भाजे लेणी. आंबेनळी, वाघजाई प्राचीन घाटवाटांच्या माथ्यावर मळवलीनजीक वसलेला महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन लेणीसमूह. ह्या पूर्वीच्या लेखात भाजे लेणीचा परिचय करून दिलाच आहे. त्यात ओझरता उल्लेख केलेल्या सूर्यगुंफेतील गूढ शिल्पाचा सविस्तर परिचय करून देण्याचा आता प्रयत्न करत आहे.
सूर्यगुंफा ही भाजे लेणीतील क्र.२० ची लेणी. जवळजवळ शेवटी असलेली. ओसरी, ओसरीवर असलेले खांब आणि आतमध्ये प्रशस्त विहार अशी याची रचना. ओसरीतच डाव्या बाजूच्या असलेल्या कक्षाच्या दोन्हीही बाजूंना हे शिल्पपट कोरलेले आहेत.
भारतीय शिल्पकलेतील हे एक सर्वाधिक चर्चेत असलेले शिल्प.
१. सूर्यगुंफा बाहेरून
डावीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष दोन स्त्रियांसहित चार घोडे असलेल्या रथातून एका वस्त्ररहित विशाल राक्षसीच्या अंगावरून दौडताना दिसतो.रा़क्षसीचे पाय हे उलट्या बाजूला वळलेले दाखविले आहेत. स्त्रियांपैकी एकीच्या हातात आहे छ्त्र तर दुसरीच्या हातात चामर. त्यांच्याबरोबरच काही अश्वारूढ स्त्रियाही दौडताना दिसतात. त्यापैकी एकीच्या पायात रिकीब दिसते. रिकीबीचे हे जगातील सर्वात प्राचीन दृश्य. भोवताली काही प्राणी सुद्धा कोरलेले आहेत.
२. डावीकडील शिल्पपट
३.रथाखाली तुडविली जाणारी राक्षसी
४. रिकीबीचे दृश्य(अत्यंत अस्पष्ट आहे)
उजवीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष हत्तीवरून जाताना दिसतो. त्याच्या मागे त्याचा सेवक हातात ध्वज धरून बसला आहे. हत्तीने त्याच्या सोंडेत एक झाड उपटून धरले आहे. ह्या शिल्पपटाच्या आजूबाजूला तर असंख्य शिल्पे कोरलेली आहेत. हत्तीच्या पायापाशीच पुढेच एक भव्य वृक्ष दाखवला असून त्याच्या शेंड्यांवर नगरजन विहरत आहेत. खालच्या बाजूला नर्तिका नृत्यमुद्रेत आहे. शेजारीच एक स्त्री तबला वाजवताना दाखवली आहे. त्यापुढे अनेक नगरजन विविध भावमुद्रांमध्ये दाखविलेले आहेत. इथेही हत्ती, गाय, सिंह इ. प्राणी कोरलेले आहेत. यातले तबल्याचे शिल्पसुद्धा फार महत्वाचे. तबल्याच्या अविष्काराचे श्रेय १३ व्या शतकातल्या अमिर खुस्रोकडे जाते. पण हे शिल्प बहुत प्राचीन. सुमारे २००० वर्षांपूर्वीचे. नि:संशय भारतीय जनकत्व सिद्ध करणारे.
५. गजारूढ राजा(सर्वात पुढे हत्तीच्या पायाजवळ विशाल वृक्ष व त्याच्या शेंड्यांवर बागडत असलेले प्रजानन आहेत.)
६. झाड सोंडेत पकडलेला हत्ती
७. विलासी नगरजन
८. तबल्याचे सर्वात प्राचीन दृश्य.
ह्या दोन्ही शिल्पपटांचा अर्थ आतापर्यंत वेगवेगळा लावला गेलाय. कुणी म्हणतात हे सूर्य आणि इंद्राचे शिल्प असावे. नाणेघाटातल्या शिलालेखात सूर्य, इंद्राला वंदन केलेले आहे. सूर्याच्या रथाचे घोडे जरी सात असले तरी प्राचीन काळच्या शिल्पांत ते चारच दाखवले जात. त्या दोन स्त्रियांना सूर्यपत्नी संज्ञा आणि छाया यांची उपमा दिलेली आहे. अधःकाररूपी राक्षसीचा तो जणू नाश करतच चाललेला आहे.
उजवीकडच्या शिल्पपटाला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राची उपमा दिलेली आहे. व सर्व नगरजन ही इंद्रप्रजा दर्शविली आहे.
पण बौद्ध लेण्यांत ही संकल्पना मान्य होण्याजोगी नाही. कारण ही लेणी सातवाहनांनी स्वतः खोदवलेली नाहीत तर त्यांच्या राजाश्रयाखाली बौद्ध श्रमणांनी खोदलेली आहेत.
कुणी म्हणतात की रथातून चाललेला राजा हा स्वत: गौतम बुद्ध असून गजारूढ योद्धा बुद्धशत्रू मार दाखवला आहे. पण मार हा शत्रू असूनही त्यांच्या युद्धकथांचे दाखले मिळत नाही.गौतमाला ज्ञानप्राप्ती होण्याच्या आधी त्याला निरनिराळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्याला मायेत गुंतवण्याचा प्रयत्न करणारा असेच माराचे स्वरूप निरनिराळ्या कथांत दाखवलेले आहे.
शिवाय हे शिल्प हिनयानकाळातले. त्याकाळी बुद्धाच्या मूर्तीपूजेला मान्यता नसल्याने ह्या शिल्पपटांचा हाही अर्थ मागे पडतो. मग हे शिल्प नेमके असावे तरी कशाचे.
काही संशोधकांनी एक वेगळीच उपपत्ती मांडली आहे. ह्या शिल्पपटांचा संबंध त्यांनी मांधाता राजाच्या प्राचीन कथेशी जोडला आहे.
महाभारत, बौद्ध जातक कथा, दिव्यावदान इ. साहित्यात उत्तर कुरु देशाचे वर्णन अत्यंत सुखी, समृद्द, कलाप्रिय व विलासी जनांचे निवासस्थान म्हणून आले आहे. मांधाता राजाने पृथ्वी पादाक्रांत केल्यावर मेरू पर्वतावरील उत्तर कुरुंचे राज्य जिंकण्याचा निश्चय केला. उजवीकडच्या शिल्पपटात तो हत्तीवर बसून उत्तर कुरुंवर स्वारी करण्यासाठी जाताना दाखवला आहे. त्या शिल्पपटाला पार्श्वभूमी म्हणून उत्तर कुरुंचे विलासी सुखी जीवन कोरलेले आहे. पुढ्यातल्या वृक्षाला कल्पवृक्ष असे मानण्यात आले आहे. इच्छा करताच सर्व उपभोग्य वस्तूंची-अलंकार, खाद्यपेये, वाद्ये इत्यादींची प्राप्ती झाल्यामुळे त्यांचे विलासी जीवन हे तिथल्या विविध शिल्पांद्वारे दर्शवलेले आहे. तर डावीकडच्या शिल्पपटात मांधाता देवासुरांच्या संग्रामात इंद्राच्या मदतीला बाजूने भाग घेण्याकरिता आकाशमार्गाने वाटेतल्या असुरांचा नाश करत जात असता दाखवलेला आहे.असुरांवर जय मिळवून मांधात्याने इंद्राच्या सुधर्मा सभेत प्रवेश केला असे दिव्यावदानात म्हटले आहे.
मांधात्याची ही कथा बौद्धांमध्ये फार प्रसिद्ध होती. अमरावतीच्या (प्राचीन नाव धेनुकाटक-आंध्र प्रदेश) स्तुपातल्या कठड्यावर इंद्राने मांधात्याचा सत्कार केल्याचे तसेच मांधात्याचे इंद्रपदाच्या लोभामुळे स्वर्गपतन झाल्याचे दर्शवले आहे.
ही दोन्ही लेणी समकालीन असल्याने भाजेतील शिल्पपट हा मांधात्याच्या कथेचा असण्याची उपपत्ती अधिक ग्राह्य मानली जाते.
९. अमरावतील स्तूपाचे दृश्य (विकीपेडीयाच्या सौजन्याने)
भाजे लेणीतील सूर्यगुंफेतील हा गूढ शिल्पपट आवर्जून बघावा असाच. अत्यंत प्राचीन असे हे लेणे आजही सालंकृतपणे सज्ज आहे.

वाचने
22900
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहीती आहे
+१ हेच म्हणते
In reply to छान माहीती आहे by अन्नू
वल्लीशेठ, बारकावे आधी
+१
In reply to वल्लीशेठ, बारकावे आधी by यकु
@बारकावे आधी पकडण्याच्या आणि
In reply to वल्लीशेठ, बारकावे आधी by यकु
गूढ आहे खरे
प्रसेनजिताच्या शिल्पाबाबतची
In reply to गूढ आहे खरे by चित्रा
प्रतिसाद दुरुस्त केला
In reply to प्रसेनजिताच्या शिल्पाबाबतची by प्रचेतस
माहुत

तुम्ही म्हणता तसे असूही
In reply to माहुत by चित्रा
काही संदर्भग्रंथ आणि मी
In reply to तुम्ही म्हणता तसे असूही by प्रचेतस
छान छान माहितीपूर्ण लेख!
छान.
चान चान !!
मावळात राहून सुद्धा !
वल्लींचा धागा आणि
वाह वल्लीशेठ
अगदी.. पूर्ण सहमत..
In reply to वाह वल्लीशेठ by झकासराव
>>>याच्यासोबत लेणी पाहणे हा
In reply to अगदी.. पूर्ण सहमत.. by गवि
निशब्द ... काही बोलु शकत
एकदम मस्त...विश्लेषण....
ज्यांना या विषयात रस आहे,
----/\---- साष्टांग नमस्कार.
शनिवार - रविवारी ठरवा रे..
In reply to ----/\---- साष्टांग नमस्कार. by मन१
लई भारी माहिती अन चर्चा,
उत्तम माहिती
वल्लीशेट, कुठून मिळवली ही
+१०
In reply to वल्लीशेट, कुठून मिळवली ही by पाषाणभेद
:)
In reply to +१० by बहुगुणी
वल्लिराव जबरा लिखाण.
वाहवा!
हेच..
In reply to वाहवा! by पैसा
छान च रे , ईंडियाना वल्ली !
काय बोलू इंडियाना जोन्स..................
खूपच
मस्त ... खूपच अभ्यासु लेख
सुंदर लेख व तितकीच सुंदर छायाचित्रे
वाह. झकास.
वल्लीशेठ, जबर लेख. तबल्याचा