गृहमंत्री माझा लाडका

चेतन माने's picture
चेतन माने in काथ्याकूट
14 Aug 2012 - 5:28 pm
गाभा: 

गृहमंत्री माझा लाडका
हल्लीच मुंबईत झालेल्या हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर (भलतीच जागा आठवली!) काही उल्लेखनीय गोष्टींचा इथे उल्लेख करावा वाटतो. वारंवार "कडक कारवाई " मुळे टिकेच लक्ष ठरलेल्या गृहमंत्र्यांनी यावेळेस मात्र हा शब्द वापरणे टाळले त्यामुळे थोड्याफार टीका कमी झाल्यात. दुसरी उल्लेखनीय कामगिरी हि पोलिसांनी बजावली. संयम हा पोलिसांचा उगाचच जनतेने नाकारलेला गुण दिसून आला. पण संयम पाळल्यामुळे बऱ्याच पोलिसांना मार खावा लागला.
समाजातल्या काही लोकांनी या माराचा तीव्र निषेध केला- १)मावळ प्रांतात मेलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय, २)छोट्या मोठ्या कारणांसाठी रस्त्यावर उतरणारे आंदोलक, ३)जैतापूर, वसई इथली जनता तसेच राजकीय मंडळींपैकी आमदार हर्षवर्धन जाधव इ., पोलिसांचा संयम बघून या लोकांना अगदी गहिवरून आल्याच कळते. हा मोर्चा मात्र अन्न्यायाच्या विरोधात होता. अन्न्यायाला वाचा फोडता फोडता बऱ्याच गोष्टी फोडण्यात आल्या. तसेच महिला पोलिसांचा झालेला विनयभंग हा देखील यातलाच एक भाग होता. काही जण अन्न्यायाच्या विरोधात लोकलच्या टपावर चढले होते, तर काही जण सशस्त्र क्रांतीच्या निर्धाराने आले होते, काही जणांनी एकीचे बळ दाखवण्यासाठी १५-२० लोकांनी एक-एकट्या पोलिसांना घेरले. या लढ्यात दोन हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले (याची हुरहूर गृह्खात्यालाच जास्त लागलीये).
२६/११ दहशतवादी हल्ला, मुंबईत त्यानंतर सुद्धा झालेले ३ स्फोट , पुण्यात दोनदा झालेले स्फोट, तसेच नित्यनेमाने चालू असलेले दरोडे, खून, बलात्कार , चोऱ्या(पुतळ्यानपासून फायलीन्पर्यंत) अश्या यशस्वी कारकिर्दीचे खरे श्रेय हे गृहमंत्र्यांनाच जाते (कुणीतरी म्हणे त्यांना मोठेपणा आवडत नाही म्हणून ते हे श्रेय नाकारतात !!!). आणि शनिवारच्या प्रसंगानंतर गृह खात्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे .
टीप: "अरे पण त्यांनी dance बार बंदी आणली ते ह्यांना दिसत नाही " अश्या प्रकारच्या बचावात्मक प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. कदाचित मुंबईतून आम्हाला त्यांचे हेच गुण दिसतात, जवळच्या लोकांनी आणखी गुण सांगावे(प्रतिमा सुधारेल).
काही विरोधक मंडळी उगाचच नेहमी शुल्लक कारणांवरून गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात!(सालाबाद प्रमाणे यंदाही). कधी गृहमंत्री जातात कधी पुन्हा तेच परत येतात पण ह्या विरोधकांच आपले एकच ह्यःह !! अशा लाडक्या गृहमंत्र्यांची ही यशस्वी घोडदौड अशीच चालू राहो आणि महाराष्ट्र या क्षेत्रात सुद्धा(?) अग्रेसर होवो अशी आमची सदिच्छा .

ता. क. : नुकत्याच आलेल्या बातमी नुसार गृहमंत्री कुणाचतरी शेपूट पिरगळनार असल्याचे कळते(शोर्य!!)

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Aug 2012 - 7:10 pm | श्री गावसेना प्रमुख

Wednesday, March 28, 2012
नागपूर - गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून तेथे विकासाची क्रांती आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी केंद्र सरकारचेही वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. मात्र, विकासकामात माओवादी अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा न करता बंदुकीच्या गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल. समाजविघातक कृत्य व निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या माओवाद्यांसोबत सरकार चर्चेसाठी हात पुढे करणार नसल्याची भूमिका गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी आज (बुधवार) येथे मांडली.

पैसा's picture

14 Aug 2012 - 8:01 pm | पैसा

मिपावर स्वागत! पहिलाच लेख चांगला जमला आहे. तुम्ही नक्कीच चांगले लिहू शकता!

चेतन माने's picture

16 Aug 2012 - 10:25 am | चेतन माने

प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद!!
:)

yeda's picture

15 Aug 2012 - 12:50 am | yeda

पोलीसानो उठा, हातात शस्त्र घ्या आणि एकेकाला शोधून सर्व पब्लिकसमोर encounter करा, एकदा का मुंबई पोलिसांची दहशत त्यांच्या देशापर्यंत पोचली म्हणजे पुन्हा हातात काठी घ्यायला त्यांचे हात पाय थरथरतील.

त्या "दीड फुट्या" चा हुकुम तुम्हाला कधीच येणार नाही, तो तिकडे "साहेबाना" खुश करण्यात, त्यांची लाळ घोटण्यात गुंतला आहे. साहेब आणखी किती जमिनी शिल्लक आहेत हे बघण्यात गुंतले आहेत.

शेलार मामा मालुसरे's picture

15 Aug 2012 - 5:25 pm | शेलार मामा मालुसरे

त्यांचा वाढदिवस आहे , किती घोर अन्याय आहे हा स्वातंत्र्य दिवसावर !

चौकटराजा's picture

15 Aug 2012 - 5:47 pm | चौकटराजा

राबा म्हनजे फुसका बार ! याचा पुरावा म्हणजे नुसतेच ट्राफिक पोलिस संख्येला वाढवून ठेवलेत .खुल्ला
पावत्यांचा धंदा चालू आहे. रहदारीवर लक्श रामभरोसे ! वहातुक नियंत्रणात कोणालाच रस नाही. सगळे वन वे करण्याचे झाले की मग गप्पा छाटण्याखेरीज दुसरे कामच रहाणार नाही.