बटाटा-सफरचंद खिर

जागु's picture
जागु in पाककृती
30 Oct 2012 - 2:48 pm

साहित्यः
अर्धा वाटी तांदूळ
अर्धे सफरचंद
१ छोटा बटाटा
१ मोठी वाटी दुध
पाउण वाटी साखर
थोडे केसर
काजु, बदाम
२ चमचे साजूक तुप
१ छोटा पेला पाणी

कृती:
१) तांदुळ धुवुन ते भाजून घ्या व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर (कणी) दळा.
२) सफरचंद व बटाटा सोलुन किसुन घ्या.
३) काजू व बदामाचे काप करुन घ्या.

४) भांडे थोडे गरम करुन त्यात तुप घालुन लगेच वाटलेले तांदूळ परता.

५) त्यात १ पेला पाणी घाला व किसलेला बटाटा टाकुन तांदुळ व बटाटा शिजू द्या. ७-८ मिनिटांत शिजतात.

६) आता त्यात साखर, ड्रायफ्रुट्स घालुन उकळी आणा.

७) नंतर सफरचंदाचा किस घालुन चांगली उकळी येउ द्या.

८) मग सगळ्यात शेवटी दूध टाकुन उकळी आणा आणि त्यावर केसर घाला.

झाली झटपट सफरचंद, बटाटा खिर तय्यार.

अधिक टिपा:
तुम्हाला आवडतील ते इतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता.

साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता.

स्वादासाठी वेलची-जायफळ घालू शकता.

कधी कधी सफरचंद आंबट असतो म्हणून दुध घालायच्या आधी सफरचंदाचा किस घालून उकळी येउ द्यायची मग दुध घालायचे.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2012 - 2:52 pm | प्रभाकर पेठकर

झटपट आणि चविष्ट पाककृती. अभिनंदन.

मी_आहे_ना's picture

30 Oct 2012 - 2:57 pm | मी_आहे_ना

असेच म्हणतो

गणपा's picture

30 Oct 2012 - 2:55 pm | गणपा

भारीच आहे खिर.
वेल्कम बॅक २ किचन. :)

कल्पना वेगळी आहे. प्रयोगशील आहे. तरी एक विचार आला.

सफरचंदापर्यंत ओके, पण बटाटा वापरला तर पिठूळ नाही होणार? करुन पाहण्याआधीच शंकानिरसन केलेलं बरं. (... पिठूळ चव आवडणारेही बरेच असू शकतील म्हणा..!!)

बटाट्याचा गोड पदार्थ त्यामुळेच सहसा करत नाहीत का? रताळं थोडं गोड असूनही त्याच्यापासून केलेला गोड पदार्थ पिठूळपणामुळी खास लागत नाही, त्यापेक्षा तिखटमिठाचा खीस चांगला लागतो.

सूड's picture

30 Oct 2012 - 5:12 pm | सूड

सफरचंद ठीकै, बटाटा गोडात बरा लागेल का याबाबतीत जरा साशंकच आहे. एकदा चवीपुरती करुन बघायला हरकत नाही.

स्पंदना's picture

31 Oct 2012 - 6:11 am | स्पंदना

तर मग गवी मी सांगते ही पाकृ फक्त माझ्या आग्रहाखातर करुन पहा.
एक बटाटा, पाण्यात किसा (काळा पडु नये म्हणुन). जेव्हढा बटाट्याचा किस तेव्हढी साखर. दोन चमचे तूप. तूपावर किस टाकुन त्यात साखर मिसळा अन सुंदर चिकु रंगाचा होइतो एकसारखे मंद आचेवर हलवत रहा. टेस्ट इट अन देन टेल. बाहेरच्या व्यक्तीला न सांगता द्या. बिलिव्ह मी नोबडी विल गेस दॅट इट्स मेड ऑफ बटाटा.

गवि's picture

31 Oct 2012 - 7:38 am | गवि

करुन पाहतोच..

अत्रुप्त आत्मा's picture

30 Oct 2012 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा

नवं नवं काँबिनेशन लै लै झ्याक दिसतया........! :-)

इरसाल's picture

30 Oct 2012 - 4:56 pm | इरसाल

एक शंका
ते ठेवलेले केसर पाहुन मला आधी झुरळ वाटले

गवि, सूड खिर जास्त शिजावी लागत नाही त्यामुळे पिठूळ नाही होत. आणि जर बटाटा तुम्हाला नसेलच आवडत तर नाही टाकला तरी चालेल.

गणपा, प्रभाकर, मी आहे ना, अतृप्त आत्मा, इरसाल धन्यवाद.

मदनबाण's picture

30 Oct 2012 - 5:57 pm | मदनबाण

खिरीत बटाटा ? हे असं पहिल्यांच वाचलं!
बाकी काजु बदाम डिझाईन भारी दिसतय... :)

(शेवयाची खिर चापणारा) ;)

निवेदिता-ताई's picture

30 Oct 2012 - 6:11 pm | निवेदिता-ताई

मस्तच

फक्त तांदळाची, फक्त सफरचंदाची खीर असते पण ही बटाटा घातलेली वेगळी पाकृ आवडली.

जाई.'s picture

30 Oct 2012 - 9:20 pm | जाई.

मस्तच ग जागुतै

नवनिर्मीतीचा आनंद काही औरच!

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 6:19 am | श्रीरंग_जोशी

पाककृती आवडली. सादरीकरण अप्रतिम आहे.
एक प्रश्न - पहिल्या चित्रातील दूधाच्या वाटीच्या डाव्या बाजूला जे आहे ते काय आहे? माझा अंदाज - केसर.

इरसाल's picture

31 Oct 2012 - 9:52 am | इरसाल

प्रतिसाद पांढर्‍याचा काळा करुन पाहिला नाही काय?

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 9:55 am | श्रीरंग_जोशी

नेमका आता पाहिला.
त्या प्रश्नात अदृश्य करण्यासारखे काय होते?

कवितानागेश's picture

31 Oct 2012 - 11:54 am | कवितानागेश

खिरीत झुरळ पडू नये म्हणून. ;)

इरसाल's picture

31 Oct 2012 - 9:59 am | इरसाल

उगाच जागुतै दुखावली जायची म्हणुन

अनन्न्या's picture

31 Oct 2012 - 10:12 am | अनन्न्या

गोड खाणाय्रांसाठी पर्वणी आहे.

अनन्न्या's picture

31 Oct 2012 - 10:22 am | अनन्न्या

ह्या खिरीत जर साध्या तांदुळाऐवजी वरीचे तांदुळ मिक्सरला रवा करुन भाजून घातले तर उपास करणारे सुध्दा ताव मारतील.

अनन्या आयडीया चांगली आहे.

ते झुरळ नाही हो केसरच आहे.

सगळ्यांचे धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2012 - 9:44 pm | स्वाती दिनेश

मस्त आणि वेगळीच आहे ग खीर,
स्वाती

कच्ची कैरी's picture

1 Nov 2012 - 4:56 pm | कच्ची कैरी

बटाट्याचा शीरा बर्याच वेळा केला आहे पण खीर मात्र कधीही नाही !!सफरचंद आणि बटाटा नविन काँबिनेशन मिळाले ,नक्कीच रुचकर असणार खीर :)
http://mejwani.in/