व्हेज समर रोल्स

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
7 Sep 2012 - 1:13 am

.

साहित्यः
राईस पेपर / शीट्स
पातळ उभा चिरलेला कोबी
पातळ उभं चिरलेलं गाजर
पातळ उभी चिरलेली काकडी
थोडे मीठ घालून उकडवून घेतलेल्या न्युडल्स (तुम्ही राईस न्युडल्स, पास्ता , काही ही वापरु शकता)
१/२ टीस्पून पांढरी मिरपूड
१ टेस्पून टोमॅटो सॉस
स्वीट चिली सॉस सर्व्हींगसाठी

.

पाकृ:

प्रथम एका ताटात थोडे पाणी घेऊन राईस पेपर / शीट्स दोन्ही बाजूने १० सेकंद भिजवून घ्या.
भिजवलेली राईस पेपर / शीट्स एका कोरड्या ताटात किंवा चॉपींग बोर्डवर अलगदपणे ठेवा. (पाण्यात भिजवल्यामुळे नाजूकपणे हाताळावे)

.

.

त्यावर उकडलेल्या न्युडल्स , गाजर, कोबी व काकडी ठेवा.
थोडीशी पांढरी मिरपूड भुरभुरा व थोडासा टोमॅटो सॉस घाला. (जास्त सॉस घालू नका नाहीतर पेपर / शीट्स ओलसरपणामुळे फाटू शकतात)
अलगदपणे रोल गुंडाळायला सुरुवात करा, कडा दुमडा व पुन्हा रोल गुंडाळा.
असे सर्व रोल तयार करुन घ्या.

.

हे समर रोल्स तुम्ही स्वीट चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.

.

नोटः
ह्यात तुम्ही झुक्किनी, लेट्युस, मोडाचे मूग .इ. आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता.
ह्यात उकडलेल्या अंड्याचे स्लाईस ही घालू शकता.
तेल अजिबात नसल्यामुळे आणी फक्त सॅलॅड असल्यामुळे पौष्टीक आहे.
स्टार्टर / स्नॅक्स म्हणून सर्व्ह करु शकता.
हवे असल्यास ह्याच शीट्स वापरुन तुम्ही स्प्रींग रोल म्हणून तळू शकता.
आवडीप्रमाणे वेग-वेगळे सॉस वपरु शकता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

7 Sep 2012 - 6:41 am | स्पंदना

आहा! किती नाजुक दिसताहेत.
सुरेख!

+१..
याला पाकृ म्हणण्यापेक्षा कलाकृती म्हणणेच शोभेल...

फारच नाजूक आणि रंगीबेरंगी आहेत.
खाण्यापेक्षा बघत रहावेत असे!
सगळे फोटू सुंदर आलेत. (फोटूही अलगदपणे काढले असावेत असे वाटत आहे.)
पाकृ तशी सोपीही आहे.
तुझ्याकडे पाहुणे आल्यावर हा प्रकार करू नकोस.
खाण्याऐवजी बघत बसतील नुसते. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2012 - 8:11 am | अत्रुप्त आत्मा

लाजव्वाब दिख रहा है बाप.......!
क्या केहेने...! हाय हाय,हम फिदा हो गये।

प्रचेतस's picture

7 Sep 2012 - 8:33 am | प्रचेतस

काय खतरा झालीय पाकृ.

कच्ची कैरी's picture

7 Sep 2012 - 9:24 am | कच्ची कैरी

आजच मी व्हेज स्प्रिंग रोल बनवायचा विचार करत होते आणि लगेच तुझी एकदम झक्कास !! यम्मी !!! सुपरकूल !! रेसेपी मिळाली :) ह्याच नॉन -व्हेज व्हर्जन करुन बघेन :) धन्यवाद !

इरसाल's picture

7 Sep 2012 - 9:41 am | इरसाल

काय बरे प्रतिसाद द्यावा ?

बरं हे तांदळाचे पातळ कागद भारतात मिळतात काय? असल्यास कोणत्या अन्नसाखळीवाल्यांकडे ?

स्प्रिंगरोल सारखे मैद्याचे चालावेत असा माझा अंदाज.( किंवा मोमोजसाठी असतात तसे)

मी_आहे_ना's picture

7 Sep 2012 - 9:54 am | मी_आहे_ना

नेहमीप्रमाणेच जबरदस्त पेशकश... इथे भारतात उन्हाळ्यात नाही तरी १५ ऑगस्टला बनवायला हरकत नाही, मधे एखादं "ब्लॅक ऑलिव्ह" लावून :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2012 - 10:09 am | प्रभाकर पेठकर

व्वा....! पौष्टीक पाककृती बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

राईस पेपर शोधावा लागणार.

छानच दिसताहेत, शिवाय पौष्टीक !
ते कागदासहीत खायचे का?

हो, हीच शंका विचारायची आहे, सानिकातै.
कारण कागद काढला की खाणार कसं ?

ते तांदळाच्या पिठाचे पातळ आवरण आहे.

सानिकास्वप्निल's picture

7 Sep 2012 - 3:29 pm | सानिकास्वप्निल

तो कागद म्हणजे अगदीच कागद नाही ओ (एडिबल आहे तो )...तांदळाच्या पीठाचे पातळ आवरण आहे , पापडासारखे दिसते पण चवीला उकडीसारखे लागते. पाण्यात तो मऊ होण्यासाठीच भिजवायचा
तो राईस पेपर काढून खायचा नाही त्याच्यासकट खायचं

सानिकाताई, राईस शीट ही तांदूळ आणि साबुदाणा एकत्र करुन बनवता येते..

सानिकास्वप्निल's picture

24 Sep 2012 - 2:49 pm | सानिकास्वप्निल

खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल :)

हारुन शेख's picture

7 Sep 2012 - 11:10 am | हारुन शेख

लाजवाब ! तुमच्या स्वयंपाकघराला नक्कीच 'पंचतारांकित' दर्जा मिळालेला असणार.

५० फक्त's picture

7 Sep 2012 - 1:19 pm | ५० फक्त

तुम्हाला मिशिलिन स्टार म्हणायचं आहे का ?

हारुन शेख's picture

7 Sep 2012 - 6:27 pm | हारुन शेख

पण ते फक्त तीन पर्यंतच देतात. इथे पाचपेक्षा एकपण कमी नाही चालायचा. ☆☆☆☆☆

बाळ सप्रे's picture

7 Sep 2012 - 11:28 am | बाळ सप्रे

पुण्यात कर्वे रस्त्याजवळ एक "fine foods" नावाचे दुकान आहे जे फक्त आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे..
तिथे प्रयत्न करून बघतो हे तांदळाचे कागद मिळतात का..
बाकी पाकृ एकदम भारी..
या कागदात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरच काही गुंडाळता येईल :-)

वामन देशमुख's picture

7 Sep 2012 - 12:24 pm | वामन देशमुख

पाककृती, चित्रीकरण, सादरीकरण, इ. सर्वकाही नेहमीप्रमाणे अजोड आहे. कोणत्या शब्दांत वर्णन करू?
राइस पेपर सारख्या कागदांपासून(?) आंध्रात पुत्रेकुलू (पेपर स्वीट) नावाचा गोड पदार्थ बनवतात.

अवांतर: मला मैसूरपाकाची पाककृती हवीय. कुणी पाकृ/ दुवा देऊ शकेल काय?

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2012 - 1:46 pm | प्रभाकर पेठकर

मला मैसूरपाकाची पाककृती हवीय. कुणी पाकृ/ दुवा देऊ शकेल काय?

आंतरजालावर सर्व पाककृत्या मिळतात. गुगलून पाहा.

वामन देशमुख's picture

7 Sep 2012 - 1:53 pm | वामन देशमुख

गुगलून पाहा.

पाहिल्यात आणि खूपश्या मिळाल्यात सुद्धा. पण मिपावरच्या पाकृ करून पाहताना जो आत्मविश्वास वाटतो, तो वाटत नाहीय.

मिपावर यापूर्वी कुणी मैसुरपाकाची पाकृ मांडलीय का?

कवितानागेश's picture

7 Sep 2012 - 12:48 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर. :)

गणपा's picture

7 Sep 2012 - 12:54 pm | गणपा

भलतीच नाजुक कलाकृती.

मृत्युन्जय's picture

7 Sep 2012 - 2:31 pm | मृत्युन्जय

पाकृ नाजुक खरी आणी फटु सुद्धा लाजवाब. पण का ते महित नाही, ही पाकृ टेष्टी मात्र वाटत नाही. करुन किंवा विकत आणुन कधी खाईन असे वाटत नाही. प्रेझेंटेशन साठी मात्र १०० / १०० :)

सानिकास्वप्निल's picture

7 Sep 2012 - 3:31 pm | सानिकास्वप्निल

करुन बघीतल्याशिवाय किंवा खाऊन बघीतल्याशिवाय कसे कळणार टेष्टी आहे का ते :)
करुन बघा नाही आवडले तर राहिलं ...

धन्यवाद

स्वाती२'s picture

7 Sep 2012 - 6:04 pm | स्वाती२

देखणे दिसतायत रोल्स!

सूड's picture

7 Sep 2012 - 6:21 pm | सूड

बघत बसावं अशी पाकृ !!

अर्धवटराव's picture

7 Sep 2012 - 10:45 pm | अर्धवटराव

अजीबात मजा नाहि आला... पण याला कारण डवखुर्‍याची बिर्याणी रेसीपी आहे. ति बिर्याणी आडवा हात मारुन पोट फुटेस्तो खायचे मांडे मनात शिकत असताना हि नाजुक साजुक स्टार्टर पाकृ बघितली... बिर्याणीचा रसभंग झाला :(

अर्धवटराव

अर्ध्या तु वाईच उशिरा आलास लेका. आम्ही आधी सकाळी रोल्स हाणले आणि आता बिर्याणी.
दोघांचाही लुत्फ घेतला.
टीव टीव. ;)

अर्धवटराव's picture

7 Sep 2012 - 11:20 pm | अर्धवटराव

नाव सार्थक करायची एकही संधी सोडत नाहि मी :P

अर्धवटराव

पैसा's picture

7 Sep 2012 - 10:52 pm | पैसा

अतिशय देखणे रोल्स आहेत!

भाग्या's picture

13 Sep 2012 - 12:45 am | भाग्या

मस्तच.
मि पा वर प्रथमच लिहित आहे.

मदनबाण's picture

14 Sep 2012 - 6:54 pm | मदनबाण

मस्त ! :)

(चायनीज स्प्रींग रोल्स प्रेमी) :)

प्यारे१'s picture

14 Sep 2012 - 7:46 pm | प्यारे१

य भारी....!

वैदेही बेलवलकर's picture

26 Oct 2012 - 12:50 pm | वैदेही बेलवलकर

काही पाककृती लॉगिन केल्यावरही दिसत नाहीत याचे कारण काय असू शकते?