रूबिक्स क्यूब

लंबूटांग's picture
लंबूटांग in काथ्याकूट
25 Jun 2008 - 4:58 am
गाभा: 

कोणी solve केला आहे का? मी आत्ताच पूर्ण केला. Algorithm आणि video इथे आहे. कितीतरी वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिले तर video बघून पण गोंधळ घातला होता. पण आत्ताच solve केला.

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

25 Jun 2008 - 5:28 am | भाग्यश्री

सही.. सुटला हे भारी.. पण व्हिडीओ बघून का.. आपलं आपल्याला तो नाही का सोडवता येणार कधी!! मला बर्‍याचदा २ बाजू जमायच्या.. असो.. व्हीडीओ साठी धन्यवाद.. पुढे कधी लागला तर बघेन..

http://bhagyashreee.blogspot.com/

लंबूटांग's picture

25 Jun 2008 - 5:33 am | लंबूटांग

व्हिडीओ बघूनच..सोपा आहे एकदम..व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या स्टेप्स प्रमाणे केले तर खूप सोपे आहे..

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 9:41 am | भडकमकर मास्तर

मी दोन लेयरपर्यंत करतो नेहमी///
तो बॉटम लेयर करताना खूप मोठ्या स्टेप्स आहेत त्यांचा कंटाळा येतो म्हणून रहिलंय...
हा व्हिडीओ पाहतो सोपा आहे का ते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2008 - 11:26 am | बिपिन कार्यकर्ते

मी ३ बाजू करायचो, पूर्वी. आता बर्‍याच वर्षात हात नाही लावला. आता जमेल की नाही बघावं लागेल. व्हिडीओ बघतो. पण इतक्या वर्षांनी लहानपणची एक सुंदर जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन.

सुनील's picture

25 Jun 2008 - 11:56 am | सुनील

मी पूर्णपणे सोडवीत असे साधारणपणे ३०-४० सेकंदात. अजूनही थोड्या सवयीने जमेलसे वाटते. पार विस्मृतीत गेलेला रुबिक क्यूब पुन्हा आठवणीत आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद.

कार्यालयातील संगणकावर विडिओ दिसत नाही. माझी पद्धत अशी होती - प्रथम सर्व दुरंगी (मधल्या) आपपल्या जागी आणणे. नंतर तिरंगी (कडेच्या) योग्य जागी आणणे. एकेक बाजू किंवा लेयर करीत संपूर्ण क्यूब करणे अशक्य नसले तरी खूपच जिकिरीचे आहे.

(रुबिक क्यूब प्रेमी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लंबूटांग's picture

26 Jun 2008 - 4:44 am | लंबूटांग

लई भारी...पण मधले रंग तर हलतच नाहीत ना?

रामदास's picture

25 Jun 2008 - 12:14 pm | रामदास

तर पुढे काय?
न सुटण्यात जास्त मजा आहे.

सुनील's picture

25 Jun 2008 - 12:18 pm | सुनील

अहो, एकदा सोडवल्यानंतर त्यातून अनेक गमतीजमतीचे रंगसंगतीचे प्रकार करता येतात. उदा मध्यभागी पांढरा ठिपका आणि बाकी सर्व लाल इ.इ.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

25 Jun 2008 - 12:23 pm | रामदास

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी.
बाकी वेरीएशन नंतर असंच ना?
अवांतर-माझा पुतण्या हे वाचत तर नसेल ना.?

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 3:09 pm | भडकमकर मास्तर

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी.
बाकी वेरीएशन नंतर असंच ना?

=)) =)) =))
काय साहेब, आज एकदम हा डायलॉग??? :D :D

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

25 Jun 2008 - 7:33 pm | चतुरंग

मना सज्जना 'वेरिएशन कामा' न ये रे!! ;)

चतुरंग

रामदास's picture

25 Jun 2008 - 8:42 pm | रामदास

कार्लीन सिंड्रोम झाला आज सकाळपासून.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jun 2008 - 1:24 am | बिपिन कार्यकर्ते

साहेब, खतरनाक प्रतिसाद. मागे सांगितलं नव्हतं तुमची रेंज जबरदस्त आहे म्हणून?

बिपिन.

स्वप्निल..'s picture

26 Jun 2008 - 2:54 am | स्वप्निल..

हहपुवा.... =)) =))

जागेवरुन खाली पडलो राव !!!! एकदम सिक्सर................. =))

स्वप्निल....

मयुरयेलपले's picture

25 Jun 2008 - 8:51 pm | मयुरयेलपले

मी तर लहान मोठ्यांशि पेज लावयचो... खोलित जायचो आणि ते तोडून व्यवस्थित बसवून आनायचो ... टेंशन नाय घेतल कधि...

आपला मयुर

(स्वगत - चौथा रंग जमावा ही इच्छा अतृप्त राहिल्यामुळेच तर 'चतुरंग' हे नाव सुचले नसेल? ;))

चतुरंग