नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन

गणपा's picture
गणपा in पाककृती
7 Jan 2012 - 10:50 pm

आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.

या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).
थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.

चला तर मग लागुया तयारीला.

साहित्य :

२ वाट्या तांदुळ १/२ तास भिजत ठेवलेला. (इथे उकडा तांदुळ वापरला जातो. मी बासमती वापरलाय.)
२ मोठे कांदे.
२ मोठे टोमॅटो.
२-३ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट.
२ लहान गाजरं.
१ वाटी मटार दाणे.
४-५ पाकळ्या लसुण.
१/२ इंच आले.
२-३ लहान लाल बेल पेपर्स. (ज्या भुतलावरील काही अती जहाल मिरच्यांमध्ये मोडतात. पण त्यांचा एक भनाट गंध असतो.)
३-४ लहान सिझनिंग क्युब्स.
१ डाव तेल.

कृती :

टॉमेटोला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे सुरीने चरे पाडुन घ्यावे. मिरच्या स्क्युअर स्टिकमध्ये ओवून घ्याव्या.

एका भांड्यात पाण्याला उकळी आणुन मग यात हे टॉमेटो ब्लांच करुन घ्यावे.

टॉमेटो शिजतायत तोवर मिरच्या मधम आचेवर भाजुन घ्याव्या. भाजुन नंतर थंड झाल्यावर आतल्या बीया काढून टाकाव्या.

मिक्सरमध्ये १/२ कांदा, २ लसुण पाकळ्या, आलं, ब्लांच केलेले टॉमेटो (सालं काढूण टाकावी.) आणि भाजलेल्या मिरच्या टाकुन पातळ वाटुन घ्यावं.

एका भांड्यात १ डाव तेल तापवून त्यात २ पाकळ्या बारील चिरलेला लसुण आणि उभा/आडवा कापलेला कांदा टाकुन परतुन घ्यावं.

कांदा गुलाबी पारदर्शक झाला की त्या वर वाटलेले टॉमेटो आणि टॉमेटो पेस्टं टाकुन ५-१० मिनीटे परतुन घ्यावं.

सिझनिंग क्युब टाकाव्या. नसल्यास चवी नुसार मीठ, २ चमचे संडे मसाला (बाजारात रेडिमेड मिळतो) टाकावा.

भिजत ठेवलेला तांदुळ (पाण्या शिवाय) टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त ढवळा ढवळ केली तर भाताची कणी मोडेल.

अंदाजे तांदळाच्या १/२ इंच वर येईल इतपत गरम पाणी टाकावं आणि झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनीटे शिजू द्यावं. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा अंदाज घ्यावा. अगदीच गरज भासली तर थोडं गरम पाणी वाढवावं.

भात शिजतोय तोवर आपण पेप्पे चिकनची तयारी करु.

चिकनचा लेग पीस स्वच्छ धुवून कोरडा करुन घ्यावा. त्याला सुरीने २-३ ठिकाणी चरे द्यावे.

१ चमचा तेल + १ चमचा कायेन पेपर (ही तिखट नसते पण रंग बरा येतो. नसल्यास काश्मिरी लाल तिखटं) चवी नुसार मीठ + चिली फ्लेक्स् + सुकवलेली थाईमची पानं (चित्रात दिसत नाहीयेत, ति मी नंतर टाकली.) एकत्र करुन घ्यावी.

वरील मिश्रण चिकनला लावून ५ मिनीटे मुरू द्यावं. तोवर ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.

ओव्हन तापल्यावर त्यात चिकन ठेवून २५-३० मिनेटे शिजवून घ्यावं. शेवटची ३ मिनीटे. ग्रील मोड वर ठेवावं.
चिकन शिजतय तोवर आपल्या भाताचं काय झालय?

ह्म्मम्म पाणी बहुतेक आटत आलय भातही बर्‍या पैकी शिजत आलाय. आता त्यात गाजराचे तुकडे आणि मटार टाकुन हलक्या हाताने ढवळुन वरून झाकण लावून (सील बंद करुन) परत १५ ते २० मिनीटे आतल्या आत वाफेवर शिजू द्यावं.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

इथला जेलोफ राईस आणि चिकन पेप्पे कसं दिसतं याची कल्पना यावी म्हणुन इथल्या 'टँटेलायझर'या फुड चेन मधुन मागवलेली ही डीश.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आणि ही आहे आपण तयार केलेली.

दिसतेय की नाही हाटीलातल्या सारखी? :)

प्रतिक्रिया

जाई.'s picture

7 Jan 2012 - 10:55 pm | जाई.

मस्त दिसतोय पदार्थ

सुपर्ब !
हाटलीतल्यापेक्षा भारी दिसतेय तुमची डीश :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2012 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा

मी अभक्ष्य(क) नाही... पण तुमच्या धाग्याचं भक्ष्य नेहमी बनतो.. ;-) काय ती रचना मांडणी आणी सांगायचा प्रकार... मी पुर्वी दिलेलं नाव योग्यच आहे...आद्य खाद्य साहित्तीक श्री.गणपा भाऊ :-)

पैसा's picture

7 Jan 2012 - 11:22 pm | पैसा

एखाद्या रांगोळीसारखी सजावट केलीय. नाहीतर टोमॅटो राईस तो काय! उकड्या तांदळाचा टोमॅटो राईस करायची आयडिया आवडली. चिकनचा फोटो छान. आणखी काही म्हणू शकत नाही!

कुंदन's picture

7 Jan 2012 - 11:34 pm | कुंदन

अरे अजुन एक फोटो टाक सर्वात खाली , तुझ्या पायांचा .

प्रचेतस's picture

8 Jan 2012 - 12:03 am | प्रचेतस

अप्रतिम कलाकृती.

गाजराचे तुकडे अगदी एकसारखे केलेत.
सजावट भारी झालिये.
पदार्थ मौसाहारी ;) असल्याने आमचा पास.
अवांतर: मी पदार्थ पहात असताना मुलगा आला आणि तुझे चित्र पाहून विचारले की हा सिनेमात अ‍ॅक्टर म्हणून काम करतो का? मी नाही म्हटल्यावर "मग तो शेफ आहे का?" असे विचारले.

अग दोन शेपरेट रेसिप्या आहेत.
एक मांसाहारी तर दुसरी शाकाहारी. :)

बाकी अवांतर वाचून भारी गुदगुल्या झाल्या.

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 9:18 am | चिंतामणी

त्याला चेपुवरची चित्रे दाखव गणपाची. ;) ;-) :wink:

चिंतुकाका, अगदी हेच केले. मुलाला फेसबुकवर गणपाचे चित्र दाखवले. नंतर त्याने वडिलांना बोलावून गम्मत दाखवतो म्हणाला. एक माणूस दुसरीकडेही आहे आणि त्याने हेलीकॉप्टरमधून एका ब्रीजचा व्हिडीओ तयार केलाय असे सांगितले.;)
आम्हीही न हसता दाखवेल ते पाहिले.

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 5:42 pm | चिंतामणी

:) :-) :smile:

वा... काय मस्त दिसतय....... भन्नाट पाकृ.. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2012 - 12:47 am | बिपिन कार्यकर्ते

चिकन जौदे! पण हा राइस एकदा खायचाय! मात्र तिथे अशा ठिकाणी तो समोर आला होता की खायची हिंमत झाली नव्हती!

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2012 - 2:15 am | प्रभाकर पेठकर

पाककृती आणि 'देखो रे शान' (डेकोरेशन) अप्रतिम आहे. मुळ पाककृतीची शान वाढविणारे आहे. अभिनंदन.
छोट्या बेल पेपर्स शोधल्या पाहिजेत. इथे मिळतील असे वाटते आहे. मिळाल्या की पाककृती केलीच म्हणून समजा.

छोट्या बेलपेपरऐवजी मोठी १ रेड बेलपेपर वापरुन चालेल.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2012 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर

श्री. अमेरिकन त्रिशंकू ह्यांच्याशी सहमत. बेल पेपर म्हणजे भोपळी मिरची. ती कुठे एवढी तिखट असते?

अमेरिकन त्रिशंकू's picture

8 Jan 2012 - 6:46 pm | अमेरिकन त्रिशंकू

या फोटोतल्या मिरच्या हाबन्येरो पेपर्स आहेत बहुतेक. जगातल्या सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक.
बेल पेपर्स म्हणजे आपली भोपळी मिरची. फोटोमधली भोपळी मिरची नाही वाटत आहे.

अवांतर माहिती:
मिरच्यांच्या तिखटपणाचं एक परिमाण आहे. त्याला स्कोव्हिल स्केल असे म्हणतात. त्या स्केलवर आसाममध्ये मिळणारी भूत जलोकिया नावाची मिरची जगातली सगळ्यात तिखट मानली जाते.

अधिक माहितीसाठी बघा.
http://en.wikipedia.org/wiki/Scoville_scale

गणपा's picture

8 Jan 2012 - 6:59 pm | गणपा

या फोटोतल्या मिरच्या हाबन्येरो पेपर्स आहेत बहुतेक. जगातल्या सर्वात तिखट मिरच्यांपैकी एक.

बरोब्बर.
हाबन्येरो पेपर्स १००,००० ते ३५०,००० या गटात मोडते.

हि ती स्केल

या स्केल बद्दल माहिती इथे आणि हाबन्येरो पेपर्स बद्दल इथे.
सौजन्य : विकीपीडिया.

स्वाती२'s picture

8 Jan 2012 - 7:43 pm | स्वाती२

हबनेरो पेपर्सचा तिखटपणा अमेरिकन चवीला न झेपणारा त्यामुळे अमेरिकन व्हर्जन बरेचदा रेड बेल पेपर वापरुन केली जाते. तिखटपणासाठी झेपेल त्या प्रमाणात कायेन पेपर वापरतात.

अमेरिकन त्रिशंकू's picture

8 Jan 2012 - 8:27 pm | अमेरिकन त्रिशंकू

हाबन्येरो भाजून त्याच्या बिया, देठाकडचा आणि आतला भाग काढून टाकला तर तिखट्पणा खूप कमी होईल.
अर्थात अमेरिकन लोकांना हालापिन्योपण तिखट लागतात त्यामुळे काही सांगता येत नाही.

कौशी's picture

8 Jan 2012 - 3:05 am | कौशी

आणि झकास सजावट........

अप्रतिम!!!!!!!!

मराठमोळा's picture

8 Jan 2012 - 4:06 am | मराठमोळा

....._/\_...

दंडवत
:)

गणपा, तुमच्या प्रत्येक पाक्रु नुसत्या चवदारच नसतात तर डोळ्यांनाही मेजवानीचे सुख देतात. अभिनंदन.

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 9:07 am | चिंतामणी

अन्न हे प्रथम डोळ्यांनी खाल्ले जाते, मग जिभेने नंतर चावुन खाल्ले जाते.

तुझ्या पाकृ नयनसुख देतातच. पण त्या जास्त सोप्यापध्दतीने आणि फारसा फाफट पसारा न घालता सांगीतलेल्या असतात.

बाकी अजून काय बोलणार.

__/\__

डोळ्यांनी नेहमीच खात आलो आहोत. आता वाट बघ आहोत जिभेने नंतर चावुन खाण्याची.

:bigsmile:

वेताळ's picture

8 Jan 2012 - 12:49 pm | वेताळ

.......

मन१'s picture

8 Jan 2012 - 1:15 pm | मन१

कोंबडीस विनम्र श्रद्धांजली....

प्यारे१'s picture

8 Jan 2012 - 1:32 pm | प्यारे१

कोंबडी तंगडी घेऊन पळू न शकल्याने कोंबडीवर जी वेळ आलेली आहे ती आपण पाहतो आहोतच.... ;)
बाकी भात अप्रतिम.

सगळ्यात भारी म्हणजे गणप्या सगळ्या पाकृ डेकोरेट इतक्या मस्त करतो की त्याचा स्वयंपाककलेवर असलेला जीव नुसता दिसत नाही तर समजतो देखील.
उद्या गणपानं शिळ्या भाकरीचे तुकडे (पर्टिक्युलर शब्द आहे आठवत नाहीये वयोमाणाणुसार)जरी केले तरी भन्नाट करेल यात शंका नाही.

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 5:16 pm | चिंतामणी

म्हणजे गणपानं शिळी भाकरी कुसकरली

:) :-) :smile:

सुहास झेले's picture

8 Jan 2012 - 1:52 pm | सुहास झेले

आयचा घोव.... भन्नाट पाककृती..... प्रचंड आवडली :) :)

स्वाती दिनेश's picture

8 Jan 2012 - 4:42 pm | स्वाती दिनेश

अरे, हाटेलपेक्षा तू केलेला राईस आणि चिकन भारी दिसत्येय.
(ही स्पेशल नायजेरियन डिश करुन बघणारच.. )
स्वाती

स्मिता.'s picture

8 Jan 2012 - 5:02 pm | स्मिता.

गणपाभाऊ, पाकृ बाघूनच खपलेय!
आजकाल तुम्ही टाकलेल्या पाकृ घरी करायची इच्छाच होत नाही... इथे फोटू पाहूनच मन तृप्त होते!
आणि तेवढ्या परफेक्शनने त्या मला बनवता येत नाहीत ;)

स्वाती२'s picture

8 Jan 2012 - 5:39 pm | स्वाती२

फोटो पाहूनच मन तृप्त झाले!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2012 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंपाशेठ, आता तुम्ही तुमच्या पाककृतीचं एक पुस्तक आमच्या डोळ्यादेखत येऊ द्या.
मग आम्ही........ :)

-दिलीप बिरुटे
( गंपाचा फॅन)

सानिकास्वप्निल's picture

8 Jan 2012 - 7:57 pm | सानिकास्वप्निल

भारीच पा़कृ आहे नक्की नक्की करून बघणार
:)

गणपाची एक एक पाककृती म्हणजे लतादीदींनी गायलेले एक एक गाणे असा प्रकार आहे.
ह्याच्या करामतीवर काय प्रतिसाद द्यावा हेच मुळी कळत नाही.

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Feb 2012 - 9:14 am | श्रीयुत संतोष जोशी

लई झ्याक झालंय .

तर्री's picture

11 Feb 2012 - 9:58 am | तर्री

खंग्री...बस्स.