शेअर बाजार हा जुगार आहे कि पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग

निश's picture
निश in काथ्याकूट
9 Mar 2012 - 2:57 pm
गाभा: 

खर म्हंजे आपण जे म्हणतो कि शेअर बाजार हा जुगार आहे हे कितपत खर आहे?
कारण शेअर बाजारातिल काहि कंपन्या ह्या खरच खुप चांगले परतावा देतात आपल्या गुंतवणु़कीवर असा अनुभव आहे.
कित्येक कंपन्या ह्या अतिशय चांगला परतावा सतत देतात. चांगल्या कंपनी कशा निवडाव्यात ह्या बद्दल काहि नियम आहेत का असल्यास ते कोणते ?

जुगार जर आहे अस मानल तर सरकार ह्यावर बंदि का घालत नाहि उलट शेअर बाजारात अजुन गुंतवणुक का करायला प्रोत्साहन देत आहे लोकाना ?

शेअर बाजारातून आम जनतेचा खरच फायदा होतो का ?

कारण बहुतेक जण बाजारात तेजि असताना खरेदी करतात व बाजारात मंदी आलि कि नुकसान सोसतात म्हणुन तो जुगार आहे का ?

प्रतिक्रिया

जुगारासारखे खेळण्याचा वाव असलेला पैसे कमवायचा उत्तम मार्ग.

आपण जुगार समजून टिप मिळाली की घे भराभर आणि रुपया चढला की वीक भराभर अशा स्ट्रॅटेजीने "खेळलो" तर थेट जुगारासारखा काहीवेळा नशा देणारा पण अल्टिमेटली खड्ड्यात नेणारा आउटपुट ... उलट चांगले शेअर्स नियमित घेऊन दीर्घकाळ (खरोखरच दीर्घकाळ) स्वतःकडे संयमाने ठेवणे अशा मार्गाने गेलात तर परताव्याचा उत्तम मार्ग.

ही आपली मला या प्रकरणाच्या वापरातून झालेली ढोबळ माहिती. कदाचित त्या विषयाचा रोजचा अभ्यास असणार्‍या एखाद्याच्या बाबतीत "सेफ" जुगारही खेळता येत असेल तर माहिती नाही.

बारीक तपशील आणि त्या विषयात एकदम घुसून खाचाखोचा समजावण्यासाठी रामदासकाका आणि अन्य तज्ञ इथे आपल्याला काय ते सांगतीलच..

मृत्युन्जय's picture

10 Mar 2012 - 11:05 am | मृत्युन्जय

हॅ हॅ हॅ. मी ५ वर्षापुर्वी एका सेन्सेक्स ३० कंपनीचे शेयर्स विकत घेतले होते. मोठी नावाजलेली कंपनी. ६० शेयर्स मध्ये आजघडीला ४२००० रुपयांचा लॉस आहे. ही लाँग टर्म इन्व्हेंस्टमेंट नव्हे काय?

शेयर बाजाराची बरीच पथ्ये आहेत. ती पाळुन पैसा कमावणारे खुप खुप कमी लोक मला माहिती आहेत. जे आहेत ते याच व्यवसायात आहेत. सामान्य माणुस बहुतेकवेळा घाटाखात्यातच असतो.

गोंधळी's picture

12 Mar 2012 - 11:50 am | गोंधळी

जसे मोठे मासे छो ट्या मासे खातात
शेअर बाजारात तसेच अस्ते.

ask २ Jhujhunwala and Damani.

निश's picture

9 Mar 2012 - 3:21 pm | निश

गवि साहेब धन्यवाद.
तसा मि शेअर बाजारात नविनच आहे.
आपण दिलेल्या माहिति बद्दल धन्यवाद.

तुम्ही इंवेसटर की ट्रेडर ?

ट्रेडिंग हा थोडया फार-प्रमाणात जुगार म्हणता येईल जसा कोणताही व्यापार असतो.
नफा नुकसानाची शक्यते वर व्यापार की जुगार ते ठरते. ( ५०-५० % असेल तर तो जुगारच )

व्य.नि. केलात तर अधिक माहिती देण्यात येईल.

साहेब,मि इन्वेस्टर आहे.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 8:03 pm | चौकटराजा

आणि मी शेअरबाजाराचा फक्त " इनिसपेक्टर " आहे .सध्या सम्द बंद !

तर्री's picture

9 Mar 2012 - 3:32 pm | तर्री

साहेब, मग तो जुगार नाही. बक्कळ पैसे कमवायचा राज मार्ग आहे तो.
स्टॉप लॉस लावून , थोडे नुकसान सोसण्यची मानसिकता नसेल तर मग कठीण आहे.

होत काय कि आपण काहि नविन गुंतवणुकिच्या मार्गावर जायच म्हटल कि तो मार्ग चुकिचा कसा आहे हेच पहिले सांगुन आपला उत्साह घालवतात आपलेच मित्र. म्हणुन हा प्रश्न विचारायचा प्रपंच.

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 11:51 pm | सोत्रि

होत काय कि आपण काहि नविन गुंतवणुकिच्या मार्गावर जायच म्हटल कि तो मार्ग चुकिचा कसा आहे हेच पहिले सांगुन आपला उत्साह घालवतात आपलेच मित्र.

'ऐकिव माहितीच्या आधारे किंवा लोकं करतात म्हणून आपण करूयात' असला प्रकार असेल तर उत्साह जाणारच. पण तेच जर व्यवस्थित अभ्यास करून त्यातल्या खाचाखोचा समजून घेऊन केले तर आपला उत्साह तर जाणार नाहीच उलट मित्रांना आपण उस्ताहित करू शकतो.

आता तुम्ही जर 'इंव्हेस्टर' आहात असे म्हणता आहात तर जगं जे शेअर मार्केटला जुगार म्हणते ते ट्रेडींग करनारे ट्रेडर्स असतात. तिकडे लक्ष देऊ नका.

१. आधि ह्या विषयातला अभ्यास वाढवा
२. इथे बर्‍याचजणांनी म्हटल्याप्रमाणे तज्ञ लोकांशी चर्चा करा (माझ्याशी नव्हे ;) )
३. कंपन्यांच्या 'बॅलन्स शीट' मध्ये काय आणि कसे वाचायचे हे शिकून घ्या
४. वसंतराव पटवर्धन ह्यांचे जुने लेख मिळवून वाचून काढा. सध्या ते सकाळ मध्ये पोसि-व्ह्यु मध्ये लिहीतात
५. मॉक पोर्ट्फोलिओ बनवून पैसे न गुंतवता शेअर्स सिलेक्ट करून तुमच्या अभ्यासाचा पडताळा घ्या
६. टीप्स मिळाल्या की त्या कचर्‍याच्या डब्यात टाकून द्या. तो जुगार असतो आणि तुम्ही इंव्हेस्टर आहात
७. सर्वात महत्वाचे "दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ" हा मंत्र गाठीशी बांधून ठेवा.

बास तुर्तास एवढेच...

- (इंव्हेस्टर) सोकाजी

सोत्रि साहेब,खरच धन्यवाद,
तुमचे सर्व मुद्दे पटले.
आज मी शेअर बाजाराच्या नोट्स आणल्या आहेत.
वसंतराव पटवर्धन ह्यांचे लेख ह्याकरिता मित्राला सांगितले आहे. तो देतो म्हणाला.

खरच धन्यवाद

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 10:43 am | विश्वनाथ मेहेंदळे

माझे आणि सोत्री यांचे या विषयावर जवळजवळ एकमत आहे (हे पुन्हा एकदा लक्षात आले ;-) )

सोत्री, तुमचा सल्ला जनरल सल्ला म्हणून अत्यंत अचूक आहे. पण सदर प्रश्नकर्त्याला जोखीम पत्करायची इच्छा नाही. त्यामुळे मी म्हणेन की त्यांनी शेअर्सच्या भानगडीत पडू नये*. फार तर म्युच्युअल फंड चा मार्ग पत्करावा. तो ही शक्यतो SIP आणि फक्त आणि फक्त डायव्हर्सी फाईड फंडच.

* किंवा जोखीम पत्करायची तयारी ठेवावी आणि मग पडावे.

बाळ सप्रे's picture

9 Mar 2012 - 3:36 pm | बाळ सप्रे

हा पैसे कमावण्याचा मार्ग नाही. पैसे गुन्तवण्याचा/ वाढवण्याचा मार्ग आहे.
गुन्तवण्यासाठी मूळ मुद्दल तुम्हाला कमवायलाच लागते.. :-)

राहीला मुद्दा मार्ग "उत्तम" आहे की नाही?? ..
हा मार्ग High risk-High return/loss असा आहे.. तुम्हाला रिस्क घेणे परवडत असेल .. आवडत असेल तर तुमच्यासाठी "उत्तम" आहे.. कमी रिस्क परवडणार्‍यांनी हातचे राखूनच पैसे इथे गुंतवावेत..

टेक्निकली जुगार नाही .. परन्तु Impacting parameters इतके असतात की सर्वांचा अभ्यास करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे एखाद्याला अशक्य असते.. त्यामुळे तसा हा जुगारच..

गुंतवणु़कितुन मला कमि परतावा मिळाला तरि चालेल पण High risk-High return/loss नको.

बाळ सप्रे's picture

9 Mar 2012 - 3:51 pm | बाळ सप्रे

Low risk low returns हवे असल्यास FD/ Bonds मध्ये गुंतवा..
Med risk - Mutual funds/ ULIP etc

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2012 - 7:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग शेअर बाजाराची पायरी पण चढू नका. योग्य प्रकारे आणि योग्य कालावधी ठेवला तर शेअर बाजारात हमखास नफा होतो हे पण सिद्ध करता येते, पण तुमचे रिस्क अपेटाईट फार नसेल तर त्या विधानाकडे पण दुर्लक्ष करा.

पैसे PPF मध्ये टाका. ८-८.५ % हमखास मिळतील.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 6:49 pm | चौकटराजा

मी तरी अजून एकूण लॉस मधे गेलेलो नाही पण शेअरमधे थांबलेलो आहे.
मी एक नंबरच्या लॉटरीत दोन माहिने सलग अभ्यास करून फायदा कमावला. तोट्यात नाही गेलो. पण तिथेही वेळेवर थांबलो. लोभी नसाल
तरच शेअर बाजाराची पायरी चढा.
अन परमेश्वर लाखातून एक निरर्लोभी माणूस निर्माण करतो ही त्याची चाल आहे हे लक्षात ठेवा !

मन१'s picture

9 Mar 2012 - 9:23 pm | मन१

खुद्द जुगार हाच एक पैसे (आनि इतरही गोष्टी) कमवायचा एक भन्नाट मार्ग आहे हे आपले पूर्वज दुर्योधन धृतराष्ट्र चंद्रवंशी ह्यांनी सोदारहण सिद्ध केलेलेच आहे.
म्हणूनच शेअर बाजार हा जुगार आहे कि पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग
ह्याला असू शकणारे उत्तर म्हणजे
शेअर बाजार हा जुगार असला तरीही पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग आहे
किंवा
शेअर बाजार हा जुगार आहे म्हणूनच पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग आहे

असे असेल. ;)

रामदाससाहेब हे याबाबतीत सांगू शकतील.

रघु सावंत's picture

9 Mar 2012 - 11:18 pm | रघु सावंत

मराठी माणसाची मानसीकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या बाजाराकडे सगळे पैसा कमवायचा एक उत्तम मार्ग. शेअर बाजारातिल काहि कंपन्या ह्या खरच खुप चांगले परतावा देतात
हे खरच आहे कारण आजच रामदास सरांबरोबर या विषयी बोलणं झालं

रघू सावंत

तर्री's picture

10 Mar 2012 - 11:44 am | तर्री

वेळ न घालवता "गोल्ड बी" मध्ये इन्वेस्ट करा. मी ही अती सुलभ सोने खरेदी मानतो. रू१९०००/ १०ग्रॅम पासून मित्रमंडळी ना खरेदीचा सल्ला दिला होता. आज भाव रू २६०००+ आहे. तो रू २५००० पर्यंत आला की जमेल तेवढा माल घ्यावा. १ गोल्ड बी ची किंमत रू २६५० पकडा. वर्षा ला १२ चा ( किंवा पटित )प्लान ठेवाच.
१-२ ग्रॅम घेत रहा. अहो २०००/५००० रू हल्ली कसेही संपतात. ते सोन्यात बदलवत रहा.
सोने खरेदीमुळे पोर्ट्फोलिओ ला रॉक सॉलिड सपोर्ट मिळतो कारण सोन्यात धोका जवळ जवळ नाहीच.

ह्या सोन्यातून होणारा नफा ईक्विटी मध्ये गुंतवत रहा. हे अति-शिस्त व संयमाचे काम आहे. सोने खरेदी सारखे सरधोपट नाही. ईक्विटी मार्केट करता वसंतराव / रामराव वाचा.हरकत नाही. पण स्वताला घडवत रहा. वसंतराव / रामरावांचे सल्ले हे काही "गृहितकांवर" आधारित असतात. ती गृहितके चुकली की होणारा मस्तकशूल अ-वर्णनियच.

ईक्विटी मार्केट मध्ये चांगल्या कंपन्या शोधण्यात लोक डोळ्याची दुर्बिण करतात. २ वर्षांनी हे होईल , ते होईल. हे सगळे खरे असले तरी कंपनी पेक्षा कंपनीत शिरण्याची वेळ महत्वाची. एल. अँड टी ही एक ब्लु चिप कंपनी. ५ महिन्या पूर्वी १७०० भाव होता. आता १२५० +/- आहे. ज्यांनी माल १५०० + ला ऊठवलाय त्याचे हात पोळले आहेत. तीच एल. अँड टी डिसेंबर ला मी रू ११०० ( सरासरी) ने खरेदी केली आहे.

नव्या संधी शोधत रहा. नफा खात रहाणे व कंपन्या बदलत रहाणे अती गरजेचे असते. बायको च्या प्रेमात पडणे ठीक , कंपनी च्या प्रेमात पडू नये. ईन्फी असली तरी.

एकदा इक्विटी मार्केट जमले की "ट्रेडींग" ची जोखीम पत्करा. एफ अँड ओ मध्येच करा पण ते काम जो़खमीचे आहे. ईक्विटी मध्ये शॉर्ट टर्म ट्रेडींग करा. कसे ते सांगतो.

गेल्या ६ महिन्यातील आकडेवारी :-
भारती एअर - टेल : रेंज ३२०-४००
ल्युपीन : रेंज ४५० - ५००
रिलायंस :रेंज ७५० -८५०
आपण अश्या २/३ कंपन्या अभ्यासा. खाली खरेदी करा व वर विका. असे १० /१२ ट्रेड झाले कि मग जम बसेल. हळूहळू तुम्ही "फंडांमेंटल" वरून "टेक्निकल" वर शिफ्ट व्हाल. छान.
मग वसंतराव / रामराव बंद करा आणि आश्विनी गुजराल , सुदर्शन सुखानी ऊघडा.

मग एफ एन ओ ट्रेडींग करा. तेथे लग्ना आधी घटस्फोट घेता येतो. शॉर्ट सेल करण्याची आणि अफाट पैसे पि़कवण्याची नशा बेधुद करते. साहेब , कोडिंग , अन्युअल इन्क्रीमेंट सगळे चिल्लर मच्छर वाटू लागते. हे झाले तर मग मार्केट आपली करामत दाखवतो.
फार अहारी न जाता कुठे थांबायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

आणि म्हणूनच मी ही थांबतो.

* पटले तर आजचा शनिवार सत्कारणी लागला असे समजेन. नाही पटले तर अजून अभ्यास हवा हे समजेन.

खरच असहि करता येइल.
तसहि सोन वधारतच जाणार आहे.
हा हि सला मला आवडला.
धन्यवाद

मन१'s picture

10 Mar 2012 - 1:41 pm | मन१

FnO म्हणजेच Futures n Options ह्याबद्द्दल एक गमतीशीर विधान ऐकत आलेलो आहे:-
The person who takes futures is left with no option.
the person takes option has no future!!

आठवलं म्हणून लिहिलं, इतकच.
शेअर्स्,ट्रेडिंग बद्दल अभ्यासाभावी सल्ले देउ श्कत नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 1:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

Futures and Options ???
साहेब, त्यांना लग्न करायचे आहे, तुम्ही पार फोरास रोड ला नेऊन सोडलेत की हो त्यांना. ;-)

सोत्रि's picture

10 Mar 2012 - 3:06 pm | सोत्रि

हा हा हा,एक नंबर :)

- (लग्नसंस्थेवर विश्वास असलेला) सोकाजी

त्यातही शेयरबाजारात उतरायचं असेल तर आयसीआयसीआयडायरेक्ट किंवा तत्सम पॉर्टल वापरा. शेयर्स, एफएनओ, एफडी, बाँड्स, एमएफ्स अगदी सोन्यासकट सगळे काही घेता येईल.

एक अवांतरीत प्रश्ण : मध्ये काही महिलांना "डिरोगेटरी" आहे की काय ? ह्या धाग्यावर किती महिलांनी प्रतिसाद दिला असेल एवढा एक दुष्ट सवाल छळतो आहे बॉ.

चौकटराजा's picture

10 Mar 2012 - 2:24 pm | चौकटराजा

हेच तुम्ही त्या इचित्र आदितीला जौन इचारा ! म्हनाव आता का ?

पैसा's picture

10 Mar 2012 - 4:03 pm | पैसा

मला इंटरेस्ट आहे आणि मी ऑनलाईन ट्रेडिंगसुद्धा जमेल तेव्हा करते. पण शेअर्सच्या बाबतीत मी कुणाला सल्ला देत पण नाही आणि घेत पण नाही. लग्नाच्या बाबतीत पण तेच. प्रत्येकाने आपला निर्णय आपण घ्यावा. काही भानगड झालीच तर उद्या आपल्या कानी सात खडे!

तर्री's picture

10 Mar 2012 - 5:12 pm | तर्री

नियम अपवादने सिध्द होतात असे तर नाही ना.