात येणार्या दिवाळी अंकाच्या तोडीचा झालाय. खरंतर याचे सगळे श्रेय मिपावर अतिव प्रेम करणार्या सर्व सभासादांना, ज्यांनी या लेखासाठी भरभरून लेखन पाठवलं. आम्ही सगळे निमित्तमात्र आहोत.
एका बाजूला वाचण्यासाठी मिपाचा दिवाळी अंक आणि दुसर्या बाजूला काठोकाठ भरलेलं दिवाळीच्या फराळाचं ताट! आहाहा!! एखाद्या अट्टल वाचनवेड्या मिपाकरासाठी यापेक्षा मोठं सुख ते काय. तेव्हा दिवाळीच्या फराळाची लज्जत मिपाच्या पहिल्या-वाहिल्या अंकासोबत आणखी द्विगुणीत करा.
शक्य होईल तितक्या वाचनवेड्या लोकांसमोर मिपाचा दिवाळी अंक पाठवण्याची जबाबदारी आता तुमची!
मिसळपावचा पिडीएफ स्वरूपातील अंक तुम्हाला इथून डाऊनलोड करता येईल.
-किसन शिंदे
प्रतिक्रिया
15 Nov 2012 - 2:20 pm | अभ्या..
अरे वा किसन्देवा, या धाग्याला प्रतिसादाची पण सोय केली का?
वा वा. आता इथल्या प्रतिक्रिया आपल्याला पुढच्या अंकासाठी उपयोगी पडतील ;)
वाचक, सदस्य आणि हितचिंतकांनो लक्ष द्या इकडे.