गोडाचा सांजा

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
9 May 2012 - 5:41 pm

.

साहित्यः

१ वाटी लापशी रवा (दलिया )
१ वाटी चिरलेला गुळ (साधारण एवढा लागतो, तरी आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
१ वाटी दूध
१ वाटी पाणी
१/२ वाटी खवलेला ओला नारळ ( आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
२-३ टेस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून वेलचीपूड
काजु, बदामाचे काप, बेदाणे

.

पाकृ:

प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून लापशी रवा मंद आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्या.

.

दुसर्‍या भांड्यात दूध व पाणी एकत्र करुन त्यात परतलेला रवा घालून प्रेशर कुकर ला ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्या.

.

कढईत शिजवलेला लापशी रवा व गुळ एकत्र करा व मंद आचेवर गुळ विरघळेपर्यंत परतून घ्या.

.

आता त्यात सुका-मेवा व ओला नारळ घालून सगळे एकत्र करा. सतत परता कारण गुळामुळे सांजा लागू शकतो.

.

वेलचीपूड घाला आणी एकत्र करा. आवडत असल्यास वरुन साजूक तूप सोडा.

.

गरमा-गरम गोडाचा सांजा खायला सुरु करा :)

.

गुळामुळे सांजा खमंग लागतो .

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

9 May 2012 - 5:47 pm | धनुअमिता

मस्तच
वाचनखुण साठवलेली आहे

पदार्थ एकदम अनोखा नसला तरी प्रेझेंटेशन खास आहे.

पाहूनच तो मटकवण्याची जबर इच्छा होते आहे. साधारण नारळीभाताची आठवण होते आहे.

गोडात शिरा / सांजा ... तिखटात उपमा / तिखटसांजा या प्रकारांत काही फरक आहे की समानार्थीच आहेत?

पैसा's picture

9 May 2012 - 6:19 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/20573

उपमा/उप्पीट्/सांजा याबद्दल बरीच चर्चा झाली होती.

प्यारे१'s picture

9 May 2012 - 6:11 pm | प्यारे१

परत परत काय प्रतिक्रिया टंकाव्यात माणसानं????

दिसायला छान आहेच्च. प्रश्नच नाही. प्रेझेन्टेशनला फुल्ल मार्क्स.

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2012 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

नेहेमीचा प्रतिसाद दिला आहे असे समजावे...

सुहास झेले's picture

9 May 2012 - 6:17 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो.... :) :)

पैसा's picture

9 May 2012 - 6:20 pm | पैसा

मस्त खमंग पदार्थ. पण रवा कुकरात का घालावा लागतो? कढईला तळाला जरासा लागलेला आणखीच खमंग लागतो.

सानिकास्वप्निल's picture

9 May 2012 - 9:15 pm | सानिकास्वप्निल

रवा कुकरला लावण्याचा एकच हेतु की तो पटकन शिजतो :)
तसे काहीजणं परतलेल्या रव्यात उकळते दूध+पाणी घालून , वाफेवर ही शिजवतात.
मला कुकरला लावणे जास्त सोयीचे वाटते इतकच :)

कढईला तळाला जरासा लागलेला आणखीच खमंग लागतो.
बरोबर आहे पण कधी-कधी तो लागल्यामुळे खमंगपणापे़क्षा कडवट चव येते ती नाही आवडत :(

कवितानागेश's picture

10 May 2012 - 11:40 am | कवितानागेश

कुकरमध्येच शिजवलेला बरा.
बाहेर परतुन शिजवताना एखाद्यावेळेस चिकट पण होउ शकतो. :(
हा जितके पाणी घालू तितका फुलतो.

स्मिता.'s picture

9 May 2012 - 6:23 pm | स्मिता.

गोड सांजा आणि शिरा यात फरक असतो का? मला नेहमीच्या रव्याचा शिरा आवडतो, जाड रव्याचा सांजा आवडेल की नाही माहिती नाही, एकदा करून बघेन. प्रेझेंटेशन अ‍ॅज युज्वल मस्त!

इरसाल's picture

9 May 2012 - 6:28 pm | इरसाल

काही काळ तरी काळ्या पाण्याच्या कोठडीत धाडावे अशी इच्छा होत आहे.
काय छळ लावलाय ?

नको.

काळं पाणी घालून काहीतरी प्रेझेन्टेबल करत बसतील.

'इथं' शोधणार कुठं तसलं? :)

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2012 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

RIP

जरा बरे शब्द तोंडातून काढायला काय घ्याल?

सानिके, असा सांजा मी प्रथमच पाहतिये. अर्थात आवडला. गव्हाच्या खिरीची आठवण झाली.
मी रव्याचा सांजा (साखरेऐवजी गूळ घालून) अधून मधून करत असते. तुझी पाकृ पाहिल्याबरोबर लगेच तो केला आणि मुलाच्या डब्यात दिला. :)

सानिकास्वप्निल's picture

9 May 2012 - 9:18 pm | सानिकास्वप्निल

धन्यवाद गं
मला लापशी रव्याचे तिखट -गोड असे सगळेच पदार्थ आवडतात.
गोडाचा सांजा जरा जास्तचं :)
आता तू बनवलास तर तुला आवडला का?? खीर तर छानचं होते बरी आठवण करून दिलीस लवकरच बनवेन :)

प्रचेतस's picture

9 May 2012 - 10:01 pm | प्रचेतस

हॅट्स ऑफ.

शुचि's picture

9 May 2012 - 10:12 pm | शुचि

मस्त मस्त मस्त!!!! गपागप गिळावासा वाटतोय.

अमृत's picture

10 May 2012 - 9:31 am | अमृत

अमृत

लापशी रवा म्हणजे केशरी रवाच ना? (केशरी रव्याची खीर करताना वापरतात तो?)

शिल्पा ब's picture

10 May 2012 - 10:33 am | शिल्पा ब

छान आहे. दलिया आणुन ठेवलाय पण त्याचं काय करायचं असतं हेच माहीती नव्हतं. आता हा शिरा करुन बघते. जरा तिखट मिठाचं काही होतं का या दलियाचं? असेल तर पाकृ टाकाच.

जरा तिखट मिठाचं काही होतं का या दलियाचं?

हो.. अगदी टेसदार दलिया बनतो तिखटमिठाचा. साधारण खिचडीसारखा. प्रेशर पॅनमधे. एक्झॅक्ट कृती माहीत नाही पण साधारण मुगाच्या / तुरीच्या खिचडीसारखीच असावी. फक्त डाळ-तांदळा ऐवजी दलिया.

मटार-टॉमॅटो आणि अन्य आवडत्या भाज्या घालून बनवला तर एकदम होलसम आणि वन डिश मील..

पैसा's picture

10 May 2012 - 12:09 pm | पैसा

तिखट मिठाचा सांजा पण होतो ना! साधी हिंग मोहरी हळद घालून फोडणी करायची, कांदा आणि मिरच्या चिरून फोडणीत टाकायच्या. रवा घालून भाजायचा. मग पाणी घालून शिजवायचं आणि लिंबू, मीठ, कोथिंबीर, खोबरं घालायचं. की झाला तिखटमिठाचा सांजा.

हा तुम्ही म्हणताय तो रव्याचा हळदयुक्त उपम्यासारखा खरपूस प्रकार वेगळा आणि मी वर म्हटलेला वेगळा.

रव्याहून बराच जाड दलिया (गव्हाच्या लापशीसारखा आणि गव्हाच्याच रंगाचा.. जो सानिकास्वप्नील यांच्या पाकृमधे दिलेल्या फोटोत आहे तोच.) आणि त्याचा कुकरमधे शिजवून खिचडीसारखा करतात. नाश्त्याला डब्यात आठवड्यात एकदा तरी असतोच. घरला विचारुन सांगतो.

पण मला खात्रीच आहे.. खिचडी / मसालेभाताप्रमाणेच फक्त भाताऐवजी लापशीचा जाडा ब्राऊन रवा वापरुन. यात मटार , टॉमॅटो वगैरेही असतात.

पैसा's picture

10 May 2012 - 12:26 pm | पैसा

फक्त तुम्ही लिहिलय त्याला दलिया खिचडी म्हणतात. आंणि मी लिहिलंय तो जाड्या लापशी रव्याचा मराठी पारंपरिक प्रकार आहे. लापशी रवा मिळाला नाही तर बारीक रव्याचा सांजा करतात, पण प्रेफरेबल जाडा रवाच.

शिल्पातै, या दलियाला कोरडे भाजून ठेवा. जरा जास्त तेलाच्या फोडणीत मिरच्या, आलं, कढीपत्ता, उडदाची आणि हरभर्‍याची चमचाभर डाळ घालून आवडतील त्या सगळ्या भाज्या घालाव्यात. कांदा, ग्रीन बिन्स, मटार, मका, गाजर, फ्लॉवर इ. परतून आधणाचं पाणी घालून त्यात ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू, मीठ, साखर,साजुक तूप चमचाभर आणि भाजलेला रवा वैरावा. नेहमीच्या रव्याला दुप्पट पाणी लागते तर याला तिप्पट. मंद आचेवर शिजवावा. बरोबर टोम्याटोचं सार केलं तर पोटभरीचं पौष्टीक जेवण होतं. सार नाही केलं तर न्याहरी म्हणून बेष्ट.

शिल्पा ब's picture

11 May 2012 - 10:59 am | शिल्पा ब

बेस्ट. तुमची अन गविंची पाकृ पण करुन बघते.

हा पहा, मी म्हणत असलेला गरमागरम दलिया (पैसाताईंनी म्हटल्याप्रमाणे दलिया खिचडी). आज ब्रेकफास्टला डब्यात दिसला म्हणून फटू काढत आहे.

आमच्या लहानपणी शिरा नव्हता सांजाच असायचा (गोडाचा).पण तो करपलेलाच खमंग लागतो.

पियुशा's picture

10 May 2012 - 2:57 pm | पियुशा

ह्याला लापशी म्हणतात आमच्याइकडे .
भंडारा /जागरण गोंधळ असेल किंवा मंदिरात प्रसाद म्हणुण हमखास हा प्रकार असतो सोबत भात अन कढी मस्त लागते :)
ह्यात नारळाच्या किसाऐवजी खोब्र्याचे काप घालुन करतात ते शिजलेले गोड काप .मनुके,काजु ,मस्त लागतात अगदी .

स्वातीविशु's picture

10 May 2012 - 4:36 pm | स्वातीविशु

गव्हाची लापशी. तों. पा. सु. :p

प्रास's picture

10 May 2012 - 8:28 pm | प्रास

सुंदर, अतोनात सुंदर......

निवेदिता-ताई's picture

11 May 2012 - 9:44 am | निवेदिता-ताई

मस्तच -- लहानपणची आठवण झाली, माझी आई असाच खपली गव्हाचा रवा काढून मग बनवायची,
खमंग लागायचा....

दिपक's picture

11 May 2012 - 10:26 am | दिपक

अरे माझं ताट कुठय ?
हा मिळालं

:-)

आर्या१२३'s picture

12 May 2012 - 10:16 am | आर्या१२३

वॉव्...एकदम तोंपासु!! :)