स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
4 Oct 2011 - 10:32 pm
गाभा: 

ग्रीक लोककथेत एक तरुण आपले प्रतिबिंब तलाव जलात बघतो व स्वतःच्या सौंदर्यावर मोहित होतो..
रोज येवुन तलावातल्या प्रतिबिंबास न्यहाळणे हा त्याचा छंद बनतो...
ह्या मानसिक वेडाला वा अवस्थेला नार्सिसस . / नार्सिसिझम असेही नाव आहे..
असे स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक..यांना स्वतः शिवाय /व्यतिरिक्त दुसरी दुनिया नसते..
हे लोक स्वतःची तारीफ..मोठेपणा इतरा कडुन ऐकण्यात धन्यता मानतात..
सतत सर्व ठिकाणी माझाच विषय चर्चेला असावा अशी मानसिक बैठक असते..
मी म्हणेल ते खरे..त्यांच्या मताची शहानिशा करणे त्यांना मंजुर नसते.
एखाद्या साध्या घरगुति कार्य क्रमास जरी हे लोक गेले तरी उत्सव मुति पेक्षा यांच्या कडे जादा ध्यान द्यावे अशी अपेक्षा असते..
ह्यांच्या हो ला हो मिळवला कि गडी/वा सखी खुश..
ज्याला रूढ अर्थाने नार्सिस्टिक व्यक्तिमत्व म्हणता येईल त्यात आढळणारे स्वभावविशेष असे वाचण्यात आले-
१) हे लोक वास्तवात आहेत त्यापेक्षा स्वतःला जास्त महत्वाचे समजतात
२) यांच्या ठायी संवेदनशीलता अत्यंत कमी असते किंवा जवळ जवळ नसते
३) समोरच्या व्यक्तीच्या केंद्रस्थानी फक्त आपण आणि आपणच असावे ही यांची तीव्र गरज असते
४) दुसऱ्यासाठी सह - अनुभूती नसते आणि दुसऱ्याला वापरून (शोषण करणे ) घेतात
५) दुसऱ्याचा हेवा करण्याची मनोवृत्ती आणि उद्धटपणा असतो
६) यांना वारंवार औदासिन्य येते (जरी दाखवत असले वा नसले )
७) सतत मनात पुढील गोष्टींबद्दल स्वप्नरंजन सुरु असते - अनिर्बंध सत्ता , सौंदर्य , बुद्धिमत्ता , यश , आदर्श प्रेम.....
यांची मानसिकता फक्त स्वतःच्या सौंदर्याशीच निगडीत नसते , तर त्यात या सर्व गोष्टी कमी - अधिक तीव्रतेने येतात ..
अश्या व्यक्ति समाजात/परीवारात/परिचयात सा~यांनाच आढळतात...

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

5 Oct 2011 - 12:19 am | आत्मशून्य

जे.के. रोलींगने एक मस्त कंन्सेप्ट लिहून तीच्या पहील्या पूस्तकातच मला अक्षरशः वेडं केलं...

Erised Mirror या आरशामधे प्रत्येकजण स्वतःच्याच सर्व इच्छा ("deepest and most desperate desire of ones heart.") पूर्ण होताना बघतो... पण ते फक्त त्या अरशात दीसत असतं... प्रत्यक्षात कधीच घडत नसतं.... हॅरीला फार चांगला सल्ला दीला जातो , की त्या आरशाच्या नादाला अजिबात लागू नकोस... कारण लोकं त्यासमोर आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दीसतात म्हणून तासन तास बघत बसून कायमचे वेडे झालेले.. आहेत... तेव्हां थोडं जपूनच... हेच ते स्वतःच्या प्रेमात पडलेले लोकं...

अर्थात अशा वेडेपणाची छोटीशी झाक माझ्यामधेही आहेच :)

पण एकूणच असे बरेच सेल्फ सेंटर्ड अथवा आत्मकेंद्रीत व्यक्ती समाजात मूबलक प्रमाणात आढळतातच. आपण स्वभावविशेष मात्र फार सूटसूटीतपणे नोंदवले आहेत.

जयंत कुलकर्णी's picture

4 Oct 2011 - 11:09 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
आपल्या धाग्यावर प्रथमच प्रतिक्रिया देत आहे कारण आपण दिलेली माहीती मला नवीन आहे आणि अशी एक व्यक्ती माझ्या पहाण्यात आहे नव्हे ती माझी जिवलग मित्रही आहे. त्याच्या स्वभावाला काय म्हणावे हा प्रश्न मला अनेक दिवस छळत होता तो तुम्ही चुटकिसरशी सोडवलात !

धन्यवाद !
:-)

विजुभाऊ's picture

5 Oct 2011 - 4:03 pm | विजुभाऊ

जयंत अशा बर्‍याच व्यक्ती तुम्हाला इथेही पहायला मिळतील. ;)

या लोकांचा मानसिक प्रॉब्लेमच असतो.

तुम्ही म्हणाला स्वप्नरंजन तेही खरे आहे.

समोर एक गोष्ट डोळ्यांनी पहात असले तरी, मनात काही वेगळेच विचार असतात.

लोकांच्या लेखनातून त्यांचे मन वाचण्याचा प्रयत्न केला असता असे दिसते, काही लोक
विषय काहीही असला तरी एकच प्रतिक्रिया देतात.

लिखाणातून भावनांना आऊटलेट मिळवण्याचा प्रयत्न करतात.

चित्र आंतरजालावरून साभार -

काका, आपल्या सारखे उदाहरण डोळ्यासमोर असतांना दूसरा कश्याला बघायचा.;) ;-) :wink:

धनंजय's picture

5 Oct 2011 - 12:20 am | धनंजय

वरील स्वभाववैशिष्ट्यांची यादी कोणी वापरायची आहे - निर्सिसिस्टिक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःच्या संरक्षणाकरिता, सजग होण्याकरिता... की प्रत्येकाने आपली स्वतःची "मी नार्सिसिस्टिक आहे काय?" अशी चाचणी करण्याकरिता?

अशी व्यक्ती आपल्या ओळखीची असली, तर त्यांच्याशी आपण काय व्यवहार करावा?

अशी व्यक्ती आपणच आहोत असे लक्षात आले, तर काय करावे? नार्सिसिस्टिक असण्याचे असे कुठले ठळक तोटे आहेत काय - की जेणेकरून स्वभावात बदल करण्यास आपण उद्युक्त होऊ? (यादीमध्ये एकच दु:खद कलम आहे : औदासिन्य. बाकी सर्व स्वभाववैशिष्ट्ये तशीच ठेवून औदासिन्याबाबत आत्मोद्धार करता येईल काय? की बाकी कलमे शाबूत असली, तर औदासिन्याशिवाय पर्याय नाही?)

ही घ्या नार्सिससच्या प्रतिबिंबाची लावणी

आजानुकर्ण यांनी नार्सीसीस चा उल्लेख या लेखात केला आहे. तो उतारा वेधक आहे. खाली देत आहे -

नार्सिससची कथा: नार्सिससची कथा ही अभिजात ग्रीक कथा असल्याने सामान्यजनांना माहिती नसावी. नाही तर त्याला अभिजात कसे बरे म्हटले असते? पुराणकाळातील हृतिक रोशन शोभावा असला राजबिंडा हा तरूण. वर्णन बरेचसे मंदोदरीसारखेच. म्हणजे रेशमी कुंतल, चाफेकळी नाक वगैरे. फक्त त्याची शरीरयष्टी बलदंड असावी. त्याला सिक्स प्याक ऍब्जही असावेत. शाहरूखखानपूर्वी अशी शरीरयष्टी लाभलेला केवळ नार्सिससच. स्वत:चे रूप कधीही न पाहिलेल्या या तरूणाचे (म्हणजे नार्सिसचे. शाहरूखचे नव्हे!) सौंदर्य अगदी मंत्रमुग्ध करणारे होते.

नेहमी सूर्योदयापूर्वी उठणारा नार्सिसस रात्री जास्त 'झाल्यामुळे' सकाळी उशीरा तळ्यावर गेला. (कशाला ते विचारू नका! घाणेरडे कुठले!) आणि स्वत:चे रूप त्याने प्रतिबिंबरूपात तळ्यामध्ये पाहिले आणि काय हो आश्चर्य. स्वत:च्याच रुपाच्या प्रेमात पडून तो तळ्यात पडला. कारण काय तर 'चड्डीत राहा ना भो!' असे सांगणारे मित्र त्याला मिळाले नाहीत!

मन१'s picture

5 Oct 2011 - 7:51 am | मन१

असे लोक भेटतात. स्वतःवर बेहद्द खुश असणारी बरीचशी मंडळी ह्या क्य्टॅगरीत येतात. बाकी, आजानुकर्णाचा परिच्चेद मी देणारच होतो, तो आधीच शुचितैंनी देउन ठेवलाय.
जुन्या जमान्यातले एक प्रचंड यशस्वी हीरो नव्वदीला टेकायची वेळ आली तरी जुन्या काळातल्या सारखेच रहायचा प्रयत्न करतात, त्यांना बघून वाईट वाटते. हे ही नार्सिसिस्ट असतील काय हो?

प्रदीप's picture

5 Oct 2011 - 4:20 pm | प्रदीप

जुन्या जमान्यातले एक प्रचंड यशस्वी हीरो नव्वदीला टेकायची वेळ आली तरी जुन्या काळातल्या सारखेच रहायचा प्रयत्न करतात, त्यांना बघून वाईट वाटते. हे ही नार्सिसिस्ट असतील काय हो?

तसे असेल असे वाटत नाही. ते फक्त स्वत:पुरते कार्यरत रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपट दिग्दर्शन व अभिनय ह्या गोष्टींतच ह्या व्यक्तिने आपले आयुष्य व्यतित केले. वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आले, तरीही ते थांबले नाहीत. गेले अनेक दशके त्यांचे चित्रपट अत्यंत सुमार दर्जाचे बनत आहेत, त्यांचा अभिनय एकसुरी व जुन्याट वळणाचा आहे, असे इतरांचे मत असले तरी ते तसलेच चित्रपट काढतच आहेत, तसलाच अभिनय करीत आहेत, कारण इतर काही करणे त्यांना माहिती नाही. स्वतःचे उर्वरीत जीवन स्वतःला ठाऊक असलेल्या एकमेव मार्गावरून जात ते पुढे चालले आहेत. थांबलो तर काय होईल अशी त्यांना भीति वाटत असावी. इतकाच काय तो अर्थ मी त्यांच्या वर्तनातून घेतो. अशी अन्यही माणसे समाजात असतात. जुन्या वळणाच्या मराठी संगीत रंगभूमीशी प्रचंड निष्ठा ठेऊन तसल्या नाटकांतून कामे करणे, तसली गाणी गाणे असे करणारे काही जण ह्यातच मोडतात. ह्या सगळ्यात नार्सिसिझम नाही. आहे, ते केवळ इतरांना त्रास न देता, रडारड न करता, आनंदाने जगत रहाण्याची धडपड. मला हे स्त्युत्य वाटते.

बरेच जण का, जवळ जवळ प्रत्येक जणच असा असतो, आणि असावंच असं एखाद्या दिवशी त्या शिवाय स्वप्नं पाहताच येणार नाहीत, मोठं होताच येणार नाही,

दिवसा उघड्या डोळ्यांनी केलेल्या स्वप्नरंजनाचा काही भागच मनात किंवा मेंदुत कोरुन ठेवला जातो,

मग मेंदु आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा संबंध या बरोबर जोडायला सुरु करतो आणि ह़ळु हळु आपल्या नकळत आपण वरवर मानत असलेल्या ध्येयाकडे वाटचाल करत असतानाच कधीतरी एका वळणाच्या मागुन दिसतं की कधीतरी पाहिलेलं स्वप्न आज ध्येय म्हणुन समोर आलंय, जवळ आहे, आवाक्यात आहे आणि मग सध्याच्या रहाटगाडग्यातुन बाहेर पडुन आपण ते साध्य करतो, त्याचा बाकी कुणालाच काही फायदा नसतो, आनंद सुख फक्त आपल्यालाच असतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मिळतो तो ध्येयपुर्तीचा आनंद आणि आत्मविश्वास, ध्येय मिळवण्याचा.

आता फरक पडतो तो इथुन पुढं, या आत्मविश्वासाचा उपयोग जर सर्वसामान्य स्वप्नं पुर्ण करण्यासाठी केला गेला तर आपलं अन सगळ्यांचच आयुष्य सुखी होउ शकते, पण स्वताच्याच प्रेमात पडलेली माणसं पुन्हा फक्त स्वताचीच स्वप्नं पुढं रेटायला लागतात अन त्याचा त्रास त्यांच्या कुटंबाला होउ लागतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2011 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. माहितीपूर्ण लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

5 Oct 2011 - 10:13 am | मदनबाण

ह्म्म्म... असे लोक पाहिले आहेत/ पाहतोय ! पण या प्रकाराला नार्सिसिझम म्हणतात हे आज कळले.
मेंदुत केमिकल लोच्या झाल्यास असे घडत असावे काय? असे वाटले. जास्त काळ एकांतवास किंवा एकलकोंडेपणा ही त्याची कारण असावी काय? असा देखील प्रश्न मनात आला.सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे लक्ष वेधुन घ्यावेसे अश्या व्यक्तींच्या बाबतीत घडतं असावे असे देखील वाटते.
अशी व्यक्ती आपल्या ओळखीची असली, तर त्यांच्याशी आपण काय व्यवहार करावा?
धनंजयरावांच्या प्रतिसादात असलेला हा प्रश्न,मला देखील पडला आहे.

(प्रेम ग्रस्त) ;)

जे.पी.मॉर्गन's picture

5 Oct 2011 - 11:01 am | जे.पी.मॉर्गन

बहुतेक सगळे चित्रपट कलाकार ह्या कॅटेगरीत येतात असं माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित ती त्या व्यवसायाची गरज असावी आणि मुळात माणसं म्हणून सगळे चांगले असतील. पण ह्याच एका गोष्टीमुळे ती जमातच समहाऊ डोक्यात जाते.

जे.पी.

शाहिर's picture

5 Oct 2011 - 3:08 pm | शाहिर

एक मि पा कर स्वतःच्या प्रेमात पडलेले आहेत ..
त्यांना दुसर्यानी सांगितलेले पटतच नाही ..
मि च तो खरा
..हवे तर थोडे गुगळून बघा ;)

ऋषिकेश's picture

5 Oct 2011 - 4:18 pm | ऋषिकेश

नर्सिसस वाचले की मला खूप पूर्वी आजानूकर्णाने लिहिलेले (व प्रसिद्ध केलेले) चड्डीत रहाणे आठवते व आजही आठवले :)

बाकी अश्या व्यक्तीही सर्वत्र भेटतात हे खरेच!

बर्‍याच दिवसांनी चड्डीत रहा ना भौ वाला धागा वाचून सुरवातीच्या काळच्या मिपाच्या स्वरूपाची पुनरभुती मिळाली.

तिमा's picture

5 Oct 2011 - 7:07 pm | तिमा

अशा व्यक्तिंना दोष देता येणार नाही कारण हा एक मानसिक रोग आहे.
लहानपणापासून अति लाड केल्याने पण अशी अवस्था अनेकांना येते.

आनन्दा's picture

16 Nov 2012 - 3:58 pm | आनन्दा

+१

अविनाशराव, ओशोचं कोणतं व्याख्यान ऐकलंत म्हणे?

पैसा's picture

5 Oct 2011 - 10:37 pm | पैसा

आणि कुलकर्णी साहेबानी मोठे लेख लिहायचं चांगलंच मनावर घेतलय आता.

आशु जोग's picture

5 Oct 2011 - 11:03 pm | आशु जोग

>> एक मि पा कर स्वतःच्या प्रेमात पडलेले आहेत ..
त्यांना दुसर्यानी सांगितलेले पटतच नाही ..
मि च तो खरा
..हवे तर थोडे गुगळून बघा <<

शाहीर नावाचे सदश्य,
अहो

सध्या मिसळीची साफसफाई चालू आहे.
तेव्हा इथे प्रतिसादातून घाण नका बुवा करू
तूमी लोक का वातावरण गढूळ करताय

हवे तर थोडे गुगळून बघा

ध चा मा केल्याने इतिहास बदलला होता हे इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं. ल चा ळ केल्यानेही अर्थ बदलण्याची शक्यता असते हे जालावर कळले. ;)

चेतन सुभाष गुगळे's picture

7 Oct 2011 - 1:12 pm | चेतन सुभाष गुगळे

<<सध्या मिसळीची साफसफाई चालू आहे.
तेव्हा इथे प्रतिसादातून घाण नका बुवा करू
तूमी लोक का वातावरण गढूळ करताय >>

जोग साहेब, अशा घाण प्रतिसाद देणार्‍यांचीही एक कॅटेगरी असते - दुसर्‍याचा द्वेष करणारे अशी. स्वत:वर प्रेम करणार्‍यांपेक्षा हे कधीही जास्तच धोकादायक. अर्थात आपण कितीही इच्छा व्यक्त केली तरी हे सुधारणार नाहीतच...

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2011 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा

@-स्वतःच्या प्रेमात पडलेले लोक

खरं तर हे असं पाहीजे > स्वतःच्या प्रेमात-पडलेले लोक ;-)

क्रेमर's picture

8 Oct 2011 - 12:45 am | क्रेमर

स्वतःच्या प्रेमात
आआआआआआआप
आआआआआआआआड
आआआआआआआआआले
आआआआआआआआआआले
आआआआआआआआआआआआलोक
असे असायला हवे होते.

धनंजय's picture

8 Oct 2011 - 3:55 am | धनंजय

आआआआआआआआआआआआआलोक.
आआआआआआआआआआआले
आआआआआआआआआआले
आआआआआआआआआढ
आआआआआआआआच
स्वतःवर प्रेमाची नशा

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2011 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा

स्वतःवर प्रेमाची नशा.... धनंजय... स्वतःवर नाही रे...स्वतःच्याच प्रेमाची नशा...

अत्रुप्त आत्मा's picture

8 Oct 2011 - 8:55 am | अत्रुप्त आत्मा

क्रेमर--- असे असायला हवे होते.... क्रेमर तुंम्ही शब्द अक्षरशः पाडलात... मी अक्षरांमधुन शब्दशः पाडलं... ;-)

स्वत्॥चीच निर्मिती असलेल्या कार्यक्रमात स्वत्।लाच महागुरू म्हणवून घेणारे कदाचित या प्रकारातले असावेत.

रविंद्र गायकवाड's picture

13 Nov 2011 - 10:20 am | रविंद्र गायकवाड

नुकत्याच म्हणजे ३-४ वर्षापुर्वी सामोरे गेलेल्या मानसशास्त्रिय व्यक्तिमत्व चाचणिच्या निष्कर्शानुसार मी नार्सिसिस्ट आहे. जरा जपून.

वाहीदा's picture

13 Nov 2011 - 7:11 pm | वाहीदा

मानसशास्त्रिय व्यक्तिमत्व चाचणिच्या निष्कर्शानुसार मी नार्सिसिस्ट आहे. जरा जपून.

असाल तुम्ही नार्सिसिस्ट .. मग त्यासाठी मिपाकरांनी का बरे जपून रहावे ?
(तुमचे वाक्य काही पटले नाही )

मृदुला सूर्यवंशी's picture

17 Nov 2012 - 3:21 am | मृदुला सूर्यवंशी

आणि अशी मंडळी आपल्यालाच का भेटतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. चेपुवर रोज स्वत:चे प्रोफाईल पिक्चर बदलणारी मंडळी पण मला याच वर्गात मोडणारी वाटतात मला...

केदारविदिवेकर's picture

17 Nov 2012 - 12:12 pm | केदारविदिवेकर

प्रत्येकाच्या ओफ्फिस मधला बौस असाच असतो

चित्रगुप्त's picture

20 Nov 2012 - 4:26 am | चित्रगुप्त

नार्सिसस या तरुणाची विविध चित्रकारांनी काढलेली (अर्थात काल्पनिक) चित्रे उपलब्ध आहेतः
१. चित्रकारः John William Waterhouse चित्राचे नावः Echo And Narcissus
nar1

२. चित्रकारः Costanzi(narcissus and echo)

nar2

३. चित्रकारः François Lemoyne
nar3

४. चित्रकारः Lépicié, Nicolas-Bernardt (Narcisse - 1771)
nar4

५. चित्रकार; Nicolas Poussin (Echo and Narcissus)
nar5

६. पॉम्पेइ या रोमन शहरात भिंतीवर चित्रित केलेला नार्सिसस :
nar6

'एको' ही अप्सरा नार्सिसस च्या प्रेमात पडली होती, परन्तु तिचे प्रेम सफल झाले नाही, आणि एका शापामुळे तिला बोलता येइनासे झाले. तिला फक्त इतरांनी बोलल्याचा 'प्रतिध्वनी' फक्त काढता येत असे. तिच्यामुळे 'एको' हा शब्द 'प्रतिध्वनी' या अर्थाने रूढ झाला.