Platanos Machos (मेक्सिकन फ्राईड बनाना)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
1 Feb 2012 - 8:16 am

झटपट होणारा हा चविष्ट पदार्थ आहे. आयत्यावेळी पाहुणे येणार /आले असतील तर करतायेण्यासारखा आहे :)

साहित्य:
२ साधारण पिकलेली केळी
२ टेस्पून बटर
१/२ वाटी संत्र्याचा रस
२ टीस्पून संत्र्याचे किसलेले साल
१-२ टेस्पून साखर (संत्री , केळी किती गोड आहेत त्याप्रमाणे घालावी)
१ टीस्पून दालचिनी पावडर
१-२ टीस्पून कंडेन्सड मिल्क (स्क्विझी वापरले तरी चालेल)
बदामाचे काप (तुम्ही कुठेलेही नट्स वापरु शकता अक्रोड, हेझलनट, काजु)

.

पाकृ:

केळ्याचे साल काढून त्याचे जाडसर तुकडे करावे.

.

पॅनमध्ये बटर गरम करावे व त्यात केळ्याचे तुकडे परतावे.

.

केळ्याचा रंग हलका सोनेरी झाला की त्यात संत्र्याचा रस ,संत्र्याचे किसलेले साल व साखर घालावी व अलगदपणे मिक्स करावे.

.

रस थोडा आटत आला की त्यात दालचिनीपूड घालावी व हलक्या हाताने मिक्स करावे.

.

मिश्रण कॅरेमलाईज्ड झाले की केळी सर्व्हींग प्लेटमध्ये काढावी. त्यावर बदामाचे काप पेरावे व कंडेन्सड मिल्क चमच्याने ड्रिझल करावे.

.

आवडत असल्यास व्हॅनिला आईस्क्रीमबरोबर किंवा व्हिप्ड क्रीमबरोबर सर्व्ह करावे. खरं सांगु का हे असेच नुसते खायला खुप चविष्ट लागतात. दालचिनी व संत्र्याचा स्वाद भन्नाट लागतो :)

.

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच भन्नाट पाकृ.

स्पा's picture

1 Feb 2012 - 8:46 am | स्पा

यम्मि

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2012 - 8:46 am | अत्रुप्त आत्मा

हाय...हाय....(शेवटचा फोटो)-खलास क्येलं-हाय
अता केळं आनंदानी ओरडणारं आज मी सुटलो... मुक्त जाहलो

अता केळं आनंदानी ओरडणारं आज मी सुटलो... मुक्त जाहलो

वारल्या गेलो आहे
=))
=))

कवितानागेश's picture

1 Feb 2012 - 9:14 am | कवितानागेश

केळे 'शेवटचा दिस गोड झाला' असे म्हणेल :)

जाई.'s picture

1 Feb 2012 - 11:23 am | जाई.

छानच दिसतोय पदार्थ

Maharani's picture

1 Feb 2012 - 12:29 pm | Maharani

जबरदस्त !!

सुहास झेले's picture

1 Feb 2012 - 2:43 pm | सुहास झेले

जबरदस्त !!!

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 2:45 pm | मेघवेडा

खल्लास!

प्रभाकर पेठकर's picture

1 Feb 2012 - 2:54 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आहे पाककृती. डॉक्टरांच्या आज्ञेत असल्याने पाककृती वाचण्यावरच समाधान मानून आहे.

दालचिनी व संत्र्याचा स्वाद भन्नाट लागतो.

आयला, केळे जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो,'दालचिनी, संत्रे भन्नाट.'

प्यारे१'s picture

1 Feb 2012 - 2:57 pm | प्यारे१

खल्लास......!
भन्नाटच लागणार.
मी इन्डियन वर्जन ईट्लेली. ;)

हसरी's picture

1 Feb 2012 - 3:25 pm | हसरी

बेस्ट!!

विशाखा राऊत's picture

1 Feb 2012 - 3:31 pm | विशाखा राऊत

पाहुणे कधीही आले तरी हे बनते ना :)

सानिका मला एक विचारायचे होते--संत्र्याचा रस fresh घालायचा की canned?? त्या ऐवजी variation\availability म्हणुन अननस रस घातला तर बरे लागेल का?? पण मग संत्र्याच्या किसलेल्या साली ऐवजी काय घालावे??

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 6:16 pm | मेघवेडा

अहो ज्या फळाचा रस घालाल त्याचीच साल किसून घालण्याची पद्धत आहे म्हणे, मेक्सिकोत. मीना प्रभूंना विचारा हवं तर.

Maharani's picture

1 Feb 2012 - 7:01 pm | Maharani

_/\_

मेव्या शहाळ्याच साल किसायला मदत हवी आहे. येतोस का?

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 8:41 pm | मेघवेडा

शहाळ्याचं साल मऊच असतंय. ते किसणं सोप्पंय. नारळासारखं कठीण नव्हे ते!

आणि ती पद्धत मेक्सिकोत आहे. तिथे कुठे आलीत आणि शहाळी!

शहाळ्याचं साल मऊच असतंय. ते किसणं सोप्पंय. नारळासारखं कठीण नव्हे ते!

ए येच मग... आल्या सरशी काही नारळ ही सोलून घेईन म्हणतो. ;)

मेघवेडा's picture

1 Feb 2012 - 8:53 pm | मेघवेडा

आण्भव हैच की मग! गुरूजनांकडून पावती मिळाली. म्यां भरून पावलो!

आणि तुमच्या आफ्रिकेत नारळाची सोलणी नसतीलच आमच्या कोकणासारखी? ती असतील तरच येतो हो. तुमच्या देशात नारळ हातांनीच सोलण्याची पद्धत आहे असं असं "नाय जेरि या टॉमची भीती!"या मीना प्रभूंच्या नव्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय असं म्हणाल्या त्या! ;)

त्यांच्याकडे नारळ मऊ असल्याने सोलणी नाहीत्.....तुमच्या कोकणासारखी.;)
तिकडचे टॉम जेरीस आलेत.

गणपा's picture

1 Feb 2012 - 9:00 pm | गणपा

तिकडचे टॉम जेरीस आलेत.

=))
हुच्च.

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2012 - 7:45 pm | सानिकास्वप्निल

संत्र्याचा रस ताजा घेतलेला जास्त चांगला :)
त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस पण साधारण केळी किती घ्याल त्याप्रमाणे घालावा म्हणजे २ केळी असतील तर १ टेस्पून वगैरे...फार नाही घालायचे आंबट होऊ शकतं.
लिंबाचे साल ही किसून घातले तरी चालेल
मुळ पाककृतीत संत्र्याचा रसचं वापरला असल्याकारणाने अननसाचा रस कसा लागेल सांगणे कठीण आहे :) बदल म्हणून घालून बघ :) साल लिंबाचे घाल :)

Maharani's picture

2 Feb 2012 - 1:00 pm | Maharani

नक्की!!प्रयोग करून बघेन व तुला सांगेन!! हो लिंबाचे घाल हा option चांगला वाटतोय ("मेघवेडा" यांनी दिलेल्या option पेक्षा :) )!!

सुहास..'s picture

1 Feb 2012 - 7:56 pm | सुहास..

महा आवडेश ..._/\_

हाटेलात असताना ह्याची एक डिश होती , हेच खाली पेरायचे काचेच्या गिल्लासात आणि वर एक स्कुप व्हनीला आणि थोडासा चॉकलेट सॉस .....ज ह ब ह रा दिसायचे !! चव तर ...सर्गातच !!

बाकी

त्यावर बदामाचे काप पेरावे व कंडेन्सड मिल्क चमच्याने ड्रिझल करावे ???

कंडेन्स्ड मिल्क चा फंडा नाय समजला !! कशासाठी ??

सानिकास्वप्निल's picture

1 Feb 2012 - 10:16 pm | सानिकास्वप्निल

अहो कंडेन्सड मिल्क ड्रिझल करण्याने केळ्याचा स्वाद चांगला खुलतो :)
मुळात मेक्सिकन लोकं ह्या पा़कृत त्याचा वापर हमखास करतात :)
तुम्हाला जर का हे वगळायचे असेल तर तुम्ही ते न घालता ही बनवु शकता...
हा आणी केळे अगदीच मऊ असल्याने कुठल्याही नट्स चा वापर केला तर त्यात एक क्रंच येते :)

मस्तच एकदम.... मधे मी पण असच केले होते...त्यात मी थोडी लाल मिरची बारीक कापुन आणि रम टाकली होती. केळे साखरेमधे कॅरॅमलाइज केले होते.. मग व्हॅनिला आइस्क्रिम सोबत सर्व्ह केले... मस्त लागत होते ते पण.... :)

मराठमोळा's picture

1 Feb 2012 - 8:49 pm | मराठमोळा

प्रेझेंटेशन मस्तच...
गोडधोड ठराविक प्रकारच आवडतात. पण हा प्रकार खाऊन पहावासा वाटला.. :)

दिसतय भारी.
पण(देवकी पंडीत फेम) गोड असल्याने आपला पास.

रेवती's picture

1 Feb 2012 - 8:53 pm | रेवती

याऽऽहू!
मस्त दिसतोय पदार्थ.
अगदी असा नाही पण याच्या जवळ जाणारा प्रकार खाल्लाय त्यामुळे चव काहीशी मनात आहे.

शुचि's picture

1 Feb 2012 - 11:34 pm | शुचि

अतिशय गोड!!!

निवेदिता-ताई's picture

1 Feb 2012 - 11:40 pm | निवेदिता-ताई

झकास......केळी आहेतच घरात....उद्याच बनवते..

प्राजु's picture

2 Feb 2012 - 9:11 am | प्राजु

आई शपथ्थ!!!
चला आणखी एक डेसर्ट मिळालं आमच्या पार्टीसाठी..

तू धन्य आहेस!!

इन्दुसुता's picture

5 Feb 2012 - 9:24 am | इन्दुसुता

छान पदार्थ. मी ह्यात मोठी केळी ( मराठीतले नाव विसरले) घालते, त्यानी वेगळी चव येते. ती केळी सुद्धा थोडीशी पिकलेली घेते आणि माय्क्रोवेव्ह मध्ये थोडी शिजवून घेते आधी.
असाच एक पदार्थ उपवासाला करतात मोठी केळी साजुक तुपात शिजवून, वर साखर आणि वेलची पावडर पेरून. वाढ्ताना दुध सोबत देण्याचा ऑप्शन असतो.