क्रौर्याची परिसीमाः

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
23 May 2012 - 12:59 pm
गाभा: 

क्रौर्याची परिसीमाः
बीडमधील डॉ. सुदाम आणि डॉ. सरस्‍वती मुंडे यांच्‍या रुग्‍णालयात गर्भपात करताना
एका महिलेचा मृत्‍यू झाल्‍यानंतर अनेक खळबळजनक प्रकार उघडकीस येत आहेत. डॉ.
मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग चिकित्सेसाठी तसेच मुलीचा गर्भ
पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून रिघ लागत होती. अर्भकाची
विल्हेवाट लावण्यासाठी या दाम्पत्याने चार कुत्रे पाळले होते. त्‍यांना हे
अर्भक खायला दिले जायचे, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
पूर्वी एके ठिकाणी वाचण्यात आले कि अश्या अर्भकांचे मास थायलंड व त्या बाजूच्या देशात औषधा साठी वापरण्यात येते.
पण हा वैदू भारीच निघाला आहे..
काय म्हणावे या नरा धमास?
पण याना काहीच शिक्षा होणार नाही का? ..
यांचे हॉस्पिटल बंद केले होते तरीही यांचा व्यवसाय चालूच कसा?
अन्ना म्हणत असलेले एक आवडते वाक्य टाकतो..
अरे क्या होगा इस देशका?

प्रतिक्रिया

यकु's picture

23 May 2012 - 1:39 pm | यकु

'अर्भकाला' (which is dead content already since it is cut off from its nutritional system, whether it should be kept there or cut off from nutritional system are all personal, as well as social, legal & moral issues.. leave alone them for a routine discussion as we do here always) त्यामुळं डॉक्टरनं स्वत: च त्याची व्यावसायिक शस्‍त्रे परजत, राक्षसी डॅन्स करीत त्याच्याकडे आलेल्या सगळ्या आयांच्या पोटातून जीवंत अर्भक बाहेर काढलं आणि लगेच ते *कुत्र्यांना खाऊ घातलं हे शक्य नाही, ते अर्भक त्याच्या पोषणसंस्‍थेपासून वेगळं करणारा तो डॉक्टर आहे, आणि रांगा लागतात याचा अर्थ या कौशल्यात तो निष्‍णात आहे...
उलट तिथे बाळं पाडायला येणार्‍या महामूर्ख* लोकांच्या क्रौर्यावर चार कुत्रे जगवले म्हणून डॉक्टरचे अभिनंदन !
*बाळ तयार होणारा content बाळ तयार होणार्‍या संस्थेत आधी घालायचा (people assume this सेक्स etc. very pleasurable act isn't it ?) आणि मग ते नको असलं की असले डॉक्‍टर लागणारच ! एकट्या डॉक्टरला क्रुर म्हणू नका, चार कुत्र्यांना जगवून त्यानं दया + स्वत:च्या धंद्यातून निघणार्‍या waste ची विल्हेवाट लावण्‍यात धूर्तताच दाखवलेली दिसते.

*अर्भक खायची सवय लागल्याने ती कुत्री राक्षसी बनली, मग ती हिंसक होऊन गर्भवती आया शोधत रस्तोरस्ती धिंगाणा घालू लागली वगैरे दाखवणारा एक मस्त सिनेमा बनवा, तिकिट भरुन लोक पहायला येतील याची गॅरंटी !

(क्रूर) यक्कु

कवटी's picture

23 May 2012 - 2:52 pm | कवटी

यकुशी सहमत....
त्या डॉक्टरने काय गर्भवती बायका पकडून आणून त्यांचे जबर्दस्ती गर्भ पाडून ते कुत्र्यांना खायला दिले का काय?
उगाच आपला लफड्यात सापडला की हाण डॉक्टरला.... तिथे रांगा लाउन गर्भ पाडून घेणारे उजळ माथ्याने फिरणार... खरे म्हण्जे त्याना हुडकून जबरदस्त शिक्षा केली पाहिजे.
काल ही बातमी बघीतल्यावर असाच विचार मनात आला की असल्या केस मधे लोक लगेच त्या डॉक्टरला शिव्या देउन, त्याच्या दवाखान्याची / घराची मोड्तोड करुन मोकळे होतात्...याच्या मागे डॉक्टरच्या व त्यांच्या आर्थीक परिस्थीती मधे असलेली दरी व त्यामुळे डॉक्टरविषयी वाटणारी असुया तर नाही ?

यकु's picture

23 May 2012 - 2:56 pm | यकु

आणि तो आमीर खान मुलगी जातीचे गर्भ पाडू नका म्हणून सिरीयल काढतोय तर त्याच्या मागच्या लफड्‍यांवरुन त्याला शिव्या घालणारे हे अविनाश कुलकर्णीच :p

कपिलमुनी's picture

23 May 2012 - 3:00 pm | कपिलमुनी

एक हे कुलकर्णी आणि एक ते कुलकर्णी ...
दोन कुलकर्ण्यांमध्ये कशाला पडायचा आपण ;)

;-)

एकूण सगळेच कुलकर्णी लोक 'आऊट' असतात असं म्हणा की !
मी पण कुलकर्णीच ;-)

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

कपिलमुनी's picture

23 May 2012 - 3:48 pm | कपिलमुनी

;)

यकु's picture

23 May 2012 - 3:51 pm | यकु

कल्याणमस्तु!
____/\____ ! कोपरापासून.
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

अविनाशकुलकर्णी's picture

23 May 2012 - 2:23 pm | अविनाशकुलकर्णी

यकु ...वर्षा देशपांड्याना भेटा..
त्या कुत्र्याची तपासणी करा असे मह्णत आहेत ..
हा वैदु कुत्र्याना खाऊ घालत असे अश्या बातम्या वाहिन्यावर झलकल्या आहेत.
ख.खो.दे.जा.

त्या कुत्र्यांची तपासणी करुन काय होणार आहे?
माणसं मांस खाऊन टाकतात त्यानंतर त्याचं काय होतं ते माहित नाही का ? त्या कुत्र्यांच्या पोटात पुरेशी विकसीत न झालेर्ली हाडंबिडं राहिली असतील तर तेवढी कदाचित तपासणीत मिळतील ब्वॉ.

बादवे, वर्षा देशपांडे कोण आहेत?

चिरोटा's picture

23 May 2012 - 2:36 pm | चिरोटा

http://in.linkedin.com/pub/dir/Varsha/Deshpande येथे २२ वर्षा देशपांडे आहेत. काही आय टीत्/काही एच आर वगैरे. दोन नंबरच्या वर्षा Law Enforcement मध्ये आहेत. बहुतेक त्याच.

>>हा वैदु कुत्र्याना खाऊ घालत असे अश्या बातम्या वाहिन्यावर झलकल्या आहेत.
-- आईये अब देखते है अजन्मे बच्चों को कुत्तों को खिलानेवाले वैदु के कुकर्म की दास्तान, ढ्‍यां.. ढ्यां.. मग त्या डॉक्टरच्या क्लिनीकचे काही शॉट.. यही वो जगह है जहां ये नराधम अजन्मे बच्चों को कुत्तों का खिलाने का कुकर्म करते थे.. ढ्यां... ढ्यां.. ढ्या.. कौन ये डॉक्टर? और क्यों करता था ऐसा जघन्य काम? वगैरे

हेच पाहिलंत का वाहिनीवर?
मायच्या वाहिन्या !

चिरोटा: थँक्स.

खूप वर्षांपूर्वी मी एका मैत्रिणीला विचारले होते "पूर्वी जे राक्षस वैगरे होते ते आता कोठे गेले" त्यावेळी तिने मला उत्तर दिले होते कि आजच्या जगात जे नराधम (आणि नारी - अधम पण म्हणूया) आहेत तेच राक्षस आहेत. अश्या बातम्या बघितल्या कि तिचे म्हणणे पटते.

असे कृत्य केल्यानंतर ह्यंच्या घश्यात घास कसा उतरतो आणि रात्री झोप तरी कशी लागू शकते अश्या लोकांना. बाकी स्त्रिया देखील काहीच कमी नाहीत किंबहूना ह्यांच्या बायकाच ह्यांना अशी फूस लावत असतील स्वताचे चोचले पुरवण्यासाठी. ह्यातर उघडकीस आलेल्या घटना. अश्या कितीतरी घटना राजरोस घडत असतील, कितीतरी निष्पाप बालकांना अत्याचाराना बळी पडावे लागत असेल आणि ज्यांना हे थांबवणे सहज शक्य आहे असे आपले राज्यकर्ते (शंढ राज्यकर्ते) डोळ्यावर पांघरून घेवून बसले आहेत. पोलिसांना तर अशी सावज मिळाले तर अत्यानंद होत असेल.

मी दोन दिवसांपूर्वी दापोलीला चालले असताना वाटेत ३ ठिकाणी गाडी थांबवावी लागली. (आम्ही भाड्याने बस केली होती) कारण हे पोलीस. checking च्या नावाखाली (अगदी परमीट असून व सर्व पेपर्स असून देखील) driverla तीनवेळा ५०/- द्यावे लागले. अगदी निर्लज्जपने दिवसाढवळ्या पैसे उकळत होते. Driver आम्हाला खाली उतरू देत नव्हता कारण त्याच्या वेळेची खोटी होईल म्हणून.

खरेच हा शंढ लोकांचाच देश आहे जेथे माणसाच्या जीवाला काहीही किमत नाही. कितीतरी माणसे हरवतात, कोठे जातात कोण जाणे कि त्यांना गायब केले जाते. किती भयानक आहे हे सर्व. देवच वाचवो ह्या देशाला.

बाकी ह्यांना काहीही शिक्षा होईल असे वाटत नाही. पुरावे मुद्दाम गोळा केले जाणार नाहीत, साक्षीदार फोडले जातील आणि आपले मानवताच्या नावाखाली गळा काढणारे तथाकथित ढोंगी लोक आहेतच त्यांची बाजू मांडायला आणि यकु लिहितात त्याप्रमाणे जणू काही सर्व विषय संपले आहेत म्हणून दोन चार item साँग घालून सिनेमा काढायला टपलेली आपली चित्रपट मंडळी आहेच कि स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी.

>>खरेच हा शंढ लोकांचाच देश आहे जेथे माणसाच्या जीवाला काहीही किमत नाही.

--- माणसाच्या जीवाला किंमत नाही हे ठीक, पण
षंढ? कैच्याकै !
एवढे गर्भ पडताना दिसूनही देशातल्या लोकांना षंढ म्हणणे म्हणजे भारीच!

प्रचेतस's picture

23 May 2012 - 3:25 pm | प्रचेतस

=)) =))

बास की आता.
गंभीर धाग्यावर अजून किती हसवाल?

विनायक प्रभू's picture

23 May 2012 - 3:12 pm | विनायक प्रभू

काय होणार या देशाचे?
वरील प्रतिक्रिया वाचल्यावर पाणावल्या डोळ्याने आलेला प्रतिसाद.

आई, बहीण, मैत्रीण, सहकारी, पत्नी अशा विविध नात्यातील स्त्री चालते आणि फक्त स्वतःची मुलगी म्हणून ती का नकोशी होते समजत नाही.
ज्या सासवा आपल्या सुनांना हे आघोरी कर्म करण्यास भाग पाडतात, त्यांना विचारायला पाहिजे कि तुमच्या आईने असाच विचार केला असता तर तुम्ही या जगात आला असता का?

ढब्बू पैसा's picture

23 May 2012 - 3:32 pm | ढब्बू पैसा

हा विषय सध्या घासून घासून गुळगुळीत झालेला असला तरी समाजातलं भीषण आणि क्रूर वास्तव नाकारता येत नाहीच ना!
दंगा घालायला बाकीचे धागे आहेतच की. ह्या विषयाचं गांभीर्य थोडं जपलं जावं इतकीच अपेक्षा.
असो! बाकी ह्याही प्रतिसादावर दंगा घातला जाऊ शकतोच :(

>>ह्या विषयाचं गांभीर्य थोडं जपलं जावं इतकीच अपेक्षा.

ते या धाग्यावर थोडंच जपता येणार आहे? :p
च्यामारी, गर्भपात जिकडे व्हायचे तिकडे होणार आणि 'या विषयावर या धाग्यावर गांभिर्य ' जपावं लागणार!
कमालै नै !

ढब्बू पैसा's picture

23 May 2012 - 3:45 pm | ढब्बू पैसा

धन्यवाद :)

कळ्ळं.. कळ्ळं.. :p
धन्यवाद तर धन्यवाद ! :p

५० फक्त's picture

23 May 2012 - 5:22 pm | ५० फक्त

+१०० टु ढब्बु पैसा, ज्यांना मुलं झाली आहेत, होणार आहेत किंवा ब-याच प्रयत्नांनी देखील दुर्देवानं होत नाहीत अशांना या विषयाचं गांभीर्य कळेल.

मध्ये एका प्रतिसादात वाचल्याप्रमाणे विनोद कुठल्याही प्रसंगातुन, गोष्टीतुन निर्माण करता येउ शकतो हे मान्य तरी देखील ज्या विषयावर आणि ज्या पद्धतीने विनोद करण्याचा प्रयत्न काही प्रतिसादांतुन होत आहे, त्यावरुन खरोखरच वाईट वाटते, अगदी मन सुन्न वगैरे झाली असली तरी.

बाकी श्री. यकु यांच्या सगळ्याच प्रतिसादांशी असहमत, नव्हे तर असे प्रतिसाद वाचुन त्यांच्या विनोदबुद्धीची किव वाटते आहे.

>>बाकी श्री. यकु यांच्या सगळ्याच प्रतिसादांशी असहमत, नव्हे तर असे प्रतिसाद वाचुन त्यांच्या विनोदबुद्धीची किव वाटते आहे.

-- माझ्या प्रतिसादांना विनोदी नजरेतून पाहिलेत त्याबद्दल मी तुमच्या बुद्धीची कीव करतो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2012 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाचा कै परिणाम दिसेना असं म्हणू का ?

अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी या दाम्पत्याने चार कुत्रे पाळले होते. त्‍यांना हे
अर्भक खायला दिले जायचे, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

काका, या माहितीचा दुवा मिळेल काय ?

-दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी's picture

23 May 2012 - 4:45 pm | अविनाशकुलकर्णी
अविनाशकुलकर्णी's picture

23 May 2012 - 6:45 pm | अविनाशकुलकर्णी

बीडचा डॉ. मुंडे फरार म्हणून घोषित

संशयित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीतील डॉ. सुदाम मुंडे आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. एव्हढंच नाही तर मुंडे दांपत्याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलंय.

मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मुंडे दाम्पंत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना फरार घोषित केलंय. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून मयत महिलेच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजकीय वरदहस्त असलेल्या सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमधील दुष्कृत्यांचा पर्दाफाश ‘झी 24 तास’नं केल्यानंतर, तो आता पुरता अडचणीत सापडला आहे.

आता सरकारनं मुंडेच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरु केलाय. मुंडे हॉस्पिटलला आरोग्य मंत्रालयाची नोटीस पाठवण्यात आली असून, मुंडे हॉस्पिटलच्या चौकशासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची चौकशी केली. या चौकशी अहवालात हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय. आता हॉस्पिटल सील करण्याबाबत आणि मुंडे याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उद्या (गुरूवारी) घेणार आहेत. तर डॉ. मुंडे याचा जामीन अर्ज रद्द व्हावा, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक गौरी राठोड यांनी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केलाय. त्यावर २५ मे रोजी निर्णय होणार आहे. या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या सर्व सोनोग्राफी सेंटरच्या तपासणीचे आदेश देण्यात आलेत. त्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय.

अर्धवटराव's picture

23 May 2012 - 9:47 pm | अर्धवटराव

यातही आता राजकारण होणार म्हणजे... तसे झालेच तर क्रौर्‍याच्या लीस्ट मध्ये डॉ., जन्मदाते आणि राजकारणी यांच्यापैकी कोण टॉप वर जाते हेच बघायचे उरले.

अर्धवटराव

यकु, एक विनंती.
तुमचे सर्व प्रतिसाद वाचले नाहीत, दोनच वाचले.
पोटात ढवळून आले.
कृपया इतके वाईट लिहू नका.
कुकर्म करणारे करतात.
त्या चर्चा वाचून मनावर जास्त अत्याचार होतात.
माझी एवढी विनंती ऐकाच!
मिपावर आल्याआल्या हा कोणता धागा म्हणून सहज उघडला आणि डोळ्याचं पाणी थांबत नाहीये.

यकु's picture

23 May 2012 - 7:22 pm | यकु

माझ्‍या वकील मित्राच्या डॉक्टर असलेल्या बायकोचा गर्भ कुठल्यातरी मूर्खाने 'मुलगी आहे' असं सांगितल्यानं त्यांनी अबॉर्ट केला, आणि अबॉर्ट झाल्यानंतर तो मुलगा आहे हे कळलं तेव्हा मी पण काहीही अर्थाअर्थी संबंध नसताना पंधरा मिनिटे रडलो होतो.
सो, क्राइंग इज गुड, डोळे स्वच्छ होतात !

मनीषा's picture

23 May 2012 - 8:55 pm | मनीषा

.... but reason is more important.

अबॉर्ट झालेला गर्भ मुलगा आहे म्हणून तुम्ही रडलात? , कि एका निष्पाप जीवाचा जन्माला येण्यापूर्वीच खून झाला म्हणून रडलात ?

अस्वस्थामा's picture

23 May 2012 - 9:53 pm | अस्वस्थामा

यक्कू, इथून पुढे तुमच्या प्रतिसादांना तळटीपा जोडत जा.. म्हणजे हे असे प्रश्न नाही विचारले जाणार..
(स्माईली टाळतोय.. विषयाचे गांभीर्य राखायला वरती कोणीतरी सांगितले आहे..)

यकु's picture

24 May 2012 - 3:22 pm | यकु

पण तळटिप टाकायची म्हटलं तर प्रतिसादात वापरलेल्या प्रत्येक शब्दासाठी तो कोणत्या अर्थानं वापरलाय हे सांगण्यासाठी, आणि तळटिपेतले शब्द कोणत्या अर्थानं वापरलेत हे सांगण्‍यासाठी पुन्हा तळटिपेला उप-तळटिप आणि मग उप-तळटिपेवर आणि उप-उप-तळटिप - खलास ! ;-)

@ मनिषा: मला फक्त तो abortion चा सगळा किस्सा स्टार्ट टू एंड ऐकून रडू आलं होतं.
आणि मी इथे तो पूर्ण लिहिला नाही, वर रेवतीताईंना त्या दोन ओळीत दिलेल्या प्रतिसादात सांगितलेल्या किश्श्यात आणखी मजेदार गोष्‍टी आहेत.

जो बाप आहे त्या किश्श्यातला - तो व्यवसायानं वकील, कोट्यधीश. माझा बॉस-कम-मित्र. त्याची बायको पेशानं बीएएमएस डॉक्टर. त्या दोघांचं लव्ह मॅरेज, आणि बाईनं तर सगळं आयुष्यच मनोमन आमच्या बॉसच्या नावे करुन दिलेलं. कारण आमचा बॉस त्याच्या कॉलेजजीवनात स्कूटरमध्‍ये रॉकेल टाकून हिंडायचा, तेव्हा या मुलीची जी कॅन्सरग्रस्त आई होती तिनं हा आमचा बॉस परिस्‍थितीनं एक गरीब मुलगा असतानाही तिच्या लाडक्या मुलीसाठी (नंतरच्या आमच्या मॅडम) हा होनहार मुलगा जावई ठरवला, कारण त्या कॅन्सरग्रस्त बाईनं या आमच्या बॉसमधली चमक ओळखली होती, आणि आज ना उद्या हा काही करुन दाखवणारच असा विश्वास तिला होता, मग आमचा बॉस त्यांना आई म्हणणारच. तर पुढे आमच्या बॉसनं वकिलीत एक बडा हात मारला, आणि अगदी दोनच वर्षाच्या काळात कोट्यधीश झाला. प्रचंड पेपरबाजी, हाणामार्‍या, पोलीस, बदनाम्या वगैरे सगळं त्यात आहे. पण त्याचा वेगळा किस्सा आहे. असो.

तर आता श्रीमंती आल्यानंतर हो-ना करीत कसंतरी या दोघांनी एकदाचं लग्न केलंच. एकदाचं अशासाठी की या श्रीमंत झालेल्या मुलासाठी अनेक चांगली स्‍थळं येत होती म्हणून त्याच्या घरच्यांचा या दोघांच्या लग्नासाठी विरोध होता, कारण त्याला आधीपासूनच साथीदार मानून बसलेल्या आमच्या मॅडमची कॅन्सरग्रस्त आई आता निघून गेली होती, आणि त्यांचं एकूण कुटुंबच कोसळलं होतं, कारण तिच्या वडीलांना नोकरी वगैरे असूनही त्या बाईंच्या कॅन्सरचा इलाज, विकत घेतलेल्या घराचं डोक्यावर कर्ज होतं. तर ही असल्या घरातली मुलगी करायची म्हटलं तर तिच्या घरंच स्वत:च्या हिंमतीवर श्रीमंती मिळवलेल्या मुलाला निस्तरावं लागणार हे ओघानं आलंच, म्हणून बॉसचे आईवडील या मुलीवर खार खाऊन असायचे. पण त्या दोघांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं.

तर पुढे त्यांना एक मुलगी. आधीची मुलगी असताना त्यांनी दुसर्‍यांदा चान्स घेतला, आणि यावेळी मुलगी नकोच असं ठरवलं आणि तंथे होऊन कितीतरी आधीच इकडेतिकडे गर्भलिंग तपासण्‍या करत हिंडू लागले. आता आमच्या मॅडम स्वत: बीएएमएस डॉक्टर असूनही स्वत:च्या गर्भलिंग तपासण्‍या का करतात तर श्रीमंत माणसाच्या बायकोला पोटी 'मुलगाच' हवा असतो. याची आणखीही वेगळीही कारणं आहेत, पण फार अवांतर होईल म्हणून सांगत नाही.

तर त्यांचा जो नेहमीचा फॅमिली डॉक्टर होता त्याने सांगितलं की यावेळीही मुलगीच आहे.
आम्ही ज्या कॉलनीत रहायचो (मी त्यांच्याकडचा जॉब सोडून येण्यापूर्वी त्यांच्याकडेच रहायचो ) त्याच कॉलनीत अगदी त्या घराच्या शेजारीच जिल्हा शल्यचिकित्सक पदावरचे आमच्या सरांचे मित्र रहायचे, रहातात. त्यांच्याकडूनही सरांनी मॅडमच्या तपासण्‍या करवून घेतल्या, 'मुलगी आहे' असं सांगणारे आधीच्या डॉक्टरांचे रिपोर्टही त्यांना दाखवले, आणि abortion चा विचारही बोलून दाखवला. तेव्हा या त्यांच्या जिल्हा शल्यचिकित्सक मित्राने त्याचं मत देताना सांगितलं 'ही जर मुलगी असेल तर मी माझी प्रॅक्टीस सोडून देईन! तेव्हा abortion वगैरेचा वेडेपणा करु नका.'
पण या दोघांनी ऐकलं नाही आणि निमशहरी भागात रहाणारा नात्यातलाच एक डॉक्‍टर पकडून भाषा केली आणि काम उरकलं आणि तेव्हा त्यांना कळलं की मुलगाच होता , तेव्हा जोड्यानं मार खाल्ल्यासारखा चेहरा घेऊन परत आले.

याच्यात्याच्या दिसेल त्याच्या गळ्यात पडून रडायला लागले, दारु प्यायला लागले (म्हणजे आधीही प्यायचेच, पण आता आणखी जास्त प्यायला लागले). या सगळ्या गोष्‍टी मला डिट्‍टेलवार माहित असायचं कारण म्हणजे मी स्वभावानं फकीर आहे हे त्यांना माहित होतं, आणि त्याकाळी रजनीशांचं साहित्य वाचत असल्याने मी त्यांना काही गोष्‍टी सांगायचो तेव्हा ते या टेन्शनमध्‍ये माझ्यासोबत गप्पा मारताना फार खुलायचे. मी त्यांच्याकडचा जॉब सोडून आल्यानंतरही ते मला फोन करुन बोलावून घ्‍यायचे आणि रात्र रात्र आमच्या गप्पा चालायच्या.

अशात ते कसे आहेत मला माहित नाही.

धन्यवाद ! सविस्तर खुलाशाबद्दल ...

नगरीनिरंजन's picture

23 May 2012 - 7:52 pm | नगरीनिरंजन

विचारात पडलोय.
ज्यांनी या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून घेतले त्यांना ही बातमी वाचून काय वाटत असेल?
काहीही वाटले नसल्याची दाट शक्यता आहे. आणि आपण समजतो की टीव्हीवर कार्यक्रम पाहून लोक बदलतील.
आणि मृतगर्भ कुत्र्यांना खाऊ घातला हे क्रौर्य वाटत असेल तर पोटातून गर्भ नष्ट करून कसा काढतात हे कळल्यावर त्याला काय म्हणणार?
असो.
एकंदर परिस्थिती पाहता मुलाला वा मुलीला जन्म देणे हेच क्रौर्य आहे असे मी म्हणेन.

दादा कोंडके's picture

23 May 2012 - 10:16 pm | दादा कोंडके

एकंदर परिस्थिती पाहता मुलाला वा मुलीला जन्म देणे हेच क्रौर्य आहे असे मी म्हणेन.

सहमत.

म्हणूनच योग्यवेळी भारत सोडून गेलेली लोकं हुशार आहेत.

वरती यकुनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टर फक्त एका हिमनगाचं टोक आहे. त्याखाली असंख्य क्रूर लोकं उभी आहेत. त्या डॉक्टरचे तर ती बाळं कुणीच नव्हती, सक्खे आईबापच एखादं झुरळ मारावं तसं मुलींना मारून टाकतात म्हणल्यावर काय करणार? :(

एकुणच सत्यमेव जयते मधल्यासुद्धा ह्या समस्या बघताना असं वाटतंय की हे फक्त परिणाम आहेत. एका विशिष्ठ समस्येतल्या पिडीतांचे आकडे वाढले की त्यांचे "सामाजिक प्रश्न" होतात. पण खरं कारण खूप वेगळं आहे असं वाटतय.
ही शोषीत लोकं प्रत्येक लिंगाची, वयाची, आर्थिक स्तरातली आहेत. त्यामुळे कडक कायदे वगैरे करून फक्त तात्पुरती मलमपट्टी होइल. एक 'माणसाने' दुसर्‍याला 'माणसाला', 'माणूस' म्हणून वागवण्यासाठी खूप काहितरी मुळातून बदल होणं अपेक्षीत आहे. काय ते कळत नाहिये... :(

अर्धवटराव's picture

23 May 2012 - 9:44 pm | अर्धवटराव

ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने मानवी जीवनाचे... आणि केवळ मानवी जीवनाचे का? एकंदरच जीवनाला पोषक अश्या प्रत्येक गोष्टीचे अवमुल्यन होते आहे... ते बघुन यापेक्षा वाईट गोष्टी पुढे बघाव्या लागणार कि काय असं वाटतय :(

मध्यंतरी ढकल पत्रांतुन अश्या अनेक "परिसीमीच्या" गोष्टी वाचनात आल्या होत्या...
१) दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जर्मनीमध्ये लोकांवर राशनींगमुळे उपासमारीची वेळ आली होती... तेंव्हा तिथे मनुष्य भक्षण करणार्‍यांना "खाद्य" पुरवायला एक साखळीच तयार झाली होती
२) तान्ह्याबाळाचे शरीर पोखरुन त्यातुन मादक पदार्थांची तस्करी करणारी टोळी विमान प्रवासात पकडली गेली होती
असे अनेक किस्से होते...
मिपाकर मुतालीकांच्या कुठल्याश्या धाग्यात एका बापाने आपल्या तान्ह्या मुलीला एका लिंगपिसाटाला विकले असे काहिसे वाचल्याचे आठवते...

या "परिसीमेला" अंत नाहि हेच खरे :(

अर्धवटराव

आशु जोग's picture

23 May 2012 - 11:54 pm | आशु जोग

या मुंड्यांचे ते मुंडे कोण
--
येथे सारे अपराध पोटात घेतले जातात

शिल्पा ब's picture

23 May 2012 - 11:46 pm | शिल्पा ब

खरे क्रुर लोकं ते की जे आपल्या पोटातच असलेल्या बाळाला केवळ नको असलेले लिंग आहे म्हणुन मारुन टाकायचा विचार सुद्धा करतात..

आता हा किंवा असे डॉक्टरलोकं हे धंदाच उघडुन बसलेत कारण लोकं त्यांच्याकडे येत आहेत. एकट्या डॉक्टरलाच काय दोषी धरणार? आधी स्वतः त्याच्याकडे मुलं पाडायला रांगा लावायच्या अन मग त्याने अमकं केलं ढमकं केलं म्हणुन गळे काढायचे हा दुटप्पीपणा कशाला?

अस्वस्थामा's picture

24 May 2012 - 5:07 am | अस्वस्थामा

शक्य असेल तर कोणी सांगावे..
साधारणपणे, जिथे गर्भपात होतो तिथे डॉक्टर काय करतात त्या गर्भाचे ? म्हणजे विधिवत अंत्यसंस्कार की त्या आई वडिलांच्या ताब्यात देतात आणि मग ते ठरवतील ??
गर्भपात बेकायदा असेल तर काय ? आणि कायदेशीर परंतु अगदी पहिल्या काही महिन्यातला असेल तर काय ?

(बाकी विधिवत अंत्यसंस्कार म्हटल्यावर कोणते विधी लागू होतील असा ही प्रश्न येतोय पण तो तूर्तास अति अवांतर..)

प्रदीप's picture

24 May 2012 - 11:30 am | प्रदीप

गर्भचिकित्सा करून, त्यानंतर जरूरीप्रमाणे गर्भपात घडवून त्या गर्भाची कुत्र्यांच्या सहाय्याने विल्हेवाट लावणे क्रूर खरेच. पण अनेक दशकांपूर्वी (बहुधा स्वातंत्र्याच्या आगेमागे) कोकणी ब्राम्हण घरांतून नको असलेल्या संततीचे, ती सुखरूप जन्मल्यानंतर काय केले जाई, ह्याची थोडी माहिती 'केतकरवहिनी' ह्या उमा कुलकर्णी ह्यांनी लिहीलेल्या चरित्रात दिली आहे.

ह्या केतकरवहिनी कोकणांतील एका ब्राम्हण घरातील कर्त्रूत्वान स्त्री होत. नवर्‍याच्या खुनानंतर त्यांनी आजूबाजूच्या समाजाशी जो वैयक्तिक लढा दिला तो त्यांच्या खंबीरपणाचे दर्शन घडवतो. चरित्रात एके ठिकाणी, त्यांच्या विस्तारीत केतकर कुटुंबातील लांबच्या नात्यातल्या बजूबाई नावाच्या 'सोवळ्या' बाई होत्या, त्यांचा उल्लेख आहे. ह्या बालविधवा होत्या. केतकरवहिनी सांगतात की ह्या बाई अत्यंत हळव्या होत्या. साध्यासुध्या घटनेंत, गोष्टी ऐकतांना वगैरे त्यांचे डोळे सहज भरून येत. हे असे का, ह्याचा केतकरवहिनींनी शोध घेतला तेव्हा त्यांची दुर्दैवी कहाणी ध्यानात आली. त्यांच्या 'न कळत्या' वयात त्यांचा नवरा गेला होता. त्याचा चेहराही त्यांना आठवत नव्हता. बजूबाई तत्कालिन प्रथेप्रमाणे सोवळ्या केल्या गेल्या, व सासरी हालाचे, उपेक्षेचे जिणे त्या जगू लागल्या. नंतर त्यांना दिवस राहिले. सासरच्यांनी अनेक गावठी इलाज करून गर्भपात करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो चिवट गर्भ तग धरून राहिला. दिवस भरले, कळा येऊ लागल्या, सुईण बोलावण्यात आली. सुईणीने तिच्या पद्धतिने अट घातली, 'हे पाप कुणाचं आहे, ते सांगितलस तरच सुटका करीन!' नाईलाजाने बजूबाईंना सासर्‍यांचं नाव सांगाव लागलं. मग सुटका झाली, मुलगा झाला व तो रडला देखील! त्यानंतर बाळाला बाजल्याच्या खुराखाली ठेऊन बाळंतिणीला त्या बाजल्यावर बसायला भाग पाडले गेले. हे 'अशा परिस्थितीत नेहमी जे केले जाते, तेच केले गेले' ह्या नोंदीसकट लिहीले गेले आहे.

तर मग ही त्या क्रौर्याच्या परिसीमेपलिकडील परिसीमा म्हणायची का?

प्रचेतस's picture

24 May 2012 - 12:12 pm | प्रचेतस

भयाण आहे.

अमृत's picture

24 May 2012 - 12:23 pm | अमृत

वाचतानाच अंगावर काटा आला.

अमृत

बिपिन कार्यकर्ते's picture

24 May 2012 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते

संपूर्ण धागा वाचला. क्रौर्याची परिसीमा आहेच. हे प्रकार नवीन नाहीत... मात्र हे प्रकार बंद झाले नाहीयेत हा, एक समाज म्हणून आपल्यावर असलेला डाग!

बाकी या धाग्यावरील काही प्रतिसाद आधी उपरोधाने लिहिलेले वाटले. मात्र नंतर उपप्रतिसाद वाचताना कळेचना काही. या सारख्या धाग्यावरही दंगा हा अतिशय चुकीचा वाटला. त्याबद्द्ल नाराजी नोंदवतो.

गणामास्तर's picture

24 May 2012 - 7:06 pm | गणामास्तर

बिकांशी सहमत.

>>या सारख्या धाग्यावरही दंगा हा अतिशय चुकीचा वाटला. त्याबद्द्ल नाराजी नोंदवतो.
--- संबंधित प्रतिसादांत काय म्हटलं गेलंय आणि का म्हटलं गेलंय ते नीट न समजून घेताच त्याला 'दंगा' म्हटल्याबद्दल तुमचा निषेध! समाज म्हणून आपल्यावर डाग असलेल्या धाग्यावर एवढ्या उशीरा, सगळ्यांनी चर्चा करुन झाल्यांनतर आल्याबद्दल आणि त्यातही नाराज झाल्याबद्दल आम्हीही आमची नाराजी नोंदवतो.